बुधवार, ५ जानेवारी, २०२२

रविवार, २ जानेवारी, २०२२

पुस्तकं

पुस्तकं
 पुस्तकांसारखी माणसं 
नीट वाचावीत
 तीनं सांगितलं होतं 
तिचं म्हणन शिरसावंद्य मानलं 
 मग तिला एकदा म्हंटल 
 तुझ्या सांगण्याचा काही
 उपयोग झाला नाही 
 गुंते तर कितीक झाले 
ते सुटता सुटत नाही 
ती हसली अन म्हणाली 
 नेहमीसारखा हाच धांदरटपणा केला 
 पुस्तकासारखी माणसं वाचलीस
 नीट हा शब्द विसरली 
 अक्षरावरून डोळे फिरवून
 अर्थही समजुन घ्यावा 
 तसा माणूस वाचताना 
बाह्यरुपासह मनीचा 
तळ गाठावा 
 मग पुस्तक कळत जातं 
तसा मानुसही कळत जातो. 
वाचतानाच केव्हा तरी 
आपलासा होतो. 
आणखी एक सांगते 
नीट घे ध्यानी 
 पुस्तकासारखी मानसंही 
पुन: पुन्हा वाचावीत.

शनिवार, १ जानेवारी, २०२२

प्रिया तेंडुलकर

प्रिया तेंडुलकर (ऑक्टोबर १९इ.स. १९५४ - सप्टेंबर १९इ.स. २००२) ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.

प्रिया तेंडुलकर
जन्मप्रिया विजय तेंडुलकर
ऑक्टोबर १९इ.स. १९५४
मृत्यूसप्टेंबर १९इ.स. २००२
मुंबईमहाराष्ट्रभारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय(चित्रपट, नाटक, टीव्ही); कथालेखन
भाषामराठीहिंदी
प्रमुख चित्रपटगोंधळात गोंधळ
मुंबईचा फौजदार
प्रमुख टीव्ही कार्यक्रमरजनी
वडीलविजय तेंडुलकर

प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून त्यांनी नाट्यसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.

प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्‍मेदार कौन, किस्से मियॉं बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

चित्रपट/चित्रवाणी कारकीर्दसंपादन करा

अभिनय केलेली नाटकेसंपादन करा

  • एक हट्टी मुलगी
  • गिधाडे
  • ती फुलराणी

आत्मचरित्रसंपादन करा

  • फर्स्ट पर्सन (पॉप्युलर प्रकाशन)

अन्य पुस्तकेसंपादन करा

  • असंही (ललित निबंध संग्रह)
  • जन्मलेल्या प्रत्येकाला (कथासंग्रह) - जीवनानुभव
  • जावे तिच्या वंशा (कथासंग्रह)
  • ज्याचा त्याचा प्रश्न (कथासंग्रह)
  • तिहार (असंग्रहित कथांचा संग्रह - प्रकाशन सन २०१५) (ललित प्रकाशन)
  • पंचतारांकित - स्वतःविषयी असलेले अनुभवप्रधान लेखन २००६, पहिली आवृत्ती, डिंपल प्रकाशन, चौथी आवृत्ती राजहंस प्रकाशन पुणे, भारत

लक्ष्मीकांत देशमुख

लक्ष्मीकांत देशमुख (जन्म : ५ सप्टेंबर १९५४) हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.[१]

लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातले मुरूम. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी ही पदवी व कोल्हापूर विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी बंगलोरमधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला. भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते ... साली निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडवला त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.

बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत. (डिसेंबर २०१७ची स्थिती)

लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत.

लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्‍यसंपदा संपादन करा
अखेरची रात्र (नाटक)
अग्निपथ (कथासंग्रह)
ॲडमिनिस्ट्रेशन्स गुड ॲन्ड ग्रेटनेस (इंग्रजी, वैचारिक)
अंतरिच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
अंधेरनगरी (कादंबरी)
अन्वयार्थ (नाटक)
अविस्मरणीय कोल्हापूर (ललित)
अक्षर अयान (दिवाळी अंक)
इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी)
ऑक्टोपस (कादंबरी)
कथांजली (कथासंग्रह)
करिश्मॅटिक कोल्हापूर (इंग्रजी, ललित)
कैफी आझमी - जीवन आणि शायरी
खोया हुआ बचपन (हिंदी, कादंबरी)
दूरदर्शन हाजीर हो (नाटक)
नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह)
नाती जपून ठेवा (ललित)
पाणी ! पाणी ! (कथासंग्रह)
प्रशासननामा (कायदेविषयक)
बखर : भारतीय प्रशासनाची (राजकीय, सामाजिक)
बी पॉझिटिव्ह (इंग्रजी, ललित)
मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित)
मधुबाला ते गांधी (व्यक्तिचित्रण, लेख)
माणूस नावाचं एकाकी बेट (कथासंग्रह)
मृगतृष्णा (कथासंग्रह)
द रिअल हीरो ॲन्ड अदर स्टोरीज (इंग्रजी कथासंग्रह)
लक्षद्वीप (लेखसंग्रह)
सलोमी (कादंबरी)
सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (कथासंग्रह)
हरवलेले बालपण (कादंबरी)
होते कुरूप बेडे (कादंबरी)
लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार संपादन करा
गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार (२५-१-२०१८)
२०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद
नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या ३८वे मराठवाडा साहित्य संमेलनस्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
सांगली येथे झालेल्या पहिल्या लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
नांदेड येथे झालेल्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
'पाणी!! पाणी!!' आणि 'सावित्रीच्या गर्भातमारलेल्या लेकी' या पुस्तकांना मराठवाडा साहित्य पुरस्कार.
महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
महाराष्ट् फाऊंडेशन पुरस्कार
टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर ॲवॉर्ड
महाराष्ट्र सरकारचा आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...