शनिवार, २ मार्च, २०१९

भाषिक कौशल्ये


१. वाचनाचे महत्व :
१.आकलनासह केलेले ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन होय.
२.वाचनामुळे व्यक्तीमत्वाचा अंतर्बाह्य विकास होतो.
३.वाचनाने वाणीवर सुसंस्कार होतात.
४.वाचनाने सौदर्य बोध व आनंदबोध घ्या दोन्ही साध्य होतात.
५.वाचन क्षमतेचा परिपूर्ण विकास हा त्यातून निघणाऱ्या अर्थनिष्पतीवर अवलंबून असतो.
२.वाचनाची प्रमुख उद्दिष्टे :
१.ज्ञान प्राप्ती :ग्रंथाचे व इतर पुस्तकाचे वाचन केल्यामुळे ज्ञान प्राप्ती होते.
२.आनंदप्राप्ती :आनंदप्राप्तीसाठी उत्तम साहित्याचे वाचन व्हावे.
३.संस्कार :व्यक्तीच्या मनावर चांगले संस्कार वाचनातून होतात.
४.रसास्वाद :कथा,काव्य,कादंबऱ्या ,नाटके ,यातून रसग्रहण दृष्टी लाभते.
५.आनंदवृत्ती :वाचनामुळे मन आनंदाच्या अनुभुतीने भरून जाते.

३.वाचनाची पूर्वतैयारी करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.शारीरिक तयारी :
१.वाचन कौशल्याची शरीरातील ज्ञानेंद्रिय परिपक्व व्हायला हवीत.
२.श्वासावर ताबा असावा.
२.भावनिक तयारी :
१.आवाजात चढ-उतार करण्याची क्षमता यावी.
२.भावनिक समतेसाठी मनाची तयारी हवी.
३.बौद्धिक तयारी :
१.व्यक्ती,वस्तु,स्थल,प्रसंग यांचा सहचर्य समजण्याची क्षमता असावी.
२.मेंदूची संदेश ग्रहण करण्याची तयारी असावी.
४.वाचनाचे प्रकार :
१.प्रगट वाचन :अक्षर ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात.
प्रगट वाचनाचे प्रकार
१.सस्वर वाचन :-स्ववासासाठी केलेल विद्यार्थाने ;वाचन त्यास सस्वर वाचन म्हणतात.
२.सुस्वर वाचन :-विद्यार्थासाठी शिक्षकाने केलेले वाचन यास सुस्वर वाचन म्हणतात.
२.मुकावचन :   लिखित अथवा मुद्रित अक्षर रूप डोळ्याने मेंदूने अर्थग्रहण करणे.
मुकवाचन प्रकार :
१.संदर्भ वाचन :संदर्भ पुस्तकाचे वाचन करणे.
२.सखोल वाचन :एखाद्या ग्रंथाचे वाचन करणे.
३.विस्तृत वाचन :-काव्य,नाटक,मासिके वाचन.
३.गतीवाचन :योग्य गतीने वाचन करण्यास गती वाचन म्हणतात.

५.प्रगट वाचनाचे शिक्षणातील महत्व :
१.उच्चार स्पष्टता :संयुक्त स्वराचे व व्यंजनाचे उच्चार अचूकपणे करणे.
२.ओघ व अस्खलितपणा :एक शब्द किंवा अनेक शब्दाचे योग्य शब्दसमूह करून वाचन करणे.
३.स्वाभाविकता:-वाचन बोलण्यासारखे व्हावे .
४.भावपुर्णता :चेहऱ्यावर हवभाव व आवाजात चढउतार करावा.
६.मुकवाचनाचे शिक्षणातील महत्व :
१.स्वतंत्रपणे आशय समजुत देणे:-
मनोगत वाचन हा प्रगट वाचनाचा प्राण आहे तो स्वतंत्रपणे आशय समजावुन देतो .
२.गती-संगती प्रगती साधने :वाचनाची गती वाढवणे व वाचलेल्याची संगती ओळखणे.
३.यथार्थता :-लेखनाच्या अनुभुतीचा साक्षात्कार पुर्णपणे आपल्याला मुकवाचाने होतो.
७.प्रगटवाचन व मुकवाचनातील फरक :
१.अक्षर रूप ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात व लिखित अथवा मुद्रित अक्षर डोळ्याने पाहून नंतर मेंदूने अर्थग्रहण करण्यास मुकवाचन म्हणतात .
२.प्रगट वाचनाचे सस्वर वाचन व सुसस्वर वाचन दोन प्रकार आहेत व मुकवाचनाचे संदर्भवाचन सखोलवाचन विस्तृत वाचन होण्यास मदल होते.
३.प्रगट वाचनचे शक्षणात उच्चार स्पष्टता ,ओघव अस्खलीतपणा ,स्वाभाविकता भावापुर्णता साधन येते व मुकवाचनाने शिक्षणात स्वतंत्रपणे आशय समजावून देणे,गती संगती प्रगती साधने ,यथार्थता इत्यादी गुण येतात.
४. प्रगट वाचन भाव व विचाराचे प्रगटीकरणकरण होते .व मुकवाचनने शांतता व चीतंशीलता या वृत्तीची जोपासणा करता येते.
५.प्रगट वाचन इतरांना आनंद देते व मुकवाचन स्वान्त सुखाय असते .
६.प्रगटवाचनाचा वेग कमी असतो व मुकवाचनाचा वेग अधिक असतो .

८.वाचनातील दोष व त्यावर उपाय :
१.अस्पष्ट आवाजात वाचन करणे :-दैवत-देवत.
२.चुकीचे उच्चारण : श,ष,स.
३.उच्चार भेदाचे अज्ञान वाचा व दृष्टीदोष .
४.वाचनातील अशुध्दता :तीर्थ ,तिर्थ.
५.अपूर्ण शब्द उच्चारण .
६.अडखळत वाचणे हेलकाढून वाचणे .
७.चुकीच्या जागी शब्द तोडून वाचणे.
८.शब्द गाळणे नवीन शब्द टाकून वाचन करणे.

९.वाचन कौशल्यात शारीरिक व्यंगामुळे निर्माण झालेल्या उणीवा व उपाय .
नाक,कान,डोळा,जिव्हा,दात :-डॉक्टर कडून करणे.
१०.वाचनातील योग्य आसनबंध :
१.पाठीचा कणा ताठ असावा.
२.प्रकाश डावीकडून यायला हवा.
३.दृष्टीच्या पातळीशी ४० अंश कोन करणे.
४.पुस्तक व नजर यात ९ ते १२ इंच अंतर आहे.
५.झोपुन वाचणे घातक आहे.
६.पुस्तक वाचताना संपूर्ण उघडणे डावाहात खाली ठेवणे.
७.इतर काम करतांना पुस्तक वाचू नये.
८.उभे राहून पुस्तक वाचतांना दोन्ही पायावर सरळ भार द्यावे .
११.निकोप वाचन सवयी :
१.पुस्तकावर खुणा करू नये.
२.पुस्तकाला कव्हर घालावी .
३.वाचलेल्या पुस्तकातील मुद्दे वहीत नोंदवी .
४.दुसऱ्याचे अथवा ग्रंथालयाचे पुस्तक वेळेवर नेऊन द्यावे.
५.वाचनलेले पुस्तक कपाटात बंद करू ठेवावे.
६.वाचलेल्या पुस्तकावर स्वताचा अभिप्राय तयार करणे.
१२.वाचन कौशल्य विकासाठी उपक्रम :
१.भिन्न-भिन्न प्रकारचे वाचन तक्ते दाखवणे अर्थ स्पष्ट करणे.
२.कार्डस ,कृतीदर्शक चित्रे दाखवणे.
३.टेपरेकॉर्डर च्या माध्यमातुन स्पर्धा घेणे .
४.भाषेचे खेळ व पाठांतर स्पर्धा घेणे.
५.भेंड्या व व्याकरणाचे खेळ घेणे .
६.अवांतर वाचन करायला लावणे.

१३.परिणामकारक वाचन कौशल्याची वैशिष्टे :
१.सुस्पष्ट वाचन : प्रत्येक अक्षराचा व शब्दाचा उच्चार सुस्पष्ट होणे आवश्यक आहे.
२.योग्य आरोह -आवरोह : उतार –चढाव होय.
३.स्वराघात : स्वरावर जोर देणे.
४.गती :योग्य गतीने वाचन करणे.
५.लय : काव्य वाचनाचे महत्वाचे लक्षण लय आहे.
६.योग्य हवाभाव :-डोळे ,भुवया ,मान,हाताची हालचाल.

लेखनकौशल्य

वाचनाने ज्ञान वाढते, सभेत बोलल्याने माणूस हजरजबाबी होतो, मात्र लिहिण्याने माणसाचा विचार नेटका व काटेकोर होतो- बेकन (तत्त्ववेत्ता).
वाचनाने ज्ञान वाढते, सभेत बोलल्याने माणूस हजरजबाबी होतो, मात्र लिहिण्याने माणसाचा विचार नेटका व काटेकोर होतो- बेकन (तत्त्ववेत्ता).
भाषिक कौशल्यांच्या पायऱ्या
लेखन कौशल्य
वाचनकौशल्य
भाषण-संभाषण कौशल्य
श्रवणकौशल्य
हा बेकन या तत्त्ववेत्याचा विचार आणि बाजूला दाखविलेल्या पायऱ्या पाहिल्या की लक्षात येईल, की लेखनकौशल्य प्राप्त करण्यापूर्वी आधीच्या तीनही पायरऱ्या यशस्वीपणे चढाव्या लागतील. आधीची तीनही कौशल्ये व्यवस्थितपणे आत्मसात करावी लागतील. कारण लेखनात आत्माविष्कार प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य असते. ‘लेखन’ हे साधनही आहे, आणि लेखनकौशल्य प्राप्त करणे ही ‘साधना’ ही आहे. ती साधना योग्य मार्गाने व दिशेने होणे आवश्यक आहे, त्यासाठी काही किमान तांत्र‌िक बाबींचा स्वीका‍र, आंगीकार विद्यार्थ्यांनी आवश्य करावा-
> आपले अक्षर फार मोठे अथवा फार बारीकही नसावे.
> अक्षरांवर शिरोरेषा द्याव्यातच. त्याने अक्षरांचे आणि शब्दांचे सौंदर्य वाढते.
> आपली अक्षरे सुवाच्य, सुंदर योग्य वळणाने लिहिलेली असावीत.
> दोन अक्षरे, दोन शब्द, दोन ओळीत योग्य अंतर असावे.
> लेखनात आवश्यक असणारी योग्य गती तर हवीच, त्यात सातत्यही हवे.
या तांत्र‌िक (टेक्निकल) गोष्टी आपण स्वत:मध्ये आणि विद्यार्थी-पाल्यांमध्येही सवय म्हणून मुरवल्या पाहिजेत. नव्हे, त्या पाचही उत्तम भाषिक सवयी आहेत, हे स्वत:च्या मनात रूजवावे.
लेखनकौशल्याची सुरूवात लिपिज्ञानाने होते. ज्यात सर्वप्रथम स्ट्रोक्स (ज्यात उभ्या आडव्या तिरप्या रेषा काढण्याची दिशा महत्त्वाची असते) वळणे- (वर्तुळ, अर्धवर्तुळ, वेलांट्या आणि सर्व वळणे काढण्याचा क्रम, वळण रेखाटण्याची दिशा महत्त्वाची असते) या सर्व गोष्टींच्या मदतीने लिपिज्ञान होते. ही लेखन कौशल्याची सुरूवात आहे, खरेतर चारही भाषिक कौशल्यांमध्ये ‘लेखन’ हे शिखरीभूत कौशल्य आहे असे म्हणतात. म्हणजेच लेखन कौशल्य ही सर्वात वरची पायरी किंवा सर्व कौशल्यांचा कळस आहे. लेखन कौशल्य उत्तमरितीने प्राप्त झाले, म्हणजे सर्व भाषिक कौशल्ये प्राप्त झाली असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. कारण थोर विचारवंत श्री.शिवाजीराव भोसले यांच्या मते- ‘‘लेखन ही अक्षरक्रीडा आहे, ती आनंदाने करता यावी.’’
लेखनाचे टप्पे
लेखन कौशल्य काही सगळ्यांना हातात लेखणी घेतल्याबरोबर प्राप्त होत नाही. ते टप्प्याटप्प्या विकसित होणारे कौशल्य आहे. त्याचे महत्वाचे तीन टप्पे आहेत.
> हस्ताक्षर (सुवाच्य ते वळणदार)
> शुद्धलेखन(ऱ्हस्व,दीर्घ, ऋकार, रफार, विसर्ग, विरामचिन्हे)
> लेखन प्रकारांनुसार स्वत:चे स्वतंत्र लेखन.
या तीनही टप्प्यांना सारखेच महत्त्व आहे. कारण लेखनाची सुरूवातच अक्षरलेखनापासून होते. ते त्या वेळीच ‘सुवाच्य’ म्हणजे सहज वाचता येईल ह्या पातळीपासून, ‘वळणदार’ म्हणजे अक्षर लेखनासाठीचे स्ट्रोक्स आणि वळणे योग्य दिशेने देऊन काढलेले सुंदर अक्षर याा पातळीपर्यंत विकसित करण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. ही एक आयुष्यभरासाठी केलेली फार मोठी गुंतवणुक असते. पुढे संपूर्ण आयुष्यभर तुमचे हे सुंदर हस्ताक्षर तुमच्या उत्तम व्यक्तिमत्वाचा महत्वाचा गुण म्हणून अनेक फायदे मिळवून देणारा असतो.
दुसरा टप्पा आहे शुद्धलेखन. हस्ताक्षर छान वळणदार झाले ; की मग आपल्या शुद्धलेखनाकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरूवात करावी. काना, मात्रा, वेलांटी, उकार, ऋकार, रफार, विसर्ग आणि विरामचिन्हे यांच्याकडे लक्ष असावे म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व विकासात आणखी एक मानाचा तुरा खोवला जातो. कारण ऱ्हस्व-दीर्घांच्या चुका नसलेले, विरामचिन्हांचा योग्य वापर करून लिहिलेले लिखाण वाचणाऱ्याच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण करणारे असते. मग तो साधा रजेचा अर्ज असो , वा कुणाला पाठवलेले पत्र असो !
तिसरा टप्पा हा भाषाविकसनाच्या दृष्टीने थोडा अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण. इथे आपण खऱ्या अर्थानी लेखनकौशल्याचा वापर करणार असतो. इतरांचे लेखन, साहित्यीकांचे साहित्य, विविध वाङ्मयप्रकारांची आपण ओळख करून घेतघेत भाषाशिक्षणात पुढे जात असतो. त्या बरोबरच आपणही असेकाही लिहावे हे अपेक्षित असते, किंबहुना आपल्यालाही असे काही आपल्या मित्रमै‌‌त्र‌िणींना, नातेवाईकांना, शिक्षकांना, वर्गमित्रांना सांगावे वाटते. काही मुले तसे लिहिण्याचा चांगला प्रयत्नही करतात. असा प्रयत्न करणे, हेच भाषाशिक्षणात अपेक्षित असते. आपले विचार, मत ,भावना आपल्या भाषेत योग्यरितीनी लिहिता अथवा सांगात येणे ; म्हणजेच भाषेचा वापर करता येणे ! हा तिसरा टप्पा म्हणजे भाषेचा प्रभावी वापर करण्याचा टप्पा आहे. ज्यामध्ये पत्रलेखन (कौटुंबिक पत्र आणि कार्यालयीन पत्रे)अर्ज लिहिणे, परिच्छेद लेखन, जाहिरात लेखन, निबंधलेखन, वैचारिक लेखन, वर्णनात्मक लेखन, कल्पनाविस्तार, संवादलेखन, वृत्तान्त लेखन, सारांश लेखन, स्वानुभव ‌किंवा आत्मकथनात्मक लेखन आणि रसग्रहणात्मक लेखन. अशा चढत्याक्रमाने ‘अनुभवग्रहण’ ते ‘अनुभव कथन’ असा हा लेखनप्रवास असतो, आणि तो तसा, त्या क्रमानेच व्हावा हे भाषाशिक्षणात अपेक्षितही असते. ‘मराठी’ ही माझी ‘मातृभाषा’ आहे, तर मला हे जमलेच पाहिजे, हा निग्रह आपल्या मनात असावा. आणि त्या दृष्टीने आपण सतत प्रयत्नशील राहाणे आवश्यक आहे.
भााषण-संभाषण

भाषणाचे महत्व :
१.बोलणाऱ्याच्या शब्दामधून होणारे त्याच्या मनोवृत्ती व विचाराचे अर्थपूर्ण प्रगटीकरण म्हणजे भाषण होय.
२.यशस्वी जीवनाचे लक्षण असते भाषण क्षमतेचा संपूर्ण विकास.
३.आपला योग्य विचार स्पष्टपणे सांगुन जन्मत आपल्या बाजुंनी वळवता येते.
४.बोलणे हे आत्माविष्काराचे प्रमुख व प्रभावी साधन आहे.
५.भाषणाचे प्रकार :
१.स्वगत भाषण :विचार हे मनोगत भाषण असते.
२.प्रगत भाषण : सभेतील व्याख्यान प्रगट भाषण असते.
२.भाषणाचे व्यावहारिक उद्दिष्टे :
१.आत्माविष्कार :आपल्या मनातील विचार ,कल्पना,भावना दुसऱ्याला सांगणे .
२.आनंदप्राप्ती:आपली सुख व दुखे दुसऱ्याला सांगुन आनंद मिळवणे.
३.संदेशपोहचवणे:आपला निरोप दुसऱ्याला भाषेद्वारे पोहचवणे.
४.स्वमतप्रचार : आपली मते इतरापुढे मांडणे.
५.सृजन शक्तीला प्रोत्साहन :शब्दाच्या उच्चारातून अर्थ छटाची निर्मिती करणे.
६.अंतरक्रिया : एकमेकाच्या विचाराचा मेळ घालणे.

३.बालकाच्या जीवनात आत्मविष्काराला महत्वाचे स्थान आहे:
१.आपल्या मनातील विचार,कल्पना,भावना व्यक्त करण्यासाठी भाषण कौशल्य आवश्यक आहे.
२.कानावर पडणाऱ्या प्रत्येक शब्द मुलांचा नवा अनुभव असतो.
३.बालक भाषण कौशल्याकडून अत्माविष्काराची गरज भागवते.
४.बालक आपल्या मनातील विचार ,कल्पना,भावना व्यक्त करते म्हणून बालकाच्या जीवनात आत्माविष्काराला महत्वाचे स्थान आहे.
४.संभाषणाचे प्रकार :
१.अनौपचारिक संभाषण :
२.औपचारिक संभाषण :

१.अनौपचारिक संभाषण :संभाषणाची भाषा जेव्हा घरेलू असते तेव्हा त्याला अनौपचारिक संभाषण म्हणतात.
१.कौटुंबिक संवाद : कुटुंबातील व्यक्ती-व्यक्ती एकत्र येऊन आप-आपली विचार व्यक्त करतात.
२.गप्पा गोष्टी :मनातील विचार,कल्पना,भावना मुक्तपणे व्यक्त होतात.
३.गाणी ,पाठांतर ,भेंड्या ,अंताक्षरी ,कोडी ,उखाणी: भाषा शुध्द होण्यासाठी मदत होते.
४.संदेश पोहचविणे : आपला निरोप दुसऱ्याला भाषेद्वारे पोहचवणे .

२.अनौपचारिक संभाषण : दोन अपरिचीत व्यक्ती जेव्हा पहिल्याच वेळेस एकमेकांना भेटतात व संभाषण करतात त्याला अनौपचारिक संभाषण म्हणतात.
१.वर्णन : व्यक्ती ,वस्तु ,स्थल,प्रसंग याचे चित्र उभे करण्यासाठी भाषण करणे व मुलाची जिज्ञासा वाढविणे.
२.कथन :घटना ,इतिहास,चरित्र्य,कथा याचे कथन करणे व कथनाला रसभरीतपणा हा गुण आवश्यक आहे.
३.चर्चा : एखाद्या विषयाचे विविध पैलु उलगडून दाखवणे प्रत्येकाने आपले विचार व्यक्त करणे .
४.निवेदन : स्वता जाणुन घेणे नंतर दुसऱ्याला सांगणे त्यास निवेदन म्हणतात.
५.स्पष्टीकरण :कविताच्या पंक्ती,सुभाषिते ,वाक्यप्रचार ,म्हणी ,कठीण शब्दाचे अर्थ स्पष्ट करण्यासाठी स्पष्टीकरण करणे.
६.व्याख्यान : सभेत श्रोत्यांना उद्देशुन केलेले भाषण यास व्याख्यान म्हणतात व व्याख्यात हा बहुश्रुत विद्वान असतो.
७.संवाद : दोन किंवा अधिक व्यक्ती एकमेकांना बोलतात त्यांना संवाद म्हणतात व नाट्यीकरण संवाद लेखन करावे लागते.
८.वादविवाद :एकाच प्रश्नाची दोन उतरे असल्यास योग्य उत्तर कोणते ?यासाठी वादविवाद घातला जातो.
९.मुलाखत :एकाद्या व्यक्तीच्या व्यवसाय संबंधी माहिती विचारणे .
१०.चित्रचर्चा : मुले चित्रकाराच्या चित्राचे उत्तर आपल्या कल्पने नुसार देतात.


५.संभाषण कौशल्याची सहा अंगे :
१.उच्चार :उच्चार स्पष्ट असावे.
१.अनुस्वार : चिंता –चिता.
२.आकार:अजन्म –आजन्म .
३.ऱ्हस्वदिर्घ: सुत-सूत
४.वर्णाची उच्चारस्थाने :कंठ,तालव्य,मुर्धव्य,दंत्य ,ओष्ठ .
२.स्वराघात :मी पुस्तक वाचतो,मी पुस्तक वाचतो.
३.विराम : मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी.
४.स्वरातील चढउतार :योग्य आरोह ,अवरोह होय.
५.गती व उंची : दीड डार्ल कुटार .
६.व्यंजन भेद :श,ष,स, व ड. ण,न,
६.भाषणातील उणीवा व त्यावर उपाय :
१.शारीरिक पातळीवरील उणीवा :
१.जीभ जाड असणे.
२.पडजीभ टाळूला चिकटणे.
३.ओठ फाटलेले असणे.
४.दांताचे वेडी वाकडी वाढ.
५.नाकाचे हाड अयोग्य रीतीने वाढणे.
उपाय : डॉक्टरला दाखवून दोष दूर करणे.

२.मानसिक अस्वास्थामुळे :
१.तोतरेपणा
२.हेलकाढून बोलणे.
३.वाक्य अर्धवट उच्चार करणे.
उपाय :आत्मविश्वास निर्माण करणे.

३.अज्ञानातून निर्माण झालेल्या उणीवा :
१.अस्पष्ट आवाजात भाषण करणे.
२.चुकीचे उच्चार करणे.
३.उच्चार भेदाचे अज्ञान वाचा जिव्हा दोष .
४.भाषणातील अशुद्धता .
५.अपूर्ण शब्द उच्चारण .
६.अडखळत बोलणे हेलकाढून बोलणे.
७.चुकीच्या जागी शब्द तोडुन बोलणे.
८.शब्द गाळणे नवीन शब्द वापरून बोलणे.
उपाय :शिक्षकाने रोजच्या अध्यापनातून ही दोष दूर कर करता येतात.
७.भाषण कौशल्यात मौखिक कार्याचे महत्व :
मौखिक कार्य : बोलणे हे एक मौखिक कार्य आहे.
१.संभाषण :अनौपचारिक व औपचारिक .
२.वादविवाद :एकाच प्रश्नाची दोन उत्तरे असल्यास योग्य उत्तर कोणते ? यासाठी वादविवाद घातला जातो.
३.चर्चा : एखाद्या विषयाचे विविध पैलू उलगडून दाखवणे प्रत्येकाने आपली मते व्यक्त करणे.
४.संवाद :दोन किंवा अधिक व्यक्ती एकमेकांना बोलतात त्यांना संवाद म्हणतात.

८.भाषण –संभाषण कौशल्यासाठी उपक्रम :
१.मौखिक कार्य :संभाषण ,वादविवाद,चर्चा संवाद याच्या माध्यमातून मौखिक कार्य घडते.

२.भाषा व्याकरणाचे खेळ :
१.एका वर्ण अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाची सूची बनविणे.
२.सामान्य ध्वनी शब्द वेगळे करणे.
३.वस्तुची सुची बनविणे.
४.कथा सांगणे.
५.एखाद्या विषयाचे वर्णन करणे.
६.वक्तृत्व स्पर्धा घेणे.
७.अंताक्षरी स्पर्धा घेणे.
८.कविता व गायन स्पर्धा घेणे.
९.समानार्थी शब्दाचा संग्रह करणे.
१०.विरुद्धार्थी शब्दाचा संग्रह करणे.

३.कथा-कथन : कथा सांगणे,चित्राचे वर्णन करायला लावणे,बाजाराचे उत्सवाचे वर्णन करायला लावणे.
४.अवसर :विद्यार्थाला ,घरी व शाळेत आपल्या मनातील विचार ,कल्पना ,भावना मांडण्याचा मोका देणे .
९.बालवाडीत गोष्ट सांगण्याचे उद्देश :
१.बालकाला अवधान पूर्वक ऐकण्याची सवय लावणे.
२.बलाकाचे मनोरंजन करणे.
३.बालकाला चांगल्या सवयी लावणे.
४.बालकावर चांगले संस्कार करणे.
९.बलासभा घेण्याचे हेतू :
१.बालकांचा परस्परांशी परिचय होतो .
२.बालकाची भीती कमी होते.
३.बालकाला शिक्षकाबद्दल आपुलकी निर्माण होते.
४.त्याचे मन शाळेत रमते.
५.बालकाचे मन मोकळे पणाने आपले विचार ,कल्पना ,भावना मांडते.

३ टिप्पण्या:

NKT LRC म्हणाले...

माननीय सर,
आपण केलेले सदरचे लेखन हे खूप छान आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील बी. ए. प्रथम वर्ष यासाठी खूप उपयूक्त आहे.
राजेश भालचन्द्र लुळे
म-9769897617

Unknown म्हणाले...

Ok

Unknown म्हणाले...


मूक वाचन हा कोणत्या भाषिक कौशल्याचा प्रकार आहे

टिप्पणी पोस्ट करा

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...