मंगळवार, १२ मे, २०२०

स्वाध्यायासाठी

भाषेचे स्वरूप स्पष्ट करा.
भाषेची वैशिष्टये लिहा.
भाषा ध्वनीरूप असते स्पष्ट करा.
त्या संदर्भाने मुद्दे
 १.भाषेचे अनन्यसाधारणत्व
 २. प्रत्येक माणसाला भाषा आहे. ३. चार कोस पे बदले पाणी आठ कोस पे बदले वाणी
४. भाषा: मानव व मानवेत्तर प्राणी यातील फरक
भाषा
 ५. समाज व्यवहाराचा श्रेष्ठ साधन
६. भाषेसाठी ध्वनी हे माध्यम सोयीस्कर कसे?
७. भाषा अर्जित वस्तू आहे.
 ८. भाषा म्हणजे काय नाही?
९. भाषेच्या अभ्यासकांनी दिलेल्या विविध व्याख्या
१०. मानवी भाषेची वैशिष्ट्ये १.द्विस्तरीय रचना २.निर्मितीशीलता
३. यादृच्छीकता
४.स्थलकालातितता
५. संस्कृती संक्रमण
६. शैलीभेदाची अपरिहार्यता ७.प्रक्रिया, प्रभाव ,अल्पकालता  व क्षणभंगुरता 
८.भाषिक रचनेचे वेगवेगळेपण ९.भाषेचे इतर स्वरूप वैशिष्ट्ये
 -भाषा प्रयत्नसाध्य आहे.
- भाषेला इतिहास असतो. -भाषाही परिवर्तनशील नसते. -भाषा एक सामाजिक सवय आहे.
- भाषा एक सामाजिक संस्था आहे.
 -भाषा ही ध्वनिरूप असते
 -भाषेचे स्वरूप रेखिक असते -भाषा विविध रूपिणी असते -भाषेचे अंतिम पूर्णरूप नसते -भाषा प्रतीकात्मक आहे
-भाषा ही एक पद्धती आहे
-प्रत्येक भाषेचे स्वरूप वेगळे असते.
सारांश:
विस्तृत विवेचनासाठी  भाषाविज्ञान व व्याकरण- प्रा. प्रल्हाद भोपे माझे पुस्तक पहा.
👍प्रमाणभाषा व बोली या घटकावरील संभाव्य प्रश्न:-
१.भाषा आणि बोली यांमधील परस्पर संबंधांची चर्चा करा.
२.बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यातील फरक सांगा.
३. प्रमाणभाषेची कार्यक्षेत्रे कोणती? त्या बाबत सविस्तर लिहा.
४.भाषाविज्ञानाचा प्रमुख शाखांचा परिचय करून द्या.
५.प्रमाणभाषेची वैशिष्टये लिहा
६.वर्णनात्मक भाषाविज्ञान म्हणजे काय ते सांगा.
७. बोलीच्या निर्मितीची कारणे लिहा.

शुक्रवार, १ मे, २०२०

आठवणी

आठवण एक
गावातल्या शाळेतील बालपणीच्या काही आठवणी गमतीदारच आहेत. मी चौथ्या वर्गात होतो. खाकी हाप चड्डी  पांढरा हाप शर्ट हा शाळेचा ड्रेस. तोही एकच. माय तो रात्री रोज धुवायची. या ड्रेसची इस्त्री फक्त झेंड्यालाच पितळेच्या  तांब्यात इस्तव टाकून  मी करायचो. झेंडा इस्त्री असे समीकरणच झालेले होते.
झेडपी शाळा तशी गावाच्या पूर्वेला मारोती मंदिराकडे साईटी च्या कडेला. साईट म्हणजे गावाच्या पूर्वेकडून नदीचे पाणी गावात येऊ नये म्हणून कट टाकलेला.  तेव्हा पाऊस आताच्या पेक्षा बरा होता. नदी दिवाळीपर्यंत वाहायची. शाळा सुटल्यावर पोहायला जाणे हा नित्याचाच क्रम आम्हा संवगड्यांचाअसायचा . मला माझ्या दादांनी बाजारातून एक लाल भोकाभोकाची बनियान आणली होती. तसं नवं काही आणले की मी तेच रोज घालायचा. पोहताना मला नामी युक्ती सुचली. चांभाराचा शंक्या आम्ही पोहतांना रोज गळ पाण्यात टाकून मासे पकडायचा. मासे पकडण्याचे त्याने आम्हाला शिकविले होते पण दादाने मासे धरतांना पाहून झोडपले होते म्हणून तो नाद सोडून दिला होता.  मासे भोकाभोकाच्या बनेलीने पकडावे असे वाटले व पकडले . त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेतील मधल्या सुट्टीत घरी आलो. पोरं मधल्या सुट्टीतून घरीच राहतात म्हणून दप्तर घरी नेऊ दिले जात नव्हते. घरी आल्यावर मी शर्ट काढून ठेवला , भाजी भाकरी खाल्ली व शाळेची घंटा झाल्याने तसेच पळत शाळेकडे सुटलो. वर्गात घुसलो तर सर्व पोरं हसायला लागली . मला काहीच कळेना, नंतर माझे लक्ष माझा अंगाकडे गेले , मी लाल बनियनिवरच शाळेत आलो होतो. तशीच धूम मी घराकडे टाकली. हा प्रसंग अविस्मरणीय ठरला.
आठवण दोन
लहानपणी गावातील चौकात वटयावर आम्ही सवंगडी सायंकाळी जमायचो. इकडच्या तिकडच्या गप्पा रंगायच्या. यात कधीकधी खूप वेळ व्हायचा. भूताच्या गोष्टी तर मी कुतूहलाने ऐकायचो. त्यानंतर घरापर्यंत जायचीहि भीती वाटायची.मागे पुढे पाहत जोरात पळतच घर गाठायचो. त्याचाच विचार करत झोपायचो तर स्वप्नातही भूत पाठ सोडायचे नाही. एकदा असेच एक रात्री भुताच्या गोष्टी ऐकत असता बराच वेळ झाला व्होता. दादाच्या भाकरी शेतात जागलीवर घेऊन जायच्या व्होत्या. शेतात जायचा रस्ता मसनवाट्यातूनच व्होता. हातात बॅटरी घेऊन व डोक्यावर टोपली घेऊन विचारा विचारात निघालो. रात्रीच्या 9.30 टाइम असेल . दादाने नुकतीच रविवारी बाजाराहून लखाणी शिल्पर चप्पल आणलेली होती. ती घालून लगबगीनं निघालो. रस्ता नदीतून होता. नदी नंतर मसनवाटा होता . अन थोड्या वेळापूर्वीच त्याच वाटेने घडलेल्या गोष्टी ऐकल्या होत्या. माझ्या पोटात पाय शिरले. कुत्र्याचं ओरडनंही कानावर आलं. मी रामराम म्हणत झपझप चालायला लागलो.  नदीतून चालताना मागून कोण्ही तरी वाळूचे खडे मारायला लागले. मी जास्तच घाबरलो. चालण्याचा वेग वाढविला तसे जोराने खडे लागायला लागले. आता मी भुताच्या तावडीत सापडलो असे वाटून पाळायला लागलो. दरदरून घाम आला. मी पळत येतोय नक्की म्या भेलो असे दादाच्या लक्षात लांबूनच आले. त्यांनी मला आवाज दिला. तो आवाज ऐकून मी सावरलो. दोन दिवसानंतर कळले की पाठीमागून कोणी भूत खडे मारत नव्हतं शिल्पर चप्पलने खडे मागून लागले होते. ही आठवण मनाच्या कप्यात कायमची राहीली.

आठवण तीन
     आज खूप दिवसांनी जवळा बाजारच्या आठवडी बाजारात वडिलांसोबत गेलो. मला माझ्या बालपणाची बाजार आठवण जागी झाली. माझं गाव उंडेगाव . आमच्या गावाला जवळा बाजारच जवळचा. लहानपणी बाजाराला वडिलांसोबत जाण्यासाठी मी हट्ट करायचो. तसं कोणत्याही गावाला जायला मला खूप आवडायचे. कारण बसमध्ये बसल्यावर शेत , झाडे, फिरलेली दिसायची. आज दिसत नाहीत. प्रवास संपूच नये असं वाटायचं . जवळा बाजाराला कधी बैलगाडीने नालेगाव पेरजाबाद मार्गे जायचो. कधी पायीपायीच जावा लागायचे. तसा बेजारीचाच बाजार होता. दादांना वाटायचे मी बाजाराला येऊ नये. मला मात्र मजा वाटायची. या वाटेनं पूर्णा नदी लागायची. त्या नदीच्या पात्रातून बैलगाडी जातांना जीव मुठीत घेऊन बसायचो. आजही बाजार तसाच होता मी पाचवी- सहावीत असतानाचा. धुळीने माखलेले रस्ते, जिकडेतिकडे मांडलेले पाल, बाजारगर्दी धांदळघाई,  तेव्हासारखंच दादानी आज मला खिचडी भजे खाऊ घातले. मी पण लहान होऊन खाल्ले.  तेव्हासारखीच फिलिंग मला झाली. सारा  लहानपणीचा बाजार आठवला....

अविस्मरणीय आठवण-सुंदरबन
शाळेत असतांना मराठीच्या पुस्तकात सुंदरबनातील वाघांची सभा हा पाठ अभ्यासलेला होता. या सुंदरबनला आपण जाऊ असे बालमनाला वाटलंही होतं.
तो योग IIT खरगपूर  जल व्यवस्थापन विषयावरील कार्यशाळेत सहभागी झाल्यामुळे घडून आला. तसा एवढ्या दूरचा प्रवास मी प्रथमच केला. सोबतही सहकारी मित्र सेलूचे डॉ. रमेश होते.  उन्नत भारत अभियानाच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून ही कार्यशाळा होती. भारतातून सर्व राज्यातून UBA समन्वयक सहभागी झाले होते. जल व्यवस्थापनात आयटी खरगपूर वॉटर रिसोर्सेस विभागाने केलेले प्रयोगाबाबत प्रत्यक्ष  मार्गदर्शन मिळाले. पुढील कार्यास दिशा मिळाली. अनेकांशी  ओळखी झाल्या. महाराष्ट्रातून 10 सहभागी  होते. कार्यशाळा समाप्त झाल्यावर परतीच्या प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षण एका दिवसानंतर होते. तेव्हा कलकत्त्यातील स्वामी विवेकानंद समाधी, रामकृष्ण मिशन बेलूर मठ, दक्षिणेश्वरी मंदिर, हावडा ब्रीज, सायन्स सिटी, व्हिकटोरिया संग्रहालय आदी ठिकाणे पाहिल्यानंतर सुंदरबनला जायचे ठरले. हा प्रवास कारने केला. १२० किमी अंतर होते. प्रदेश अनोळखी, हिंदी, इंग्रजी भाषेत संवाद करीत आम्ही निघालो. कारचा ड्रायव्हर बिहारी राम होता. रस्त्याच्या बाजूने भात शेतीच, पाणी दोन्ही बाजूला मुबलक दिसत होते. नारळाची झाडे, कमळाची मळे न्याहाळीत आम्ही आनंदाने प्रवास करीत होतो. कदाचित भाषा तेवढी कळत नसावी म्हणून ड्रायव्हर बोलत नव्हता. गावे महाराष्ट्रातील गावांपेक्षा अविकसित, दारिद्य्र राहाणीमानावरून लक्षात येत होते. तीन तास प्रवास झाला. गोडखली येथे आम्ही पोहोचलो. वेळ कमी असल्यामुळे दोन ठिकानांना भेटी दिल्या. गंगा, हुगळी, दुर्गा मतला आदी नद्यांचा संगम पाहिला.  या नद्यांच्या कॅनाल ला खळी असे म्हणतात . अशा 28 खळ्या आहेत असे गाईडने सांगितले. 50 km प्रवास बोटीतून केला. आम्ही चार जणांसाठी 40 माणसांची बोट निघाली सुंदरबन पाहण्यासाठी. सुंदरबनचा काही भाग बांग्लादेशाच्या हद्दीत आहे. फॉरेस्ट विभाग व भारतीय नेव्हीच्या बोटींगही गस्त घालतात. त्यामुळेच रस्त्यांनी कारनी येतांना चार चेकपोस्ट वर चोकशी झाली. बोट चालक सरदार याच्याशी गप्पा मारल्या. नद्यांनी वाहून आलेल्या गाळाने ही जमीन तयार झालेली आहे. सर्व दाट झाडांनी वेढलेले जंगल, सभोवती निळाशार पाणी व अख्या बोटीत आम्ही सहा जण अविस्मरणीय होते. मी , रमेश सर, पुण्याचे नाना शेजवल सर त्यांचा मुलगा प्रज्ञेष ,  बोट चालक सरदार आणि मार्गदर्शक अमर आम्ही त्या परिसराबाबत,तेथिल माणसे कशी राहतात, कशी शिकतात याबाबत सरदार सांगत होता. हे बन वाघांसाठी जगात प्रसिद्ध आहे. सर्व किनाऱ्याच्या बाजूने उंच अशी जाळी फॉरेस्ट विभागाने लावलेली आहे. त्याबाबत कळले की, जंगलातून वाघ येऊन पाण्यातून पोहत जाऊन बऱ्याचदा वाघ माणसाची शिकार कारायचा  म्हणून ही व्यवस्था केलेली आहे . आम्ही सकाळी 10 वाजता सुरू झालेला बोट प्रवास सायंकाळी 6 वाजेपर्यंत झाला. थोडा वेळ बोटही चालविली.
प्रल्हाद भोपे 

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...