बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या.
संत जनाबाई
जन्मअंदाजे इ.स. १२५८
गंगाखेड
मृत्यूअंदाजे इ.स. १३५०
राष्ट्रीयत्वभारतीय
नागरिकत्वभारतीय
वडीलदमा
आईकरुंड

जीवन

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्यागातात.

बालपण

परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.

आयुष्य

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.
‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.[१]
संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंगसकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.
संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)
संतांनी विठोबाला ‘माउली’ असे म्हंटले आहे, अर्थातच ही संतमंडळी त्याची आवडती ‘लेकरे’ झाली. अशा या लेकुरवाळ्या विठ्ठलाचे वर्णन खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यात संत जनाबाईंनी हे वर्णन केले असल्यामुळे त्यांच्या काळामधले निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरा कुंभार, चोखा मेळा, जीवा, बंका आणि नामदेव यांचे उल्लेख या अभंगात आहेत. संत एकनाथ आणि संत तुकाराम हे त्यानंतरच्या शतकांमध्ये होऊन गेले. या अभंगाच्या शेवटी ‘जनी म्हणे’ असे लिहिले असले तरी ‘नामयाची जनी’ अशी त्यांची नेहेमीसारखी सही नाही. कदाचित “संत जनाबाईंनी असा विचार केला असेल” अशी कल्पना करून हा अभंग आणखी कोणी तरी लिहिला असेल.
विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।
निवृत्‍ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी ।।१।।
पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्‍ताबाई सुंदर ।।२।।
गोराकुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ।।३।।
बंका कडेवरी, नामा करांगुली धरी ।।४।।
जनी म्हणे गोपाळा, करी भक्‍तांचा सोहळा ।।५।।

जनाबाईंवरील पुस्तके/व्हीडिओ/चित्रपट

 • ओंकाराची रेख जना (चरित्रवजा कादंबरी; लेखिका - मंजुश्री गोखले)
 • संत जनाबाई (लेखन - संत जनाबाई शिक्षण संस्था; प्रकाशन - डायमंड पब्लिकेशन्स)
 • संत जनाबाई (सुहासिनी इर्लेकर|डाॅ. सुहासिनी यशवंत इर्लेकर]]; पुस्तक आणि त्याची पीडीएफ आवृत्ती; महाराष्ट्र सरकार प्रकाशन)
 • संत जनाबाई चरित्र (बालसाहित्य; लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)
 • संत जनाबाई जीवन चरित्र (व्हीडिओ; दिग्विजय बाबर)
 • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट; लेखन, दिगदर्शन - राजू फुलकर)
 • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट (१९४९); दिग्दर्शक - गोविंद बी. घाणेकर; प्रमुख भूमिका - हंसा वाडकर)
 • संत जनाबाई अभंग गाथा (संपादक - नितीन सावंत)
 • संत जनाबाई - अभंग संग्रह १ ([१])
 • संत जनाबाई - अभंग संग्रह २ ([२])

प्रकाश आमटे माहिती

प्रकाश आमटे
Prakash Amte.jpg
जन्मप्रकाश आमटे
26 december 1948
निवासस्थानहेमलकसागडचिरोली जिल्हाभारत
राष्ट्रीयत्वभारतीय
नागरिकत्वभारतीय
शिक्षणएमबीबीएस, एमएस
प्रशिक्षणसंस्थामहात्मा गांधी मेडिकल कॉलेज
पेशासमाजसेवा
कार्यकाळ१९७३ पासून
धर्महिंदू
जोडीदारमंदाकिनी आमटे
अपत्येदिगंत,अनिकेत,आरती
वडीलमुरलीधर देवीदास आमटे
आईसाधना आमटे
पुरस्कारमॅगसेसे पुरस्कार; श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराने फलटण येथे सपत्‍नीक सन्मानित
संकेतस्थळ
http://www.lokbiradariprakalp.org/

प्रकाश आमटे बिबट्यासह

परिचयसंपादन करा

प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे (माहेरच्या डॉक्टर भारती वैशंपायन) यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडतालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.
लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल अधिक माहितीसाठी http://www.lokbiradariprakalp.org/

डॉ. प्रकाश आमटे यांची पुस्तकेसंपादन करा

 • प्रकाशवाटा (२०१३ सालापर्यंत २५ आवृत्त्या)
 • रानमित्र (२०१३)

चित्रपटसंपादन करा

डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णीमोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.
याशिवाय त्यांच्या जीवनावर ’हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आहे. हा चित्रपट कदाचित ऑस्करला पाठवण्यासाठी निवडला जाईल

प्रकाश आमटे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा

 • १९८४ - आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र सरकार
 • इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ’डॉ. एम.जे. जोशी आय.एम.ए.भूषण’ पुरस्कार
 • २००९ - गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार
 • २००२ - पद्मश्री पुरस्कार, भारत सरकार
 • २००८ - मॅगसेसे पुरस्कार
 • २०१४ - मदर तेरेसा पुरस्कार
 • श्रीमंत मालोजीराजे स्मृति पुरस्कार
 • २०१२ - लोकमान्य टिळक पुरस्कार
 • पिंपरी (पुणे) येथील संस्कार प्रतिष्टानतफे श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार (२०१७)
 • आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा सन्मान समारंभ (१२ डिसेंबर २०१८)

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

राष्ट्रीय सेवा योजना-युवा चळवळ

आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे.

maharashtra-times
   
प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ/ प्रा. रवींद्र अशोक आहिरे
युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय.
राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते.

डॉ. डी. एस. कोठारी शिक्षण आयोगाने शिक्षणाच्या सर्वच टप्प्यांवर विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जावा, अशी शिफारस १९६४-६६ दरम्यान केली आणि १९६७ मध्ये राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेत एनसीसीसोबत एनएसएस असावे हे मान्य झाले. त्यानंतर कुलगुरूंच्या परिषदेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वागत होऊन २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तेव्हाच शिक्षणमंत्री व्ही. के. आरव्ही राव यांनी देशातील ३७ विद्यापीठांत प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. आज देशातील हजारो महाविद्यालये व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी झाले आहेत. २४ सप्टेंबर हा ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ म्हणून साजरा केला जातो.

‘Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आजचा स्वयंसेवक हा बोधचिन्हाच्या आठ आरेनुसार अष्टौप्रहर समाजसेवेसाठी बांधील आहे व लाल रंग हे तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठी असल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा, यासाठी राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर या दोन उपक्रमांद्वारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य करीत आहे. नियमित कार्यक्रमांद्वारे महापुरुषांचे विचार हे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमातून घेऊन श्रमदान, युवा सप्ताह, कार्यशाळा, शिबिर, सरकारच्या विविध कार्यक्रमांत सहभागी होतात.

महात्मा गांधींचा ‘खेड्याकडे चला’ हा विचार घेऊन गावांमध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरांमार्फत निर्मलग्राम, सर्वांगीण व शाश्वत ग्रामविकास, चर खोदणे, रस्ते बांधणी, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, रक्तदान आदी कार्य श्रमदान, पथनाट्य, रॅली, उद््बोधक चर्चा, शिवारफेरी, गावकरी संवाद या माध्यमांतून समाजाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात युवाशक्ती वा ऊर्जास्त्रोत पुरविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह हे या उपक्रमाचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करतात. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना हा भारत सरकारचा अभिनव उपक्रम आहे.

अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठे तरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे. पर्यावरणासंबंधी वृक्षारोपण, सीसीटीव्हीचे काम, ग्रीन ऑडिट, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता, निर्माल्य संकलन, जलसाक्षरता, समाजाप्रती कन्यारत्न वाचवा अभियान, आर्थिक, कौटुंबिक व शैक्षणिक सर्वेक्षण आदी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची ही युवा चळवळ अखंड सुरू राहावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मूलभूत योजनांचा सतत प्रचार व प्रसार या युवा चळवळीच्या माध्यमातून करीत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची ही युवा चळवळ राष्ट्र व समाजासाठी तत्पर व सक्षम व्हावी, यासाठी तो कवी दिलशादच्या ओळी म्हणत आपला उद्देश मांडतो.

उठे समाज के लिए उठे उठे

जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे

स्वयं सजे वसुंधरा संवार दे

स्वयं सजे वसुंधरा संवार दे| 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...