मंगळवार, १६ एप्रिल, २०१९

चरित्रे- आत्मचरित्र

मराठी
१) प्रकाशवाटा:- प्रकाश आमटे
२) एकटा जीव :- दादा कोंडके
३) अग्नीपंख:- ए.पी.जे. अब्दुल कलाम
४) झिम्मा :- विजया मेहता
आत्मचरित्र कस असाव याचा ऊत्तम वस्तुपाठ म्हणजे झिम्मा
कुठेही कोणावर दोषारोप नाही; सनासनाटी पनाच्या नावाखाली भड़क पणा नाही . अतिशय संयत भाषेत लिहिलेल / मराठी नाट्य सृष्टिचा महत्वाचा दस्तावेज अशी याची नोंद होईल
५) लमाण :- डॉ श्रीराम लागू
डॉक्टरान्च्या स्वभावाप्रामाणे परखड भाषेचा अनुभव देणार. वेळोवेळि स्वताला काढलेले चिमटे ; भोवतालच्या परिस्थितीचे ऊत्तम आणि अचूक विश्लेषण हे जमेचे मुद्दे
६)स्वतःविषयी :- अनील अवचट
७) सत्याचे प्रयोगः- म. गांधी
८) नाच गं घुमा - माधवी देसाई
९) आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
१०) 'कुणा एकाची भ्रमणगाथा':- गोनिदा
११) कॉलनी :- सिद्धार्थ पारधे.
१२) स्म्रुतीचित्रे:- लक्ष्मीबाई टिळक.
१३) रास :- सुमा करंदीकर.
१४) रांगोळीचे ठीपके:- वासंती गाडगीळ.
१५) झोंबी- आनंद यादव.
१६) आय डेअर- किरण बेदी.
१७) एक झाड दोन पक्षी :- विश्राम बेडेकर.
१८) हृदयस्थ- नीतू मांडके.
१९) जगाच्या पाठीवर :- सुधीर फडके.
२०) एका साळीयाने- लक्ष्मीनारायण बोल्ली.
२१) बंध-अनुबंध - कमल पाध्ये.
२२) समिधा - साधना आमटे.
२३) मास्तरांची सावली - कृष्णा सुर्वे.
२४) वार्ड नं. ५ - डॉ.रवी बापट
२५) मुसाफिर :-अच्च्युत गोडबोले
२६) मी दुर्गा खोटे - श्रीम. दुर्गा खोटे शब्दांकन आहे.
२६) सांगत्ये ऐका - हंसा वाडकर
२७) कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
२८) एंडे कथा(माझी कथा) - कमला दास. नंतर मुस्लीम धर्म स्वीकारून पै.वासी झालेल्या.
२९) दि लास्ट प्रिन्सेस - गायत्रीदेवी.
३०) अंतर्यामी सूर गवसला - श्रीनिवास खळे
३१) माझा साक्षात्कारी हृदयरोग- अभय बंग ( ह्याला आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा, हार्ट प्रॉब्लेम आल्यानंतर आलेले अनुभव, त्यातून ते काय शिकले आणि आपली जीवनशैली कशी असावी ह्याबद्दल हे पुस्तक आहे.)
३२) उपरा- लक्ष्मण माने.
३३) उचल्या- लक्ष्मण गायकवाड
३४) बलुतं- दया पवार.
३५) आयदान- उर्मिला पवार.
३६) ताई मी कलेक्टर व्हायनू -राजेश पाटील
३७) ताठ कणा.-डॉ.पी.एस.रामाणी (नाव नक्की नाही)
३८) तराळ-अंतराळ- शंकरराव खरात; अजिबात आक्रस्ताळे न होता दलित आत्मचरित्र लिहिता येते आणि तरीही ते तितकेच दाहक आणि अस्वस्थ करणारे असू शकते याचे कदाचित सर्वोत्कृष्ट उदाहरण.
३९) माय एक्सपेरीमेंट्स विथ ट्रूथ- गांधीजी; हे खरेतर मूळ गुजरातीतूनच वाचले पाहिजे, किमान इंग्रजीतरी; मराठी अनुवाद वाचू नका फार पांचट आहे.
४०) 'परतीचा प्रवास' :-वनमालाबाई
४१) लंडनच्या आजीबाईची कहाणी :- लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य (चरित्र)
४२) स्टुडीओ- सुभाष अवचट
४३) तीन दगडांची चूल- विमल मोरे ( भटक्या जोशी समाजाचे चित्रण).
४४) कोल्हयाटयाचे पोर- किशोर शांताबाई काळे
४५) 'मयादा' हे आत्मचरित्रपण चांगले आहे, मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद आहे. इराकमध्ये सद्दामच्या राजवटीत तुरुंगात गेलेल्या 'मयादा' नावाच्या सुशिक्षित आणि स्वतःची प्रेस असणाऱ्या स्त्रीचे आत्मचरित्र आहे.
४६) 'ईराणमधून पलायन' हापण मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद आहे. ईराणमध्ये जुलमी राजवट आल्यानंतर एका स्त्रीने पलायन केले मुलासह, प्रथम फ्रान्समध्ये आली आणि नंतर कॅनडा येथे स्थायिक झाली.
४७) कुणास्तव कुणीतरी --- यशोदा पाडगावकर
४८) हसरे दु:ख - चाल्री चाप्लीन वरचे पुस्तक
४९) चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर
५०) ही श्री ची इच्छा -श्रीनिवास ठाणेदार
५१) ईडली ऑर्कीड आणि मी - कामत
५२) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
५३) रेडीयमः- मादाम मेरी क्युरी (शाळेत असताना रेडीयम नामक पुस्तक वाचले होते - मादाम मेरी क्युरी वरचे पुस्तक मला अतिशय आवडले होत...पण नाव नक्की रेडीयम च होते का हे नीट आठवत नाही.)
५४) द्रुष्टीदाता:- ब्रेल लिपी ज्याने शोधली त्याच्यवरचे (नाव नक्की आठवत नाही )
५५) उष:काल:- उषा किरण
५६) उपरा- लक्ष्मण माने.
५७) उचल्या- लक्ष्मण गायकवाड
५८) आमचा बाप आणि आम्ही -नरेंद्र जाधव
५९) 'इनसाइड द गॅस(gas) चेंबर्स' :- 'श्लोमो व्हेनेत्सिया' यांचे अनुभवकथन . सुन्न करणारा अनुभव. संपादन-जीन माउटापा, इंग्रजी अनुवाद- andru brown. मराठी अनुवाद- सुनीती काणे.
६०) राजमाता:- वि स वाळिंबे
६१) "माझंही एक स्वप्न होतं' ( I too had a dream...Vergese Kurien as told by Gauree Salavee):- सुजाता देशमुख यांनी अनुवाद केलेले श्री.व्हर्गीस कुरियन यांचे आत्मचरित्र.खूप स्पष्ट,निर्भीड वाटतेय.
६२) स्मृतीपूजा:- प्रभावती भावे (पु.भा.भावे यांच्या पत्नी)
६३) जेव्हा माणूस जागा होतो :- गोदावरी परुळेकर : हे आत्मकथनपर आहे ,यातला भाग शालेय अभ्यासक्रमात होता. आणखी एक प्रकरण अलीकडेच एका दिवाळी अंकात वाचले.
६४) माझा पोवाडा:- शाहिर साबळे
६५) धाकटी पाती:- सूर्यकांत
६६) टाईमपास:- प्रोतिमा बेदी (कबीर बेदी ची एक्स बायको)
६७) गोष्ट एका मारवाड्याची'- गिरीश जाखोटिया (आत्मचरित्र नव्हे पण बरेचसे तसेही.)
***************************************************************************************************************************************************************
काही इंग्रजी:-
१) 'Iron Lady' :- Margaret Thatcher
२) Madeleine Albright:- Madam Secretary
३) Early days:-Sir Winston Churchill
४) माझा लढा (main kampf) :- हीटलर चा
५) A diary of a young girl:- Anne Frank
६) डेझर्टर- विजय देवधर (एका जर्मन मेसेंजरच्या पलायनाची गोष्ट)
७) सैबेरियातून पलायन (लेखक आठवत नाही, एका जर्मन युद्धकैद्याचे रशियातून पलायन)
८) काळी बाई- ब्राझीलमध्ये झोपडपट्टीत राहणारी भंगार विकणारी बाई, फक्त दुसरी शिकलेली पोर्तुगीजमध्ये पण रोज आपली डायरी लिहायची सवय होती तिला. एका पत्रकाराने तिचे लिखाण प्रसिद्ध केले आणि ती फेमस झाली, तिचे चांगल्या वस्तीत राहून मुलांना वाढवायचे स्वप्न पूर्ण झाले.
९) अँजेलाज अ‍ॅशेस - फ्रँक मॅकोर्ट
१०) Iran Awakening :- Shirin Ebadi:- ह्या पुस्तकाच्या इराण जागा होतोय या नावाने प्रतिमा जोशीनी मराठीत अनुवाद केला आहे
११) Desert Flower :- Waris Dirie
१२) Agony and Ecstasy:- a biography of Michael Angelo by Irving Stone
१३) Clarence Darrow for defense:- biography of Clarence Darrow by Irving Stone
१४) In the line of fire :- Parvez Musharraf
१५) Daughter of Destiny :- Benazeer Bhutto
१६) Sunny Days - Sunil Gavaskar
१७) 4th Part Dashadwar se sopan tak:- Harivanshrai Bachchan
१८) Every Second Counts :- Lance Armstrong
१९) Winning :- Jack Welch
२०) Iacocca :- Lee Iacocca
२१) Open :- Andre Agassi
२२) My Life :- Brett Lee
२३) Made in Japan :- Akio Morita (Sony)
२४) A Double Life :- Alyque Padamsee
२५) Controversially Yours :- Shoaib Akhtar
२६) Genghis Khan and the Making of the Modern World -: Ghenghis Khan (हे चरीत्र आहे)
२७) Jinnah :- By Jaswant Singh
२८) The test of my life:- युवराज सिंग
२९) Out of comfort zone:- स्टिव्ह वॉ
३०) Indian summers :- जॉन राईट
३१) ऑन द लाईन :- सेरेना विल्यम्सचे



वाचावे असे काही...
1. मृत्युंजय
2. छावा
3. बुधभूषण
4. राधेय
5. शिवरायांचे खरे शत्रू कोण
6. श्रीमान योगी
7. म्हणे लढाई संपली
8. शंभूराजे
9. शिवचरित्रातून उद्योगमंत्र
10. शंभूचरित्र
11. राजमाता जिजाऊ
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. छत्रपती संभाजी महाराज
14. संभाजीराजे सांक्षिप्त जीवनपट
15. झुंज
16. मावळा
17. पावनखिंड
18. युगंधर
19. बजिंद
20. ययाती
21. किल्ले रायगड
22. छत्रपती शिवरायांची अस्सल छायाचित्रे
23. रायगडाची जीवन कथा
24.  तेरा पोवाडे
25. तोरणा
26. दुर्गरत्न
27. पुरंदर
28. प्रतापगड
29. प्रवास गडकोटांचा
30. महाराष्ट्र दर्शन
31. माझा राजा शिवाजी राजा
32. मुरुड जंजिरा
33. राजगड
34. रायगड
35.  लोहगड
36. विजयदुर्ग
37. विशाळगड
38.  शिवनेरी
39. शिवाजी
40. सिंधुदूर्ग..

*तुम्हाला पाहिजे असणारी सर्व पुस्तके खालील लिंक वर आहेत कधीही बघा, वाचा, download करा. महत्वाचे म्हणजे हा message share करा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल*

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-8PYwGN2D8rTHWNBjgBmVI9vCfrC8Unr

रविवार, १४ एप्रिल, २०१९

भजन -स्वरूप

भजन : टाळ, मृदंग, किंवा पखावज या वाद्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे, यास 'भजन' असे म्हणतात. भजन हा भक्तिसंगीतातील व भक्तिमार्गातील एक महत्वपूर्ण प्रकार आहे. ह्या प्रकारचा उद्‌गम सामवेदापासून दिसत असला, तरी याचा स्पष्ट आढळ श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधात होतो. भागवताचा कालखंड इ.स.पू.३०० असा मानतात. या काळापासून भजनाची परंपरा रुढ आहे. येथून भारतात वेगवेगळ्या प्रांतांत भजन रुढ झाले.

भजनास प्रांरभ करण्यापूर्वी सांप्रदायिक देवतेची प्रतिमा व्यासपीठावर ठेवतात. त्याची यथासांग हळद-कुंकू, बुक्का, गुलाल, हार, धूप-दीप इ. साधनांनी पूजा करतात. पूजा करणारा प्रमुख वीणेकरी असतो. तो देवतेची पूजा झाल्यावर वीणेची हार-फूल, गुलाल-बुक्का यांनी पूजी करतो. इष्टदेवतेचे, कुलदेवतेचे संस्कृत श्लोकात स्मरण करुन मग प्रांतीय भाषेत भजनास आरंभ करतो. काही संप्रदायात संस्कृत श्लोक न म्हणता प्रांतीय भाषेत भजनास सुरुवात करतात. भजनात वीणेकऱ्यास प्रमुख स्थान असते. वीणेकरी हा शुचिर्भुत, कपाळी गंध, मधोमध बुक्क्याचा टिळा व टोपी अथवा लांब केस राखलेला असा असतो. याने भजनाची दीक्षा घ्यावयाची असते, यासाठी संप्रदायिक ग्रंथांचा अभ्यास, सद्‌गुरु-अनुग्रह, सांप्रदायिक व्रतोत्सव हे सर्व पाळण्याची शपथ देवतेसमोर घ्यावयाची असते, तसेच त्या देवतेला अभिषेक करावयाचा असतो. तेव्हापासून तो वीणेकरी होतो. बाकीच्या भजनी मंडळींसाठी हा दीक्षाविधी तितकासा कर्मठ नसतो.

त्तर हिंदुस्तानात भजन करणाऱ्या समूहास 'भजनी मंडली' असे म्हणतात. यात चैतन्य महाप्रभूंचे 'हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल' किंवा 'कृष्ण कृष्ण जय कृष्ण' किंवा 'राधा राधेकृष्ण राधा' हे भजन, तर चंडीदासाच्या भजनात 'हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे' हे भजन त्यांच्या पदांसह येते. बंगालमद्ये गौडी-संप्रदायाची भजने म्हणतात. चतुःसंप्रदाय आखाड्यात करताल, मृदंग यांवर तुलसीदसांची सगुण भजने तसेच सूरदास, मीराबाई, कबीर यांची निर्गुण भजने म्हणतात, तर शैव आखाड्यात चिमट्यावर पारंपरिक शैव पदे म्हणतात. वैष्णव भजनात अधूनमधून राम-कृष्णांच्या कथाही येतात. या कथा प्रमुख वीणेकरी किंवा पेटी वाजवणारा निवेदक सांगतो. ही भजनी मंडळी विशिष्ट उत्सवांना त्या त्या तीर्थक्षेत्री उपस्थित असतात. शैव आखाड्यात शिववर्णनपर चिमट्यांची भजने असतात. उत्तर हिंदुस्थानातील भजनात पेटीचा समावेश कालांतराने झाला. शैव भजनात पेटी, टाळ, वीणा नसते. चिमटा, मृदंग किंवा ढोल ही वाद्ये वापरतात. वैष्णव भजनात वीणेकरी अधूनमधून नाचतो; तर शैव भजनात चिमटेकरी अधूनमधून नाचतो.

र्नाटक संगीतामध्ये भजन म्हणणारे 'भागवतर' मृदंग, टाळ, वीणा वा तंवोरा, पेटी या वाद्यांसह भजन म्हणतात. त्यातला प्रमुख भागवतर फेर धरून नाचतो व त्यासोबत बाकीचे भजन म्हणतात. यातील पदे कथानकप्रधान असतात भजन ऐकणारे श्रोतेही त्यांच्याबरोबर पदाचे ध्रुवपद आळवितात. यात गणेश, सरस्वती इ. देवतांची स्तुती, प्रह्लाद, नारद यांचे माहात्म्यपर वर्णन, जयदेवाची 'अष्टपदी' राम-सीता, सुब्रह्मण्य यांचे गुणवर्णन येते. हा भजनाचा पहिला भाग झाला. दुसऱ्या भागात देवतेजवळची समई मधोमध ठेवून त्याभोवती प्रदक्षिणा घालून भजन म्हणण्याची प्रथा आहे. 'उञ्च्छवृत्ती भजनी मंडळ' म्हणून एक फिरते भजनी मंडळ असून ते रस्त्यावर भजन करीत जातात. लोक त्यांना कोरडी मिक्षा घालतात. तंजावर प्रांतात देवतेच्या पालख्यांपुढेही भजने म्हणतात. यात पुरंदरदास, बोधेंद्रगुरूस्वामी, त्यागराज, सदाशिव ब्रह्मेंद्र इत्यादींच्या रचना असतात. गुजरातमधील भजनी संप्रदायाचा नरसी मेहता हा प्रवर्तक होय. या पदरचनेत कृष्णकथा प्रामुख्याने गुंफलेली असते. ओरिसातील भजनी परंपराही रामकृष्णकथांनी युक्त असते. यात कथानिवेदनही वापरतात. प्रमुख वीणेकरी व पेटीवादक हा अधूनमधून कथा सांगत असतो व आपल्याबरोबर सर्वांना भजन म्हणायला सांगतो.

महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून वारकरी संप्रदायाने भजनगायनाची परंपरा नामदेवांच्या काळापासून सुरू केली. यापूर्वी महानुभाव पंथात मठसंगीत होते. पण ते मठापुरते आणि मठातील शिष्यगणांपुरतेच मर्यादित स्वरूपात तसेच चक्रधरांच्या गुणस्तुतीपर कवनांतून उपलब्ध होते. हे भजन सर्वसामान्यांसाठी कधीही नव्हते. वारकरी संप्रदायाने भजन सर्वांना मुक्त केले. नामस्मरणाचा प्रमुख प्रकार म्हणून तसेच नवविघाभक्तीचा एक आविष्कार म्हणून भजन या घटकास वारकरी परंपरेने भक्तिमार्गात प्रमुख व महत्त्वपूर्ण स्थान दिले. वारकरी भजनात खोलगट टाळ, वीणा, पखावज ही तीन वाद्ये असतात. समोर पांडुरंगाची प्रतिमा असते. वीणेकरी मधोमध उभा असतो. त्याच्या डाव्या हाताला पखावजी असतो. भजनाचा आरंभ 'जय जय राम कृष्ण हरी' या नाममंत्राने होतो. 'सुंदर ते ध्यान उभे विटेकरी' हा तुकारामाचा अभंग व 'रूप पाहता लोचनी, सुख जाले वो साजणी' हा ज्ञानदेवाचा अभंग मंगलाचरण म्हणून गातात. यानंतर वीणेला व वीणेकऱ्याला बुक्का, हार घालून पूजा झाली, की मग भजनास आरंभ होतो. यात नामदेव, एकनाथ, तुकाराम, निळाबाराय या संतांच्या नाम-उपदेशपर अभंगांचा प्रमुख्याने समावेश होतो. भजनाचा पूर्वरंग झाल्यावर नाथांच्या गौळणी, भारुडे म्हणतात. भजनाच्या शेवटी विठ्ठल, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या आरत्या म्हणतात. पसायदान व नामदेवाचे चिरंजीवपद सामुदायिकपणे म्हणून भजन संपते.

वारकरी भजनांचे 'फड' आहेत. फड म्हणजे वारकरी भजनांचा समूह वारकऱ्याने आयुष्यभर त्या फडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असा नियम आहे. वासकरबुवांचा फड, गुरवबुवांचा फड, कदमबुवांचा फड, करमरकरबुवांचा फड असे विविध फड पंढरपुरात आहेत. हे विशिष्ट समूह काही निवडक संतांचे अभंग परंपरेने गातात. हे अभंग फडांच्या पूर्वंसूरींनी ठरवून दिलेले असतात. त्याव्यतिरिक्त दुसरा अभंग म्हणावयाचा नसतो. हे फड आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत पंढरपुरात व कार्तिक वद्य प्रतिपदा ते अमावास्येपर्यंत आळंदीस असतात. वारकऱ्यांच्या या दोन प्रमुख वारकऱ्यांना फडांची हजेरी लागते. संतांच्या पालख्या पंढरपुरास येताने काही चक्री भजने करतात. 'चक्री भजन' म्हणजे लागोपाठ भजने म्हणणे. यात कधी कधी भजनाच्या शेवटच्या अक्षरापासून दुसऱ्या अभंगाला सुरूवात करतात. काही विशिष्ट देवभक्तांची सोंगे घेऊन त्यांच्यात अंभगरूपाने होणाऱ्या संवादास 'सोंगी भजन' म्हणतात. सांगली जिल्ह्यातील खुजगाव येथील सोंगी भजनी मंडळी प्रसिद्ध आहेत. 'बारी भंजना'त अधिक सुरेल भजन कोण म्हणतो, याची स्पर्धा असते. 'रिंगण भजना'त तीन वेगळ्या प्रकारची भजनी मंडळी गोलाकार उभी असतात. ते क्रमाने एकेक अभंग म्हणतात. 'भारुड भजना'त केवळ नाथांची भारुढ गातात. ही सर्व विठ्ठलपंथी भजने आहेत.

वारकरी भजनी मंडळे महाराष्ट्रभर आहेत. दत्तपंथी भजनात वारकरी भजन असते, पण त्यात दत्तसंप्रदायातील पारंपरिक पदे नमन म्हणून म्हणतात. दर गुरूवारी भजन करणारी दत्तोपासक भजनी मंडळे महाराष्ट्रात सर्वत्र आहेत. आळंदीच्या वारकरी शिक्षणसंस्थेत खास भजनाचे वर्ग घेतले जातात. काही ठिकाणी बारमाही भजन असते. विठ्ठलपंथी प्रत्येक एकादशीस तर दत्तपंथी दर गुरूवारी भजन करतात. दत्तपंथी भजनात भक्ति-नृत्यही असते. काही भजनी मंडळे एकतारीवर भजने करतात. एकतारीवर भजन म्हणण्याचा प्रघात मांग, महार, कोळी, चाभांर या जमातींत विशेष आढळतो.

जन हा गानपद्धतीनुसार सुगम शास्त्रीय संगीताचा किंवा सुगम संगीताचा प्रकार म्हणता येईल. पारंपरिक संतकवींची भजनरचना धृपद-धमार गायकीच्या अथवा शास्त्रीय रागदारीच्या अंगाने गाईली गेल्यास, त्या रचनेला 'पद' असे म्हणतात. ही रचना सुगम शास्त्रीय संगीताच्या-ठुमरी-दादरा गायकीच्या-अंगाने गाईली गेल्यास 'भजन' म्हणून ओळखली जाते. भजन हे एकच गायक गातो; किंवा समूह स्वरात सामुदायिक रीत्याही म्हटले जाते. सुगम संगीताच्या अथवा लोकगीताच्या अंगाने भजन गाईले गेल्यास एकतारी, झांजा, चिपळ्या ही वाद्ये त्या बरोबर साथीला घेतली जातात. या पद्धतीने भजन म्हणत असताना काव्यार्थाला महत्त्व असल्यामुळे साहित्याची पुनरुक्ती केली, तरी सांगीतिक दृष्टया आळवणे हा भाग त्यात नसतो. याउलट ठुमरी-दादरा गायकीच्या अंगाने भजन गाईले गेल्यास तेथे संगीतदृष्टया कल्पनेचा विलास खूपच आढळतो आणि साहित्याचे महत्त्व कमी न करता पण संगीतदृष्टया विविध त-हांनी आळवून असे भजन गाईले जाते. भजन ज्या गायकीच्या अंगाने भजन गाईले जात असेल, त्यानुसार सोयीप्रमाणे तबला, पखावज, ढोलक इ. तालवाद्ये वापरली जातात. तेव्हा भजन हा गीतप्रकार शास्त्रीय रागदारीपासून ते सुगम तसेच लोकसंगीतापर्यंत वेगवेगळ्या संगीतप्रकारांच्या गायकीची डूब घेऊन भिन्नभिन्न प्रदेश-कालपरत्वे प्रसृत होत गेला आहे, हे दिसून येईल.

भजनात पारंपरिक चालींबरोबर शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेली भजनी पठडी गेल्या काही वर्षांत तयार झाली. यांनी भजन ऐकणारा भाविक आणि शास्त्रीय संगीतची आवड असणारा श्रोतृवर्ग तयार केला. या भजनात पेटीचा समावेश झाला. यात दोन स्वतंत्र पठडया निर्माण झाल्या. एक पारंपरिक चाली वीणा-टाळ-पखावज यांच्या साथीसह गाणारी पारंपरिक पठडी दुसरी पेटी-तबला-तंबोरा-वीणा-पखावज यांच्या साथीसह व रागदारीयुक्त गाणारी नवी पठडी अशा पठडीतील भजनी मंडळे शहरांतून दिसतात. मुंबईतील गिरणी कामगारांच्या भजन स्पर्धा होतात. अशा प्रकारच्या भजनांचे वर्ग प्रसिद्ध भजनकारांमार्फत चालवले जातात. मुंबईचे एकनाथबुवा हातिसकार हे या विठ्ठलपंथी भजनीपठडीतील प्रसिद्ध भजनकार होऊन गेले. नागपूरचे शामसुंदरबुवा भुजाड यांचाही या संदर्भात उल्लेख करता येईल.

रामदासी भजनात समर्थ संप्रदायाची पारंपरिक पदे येतात. यात समर्थगाथेतील भजने म्हटली जातात. तीनचार भजनांपाठोपाठ 'समर्थ सद्‌गुरू माझे आई मजला ठाव द्यावा पायी' असे नामस्मरणही म्हणतात. भजनाच्या शेवटी त्या त्या वाराची 'सवाई' म्हणून भजन संपते. यात पेटी, तबला, टाळ ही वाद्ये असतात. समर्थ रामदासांची प्रतिमा समोर ठेवतात.

क्ती संप्रदायातील भजनात देविस्तुती, 'उदे उदे ग अंबावाई' या रचना मोठया करताळावर म्हणतात. साथीला ढोलके, तुणतुणे ही वाद्ये असतात. मंगळवार, शुक्रवार या दिवशींच्या भजनात मध्यंतरात जोगवाही मागतात. तुकाराम, रामदास यांचे अभंग म्हणतात. यात महालक्ष्मी, रेणुकादेवी, तुळजाभवानी, सप्तृश्रृंगी यांच्या प्रतिमा असतात.

गाणपत्य भजनात गणेशस्तुती नमनात गातात. 'पार्वतीशनंदना मोरया गजानना, सुफलदुरितनाशना येई बा गजानना' हे नामस्मरण करतात. यात एकनाथ, रामदास यांचे अभंग पेटी-टाळ-तबला-तंबोरा या साथीच गातात. यांच्यात दर संकष्टी चतुर्थीला भजन म्हणण्याचा प्रघात आहे.

पाठक, यशवंत; आठवले, वि.रा

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

पदवी स्तरावरील मराठी भाषा व साहित्य अभ्यासक्रम उपयोगिता

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
बी. ए. सत्र I ऐच्छीक मराठी अभ्यासपत्रिका II
आधुनिक मराठी कविता 
उपयोगीता
१.
२.
३.
४.
बी. ए. सत्र II ऐच्छीक मराठी अभ्यासपत्रिका IV
आधुनिक मराठी कवितेतील प्रवाह IV
उपयोगीता
१.
२.
३.
४.
बी कॉम. सत्र I द्वितीय भाषा मराठी - साहित्यागाथा भाग 1
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.
बी कॉम. सत्र II द्वितीय भाषा मराठी - साहित्यागाथा भाग 2
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.
बी कॉम. सत्र III द्वितीय भाषा मराठी - साहित्यधारा भाग 1
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.
बी कॉम. सत्र IV द्वितीय भाषा मराठी - साहित्यधारा भाग 2
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.

पदवी तृतीय वर्ष अभ्यासक्रम - श्रेयांक पद्धतीनुसार CBCS सत्र पद्धती
कौशल्ये विकास SEC - IV। बी.ए. sem.V
अभ्यासपत्रिकेचे नाव : मराठी भाषिक कौशल्ये विकास भाग 1 SEC-  III
उपयोगिता
१. मराठी भाषिक क्षमतांच्या वाढीस मदत
२. मराठी भाषिक कौशल्ये विकासास वाव
३. विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी
४. मराठी भाषेतील ग्रंथ प्रकाशनाचे स्वरूप समजावून घेण्यास मदत
अभ्यासपत्रिकेचे नाव : मराठी भाषिक कौशल्ये विकास भाग 2 SEC-  IV
उपयोगिता
१. विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन
२. देहबोलीच्या वापरातून प्रभावी संभाषण
३. मुद्रितशोधनासाठीचे कौशल्ये विकसन
४. अनुदिनी व पटकथा लेखन कौशल्ये विकसन
५.प्रमाण मराठीच्या नियमांचे लेखनामध्ये उपयोजन
बी.ए. सत्र IV अभ्यासपत्रिकेचे नाव :- मराठी मध्ययुगीन गद्य पद्यांचा अभ्यास -  VIII
उपयोगिता
१. मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाङ्मय प्रकारांचा परिचय
२. मध्ययुगीन कालखंडातील वाङ्मयातून प्रकट झालेल्या मानवी मूल्यांचे आकलन
३. तत्कालीन भाषिक जाणिवांचे, शैलीचे दर्शन व आकलन
बी.ए. सत्र III अभ्यासपत्रिकेचे नाव :- आधुनिक मराठी वाङ्मय प्रकारचा अभ्यास - आत्मचरित्र  V
उपयोगिता
१. आत्मचरित्र वाङ्मय प्रकाराचा परिचय व आकलन
२. आत्मचरित्र वाङ्मय प्रकारातून प्रकट होणाऱ्या मानवी मूल्यांचे आकलन
३.




मध्ययुगीन गद्य पद्यांचा अभ्यास viii वस्तुनिष्ठ प्रश्न

१. मराठीतील पाहिले भावकवी म्हणून कोणास ओळखले जाते?  संत नामदेव
२. संत ज्ञानेश्वरांनी भगवदगीतेस काय म्हटले आहे?  धर्म कीर्तन
३. सुत्रपाठ हा ग्रंथ कोणी लिहिला?  केसोबास
४. ११४ दृष्टातांचे संपादन केसोबासांनी कोणत्या ग्रंथात केले आहे?  दृष्टांतपाठ
५.निष्ठेने एकाच परमेश्वराची सेवा केली तर उचित फळ मिळते हा विचार तुम्ही अभ्यासलेल्या गद्य उताऱ्यातून येतो? सिंदेराणेयाचा दृष्टांत
६. कान्हेरदेवासोबत लोणार सरोवरास कोण आले होते? रामदेवराय यादव
७. ------म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा साहूकार
८. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?   आळंदी
९. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला?  आपेगाव
१०. आज्ञापत्र ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? रामचंद्रपंत अमात्य
११. माझा मराठाचि बोलू कौतुकेl परी अमृतातेही। ----- जिंके   पैजा
१२.मराठी भाषेविषयीचा अभिमान संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या कोणत्या अध्यायातून व्यक्त केलेला आहे?   सहाव्या अध्यायातून
१३. वारकरी पंथाची पताका पंजाबपर्यंत नेण्याचे कार्य कोणी केले?   संत नामदेव
१४. संत नामदेवाचे अभंग ------------ या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत.   गुरुग्रंथसाहेब
१५. कडू वृंदावन साखरे घोळीळे l तरी काय गेलें----------? कडुपण
१६.नामा म्हणे संत सज्जन - - - -। ऐशासही गती काळांतरी । संगती
१७.किर्तन परंपरेचे पाईक म्हणून कोणास ओळखले जाते ? संत नामदेव
१८.संत नामदेवांचे पूर्ण नाव काय आहे? नामदेव दामाशेटी रेळेकर
१९. होनाजी बाळाचे पूर्ण नाव काय आहे? होनाजी सयाजी शिलारखाने
२०. घनश्याम सुंदरा..... ही अजरामर भूपाळी कोणाची आहे?   शाहीर होनाजी बाळा
२१. लखलखाट चकचकाट जैसे दुकान ---------- बोलणे मंजुळ मैनाचे ।। बोहोऱ्याचे
२२. माधव निधान ही प्रसिद्ध रचना कोणाची आहे?   शाहीर अनंत फंदी
२३.बिकट वहिवाट नसावी ------- मार्गा सोडु नको। धोपट
२४. कोणाच्या उपदेशामुळे तमाशाचा त्याग करून अनंत फंदी किर्तनाकडे वळले? अहिल्याबाई होळकर
२५.मोरोपंतांचे पूर्ण नाव काय आहे? मोरोपंत रामचंद्र पराडकर
२६. हंसकाकीख्यान ही कथा कोणी कोणास सांगितली आहे?   शल्याने कर्णास
२७. भाजले ते बीज -------- कदा। न मिळेचि दुधामाजी लोणी।।  अंकुरेना
२८. संत बहिणाबाई ह्या संत--------- च्या शिष्या होत्या.  तुकाराम
२९.संतकृपा झाली इमारत फळा आली ही रचना कोणाची आहे?  संत बहिणाबाई
३०. दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? समर्थ रामदास
३१.संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे? नारायण सुर्याजीपंत ठोसर
३२.समर्थ संप्रदायाचे प्रवर्तक कोणास मानले जाते? संत रामदास
३३. बरा कुणबी केलों। नाहीं तरि -------असतो मेलो।।  दंभेचि
३४. संसार करितां दगदगले मनीं। ----- विकल्या चौघीजणी।। नंदा
३५. संत एकनाथांचे जन्मगाव कोणते? पैठण
३६. हिंदी भाषिक असूनही मराठी अभंगांची रचना कोणत्या संतांने केली? संत सेना न्हावी
३७. सेना म्हणे ऐशा दांभिका -------। दोघेही जाताती अधोगती।।  भजती
३८. सकल संतगाथेत संत सेना न्हावी यांच्या किती रचना आहेत?   १४३
३९. वारकरी संप्रदायातील कोणत्या संतास काका हे संबोधन सर्व संत वापरतात?  गोरोबा
४०. संत गोरा कुंभार यांनी आपल्या अभंगात कोणत्या संतांचा उल्लेख केलेला आहे?
 संत नामदेव
४१. सारितेचा ओघ -------------आटला । विदेही भेटला मनामन । सागरी
४२. संत कर्ममेळा हा संत चोखामेळा व संत--------- यांचा पुत्र होता.  सोयराबाई
४३. जन्म गेला उष्टे खातां । ----- न ये तुमचे चित्ता ।। लाज
४४. संत गोरोबाकाका यांचे जन्मगाव कोणते?  तेरढोकी
४५. नामयाची दासी जनी हे बिरुद विनम्रपणे कोणती संत कवयित्री लावते? संत जनाबाई
४६. तुझे गेले मढे । तुला पाहून------- रडे ।।  काळ
४७. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे गाव कोणत्या संतांचे जन्मगाव आहे? संत जनाबाई
४८. विठ्ठलाचा एकेरी उल्लेख संत जनाबाई कसा करते? अरे विठ्या विठ्या
४९. ज्ञानेश्वरीचे मूलनाव काय आहे? भावार्थदीपिका
५०. भाऊसाहेबांची बखर या बखरीचे कर्ते कोण आहेत? कृष्णाजी शामराव
५१. शिवकालीन आचारसंहिता म्हणजे ---------- हा ग्रंथ होय. आज्ञापत्र
५२. सुरजमल जाट किती रुपयाची खंडणी धुडकावून लावतो?  एक करोड रुपये
५३. सुरजमल जाट व मराठे यांच्यातील युध्दात कोनास गोळी लागते? खंडेराव होळकर

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...