रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

गाडगे बाबांचे कीर्तन

  शिक्षण विषयक कीर्तन

 संत गाडगेबाबा 

परिचय - डेबुजी झिंगराजी जानोरकर इ.स.१८७५ ते १९५६ वऱ्हाडात अमरावती जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील शेंडगावी बाबांचा जन्म झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या प्रदेशातील निरनिराळ्या गावी त्यांनी पायी प्रवास केलेला आहे. त्यांच्या अंगावर फाटकी गोधडी आणि अन्न व पाणी घेण्यासाठी हातात गाडगे असे म्हणून लोक त्यांना गोधडी महाराज किंवा गाडगे महाराज म्हणत. आपल्या समाजातील अज्ञान, भोळ्या समजुती अनिष्ट रूढी-परंपरा इत्यादी विषयावर त्यांनी कठोर प्रहार केले. त्यासाठी त्यांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. अनेक गावात संचार केला. त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब करण्याचे कारण म्हणजे खेड्यापाड्यातील अज्ञानी देव भोळ्या जनतेला भजन-कीर्तन यासारख्या गोष्टींचे विशेष आकर्षण वाटत असे त्यामुळे जनतेपर्यंत पोहोचण्याचा तोच प्रभावी मार्ग होई. गाडगे महाराज किर्तन आतून अतिशय सोप्या व सुबोध भाषेत उपदेश देत.   माणसाने लफडी करू नये,  व्यसने करू नयेत,  देवाच्या नावाने पशुपक्षी यांचे बळी देऊ नयेत,  जात-पात मानू नये, कोणी आजारी पडले तर अंगारे-धुपारे न करता डॉक्टरकडे जावे.  नेहमी कष्ट करावेत. चोरी करू नये,  कर्ज काढू नये,  भूतदया  म्हणजे परमेश्वराची पूजा करणे असा उपदेश त्यांनी दिला.  'पदेवकीनंदन गोपाला'  हे त्यांचे आवडते भजन होय.  संत गाडगे महाराजांनी सर्वसामान्य माणसाला प्रज्ञावंत होण्याचा संदेश दिला;  तसेच जीवनात शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे शिक्षण आवश्यक आहे.  तसेच विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगणे गरजेचे असल्याचे सप्रमाण सांगितले आहे.

मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    भारत देशास स्वराज्य मिळाले परंतु सुराज्य निर्माण करण्यास अजूनही आपण असमर्थ ठरतांना दिसतो. खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य आपण निर्माण करु शकल...