शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या.


संत जनाबाई

जन्म

अंदाजे इ.स. १२५८

गंगाखेड

मृत्यू

अंदाजे इ.स. १३५०

राष्ट्रीयत्व

भारतीय

नागरिकत्व

भारतीय

वडील

दमा

आई

करुंड

जीवन

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.


बालपण

परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.


आयुष्य

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.


‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.[१]


संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.


संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारीपद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)


जनाबाईंवरील पुस्तके/व्हीडिओ/चित्रपट

ओंकाराची रेख जना (चरित्रवजा कादंबरी; लेखिका - मंजुश्री गोखले)

संत जनाबाई (लेखन - संत जनाबाई शिक्षण संस्था; प्रकाशन - डायमंड पब्लिकेशन्स)

संत जनाबाई (सुहासिनी इर्लेकर|डाॅ. सुहासिनी यशवंत इर्लेकर]]; पुस्तक आणि त्याची पीडीएफ आवृत्ती; महाराष्ट्र सरकार प्रकाशन)

संत जनाबाई चरित्र (बालसाहित्य; लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)

संत जनाबाई जीवन चरित्र (व्हीडिओ; दिग्विजय बाबर)

संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट; लेखन, दिगदर्शन - राजू फुलकर)

संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट (१९४९); दिग्दर्शक - गोविंद बी. घाणेकर; प्रमुख भूमिका - हंसा वाडकर)

संत जनाबाई अभंग गाथा (संपादक - नितीन सावंत)

संत जनाबाई - अभंग संग्रह १ ([१])

संत जनाबाई - अभंग संग्रह २ ([२])


संत वाटीकीतील 'जाईची वेल' असे वर्णन संत जनाबाईचे केले जाते. त्या स्वतःला 'नामयाची दासी जनी' म्हणून घेत असत. त्यांचा जन्म अंदाजे इसवी सन १२५८ असा सांगितला जातो.  दमा- कुरुंड या दाम्पत्याच्या पोटी झाला.  मृत्यू अंदाजे १३५० मानला जातो. त्यांचा जन्म मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचा. वयाच्या सहाव्या वर्षी जनी अनाथ झाली. त्यांच्या संदर्भात काही दंतकथा ही प्रसिद्ध आहेत. वारीला पंढरपूरला दमा आणि कुरुंद दापत्य गेले; तेव्हा दमा आणि दामा नावातील सारखेपणामुळे एका व्यक्तीने हरवलेल्या या जनाबाईला दामाशेटी या शिंप्याकडे नेऊन सोडले आणि त्यांच्याच घरी ती वाढली. जनीच्या आई-वडिलांनी म्हणजे दमा आणि कुरुंड यांनी दामाशेट्टी यांच्याकडे कामासाठी जनाबाईला पाठवले  अशीही दंतकथा सांगितली जाते. नामदेवांना जनाबाईंनी कडेवर खेळवण्याची उल्लेख त्यांच्या अभंगांमध्ये आहे. जनी म्हणजे स्त्रियांचा समूह होय. 'जनी' ही लाख स्त्रिया आहेत याचे व्यक्तिमत्व यांच्यात आहे. संत जनाबाई वर अनेक जात्यावरील ओव्या लिहिल्या. कोकणापासून दख्खन पर्यंत सर्व ठिकाणी त्यांच्यावर जात्यावरील ओव्या लिहिल्या गेल्या.  महाराष्ट्रातील सर्व स्त्रियांचे प्रतीक म्हणजे '' असेही म्हटले जाते. सर्व संतांचे नाव प्रतीकात्मक आहे. जनी नाव हे प्रतिकात्मक आहे. तीचे चरित्र हे ओव्या मधून चित्रित झालेले आहे. अप्रतिम असे हे व्यक्तिमत्त्व होते. संत जनाबाईचा विठ्ठल हा देव नसून एक माणूस आहे. संत जनाबाईंना विठ्ठल सर्व कामात मदत करतो. त्या स्वतः विठ्ठलाला चोर ठरवितात. विठ्ठलाला शिव्याही घालतात. इतकं अतूट प्रेम त्यांचे विठ्ठलावर आहे. त्यातून त्यांचा प्रेम कलहच व्यक्त होतो. नामदेवांचे गुरु विसोबा खेचर- ज्ञानदेव. आणि ज्ञानदेवांचे शिष्य निवृत्तीनाथ अशी गुरुपरंपरा आपल्याला सांगता येते. रुक्मिणी म्हणती 

विठ्ठल मवा कुठे गेला दासी जनीने गोविला

 शेणापाण्याला लाविला

 जनीने त्याला बांधून शेण्यापाण्याला लावले असे म्हणते. असे चमत्कारिक वर्णन अभंगात केलेले आहे. संत जनाबाई ग्रंथ प्रामाण्यापेक्षा अनुभवावर अभंग लिहित म्हणून त्या सर्वांच्या आवडत्या झाल्या. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर 

झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी पाटी घेऊन या सिरी नेऊन या टाकी दूरी ऐसा भक्तास भुलला नीच कामे करू लागला 

जनी म्हणे विठोबाला काय उत्तर आहे हो तुला संत जनाबाई विठ्ठल भक्ती त्या इतक्या तल्लीन होऊन जात असत की प्रपंच किंवा प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना कामात सहाय्यक करीत असे. संत नामदेव हे विठ्ठल भक्त असल्यामुळे जनाबाईनाही विठ्ठलाच्या भक्ती विषयीची गोडी निर्माण झाली. त्यांना संत संग हा नामदेवामुळे लाभला.  

  आज त्यांच्या नावावर जवळपास ३५० अभंग सकलसंतगाथा या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. त्याचबरोबर त्यांचे बालक्रीडा, प्रल्हाद चरित्र, कृष्णजन्म, थाळीपाक या विषयावर जनाबाईचे अभंग आहेत.  तसेच हरिश्चंद्राख्यान रचना सुद्धा जनाबाईंनी लिहिल्या. मनाची कोमलता, उत्कट विठ्ठलभक्ती, परमेश्वर प्राप्तीची अर्थता व तळमळ वात्सल हे त्यांच्या अभंगामधून पुत्र पाहायला मिळते पंढरपूर या तीर्थस्थळी विठ्ठलाच्या महाद्वारी जनाबाई सन १३५० रोजी आषाढ कृष्ण त्रयोदशीला समाधीस्थ झाल्या. अतिशय अवघड अभंग अक्षरांचा अंकांचा खेळ ही कोडे असा अभंग आज आपण पाहणार आहोत.

 बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुराया पाशी या अभंगात संत जनाबाई अद्वेताचा सिद्धांत मांडतात. सगळ्या विश्वाच्या पलीकडची निर्गुणाची अवस्था कशी आहे. सर्व विश्वामध्ये एक तत्त्व आहे हे तत्व म्हणजेच निर्गुणाचाच सगुण आकार होय हा असे या अभंगातून अधोरेखित जनाबाई करते. संत जनाबाई लिहिणे शिकल्या की नाही माहित नाही पण हा अभंग वाचल्यानंतर समजते संत जनाबाई फक्त लिहिणे शिकल्या नाहीत तर चार वेद सहा शास्त्र अठरा पुराने सर्व कोळून त्या पिल्यात; हे लक्षात येते. इतका आघात पंडित्य दाखवणारा हा अभंग आहे. यामध्ये सर्व वेदांचे शास्त्रांचे, पुराणांचे संदर्भ आलेले आहेत. संत जनाबाई यांचे परमार्थिक गुरू संत नामदेव आहेत. या सद्गुरुरायापाशीच संत जनाबाई लिहिणे शिकले आहेत. त्या असे म्हणतात, "संत नामदेवामुळे माझा उद्धार झाला. मला साक्षात्कार झाला. मला ईश्वर भेटला '; पण ईश्वर प्राप्तीसाठी मी काय काय केले कसे कसे पुढे गेले तो साक्षात्कार या अभंगातून त्या सांगतात.


बाई मी लिहिले शिकले सद्गुरुरायापाशी ब्रह्मी झाला जो उल्लेख तोची नादाकार देख

 पुढे ओंकाराची रेख दुरिया म्हणावे तिसरी त्या म्हणतात माझ्या आतून जो ब्रह्मी असलेला आत्मोदगार झाला त्यानेच नादाकार घेतला. पुढे ओंकाराची रेख घेतली. पुढे ओम होता आणि तुरिया म्हणजे शेवटची अवस्था प्राप्त झाली. म्हणजे ईश्वर प्राप्तीची सर्वोच्च अवस्था प्राप्त झाली परमेश्वराचे निर्गुण निराकार रूप आहे तो आपल्याला सगुन रूपात भेटला असे त्या म्हणतात मायामतत्त्वाचे सुबह तीन पाचांचा प्रकार पुढे २५ चा भारत गणती केली छातीशी माया फार अवघड आहे ती महत्त्वाचा सुभर आहे तीन पाचाचा प्रकार म्हणजे तीन दोष रज- तम-सत्व पुढे पाचाचा प्रकार म्हणजे पंचमहाभूत यात अग्नी, जल ,वायू, पृथ्वी आणि आकाश २५ काय आहे सृष्टीची ते तत्व आहेत, जी की मूळ पृथ्वीपासूनची सुरुवात झाली ते शिवापर्यंतचे ३६ टप्पे आहेत. देवाचा महिमा अगाध आहे. देव सर्वत्र आहे तो कोणत्याही रूपात कोठेही भेटतो तो निर्गुणाचा समूह आकार आहे. त्यासाठी भावभक्ती आवश्यक असते १२, १६ २१००० आणि सहांचा उभार 

माप चाले सोहमकार ओळखले ५२  मात्रेशी lसंत जनाबाई यांनी कोड्यामधून परमेश्वराचे निर्गुण निराकार रूप सगुनच आहे हे सांगितले आहे. परमेश्वराचे रूप अंकाचा खेळ आहे. दिवस व रात्र मिळून तुमचे जे श्वास असतात दहा हजार आठशे व दहा हजार आठशे मिळून ते 21 हजार 600 होतात त्यांचे माप सोहमकार म्हणजे सोहम नामाचा जप श्वास खाली घेणे वर घेणे हे आहे माळेचे मणी 108 असतात. आपण रात्रंदिवस श्वासोस्वासाबरोबर देवाचे नामस्मरण केले तर 21 हजार 600 होतात म्हणजे अनेक सहाषांचा उभार त्याचे माप आहे. सोहमचा जप याची ओळख पटण्यासाठी ५२ बाराखड्याच्या मात्रेत समाविष्ट आहेत असे जनाबाई म्हणतात. चार खोल्या चार घरी चौघी पुरुष सर्वांशी अंतरी राहिले पाचव्यापासी चार खोल्या माणसाच्या जीवनाची अवस्था जागृती, स्वप्न, सुसृप्ती, आणि तुरिया हे सर्व जीवन चार अवस्थांनी व्यापलेला आहे. चार घरी या देहाचे चार प्रकार स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण चार पुरुष धर्म, अर्थ, काम ,मोक्ष चार नारी म्हणजे चार मुक्ती सलोकता, समिपता,  स्वरुपता आणि सायुजता

आणि हे ईश्वर प्राप्तीचे चार प्रकार आहेत. तर ते कोणते देवामध्ये एकरूप होणं, देवाचा सहवास मिळवणं, देवासारखा उच्च आनंद मिळविणे, आणि या सर्वांना मी अंतरात ओळखले आहे. तरीही हे सर्व नश्वर आहेत या सर्वांना मी ओळखते. म्हणून मी पाचव्या सोबत राहते. तो पाचवा परमेश्वर आहे त्याचे निर्गुण निराकार रूप आहे पाच शहाणे पाच मूर्ख पाच चालक असती देख पाच दरोडेखोर आणि ओळखले दोघांशी पाच शहाणे ज्ञानेंद्रिय डोळा, कान, जीभ, नाक व त्वचा पाच मूर्ख कर्मेंद्रिय पाच इंद्रिय चोऱ्या करतात या सर्वांना मला ओळखण्याची गरज नाही, कारण मी दोघांना ओळखले आहे ते दोघे जीव शिव आहेत त्यामुळे इतर आणि हा अध्यात्माचा पसारा या सर्वांची गरज मला नाही. वेदशास्त्राचा शास्त्राची उठाठेव कशासाठी मग परमेश्वराचे रूप जीव-शिव यामध्ये आहे. एका बिजांचा अंकुर होय. वृक्षाची विस्तार शाखा पत्रे, फळ ,फुलभारत, विजापोटी सामावे संत जनाबाई म्हणतात, "एक बी रुजवल्यानंतर त्याचे रूप वृक्षांमध्ये होऊन विस्तारते त्या वृक्षाला पान फुले फळे याचा बहार येतो. त्याचे रूप येण्यामागे कारण म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ असतात. अशाप्रकारे परमेश्वराची देखील शुद्ध आचरणाने भक्ती केली तर परमेश्वर सगुण रूपात साक्षात्कार देतो. कांतीन तंतूशी काढून वरी क्रीडाकरी ती जाण शेवटी तंतूशी गळून एकटी राहते.एखादी कांतीन पहा एका कोपऱ्यात तंतू म्हणजे दोरा आपल्या शरीरातून काढते. त्या तंतू वरती क्रीडा करते शेवटी तोच दोरा गिळत गिळत तिथे जाळे आपल्या पोटात घेते. शेवटी ती एकटीच स्वतः पाशी राहते परमेश्वराचा खेळ असाच असतो. शेवटी तो एकटाच राहतो तो अनंत आहे. त्याचा महिमा जगाच्या पाठीवर शेवटी तो एकांतात राहतो. असेच परमेश्वराचे रूप आहे. वेदशास्त्र आणि पुराना याचा अर्थ अनिता म्हणा कनकी नगाच्या भूषणा अनुभव वाटे जीवाशी वेदशास्त्र पुराण भक्ती यांचा अर्थ आपल्या मनामध्ये लावला आहे. सोने जे असते त्याचे दागिने त्यातही सोनेच असते त्याचाच अनुभव आपणास येतो. तसेच प्रत्येकाने आपल्या अनुभवानुसार परमेश्वर मानला आहे परंतु जीव आणि शिव एकच आहेत हा अद्वैताचा सिद्धांत आहे. ईश्वर व भक्त एकच आहेत असे संत जनाबाई म्हणतात.

 नामदेवाच्या प्रतापात श्री विठोबाचा हात जनी म्हणे केली मात पुसा ज्ञानेश्वराची 

या सर्वांचे ज्ञान मला नामदेवामुळे झाले. माझ्या डोक्यावर विठोबाने हात ठेवला म्हणून जनी म्हणते, मी या सर्वांवर मात केली सर्व अद्विताचा सिद्धांत समजून घेतला आणि पुढे गेले आणि हे कोणाला विचारा म्हणतात, तर संत ज्ञानेश्वराला विचारा काय विचारा तर हा सर्व अध्यात्माचा अद्वैताचा सिद्ध विलासाचा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितला आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत अमृतानुभावामध्ये चिदविलासाचा अद्वैताचा सिद्धांत मांडलेला आहे. जीव आणि शिव एकच आहेत. याचे सार फक्त एकोणीस ओवीमध्ये जनाबाईंनी अद्वैताचे ज्ञात ज्ञान सांगितले आहे. हा चमत्कार नामदेवामुळे झाला असे त्या म्हणतात त्या मानाने निर्गुणाचाच सगुण आकार देऊन भक्तीभाव ठेवावा असे त्या म्हणतात. शेवटी संत जनाबाई व संत नामदेवांना नमस्कार करतात आणि जनाबाई या ज्ञानामुळे अशिक्षित आहेत असे मात्र आपणास वाटत नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...