मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

मध्ययुगीन व आधुनिक पद्य-I सत्र -१, वस्तुनिष्ठ प्रश्नI

वस्तुनिष्ठ प्रश्न १. मराठीतील आद्य कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? महदंबेस २. स्वामी चक्रधरांच्या गुरूंचे नाव काय होते? श्रीगोविंदप्रभू ३. धवळे म्हणजे --------गावयाचे वरविषयक गाणे किंवा विवाह्गीत होय. लग्नात ४. धवळयाचे किती भाग आहेत? दोन ५. धवाळयाच्या पूर्वार्धात रुक्मिणीहरणाचा कथाभाग येतो, तर उतरार्धात ---------------निवेदन येते. रुक्मिणी स्वयंवराचे ६. महदंबेने धवळे कोणाच्या आज्ञेवरून लिहिले? श्रीगोविंद प्रभूच्या ७. रुक्मिणीच्या वडिलांचे नाव काय होते? भीमक राजा ८. बंधू रुक्मीने रुक्मिणीचे स्वयंवर कोणासोबत करायचे ठरविलेले होते? शिशुपालासोबत ९. काय ऐकिल्यावर भक्तास परमगती प्राप्त होते? कृष्णचरित्र १०. जेणे रुक्मिणी हरीएली तेणे -------केले अद्भुत : पवाडे ११. कृष्णाचा जन्म कोणत्या कुळात झाला होता? यादवकुळ १२. रुक्मिणी वृतांत कोणास विचारते? सख्यांना १३. संत नामदेवांचे जन्मगाव कोणते? नरसीबामणी १४. मराठीतील पहिले पद्य चरित्रकार म्हणून कोणास ओळखळे जाते? संत नामदेव १५. मराठीतील पहिले पद्य आत्मचरित्रकार म्हणून कोणास ओळखळे जाते? संत नामदेव १६. मराठी व ------ भाषेत काव्यरचना संत नामदेवांनी केली. पंजाबी १७. कीर्तन परंपरेचे प्रवर्तक कोणास म्हटले जाते? संत नामदेव १८. शीख धर्मियांच्या ----------- या धर्मग्रंथात संत नामदेवांची ६१ पदे समाविष्ट आहेत. गुरुग्रंथसाहिब १९. संत नामदेवास वारकरी संप्रदायाचे आद्य ---------म्हणून ओळखळे जाते? प्रचारक २०. संत नामदेवांनी ज्ञानदेवाचे आदी, समाधी व ----------या तीन प्रकरणात चरित्र लिहिले. तीर्थावळी २१. ‘पाप्या नावडे संत संगती’ या अभंगात कोणत्या युगाचे वर्णन आलेले आहे? कलयुगाचे २२. लोभी माणसास काय आवडत नाही? उदारवृती २३. व्यभिचारिणी नावडे ------I नावडे ज्योति उजीयेडा I पती २४. लबाड व्यक्तीस काय आवडत नाही? सत्य २५. चांदणे नावडे चोरा I --------नावडे रांडपोरा I सदबुध्दी २६. भक्ती नावडे तया --------- I पुण्य नावडे तया चांडाळा I खळा २७. अब्राम्हणास काय आवडत नाही? कर्म २८. धर्म कोणास आवडत नाही? कृपणास २९. नावडे भजन कैंची कथा कथा I नाही --------------कलियुगी I पतिव्रता ३०. संत नामदेव कलीकाळात काय धरण्यास सांगतात? नामाचा विश्वास ३१. भांडखोर व्यक्तीस काय आवडत नाही? न्याय ३२. ज्ञानेश्वरीचे मुळनाव काय होते? भावार्थदीपिका ३३. चांगदेव पासष्टी हा ग्रंथ किती ओव्यांचा आहे? पासष्ट ३४. अमृतानुभव हा ग्रंथ कोणाचा आहे? संत ज्ञानेश्वर ३५. घनु वाजे घुणघुणा ही संत ज्ञानेश्वर यांची --------आहे. विराणी ३६. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी I कान्हो --------वेगी भेटवा का II वनमाळी ३७. दर्पणामध्ये विरहिणीस काय दिसत नाही? आपले रूप ३८. संत जनाबाईचे जन्मगाव कोणते? गंगाखेड ३९. कोणत्या संताच्या कुटुंबात संत जनाबाईने पंढरपुरास वास्तव्य केले? संत नामदेवाच्या ४०. विठो माझा लेकुरवाळा, संगे -----------मेळा गोपाळांचा ४१. विठ्ठलाच्या मागे कोण चालत आहे? संत मुक्ताई ४२. संत वाटिकेतील कलिका म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? संत जनाबाई ४३. संत चोखामेळा ---------चे राहणारे होते. मंगळवेढा ४४. संत चोखामेळा यांना -----------कडून अद्वैताचा बोध झाला. संत नामदेवा ४५. देवा नाही रूप देवा नाही ----- I देव हा निष्काम सर्वाठाई II नाम ४६. संत --------भारुडांना मराठी वाड्मय निर्मितीत आगळे स्थान आहे. एकनाथांच्या ४७. समन्वयकार म्हणून कोणत्या संतास ओळखले जाते? संत एकनाथ ४८. मनुष्यास कोणता विंचू चावलेला आहे? कामक्रोध ४९. विज्ञानबोध हा ग्रंथ कोणाचा आहे? संत मन्मथ स्वामी ५०. प्राचीन संस्कृत साहित्यातील शिवाचार आणि --------------------- पुरोगामी विचार यांचा सुंदर समन्वय मन्मथ स्वामींच्या साहित्यात आढळतो. महात्मा बसवेश्वरांचे ५१. चंद्राच्या उद्याने कोणास आनंद होतो? चकोर पक्षास ५२. यथार्थदिपिका ग्रंथ कोणाचा आहे? वामन पंडित ५३. राग करू नका I रातांदिवस विवेकाला II या कवितेच्या ओळी कोणाच्या आहेत? संत मन्मथ स्वामी ५४. नटा नामी --------I आपदा चुकवा भयाच्या II शंकराच्या ५५. गाढव शृंगारिले कोडेI काही केल्या नव्हे -------II घोडे ५६. -------------या शाहीरास बाजीराव पेशव्यांचा मोठा आश्रय होता. होनाजी बाळा ५७. घनश्याम सुंदरा ही अमर ------- म्हणून प्रसिद्ध आहे. भूपाळी ५८. भूपाळी म्हणजे ----------वेळी सुरम्य वातावरणात आळवावयाचे सुमधुर गीत होय. पहाटेच्या ५९. वामन पंडित हे ---------कवी आहेत. आख्यान (पंडित) ६०. छंदोमंजरी या ग्रंथाचा कर्ता कोण आहे? शाहीर राम जोशी ६१. महात्मा जोतीराव फुलेंनी अभंग सदृष्य --------काव्यप्रकार हाताळला. अखंड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...