मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

मध्ययुगीन व आधुनिक पद्य-I सत्र -१, वस्तुनिष्ठ प्रश्नI

वस्तुनिष्ठ प्रश्न १. मराठीतील आद्य कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? महदंबेस २. स्वामी चक्रधरांच्या गुरूंचे नाव काय होते? श्रीगोविंदप्रभू ३. धवळे म्हणजे --------गावयाचे वरविषयक गाणे किंवा विवाह्गीत होय. लग्नात ४. धवळयाचे किती भाग आहेत? दोन ५. धवाळयाच्या पूर्वार्धात रुक्मिणीहरणाचा कथाभाग येतो, तर उतरार्धात ---------------निवेदन येते. रुक्मिणी स्वयंवराचे ६. महदंबेने धवळे कोणाच्या आज्ञेवरून लिहिले? श्रीगोविंद प्रभूच्या ७. रुक्मिणीच्या वडिलांचे नाव काय होते? भीमक राजा ८. बंधू रुक्मीने रुक्मिणीचे स्वयंवर कोणासोबत करायचे ठरविलेले होते? शिशुपालासोबत ९. काय ऐकिल्यावर भक्तास परमगती प्राप्त होते? कृष्णचरित्र १०. जेणे रुक्मिणी हरीएली तेणे -------केले अद्भुत : पवाडे ११. कृष्णाचा जन्म कोणत्या कुळात झाला होता? यादवकुळ १२. रुक्मिणी वृतांत कोणास विचारते? सख्यांना १३. संत नामदेवांचे जन्मगाव कोणते? नरसीबामणी १४. मराठीतील पहिले पद्य चरित्रकार म्हणून कोणास ओळखळे जाते? संत नामदेव १५. मराठीतील पहिले पद्य आत्मचरित्रकार म्हणून कोणास ओळखळे जाते? संत नामदेव १६. मराठी व ------ भाषेत काव्यरचना संत नामदेवांनी केली. पंजाबी १७. कीर्तन परंपरेचे प्रवर्तक कोणास म्हटले जाते? संत नामदेव १८. शीख धर्मियांच्या ----------- या धर्मग्रंथात संत नामदेवांची ६१ पदे समाविष्ट आहेत. गुरुग्रंथसाहिब १९. संत नामदेवास वारकरी संप्रदायाचे आद्य ---------म्हणून ओळखळे जाते? प्रचारक २०. संत नामदेवांनी ज्ञानदेवाचे आदी, समाधी व ----------या तीन प्रकरणात चरित्र लिहिले. तीर्थावळी २१. ‘पाप्या नावडे संत संगती’ या अभंगात कोणत्या युगाचे वर्णन आलेले आहे? कलयुगाचे २२. लोभी माणसास काय आवडत नाही? उदारवृती २३. व्यभिचारिणी नावडे ------I नावडे ज्योति उजीयेडा I पती २४. लबाड व्यक्तीस काय आवडत नाही? सत्य २५. चांदणे नावडे चोरा I --------नावडे रांडपोरा I सदबुध्दी २६. भक्ती नावडे तया --------- I पुण्य नावडे तया चांडाळा I खळा २७. अब्राम्हणास काय आवडत नाही? कर्म २८. धर्म कोणास आवडत नाही? कृपणास २९. नावडे भजन कैंची कथा कथा I नाही --------------कलियुगी I पतिव्रता ३०. संत नामदेव कलीकाळात काय धरण्यास सांगतात? नामाचा विश्वास ३१. भांडखोर व्यक्तीस काय आवडत नाही? न्याय ३२. ज्ञानेश्वरीचे मुळनाव काय होते? भावार्थदीपिका ३३. चांगदेव पासष्टी हा ग्रंथ किती ओव्यांचा आहे? पासष्ट ३४. अमृतानुभव हा ग्रंथ कोणाचा आहे? संत ज्ञानेश्वर ३५. घनु वाजे घुणघुणा ही संत ज्ञानेश्वर यांची --------आहे. विराणी ३६. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी I कान्हो --------वेगी भेटवा का II वनमाळी ३७. दर्पणामध्ये विरहिणीस काय दिसत नाही? आपले रूप ३८. संत जनाबाईचे जन्मगाव कोणते? गंगाखेड ३९. कोणत्या संताच्या कुटुंबात संत जनाबाईने पंढरपुरास वास्तव्य केले? संत नामदेवाच्या ४०. विठो माझा लेकुरवाळा, संगे -----------मेळा गोपाळांचा ४१. विठ्ठलाच्या मागे कोण चालत आहे? संत मुक्ताई ४२. संत वाटिकेतील कलिका म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? संत जनाबाई ४३. संत चोखामेळा ---------चे राहणारे होते. मंगळवेढा ४४. संत चोखामेळा यांना -----------कडून अद्वैताचा बोध झाला. संत नामदेवा ४५. देवा नाही रूप देवा नाही ----- I देव हा निष्काम सर्वाठाई II नाम ४६. संत --------भारुडांना मराठी वाड्मय निर्मितीत आगळे स्थान आहे. एकनाथांच्या ४७. समन्वयकार म्हणून कोणत्या संतास ओळखले जाते? संत एकनाथ ४८. मनुष्यास कोणता विंचू चावलेला आहे? कामक्रोध ४९. विज्ञानबोध हा ग्रंथ कोणाचा आहे? संत मन्मथ स्वामी ५०. प्राचीन संस्कृत साहित्यातील शिवाचार आणि --------------------- पुरोगामी विचार यांचा सुंदर समन्वय मन्मथ स्वामींच्या साहित्यात आढळतो. महात्मा बसवेश्वरांचे ५१. चंद्राच्या उद्याने कोणास आनंद होतो? चकोर पक्षास ५२. यथार्थदिपिका ग्रंथ कोणाचा आहे? वामन पंडित ५३. राग करू नका I रातांदिवस विवेकाला II या कवितेच्या ओळी कोणाच्या आहेत? संत मन्मथ स्वामी ५४. नटा नामी --------I आपदा चुकवा भयाच्या II शंकराच्या ५५. गाढव शृंगारिले कोडेI काही केल्या नव्हे -------II घोडे ५६. -------------या शाहीरास बाजीराव पेशव्यांचा मोठा आश्रय होता. होनाजी बाळा ५७. घनश्याम सुंदरा ही अमर ------- म्हणून प्रसिद्ध आहे. भूपाळी ५८. भूपाळी म्हणजे ----------वेळी सुरम्य वातावरणात आळवावयाचे सुमधुर गीत होय. पहाटेच्या ५९. वामन पंडित हे ---------कवी आहेत. आख्यान (पंडित) ६०. छंदोमंजरी या ग्रंथाचा कर्ता कोण आहे? शाहीर राम जोशी ६१. महात्मा जोतीराव फुलेंनी अभंग सदृष्य --------काव्यप्रकार हाताळला. अखंड

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

सत्र-पहिले SL अक्षरलेणी वस्तुनिष्ठ प्रश्न

परीक्षा सराव-वस्तुनिष्ठ प्रश्न 1. श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी मराठी विभाग अक्षरलेणी - वस्तुनिष्ठ प्रश्न १. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? लीळाचरित्र २. म्हाइंभटाने कोणाच्या मार्गदर्शनाखाली लीळाचरित्र ग्रंथ पूर्ण केला? नागदेवाचार्य ३. लीळाचरित्र हा ग्रंथ किती भागात विभागलेला आहे? तीन ४. अहिंसेचे महत्व विशद करणारी कोणती लीळा तुम्ही अभ्यासली आहे? ससिक रक्षण ५ . लीळाचरित्र या ग्रंथातून कोणाचे चरित्र रेखाटले आहे? चक्रधर स्वामी ६. ससा जीवाच्या आकांताने का पळत होता? त्याच्या मागे कुत्रे लागली होती. ७. 'ससिक रक्षण' लीळेत चक्रधर स्वामींना कोणत्या नावाने संबोधले आहे? सर्वज्ञ ८. चक्रधर स्वामींनी सशास कोणत्या नावाने संबोधले? महात्मे हो! ९. लीळाचरित्राचा करता कोण आहे? म्हाइंभट १०. ‘एथ शरण आलेया काइ मरण असे?’ हे हे उद्गार कोणाचे आहेत? चक्रधर स्वामी यांचे ११ . इ.स. १६७४ मध्ये शिवाजी राजेंनी आपल्या राज्यभिषेकसमयी अष्टप्रधान मंडळातील प्रमुख व्यक्ती म्हणून कोणाची निवड केली होती? रामचंद्रपंत अमात्य १२. रामचंद्रपंत अमात्य यांचे पूर्ण नाव काय होते? रामचंद्रपंत निळोपंत अमात्य (बावडेकर ) १३. रामचंद्रपंत यांनी राजनीतीवरील कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? आज्ञापत्र १४. रामचंद्रपंत अमात्य यांनी कोणाच्या आज्ञेवरून आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला? श्री राजा शंभूछत्रपती (दुसरा) १५. आज्ञापत्रातील पाचवे प्रकरण कोणते आहे? साहुकार म्हणजे राज्याची शोभा १६. आज्ञापत्र या ग्रंथात किती प्रकरणे आहेत? नऊ १७. साहुकाराच्या योगाने राज्य ------- होते. आबादान १८. अनंत पैलूंचा सामाजिक योध्दा म्हणून -------------- याचे नाव कोरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९. स्वतंत्र भारताच्या कायदेमंडळातील पहिले कायदेमंत्री ------------ हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर २०. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील नियतकालिके काढली? जनता, समता, मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत २१. २०. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुढील ग्रंथे प्रसिद्ध होती? caste in India, Thoughts on Pakistan, budhdha and his Dhamma, who where the shudras, Problem of Ruppees २२. भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते हे भाषण कोणत्या कॉलेजमध्ये केलेले आहे? एल्फिस्टन कॉलेजमध्ये २३. मानवी जीवनातील वैचारिक आणि------ मूल्ये कधीच स्थिर राहिली नाहीत. नैतिक २४. आजचे विद्यार्थी ------- आणि राजकारणाच्या फंदात ती दिव्य दृष्टी करून घेतच नाही. क्रीडेच्या २५. Knowledge is power हे वाक्य कोणाचे आहे? केबन २६. ---------- अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर लढा दिला. डॉ. नरेंद्र दाभोलकर २७. डॉ . नरेंद्र दाभोलकर यांनी सानेगुरुजीने सुरु केलेल्या ------- साप्ताहिकाचे संपादन केले. साधना २८. ‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ हा ग्रंथ कोणाचा आहे? डॉ. नरेंद्र दाभोलकर २९. ------ अनभिषिक्त सम्राट आणि बाकीचे खेळ जणू तिय्यम दर्जाचे मानकरी अशी आजची स्थिती आहे. क्रिकेट ३०. --------- या क्रीडा संस्कृतीला आकर्षकपणा प्राप्त करून देतील, असे घडावयास हवे. प्रसारमाध्यमे ३१. कोणत्या आदिवासी तरुणाने थोडी संधी मिळाली तर धनुर्विद्या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक्सपर्यंत धडक मारली. लिंबाराम ३२. डॉ. उत्तम बावस्कर यांनी कोणते रामबाण औषध शोधले? विंचवाच्या व सापाच्या दंशावर ३३. डॉ. उत्तम बावस्कर यांचे शोधनिबंध कोणत्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेले आहेत? द लनसेट ३४. डॉ. हिंमतरावांच्या पत्नीचे नाव काय होते? प्रमोदिनी ३६. डॉ. हिंमतराव बावस्कर यांचा जन्म कोठे झाला होता? देहेड या गावी ३७. लेखकाचे आजोबा कोणत्या गावचे पाटील होते? दगडवाडी ३८. लेखकाची आई वैतागून काय म्हणायची? पदरी पडलं आणि पवित्र झालं ३९. डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्या वडिलांचा सांभाळ कोणी केला? त्यांचे मामे आजोबा पाटीलबा करतडे ४०. करतडे आजा म्हणजे आमचे साक्षात --------च गाडगेबाबा ४१. आईवडिलांनी लेखकास शिक्षणासाठी कोठे ठेवले? बुलढाणा ४२. करतडे आजोबाच्या संसाराची तुलना लेखक कुणाशी करतात? मदर तेरेसाशी ४३. जेवणासाठी परातीच्या आकारासारखे भांडे त्यास काय म्हणत असत? परोळ ४४. करतडे आजोबा कोणाच्या शेतातील गोठ्यावर गुरे सांभाळण्याचे काम करीत? तुकाराम दादा ४५.पदरी पडलं आणि पवित्र झालं हा वेचा कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे? ४६.आदिवासीच्या जीवनात परिवर्तनाचा प्रकाश पेरणाऱ्या डॉ. मंदा आमटे ह्या ----------------प्रकल्पाच्या संचालिका आहेत. लोकबिरादारी ४७. ताई पारंपारिक मत बाळगणाऱ्या तर बाबा --------विचाराचे होते. पुरोगामी ४८. मंदा आमटे व प्रकाश तरुण वयात ---------जंगलात येऊन राहिले. हेमलकशासारख्या ४९. ताई आणि बाबा दरवर्षी -----------सुमारास आम्हास भेटण्यासाठी हेमलकशास येत असत. गणपतीच्या ५०.अनाथ मुलांच्या संस्थेस बाबांनी काय नाव दिले होते? गोकुळ ५१. ‘किमान या लोकांना सहजीवन तरी जगू द्या’ ही मागणी कोणी केली? साधनाताई आमटे ५२. बाबांनी नर्मदेच्या किनारी -----वर्ष काढली. ११ ५३. ताईने कोणते आत्मचरित्र लिहिले? समिधा ५४. ताईचं कोणते तत्वज्ञान आमच्या कायमचं लक्षात राहिलं असे लेखिका म्हणतात. फरगेट आणि फरगीव ५५. जादव पायेंग यांनी किती वर्ष जीवापाड मेहनत घेऊन जंगल उभे केले? ४० वर्षे ५६. जादव पायेंग यांचा जन्म कोणत्या जमातीमध्ये झाला होता? मिशिंग ५७. ---------जंगल वसविण्यासाठी जादव यांना तब्बल पाच वर्षे लागली. एक एक्करचे ५८. कोणत्या वार्ताहारामुळे जादव पायेंग जगाला माहित झाले. जितू कालिता ५९. जादव पायेंग यास ‘फोरेस्ट मन ऑफ इंडिया’ हा पुरस्कार कोणी दिला? जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने ६०. जादव पायेंग यांच्या पत्नीचे नाव काय होते? बिनिता ६१. आजही जादव पायेंग कोठे राहतात? बांबूच्या झाडावर निवारा करून ६२. ‘प्रथमपरुष आणि भूमिती’ हा कथासंग्रह कोणाचा आहे? कृष्णा रवींद्र किंबहुने ६३. आहोजाहो कोणाशी सहज बोलू शकत होते? पानवाल्या मित्रांशी व रिक्षेवाल्या मित्रांशी ६४ . संत सावता माळी यांचा जन्म कोठे झाला होता? अरण ता. माढा ६५. “कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार कोणे दिवशी पायाचा चाकर, चालून जावे” या कवितेच्या ओळी कोणत्या कवीच्या आहेत? संत सावता महाराज ६६. आपल्या कष्टाच्या मळ्यातच कोणास परमेश्वराचे रूप दिसले? संत सावता महाराज ६७. कोणे दिवशी होईल -------कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा सद्गुरूची ६८. कोणत्या कवीचा पिढीजात सराफी व गोंधळीपणाचा व्यवसाय होता? कवी अनंत फंदी ६९. शाहीर अनंत फंदीने कोणता काव्यप्रकार लोकप्रिय केला? फटका ७०. बिकट वाट वहिवाट नसावी, -----मार्गा सोडु नको धोपट ७१. “बरी खुशामत शहाण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको कष्टाची बरी भाजिभाकरी, तुपसाखरेची चोरी नको” या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत? अनंत फंदी ७२. विडा पैजेचा ----- नको, उणी तराजू तोलू नको उचलु ७३. कवी अनंत फंदीचे पूर्ण नाव काय होते? अनंत भावानीबाबा घोलप ७४. माधव जूलियन या टोपणनावाने कोणी काव्यलेखन केले? माधव त्र्यंबक पटवर्धन ७५. माधव जूलियन यांना मुंबई विद्यापीठाने कोणत्या ग्रंथाबद्दल प्रतिष्ठेची डी. लिट. पदवी बहाल केली? छंदोरचना ७६. मधुलहरी हा कवितासंग्रह कोणाचा आहे? माधव जूलियन ७७. गझल व ----- हे काव्यप्रकार माधव जूलियन यांनी मराठी आणले. रुबाई ७८. १९३६ मध्ये जळगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान कोणी भूषविले? माधव जूलियन ७९. तू माय ------- मी तू गाय, वासरू मी, लेकरू ८०. कुणाविणा कवी पोरका आहे? आई ८१. “वाटे इथुनी जावे, तुझ्या पुढे निजावे नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे” या कवितेच्या ओळी कोण्या कवीच्या आहेत? माधव जूलियन ८२. कवी माधव जूलियन यांनी कोणती मागणी देवाकडे केली आहे? पुन्हा आईच्या पोटी जन्म घेण्याची ८३. कवीला आईच्या वियोगाने काय आठवते? ब्रम्हांड ८४. कैलास सोडून कशासम वेगाने आईने यावे असे कवीला वाटतें? उल्केसमान ८५. कवी वामनदादा कर्डक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथम दर्शन कोठे झाले? नायगाव ८६. ‘मोहळ’ हा गीतसंग्रह कोणाचा आहे? कवी वामनदादा कर्डक ८७. कोणत्या शहरात संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी वामनदादा कर्डक होते? वर्धा ८८. कवी वामनदादा कर्डक यांच्या आत्मकथनाचे नाव आहे? माझ्या जीवनाचं गाणं ८९. ‘वाटचाल’ हा कवितासंग्रह कोणाचा आहे? कवी वामनदादा कर्डक ९०. “असे गोड नाते तुझ्याशी जडावे तुझ्या संकटाशी इथे मी लढावे” या कवितेच्या ओळी कोण्या कवीच्या आहेत? कवी वामनदादा कर्डक ९१. इथे सारे सारे नवे ---------- वामन परी मी तुझे हात व्हावे पेरताना ९२. माणसाने माणसाशी कसे वागावे ही भावना कोणत्या कवितेतून आलेली आहे? माणसा इथे मी तुझे गीत व्हावे ९३. माणसा इथे मी तुझे गीत व्हावे हे गीत कोणत्या गीत संग्रहातून घेतलेले आहे. मोहळ ९४. निसर्गकवी म्हणून कोणास ओळखले जाते? ना. धों. महानोर ९५. ‘सूर्यनारायणा’ ही कविता कोणत्या कवितासंग्रहातून घेतलेली आहे? पानझड ९६. ‘प्रार्थना दयाघना’ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? ना. धों. महानोर ९७. ‘एक होता विदूषक’ या चित्रपटाचे गीतलेखन कोणी केलेले आहे? ना. धों. महानोर ९८. “ओंजळीने भरू देगा पाखरांच्या चोची दु;खात पंखांना असो सावली मायेची” या कवितेच्या ओळी कोणत्या कवितेतील आहेत? सूर्यनारायणा ९९. ‘पावसाळी कविता’ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? ना. धों. महानोर १००. तुम्ही अभ्यासलेल्या कोणत्या कवितेतून धरण ही प्रतिमा आलेली आहे? उतराई १०१. ‘दस्तऐवज’ हा कवितासंग्रह कोण्या कवीचा आहे? कवी गोविंद काळे १०२. कवी गोविंद काळे यांनी धरणातील जलाशय ही प्रतिमा कोणासाठी वापरली आहे? राजकीय नेत्यांसाठी १०३. मलाही वाटतं ढासळून टाकावेत आपल्यातले सगळे ----- आणि बनावं उतार...फक्त उतार चढ १०४. वाहते पाणी-जीवनगाणी हा कवितासंग्रह कोणाचा आहे? कवी गोविंद काळे १०५. पी. विठ्ठल या टोपण नावांनी कोणी काव्य लेखन केले आहे? डॉ. विठ्ठल पवार १०६. माझ्या वर्तमानाची नोंद ह कवितासंग्रह कोणत्या कवीचा आहे? पी. विठ्ठल १०७. भूक, भाकर आणि तुझी --------वाणी स्त्रीलिंगी आहे. सृजनशील १०८. राष्ट्र राष्ट्राच्या साऱ्या सीमा आणि ----------च्या भव्य डोळ्यातली चमक स्त्रीलिंगीच असते. लोकशाही १०९. बुध्दाच्या अथांग डोळ्यातील ------ असो की येशूची अंतरिक तगमग असो परकेपणाला जोडून ठेवणारी प्रत्येक व्याकूळ कवितासुद्धा स्त्रीलिंगीच असते. करुणा ११०. कवीने जातं ही प्रतिमा कुणासाठी वापरली आहे? स्त्रीसाठी १११. कवीने पतीसाठी कोणती प्रतिमा वापरली आहे? सूप ११२. ‘वाटेवरती काचा गं’ हा कवितासंग्रह कोणाचा आहे? कवयित्री स्वाती शिंदे- पवार ११३. नाते सुपाचे जात्याचे पती-पत्नीच्या नात्याचे एक फिरते भरारा दुज्या नावाचा दरारा या कवितेच्या ओळी कोणाच्या आहेत? कवयित्री स्वाती शिंदे- पवार ११४. सारा भरडा पडतो इथं तुझ्याच श्रमाचा लख्ख --------लागते शिक्का माझ्याच कामाचा लेबल ११५. सूप आणि जातं ही कविता कोणत्या कवितासंग्रहातून घेतलेली आहे? वेदनेच्या खोल तळाशी ११६. स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल ----------द्यावा. शीर्षबिंदू ११७. प्रमाण मराठी लेखनाच्या नियमांची विभागणी -------- गटात केलेली आहे? तीन ११८. १९७२ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने ----- नियमांची भर घातली व एकून १८ नियम बनले. चार ११९. अभ्यस्त शब्दांच्या ---------अनुस्वार लिहावा. सामान्यरूपांवर १२०. पुढील योग्य शब्द ओळखा. बन्द, खंत, सम्प, दन्गा १२१. पुढील योग्य शब्द ओळखा. गुल्कंद, चिन्च, आंबा, तनटा १२२. पुढील योग्य शब्द ओळखा. संय्यम, मांव्स, संव्ज्ञा, संयम १२३. ज्या शब्दांच्या रूपांमध्ये लिंग, वाचन, पुरुष व विभक्ती यानुसार बद्दल होतो, त्यांना ------------असे म्हणतात. विकारी शब्द १२४. शब्दांच्या विविध कार्यावरून शब्दांच्या -------- जाती पडतात. आठ १२५. ज्या शब्दांच्या लिंग, वचन, पुरुष व विभक्ती याप्रमाणे बदल होत नाही त्यांना -------------शब्द म्हणतात. अविकारी १२६. नामाचे प्रकार किती आहेत? तीन १२७. प्रामाणिकपणा हा शब्द कोणते नाम दर्शविते? भाववाचक या धर्मवाचक नाम १२८. सर्वनामे नामाचे कार्य करतात म्हणून त्यास -------- असेही म्हणतात. प्रतिनाम १२९. सर्वनामांचे एकून किती प्रकार आहेत? सहा १३०. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी -----------सर्वनामाचा वापर केला जातो. दर्शक १३१. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांस ---------असे म्हणतात. विशेषण १३२. विशेषणाचे किती प्रकार आहेत? तीन

सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

सत्र - पाचवे BA वस्तुनिष्ठ प्रश्न

1.ताटीचे अभंग कोणत्या संत कवयित्रीने लिहिले? संत मुक्ताबाई 2. अवघ्या संत मंडळाची परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या संताकडे होती? संत मुक्ताबाई 3. 'संत वाटिकेतील जाईची वेल' असा उल्लेख -------या संत कवयित्रीचा केला जातो? संत जनाबाई 4. महाराष्ट्रातील-------- येथून महात्मा बसवेश्वरांच्या कारकिर्दीचा आरंभ झाला? कपिलधार 5. लिंगायत संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून खालीलपैकी यांचा उल्लेख केला जातो महात्मा बसवेश्वर 6. भारुड हा काव्यप्रकार खऱ्या अर्थाने -----यांनी लोकप्रिय केला? संत एकनाथ 7. 'नको-देवराया अंत आता पाहू' अशी आर्त हाक कोणत्या संत कवयित्रीने दिली? संत कान्होपात्रा 8. 'सह्याद्रीवर्णन' या ग्रंथातून यांचे चरित्र साकारले आहे? श्री दत्तात्रेय प्रभू 9. मराठीतील पहिला पद्य ग्रंथ म्हणून त्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो? विवेकसिंधु 10. हरी आणि हर यांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून या देवतेची उपासना वारकरी सांप्रदायिक करतात? श्री विठ्ठल 11. 'चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी' ही विराणी या संताने लिहिली? संत ज्ञानेश्वर 12. 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी' अशी घोषणा कोणत्या संताने केली? संत नामदेव 13. श्रीकृष्णाचे पाचवे अवतार म्हणून यांचा उल्लेख केला जातो? श्री चक्रधर स्वामी 14. कोणत्या राजाने सोनटक्का देण्याचे प्रलोभन दाखवून 'रुक्मिणीस्वयंवर' या ग्रंथावर हक्क सांगितला? राजा रामदेवराय यादव 15. 'सावता सागर प्रेमाचा आगर' अशा शब्दात सावता माळ्याचा गौरव कोणत्या संताने केला? संत नामदेव

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...