गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

बातमी लेखन

अलीकडील, सद्य घडामोडींविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय. अर्थातच बातमीतील मजकुराला काळाचा संदर्भ असतो. बातमी ही अनेक माध्यमांद्वारे दिली जाते. News या शब्दामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही दिशामध्ये घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन म्हणजे बातमी होय. जे नवीन घडले आहे, ते वाचकाला सांगणे म्हणजे बातमी होय. "News Is Everything That Interest People" ज्यामध्ये लोकांना स्वारस्य वाटते, अशी कोणतीही गोष्ट म्हणजे बातमी होय.

बातमी लेखन म्हणजे खासगी वाचनाच्या गोड वाचनाच्या कौशल्याचा उपयोग करून कोणत्याही गोष्टी, समाचार, किंवा घडामोडींची खबरीतली माहितीला तुमच्या वाचनाच्या योग्यपणानुसार लिहिणे. या कामात, तुमच्याकडून दिलेल्या गोष्टीची माहिती प्रमुख आणि उत्तरदायीपणाने व्यक्त करणे महत्त्वाचं आहे.

बातमी लेखन कसे करावे हे सांगताना, तुम्हाला कोणतीही विशिष्ट विषयाची गोष्टी असतील त्याच्या विचारात सुरुवात करूया. त्यानंतर, तुमच्या लेखनाच्या सूक्ष्मतेने अद्ययावत आणि वाचनाच्या नियमानुसार आवश्यक माहिती वाचनार वाचनाच्या कौशल्यानुसार लिहिण्याचा प्रयत्न करा.

एक चांगली बातमी लेखनाची सुरुवात उद्देशित वाचनाच्या साक्षरतेच्या पाठीशी सुरू करून, त्यातल्या गोष्टींची सारांश म्हणजे "5W1H" (Who, What, When, Where, Why How) ह्या प्रश्नांच्या उत्तरांतराची तुमची प्रयत्न करावी. त्यामुळे तुमच्या लेखनात आपल्याला तळब तळब वाचनाच्या असलेल्या वाचनाच्या कौशल्याने त्या गोष्टींची जबाबदारी सुनिश्चित करण्यात मदतीला आणण्याची आवश्यकता आहे.

लेखनाच्या सार्थकतेने, वाचनाच्या आवश्यकता असलेल्या गोष्टींची माहिती पुरेस्कृतपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बातमी लेखनाच्या माहितीला साक्षरता, तुमच्या वाचनाच्या कौशल्यानुसार सुधारित करण्याचा प्रयत्न केल्यास, तुमचं लेखन सुचलित आणि आकर्षक असेल.

अशाप्रकारे, तुमच्या बातमी लेखनाच्या कौशल्याने तुम्हाला मराठीत वाचनाच्या साक्षरतेच्या साधनेत सहाय्य करू शकतो आणि तुमच्या वाचनाच्या जीवनात अधिक निर्माण देऊ शकतो.

बातमी तयार करण्याचे निकष:

1. शीर्षक - बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा आरसा असतो.

2. दिनांक, स्थळ, कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा.

3. बातमी नेहमी भूतकाळात लिहिली जावी. बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

लेखन कौशल्य

लेखन कौशल्य
भाषिक कौशल्यातील लेखन ही कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे. मौखिक भाषेचे ते चिन्हांकित रूप असते. अक्षर ओळख असलेली सुशिक्षित व्यक्ती आपले बोलणे विचार अक्षरुपाने प्रकट करते तेव्हा नकळत या लेखन कौशल्याचा ती स्वीकार करते. अध्ययन अध्यापनामध्ये वाचनाप्रमाणेच लेखन कौशल्यही अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखन कौशल्यासाठी भाषेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भाषेतील विविध शब्द, त्यांचे अर्थ रस्व दीर्घ व या उच्चाराप्रमाणे त्यांचे लेखन, व्याकरणिक नियम, अक्षरओळख, शब्दसंग्रह, सुवाच्च लेखन, हस्ताक्षर, मनातील विचार समर्पक शब्दात मांडण्याची क्षमता इत्यादी गोष्टीचा स्वीकार केला म्हणजे या भाषिक क्षमतेचा विकास साधता येतो.

लेखन म्हणजे काय? 
व्यावहारिक जीवनात भाषेचा विविध स्तरावर आपण वापर करतो. पत्रलेखन, कार्यालयीन लेखन, अध्ययन अध्ययन क्षेत्रातील लेखन, वृत्तपत्र लेखन, ग्रंथ लेखन इत्यादी आपल्या परिचयाचे क्षेत्रात त्यांचा आपण अनुभव घेतो. या विविध स्तरावरील भाषिक रचना छापील किंवा मुद्रित स्वरूपात असतात त्यासाठी शुद्धलेखनाचे नियम, व्याकरणिक नियमांचा आधार घेतलेला असतो. त्यामुळे लेखनाला एक वेगळे स्वरूप प्राप्त होते. लेखन हे आपल्या विचाराचे मूर्त स्वरूप असते
लेखनाच्या व्याख्या 
१. आशयाची मूर्त रूपाने केलेली मांडणी म्हणजे लेखन होय. 
२. अक्षराच्या माध्यमातून परस्परांशी साधलेला संवाद म्हणजे लेखन होय. 
३. मनातील विचारांचे अक्षरुप म्हणजे लेखन होय. 
अक्षर-शब्द-वाक्य यांची व्याकरणिक नियमाच्या आधारे मांडणी केलेले लेखन हे ‘शुद्धलेखन’ असल्याचे म्हटले जाते. त्यासाठी मनाची पूर्वतयारी असणे आवश्यक आहे. काय लिहायचे? व कसे लिहावयाचे? हे दोन प्रश्न नेहमी लेखकाच्या मनात निर्माण होतात. त्याची विचारपूर्वक सोडून केली म्हणजे लेखन क्षमतेचा आधार घेऊन मनातील विचार अक्षर रूपाने मांडण्याची प्रेरणा मिळते. त्यातूनच लेखन साकारते.
चांगले लिहिता येणे यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत.
१) विषयाचे पूर्ण ज्ञान.
२) काय लिहावयाची याविषयी स्पष्टता. ३) मराठी लेखनविषय नियमाचा परिचय. ४) शब्दसंग्रहाचे विपूलता 
५) समर्पक शब्दांची निवड करण्याची क्षमता.
६) मनाची एकाग्रता
 ७) सुंदर हस्ताक्षर - त्यासाठी लेखनाचा सराव.
८) योग्य पद्धतीने विचार मांडण्याची क्षमता, नेमकेपणा.
९) भाषेवरील प्रभुत्व.
१०) व्याकरणिक नियमांचा परिचय.
वरील गुणांच्या आधारे आपले लेखन कौशल्य जाणीवपूर्वक विकसित करता येते. त्यासाठी मनाची तयारी असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आपणा सर्वांना लेखनाचा कंटाळा येतो. याची प्रमुख कारण म्हणजे दैनंदिन जीवनात लेखनाची गरज कमी असते. बोलण्यापेक्षा लिहीण्याचा जास्त वेळ लागतो. चटकन संवाद साधून आपण लेखनाकडे दुर्लक्ष करत होतो. त्यामुळे आपले लेखन क्षमता विकसित होणे थांबते म्हणून लेखनाचा सराव करा,अधिक वाचन करा, त्यावर चिंतन करा, मनातील विचारांचे त्वरित लेखन करा, त्यांचा उपयोग आपल्या लेख शैक्षणिक स्तरावरील अध्ययन अध्यापन प्रक्रियेत होतो. विद्यार्थीदशेतच लेखन कौशल्य आत्मसात केले तर त्यामुळे भविष्यात चांगले जीवन जगता येते.

लेखनासाठी प्राथमिक कौशल्ये

माणसाने आपल्या भाषेला लिपी प्राप्त करून दिल्यानंतर व ती अधिक स्थिरस्थायी आहे हे लक्षात आल्यावर माणसे आपले विचार, मते, कल्पना लेखननिविष्ट करू लागली. लेखन ही 
स्वयं -अध्ययनाची जशी पायरी आहे तसे ते आत्मविष्काराचे, ज्ञानाच्या प्रसाराचेही महत्त्वाचे साधन आहे. औद्योगिकिकरण व जागतिकीकरणामुळे ज्ञानप्रक्रियेला व लेखन प्रक्रियेला गती आली. म्हणून जलद लेखनाचे महत्त्व आहे. त्याचबरोबर लेखन योग्य झाले पाहिजे याचा अभ्यास व्हायला लागला. 
लेखनाची प्राथमिक कौशल्य आपण सात टप्प्यात शिकणार आहोत. प्रथम जलद लेखन कसे करावे ते पाहू. दुसऱ्या भागात लेखनाचे दर्शनी रूप कसे असते ते पाहू. आज्ञेबर हुकूम करावयाच्या लेखनातही उचित शब्द lलेखनाला कसे महत्त्व आहे ते तिसऱ्या व चौथ्या भागात पाहू. संपन्न शब्दसंग्रहाचे महत्त्व काय, शुद्धतेचा परिणाम काय होतो व योग्य शब्दांचा वापर न केल्यास कोणती तोटे होतात ते पुढील भागात पाहू.

लेखनगती
प्रौढपणी आपण अभ्यासास सुरुवात केल्यावर लेखनाला गती येत नाही. कित्येक वर्षात लेखनाचा सराव नसतो. लिहिण्यामुळे हात दुखतात. शब्द नेमका कसा लिहावयाचा ते आठवत नाही. जोडाक्षर लेखन त्रासदायक वाटते. पर्याप्त वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे लिहिण्याचा कंटाळा येतो. जलद लिहावे तर अक्षर बिघडते. सावकाश लिहावे तर लवकर संपत नाही अशी द्विधा स्थिती होते. लेखन करताना कोणी अचानक प्रश्न विचारल्यास गती खुंटते. ऐकणे व लिहिणे या क्रिया एकाच वेळी करणे जमत नाही. बोलताना वाक्यक्रम तसेच भाषा याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही; पण लेखनात ते मुद्दाम पाहिले जाते व त्यावर प्रभुत्व नसते म्हणून लेखन नकोसेच वाटते. बोलताना पूर्वतयारी नसली तरी चालते. काही वेळा वेळ मारून नेता येते; पण लिहिण्यासाठी संदर्भ सामग्री असावी लागते. मजकूर कळलाच नसेल तर लिहिता येत नाही. तो पाठ नसेल किंवा तयार नसेल तर एक अक्षर लिहून होत नाही. लेखनविस्तार करता येण्यासाठी अधिक वाचनाची, अभ्यासाची गरज असते. कौशल्यांचे स्थलांतरण करता येण्याची क्षमता असल्यास लेखनाला गती येते.
लेखन गतिमान न होण्याची कारणे 
१) लिहिण्याचा सराव नसणे. 
२) जोडाक्षर लेखन किचकट वाटणे. 
३) लेखन वेळखाऊ साधन मानसिकता. ४) लिहिण्यापेक्षा अक्षर खराब होण्याची भीती.
५) एकाच वेळी ऐकणे-लिहिणे करावे लागणे.
६) लिखित विश्वाची ओळख नसणे. 
७) लेखनासाठी संदर्भ सामग्रीच नसणे. 
८) आकलन स्पष्ट न होणे.
९) लेखन विस्ताराची तंत्रे माहीत नसणे.
१०) लेखन कौशल्य स्थलांतराची सवय नसणे आदी कारणामुळे लेखन गतिमान होत नाही. त्यासाठी काही उपाय सुचविता येतात. सरावाने व प्रयत्नाने लेखन कौशल्य सुधारते. 

लेखन गतिमान करण्यासाठी उपाय 

समर्थ रामदासांनी म्हटलेले आहे, ‘दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंड वाचीत जावे’ लेखनामध्ये नेहमी सातत्य ठेवले की, ते अंगवळणी पडते व त्याचा त्रास वाटत नाही. जोडाक्षरे लिहिण्याचा सराव करावा. शुद्धलेखनावरील पुस्तके पहावित, होत असलेल्या चुकांची दुरुस्ती करावी. लेखनाचे महत्त्व जाणून घ्यावे. प्रथम वेळेत मजकूर संपवणे महत्त्वाचे मानून नंतर सुलेखनाकडे वळावे. ऐकून लिहिण्याचा सक्तीने करण्याचा सराव करावा. खूप चिकित्सक वाचन करावे व ते वाढवित जावे. विषय, हेतू, आराखडा करून संदर्भसामग्री जमा करावी. नेमका आशय समजून घ्यावा. न समजल्यास संकोच न करता मार्गदर्शकाची मदत घेऊन लक्षात घ्यावा. लेखन विस्तारात ज्या तंत्रांची ओळख करून घ्यावी. कौशल्य स्थलांतराची सवय करावी. आंतरक्षत्रिय संबंधाची व्यापकता अनुभवावी व त्याची सवयी लावावी. तंतोतंत लेखन करण्याचा प्रयत्न करावा.
लेखनास गती येण्यासाठी हे करून पहा. 
१. एक छोटा परिच्छेद पाहून लिहा. सुवाच्च, शुद्ध, अचूक व भराभर लिहा. एका दमात पाच-सहा शब्द अथवा एक- दोन ओळी वाचून न पाहता लिहा. परिच्छेद लेखनास किती वेळ लागतो ते नोंदवा. तोच परिच्छेद पुन: पुन्हा लिहा. दुसऱ्या व तिसऱ्या लेखनाला कमी वेळ लागलेला दिसेल.
२. जे लेखन आपणास पाहून लिहावयाचे आहे ते लिहिण्यापूर्वी एकदा वाचून काढा. वाचल्यामुळे आशय, मजकूर ध्यानात येतो. त्याचा परकेपणा नाहीसा होतो. त्यामुळे पाहून लिहिताना आधी वाचल्यामुळे विषयानुरूप शब्द सहज आठवतात व लेखनात गती येते.

सुलेखन 
डोळ्यांना सहज दिसेल असे स्पष्ट, सुटे, मोकळे सुवाच्च लिहिणे म्हणजे सुलेखन होय. असे लेखन करणे प्रत्येकाला शक्य आहे. परंतु त्यासाठी प्रयत्न व सातत्य ठेवणे आवश्यक आहे. 
अनेकांना इंग्रजीतील लपेटीप्रमाणे एकात एक अक्षरे लिहिण्याची काहिंना सवय असते, त्यामुळे एका अक्षरातील मात्रा बऱ्याच वेळा पुढील वा मागील अक्षरावर गेलेली असते. उकार स्पष्ट नसतो अक्षराची गाठ स्पष्ट नसते. अक्षर फारच बारीक असते, त्यामुळे नीट वाचता येत नाही. दोन शब्दात आवश्यक ते आंतर राखलेले नसते. सांकेतिक वर्णाऐवजी दुसऱ्याच वर्णाची योजना केलेली असते. (षहामृग, आमाला) नको तिथे अविष्कार कौशल्य दाखवून अक्षर वाचणे अवघड करून टाकलेले असते. आपण असे काही लिहीत नाही ना? अशी एखादी सवय असल्यास ती घालविण्याचा प्रयत्न करा.
सुलेखनाची संकल्पना केवळ अक्षर लेखनापूर्ती मर्यादित नाही. तर एकंदर टीपण / लेखन टापटीप असावे अशी आहे. शीर्षक, उपशीर्षके देऊन ती अधोरेखित करावीत. सुटे, स्वतंत्र परिच्छेद पाडावेत. परिच्छेदाच्या सुरुवातीचे आद्याक्षर मोठे, प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र ओळ, नंतर समाविष्ट करावयाच्या मजकुरासाठी पुरेशी जागा, चोहोबाजुंनी मोकळी जागा ठेवावी. पारिभाषिक शब्द, संकल्पना, व्याख्या यासाठी स्वतंत्र चौकटी कराव्यात.संदिग्ध मजकूर पेन्सिलीने लिहावा. विषय बदलण्यासाठी निरनिराळ्या रंगाचे स्केचपेन वापरावे. अशाप्रकारे लेखन आकर्षक करता येते. अक्षर वळणदार करण्यासाठी सुलेखन पाट्या, कित्तावही यांचाही वापर करता येतो. आज टंकलेखन व संगणकाची सोय झाल्याने सुलेखनाकडे दुर्लक्ष होते. पण टंकलेखन करणारे आपणच असल्याने सुलेखनातील वाईट सवयी त्यातही उतरणार नाहीत का? म्हणून सुवाच्च नीटनेटके लेखन असावायला हवे.

सुलेखनाची वैशिष्ट्ये 
१) वाचता येईल इतपत (सुवाच्च) मोठे अक्षर.
२) सुटे, सरळ एकसारखे अक्षर. 
३) शब्दांत, वाक्यांत, परिच्छेदांत पुरेसे अंतर.
४) सर्व बाजूंनी पुरेसा समास.
५) नवीन माहितीची भर घालण्यासाठी पुरेशी जागा. 
६) आवश्यक तेथे अधोरेखा, अंक, चौकटी, रंगीत पेन यांचा वापर.

शब्दलेखन 

इंग्रजीत शब्दांचे स्पेलिंग चुकीचे असू नये असे म्हटले जाते. त्याप्रमाणे मराठीतही शब्द/ वर्ण /अक्षरे चुकीची वापरू नयेत. मराठी माणसे इंग्रजी लेखनात जितकी काटेकोर व आग्रही असतात तेवढीच ती आपल्याच भाषेतील लेखनात नसतात. ही अनास्था योग्य नव्हे.
पुढील शब्दातील चुका ओळखा व दुरुस्त केलेले शब्द पुन्हा लिहा. 
कृषीप्रधान, पेनटर, तासुन, थुका

आता पुढे दिलेले काही शब्द चुकीच्या पद्धतीने लिहा. 

प्रतिबिंब, श्रेष्ठ, ऑफिस, जनार्दन


चुकीचे लिहिताना काय होते? 
१) संकेत मोडला जातो.
२) अर्थ बदलतो. 
३) अप्रतिष्ठा वाटते.
४) अज्ञान सिद्ध होते.
५) उच्चारातच दोष वाटतो
  म्हणून शब्दलेखन नियमाबर हुकूम व प्रमाणबद्ध असायला हवे.

शब्दसंग्रह 

मोठा शब्दसंग्रह हे कोणत्याही लेखकाचे बळ असते. यासाठी विपुल व चिकित्सक वाचन हवे. एखादा नवा शब्द ऐकल्यास वाचल्यास तो टिपुण, लिहून घेण्याची दृष्टी हवी. असा शब्द मनात पुन: पुन्हा उच्चारावा. घोळवावा. अनेक संदर्भात वापरून पहावा. यामुळे अर्थकक्षा लक्षात येतात व तो आपल्या संग्रही नांदू लागतो.
शब्दसंग्रह वाढविण्यासाठी अन्य भाषकांशी संवाद सहाचर्य वाढवावे. देवाणघेवाण ठेवावी. परभाषेबद्दल कुतूहल व आस्था असावी. त्यांच्या सहवासात हे शब्द उच्चारावेत, वापरावेत, शब्दकोश वाक्यसंप्रदाय कोश, संस्कृती कोश, मराठी विश्वकोश, वाडमय परिभाषा कोश, उत्पत्ती कोश असे कोश कुतूहल म्हणून नेहमी चाळावेत. परभाषेतील भाषणे ऐकावीत. परभाषेतील चित्रपट पाहावेत. जुने नवे साहित्य सतत वाचत राहावे.

शुद्धता 

व्याकरणातील नियमांना अनुसरण निर्दोष लेखन म्हणजे शुद्धलेखन. 
लेखन सुवाच्च, अर्थपूर्ण व परिणामकारक व्हाववयाचे असेल तर विशिष्ट लिपीचा वापर करून लेखन करताना समाजमान्य नियम किंवा संकेत पाळण्याची पद्धती म्हणजे शुद्धता होय. अशुद्ध लेखन गैरसमज, चुकीचा ग्रह होण्यास कारण ठरते. माणूस बोलताना भरपूर स्वातंत्र्य घेतो. उच्चारणाची लकब, स्वरांचा चढ-उतार, आघात, विराम आणि अनुनासिके, उच्चारणाची पद्धती, आवाज वेगवेगळा असतो. पण लेखन एकाच प्रकारचे होण्यासाठी शुद्धतेचे नियम केलेले असतात. यामुळे वाचणाऱ्या सर्व तरेहच्या व्यक्तींना ते समजते.
शुद्धता ही केवळ व्याकरणीच असते असे नाही तर ती अर्थाच्या बाबतीत देखील असते. ‘वारा वाहतो’ - या करता क्रियापद रचनेप्रमाणे ‘रस्ता वाहतो’, ‘माणूस वाहतो’ या रचना व्याकरणिक नियमांनुसार बरोबर आहेत पण रचनेप्रमाणे ‘सुतार वाहतो’, ‘बंगला वाहतो’ या रचना व्यावहारिक अर्थ देत नाहीत. म्हणून अशा रचना अशुद्ध समजाव्यात व लेखनात हे भान ठेवून तसे शब्द वापरावेत, रचना कराव्यात. 

योग्य शब्दांचा वापर 

    ऐकलेल्या व वाचलेल्या मजकुराचे लेखन करताना ते अर्थपूर्ण योग्य व स्पष्ट होईल असे पाहावे. लेखनात शब्दरचनेला (शब्दसिद्धी), शब्दयोजनेला व त्यांच्या स्थानाला फार महत्त्व असते.

शब्दरचना

मराठीत नुसते मूळ शब्द एकापुढे एक ठेवून रचना होत नाही. वाक्य योजनेप्रमाणे शब्दात अनेक बदल करावे लागतात. ही बदल प्रत्यय, सामान्यरूपे, शब्दयोगी अव्यय, वचन, आख्यात प्रत्यय वगैरे लावून होतात. यालाच शब्दरचना म्हणावयाचे.
पुढील वाक्य वाचा. 
नदीला पूर आला आहे; अशाप्रकारे तेथे पाऊस झाला असला पाहिजे. 
आता पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्याचे तपासणी करा. 
१) मूळ वाक्य मोठ्याने वाचा. 
२) कानाला ते कसेसेच वाटत असल्यास अर्थ कायम ठेवून तेच वाक्य पुन्हा लिहा.
३) पहिली वाक्य व दुरुस्त केलेले दुसरे वाक्य यांची तुलना करा.
४) पहिला व पाचवा शब्द यांची रचना पहा चुकीची वाटल्यास दुरुस्त करा. दुरुस्त केलेला व मूळचा शब्द या दोन्हींचा परिणाम पहा. दुरुस्त केलेले दुसरे वाक्य आपणास येथोचित वाटेल यावरून लेखनात शब्दरचलेला किती महत्त्व असते ते स्पष्ट होईल.

शब्दयोजना 

शब्दरचनेत शब्दाला लावण्यात येणारे प्रत्यय, शब्दसिद्धीचे नियम लावण्यात चूक झालेली असते. परंतु शब्दयोजना करताना लेखकाचा हेतू स्पष्ट नसल्याने, मनात संभ्रम असल्याने, शब्दांचा अर्थ चुकीचाच माहीत असल्याने लेखनात उचित शब्द वापरले जात नाहीत. अशावेळी लेखकाचा आपल्यावरील प्रभाव कमी होतो. चुकीचा अर्थ स्मरणात राहतो व माहितीच्या प्रसारणात अडथळा येतो.
पुढील वाक्ये वाचा - ‘हल्ली तुझी बरीच व्याप्ती वाढलीय नाही?’, ‘मला तुझा आजन्मात कधी राग येणार नाही.’या वाक्यात शब्दयोजनेत काही चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी पुढील दिलेल्या सूचनांचा अवलंब करा.
१) आपल्या हेतूची पुन्हा तपासणी करा. नेमकी काय म्हणावयाचे आहे ते ठरवा. 
२) प्रत्येक शब्दाचा अर्थ शब्दकोशात पहा. संदर्भाने अर्थ निश्चित करा. 
३) अशाच अर्थाचे /रचनेचे इतरांनी लिहिलेले / बोललेले विधान ऐका / पाहा. आपले व त्यांचे विधान ताडून पाहा. मूल्यमापन दुसऱ्याकडून करून घ्या.

शब्दांचे स्थान 

वाक्यात शब्दांच्या स्थानाला / क्रमाला महत्त्व असते. मराठीत काही शब्दांची योजना चुकीच्या स्थानी झाल्यास अर्थ कसा बदलतो ते पाहा. १) ‘आमचे शिक्षक छान मराठी शिकवतात.’ या वाक्यात ‘मराठी’ या शब्दाच्या आधी छान हा शब्द योजल्याने मराठी हा विषय छान आहे, असा अर्थ होईल. येथे त्यांचे शिकवणे छान आहे हे सांगायचे आहे म्हणून हे वाक्य असे हवे - ‘आमचे शिक्षक मराठी छान शिकवतात.’यावरून हे लक्षात येते की, लेखनात शब्दरचना, योजना व स्थान यांना महत्त्व असते.

लेखनाचे घटक

मागील घटकात आपण लेखनाची प्राथमिक कौशल्य कसे आत्मसात करावी हे पाहिल्यानंतर आता प्रत्यक्ष लेखन करताना लेखनाच्या कोणत्या घटकाकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे हे पाहणार आहोत. 
आपणास जीवन व्यवहारात बऱ्याचदा लेखन करावे लागते. सर्वच तोंडी सांगून भागत नाही. असे तोंडी सांगितलेले विचार कितीही महत्त्वाचे असले तरी ते काही काळानंतर विस्मृतीत जातात. पुष्कळदा खूप काही बोलायचे असते पण वेळेच्या अभावी तज्ञ श्रोत्यांअभावी, योग्य जागेअभावी आपण बोलत नाहीत. बोलताना आयत्यावेळी अनेक विचार प्रविष्ट होतात. योजलेले मागे राहतात वा गळून जातात. अनेक बाह्य अडथळ्यांमुळे, श्रोत्यांच्या प्रश्नामुळे, आयत्या वेळेच्या आपत्तीमुळे विषयांतर होते. बोलण्यात प्रवाहित्व असते. भाषेच्या ओघाला, उच्चारणाला श्रोत्यांच्या प्रतिसादाला वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले जाते. त्यामुळे तत्काळ परिणाम झाला तरी त्यात गंभीर आशय, विचारांची जडता राहू शकत नाही. भाषणात एखादा विचार महत्त्वाचा वाटला, त्यावर अधिक सूक्ष्म विवेचन व्हावे असे वाटले तरी ते सांगितले जात नाही. कारण मागे जाऊन विचार करायला सवड नसते. सवड असली तर श्रोत्यांना कंटाळा येतो. ओघ राहत नाही. यासाठी सुव्यवस्थित लेखनाची गरज आहे काय? आणि कसे लिहावयाचे? याची पूर्वकल्पना आपणास आहेच. आता प्रत्यक्ष लेखन करताना कोणत्या महत्त्वाच्या घटकाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे हे आपणास लक्षात घ्यावयाचे आहे.

मांडणी
        लेखनात मांडणीचे महत्त्व आधार बिंदूसारखे असते. मांडणीचे नियोजन केल्याशिवाय लेखनाचा आवाका ध्यानात येत नाही. कोणतेही नवीन कौशल्य शिकताना सुलभतेकडून कठीणतेकडे असा क्रम ठेवावा लागतो. नवीन पोहायला शिकणारा ज्याप्रमाणे आधार घेतो. त्याप्रमाणे लेखक मांडणीच्या साहाय्याने लेखन करू शकतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना निबंध लिहिण्यासाठी आराखडा वा रूपरेषा दिली जाते. त्यामुळे सराईत नसलेल्या विद्यार्थ्यालाही निबंध लिहिणे सोपे वाटते. 
प्रथम लेखकाने काय सांगायचे / लिहायचे ते निश्चित करून आपण कोणासाठी व कशासाठी लिहीत आहोत हे निश्चित करावे. आपल्या लेखनाचा हेतू / उद्देश काय ते ठरवावे. वाचक सामान्यपणे क्रमवार वाचत असतो हे लक्षात ठेवून घटका-घटकात सारखी संगती राखली पाहिजे हे लक्षात घ्यावे. तपशीलवार व संथपणे वाचणाऱ्या वाचकांसाठी आपण जसे लिहितो तसे वेळ कमी असणाऱ्या, वरवर वाचणाऱ्या समारोप सूचीवरून विषयाचा अंदाज व गुणवत्ता लक्षात घेणाऱ्या वाचकांसाठीही लिहावयाचे असते हे लक्षात घ्यावे. म्हणून मुद्द्यांची संख्या महत्त्व व क्रम या घटकाकडे मांडणी करताना लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक मुद्दा हा स्वतंत्र घटक असून तो एका मोठ्या विषयाचा एक भाग आहे हेही लक्षात घ्यावे.

मुद्द्यांची संख्या
 
एखादा विषय विशद करताना लेखकाने तो अधिकाधिकपणे स्पष्ट केला पाहिजे. एखादी कल्पना विचार गृहीतकृत्ये किंवा तत्व लक्षात आल्यावर ते मांडताना अनुकूल, प्रतिकूल, व्यक्तीसापेक्ष, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दृष्टिकोन त्यांना असतात हे लक्षात घ्यावे. त्यामुळे विषयाची व्याप्ती स्पष्ट होते. यासाठी संवादाची मूलभूत तंत्रे व कौशल्ये या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकातील ‘कल्पनास्फोट व प्रविव्याव्यावी’ या तंत्राच्या साह्याने मुद्दे शोधावेत व लिहावेत. पुन्हा पुन्हा मुद्द्यांच्या साह्याने चिकित्सक परीक्षण करावे. 
१. सारखाच आशय / विषय स्पष्ट करणारे मुद्दे कोणते?
२. ते एकमेकात समाविष्ट होऊ शकतील का? कसे? 
३. एखादा मुद्दा इतरांपेक्षा अधिक व्यापक आहे असे आपणास वाटते काय? 
४. संदिग्ध मुद्दा कोणता?
५. त्याचे स्पष्टीकरण कसे कराल? 
६. प्रत्येक मुद्द्यापुढे प्रश्नचिन्ह ठेवून त्याचे उत्तर देता येते का ते पहा. 
७. विषयाच्या विरुद्ध जाणारा मुद्दा कोणता? 
८. मुद्द्यातील व्यक्तीसापेक्षा स्पर्श स्पष्ट करा. 
९. कालसापेक्ष मुद्दा कोणता? 
१०. कालातीतता स्पष्ट करणारा मुद्दा कोणता?
सदरील मुद्दे कोणत्याही विषयाच्या मुद्दे लेखनासाठी वापरता येतील. अशा प्रकारे मुद्द्यांची संख्या आपल्याजवळ जास्त झाल्यावर नियोजित विषयाची व्याप्ती नक्कीच वाढलेली दिसेल.

महत्व 

मुद्दे काढले पण कोणत्या मुद्द्याला अग्रक्रम द्यावा. कोणता दुय्यम, कमी महत्त्वाचा हे ठरवावे. हे लेखकाचा हेतू, वाचकाच्या अपेक्षा, लेखनाच्या गरजा यानुसार ठरत असते. म्हणून लिहिण्यापूर्वी यापैकी एखादी गोष्ट निश्चित करावी. तीनही महत्त्वाच्या वाटत असतील तर त्यात क्रम ठरवावा. नाहीतर लेखनाची रचना तीन भागात करावी.

क्रम 
     क्रमरचनेत मांडणीला महत्त्व असते. क्रम ठरवताना अंधारातून उजेडाकडे, व्यापकतेकडून सूक्ष्मतेकडे, प्रश्नातून उत्तराकडे, संदिग्धरतेकडून स्पष्टतेकडे, विशिष्टाकडून सामान्यतेकडे, अनेकातून एकतेकडे मुद्द्याची दिशा असावी. ही दिशा बोध स्पष्ट होण्यास व्यापक व सूक्ष्म विचार करण्यास मदत करते.
   अशाप्रकारे मुद्दे आणि त्यांच्या महत्त्व नुसार क्रम ठरविल्यावर एकेका घटकाचा स्वतंत्र विचार होणे व मूळ विषयाचा भाग म्हणून होणे आवश्यक असते. यासाठी प्रारंभी व्यापक भूमिका मांडून नंतर एकेका घटकांना न्याय द्यावा या पद्धतीने लेखनाची मांडणी करावी.

अनुक्रम

         प्रत्येक वेळी मांडणी कागदावर उतरलेलीच असते असे नाही. पण अनुक्रम मात्र नोंदवलेला असतो. मांडणी म्हणजे अनुक्रमाचा कच्चा, मनातील आराखडा; तर अनुक्रम म्हणजे मांडणीचा दृश्य, लिखित, संक्षिप्त आराखडा. अनुक्रमणिकेत आपण काय सांगणार आहोत ते तर संबंधिताचा संपूर्ण तपशील तयार झाल्यावरच ठरविता येते. लेखनास सुरुवात करण्यापूर्वी तात्पुरती अनुक्रमणिका आपण गृहीत धरू शकतो; पण प्रत्यक्ष लेखनात त्यात अनेक बदल होतात. मुद्दे-उपमुद्दे यांची भर पडते. घटकाचे विश्लेषण होऊन त्यातून स्वतंत्र घटकांचीही निर्मिती होऊ शकते. प्रत्येक घटक सारख्याच पद्धतीने लिहिला पाहिजे असे बंधन नसते. परिपूर्ण अनुक्रमणिका लेखकाचा अभ्यास, भाषा, तयारी, वेगळेपणा स्पष्ट करीत असते. तपशीलवार अनुक्रमणिका सत्यता, स्पष्टता दाखविते. संक्षिप्त, पुनरुक्त संदिग्ध शब्द अनुक्रमणिकेलाच नव्हे तर लेखनालाही दोषास्पद ठरवितात.
      लेखनात मांडावयाची सर्व विषय अनुक्रमणिकेत स्पष्ट झाले पाहिजेत. जसे- मनोगत, ऋणनिर्देश, भूमिका, प्रास्ताविक, विषय विवेचन, भागश:, घटकश:, प्रकरण:, मांडणी, पूरक माहिती, संदर्भसाधने अशी सर्व अभ्यास सामग्री स्पष्ट झाली पाहिजे. त्यात तार्किकता पाहिजे. सुरुवात व शेवटचे घटक अभ्यासप्रक्रियेचे पूर्णता दाखवतात. जिथून सुरुवात झाली तेथेच येऊन पोहोचले की एका प्रश्नाच्या ठिकाणी किती बाजू असू शकतात ते समजते. किंवा एखादा अस्पष्ट विषय प्रत्येक घटकातून अधिकाधिक स्पष्ट होत जाऊन मन नि:संदिग्ध होते.
उदा. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ या पुस्तकाची अनुक्रमणिका तयार करण्याची तत्वे लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे करता येईल.
१. मनोगत 
२. प्रास्ताविक 
३. भाषेचा लेखनासाठी नियमाची आवश्यकता
४. भाषेची वर्णमाला व लिपी 
५. अनुस्वारासंबंधीचे नियम
६. रस्वा-दीर्घासंबंधीचे नियम 
७. किरकोळ व इतर नियम 
८. जोडाक्षराचे लेखन लेखनातील विरामचिन्हे 
९. वाक्यरचना
१०. हे शब्द असे लिहा.

स्वाध्यायासाठी -
तुम्हाला ‘प्रभावी व्यक्तिमत्व’ या विषयावर सामान्य वाचकांसाठी एक २५ पृष्ठांची पुस्तिका तयार करावयाची आहे या पुस्तिकेची अनुक्रमणिका कशी कराल?



तर्क संगती
         आपले लेखन तर्कसंगत आहे किंवा नाही याचे प्रत्यंतर अनुक्रमातून येऊ लागते. संगतीही आराखड्यात कशी असायला हवी तशी ती विवेचनातही असायला हवी. तर्क म्हणजे काय? तर अनुमान. हे अनुमान तर्क बुद्धीस पटणारे हवे. ते केव्हा पटेल - तर एखाद्या विषयाचे सूक्ष्म अन्वेषण करून त्याविषयी सामान्य तत्वे निश्चित करून त्यापैकी मूलभूत तत्त्वांचा शोध घेऊन, त्या तत्त्वापासून बाकीच्यांची निष्पत्ती झाली आहे असे सांगू तेव्हा. याचा अर्थ आपले अनुमान साधार व लोकांना पटणारे हवे. हे केव्हा पटेल तर आपण संगतवार सांगू तेव्हा मग संगती म्हणजे काय? तर पुढील भाग मागच्याशी संबंधित असणे व तसा तो जुळवून सांगणे. प्रत्येक भागात एक शिस्त असून तो पद्धतशीर, क्रमाने, समतोलाने, समरूपतेने विचार संगतीने मांडलेला असणे होय. आपण आपल्या लेखनात ही तत्वे कशी सांभाळाल? यासाठी पुढे एक प्रश्न सूची दिली आहे. या सुचीचा वापर करून लेखनात संगती आली आहे किंवा नाही त्याचा पडताळा आपण घेऊ शकतो. 

प्रश्नसूची 

         १. लेखनाचा मुख्य विषय प्रश्न समस्या कोणती? 
२. प्रश्नाच्या उत्तराची संभाव्य, किमान चार व कमाल कितीही उत्तरे शोधा.
३. उत्तराची घरी, दारी, कचेरीत चर्चा करून आपल्या उत्तरास पाठबळ किती आहे ते पहा.
४. उत्तर सखोल असल्याकडे कटाक्ष ठेवा. ५. आपले उत्तर बरोबरच आहे, असे आपणास का वाटते त्याची किमान चार कारणे लिहा.
६. उत्तराचे मूलगामित्व ठरविण्यासाठी शब्दकोश, व्युत्पत्तीकोश, विश्वकोश आणि तज्ज्ञ व्यक्ती यांचे सहाय्य घ्या.
७. आपले लेखन कमीतकमी पण अर्थपूर्ण व वेचक शब्दांत मांडा.   

भाषाविष्कार
                भाषाविष्कार म्हणजे लोकनिहाय भाषिक अभिव्यक्ती होय. एकच आशय व्यक्त करण्यासाठी भाषेत एकापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध असतात. लेखकाचे वेगळेपण त्याच्या पर्याय निवडीवरच अवलंबून असते. लेखकाने योजलेले शब्द, वापरलेले निवेदन पद्धती, वाक्यरचना, साहाय्यास घेतलेले संदर्भ, दिलेले दृष्टांत, हाताळलेले लेखन प्रकार, केलेली मा

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

लेखन कौशल्य


Monday 4 December 2017
भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन
A. लेखनाचे महत्व :
१.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता होय.
२.लेखनाद्वारे भाव,विचाराची अभिव्यक्ती होते.
३.मराठी भाषा संस्कृतमधून आली आहे व तिचे लेखन उच्चारानुसार होते.
४.जीवनात यश संपादन करण्यासाठी लेखन कौशल्य असणे आवश्यक आहे.

B. लेखनाचे सर्वसामान्य उद्दिष्टे :
१.आत्माविष्कार : मनातील भावना,कल्पना,विचार,
लिखित स्वरुपात व्यक्त करणे .
२.प्रचार : आपले विचार, मत दुसऱ्यापर्यंत लेखनाद्वारे पोहचवणे .
३.मन:शांती : मनातील भावना लिहून मनाला शांतता होते.
४.सुसंस्कार : दुसऱ्याला आपले विचार वाचण्यास दिले असता त्या त्या व्यक्तीवर चांगले सुसंस्कार होतात.

C. लेखनातील शिक्षणातील उद्दिष्टे :
१.वहीवर योग्य रेखा आखणे .
२.लेखन व्याकरण शुध्द व समास पाडून करणे.
३.मुख्य मुद्द्याला अधोरेखा मारणे.
४.अक्षरावर शिरोरेषा मारणे.

D. लेखन सिध्दता व ती कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे:
१.पकड : हाताची बोटे व मनगटाच्या बळकटीत ३ से.मी.अंतरावर पेन धरावा .
२.आसनबंध : वि.वयानुसार व उंचीनुसार टेबल खुर्चा असाव्यात .
३.दृष्टी हस्त संयोजन : लेखन करतांना तेथे दृष्टी पोहचेल तिथे हात पोहचावा .

E. सुलेखन :
सुलेखन हे लेखनाचे बाह्यांग आहे.सुवाच्च ,वळणदार,
प्रमाणबद्ध व आकर्षक अक्षरात केलेले लेखन म्हणजे सुलेखन होय.

F. चांगल्या हस्ताक्षराचे वैशिष्टे :
१.लेखनातील स्पष्टता वळण व आकार.
२.दोन शब्द व अक्षरातील आंतर .
३.लेखन शुध्दता व लेखनातील गती.
४.लेखनाचे नियोजन .
५.लेखनातील मुद्याची गुंपण.
६.लेखनातील आटोपशीरपणा.
७.लेखनातील लक्ष अकृट करण्यासाठी वापर लेखन हे व्यक्ती मत्वाचे दर्पण आहे.
८.लेखनातील मुख्य मुद्याला अधोरेख करणे.

G. हस्ताक्षर सुधारण्याच्या पध्दती :
१.वर्णमालेचे तक्ते वापरावे.
२.शब्द पट्ट्या वापराव्यात .
३.चित्राचा वापर करावा उदा-गरुड ‘ग’
४.खादी फलकाचा वापर अक्षर काढण्यासाठी .
५.रेषा,गोल ,अर्धवर्तुळ ,कमान काढून अक्षर शिकवावे.
६.रंगीत खडूचा व रंगीत चित्राचा वापर करावा.
७.विद्यार्थाला वर्णमालेच्या वह्या बाजारातुन उपलब्धता करून देऊन प्रात्यक्षिक द्यावे.
८.हस्ताक्षर स्पर्धा घ्यावे.

H. अनुलेखन ,दृकलेखन ,श्रुतलेखन ,गतीलेखन :
१.अनुलेखन :फळ्यावरचे शिक्षकाचे पाहून लेखन करणे त्यास अनुलेखन म्हणतात.
२.दृकलेखन : शिक्षकाने स्वाध्याय दिल्यास त्या प्रश्नांचे उत्तर पाहण्यासाठी पुस्तकातील पाहून लेखन करणे त्यास दृक लेखन म्हणतात.
३.श्रुतलेखन :शिक्षकाचे एकूण लेखन करणे त्यास श्रुतलेखन म्हणतात .
४.गती लेखन :योग्य वेगाने लेखन करणे त्यास गती लेखन म्हणतात.

I. लेखनातील दोष किंवा उणीवा त्यावर उपाय:
१.खराब अक्षर :हस्ताक्षर सुधारण्याच्या पध्दती .
२.अनुचित गती :रोज श्रुत लेखन देणे.
३.अशुध्द लेखन :ऱ्हस्व दीर्घची ओळख करून देणे.
४.अनुचित शब्दप्रयोग :योग्य शब्द प्रयोग करणे.

J. लेखनासाठी योग्य साहित्य व साधनाची निवड :
१.कागद :एक रेषाची ,दोन रेघी,तीन रेषाचा कागद.
२.कागदाखाली धरावयाचा पुठ्ठा :फळी,
३.लेखन :बॉलपेन ,साईपेन ,पेन्सिल.

K. विविध लेखनाचे प्रकार :
१.निबंधलेखन .
२.पत्र लेखन.
३.कथा व संवाद लेखन .
४.संवाद लेखन .
५.कल्पना विस्तार.
६.सारांश लेखन.
७.दैनंदिनी लेखन.
८.अहवाल लेखन .
९.भावानुवाद.
१०.आकलन.
११.निवेदन .
१२.वार्तालेखन.

१.निबंध लेखनाचे प्रकार :
१.कथनात्मक निबंध :घटना,इतिहास,चारित्र्य ,कथायाचे अनुभव आपल्या शब्दात सांगणे त्यास कथनात्मक निबंध म्हणतात उदा-साने गुरुजी.

२.वर्णनात्मक निबंध :व्यक्ती वस्तु,स्थल,प्रसंग यांचे प्रकृती वर्णन करणे त्यास वर्णनात्मक निबंध म्हणतात .
उदा-माझी शाळा .

३.चारित्र्यात्मक निबंध :व्यक्ती ,पशु,पक्षी स्थलाचे चारित्र्य दर्शन मांडणे त्यास चारित्र्यात्मक निबंध म्हणतात.
उदा-माझा आवडता नेता.

४.कल्पना प्रधान निबंध :आपल्या मनातील कल्पना ,भावना,विचार मांडणे त्यास कल्पना प्रधान निबंध म्हणतात .
उदा-मी पंतप्रधान झाली तर .....

५.रसग्रहण निबंध :कथा ,कविता,कादंबऱ्या ,वाचुन निबंध लेखन करतात त्यास रसग्रहणात्मक निबंध म्हणतात .
उदा-माझे आवडते पुस्तक .

२.पत्र लेखनाचे प्रकार व त्यातील आवश्यक गोष्टी :
१.व्यक्तिगत (घरगुती पत्र )

२.व्यावसायिक (कार्यालयीन पत्र )

३.बातमीपत्र .

त्यातील आवश्यक गोष्टी :
१.स्थळ व तारीख :पत्राच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात लिहावी.
२.मायना (शीर्षक) :ज्याला पत्र लिहिण्याचे आहे त्यासंबधी 
उदा-तीर्थस्वरूप ,प्रिय.
३.आशय (कलेवर ): यात पत्र लिहिण्याचा मुख्य उद्देश लिहिणे आवश्यक आहे.
४.शेवट (समाप्ती ): आपले स्वताचे पत्र पाठवणाराचे नाव लिहावे उदा-तुझा मित्र .
५.पत्ता : ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता लिहणे आवश्यक आहे.

३.कथा लेखन :
१.कथा लेखन मुद्याच्या साह्याने करावे.
२.कथेतील घटना तंतोतंत डोळ्या समोर उभी करणे .
३.कथेतील पात्राची व्यक्तीरेखा व स्वभाव रेखा .
४.कथा सांगणे व कथेतील योग्य शीर्षक देणे.

४.संवाद लेखन :
१.व्यक्ती समोरा-समोर बोलत आहे असे लेखन करणे.
२.दोन व्यक्तीचे भावना,कल्पना,विचार लेखनाद्वारे प्रगट करणे.

५.कल्पना विस्तार :
१.कल्पनेचे आकलन होणे आवश्यक आहे.
२.कल्पना,फुलुन,ती पटून देता यावी .
३.सोपी समर्पक उदाहरणे देणे.
४.निबंधापेक्षा कमी ओळीत कल्पना विस्तार असावा.

६.सारांश लेखन :
१.कल्पना विस्ताराच्या उलट प्रकार आहे.
२.गद्य /पद्य १/३ सारांश लिहावा लागतो.
३.पण सर्व मुद्दे यायला हवे.
४.आपल्या शब्दात लेखन करणे.

७.दैनंदिनी लेखन :
१.व्यक्तीने स्वतः स्वतःच्या मनाशी साधलेला संवाद म्हणजे दैनंदिनी होय.
२.दैनंदिनी कामाच्या नियोजनाला यशाशक्ती म्हणतात.
३.रोजच्या व्यवहारात आपण केलेली कार्य लिहून ठेवणे.
४.दैनंदिनीत दिनांक, वार, महिना लिहून ठेवणे.

८.अहवाल लेखन :
१.शाळेत झालेले विविध कार्यक्रमाचा आढावा मोजक्या शब्दात विद्यार्थी आपल्या वहीत लिहून ठेवतात.
२.महत्वाचे मुद्दे गाळू नये.
३.महत्वाच्या व्यक्ती ,घटना याची नोंद ठेवणे.
४.दिनांक ,वार ,महिना लिहिणे.

९.भावानुवाद:
१.मराठीचे इंग्रजीत रुपांतर करणे.
२.इंग्रजीतील लेखनाचे मराठीत रुपांतर करणे.

१०.आकलन :
लेखक त्याची भावना,विचार कल्पना,त्याच्या लेखनाद्वारे व्यक्त करत असतो ती आपण वाचून मनाने लेखन करणे त्यास आकलन म्हणतात.

११.निवेदन :
आपल्या तक्रारी ,सूचना,मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्या समोर मांडण्यासाठी निवेदन लेखन करावे लागते.

१२. वार्तालेखन :
वर्तमान पत्रात कविता,कथा,सुविचार व परिसरातील घटना लिहून पाठवणे त्यास वार्तालेखन म्हणतात.

L. शैलीयुक्त लेखनाची वैशिष्टे :
१.शैली हा लेखनाचा प्राण आहे.
२.अनुभवाशी एक निष्ठ असलेले लेखन म्हणजे शैलीयुक्त लेखन होय.
३.समर्पक शब्द योजना असावी .
४.प्रवाह व लयबध्दता असावी.१३.रसास्वाद परीक्षण (रसग्रहण लेखन )एखाद्या कविचे किंवा पद्य काव्याचे परीक्षण करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.शब्द सौदर्य .
२.अर्थ सौदर्य .
३.भाव सौदर्य.
४.कल्पना सौदर्य.
५.अलंकार सौदर्य .
६.विचार सौदर्य .

M. लेखन मूल्यमापन करण्याचे साधने : 
परीक्षा 
1. निरीक्षण : १.अक्षराचे वळण. २.शुध्द लेखन.
2. लेखी परीक्षा : १. दीर्घोत्तरी प्रश्न . २.लघुत्तरी प्रश्न . ३.वस्तुनिष्ठ प्रश्न .
3. प्रात्याक्षिके : १.हस्ताक्षर स्पर्धा, २. वैयक्तिक नोंदी, ३. प्रासंगिक नोंदी, ४. पडताळा सूची

वैचारिक लेखनाचे स्वरूप

आपले विचार,भावना,कल्पना इत्यादींचे आपण लेखन करतो किंवा आपल्या विचारांना आपण लिपीबद्ध करतो.यालाच आपण लेखन म्हणतो.हे एक भाषिक कौशल्य आहे.लेखनाला व्याकरणीक अशी नियमांची चौक असते.लेखन करत असतांना किंवा त्या पूर्वी आपण मानसिक चिंतन करीत असतो,ही एक प्रकारची विचार निर्मितीची प्रक्रिया असते. यात आपण आपल्याला पटलेले वा न पटलेलेही विचार व्यक्त करू शकतो. किंवा इतरांचे विचार,मतेही आपण विचार प्रतिपादनात घेऊ शकतो.

साहित्य हा खूप व्यापक विषय आहे पण इथे आपण भाषेच्या कार्यामागील व वापरामागील हेतूवरून ललित व वैचारिक लेखन असे जे दोन प्रकार मानता येतात असे ललित साहित्य प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहे.

 वैचारिक लेखनाचे स्वरूप व प्रकार
वैचारिक स्वरूपाच्या लेखनात लेखक हा लोकसत्ताक समाजव्यवस्थेत वैचारिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्वतःचे विचार मांडत असतो.या विचार प्रकटिकरणातून कधी तो इतरांचे विचार ग्रहण करतो किंवा कधी त्या विचारांना सभ्यपणे मतभेद देखील व्यक्त करत असतो.भाषेद्वारे जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती,वस्तू,स्तिथीविषयी किंवा इतर कुठल्याही विषयांवर विचार प्रकट करतो,त्या विचारांमधून आपण आपले ज्ञान,अभिरुची,आपली जीवनधारणा,नैतिक भूमिका,आपले व्यक्तिमत्त्व देखील प्रकट करत असतो.
एखाद्या विषयांवरील इतरांच्या मतांना मांडत जात त्यातील उणिवा,त्रुटी दर्शवत स्वतःचे विचार युक्तिवाद कौशल्याने पूरक उदाहरणे,संदर्भ देऊन पटवून देणे अशीही एक पद्धत वैचारिक लेखनात आहे.ज्याला खंडन मंडन असे म्हणतात.

तर्कशुद्ध निष्कर्ष काढून,विषय विवेचन करत साहित्य व कला समीक्षा,वर्तमानपत्रे, ग्रंथ,संशोधन,पाहणी अहवालाचे निष्कर्ष इत्यादी क्षेत्रात वैचारिक लेखन केले जाते. सामान्यतः न्याय व्यवस्था,कलामुल्य मापन,अध्यात्म,वर्तमानपत्र,संस्कृती-इतिहास मीमांसा,तत्वज्ञानात्मक ग्रंथ या क्षेत्रात मोठया प्रमाणात वैचारिक लेखन होत असते.



अग्रलेख 
नियतकालिके वा वर्तमानपत्र यांच्या संपादकांनी लिहलेल्या संपादकीय लेखाला अग्रलेख म्हणतात.जागृती, लोकशिक्षण,जाणीव या प्रेरणेतून हे लेख लिहिले जातात. सद्यस्थितीतील प्रश्न, समस्या,घटना,व्यक्तीच्या कृती अशा विविध जीवनक्षेत्रासंबंधित विषयांवर अग्रलेखातून ठराविक शब्दात विचार मांडल्या जातो.सामान्य माणसाला जागे करणे व विधायक कृतिसाठी प्रेरित करणे हे अग्रलेखाचे उद्दिष्ट असते.संपादकीय लेखणाचे मूळ कार्य हे वर्तमानातील सामाजिक,राजकीय परिस्थितींवर भाष्य करणे असते.अलीकडच्या काळात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे मुखपृष्ठ असलेले स्वतंत्र असे वर्तमानपत्र आहे.त्यामुळे अग्रलेखातील निष्पक्षपणा(जो असायलाच हवा) वाचायला मिळत नाही.अग्रलेखातील भूमिका ही त्या वर्तमानपत्राची अधिकृत भूमिका असते.


वैचारिक निबंध लेखन :-
आपल्या विचारांची सुसूत्र,तर्कशुद्ध मांडणी वैचारिक निबंध लेखनात केली जाते.हा गांभीर्यपूर्वक लिहलेला तसेच समाजाला उपयुक्त असे विचार,दृष्टिकोन मांडत असतो.निबंध या साहित्य प्रकाराचा उदय विचारप्रतिपादन करण्यासाठी झाला आहे.विचार अनुभूती किंवा कल्पनांची,मुद्यांची सुसूत्र बांधणी येथे अभिप्रेत आहे.निबंध एक प्रकारे सौंदर्यपूर्ण रचनेशी संबंधित आहे.ही रचना विचार,विषय,कल्पना,विषय विश्लेषण यांची असू शकेल.मराठी शब्दकोशात 'निबंध म्हणजे =प्रबंध,नियमबद्ध असणारा लेख,मोठा लेख,नीटपणे पक्का जडलेला लेख' असा अर्थ दिलेला आहे.



स्फुट लेखन
एखाद्या विशिष्ट विषयावर समकालीन संदर्भ देत लिहलेला वर्तमानपत्रातील लेख.यात वैचारिक गांभीर्य राहीलच असे नाही.मनमोकळेपणाने विषय विषयांतरे, विषय वाढवीत नेणे असे करीत एखादा नवा विचार,माहिती चिंतानफल मांडलेले असावे लागते.मर्यादित शब्दात सुत्ररूपाने,संक्षेपाने असे लेखन केले जाते.लेखनात मृत्यू लेख व वैचारिक लेख असे प्रकार देखील आहे.



ललित साहित्याचे प्रकार
प्रथम आपण बघू ललित साहित्य म्हणजे काय

ललित शब्दाचा अर्थ 'सौंदर्य' 'सुरेख' 'मनमोहक' असा आहे.मनाला आनंद देणारे सौंदर्यतत्व या शब्दांमधून सूचित होते.लेखक हे लालित्य भाषेद्वारे निर्माण करीत असतो.आलंकारिक शब्दरचनेतून रसात्मक अनुभव वाचकांंना करून दिल्या जातो.लेखक प्रत्यक्षातल्या माणसावरून,अनुभवावरून कल्पनेच्या साहाय्याने पात्र निर्माण करतो.ती निर्मिती प्रतिभासिक निर्मिती असते. तात्पर्य. प्रत्यक्षातल्या जीवनाचे कल्पनापूर्ण निर्मितीत परिवर्तन घडविण्याची क्रिया म्हणजे साहित्यनिर्मिती होय.

गोष्ट / कथा आणि लघुकथा
गोष्ट हा लोककथेचा एक प्रकार मानावा लागेल.निसर्ग घटकांच्या,माणसांच्या,प्राणांच्या जीवनातल्या घटनांच्या आधारे गोष्ट रचली जाते.गोष्टी या बहुदा रंजन वा उपदेश करणे या प्रेरणेतून निर्माण होतात.

जेव्हापासून मानवाला बोलण्याची कला अवगत झाली तेव्हापासून एकमेकांना गोष्टी सांगण्याची कला ही विकसित झाली.पूर्वी या गोष्टी प्राण्यांच्या(इसापनीती)वैगरे असत.नंतरच्या काळात लोकजीवणाचा व लोकव्यवहाराच्या अनुभवावर आधारित अशा कथा एकमेकांना सांगण्यात येत असत.या कथांमध्ये सांगण्याचे कौशल्य, उत्कंठा,व आकर्षकपणा असे त्यामुळे कथा रंजक बनत असे आणि एकमेकांच्या कथा लोक आवडीने ऐकत असत.विकासाच्या ओघात हळूहळू लिपीचा शोध लागला त्यानंतर लिहिण्याची कथा अस्तित्वात आली.शिलालेख कोरले गेले ताम्रपट व भूर्ज पत्रावर लेखन केले गेले.त्यानंतर कागदाचा शोध लागला. त्यानंतर मुद्रण कलेचा शोध लागला.

मुद्रणकलेच्या शोधानंतर कथा लिखित स्वरूपात साकार झाली आणि वाङ्मय प्रकारात एक महत्त्वाचा प्रकार म्हणून लोकप्रिय ठरली.लघुकथेत मोजकी पात्रे,घटना,प्रसंग यांच्या आधारे जीवनाचे अंगदर्शन घडते.कल्पित माणसे,निसर्ग घटक ही लघुकथेतील पात्रे असतात.कवितेनंतर प्रचंड लोकप्रिय असलेला हा दुसरा साहित्य प्रकार आहे.



आत्मकथन,ललित निबंध,कविता व प्रवासवर्णन
आत्मकथा/बायोग्राफी
स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या ओढीतून आत्मकथन हा साहित्य प्रकार अस्तित्वात आला आहे. स्वतःच्या जीवनातल्या घटना ,भेटलेल्या व्यक्ती,घेतलेले अनुभव, आपल्या भावना याचे स्वतः केलेले कथन म्हणजे आत्मकथा.

आत्मचरित्राच्या वाचकाला नेहमी यशस्वी लोकांच्या आत्मकथेत रस असतो.उद्योगपती,साहित्यिक,मोठा राजकीय नेता,सिलेब्रिटी अभिनेता-अभिनेत्री,सामाजिक कार्यकर्ता,वरिष्ठ पत्रकार,IS/IPS अधिकारी अशा लोकांच्या जीवनातील घटना,त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आत्मचरित्र वाचल्या जाते.जगभरातील कित्येक मोठया व्यक्तीचें अनुवादित बायोग्राफी आपल्याला आज उपलब्ध आहे.

मराठी साहित्यातील 'आत्मचरित्रा'ला खऱ्या अर्थाने दलित साहित्यिकांच्या आत्मकथनाने समृद्ध केले.दया पवार लिखित 'बलुत' या आत्मकथेने देशातीलच नव्हे तर विदेशातील शोषित-पीडितांना देखील 'आत्मकथा' लिहिण्यास प्रोत्साहित केले.



ललित निबंध
वैचारिक निबंधापेक्षा ललित निबंधाचे स्वरूप वेगळे असते.यात एखादे व्यक्ती चित्र,एखादी घटना,एखादा अनुभव किंवा एखादा क्षण असे काहीही स्व केंद्री भूमिकेतून कथन करणे ही एक रीत आहे.'स्व' ने केलेले चिंतन,'स्व' च्या आठवणी,'स्व' च्या भावावस्था याचे दर्शन ललित निबंधातून घडते.लालित्यपूर्ण चिंतनप्रक्रिया हे याचे वैशिष्ट्य सांगता येईल.विषयाचे बंधन वा मांडणीची शिस्त असे काही न पाळणारा हा मुक्त लेखन प्रकार आहे.अनुभव,घटना किंवा व्यक्तींकडे पाहण्याची दृष्टी ही लेखकाची खास व्यक्तिगत दृष्टी असते म्हणून ललित निबंधाला विविधताही प्राप्त होऊ शकते. घटना-व्यक्ती यांचा विशिष्ट कालानुक्रम गृहीत धरून 'मी' जेव्हा बोलू लागतो तेव्हा त्या बोलण्याला कथनपरता प्राप्त होते व एखादी हकीगतही ल.निबंधात सामावली जाऊ शकते.सोंदर्ययुक्त मूल्यदृष्टीने जीवनानुभव घेणारा 'मी' ललित निबंधातून प्रकट होत असतो.सर्व मानवीमनाचे - स्वभावाचे सर्व रंग प्रकट करण्याचे सामर्थ्य ललित निबंधात असते.



कविता
कविता हा भावनेला महत्व देणारा साहित्य प्रकार आहे.कवीच्या भावनात्मकतेचे सहज,उत्कट व प्रत्ययकारी संक्रमण वाचकांमध्ये होणे आवश्यक मानले जाते. कवीला भावनात्मक अनुभवाची तीव्र, उत्कट अशा अविष्काराची ओढ असते.त्यातूनच तो काव्यशब्द,काव्यभाषा घडवतो.कवितेत भाषिक मोडतोड मोठ्या प्रमाणावर होते,त्यामागे कवीचा सौंदर्यसर्जनाचा हेतू असतो.व्यवहारभाषेची परंपरागत नियमव्यवस्था, संकेतव्यवस्था मोडली गेल्याने वाचक किंवा श्रोता मूळच्या संकेतव्यवस्थेचे स्मरण ठेवीत कविनिर्मित नव्या व्यवस्थेकडे आकर्षित होतो.भाषेच्या लयींचा,नादगुणांचा,दृश्यागुणांचा,दृश्यात्मकतेचा सूचक वापरही कवी करत असतो. भाषेच्या गद्य साहित्य प्रकारांमध्ये भाषा हे बहुदा माध्यम व साधन म्हणून कार्य करते.परंतु कवितेत भाषा हे भावसंप्रेषणाचे माध्यम बनते.



प्रवास वर्णन
प्रवासवर्णनामध्ये प्रवासात भेटलेल्या व्यक्ती,त्या व्यक्तींचे गुण वैशिष्ट्ये,प्रवासात आलेले संमिश्र अनुभव,ज्या ठिकाणी प्रवास घडला त्या ठिकाणचा भूगोल,इतिहास,लोकांच्या रितिभाती,लोकजीवन,स्थळ वैशिष्ट्ये या सर्वांचाच समावेश असावा लागतो.या सर्व गोष्टींची शब्दाच्या माध्यमातून पुर्नरचना प्रवासवर्णनकारास करावी लागते.तेव्हाच ते ललितरुप धारण करते.नाहीतर ते रुक्ष प्रवासवृत ठरू शकते.प्रवासातील कोणत्या घटना,व्यक्ती,प्रदेश व त्यांच्या अनुभूतीचे दर्शन घडवायचे. हे लेखकाने ठरविलेले असते.'निवड' हे तत्व येथे असते.कारण 'काय सांगायचे?' हा लेखकाचा कलामुल्याशी निगडित प्रश्न आहे.भाषिक निवडीएतकीच आशयाची निवड महत्वाची असते.या निवडीमधून 'वर्णन' ही कलात्मक ठरते.प्रवासवर्णन हे केवळ 'वर्णन' असत नाही त्यात संवाद,कथन,भाष्ये यांचाही यथोचित वापर लेखकाने केलेला असतो.भाषिक सर्जनशीलता प्रकट करणारी प्रवासवर्णने ही उत्कट प्रत्ययकारकता निर्माण करतात. असा लेखक वाचकाला आपल्या अनुभवात सहभागी करून घेतो.त्यामुळे भावनिक व सौंदर्यात्मक संक्रमण घडून येते.मराठीत 'पूर्वरंग व 'अपूर्वाई हे पु. ल. देशपांडेंची प्रवासवर्णने सुंदर उदाहरण आहे.

हे काही प्रमुख प्रकार ललित साहित्यात आहे.या व्यतिरिक्त रुपककथा,लोककथा,दृष्टांत कथा हेही ललित साहित्याचा भाग आहे.

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे,
आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सुर तुझ्या आवडीचे,

राहू दे स्वातंत्र्य माझे,
फक्त उच्चारांतले गा,
अक्षरां आकार तूझ्या,
फुफ्फुसांचा वाहू दे गा.

लोभ जीभेचा जळू दे,
दे थिजू विद्वेष सारा,
द्रौपदीचे सत्त्व माझ्या
लाभू दे भाषा शरीरा.

जाऊ दे कापर्ण्य 'मी' चे,
दे धरू सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्र काट्याची कसोटी.

खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेऊ दे तीतून माते
शब्द तूझ्या स्पंदनांचे.

धैर्य दे अन् नम्रता दे
पाहण्या जे जे पाहणे;
वाकू दे बुद्धीस माझ्या,
तप्त पोलादाप्रमाणे.

आशयाचा तूच स्वामी,
शब्दवाही मी भिकारी,
मागण्याला अंत नाही
आणि देणारा मुरारी.

काय मागावे परि म्या,
तूही कैसे काय द्यावे;
तूच देणारा जिथे अन्
तूच घेणारा स्वभावे.

- कवि बाळ सीताराम मर्ढेकर (१९०९-१९५६)

मी पणाचे कवच, अहंकार गळून पडल्याशिवाय निखळ कवितेची निर्मिति होऊ शकणार नाही
असा ह्या कवितेचा आशय आहे. ही कविता वाक्देवतेला उद्देशून आहे.

करांच्या बाबतीत पहिल्यांदा वाचताना येऊ शकतो.

मर्ढेकरांच्या बाबतीत अश्लीलतेचा आरोप अनेकांनी केला. तो धुरळा आता बर्‍यापैकी खाली बसलेला आहे. त्याबाबतीत मी जास्त काही लिहीत नाही. त्यांना बेधडक भाषा वापरून वाचकांना खडबडून जागे करायचे होते असे वाटते. 'हाडांचे सापळे' झालेले पुरूष, आणि 'किरटी हाडबंडले' झालेल्या बायका, ह्यांच्यातल्या अर्थहीन, यंत्रवत् समागम त्यांना भयावह वाटत होता.

'सोडवेना सोडवीतां
गेल्या रात्रींचा हा पाश
जागा आहें तरी आता
मेल्या इच्छा सावकाश.'

अशा ओळींवर त्या काळात लोक भडकले, वादविवाद घडले. अनेक मान्यवरांनी त्यात भाग घेतला. 'लिंग', 'स्तन'सारखे शब्द मर्ढेकरांच्या कवितेत आल्याने खळबळ माजली. मराठी कवितेला हे नवीन परिमाण मर्ढेकरांनी बहाल केले. तिची नवी अभिव्यक्ती मर्ढेकरांनी घडवली. अभिव्यक्तीच्या कल्पनांत भारतात अजूनही इतका गोंधळ जाणवतो, की हे काम त्या काळात मर्ढेकरांनी केले, हा मोठाच क्रांतिकारी बदल आहे.

मर्ढेकरांचा आशयच इतका संपन्न आहे, की त्यांच्या भाषाशैलीकडे बघायला लोकांना ताकद उरत नाही. बोरकरांसारख्या कवीकडे जे भाषेचे लेणे दिसते, ते मर्ढेकरांकडे दिसत नाही, हे मात्र मान्य केले पाहिजे. शब्दांच्या आविष्कारात, शैलीबाजपणात मर्ढेकर थोडे कमी पडतात की काय, असे वाटत राहते. परंतु मर्ढेकरांनी रुपक, उपमा, उत्प्रेक्षा ह्या अलंकारांचा प्रभावी वापर करून ही त्रुटी फार जाणवू दिली नाही. मर्ढेकरांची रुपके आणि प्रतिमा ह्यांना स्वतःचे एक अस्तित्व येते. त्या कळीचे फुलात रूपांतर व्हावे तशा स्वतःहूनच फुलायला लागतात. त्यांच्या प्रतिमा वाचकाशी भावनांचे नाते जोडून समानता दाखवतात. 'गोळ्यांचे पराग' ह्या वर आलेल्या उपहास करणार्‍या प्रतिमेमधून मर्ढेकर किती चटकन वैफल्य सांगतात! हे सर्वच खुल्या डोळ्यांनी, झापडे न लावता बघायला हवे.

मर्ढेकरांवर असंख्य पुस्तके, लेख लिहिले गेले आहेत. चर्चासत्रे, परिसंवाद ... काही विचारू नका. ह्या लेखात मी कितीसे सांगणार? त्यांच्या सौंदर्यशास्त्रविषयक लिखाणाला मी स्पर्शही करू शकलेलो नाही. माझा तेवढा काही अभ्यासही नाही. त्यांच्या कवितांबद्दल जे वाटलं, ते लिहीलं, एवढंच. दोन-चार आवडलेल्या ओळी वगैरे. मराठी भाषा दिनानिमित्त एका महाकवीबद्दल मराठी भाषेला दिलेला हा छोटासा नजराणा. शेवटी मर्ढेकरांबद्दल ते त्यांच्या देवाला किंवा आदिशक्तीला उद्देशून जे म्हणतात तेच लागू पडते.

'किती पायी लागूं तुझ्या
किती आठवूं गा तूंतें;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनीं येतें.'

कार्ल मार्क्‍स - नारायण सुर्वे

नारायण गंगाराम सुर्वे (जन्म : १५ ऑक्टोबर १९२६; - १६ ऑगस्ट २०१०[]) हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार प्राप्त.
 नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता ,आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली.

१९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीतील एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाला म्हणून काम मरणाऱ्या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. []त्याच गिरणीत बाईंडिंग खात्यात काम करणाऱ्या गिरणी कामगार काशीबाई सुर्वे यांनी या "बाळगलेल्या पोराला' स्वतःच्या मुलासारखे प्रेम दिले आणि "नारायण गंगाराम सुर्वे' हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्ऱ्य, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यांतून नारायण सुर्वे यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले. घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. हे दांपत्य मुळचे कोकणातील हेताचीवाडी(भुईबावडा) येथील होते. त्यांनी नारायणास मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिले. पुढील शिक्षण नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले.नारायण सुर्वे १९३६ मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि समोर मुंबईचा विशाल सागर.

मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी नारायण सुर्वे एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे "सुर्वे मास्तर' झाले.

"कधी दोन घेत, कधी दोन देत' आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर घुमवला. त्यांची पहिली कविता १९५८ मध्ये "नवयुग' मासिकात प्रसिद्ध झाली. "डोंगरी शेत माझं गं....' हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली. .

गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिंमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला संदर्भ हवा ]. इ.स. १९६२ साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह - "ऐसा गा मी ब्रह्म" - प्रकाशित झाला.त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.

सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेच जण साम्यवादी पक्षात होते. डावी चळवळ जोरात होती. ती चळवळ हा त्यांचा मोठा आधार बनली. सुर्व्यांच्या वैचारिक प्र वासाची ही सुरुवात होती. "माझ्या पहिल्या संपात मार्क्सआ मला असा भेटला,' असे सांगणाऱ्या सुर्व्यांची साम्यवादी, डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. कम्युनिस्ट चळवळीत ते "रेडगार्ड' बनले. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. आई-बापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके हिच्याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खारजवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला होता. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य श्री. सुर्वे यांनी केले आहे. जीवनात जे वास्तव अनुभवले, त्यांचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात. पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली. संत कबीरालाही त्याच्या आईने नदीकाठी सोडले. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला...त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही...असे सुर्वे म्हणत.

त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले. गाजत रा हिले. "माझे विद्यापीठ', "जाहीरनामा', "पुन्हा एकदा कविता', "सनद' हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या, इस ल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या , अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. "मास्तर, तुमचंच नाव लिवा...', "असं पत्रात लिवा', "मर्ढेकर', "सर कर एकेक गड', "मनिऑर्डर', "मुंबईची लावणी', "गिरणीची लावणी' या त्यांच्या कविता हमखास पावती घेतात. श्री. सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही उल्लेख केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणाऱ्या आकांक्षांचे चित्रण, पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आणि मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला.

नारायण सुर्वे यांचे १६ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले.

ज्यांना सुर्वे दिसू आले नाहीत, अशांसाठी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी एकदा सांगितले, "अरे, केशवसुत कशाला शोधतांय? तुमचा केशवसुत परळ मध्येच राहतोय.

काव्य संग्रह 

ऐसा गा मी ब्रह्म

जाहीरनामा

नव्या माणसाचे आगमन

पुन्हा एकदा कविता

माझे विद्यापीठ

सनद

नारायण सुर्वे यांच्या काव्याचा नमुना

आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते.
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते.
जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते, चला बरे झाले;
आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते...जेव्हा मी या अस्तित्त्वाच्या पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, .......


"असे आम्ही लक्षावधी नारीनर दिवस असे तो वावरतो,

राबता, खपता आयुष्य मेणबत्तीसम विझवुन घेतो."

[[ तेव्हा एक कर ! ]]

जेव्हा मी या अस्तित्त्व पोकळीत नसेन

तेव्हा एक कर

तू निःशंकपणे डोळे पूस.

ठीकच आहे चार दिवस-

उर धपापेल, जीव गुदमरेल.

उतू जणारे हुंदके आवर,

कढ आवर.

उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस

खुशाल, खुशाल तुला आवदेल असे एक घर कर

मला स्मरून कर,

हवे अत्र मला विस्मरून कर.

{{ दोन दिवस वाट पाहण्यात गेले}}

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

[[इतका वाईट नाही मी]]

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस

दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले

आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस

हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद

पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको

आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव.

नारायण सुर्वेवरील पुस्तके

ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी ’मास्तरांची सावली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.

सुर्व्यांच्या काव्याची इहवादी समीक्षा (डाॅ. श्रीपाल सबनीस)

नारायण सुर्वे यांना मिळालेले पुरस्कार 

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (इ.स. २००४)

मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८)

सोव्हिएत रशियाचं नेहरू ॲवॉर्ड

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा नरसिंह मेहता पुरस्कार

कराड साहित्य पुरस्कार

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, वगैरे.

कार्ल मार्क्स - कविता

माझ्या पहिल्या संपातच

मार्क्‍स मला असा भेटला.

मिरवणुकीच्या मध्यभागी

माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता.

जानकी अक्का म्हणाली, ‘वळिखलंस ह्याला –

ह्यो आमचा मार्कसबाबा

जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले

आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला.

‘सन्याषाला काय बाबा

सगळीकडची भूमी सारखीच

तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’

माझ्या पहिल्या संपातच

मार्क्‍स मला असा भेटला.

 नारायण सुर्वे हे परभणी येथे इ.स. १९९५मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

पुढे एका सभेत मी बोलत होतो,

– तर या मंदीचे कारण काय

दारिद्र्याचे गोत्र काय

पुन्हा मार्क्‍स पुढे आला; मी सांगतो म्हणाला,

आणि घडाघडा बोलतच गेला.

परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता.

मी म्हणालो –

‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,

यापुढच्या सर्वच चरित्रांचेही.’

तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली

खळखळून हसत, पुढे येत;

खांद्यावर हात ठेवीत म्हणाला,

‘अरे कविता-बिविता लिहितोस की काय

छान, छान.

मलासुद्धा गटे आवडायचा.’

मैत्री २०१२शोधा
शोधा 
मुख्य मेनू
मुखपृष्ठ
About
पोस्टचे नॅव्हिगेशन← PreviousNext →
कार्ल मार्क्स
Posted on एप्रिल 12, 2023
कवितांच्या प्रदेशात : २
 
डॉ. उमेश करंबेळकर 
एकोणिसाव्या शतकातील, ज्याच्या विचारांनी संपूर्ण जगातील औद्योगिक विश्वात क्रांती घडवून आणली आणि साम्यवादी विचारसरणीचा ज्याने पाया घातला, असा महान जर्मन तत्वज्ञ म्हणजे कार्ल मार्क्स ! भारतातील कामगार चळवळीचं, विशेषतः गेल्या शतकातील मुंबईतील गिरणी कामगारांच्या चळवळीचं, प्रेरणास्थानही ‘मार्क्स आणि त्याची विचारसरणी’ हेच होतं. साहजिकच ज्यांचं बालपण गिरणगावात एका सामान्य गिरणी कामगाराच्या घरात गेलं त्या कविवर्य नारायण सुर्व्यांच्या कानावर मार्क्सचं नाव फार लहानपणीच पडलं आणि साम्यवादी विचारसरणीचं बाळकडूही त्यांना तेव्हाच मिळालं. मार्क्सचा हा प्रभाव सुर्व्यांवर अखेरपर्यंत कायम राहिला.
कार्ल मार्क्स सुर्व्यांच्या शरीरात आणि मनात किती खोलवर भिनला होता याचे उदाहरण म्हणजे त्यांची ‘कार्ल मार्क्स’ ही कविता. ही कविता त्यांच्या ‘जाहीरनामा’ या काव्यसंग्रहातील आहे. खरं तर, कार्ल मार्क्स हा एका महाकाव्याचाच विषय. त्याला तीस-चाळीस ओळींच्या कवितेत बसविणे म्हणजे कठीणच. परंतु असामान्य कवितेचं वैशिष्ट्य असं की अल्प पण समर्पक शब्दांत ती फार मोठा आशय आणि विषय प्रकट करते. कार्ल मार्क्स या कवितेत आपल्याला ह्या गोष्टीची प्रचिती येते.

कार्ल मार्क्स

माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला

मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता.
जानकी अक्का म्हणाली ‘वळिखलंस ह्याला-
ह्यो आमचा मार्क्सबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला.
संन्याशाला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच
तुझ्यासारखीच त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला.

पुढे; एका सभेत मी बोलत होतो,
तर या मंदीचं कारण काय ?
दारिद्याचे गोत्र काय ?
पुन्हा मार्क्स पुढे आला ; मी सांगतो म्हणाला
आणि घडाघडा बोलतच गेला.

परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता.
मी म्हणालो –
‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,
या पुढच्या सर्वच चरित्रांचेही.’
तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली
खळखळून हसत, पुढे येत ;
खांद्यावर हात ठेवीत म्हणाला,
‘अरे, कविता-बिविता लिहितोस की काय ?
छान, छान.
मलासुद्धा गटे आवडायचा.’

नारायण सुर्व्यांच्या जीवनसंघर्षाची सुरुवात त्यांच्या जन्मापासूनच सुरू होते. त्यांच्या आईने त्यांन चार-पाच महिन्यांचे असताना एका कापड गिरणीच्या गेटवर टाकून दिलं. १९२६ साली गंगाराम सुर्वे ह्या गिरणी कामगाराला त्याच्या गिरणीच्या गेटपाशी हे अनाथ मूल सापडलं. त्याने त्या मुलाला घरी आणलं आणि त्याचं नाव ठेवलं नारायण.विशेष म्हणजे त्याने आणि त्याच्या बायकोने ह्या मुलाला कधी परकं मानलं नाही आणि पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याचं पालन-पोषण केलं. अशा तऱ्हेने माणुसकीचे संस्कार सुर्व्यांवर फार लहानपणीच झाले होते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आधुनिक मराठी कवितेला ज्यांच्या कवितांनी वेगळे वळण दिलं त्या कविवर्य नारायण सुर्व्यांची ही आगळीवेगळी जन्म कहाणी.

सुर्व्यांनी गिरणी कामगाराचं हलाखीचं जीवन फार जवळून पाहिलं. काही काळ त्यांनी गिरणीत नोकरीही केली. नंतर त्यांनी शाळेत शिपाई म्हणून व नंतर तेथेच शिक्षक म्हणून काम केलं. १९५६ च्या सुमारास त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. सुर्व्यांचं ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ,’ ‘जाहीरनामा’ आणि ‘नव्या माणसाचे आगमन’ असे चार काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.सुर्व्यांची कविता कामगार, वेश्या, दादर पुलाखालची माणसे, पोस्टर चिकटवणारी माणसे अशा मुंबापुरीतील उपेक्षितांच्या वेदना सजीव करणारी आहे. ह्या सर्वांच्या जीवनाशी त्यांचा निकटचा संबंध आल्यामुळे त्यांच्या कवितेतील वास्तव काळजाला भिडणारं ठरतं. सुर्व्यांना माणसांच्या गर्दीत वावरायला आवडायचं. त्यामुळे त्यांच्या कवितेचा विषयही प्रामुख्याने माणूसच राहिला.

त्यांच्या बऱ्याचशा कविता निवेदन शैलीतील आहेत. याचं कारण त्यांना कवितेच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधायचा असे. कागदावरील कवितेपेक्षा सादरीकरणातून प्रकट झालेली कविता अधिक परिणामकारक ठरते. सुर्वे आपली कविताही तितक्याच ताकदीने सादर करत. त्यामुळे त्यांच्या कवितावाचनास रसिकांची गर्दी होई.

‘संथ निवेदनात्मक, संवादांचा वापर प्रभावीपणे करणारी, बोली भाषेशी जवळीक साधणारी आणि गद्याच्या अंगाने जाणारी’ असं सुर्व्यांच्या काव्यशैलीचं थोडक्यात वर्णन करता येईल.
सुर्व्यांच्या कवितेची ही सर्व वैशिष्ट्यं त्यांच्या कार्ल मार्क्स या कवितेत आपल्याला पाहायला मिळतात.
कवितेच्या सुरुवातीस मार्क्स आपल्याला पहिल्या संपात भेटला असं सांगून सुर्वे तो कसा भेटला याचा किस्सा सांगतात. कुठल्याही संपाची सुरूवात मिरवणुकीने किंवा मोर्चाने होते. मिरवणूकीत कोण आणि किती सामील झाले यावरून कामगारांना जशी आपल्या शक्तीची जाणीव होऊन उमेद मिळते, आधार मिळतो त्याप्रमाणे मालकवर्गालाही कामगारांची ताकद कळते आणि कामगारांच्या असंतोषाची जाणीव होते.

अशाच एका मिरवणुकीत सुर्व्यांच्या खांद्यावर मार्क्सचं छायाचित्र असलेला बॅनर होता. त्याकडे बोट दाखवून अशिक्षित जानकी अक्का आपल्या ग्रामीण भाषेत सुर्व्यांना मार्क्सची ओळख करून देते. मार्क्सचा ती ‘आमचा मार्क्सबाबा’ असा एकेरी उल्लेख करते. मार्क्सचा जन्म जर्मनीत झाला पण त्याचा शेवट इंग्लंडमध्ये झाला. त्याचं सर्वात मोठं कार्य म्हणजे त्याची ढीगभर ग्रंथसंपदा. खरं म्हणजे जानकीअक्कासारख्या एका अशिक्षित कामगार बाईनं सुर्व्यांना मार्क्सची ओळख करून द्यावी हीच एक अपूर्व घटना मानली पाहिजे. यातून सुर्वे मार्क्स कामगारवर्गात किती आणि कसा रुजला होता हे अप्रत्यक्षरित्या आपल्या ध्यानात आणून देतात. पोताभर ग्रंथ यातून मार्क्सचा विचार केवढा व्यापक आहे हे ते दाखवतात. त्याचबरोबर आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी शिकणं किती महत्वाचं आहे याची जाणीव जानकीअक्काला झाल्याचंही यातून दिसून येतं.
‘सन्याशाला काय बाबा सगळीकडची भूमी सारखीच’ या वाक्यातून मार्क्स केवळ जर्मन अथवा इंग्लंडपुरता मर्यादित नव्हता तर तो जगातील सर्व देशातील कामगारांचा, कष्टकरी वर्गाचा निरिच्छ नेता होता हे जानकीअक्का सांगते.

परंतु ह्या सर्वांपेक्षा ‘तुझ्यासारखीच त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’ या वाक्यातून कार्ल मार्क्सची एखादा धीरगंभीर चेहऱ्याचा, हस्तिदंती मनोऱ्यात राहून प्रबोधन करणारा तत्वज्ञ अशी प्रतिमा डोळ्यासमोर न येता एखाद्या सर्वसामान्य कुटुंबवत्सल गृहस्थाचा प्रेमळ चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि मार्क्सची ही प्रतिमा आपल्याला अधिक भावते.
त्यानंतर सुर्वे आपल्याला एका सभेतील अनुभव सांगतात. एका कामगार सभेत बोलत असताना सुर्वे आर्थिक मंदी आणि त्यातून निर्माण होणारी गरिबी यांचा संबंध कामगारांना सोप्या भाषेत समजावून देत असतात. तेव्हा त्यांच्या तोंडातून मार्क्सचे विचार बाहेर पडू लागतात. हा अनुभव कवितेत शब्दबद्ध करताना सुर्वे म्हणतात, ‘पुन्हा मार्क्स पुढे आला; मी सांगतो म्हणाला, आणि घडाघडा बोलतच गेला.’ त्यावेळी सुर्व्यांच्या आचार विचार आणि उच्चारातून मार्क्सच प्रकट होत होता. इतका तो त्यांच्या शरीरात भिनला होता.

जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता तेव्हा तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी तीच गोष्ट दिसू लागते. विठ्ठलाचा ध्यास घेतलेल्या तुकाराम महाराजांना ‘विठ्ठल गिती, विठ्ठल चित्ती’ असे झाले आणि ते अवघे विठ्ठलमय होऊन गेले.

मार्क्सचा ध्यास घेतलेल्या सुर्व्यांना असाच अनुभव एका गेट सभेत बोलताना आला. सुर्व्यांना चक्क मार्क्स त्यांचं भाषण ऐकताना दिसला.त्या सभेत बोलण्याच्या ओघात,’ आता इतिहासाचे नायक आपणच आहोत, या पुढच्या सर्वच चरित्रांचेही’ या वाक्यातून सुर्व्यांमधला कवी डोकावला आणि त्या वाक्याला मार्क्सने कडाडून टाळी वाजवली. पुढे येऊन सुर्व्यांच्या खांद्यावर हात टाकून तो म्हणाला, ‘अरे कविता बिविता लिहितोस की काय ? छान छान, मलासुद्धा गटे आवडायचा.’

इथे कविता संपते. ‘मलासुद्धा गटे आवडायचा’ यातून मार्क्स रूक्ष,कोरडा विचारवंत नव्हता. त्याला साहित्याची आवड होती, तो काव्यप्रेमी रसिक होता हे जाणवतं आणि त्याच्याबद्दलचा आपल्या मनातील आदरभाव दुणावतो हे खरे. पण तेवढाच मर्यादित अर्थ त्यातून ध्वनित होत नाही.

खरं म्हणजे सुर्व्यांच्या कवितांचा शेवट फार परिणामकारक असतो. उदाहरणार्थ, ‘शीगवाला’ या कवितेत शेवटी दाऊदचाचा आजच्या जीवनाचं कठोर वास्तव सांगताना, ‘सब्दाला, जागवेल असा कोन हाय दिलवाला, सबको पैसेने खा डाला.’ असं म्हणतो तेव्हा त्यातील दाहक वास्तवता आपल्या काळजाला भिडते. किंवा ‘का गा ग्रंथगर्व’ या कवितेत भाकरी महात्म्य सांगताना शेवटी सुर्वे ‘संपलाच नाही भाकरीचा मार्ग, ग्रंथातले स्वर्ग कशापायी ?’ असा रोखठोक सवाल करतात तेव्हाही आपण असेच सुन्न होतो.

कार्ल मार्क्स या कवितेच्या शेवटी सुर्वे आपल्याला असाच एक वेगळा धक्का देतात. ‘मलासुद्धा गटे आवडायचा’ या मार्क्सच्या वाक्यातून गटेचे पर्यायाने कवीचे सामाजिक, राजकीय तसेच वैचारिक क्रांतीमधील महत्व अधोरेखित होते.सर्व क्षेत्रातील क्रांतिकारकांना आणि त्यांच्या क्रांतीला काव्याचे अधिष्ठान असतं. किंबहुना क्रांतीची ज्योत ऊर्जस्वल कवनाने पेटविली जाते असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

फ्रान्सच्या राज्यक्रांतीला ‘रूझे द लील’ या तरुण अधिकाऱ्याने लिहिलेल्या ‘ला मार्सेएझ’ या गीताने चैतन्य दिलं. या गीताचा खेड्यापाड्यांतून, वस्तीवस्तीतून प्रसार झाला आणि संपूर्ण फ्रेंच सैन्य या गीताच्या ध्वनीने स्वातंत्र्यसिद्ध झालं. हेच गीत पुढे फ्रान्सचं राष्ट्रगीत म्हणून मान्यता पावलं. कवी आणि कवितेचं महत्त्व लक्षात येण्यासाठी हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे.

गटे हा जर्मनीचा महान कवी समजला जातो आणि मार्क्सवर गटेचा प्रभाव होता. असाच प्रभाव सुर्व्यांच्या काव्यवाचनामुळे मुंबईतल्या कामगार वर्गावर पडत असे. म्हणूनच ‘सुर्व्यांची कविता लढाऊ वृत्तीची व सामाजिक क्रांतीची उपासना करणारी आहे’ असे गौरवोद्गार , ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ हे अजरामर काव्य रचणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रजांनी काढले.

सुर्वे स्वतःला ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुतांच्या कविपरंपरेचा पाईक समजत. ‘ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत नसते तर आपण कोणीच नसतो’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘मलासुद्धा गटे आवडायचा’ यातून मार्क्सपेक्षाही कवी गटे अधिक श्रेष्ठ हेच त्यांना सुचवायचं आहे. कवितेच्या एका ओळीतदेखील प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देण्याचं सामर्थ्य असतं, हे सुर्वे जाणून होते. त्या दृष्टीने कवी असामान्य, असाधारण असतो. म्हणूनच ‘मार्क्स आणि मार्क्सवाद श्रेष्ठ आहेच पण पोथिनिष्ठ मार्क्सवाद्यांकडून माणूस आणि कलेच्या स्वातंत्र्यावर बंधने आली तर … तर माणसाचा आणि कलेतील सच्चा स्वातंत्र्याचा पक्ष तोच माझाही राहील’ असं सुर्व्यांनी ‘कविता आणि मी’ या लेखात ठामपणे सांगितलं आहे.

‘मलासुद्धा गटे आवडायचा’ या वाक्यातून मार्क्सवादाची मर्यादा आणि विचार स्वातंत्र्य जपणाऱ्या व त्याचा आग्रह धरणाऱ्या कवीचं श्रेष्ठत्व एकाच वेळी सुर्वे आपल्या नजरेस आणतात. त्यामुळे कवितेला एक वेगळेच परिमाण प्राप्त होऊन ही कविता सुर्व्यांच्या सर्वोत्कृष्ट कवितांमध्ये स्थान प्राप्त करते.

– संग्रहित साभार ©️ डॉ. उमेश करंबेळकर, सातारा.


रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

कवी बी. रघुनाथ


कुळकर्णी, भगवान रघुनाथ
Kulkarni Bhagwan Raghunath
कुळकर्णी, भगवान रघुनाथ
कथाकार, कवी, कादंबरीकार
प्रसिध्दी नाव : 
बी. रघुनाथ
जन्मदिनांक : 
२५ ऑगस्ट १९१३
मृत्युदिनांक : 
७ सप्टेंबर १९५३
कार्यक्षेत्र : 
जन्मस्थळ : 

बी. रघुनाथ

बी.रघुनाथ यांचा जन्म सातोना, जिल्हा परभणी येथे झाला. बालपण सातोन्यातच गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर हैद्राबादला नातेवाइकांकडे वास्तव्य. मॅट्रिकपर्यंत तेथे विवेकवर्धिनी या शाळेत शिक्षण घेतले, पण महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. १९३२साली परभणी येथे आले व सरकारी बांधकाम खात्यात नोकरी केली. प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना, आर्थिक हलाखी सोसताना, मानसिक ताण आणि जुलमी सरंजामी राजवट यांना तोंड देता-देता त्यांचे शरीर इतके खंगले की, कार्यालयाध्येच हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. अवघे चाळीस वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले.

इतक्या अल्प काळातही त्यांनी विपुल लेखन केले. १९३० साली लिहिण्यास सुरुवात झाली आणि २० वर्षांच्या काळात त्यांनी १५०च्या आसपास कविता, ६० कथा, ७ कादंबर्‍या असे लिखाण केले. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘आलाप आणि विलाप’ १९४१ साली प्रसिद्ध झाला. त्यांच्या कवितांवर निसर्गाचा, बालकवींचा, गोविंदग्रजांचा व मर्ढेकरांचा प्रभाव जाणवतो. त्यांचा स्वभाव अत्यंत मनस्वी व बोलणे कमी त्यामुळे त्यांची कविता आत्ममग्न आहे. ‘रे ओल्या काष्ठा’, ‘वर्ष नवे’, ‘अजुनि गाव दूर’ इत्यादी कविता आत्मभानाचे प्रकटीकरण करताना दिसतात. तर ‘रस्ता नगर झाला’, ‘अन्नदेवता’, ‘राव अधिकारी झाले’, ‘धुराड’, ‘आज कुणाला गावे’, ‘एक गरजते ढगाड’, ‘उजेड झाला’, ‘गरिबांचा संसार’, ‘देव आणि दासी’ या सामाजिक जाणिवेच्या कविता आहेत. बी.रघुनाथांच्या मनात असलेली स्त्री कशी विविधरूपी आहे, हे त्यांच्या ‘उन्हात बसली न्हात’, ‘ज्वार’, ‘दर्पण’, ‘रात्र संपली तरी’, ‘ये मनात राया कधी’, ‘रंगार्‍याचे गाणे’, ‘नेस नवी साडी’, ‘नगरभवानी’, ‘उजेड झाला’ या कवितांतून प्रकट होते. तसेच त्यांच्या कवितेत स्त्री-देह, शृंगार, प्रणय यांचे सुंदर चित्रण दिसते. ‘देखियला चल एक हिमालय’, ‘लहर’, ‘पांढर्‍या पर्‍या’ या काहीशा गूढ कविता त्यांनी लिहिल्या.‘टिचकी’, ‘पडली बघ झाकड’, ‘लागली जीवास घरची वड’ या कवितांतून परभणीच्या अस्सल बोली भाषेचा अनोखा सौंदर्याविष्कार आढळतो.‘स्वस्त धान्याचे दुकान’, ‘कुरण’, ‘माझी चिमणी’ आणि ‘मुद्रिका’ या चार दीर्घ कविता त्यांनी लिहिल्या. ‘काळास मिटव नेत्र तेव्हाच’ या चिंतनात्मक व अंतर्मुख करणार्‍या कविता आहेत.

बी.रघुनाथ यांचा पहिला कथासंग्रह ‘साकी’ १९४० साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘फकिराची कांबळी’, ‘छागल’, ‘आकाश’, ‘काळी राधा’ या कथा प्रसिद्ध. त्यांच्या कथा तीन विभागांत मोडतात. पहिल्या प्रतीक कथा, दुसर्‍या निझामी राजवटीतील आराजकतेच्या आणि तिसर्‍या प्रकारात निझामी नोकरशाहीचे आणि समाजाचे वर्णन करणार्‍या कथा. ‘बेगम सकीना’ ही गाजलेली कथा! या कथेतील चपराश्याचे दारिद्य्र, त्याचे मनोरथ, लाचारी आणि शेवटी अपेक्षाभंग यांचे सुरेख चित्रण आहे.

 ‘अभावती’ ही बी.रघुनाथांचे अनुभवांचे मर्म लेवून उभी राहते. या कथेत लावण्याबरोबर संयमाचा सुसंस्कृतपणा आहे. भावनिक रस आहे. ‘गंगाधर’ ही स्टोअरकीपरची कथा, एक हंगामी जागा व बारा रुपड्यांवर उरी  फुटेपर्यंत काम करणार्‍या कारकुनाची कथा. ‘थैली’ ही आत्मनिवेदन असणारी, त्यांच्या मनातील तडफड व्यक्त करणारी, मनाला चटका लावणारी कथा आहे.

 ‘प्रधानांचा दौरा’, ‘पैसा कुठे जातो’, ‘जिथं तांबड फुटायचं आहे’, ‘शेख मस्तान’ इत्यादी कथांतून सरंजामशाहीचे विस्तृत भेदक वर्णन येते. गंगाधर गाडगीळ त्यांच्याबद्दल म्हणाले होते, “बी. रघुनाथांनी मराठी नवकथेची पायवाट तयार केली.” तर अरविंद गोखले म्हणाले, “बी रघुनाथांनी हळवा ध्येयवाद व फसवा बोधवाद यांतून मराठी कथेला बाहेर काढून अंतर्मुख आणि काव्यात्म बनवले.”

बी.रघुनाथ यांनी एकूण सात कादंबर्‍या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी ‘ओ’ १९३६मध्ये प्रसिद्ध झाली. तत्कालीन समीक्षकांना आणि रसिकांना मान्य नसलेला वास्तववादी वेगळा मार्ग त्यांनी स्वीकारला. ‘हिरवे गुलाब’ या कादंबरीतील अमीर जानकीराम यांच्या व्यक्तिरेखेवरून व्यक्तींची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांच्या मुळाशी असलेल्या प्रेेरणांचा ते शोध घेतात आणि विविधस्तरीय सामाजिक वास्तवाचे चित्र रेखाटतात. ‘बाबू दडके’, ‘उत्पात’ या कादंबर्‍यांतून त्यांना आनुभवास आलेली आत्मवंचना व न्यूनगंडाच्या जाणिवेचा अविष्कार दिसतो. ‘जगाला कळलं पाहिजे’, ‘म्हणे लढाई संपली’ यांतील बाबूराव, डी.हानुमंतराव, रावजी या व्यक्तिरेखा म्हणजे जीवनमूल्ये पायदळी तुडवणे, अन्याय करणे, विवेकापासून भ्रष्ट होणे यांची उदाहरणे आहेत.

लहान-मोठे विविध तपशील, लहान-सहान व्यक्तिरेखा यांचे विस्तृत वर्णन बी.रघुनाथ यांच्या कादंबर्‍यांतून अढळते. टांगेवाले, टॅक्सी ड्रायव्हर, हॉटेलातील पोरे, पानपट्टीवाले, कारकून इत्यादी विविध स्तरांतील व्यक्तींचे सुस्पष्ट वर्णनही दिसते.

     अत्यंत प्रतिभासंपन्न अशा या साहित्यकाराचा त्या काळी योग्य सन्मान झाला नाही; की कोणत्याही पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले नाही.

निशा रानडे

रविवार, १ सप्टेंबर, २०२४

माधव ज्युलियन यांची कविता


मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे

नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे

जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी

मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥


जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,

मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,

असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,

मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥


मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं

पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं

जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥


हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां

प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा

न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने

‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥


मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली

हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं

नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥ चोंडकं 

या कादंबरीचे रसग्रहण  

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

जग खूप सुंदर आहे.

जग खूप सुंदर आहे 
फक्त ते जगता यायला हवं 
त्याचा निर्माता किती सुंदर असेल 
हे अनुभवता यायला हवं 
संघर्षामधून आणि परिश्रमातूनच नव जन्माला येतं 
निर्मात्याची दूरदृष्टी आणि निर्मात्याचे नित्यनूतनत्व नित्य जगायला हवं 
दृष्टी तर प्रत्येकालाच आहे
त्यातही डोळस व्हायला हवं
निसर्ग पहा तो देतच राहतो 
त्याच्याकडडील दातृत्व घ्यायला हवं 
आयुष्य किती आहे पुष्पाचे 
त्यांचे रंग व सुगंध व्हायला हवं
निसर्ग विविध रंगी याप्रमाणे नित्य नूतन होता यायला हवं 
सुरवंटाचे फुलपाखरू व्हायला हवं 
रडण्यात काय मजा!
थोडं हसायला हवं 
आयुष्य थोडं आहे 
भरभरून जगायला हवं 
प्रकाश पसरवून आपण आकाशभर 
माणसा-माणसानेच जग जोडायला हवं
द्वेष, राग, दंभ यांची होळी करून 
वात्सल्य-मानवतेची दिवाळी साजरी करूयात आपण सारे
जग फारच सुंदर आहे ते फक्त जगता यायला हवं
जग अप्रतिमच आहे ते मुक्तपणे जगता यायला हवं

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

कविता म्हणजे काय? ( संग्रही)


खर तर कविता म्हणजे आपल्याला कमी शब्दात व्यक्त होण्याचं, लोकांपर्यंत भावना पोहचवण्याचं एक भावनाशील माध्यम आहे.कारण प्रत्येकजण व्यक्त होत असतो.फक्त प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे असतात.जसे एखादा चित्रकलेच्या माध्यमातुन तर कोणी लेख,कथा, किंवा मनसोक्त बोलून व्यक्त होतो.तसच कविता ही सुद्धा एक अनेक मनांना जोडणारी एक खळखळणारी नदी म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

खर तर कविता करताना साधारण प्रत्येकजण सुरूवातीला आपल्याला जसे होईल तसे मुक्तपणे व्यक्त होत असतो त्यासाठी विशिष्ट अशी साचेबद्दपणा नसतो.म्हणजेच ती मुक्तछंदात मोडते.परत मग त्यात चारोळी,यमक,ओवी,आठोळी असे कित्येक कवितेचे प्रकार पडतात मग आपण आवडीने तो शिकू शकतो.

कविता आपण कशी ही करू शकतो.चूकातून शिकण्यची सवय लावून घ्यावी.आपल जर वाचन अवांतर असेल तर नेमक्या शब्दात आपण व्यक्त होऊ शकतो.खर तर कविता करण्यासाठी म्हणण्यापेक्षा ती आतून, मनापासून येते.आपल्या अंतर्मनातून आलेली हाक ती असते.त्यासाठी अक्षर ओळख नसली तरी चालते.अशी कित्येक उदाहरणे आहेत की अशिक्षित असून सुद्धा कविता रचल्या आहेत त्यामुळे कविता ही फक्त ठरावीक लोकांची मक्तेदारी ठरत नाही.ती सर्वांसाठी समान आहे.

शक्यतो कविता ठरवून करता येत नाही.किंवा तसं केलं तर तिला तो भावनिक ओढ जाणवत नाही.नुसता कुत्रिमता वाटते.

आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर देतो.हो मी पण कविता रचन्याचा प्रयत्न करतो.कारण मी अजूनही नवनवीन प्रकार शिकण्याचा प्रयत्न करतोय.कारण नवीन शिकायला मला आवडत आणि प्रत्येकामध्ये एक विद्यार्थी दडलेला असतो त्यामुळे नेहमी नवीन शिकण्याची संधी सोडायला नको.

कविता म्हणजे काय आणि ती कशी वेगळी आहे?

कवितेच्या जितक्या व्याख्या आहेत तितक्या कवी आहेत. विल्यम वर्डस्वर्थने कवितेची व्याख्या "शक्तिशाली भावनांचा उत्स्फूर्त ओव्हरफ्लो" अशी केली. एमिली डिकिन्सन म्हणाली, "जर मी एखादे पुस्तक वाचले आणि त्यामुळे माझे शरीर इतके थंड झाले की कोणतीही आग मला कधीही गरम करू शकत नाही, तर मला माहित आहे की ती कविता आहे." डायलन थॉमस यांनी कवितेची अशी व्याख्या केली: "कविता ही मला हसवते किंवा रडवते किंवा जांभई देते, माझ्या पायाची नखं कशामुळे चमकतात, मला हे किंवा ते किंवा काहीही करण्याची इच्छा निर्माण होते."

कविता ही बऱ्याच लोकांसाठी खूप काही असते. होमरचे महाकाव्य, " द ओडिसी " मध्ये साहसी, ओडिसियसच्या भटकंतीचे वर्णन केले आहे आणि त्याला आतापर्यंतची सर्वात महान कथा म्हटले गेले आहे. इंग्रजी पुनर्जागरण काळात, जॉन मिल्टन, ख्रिस्तोफर मार्लो आणि अर्थातच, विल्यम शेक्सपियर सारख्या नाट्यमय कवींनी आम्हाला पाठ्यपुस्तके, व्याख्यान हॉल आणि विद्यापीठे भरण्यासाठी पुरेसे शब्द दिले. रोमँटिक कालखंडातील कवितांमध्ये जोहान वोल्फगँग फॉन गोएथेचे "फॉस्ट" (1808), सॅम्युअल टेलर कोलरिजचे "कुब्ला खान" (1816), आणि जॉन कीट्सचे "ओड ऑन अ ग्रीसियन अर्न" (1819) यांचा समावेश होतो.

आपण पुढे जाऊया का? कारण असे करण्यासाठी, आपल्याला 19व्या शतकातील जपानी कविता, एमिली डिकिन्सन आणि टीएस एलियट, उत्तर आधुनिकतावाद, प्रयोगवादी, फॉर्म विरुद्ध मुक्त श्लोक, स्लॅम इत्यादींचा समावेश असलेल्या सुरुवातीच्या अमेरिकन कवितेतून पुढे जावे लागेल.

कवितेची व्याख्या काय?

कदाचित कवितेच्या व्याख्येत सर्वात मध्यवर्ती वैशिष्ट्य म्हणजे त्याची व्याख्या, लेबल किंवा खिळे ठोकण्याची इच्छा नसणे. कविता म्हणजे भाषेचा छिन्नी केलेला संगमरवर. तो पेंट-स्पॅटर्ड कॅनव्हास आहे, परंतु कवी ​​पेंटऐवजी शब्द वापरतो आणि कॅनव्हास तू आहेस. कवितेची काव्यात्मक व्याख्या स्वत:वर आवर्तते, तथापि, कुत्र्याप्रमाणे शेपूटातून स्वतःला खात आहे. चला निटी घेऊया. चला, खरं तर, किरकिरी करा. कवितेचे स्वरूप आणि त्याचा उद्देश पाहून आपण कवितेची सुलभ व्याख्या देऊ शकतो.

काव्यात्मक स्वरूपातील सर्वात स्पष्ट वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे भाषेची अर्थव्यवस्था. कवी ज्याप्रकारे शब्द काढतात त्यावर ते कृपाळू आणि निर्विवादपणे टीका करतात. संक्षिप्तता आणि स्पष्टतेसाठी काळजीपूर्वक शब्द निवडणे हे मानक आहे, अगदी गद्य लेखकांसाठी. तथापि, कवी शब्दाचे भावनिक गुण, त्याची पार्श्वकथा, त्याचे संगीत मूल्य, त्याचे दुहेरी-किंवा तिहेरी-प्रवेश आणि अगदी पृष्ठावरील त्याचे अवकाशीय संबंध लक्षात घेऊन याच्या पलीकडे जातात. कवी, शब्द निवड आणि रूप या दोन्हीत नावीन्य आणून, कृश हवेतून महत्त्व व्यक्त करतो.

वर्णन करण्यासाठी, वर्णन करण्यासाठी, वाद घालण्यासाठी किंवा परिभाषित करण्यासाठी कोणी गद्य वापरू शकतो . कविता लिहिण्याची कारणेही तितकीच असंख्य आहेत . पण गद्याच्या विपरीत, कवितेचा अनेकदा अंतर्निहित आणि व्यापक हेतू असतो जो शब्दशः पलीकडे जातो. कविता उद्बोधक आहे. हे सामान्यत: वाचकामध्ये तीव्र भावना उत्तेजित करते: आनंद, दुःख, राग, कॅथर्सिस, प्रेम इ. कवितेमध्ये "अह-हा!" वाचकाला आश्चर्यचकित करण्याची क्षमता असते. अनुभव आणि प्रकटीकरण, अंतर्दृष्टी आणि मूलभूत सत्य आणि सौंदर्याची पुढील समज देणे. कीट्सने म्हटल्याप्रमाणे: "सौंदर्य हे सत्य आहे. सत्य, सौंदर्य. तुम्हाला पृथ्वीवर एवढेच माहित आहे आणि तुम्हाला हे सर्व माहित असणे आवश्यक आहे."

ते कसं? आमच्याकडे अजून व्याख्या आहे का? चला त्याचा सारांश असा काढूया: कविता ही तीव्र भावना किंवा "आह-हा!" अशा प्रकारे शब्दांचे कलात्मक रूपांतर करते. वाचकांकडून आलेला अनुभव, भाषेच्या बाबतीत किफायतशीर असणे आणि अनेकदा एका सेट फॉर्ममध्ये लिहिणे.  असे उकळणे सर्व बारकावे, समृद्ध इतिहास आणि कवितेचा लिखित भाग तयार करण्यासाठी प्रत्येक शब्द, वाक्यांश, रूपक आणि विरामचिन्हे निवडण्याचे काम पूर्ण करत नाही, परंतु ही एक सुरुवात आहे.

कवितेला व्याख्येने बांधणे अवघड आहे. कविता ही जुनी, क्षीण आणि मेंदू नसते. कविता तुम्हाला वाटते त्यापेक्षा मजबूत आणि ताजी आहे. कविता ही कल्पनाशक्ती आहे आणि त्या साखळ्या तुम्ही "हार्लेम रेनेसान्स" म्हणू शकता त्यापेक्षा वेगाने तोडेल.

एक वाक्प्रचार उधार घेण्यासाठी, कविता हे कार्डिगन स्वेटरमध्ये गुंडाळलेले कोडे आहे... किंवा असे काहीतरी. एक सतत विकसित होणारी शैली, ती प्रत्येक वळणावर व्याख्या टाळेल. ती निरंतर उत्क्रांती ती जिवंत ठेवते. ते चांगल्याप्रकारे करण्याची त्याची अंतर्निहित आव्हाने आणि भावना किंवा शिकण्याच्या केंद्रस्थानी येण्याची क्षमता लोकांना ते लिहित ठेवते. पानावर शब्द टाकत असताना (आणि त्यांची उजळणी करत असताना) आह-हा क्षण मिळवणारे लेखक हे पहिलेच आहेत.

ताल आणि यमक

जर कविता एक शैली म्हणून सोप्या वर्णनाला नकार देत असेल, तर आपण किमान विविध प्रकारांची लेबले पाहू शकतो. फॉर्ममध्ये लिहिण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला योग्य शब्द निवडणे आवश्यक आहे, परंतु तुमच्याकडे योग्य लय असणे आवश्यक आहे (निर्धारित ताणलेले आणि ताण नसलेले अक्षरे), यमक योजना (पर्यायी ओळी यमक किंवा सलग ओळी यमक) अनुसरण करा किंवा परावृत्त करा. किंवा पुनरावृत्ती ओळ.

ताल. तुम्ही iambic pentameter मध्ये लिहिण्याबद्दल ऐकले असेल , परंतु शब्दशैलीने घाबरू नका. Iambic चा अर्थ असा आहे की तणाव नसलेल्या अक्षराच्या आधी येतो. यात "क्लिप-क्लॉप," घोडा सरपटण्याचा अनुभव आहे. एक ताणलेला आणि एक ताण नसलेला उच्चार तालाचा एक "पाय", किंवा मीटर बनवतो आणि सलग पाच पेंटामीटर बनवतात .  उदाहरणार्थ, शेक्सपियरच्या "रोमिओ अँड ज्युलिएट" मधील ही ओळ पहा, ज्यात ताणलेले अक्षरे ठळक आहेत: "पण, मऊ ! योन डेर विन डो ब्रेक्समधून कोणता प्रकाश पडतो ? " शेक्सपियर आयंबिक पेंटामीटरमध्ये मास्टर होता.

यमक योजना. अनेक संच फॉर्म त्यांच्या यमकासाठी विशिष्ट पॅटर्नचे अनुसरण करतात. यमक योजनेचे विश्लेषण करताना, प्रत्येक यमकाचा शेवट कुठल्या इतर यमकांसह होतो हे लक्षात घेण्यासाठी ओळींना अक्षरांसह लेबल केले जाते. हा श्लोक एडगर ऍलन पोच्या "ॲनाबेल ली:" मधून घ्या .

एक वर्षापूर्वी,
समुद्राजवळच्या एका राज्यात, एक युवती राहत होती जिला तुम्ही ॲनाबेल ली नावाने
ओळखता ; आणि ही मुलगी ती माझ्यावर प्रेम करण्याशिवाय आणि माझ्यावर प्रेम करण्याशिवाय इतर कोणत्याही विचाराशिवाय जगली .

पहिल्या आणि तिसऱ्या ओळींचा यमक, आणि दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या ओळींचा यमक आहे, म्हणजे त्यात एक ababcb यमक योजना आहे, कारण "विचार" इतर कोणत्याही ओळींशी यमक करत नाही. जेव्हा ओळी यमक करतात आणि त्या एकमेकांच्या शेजारी असतात, तेव्हा त्यांना यमक  जोडले जाते . एका ओळीत तीनला यमक तिहेरी म्हणतात . या उदाहरणात यमक जोडलेले दोन किंवा तिहेरी नाहीत कारण यमक पर्यायी ओळींवर आहेत.

काव्यात्मक रूपे

अगदी लहान शाळकरी मुले देखील कवितेशी परिचित आहेत जसे की बॅलड फॉर्म (पर्यायी यमक योजना), हायकू (पाच अक्षरे, सात अक्षरे आणि पाच अक्षरे बनवलेल्या तीन ओळी), आणि अगदी लिमेरिक - होय, हा एक काव्य प्रकार आहे. त्यात ताल आणि यमक योजना आहे. ते साहित्यिक असू शकत नाही, पण कविता आहे.

रिकाम्या श्लोकांच्या कविता आयंबिक स्वरूपात लिहिल्या जातात, परंतु त्यांना यमक योजना नसते. जर तुम्हाला आव्हानात्मक, गुंतागुंतीच्या फॉर्ममध्ये तुमचा हात वापरायचा असेल, तर त्यात सॉनेट (शेक्सपियरचे ब्रेड अँड बटर), विलेनेले (जसे की डायलन थॉमसचे "डू नॉट गो जेंटल टू दॅट गुड नाईट."), आणि सेस्टिना , जी रेषा फिरवते. त्याच्या सहा श्लोकांमध्ये विशिष्ट पॅटर्नमध्ये शब्दांचा शेवट करणे. तेर्झा रीमासाठी, दांते अलिघेरीच्या "द डिव्हाईन कॉमेडी" चे भाषांतर पहा जे या यमक योजनेचे अनुसरण करतात: aba, bcb, cdc, ded in iambic pentameter.

मुक्त श्लोकाला कोणतीही ताल किंवा यमक योजना नाही, तरीही त्याचे शब्द आर्थिकदृष्ट्या लिहिणे आवश्यक आहे. ज्या शब्दांची सुरुवात आणि शेवटची ओळी असते त्यांना अजूनही विशिष्ट वजन असते, जरी ते यमक नसले तरीही किंवा कोणत्याही विशिष्ट मीटरिंग पॅटर्नचे पालन केले जात नसले तरीही.

तुम्ही जितकी जास्त कविता वाचाल, तितकेच तुम्ही फॉर्म आंतरिक बनवू शकाल आणि त्यामध्ये शोध लावू शकाल. जेव्हा फॉर्म दुस-या स्वरूपाचा वाटतो, तेव्हा तुम्ही पहिल्यांदा फॉर्म शिकत आहात त्यापेक्षा ते अधिक प्रभावीपणे भरण्यासाठी तुमच्या कल्पनेतून शब्द प्रवाहित होतील.

त्यांच्या क्षेत्रात मास्टर्स

कुशल कवींची यादी मोठी आहे. तुम्हाला कोणते प्रकार आवडतात ते शोधण्यासाठी, येथे आधीच नमूद केलेल्या कवितांसह विविध प्रकारच्या कविता वाचा. "ताओ ते चिंग" पासून रॉबर्ट ब्लाय पर्यंत आणि त्यांचे भाषांतर (पाब्लो नेरुदा, रुमी आणि इतर अनेक) जगभरातील आणि सर्व काळातील कवींचा समावेश करा. लँगस्टन ह्यूजेस ते रॉबर्ट फ्रॉस्ट वाचा. वॉल्ट व्हिटमन ते माया अँजेलो. सॅफो ते ऑस्कर वाइल्ड. यादी पुढे आणि पुढे जाते. आज सर्व राष्ट्रीयतेचे आणि पार्श्वभूमीचे कवी काम करत असताना, तुमचा अभ्यास कधीच संपुष्टात येत नाही, विशेषत: जेव्हा तुम्हाला एखाद्याचे काम सापडते जे तुमच्या मणक्याला वीज पुरवते.

  • हरक्यूलिस नदीच्या पायथ्याशी फिरतो आणि दोन निळे पर्वत धारण करतो.

कविता म्हणजे काय?

गणेश कनाटे
"कविता म्हणजे काय', असा प्रश्न वाचकांना पडतोच. मग तो या प्रश्नाचे उत्तर कुठे शोधत असेल? का नसेलच शोधत? की आपल्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवून पुढ्यातल्या संहितेला कविता मानून मोकळा होतो. हे प्रश्न केवळ मराठी कवितेच्या वाचकांना पडणारे प्रश्न नव्हेत; हे जगभरातील सर्व काव्यरसिकांना पडणारे प्रश्न आहेत. कवितेची समीक्षा लिहिणाऱ्या समीक्षकांनाही "कविता म्हणजे काय', हा प्रश्न ऍरिस्टॉटलच्या काळापासून आजवर छळतोच आहे.

पौर्वात्य आणि पाश्‍चिमात्य दोन्ही परंपरांमध्ये कवितेची व्याख्या करण्याचे अगणित प्रयत्न झाले. परंतु कवितेची सर्वमान्य किंवा अंतिम अशी व्याख्या कुणालाही करता आली नाही. याचे मूळ "व्याख्या' या संज्ञेची जी व्याख्या दिली जाते त्यात दडलेले आहे. "व्याख्येत वस्तूचे किंवा संज्ञेचे व्यवच्छेदक लक्षण देणे (Unique Characteristic) म्हणजे व्याख्या.' कवितेच्या बाबतीत असे व्यवच्छेदक लक्षण किंवा एकच एक सत्त्व कुणालाही शोधता आले नाही. म्हणून व्याख्येच्या नावाखाली अनेक कवी-समीक्षकांनी कवितेची लक्षणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अभारतीय भाषांमध्ये अगदी ऍरिस्टॉटलपासून विलियम वर्डसवर्थ, टी. एस. इलियट, मिशेल रिफातेरी, रिचर्डस, हर्बर्ट रीड, टेरी ईगलटन आणि मराठीत अलीकडच्या काळात सुधीर रसाळ, रमेश तेंडुलकर, म. सु. पाटील, गंगाधर पाटील, वसंत आबाजी डहाके, चंद्रकांत पाटील, मिलिंद मालशे यांच्यासारख्या जाणकार समीक्षकांनीही हा प्रयत्न केलेला आहे. परंतु दोन्ही परंपरांमध्ये अपवाद वगळता बहुतेकांनी व्यवच्छेदक लक्षण देण्याऐवजी अनेक लक्षणे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या "व्याख्यासदृश व्याख्या' अतिव्याप्त तरी होतात किंवा अव्याप्त तरी. म्हणूनच वाचक शेवटी त्याच्या भाषिक समजेच्या आधारावर, काव्यस्मृतीच्या आधारावर आणि कविता या साहित्य प्रकाराबद्दलच्या कल्पनांच्या आधारावर वाचलेली संहिता कविता आहे किंवा नाही हे ठरवतो. म्हणूनच वाचकाला जशी बा. भ. बोरकरांची, इंदिरा संतांची, शांता शेळके यांची कविता कविता वाटते तशीच बा. सी. मर्ढेकरांची, दिलीप चित्रेंची, अरुण कोलटकरांची आणि नामदेव ढसाळांचीही कविता कविताच वाटत असते.

कविता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर तिच्या लक्षणांची एक यादी येते. अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध आदींचा वापर करणारी छंदोबद्ध, वृत्तबद्ध किंवा मुक्तछंद-मुक्तशैलीत लिहिली गेलेली संहिता आपण कविता म्हणून स्वीकारत असतो. अलीकडच्या काळात सुधीर रसाळ यांनी प्रतिमेला केंद्रीभूत मानून "शब्दांनी घडविल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय,' अशी एक व्याख्या केली. (कविता आणि प्रतिमा- सुधीर रसाळ) त्यांच्या मते, प्रतिमा हा घटक कवितेला काव्यत्व मिळवून देणारा प्राणभूत घटक आहे. परंतु ही व्याख्या स्वीकारली तर कथनपरतकडे झुकणाऱ्या बहुसंख्य रचना कविता म्हणून स्वीकारता येणार नाहीत. कथाकाव्य, आख्याने, पोवाडे यांसारख्या काव्यप्रकारांत प्रतिमांची संघटना नसते. मग हे काव्यप्रकार कविता म्हणून बाद करायचे काय? तसेच पु. शि. रेगे यांच्या काही कादंबऱ्या, गंगाधर गाडगीळ यांच्या काही कथा किंवा ग्रेस यांचे ललितबंध हे सारेच काव्यात्म आहे असे आपण म्हणतो, पण त्यांना कविता म्हणत नाही. या अंतर्विरोधाचे काय करायचे?

या पार्श्वभूमीवर, प्राचीन संस्कृत साहित्यशास्त्रात वक्रोक्तिजीवितकार आचार्य कुन्तक यांची व्याख्या मूल्यवान आहे. "काव्यमर्मज्ञांना आनंद देणाऱ्या सुंदर (वक्र) कवी-व्यापारयुक्त रचनेतील शब्द आणि अर्थ यांच्या समन्वित रूपाला काव्य म्हणतात.' त्यांच्या मते, वक्रोक्ती हा काव्याचा आत्मा आहे. या ठिकाणी ध्वन्यालोककार आनंदवर्धन यांच्या मते, "ध्वनी हा काव्याचा आत्मा असतो,' हे मत विचारात घेता येते. त्यांच्या मते, शब्दाचे "वाच्य' आणि "प्रतीयमान' असे दोन अर्थ असतात; "प्रतीयमान' अर्थ म्हणजे "ध्वनी'; ध्वनीमुळे भाषिक रचनेला "काव्यत्व' प्राप्त होते. या दोन्ही व्याख्या जर एकत्रितपणे वापरल्या तर आपण डहाके यांच्या व्याख्येकडे वळू शकतो. डहाके लिहितात, "नाद आणि अर्थ असलेल्या शब्दांची सममूल्यतेच्या तत्त्वानुसार केलेली मांडणी असलेल्या ओळींची; छंद, अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त अथवा मुक्तछंद-मुक्तशैली यांतील लय-तालांत बांधलेली; अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध यांच्या उपयोजनाचे अर्थसंपृक्त असलेली; वाच्यार्थ आणि वाच्यार्थातून स्पंदित होणारा व्यंगार्थ असलेली रचना, म्हणजे कविता, असे म्हणता येईल.' (काव्यप्रतीती- वसंत आबाजी डहाके)

या पार्श्वभूमीवर, मिशेल रिफातेरी याने "सेमिऑटिक्‍स ऑफ पोएट्री' या ग्रंथात कवितेच्या लक्षणांची केलेली चर्चा बहुमोल आहे. रिफातेरीच्या मते, अर्थाच्या पातळीवरील वक्रता (Indirection) ही प्रतिरूपणाला (Representation) वा अनुकृतीला (Mimesis) नकार देणारी असते. ती विचलन म्हणजे (Deviation), विरूपण (Distortion) व अर्थनिर्मिती यांनी साधलेली असते. रिफातेरी कवितेचा अर्थ (Meaning) आणि कवितेची अर्थवत्ता (Significance) यांत भेद करतो. (कवितेचा शोध- वसंत पाटणकर)

या पार्श्वभूमीवर आचार्य कुन्तक यांची व्याख्या व रिफातेरी यांनी सांगितलेली लक्षणे हाताशी घेऊन "यान्नीस रीत्सोस' या ग्रीक कवीच्या "डायरीज ऑफ एक्‍झाईल' (वनवासातील रोजनिशी) या प्रसिद्ध कवितासंग्रहातील एक कविता बघूया.

सिगरेटच्या पाकिटांत काही चिठ्ठ्या घेऊन
जोड्यांत खूप काही खरडलेले काही कागद लपवून
डोळ्यांत काही निषिद्ध स्वप्नं घेऊन
(जिथे गाडले गेलेत ते) त्या दगडांखालीच
रात्री, ते एकत्र येतात

नेमके त्याचवेळी
मोठे होत जाते आकाश
मोठे आणि खोल होत जाते आकाश

वाच्यार्थ किंवा काव्यार्थ सांगण्याच्या भानगडीत न पडताही आपण हे बघू शकतो, की एक कैदी तुरुंगातच मारल्या गेलेल्या, त्याच्या स्मृतीतल्या कैद्यांच्या एकत्र येण्याच्या काल्पनिक स्थितीचे वर्णन पहिल्या चार ओळींत करतो आणि नंतरच्या तीन ओळींत आकाशाच्या मोठे आणि खोल होत जाण्याची कल्पना मांडतो. मोजक्‍या शब्दांत कैद्यांचे दुःखं, भोगलेल्या यातना, जीवनातली परात्मता, जगण्याविषयीची आस्था सगळेच लीलया मांडतो. असे करत असताना रीत्सोस माणसाच्या हातातील आशेचा क्षीण धागा सुटू देत नाही.


Also Read

वाच्यार्थ किंवा काव्यार्थ सांगण्याच्या भानगडीत न पडताही आपण हे बघू शकतो, की एक कैदी तुरुंगातच मारल्या गेलेल्या, त्याच्या स्मृतीतल्या कैद्यांच्या एकत्र येण्याच्या काल्पनिक स्थितीचे वर्णन पहिल्या चार ओळींत करतो आणि नंतरच्या तीन ओळींत आकाशाच्या मोठे आणि खोल होत जाण्याची कल्पना मांडतो. मोजक्‍या शब्दांत कैद्यांचे दुःखं, भोगलेल्या यातना, जीवनातली परात्मता, जगण्याविषयीची आस्था सगळेच लीलया मांडतो. असे करत असताना रीत्सोस माणसाच्या हातातील आशेचा क्षीण धागा सुटू देत नाही.

बातमी लेखन

अलीकडील, सद्य घडामोडींविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय. अर्थातच बातमीतील मजकुराला काळाचा संदर्भ असतो. बातमी ही अनेक माध्यमांद्वारे दिल...