गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

स्त्रीवादी साहित्य स्वरूप व परंपरा

स्त्रीवादी मराठी साहित्य


मराठी साहित्यात साधारणतः १९६० नंतरच्या दशकांत स्त्रीवादी साहित्य जाणीवपूर्वक लिहिले जाऊ लागले आणि सत्तर-ऐंशीच्या व नंतरच्या दशकांतही स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह काव्य, कथा, कादंबरी अशा प्रकारांत जोमाने विकसित होऊ लागला. मात्र तत्पूर्वीही स्त्रीकेंद्री साहित्याची निर्मिती अगदी प्राचीन काळापासून मौखिक वा लिखित स्वरूपात होत होती, असे दिसून येते.
स्त्रियांच्या साहित्याचे मूळ प्राचीन काळापर्यंत जाऊन पोहोचते. स्त्री आपल्याशीच किंवा आपल्यासारख्याच दुसरीशी चाललेल्या संवादातून‘बाई असण्याचा ’, ‘ बाईपणाचा ’ अर्थ व्यक्त करीत आली आहे. मराठी लोकगीतां त हा स्त्रीत्वाचा स्वर सतत ऐकू येतो. अन्याय, बंधने, शिक्षा, दंड, तक्रार, शोषण, पुरुषांकडून मिळणारी अन्यायकारक व अपमानास्पद वागणूक, सततची अवहेलना व उपेक्षा, अपाय, इजा, आपल्याकडून चूक वा अपराध घडेल का ह्याची स्त्रीला वाटणारी धास्ती इ. स्त्रियांच्या अनु-भवविश्वाच्या कक्षेतील अशा अनेक भावना आणि तथ्ये त्यांनी लोकवाङ्मयातून शब्दांकित केलेली दिसतात. समाजाने दुर्लक्षित केलेले हे वाङ्मय स्त्रीवादी समीक्षकांनी शोधून त्यावर नवा प्रकाश टाकला आहे. मराठीत तारा भवाळकर, कुमुद पावडे, सरोजिनी बाबर इत्यादींनी लोकगीतांचे संशोधन केले आहे.
महाराष्ट्रातील  महदंबा,  मुक्ताबाई,  जनाबाई इत्यादींनी तसेच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ताराबाई शिंदे,  पंडिता रमाबाई,  लक्ष्मीबाई टिळक इ. लेखिकांनी ललित व वैचारिक पातळीवर स्त्री-पुरुष विषमतेचे, पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेचे, तसेच स्त्रियांवरील अन्याय, जुलूम, शोषण व त्यांतून स्त्रियांना भोगावी लागणारी दुःखे, वेदना यांचे  प्रभावी चित्रण केले.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुषतुलना ह्या ग्रंथात पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या होत असलेल्या  शोषणाविरुद्ध लिहून, स्त्रीशोषणाचे विश्लेषण करणारी सैद्धांतिक मांडणी केली. मालतीबाई बेडेकर म्हणजेच विभावरी शिरूरकर यांच्या लिखाणातही ( हिंदोळ्यावर, १९३४ — कादंबरी ) पुरुषाकडून स्त्रीच्या  शारीरिक व मानसिक पातळीवर होत असलेल्या शोषणाची जाणीव व्यक्त झाली आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘ भरली घागर ’ कवितेत स्त्री-पुरुष भेदावर भाष्य आहे, तर स्मृतिचित्रे ( ४ भाग;१९३४,१९३५, १९३६ ) मध्ये विनोदाच्या, उपरोधाच्या अंगाने स्त्री-पुरुष विषमतेचे चित्रण आहे. व्हर्जिनिया वुल्फचा सिद्धांत — स्त्रियांनी उपरोध, विनोद ही शस्त्रे वापरून आपल्या व्यथा,शोषण,अन्याय यांना वाचा फोडावी — इथे मराठीत प्रत्यक्षात आला आहे. अलीकडच्या काळात मंगला गोडबोले यांच्या लिखाणातही पुरुषप्रधान व्यवस्थेतील रूढी, परंपरांचा निषेध करताना विनोद, उपरोध यांचा वापर केला आहे.
विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यात कमल देसाई, गौरी देशपांडे, शांता गोखले, कविता महाजन, प्रिया तेंडुलकर,  सानिया ( सुनंदा कुलकर्णी ), मेघना पेठे, नीरजा यांच्या कथा कादंबर्‍यांनी मोलाची भर घातली आहे. कमल देसाईंच्या काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई (१९७५) या कादंबरीत प्राचीन मिथ्यकथांना नवे स्त्रीवादी अर्थ दिले आहेत. काळा सूर्य या कादंबरीची नायिका शेवटी गावातील पुरातन मंदिर तोडून टाकते आणि स्वतःही मरते. हे गिल्बर्ट-ग्यूबरच्या ‘ मॅडवुमन ’ प्रतिमेचे मराठीतील उदाहरण म्हणता येईल. अरुणा ढेरे, गौरी देशपांडे, श्यामला वनारसे यांनी त्यांच्या साहित्यकृतींतही प्राचीन पुराणकथांचे स्त्रीवादी दृष्टि-कोणातून नवे अन्वयार्थ लावले आहेत. गौरी देशपांडे यांच्या कथा--कादंबर्‍यांत स्वतंत्र, मुक्त, प्रगल्भ स्त्रीची अनेक रूपे आढळतात. स्त्रीवादी दृष्टिकोणातून स्त्रियांचे अनेक प्रश्न व जाणिवा यांची  अभिव्यक्ती, पुरुषसत्ताक व्यवस्था व पुरुषी मानसिकता यांची उपरोधपूर्ण टिंगलटवाळी, करिअरला प्राधान्य देणार्‍या स्त्रीच्या समस्या व व्यथा यांचे प्रभावी चित्रण ही त्यांच्या स्त्रीवादी साहित्याची ठळक वैशिष्ट्ये होत.
शांता गोखले यांच्या रीटा वेलिणकर या कादंबरीची मानसशास्त्रीय तसेच समाजशास्त्रीय स्त्रीवादी भूमिकेतून चिकित्सा करता येते. स्त्रीवादातील ‘ भगिनीभाव ’ या संकल्पनेचा पुरस्कार करणारी ही कादंबरी आहे. आशा बगे यांची भूमी ही कादंबरी, तसेच प्रिया तेंडुलकरांच्या कथा ( ज्याचा त्याचा प्रश्न व जन्मलेल्या प्रत्येकाला (१९९१) हे कथासंग्रह ) यांचे मूल्यमापन भारतीय स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून करता येते. कविता महाजन यांची ब्र ही कादंबरी भारतीय व समाजशास्त्रीय अशा द्विविध स्त्रीवादी दृष्टिकोणांतून अभ्यासता येते. मेघना पेठे यांच्या लिखाणात ( हंस अकेला — कथासंग्रह वनातिचरामि ही कादंबरी ) मुक्त जीवनपद्धती, बिनधास्त जीवनशैली यांचा पुरस्कार आढळतो. नीरजा ह्या अलीकडच्या स्त्रीवादी साहित्यप्रवाहातील एक प्रमुख व महत्त्वाच्या कवयित्री व कथाकार ( ओल हरवलेली माती — कथासंग्रह ) असून, स्त्रीवादी जाणिवांचे विविध पैलू त्यांनी वास्तववादी, चिंतनशील पद्धतीने व्यक्त केले आहेत.
साठोत्तरी कालखंडात, १९७०—८० च्या दशकांत व नंतरच्या काळातही काव्यनिर्मिती करणार्‍या अनेक कवयित्रींनी स्त्रीवादी काव्याचे दालन समृद्ध केले आहे. त्यांतील काही प्रमुख कवयित्री अशा : अनुराधा पाटील, रजनी परुळेकर, मलिका अमर शेख, प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे, नीरजा, प्रज्ञा लोखंडे, कविता महाजन, आसावरी काकडे, सिसिलिया कार्व्हालो इत्यादी. स्त्रीत्वाचे, स्त्रीवादी जाणिवेचे, स्त्रीच्या विशिष्ट अनुभव-विश्वाचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे, भिन्न भिन्न स्वरूपाचे चित्रण त्यांच्या कवितांत आढळते. व्यक्तिनिष्ठ तसेच सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाचे थेट चित्रण करणार्‍या या कविता स्त्रीत्वाचा आत्मभानयुक्त स्वर आळवणार्‍या आहेत. बाईचे सामर्थ्य व अनेकविध क्षमतांच्या शक्यता सूचित करणार्‍या भविष्यवेधी कविता काही कवयित्रींनी लिहिल्या आहेत. बाईतील अपार करुणा, तिची सर्जनशीलता, नवनिर्मितीची क्षमता ही तिची बलस्थाने अनेक कवितांतून व्यक्त झाली आहेत. १९८०—९० च्या दशकांत स्त्रीवादी जाणिवेच्या काव्याचा प्रवाह लक्षणीय होता. स्त्रीकेंद्री काव्यलेखनाचे प्रमाण उत्तरोत्तर वाढतच गेले.
स्त्रियांच्या आत्मकथनांनी स्त्रीवादी साहित्यात मोलाची भर घातली आहे. उदा., सुनीता देशपांडे यांचे आहे मनोहर तरी (१९९०), कमल पाध्ये यांचे बंध अनुबंध ही आत्मकथने उल्लेखनीय आहेत.
दलित स्त्रियांची आत्मकथने ही स्त्रीवादी साहित्यातील एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. बेबी कांबळे ( जिणे आमचे ), कुमुद पावडे ( अंतःस्फोट ), शांताबाई कांबळे ( माज्या जलमाची चित्तरकथा ), मुक्ता सर्वगौड ( मिटलेली कवाडे ), ऊर्मिला पवार ( आयदान ), सिंधुताई सपकाळ ( मी वनवासी ) इत्यादींचे स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भात महत्त्वाचे योगदान आहे. भारतीय व समाजशास्त्रीय अशा दुहेरी स्त्रीवादी भूमिकांतून त्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.
संदर्भ : 1. Buck, Claire, Ed. Bloomsbury Guide to Women’s Literature, London, 1992.
2. Gilbert, Sandra; Gubar, Susan, The Norton Anthology of Literature by Women, New York, 1985.
3. Moi,Toril, Sexual / Textual Politics : Feminist Literary Theory, Methuen, 1985.
4. Tharu, Susie; K. Lalita, Eds. Women Writing in India : 600 B. C. to the Present,Vol. I & II, New York, 1990; 1993.
५. नाईक, शोभा, भारतीय संदर्भातून स्त्रीवाद, मुंबई, २००७.
६. बोव्हार, सीमॉन द; अनु. गोखले, करुणा, द सेकंड सेक्स, पुणे, २०१२ .
७. भागवत, विद्युत, स्त्रीजन्माची वाटचाल, पुणे, २ ००४.
८. मेश्राम, केशव, संपा. वाङ्मयीन प्रवृत्ती : तत्त्वशोध  ड्ढडॉ. दादा गोरे गौरवग्रंथ  पुणे, २००७.
९. वरखेडे, मंगला, संपा. स्त्रीवादी समीक्षा : संकल्पना व उपयोजन, धुळे, १९९९.
१०. सारडा, शंकर, स्त्रीवादी कादंबर्‍या, पुणे, १९९३.
लेखक : श्री. दे. इनामदार ;  विद्युत भागवत
माहिती स्रोत :  मराठी विश्वकोश

मराठी साहित्य प्राचीन ते 1819

मराठी साहित्य


प्रास्ताविक

या लेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून साधारणपणे १९८० पर्यंतचा आढावा घेतलेला आहे. या आढाव्यात ‘प्राचीन मराठी साहित्य’ असा पूर्वविभाग असून, त्यात प्रारंभापासून इ.स. सु. १८१८ पर्यंतच्या मराठी साहित्याचे विवेचन केलेले आहे. लेखाच्या दुसऱ्यात भागात अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतलेला आहे. त्यात काव्य, नाटक, कादंबरी , कथा, विनोद, लघुनिबंध, प्रवासवर्णने, बालसाहित्य चरित्रे-आत्मचरित्रे, निबंध, समीक्षा, व्याकरणग्रंथ, संधोधनपर (वाङ्मयीन) साहित्य, इतिहासलेखन, शास्त्रीय साहित्य अशा उपविषयांखाली वेगवेगळ्या लेखकांनी, त्या त्या प्रकारातील वाङ्मयाचा परामर्श घेतला आहे. बृहन्महाराष्ट्रातील साहित्यसंस्था असाही एक उपविषय त्यानंतर घेतलेला आहे.
‘दलित साहित्य’ अशी स्वतंत्र नोंद असून जिज्ञासूंना ती विश्वकोशाच्या सातव्या खंडात पाहता येईल. ‘लोकसाहित्य’ अशी विश्वकोशात स्वतंत्र नोंद असून त्या नोंदीत मराठी लोकसाहित्याचा आढावा जिज्ञासूंना पाहावयास मिळेल. काव्य, नाटक, कादंबरी आदी प्रमुख साहित्यप्रकारांबरोबरच शास्त्रीय वाङ्मय, इतिहासवाङ्मय, व्याकरणग्रंथ यांसारखी मराठी वाङ्मयाची इतरही काही क्षेत्रे वाचकांनी परिचित व्हावीत, या दृष्टीने या लेखाची मांडणी केलेली आहे. विश्वकोशात काव्य, नाटक, कादंबरी, कथा, विनोद यांसारख्या साहित्यप्रकारांवर स्वतंत्र नोंदी अकारविल्हे यथास्थळ दिलेल्या असून ह्या साहित्याप्रकारांच्या घाटांसंबंधीचे विवेचन, तसेच त्याच्याशी संबंधित असे, मराठी साहित्यातील योग्य ते निर्देश अशा नोंदीतून जिज्ञासू वाचकाला पहावयास मिळतील. ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत यांसारख्या महत्वाच्या रचनांवरही स्वतंत्र नोंदी यथास्थळ दिलेल्या आहेत. मराठी वाङ्मयासंबंधीची-विशेषत: लेखक आणि साहित्यकृती यांसंबंधीची अधिक माहिती, जिज्ञासूंना या प्रकारच्या स्वतंत्र नोंदीत, उपलब्ध होऊ शकेल.
महत्वाच्या सर्व प्राचीन-अर्वाचीन लेखकांवर विश्वकोशात असलेल्या स्वतंत्र नोंदी, अकारविल्हे त्या त्या खंडात पहावयास मिळतील. उदा., ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, मर्ढेकर यांसारखे कवी; किर्लोस्कर, देवल, गडकरी, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर इ. नाटककार; ह.ना.आपटे, ना.सी.फडके , वि.स. खांडेक, विश्राम बेडेकर यांसारखे कादंबरीकार; त्याचप्रमाणे वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळणारे महत्वाचे साहित्यिक यांवर स्वतंत्र नोंदी आहेत. महानुभाव, वारकरी यांसारख्या पंथांवरही स्वतंत्र नोंदी आहेत. बखरवाङ्मय, आख्यानक कविता, शाहिरी वाङ्मय, लावणी, पोवाडा यांसारख्या खास मराठी अशा विषयांवरही स्वतंत्र नोंदी विश्वकोशात यथास्थळ दिल्या आहेत.
काव्यनाटकादी महत्वाचे साहित्यप्रकार; स्वच्छंदतावाद, वास्तववाद यांसारख्याकालवाङ्मयीन संप्रदाय; रसिसिद्धात, ध्वनिसिद्धान्त संस्कृत साहित्य शास्त्रातील संकल्पना; सौंदर्यशास्त्र, साहित्यसमीक्षा, पाठचिकित्सा तसेच महत्वाचे अन्य वाङ्मयीन विषय (उदा., भावविरेचन, काव्यन्याय इ.), वाङ्मयीन चळवळी (उदा., रविकिरण मंडळ), वाङ्मयीन संस्था (उदा., साहित्य संस्कृति मंडळ, भारतीय ज्ञानपीठ इ.) व संमेलने (उदा., मराठी साहित्य संमेलने) यांवरही विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. प्रस्तुत लेखात मराठीतील काही महत्वाच्या ग्रंथांचे निर्देश आलेले आहेतच, त्याशिवाय काही निवडक संदर्भग्रंथ लेखाच्या शेवटी, प्राचीन व अर्वाचीन अशी विभागणी करून दिलेले आहेत.

प्राचीन मराठी साहित्य

प्रारंभ ते इ.स. सु. १८१८ : मराठी वाङ्मयाचा मूलस्त्रोत स्त्रीगीते, अन्य लोकगीते, कथा-कहाण्या अशा प्रकारच्या अलिखित लोकसाहित्यात दिसून येतो. अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिला गेलेला ज्योतिपरत्नमाला हा मराठीतील पहिला ग्रंथ होय, असे मत राजवाड्यांनी व्यक्त केले; पण त्याची भाषा उत्तरकालीन वाटते. सन ११८८ मध्ये लिहिला गेलेला⇨मुकुंदराजांचा विवेकसिंधु हा मराठीतील पहिला ग्रंथ, असे एक मत आहे; पण त्या ग्रंथाचा नेमका काळ निश्चित करण्याचा प्रयत्न करताना ग्रंथातील शकसंवत्सरांचा मेळ बसत नाही, असे दिसून येते. एकनाथ-मुक्तेश्वरांसारखे कवी मराठीतील या आदिकवीचा उल्लेखही करीत नाहीत आणि विवेकसिंधूतील मराठीचे स्वरूपही उत्तरकालीन वाटते, असे महत्वाचे आक्षेप या मतावर घेतले गेले आहेत.
या आक्षेपांत तथ्य आहे.या ओवीबद्घ ग्रंथाची अठरा प्रकरणे असून त्याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. यात शांकरवेदान्त स्पष्ट केला असून काव्यात्मकतेपेक्षा तत्त्वप्रतिपादनावर कवीचा भर अधिक आहे. ब्रह्मविद्येचा ‘सुकाळु हो देयावा’ हा ग्रंथाचा हेतू. यातील तत्त्व विवेचनाची गंभीर पातळीही त्याला मराठीतील आद्यग्रंथ मानण्याच्या आड येते; काही विद्वानांच्या मते विरोधीच ठरते. निर्विवाद पुराव्यानेच बोलावयाचे असेल, तर सु. १२७८ मध्ये⇨म्हाइंभट्टांनी (मृ.सु. १३००) संकलित केलेले लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ म्हणता येईल. हा गद्य आहे हा त्याचा एक विशेष आहे.
म्हाइंभट्टांचे लीळाचरित्र: धर्म हा लोकाभिमुख असावा, असा एक नवा विचार दहाव्या-अकराव्या शतकाच्या सुमारास भारतामध्ये सर्वत्र निर्माण झालेला दिसतो. केवळ उच्चवर्णियांनाच समजणारासंस्कृतमधील धर्मविचार सर्वसामान्यांच्या भाषेत आणला पाहिजे, ही प्रेरणा यातून निर्माण झाली व ती अर्वाचीन देशभाषांतील वाङ्मयाच्या निर्मितीस कारण ठरवी. बाराव्या शतकात महाराष्ट्रामध्ये महानुभाव व वारकरी हे प्रभावशाली संप्रदाय उदयाला आले. नाथपंथाचा प्रवेश तर येथे त्याच्याही आधी झाला होता. मराठीच्या प्रारंभकालातील वाङ्मय या तीन पंथांच्या अनुयायांकडून लिहिले गेले. यातील अग्रदूताचा मान महानुभाव लेखकांकडे जातो. त्या पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर आणि संघटक नागदेवाचार्य यांनी आपल्या पंथाच्या अनुयायांनी सर्वत्र मराठीचाच वापर केला पाहिजे, असा आग्रह धरला होता. मराठी ही या पंथाची धर्मभाषाच झाली. स्वत: चक्रधर व नागदेवाचार्य यांनी कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही; पण त्यांच्या प्रेरणेतून या पंथाच्या अनुयायांकडून मात्र विपुल ग्रंथरचना झाली.
महींद्र व्यास उर्फ म्हाइंभट्ट ह्यांनी संकलित केलेला लीळाचरित्र हा या पंथातील पहिला ग्रंथ होय. चक्रधरांच्या महानिऱ्याणानंतर त्यांच्या आठवणी ऊर्फ लीळा लिहून काढण्याची प्रेरणा म्हाइंभट्टास झाली. नागदेवाचाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली गावोगाव फिरून त्यांनी एकूण १,५०९ लीळा गोळा केल्या. त्यांचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग केले. पैठणला येऊन लोकांना उपदेश करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी चक्रधर एकाकी भ्रमण करीत होते. त्या काळातील काही आठवणी त्यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितल्या होत्या. त्या एकत्र करून त्याला ‘एकांक’ असे नाव देण्यात आले. असे या ग्रंथाचे अखेर तीन भाग झाले. संकलनकार या दृष्टीने म्हाइंभट्टांनी केलेली कामगिरी केवळ अपूर्व म्हणावी अशी आहे.
यातील प्रत्येक लीळा त्या त्या संबंधित व्यक्तीकडून मिळवलेली आहे आणि त्यातील बारीकसारीक तपशील अचूकपणाने टिपण्यात आले आहेत. शंका उत्पन्न झाली, तेव्हा ती शंका किंवा मतभेद आढळला तेथे तो मतभेद नोंदलेला आहे. प्रत्येक लीळा नागदेवाचाऱ्याकडून तपासून घेण्यात आली आहे. चक्रधर हे साक्षात परमेश्वराचे अवतार, तेव्हा त्यांचे उदगार जसेच्या तसे नोंदले जातील. असा प्रयत्न कसोशीने करण्यात आला आहे. वास्तव वर्णने, आकर्षक शब्दचित्रे, नाट्यपूर्ण संवाद हे या ग्रंथाचे डोळ्यांत भरणारे विशेष आहेत. येथे वर्णिलेले प्रसंग दररोज घडणारे असे आहेत; पण त्या साध्यासाध्या प्रसंगांतून प्रकट होणारी व्यक्तिचित्रे व समाजचित्रे अतिशय जिवंत व बोलकी आहेत. वाक्ये छोटी आहेत, शब्द नित्याच्या वापरातील आहेत. भाषा सजवण्याचा कोणताही प्रयत्न येथे केलेला नाही. मराठीमधील या पहिल्या ग्रंथातील अभिव्यक्ती सहज व अकृत्रिम अशी आहे. लीळाचरित्र हा मराठीतील आद्य चरित्रग्रंथही आहे.
ऋद्धिपूरला राहणारे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू ऊर्फ गुंडम राऊळ यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाइंभट्टांनी गोळा केल्या व त्यांतून ३२५ लीळांचा ऋद्धिपुरलीळा (ऋद्धिपूरचरित्र हेही एक पऱ्यायी नाव) ऊर्फ गोविंदप्रभुचरित्र (सु. १२८८) हा ग्रंथ सिद्ध झाला. लीळाचरित्राची सारी वैशिष्ट्ये त्यांच्या या ग्रंथातही उतरली आहेत. श्रीकृष्ण, दत्तात्रेय व गोविंदप्रभूंचे गुरू चांगदेव राऊळ ह्यांच्या कथा चक्रधर आपल्या शिष्यांना सांगत असत, त्या एकत्र करून म्हाइंभट्टांनी त्यांचीही चरित्रे सिद्ध केली आहेत. पण ती पुराणांच्या थाटाची आहेत. नागदेवाचाऱ्याच्या निऱ्याणानंतर त्यांच्या आठवणी संग्रहित करणारे स्मृतिस्थळ हे मुळात नरेंद्र व परशराम यांनी सिद्ध केले (सु. १३१२) असे म्हटले जाते. त्यामध्ये नागदेवाचाऱ्याच्या बरोबर म्हाइंभट्ट, केसोबास आदी इतर शिष्यांच्या कथाही आल्या आहेत. लीळाचरित्र, ऋद्धिपुरलीळा व स्मृतिस्थळ हे मराठी वाङ्मयाच्या प्रारंभकाळात सिद्ध झालेले तीन चरित्रग्रंथ होत. थोर पुरुषांच्या आठवणी गोळा करून सत्याशी संपूर्ण इमान राखणारी अशी चरित्रे सिद्ध करण्याची ही प्रथा मराठीत पुढे चालू राहिली असती, तर मराठी वाङ्मयाचे हे दालन अपार समृद्ध झाले असते.

सिद्धांन्तसूत्रपाठ व दृष्टान्तपाठ

संकलनाच्या या पद्धतीने व लीळाचरित्राच्या आधाराने आणखी दोन महत्वाचे ग्रंथ तयार झाले.यांचे कर्तृत्व केशवराज सूरि (?-१३१६ ?) यांच्याकडे जाते. केसोबास, केशवराज किंवा केशिराज व्यास व मुनी केशिराज ह्या नावांनीही हा ओळखला जातो. लीळाचरित्रामध्ये चक्रधरांची सूत्रे आली आहेत व त्यांतून महानुभावांचे तत्वज्ञान व आचारधर्म प्रकट झाला आहे. अशी एकूण १,६०९ सूत्रे गोळा करून व त्यांचे लक्षणपाठ, आचारमालिका व विचारमालिका असे त्रिविध वर्गीकरण करून केशिराजांनी ⇨सिद्धांतसूत्रपाठ (सु. १२८०) हा ग्रंथ तयार केला. महानुभाव पंथात हा ग्रंथ फार पवित्र मानला जातो. दृष्टांतपाठ हा त्यांचा दुसरा ग्रंथ. हाही १२८० च्या आसपासचा. शिष्यांना उपदेश करतेवेळी आपला विचार स्पष्ट व्हावा म्हणून चक्रधर एखादी व्यावहारिक कथा दृष्टांतादाखल सांगत असत.
असे एकूण ११४ दृष्टांत केशिराजांनी एकत्र केले व त्यांचा दृष्टांतपाठ हा ग्रंथ तयार केला. प्रथम चक्रधरांनी सांगितलेले सूत्र, मग त्यासाठी त्यांनी दिलेला दृष्टांत आणि त्यानंतर त्या दोहोंतील परस्परसंबंध स्पष्ट करणारे केशिराजांचे दार्ष्टान्तिक अशी या ग्रंथाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. गद्यग्रंथांच्या या नामावळीत आणखी एका महत्वाच्या ग्रंथाचा उल्लेख करावयास हवा. तो म्हणजे बाइदेवबास (व्यास) (मृ. १३०९) यांचा पूजावसर. चक्रधरांची दिनचऱ्या वर्णन करणाऱ्याह या ग्रंथात त्यांच्या बारीकसारीक हालचालींची नोंद असल्याने पंथीयांना हा विशेष पूज्य झाला आहे.

साती ग्रंथ

गद्याप्रमाणेच पद्यवाङ्मयाही महानुभावांनी निर्माण केलेले आहे आणि त्यांतील विषयांची व प्रकारांची विविधता गद्यापेक्षाही डोळ्यांत भरणारी आहे.⇨साती ग्रंथ या नावाचा या पद्यवाङ्मयातील एक महत्वाचा गट आहे. हे सारे ओवीबद्ध ग्रंथ आहेत. दामोदरपंडितांचे वछाहरण (सु. १३१६), नरेंद्रांचे रुक्मिणीस्वयंवर (१२९२), भास्करभट्ट बोरीकरांचा शिशुपालवध (१३१२) व उद्भवगीता (१३१३), पं, विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध (१४१८), रवळो व्यासांचे सह्याद्रिवर्णन (१३५३) आणि नारो बहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन (१४१८) असे हे सात ग्रंथ महानुभाव पंथात ‘साती ग्रंथ या’ नावाने प्रसिद्ध आहेत. या सातांपैकी चार ग्रंथांचा विषय श्रीकृष्णचरित्र हा आहे, तर उरलेल्या तिहींमध्ये भगवद्गीता, दत्तात्रयचरित्र व क्षेत्रमाहात्म्य हे विषय आहेत. सैह्याद्रिवर्णन व ऋद्धिपूरवर्णन या दोहोंमध्ये स्थलवर्णनाला महत्वाचे स्थान आहे.
नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर हे स्वयंवरकाव्य असल्याने त्यात शृंगाराला साहजिकच महत्व आहे; पण शिशुपालवधामधील मूळ विषय वीररसाचा असूनही त्यात शृंगाराल अधिक महत्व मिळाले आहे. वछाहरणामध्ये श्रीकृष्णाचे श्रेष्ठत्व सांगणारी एक कथा आहे. ही तीन काव्ये कथाकाव्ये आहेत. प्रसंगवर्णन व व्यक्तिदर्शन यांना त्यांत वाव आहे. भागवताच्या एकादशस्कंधामधील तत्वज्ञान हा उद्भवगीतेचा विषय आहे; पण भास्करभट्टांची ही रचना मूळ ग्रंथाच्या मानाने फार छोटी आहे. भागवत अद्वैतपर मानले जाते. महानुभाव पंथ द्वैती आहे, त्याती तत्वज्ञानाची परिभाषाही निराळी आहे. आपल्या पंथाचे विशिष्ट तत्वज्ञान भागवताच्या आधारे भास्करभट्ट कसे मांडतात हे पाहू गेले तर विशेष समाधान होत नाही. ज्ञानप्रबोधमध्ये गीतेतील केवळ पाच श्लोकांचे विवरण आहे. सैह्याद्रिवर्णन व ऋद्धिपूरवर्णन यांमध्ये मूळ विषयाबरोबरच भक्तीला विशेष स्थान मिळाले आहे.
ओवीबद्ध रचना व आख्यानकाव्याला शोभावा इतपत विस्तार एवढेच साम्य व सात ग्रंथांमध्ये आहे. महानुभाव पंथामध्ये याच सात ग्रंथांना विशेष मान्यता का लाभावी व त्यांचा स्वतंत्र गट का कल्पिला जावा याचा उलगडा होत नाही. वाङ्मयीन दृष्टीने विचार केला, तर या सर्व कवींत नरेंद्र सर्वश्रेष्ठ ठरतात. त्यांचा काव्यरचनेतील हेतूही केवळ वाङ्मयीन आहे. आपण कवी आहोत याचा त्यांना अभिमान आहे आणि त्या अभिमानाला शोभेल अशी त्यांची रचना आहे. खरीखुरी कलावंताची दृष्टी असणारा हा मराठीतील पहिला कवी होय. रुक्मिणीस्वयंवर हे मराठीतील पहिले शृंगारपर आख्यानकाव्य. या कथेवर पुढे अनेकांनी रचना केली आहे, पण नरेंद्रांची सर कोणाला येत नाही. आकर्षक वर्णनशैली व रमणीय कल्पनाविलास हे नरेंद्राचे विशेष आहेत. त्यांचे सरस उपमादृष्टांत काही स्थळी ज्ञानेश्वरांशी नाते सांगतात. त्या मानाने भास्करभट्ट किंवा दामोदरभट्ट यांची शैली उणी पडते. उरलेल्या कवींची रचना ठाकठीक म्हणावी अशी आहे.
काव्यदृष्टीनेच विचार करावयाचा झाला, तर या साती ग्रंथांच्या बाहेर असणार्या् दोन रचना अधिक महत्वाच्या आहेत. केशवराज सूरींचे मूर्तिप्रकाश हे काव्य गुणदृष्ट्या नरेंद्राच्या रुक्मिणीस्वयंवराच्या खालोखाल येते. चक्रधरांच्या मूर्तीचे, त्यांच्या अवतारित्वाचे व विविध गुणांचे वर्णन हा या काव्याचा विषय आहे. कवीच्या चक्रधरांविषयीच्या असीम श्रद्धाभावामुळे हे काव्य उत्कट उतरले आहेच, पण त्या उत्कटतेला वाचा फोडण्यास तितकीच समर्थ अशी शैलीही केशिरांजाजवळ आहे. दुसरी रचना स्फुट आहे व ती म्हणजे महदंबेचे (सु. १२२८-सु. १३०३) धवळे. याच्या पूर्वार्धात ८३ कडवी आहेत. उत्तरार्धाची ६५ कडवी सर्वस्वी तिची नसावीत. या धवळ्यांची रचना केवळ गोविंदप्रभूंच्या आग्रहावरून व स्फूर्तीच्या आकस्मिक आविर्भावासरशी महदंबेने केली आहे (सु. १२८६).
लग्नाच्या प्रसंगी वराला उद्देशून म्हणावयाची ही गीते आहेत. ‘धवळा’ हा एक वृत्तप्रकार असावा, असाही एक तर्क आहे. भावनेची उत्कटता व आत्मपरता या दृष्टीने अर्वाचीन काळातील भावगीतासारखे या गीतांचे स्वरूप आहे. त्यांची भाषा व त्यांतील भावमाधुरी स्त्रीसहज अशी आहे. श्रीकृष्णरुक्मिणीविवाहविषयक ही मराठीतील पहिली रचना होय. ११० अभंगांचे एक मातृकीरुक्मिणीस्वयंवर महदंबेच्या नावावर आहे, पण त्याला धवळ्यांचे यश लाभले नाही. महदंबा ही मराठीतील पहिली कवयित्री होय.महानुभाव वाङ्मय: आठवणी, दिनचऱ्या, स्थलवर्णन, व्यक्तिवर्णन, कथात्मक, भावगीतसदृश, तात्विक व विवेचनपर अशी विविध प्रकारची रचना महानुभवांनी केली आहे. गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारांतील हे लेखन आहे. गद्यातील विविधता विषयांची नाही, तर वाङ्मयप्रकारांची आहे. त्या सर्व रचनेत चक्रधरांचे चरित्र व शिकवणूक हाच विषय प्राधान्याने आहे. पद्यवाङ्मयातील विविधता, आशय व अभिव्यक्ती अशी दोन्ही प्रकारची आहे.
बहुतेक गद्यग्रंथ संकलनात्मक आहेत; पद्यग्रंथ ही मात्र स्वतंत्र निर्मिती आहे. श्रुती, स्मृती, वृद्धाचार, मार्गरूढी आणि वर्तमान असे गद्यग्रंथांचे एक वर्गीकरण महानुभाव पंथात केले जाते, पण ते वाङ्मयीन दृष्टीने केलेले नाही. श्रुती’ म्हणजे चक्रधरांच्या सूत्रांची संकलने; ‘स्मृती’ म्हणजे नागदेवाचाऱ्याची वचने. त्यानंतरचा आचार्यवचनांना वृद्धाचार म्हणतात. त्यानंतरचा विचार म्हणजे मार्गरूढी होय. नंतरचे साहित्य म्हणजे ‘वर्तमान’. पद्यग्रंथांतील साती ग्रंथ या गटालाही तसे खास वाङ्मयीन निराळेपण नाही. गद्यवाङ्मयात वास्तवता, सहजता, नाट्यपूर्णता, परिणामकारकता हे गुण जाणवतात, तर लालित्य, अलंकारप्रचुरता, कल्पनारम्यता, भावनोत्कटता हे विशेष पद्यग्रंथांत आढळतात. गद्यामध्ये भाषेचा जिवंतपणा व ठसठशीतपणा आहे, तर पद्यामध्ये रसरशीतपणा व चैतन्यपूर्णता आहे.हयग्रीव व्यास ह्या महानुभाव पंडिताने भागवताच्या दशमस्कंधावरील टीका गद्यराजस्तोत्र ह्या नावाने लिहिली. ती २७९ श्लोक आहेत. त्यांतील काही श्लोकांची निर्यमक रचना लक्षणीय आहे.

महासंत ज्ञानेश्वर

वारकरी संप्रदायातील पहिलेच व सर्वश्रेष्ठ संत म्हणजे ज्ञानेश्वर (१२७५-१२९६). ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६). ज्ञानदेव, त्यांचे जीवन, वाङ्मय आणि व्यक्तिमत्व हे सारेच केवळ लोकोत्तर आहे. ज्ञानदेवांच्या चरित्राबद्दल अनेक वाद आहेत. त्यांतील वाङ्मयाशी संबंधित असा महत्वाचा वाद म्हणजे गीतेवर टीका लिहिणारे ज्ञानेश्वर आणि अभंगरचना करणारे ज्ञानेश्वर या दोन भिन्न व्यक्ती असाव्यात, हा होय. या वादाचा अखेरचा निर्णय अद्याप झालेला नाही; मात्र ज्ञानदेवांच्या नावावरील बरेच अभंग त्यांचे नसावेत. भावार्थदीपिका ऊर्फ⇨ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेवपासष्टी आणि काही अभंग एवढी रचना निर्विवादपणे ज्ञानदेवांची आहे. त्याशिवाय उत्तरगीत, प्राकृतगीता, पंचीकरण, शुकाष्टक, योगवसिष्ठ अशी सु. पंचवीस प्रकरणे ज्ञानदेवांची म्हणून सांगितली जातात, पण अंतर्गत पुराव्यांवरून असे म्हणता येते, की ही रचना ज्ञानदेवांची नाही.
भावार्थदीपिका ऊर्फ ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील टीका आहे. ओवीसंख्या सु. नऊ हजार आहे. या ग्रंथाच्या संहितेचा प्रश्नही अद्याप निकालात निघालेला नाही. त्याची रचना नेवासे येथी झाली, हा उल्लेख त्या ग्रंथातच आहे. पुढे त्यात अनेक अपपाठ शिरले म्हणून एकनाथांनी त्याची शुद्ध प्रत तयार केली (१५८४). या ग्रंथाची एकनाथपूर्व-कालातील विश्वसनीय प्रत अद्याप मिळालेली नाही. ज्ञानदेवांनी आपली टीका रुक्ष शास्त्रीय पद्धतीने लिहिलेली नाही. तत्त्वज्ञानातील सिद्धांत ते उत्तम प्रकारे जाणतात आणि त्यांनी भाष्यकारांना वाटही पुसली आहे; पण आपली टीका त्यांनी तर्ककर्कश होऊ दिलेली नाही. ही टीका म्हणजे मराठी साहित्याचे एक अनमोल लेणे आहे.
आपल्या सौंदऱ्याने ती रसिकाला वेड लावते, नास्तिकालाही तिच्या रमणीयतेचा वेध लागतो. यातील ओवी छोटी व नेटकी आहे, शब्दयोजना नेमकी व चातुर्यपूर्ण आहे, त्यामध्ये काव्य आणि तत्वज्ञान ही केवळ एकरूप होऊन गेली आहेत. अध्यात्मातील सिद्धांताबाबत ज्ञानदेवांची वृत्ती अनाग्रही आहे. नाथपंथातील अद्वयसिद्धांताचा व हठयोगातीली कुंडलिनीजागृतींचा मोठाच ठसा त्यांच्यावर आहे, पण त्यांची दृष्टी समन्वयाची आहे. ज्ञान आणि कर्म, कर्म आणि संन्यास, संन्यास आणि भक्ती, भक्ती आणि अद्वैत, अद्वैत आणि योग, योग आणि वेदान्त अशी अनेक द्वंव्दे येथे निर्द्वंव्दात पोहोचली आहेत. यथील तत्वज्ञानविचार जितका सुबोध तितकाच रमणीय आहे. येथे अतींद्रिय अध्यात्म साक्षात अनुभवाचे इंद्रियोगचर रूप धारण करून उभे राहिले आहे.
आपली ही टीका शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवील हा आपला उदगार ज्ञानदेवांनी सार्थ करून दाखवला आहे. त्यांचा हा ग्रंथ शांतरसाचा उत्कृष्ट आविष्कार आहे. यातील सरस प्रास्ताविके, उचित उपसंहार, वेधक शब्दचित्रे, समर्पक उपमादृष्टांत, मराठी भाषेविषयीचे प्रेम, गाढ तत्वज्ञानविचार, अद्वैतानुभवाची प्रत्ययकारी वर्णने, विनय आणि आत्मविश्वास यांचे मधुर मीलन, ज्ञानदेवांच्या उदात्त व्यक्तिमत्वाचे मनोहर दर्शन, त्यांची आध्यात्मिकता व सर्वसामान्यांविषयीची करुणा यांपैकी कोणते वैशिष्ट्य अधिक श्रेष्ठ मानावे याचा संभ्रम पडावा अशी ही एक अनन्यसाधारण साहित्यकृती आहे. साहित्याचा हा एक तेजस्वी मानदंड मराठी सारस्वताच्या प्रारंभकालात उभा ठाकला आहे आणि पुढच्या काळातील अनेक श्रेष्ठ संतकवींनी याच्या प्रकाशात वाटचाल करण्यात धन्यता मानली आहे.
अद्वैताचा अनुभव हाच ज्याचा एकमेव विषय आहे, असा अमृतानुभव हा सु. आठशे ओव्यांचा स्वतंत्र ग्रंथ (हा अनुभवामृत ह्या नावानेही ओळखला जातो.) आपले गुरू श्रीनिवृत्तिनाथ यांच्या आज्ञेने ज्ञानदेवांनी आपल्या गीताटीकेनंतर लिहिला. काव्य आणि तत्वज्ञान या दोन्हीं दृष्टींनी हा ज्ञानेश्वरीच्याही वरची पातळी गाठतो असा रसिकांचा व तत्ववेत्त्यांचा अभिप्राय आहे. योगी चांगदेवांनी कोरे पत्र पाठवले, त्याला उत्तर देण्याच्या निमित्ताने पासष्ट ओव्यांचे एक अद्वैतानुभूतिपर काव्य ज्ञानदेवांनी लिहिले, ते चांगदेवपासष्टी म्हणून प्रसिद्ध आहे. अथांग आकाशाचे छोटेसे प्रतिबिंब एखाद्या लहानशा जलाशयात पडलेले दिसावे व त्याचा आपल्या मनाला त्या बिंबरूप आकाशाहूनही अधिक मोह पडावा, तशी या चांगदेवपासष्टीतील आविष्काराची गुणवत्ता आहे.
विठ्ठलसंप्रदायाशी संपर्क आल्यावर ज्ञानदेवांनी अभंग लिहिले असावेत. त्यांच्या नावावरील बऱ्याकच अभंगांचे कर्तृत्व संशयित आहे. तथापि काही अभंगांतून ज्ञानदेवांच्या अनुभवाची उत्कटता व रचनेची कोवळीक आढळते. योगपर व आत्मानुभवपर अभंग, गौळणी आणि विराण्या यांत ते विशेषत्वाने जाणवते. त्यातील हरिपाठाचे अभंग हा छोटा गट वारकऱ्याणच्या नित्यपाठात आहे. एवढी अलौकीक रचना ज्ञानदेवांनी केवळ एकवीस-बावीस वर्षाच्या आयुष्यात केली हा देखील एक चमत्कारच.जगाच्या वाङ्मयातही असे उदाहरण अपवादानेच असावे. वारकरी संप्रदायात ज्ञानदेवांना ‘माउली’ मानतात. ज्ञानेश्वरी हा त्या पंथाचा जणू धर्मग्रंथच आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या शब्दांमध्ये त्यांचे भागवतधर्मातील कार्य वर्णिले जाते. मराठी साहित्याच्या संदर्भातही ते उदगार सार्थ आहेत.

नामदेव आणि इतर संत

ज्ञानदेवांचे समकालीन, काहीसे निराळे व्यक्तिमत्व असलेले, पण तितकेच कर्तृत्ववान असे दुसरे संत म्हणजे ⇨नामदेव (१२७०-१३५०). त्यांच्या चरित्रातही अनेक वादस्थळे आहेत आणि त्यांच्या नावावर असलेल्या अभंगापैकी नेमके किती अभंग त्यांचे आहेत, हे ठरवणे दुरापास्त आहे; पण ‘भक्त शिरोमणी’ म्हणून त्यांची असलेली ख्याती वादातीत आहे. नामदेवांनी भक्तीचा, पंढरीचा व विठ्ठलाचा झेंडा पंजाबपर्यंत नेला. तिकडील त्यांची मंदिरे आणि शिखांच्या ग्रंथसाहेबात अंतर्भत केली गेलेली त्यांची पद्ये याची साक्ष देत आहेत. ते वारकरी पंथाचे आद्य प्रचारक होते, तसे कीर्तनाचेही प्रवर्तक होते.
त्यांच्या अभंगवाणीत भक्तीची स्निग्धता व उत्कटता ओतप्रोत भरून राहिलेली आहे. सहजसुलभ भाषा आणि भक्तिभावनेच्या अनेकानेक छटा हे त्यांच्या वाणीचे विशेष आहेत. जे अभंग सामान्यत: नामदेवांचे मानले जातात, त्यांत ‘आदि’, तीर्थावळी आणि समाध अशा तीन प्रकरणांचे ज्ञानेश्वरचरित्र आहे. त्या आधारे ते ज्ञानेश्वरांचे आद्य चरित्रकार मानले जातात. परंतु ही तीन प्रकरणे खरोखरीच नामदेवांनी लिहिली किंवा काय, ह्याबद्दल रा.चि. ढेरे ह्यांच्यासारख्या संशोधकांना शंका आहे. समाधिप्रसंगाचे वर्णन मात्र अतिशय उत्कट व ह्रदयाला पीठ पाडणारे आहे.
ज्ञानदेव व नामदेव या दोघांच्या प्रभावामुळ भक्तिगंगेचा प्रवाह महाराष्ट्रात अठरापगड जातींमध्ये पोचला व एक प्रकारची आध्यात्मिक लोकशाहीच निर्माण झाली अनेक जातींच्या संतांनी अभंगरचना केली व तीद्वारा भक्तीचा व विठ्ठलाचा महिमा गायिला. बद्धावस्थेपासून तो साक्षात्काराच्या अवस्थेपर्यंतच्या पारमार्थिक प्रवासातील आपले अनुभव या संतांनी आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहेत, त्यामुळे त्यांत आत्मपरता यावी, हे स्वाभाविक आहे. नाममाहात्म्य, पंढरीचा महिमा, श्रीकृष्णाचे बालपण असे इतरही काही विषय या अभंगांतून येतात. निवृत्तिनाथ, सोपान व मुक्ताबाई या ज्ञानदेवांच्या भावंडांची रचना आहेच. पण चांगा वटेश्वर ( १३२५), विसोबा खेचर (- १३०९), नरहरी सोनार (१२६७-?), सावता माळी (१२५०?- ९५), परिसा भागवत, नामदेवांची दासी जनाबाई (१३५०) व इतर कुटुंबीय, जगमित्र नागा, जोगा परमानंद, संत चोखामेळा आणि इतर अनेक संत व भक्त यांनी या काळातील अभंगवाङ्मयाचे हे दालन समृद्ध केले आहे. चांगा वटेश्वर ह⇨चांगदेव व वटेश चांगा ह्या नावांनीही ओळखला जातो.
त्याच्या अभंगांत रूपकयोजनेवर विशेष भर आहे. मोतियाचे पाणी रांजण भरिला’ हा त्याचा अभंग प्रसिद्ध आहे. विसोबा खेचर हा व्यापारी. व्यापारी लोकांत त्याच्या काळी नंदभाषा प्रचलित होती. तिचा उपयोग त्याने आपल्या अभंगांत केलेला आहे. गोरा ऊर्फ गोरोबा कुंभाराचे आज फक्त वीस अभंग मिळतात. एक थोर आध्यात्मिक अधिकारी-पुरुष म्हणून त्याचा तत्कालीन संतांत लौकील होता. नक्की नरहरी सोनाराचे म्हणता येतील असे आठ-दहाच अभंग उपलब्ध आहेत, तर सावता माळ्याचे पाचपंचवीस. परिसा भागवत ह्याने नामदेवांचे शिष्यत्व पतकरले होते. ‘कवित्वापरिस कवित्व आगळे पै आहे...’ असा त्याचा नामदेवांवरचा एक मार्मिक अभंग मिळतो. जनाबाईने सु. साडेतीनशे अभंग लिहिले आहेत. जगमित्र नागा ह्याच्या अभंग-पदांतून चमत्कृतीची आवड जाणवते. चोखामेळ्याची ‘जोहार मायबाप जोहार’ ही रचना प्रसिद्ध आहे. या सर्वांच्या रचनेचा मूळ गाभा एकच आहे. त्या त्या कवीच्या भिन्न व्यक्तिमत्वानुसार व सामाजिक स्तरानुसार त्याच्या रचनेत अभिव्यक्तीचा काही निराळेपणा जाणवतो. जनाबाई व चोखामेळा या दोघांची रचना त्या दृष्टीने विशेष लक्षणीय आहे.
संदर्भ : प्राचीन मराठी साहित्य :
१. आजगावकर, ज. र. महाराष्ट्र – कवि चरित्र, ८ खंड, मुंबई, १९०७ – २७.
२. आजगावकर, ज. र.महाराष्ट्र संत कवयित्री, मुंबई, १९३९.
३. इर्लेकर, सुहासिनी, यादवकालीन मराठी काव्यसमीक्षा, औरंगाबाद, १९७९.
४. कानेटकर, शं. के. काव्य – कला भाग १ ला, पुणे, १९३६.
५. कुलकर्णी, श्री. रं. प्राचीन मराठी गद्य : प्रेरणा व परंपरा, मुंबई, १९७०.
६. केतकर, श्री. व्यं. महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण, पुणे, १९२८.
७. केळकर, य. न. मराठी शाहीर आणि शाहिरी वाड्‍मय, पुणे, १९७४.
८. कोलते, वि. भि. महानुभाव संशोधन, पुणे, १९६८.
९. खानोलकर, गं. दे. संपा. मराठी वाङ्‌मयकोश, खंड – १ मुंबई, १९७७.
१०. ग्रामोपाध्ये, गं. ब. संतकाव्यसमालोचन, पुणे, १९३९ .
११. जोग, रा. श्री. संपा. मराठी वाङ्‌मयाचा इतिहास, खंड ३ ( १६८० ते १८०० ), पुणे, १९७३.
१२. जोग, रा. श्री. मराठी वाड्‍मयभिरूचीचे विहंगमावलोकन, पुणे, १९५९.
१३. जोशी, प्र. न. मराठी वाङ्‌मयाचा इतिहास, खंड १ , पुणे, १९७८.
१४. जोशी, वसंत स. महानुभाव पंथ. पुणे, १९७२.
१५.  ढेरे, रा. चिं. चक्रपाणि : आद्य मराठी वाङ्‌मयाची सामाजिक पार्श्वभूमी, पुणे, १९७७.
१६. ढेरे, रा. चिं. प्राचीन मराठीच्या नवधारा, कोल्हापूर, १९७२.
१७. ढेरे, रा. चिं. मुसलमान मराठी संतकवी, पुणे, १९६७.
१८. ढेरे, रा. चिं. श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पुणे, १९८४.
१९. तुळपुळे, शं. गो. पाच संतकवी, पुणे, १९४८.
२०. तुळपुळे, शं. गो. महानुभाव पंथ आणि त्याचे वाड्‍मय, पुणे, १९७६.
२१. देशपांडे, अ. ना. मराठी वाङ्‌मयकोश ( प्राचीनखंड ), नागपूर, १९७४.
२२, देशपांडे , अ. ना. प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास, भाग १ ते ५, १९६६- ८२ .
२३. देशपांडे , यशंवंत खुशाल, महानुभावीय मराठी वाड्‍मय, यवतमाळ, १९२५.
२४. देशामुख, मा. गो. मराठीचे साहित्यशास्त्र, पुणे, १९४०.
२५. धोंड, भ. वा. मर्‍हाटी लावणी, मुंबई, १९५६.
२६. पंगु, दत्तात्रय सीताराम, प्राचीन मराठी कविपंचक, कोल्हापूर, १९४४.
२७. पांगारकर, ल. रा. मराठी वाड्‍मयाचा इतिहास, ३ खंड, मुंबई, १९३२, १९३५ , १९३९.
२८. पिंगे, श्री. म. युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा, औरंगाबाद, १९६०.
२९. पेंडसे, शं. दा. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, नागपूर, १९५१.
३०. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, ( आवृ. ६ वी ), खंड १ , मुंबई, १९८२.
३१. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, ( आवृ. ६ वी ), खंड २, पुरवणी, तुळपुळे, शं. गो. मुंबई, १९८३.
३२. भिडे, बाळकृष्ण अनंत, मराठी भाषेचा व वाड्‍मयाचा इतिहास ( मानभाव अखेर ) , पुणे, १९३३.
३३. मालशे, स. गं. संपा. मराठी वाड्‍मयाचा इतिहास, खंड -२, भाग पहिला, ( १३५० ते १६८० ), पुणे, १९८२.
३४. मालशे, स. गं. संपा. मराठी वाड्ऍमयाचा इतिहास, खंड – २, भाग दुसरा, ( १३५० ते १६८० ), पुणे, १९८२.
३५. मोरजे, गं. ना. मराठी लावणी वाड्‍मय, पुणे, १९७४.
३६. रानडे, रा. द. अनु. गजेद्रगडकर, कृ. वे. मराठी संतवाङ्‌मयातील परमार्थ मागे, २ भाग, मुंबई, १९६३; १९६५.
३७. वर्दे, श्री. म. मराठी कवितेचा उप:काल किंवा मराठी शाहीर, मुंबई, १९३० .
३८ वाटवे, के. ना. प्राचीन मराठी शाहीर, मुंबई, १९३०.
३९. वाटवे, के ना. प्राचीन मराठी शाहीर, मुंबई, १९३०.
४०. वाटवे, के. ना. प्राचीन मराठी पंडिती काव्य, पुणे, १९६४.
४१. संकपाळ, बापूजी, बखरवाड्‍मय : उद्‍गम आणि विकास, पुणे, १९८२.
४२ . सरदार, गं. बा. संतवाङ्‌मयाची सामाजिक फलश्रुती, पुणे, १९५०.
४३. सुठणकर, वा. रं. महाराष्ट्रीय संतमंडळाचे ऐतिहासिक कार्य, बेळगाव, १९४८.
४४. हेरवाडकर, र. वि. मराठी बखर, पुणे, १९५७.
लेखक: वि.रा. करंदीकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

संवाद कौशल्ये

संवाद कौशल्य

 | Updated: 18 Sep 2017, 04:00 AM

बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणाऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी बोलणाऱ्या व्यक्तीजवळ संवाद कौशल्याची गरज असते. बोलणाऱ्याजवळ ही कला नसेल तर बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणारा ऐकतो खरा, पण त्याचा योग्य अर्थ त्याच्यापर्यंत पोचत नाही. यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात.

maharashtra times


मानव हा एक समाजप्रिय प्राणी आहे, असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. कुणी एकान्त प्रिय असला तरी तो बारा महिने चोवीस तास तसा राहू शकणार नाही. त्याच्या या वृत्तीमुळे कदाचित कुटुंबव्यवस्था तयार झाली असावी. कुणाशी तरी बोलावं, आपले विचार सांगावे ही आंतरिक गरज प्रत्येक मानवी जीवामध्ये असते. अगदी तान्हं मूलही याला अपवाद नाही.
नव्या जगात आलेलं प्रत्येक बालक सुरुवातीला आपल्या गरजा पूर्ण करण्यात, करवून घेण्यात मशगूल असतं. गरजा पूर्ण करण्यासाठी आई आसपास असते. या निमित्तानं आईशी निर्माण होणाऱ्या जवळीकीनं बालकाच्या सामाजिक गरजेची पूर्तता होते. सुरुवातीला भाषिक संवाद नसतोच. आईच्या मिठीमधून ‘मला तू आवडतोस’ ही भावना पोचते. बालकाचं वय वाढतं तसं दुसऱ्या-तिसऱ्या वयातलं मूल बघणाऱ्याच्या नजरेला नजर मिळवतं, बोललेल्या शब्दांना हुंकारानं उत्तर देतं. ऐकलेसे शब्द व हुंकार या संवादातून मूल ऐकलेले शब्द उच्चारायला शिकतं. दोन ते अडीच वर्षे वयाचं मूल भोवतीच्या व्यक्तींशी शब्दांनी संवाद साधू लागतं.

खरं तर संवादाच्या व्याख्येमध्ये ‘चेहऱ्यावरचे भाव, हावभाव, खुणा व बोललेली भाषा यांच्या माध्यमातून माहितीची दे‍वाण-घेवाण’ असं संमिलित असतं.

संवादामध्ये एक व्यक्ती बोलणारी व एक ऐकणारी अशा किमान दोघांची गरज असते. बोलणाऱ्या व्यक्तीनं बोललेले शब्द, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, हावभाव हे कान व डोळे या माध्यमातून मेंदूपर्यंत पोचवले जातात. या सगळ्या गोष्टींच्या समन्वयातून व ऐकणाऱ्याच्या आकलनक्षमतेनुसार ऐकणाऱ्याचा मेंदू अर्थ लावतो. बोलणाऱ्याची व ऐकणाऱ्याची भाषा, अनुभव, मानसिक परिस्थिती, भावनिक संतुलन यावर ऐकलेल्या शब्दाचं आकलन होत असतं.

बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणाऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी बोलणाऱ्या व्यक्तीजवळ संवाद कौशल्याची गरज असते. बोलणाऱ्याजवळ ही कला नसेल तर बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणारा ऐकतो खरा, पण त्याचा योग्य अर्थ त्याच्यापर्यंत पोचत नाही. यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि बोलणाऱ्याला ‘मला असं म्हणायचं नव्हतं’ असं बोलून क्षमा मागावी लागते.

जो उत्तम वक्ता असतो तो त्याला अपेक्षित असलेला संदेश सगळ्या श्रोत्यांपर्यंत तंतोतंत पोचविण्यात यशस्वी होत असतो. त्यानी सांगितलेल्या विनोदाला श्रोते हसून दाद देतात. एखादा विचार आवडला तर टाळ्या वाजवून प्रतिक्रिया देतात. अपेक्षित क्षणी बोललेल्या भाष्याला अपेक्षित प्रतिसाद मिळणं ही संवाद कौशल्याची पावती असते. चांगला वक्ता अशावेळी आपलं बोलणं योग्य वेळी थांबवतो व त्यावेळी अपेक्षित असलेला प्रतिसाद हंशा किंवा टाळ्या या स्वरूपात मिळतो.

व्याख्यात्यांचा कौशल्याचा वापर एका वेळी अनेक श्रोत्यांसाठी असतो. रोजच्या व्यवहारामध्ये घरी. नातेवाइकांमध्ये कार्यालयांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये, डॉक्टरांच्या दवाखान्यात, दुकानांमध्ये या संवाद कौशल्याचा उपयोग होत असतो. संवाद कौशल्य असेल तर माणसं भावनिकरित्या जोडली जातात. एखादा व्यावसायिक, एखादा डॉक्टर, एखादा विक्रेता यशस्वी होण्यामागे त्याच्यातील संवाद कौशल्याचा मोलाचा वाटा असतो.

संवाद कौशल्य हे जन्मजात नसतं, अनुवांशिकरित्याही मिळत नसतं. त्यासाठी घरचं पोषक वातावरण, शाळा-कॉलेजातील शिक्षकांचं मार्गदर्शन, संबंधित व्यक्तीचं वाचन, भाषेवरील प्रभुत्व, त्याचं आत्मभान, आत्मविश्वास, सहसंवेदना ही जीवन कौशल्ये या सगळ्या घटकांचं योगदान असतं.
संवाद म्हणजे आदान - प्रदान, देवाण - घेवाण, संप्रेषण, संज्ञापन इत्यादी. थोडक्यात संवाद म्हणजे आपल्या मतांचा केलेला आदान - प्रदान किंवा देवाण - घेवाण होय.
"एका व्यक्तीद्वारे इतर व्यक्तीकडे अथवा व्यक्ती समूहा कडे चिन्हाद्वारे माहितीचे प्रेषण किंवा प्रक्षेपण होय."
"संदेशा द्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद".
संवाद हि संस्कृतीशी संबधित प्रक्रिया आहे. याचाच अर्थ ज्या व्यक्तीला संवाद साधायचा आहे. तिची आणि ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे या दोघांचीही संस्कृतिक पार्श्वभूमी एकच असल्यास संवाद अधिक प्रभावी होतो.
ज्यावेळी विविध प्रसार माध्यमांचा वापर करून संवाद केला जातो व तो संदेश खूप लोकापर्यंत पोहोचविला जातो त्यास जनसंज्ञापन म्हणतात.मानवी जीवनामध्ये संवादाला खूप महत्वाचे स्थान आहे. संवादाला मानवी जीवनामध्ये फार महत्वाचे स्यान आहे. संवामुळे विचारांची देवाण घेवाण होते.
संवाद हा परस्परांमध्ये होणे खूपच गरजेचा असतो. कारण कोणताही मनुष्य हा एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय राहूच शकत नाही. [१]

=संवादाचे प्रकारसंपादन करा

१) आत्म संवाद - प्रत्येक व्यक्ती दर क्षणाला स्वत:शी एक संवाद साधत असते, म्हणजे प्रत्येक क्षणी त्या-त्या प्रसंगानुसार आपल्या मनात विचार येत असतात. आणि तो आपल्या विवेक बुद्धीच्या जोरावर त्या-त्या प्रसंगाचे मूल्यमापन करीत असतो, आणि त्या नुसार तो निर्णय घेत असतो. स्वतालाच प्रश्न विचारणे, स्वत उत्तर देणे म्हणजे स्वतःलाच संप्रेषकाची भूमिका आणि श्रोत्याची भूमिका दोन्ही असते. या आत्मसंवादाच्या प्रक्रियेत एक आणि केवळ एकच व्यक्ती सामील होते.
२) द्वीव्य्क्तीय संवाद - दोन व्यक्तींमधील संवाद यात सहसा तिसरा व्यक्ती सामील नसतो. हा संवाद व्यक्तिगत,थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो. ज्यात शब्द,हातवारे ए.चा वाव असतो.या संवादामुळे व्यक्तीचे मन वळवणे,तसेच एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होते.या संवादामध्ये मौखिक आणि अमौखिक संवाद शक्य असतो. तसेच तात्काळ प्रतिसादही मिळतो.
३) समूह संवाद - जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्तींचा समूह तयार होतो, यात समूहाच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त संख्या ठरत असते. सदर संवाद हा नियंत्रित वातावरणात पार पडते.द्वीव्य्क्तीय संवादाच्या वैशिष्ट्यांचे कमी प्रमाणात असलेले अस्तित्व हे समूह संवादाच्या ठळक वैशिष्ट्य असते.
४) जनसंवाद - समूह संवादाचे रूप म्हणजे जनसंवाद. यामध्ये संप्रेषक आणि श्रोता यांचा थेट संवाद प्रस्थापित न होता तो एखाद्या जनसंवाद माध्यमाद्वारे प्रस्थापित होतो. हा थेट संवाद नसल्यामुळे संप्रेषक आणि श्रोता एकमेकांना ओळख्त नाहीत, त्यामुळे संवादाछ म्हणावा तसा प्रभाव श्रोत्यांवर होत नाही आणि श्रोत्यांची प्रतिक्रिया देखील संप्रेषकाकडे उशिरा पोह्चते.

संवाद कौशल्याची गरज

talklng-skill माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये तणावाचे व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन यांचे जसे महत्त्व असते तसे संवाद कौशल्याचे महत्त्व असते. विशेषतः राजकारणामध्ये गोड बोलणारा माणूस यशस्वी होतो. ज्याच्या जिभेवर खडीसाखर असते तो राजकारणात पुढे जातो आणि जो नेहमी मस्तीत बोलतो आणि लोकांचा उपमर्द करून बोलतो तो राजकारणात नेहमीच अडचणीत येतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे संवाद कौशल्य याबाबतीत अफलातून होते. सध्या कॉंग्रेसची सद्दी सुरू नसली तरी सुशीलकुमार शिंदे हे नेते सतत राजकारणात वर चढत गेलेले दिसतात. न्यायालयात शिपायाची नोकरी करणारे शिंदे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि शेवटी केंद्रीय गृहमंत्री झाले. त्यांच्या परिस्थितीचा फार तपशीलात आढावा घेण्याची गरज नाही. परंतु त्यांच्या या विकासामध्ये त्यांचे संवाद कौशल्य हे सर्वाधिक उपयोगी पडलेले आहे.
शिवाजी महाराजांचे संवाद कौशल्य फार जबरदस्त होते. असे अनेकदा सांगितले जाते. त्याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. संत रामदास स्वामींनी याचे महत्त्व ओळखलेले होते. म्हणून ते म्हणत असत, अरे म्हणता कारे येते बोलल्यासारखे उत्तर येते | मग कठोर बोलावे ते काय कारणे ॥ आपण लोकांना ज्या शब्दात बोलू त्या शब्दात त्यांच्याकडून उत्तर येते. कधी कधी ते ताबडतोब येत नाही. परंतु शब्दाने दुखावला गेलेला माणूस पुढे आयुष्यात कधी तरी त्या शब्दाची परतफेड कोणत्याही प्रकारे केल्याशिवाय राहत नाही. सध्या छगन भुजबळ अडचणीत आहेत. त्यामागे हेच कारण आहे. त्यांनी हातात सत्ता असताना अनेकांना दुखावले. ते सतत गुर्मीत बोलत असत. त्यांनी दुखावलेल्या लोकांनीच त्यांना अडचणीत आणले आहे असे अनेक पत्रकारांचे म्हणणे आहे.
सध्या अजितदादा पवार यांच्याबाबत एक हकीकत चर्चिली जात आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि फडणवीस सरकार आपल्यामागे का लागले आहे असा सवाल त्यांना केला. तेव्हा फडणवीस यांनी हात वर केले आणि अजित पवार यांच्या मागे लागलेला ससेमिरा आपल्यामुळे नसून आर. आर. पाटील यांच्यामुळे आहे असे सांगितले. त्या संबंधातली फाईलसुध्दा फडणवीस यांनी अजितदादा यांना दाखवली आणि ती पाहिल्यानंतर अजित पवार यांनी कपाळावर हात मारून घेतला. अशी एक बातमी काही वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे. आर. आर. पाटील यांनी कारवाईचा आग्रह धरला आणि गृहमंत्री या नात्याने केवळ अजित पवारच नव्हे तर छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या सोळा नेत्यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कारवाईखाली चौकशी करण्याची मागणी करणारी फाईल नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवली.
हे सगळे ऐकले म्हणजे माणसाचे बोलणे त्याला किती महागात पडते याचे प्रत्यंतर येते. मागे एकदा जाहीर सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांचा भर सभेत तंबाखू खाण्यावरून अपमान केला होता. एवढेच नव्हे तर आपण स्वतः कसे हजारोंच्या मताधिक्क्याने निवडून येतो आणि आर. आर. पाटलांना मात्र २-३ हजारांच्या लीडसाठी किती आटापिटा करावा लागतो असे म्हणून त्यांचा पाणउतारा केला होता. त्यावर आर. आर. पाटलांनी थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली खरी परंतु हा अपमान आणि सल त्यांच्या मनामध्ये नक्कीच ठसठसत राहिलेला असला पाहिजे आणि त्यापोटीच त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा वापर करून अजित पवार यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेतला असला पाहिजे. राजकारणात बोलताना कसे सावध राहिले पाहिजे याचा हा धडाच आहे.
राजकारणातले काही नेते हाती सत्ता येताच मग्रूर होतात आणि बड्या बड्या लोकांचा सतत अपमान करत राहतात. लोकांशी अतीशय ताठ्याने वागतात. ताठ्याने बोलतात. पण सत्ता ही कायम राहत नसते. हे त्यांच्या लक्षात येत नाही. सत्ता जाताच ते उघडे पडतात आणि मग एखादा दुखावलेला माणूस त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन कधीतरी डंख मारतो. तेव्हा सत्तेवर असताना लोकांशी इतक्या नम्रपणे बोलले पाहिजे आणि लोकांची एवढी कामे केली पाहिजेत की सत्तेवर गेल्यानंतरसुध्दा लोकांनी त्यांचा आदरच केला पाहिजे. राजकारणात हे सर्वांनाच जमत नाही परंतु ज्यांना जमते त्यांच्याविषयी आपण किती चांगले ऐकतो. ते सत्तेवरून गेले तरी सर्वत्र त्यांचे मित्र असतात आणि त्यांची कामे होतच राहतात.

काव्य आणि संवाद कौशल्य

नाना पाटेकर म्हणजे अभिनय क्षेत्रातील एक उच्चस्थ शिखर  त्यातही संवाद कौशल्य म्हणजे  परमोच्च  बिंदू. अनेक चित्रपटातील संवाद त्या  मुळेच  अजरामर झाले आहेत. क्रांतिवीर , यशवंत, परिंदा,वजूद , थोडासा रुमानी हो जाय  अश्या अनेक चित्रपटाची यादी  देता येईल. अमोल पालेकरच्या थोडासा रुमानी हो जाय मधील नानांचा  हा संवाद म्हणजे सुंदर काव्य आणि संवाद कौशल्य याचा सुरेख मिलाफ.
हां मेरे दोस्त वही बारिश वही बारिश जो आसमान से आती है बूंदों मैं गाती है पहाड़ों से फिसलती है नदियों मैं चलती है नहरों मैं मचलती है कुंए पोखर से मिलती है खप्रेलो पर गिरती है गलियों मैं फिरती है मोड़ पर संभालती है फिर आगे निकलती है वही बारिश                    ये बारिश अक्सर गीली होती है                    इसे पानी भी कहते हैं                    उर्दू में आप                    मराठी में पानी                    तमिळ में कन्नी                    कन्नड़ में नीर                    बंगला में… जोल केह्ते हैं                    संस्‍कृत में जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते हैं                    ग्रीक में इसे aqua pura                    अंग्रेजी में इसे water                    फ्रेंच में औ’                    और केमिस्ट्री में H2O केह्ते हैं ये पानी आंखों से ढलता है तो आंसू कहलता है लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है और कभी कभी यह पानी सरकारी फाइलों में अपने कुंए समेत चोरी हो जाता है                 पानी तो पानी है पानी जिन्दगानी है                 इसलिए जब रूह की नदी सूखी हो                 और मन का हिरण प्यासा हो                 दीमाग में लगी हो आग                 और प्यार की घागर खाली हो तब मैं….हमेशा ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूं मेरी मानिए तो ये बारिश खरीदिये सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश सिर्फ 5 हज़ार रुपये में इस्से कम में दे कोई तो चोर की सज़ा वो  मेरी आपकी जूती सिर पर मेरी मेरी बारिश खरीदये सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश
दुसरी अशीच एक कविता आहे वजूद मधील 
कैसे बताऊं मैं तुम्हे?
मेरे लिए तुम कौन हो?, कैसे बताऊं?
कैसे बताऊं मैं तुम्हे
     तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो
     तुम ज़िंदगी तुम बंदगी, तुम रोशनी तुम ताज़गी
     तुम हैर ख़ुशी तुम प्यार हो, तुम प्रीत हो मनमीत हो....!
आँखों में तुम यादों में तुम, साँसों में तुम आहों में तुम
नींदों में तुम ख्वाबों में तुम
तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में
तुम सुबाह में तुम शाम में, तुम सोच में तुम काम में......!
मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम
मेरे लिए हासना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम
और जागना सोना भी तुम जाऊं कहीं देखूं कहीं
तुम हो वहाँ तुम हो वहीं कैसे बताऊं मैं तुम्हे?, तुम बीन तो मैं कुछ भी नहीं
कैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो?
ये जो तुम्हारा रूप है ये ज़िंदगी की धूप है
चंदन से तराशा है बदन, बहती है जिस में एक अगन
ये शोखियाँ ये मस्तियाँ, तुमको हवाओं से मिली
ज़ूल्फें घटाओं से मिली होंठों में कालियाँ खिल गयी आँखों को झीले मिल गयी
चेहरे में सिमटी चाँदनी, आवाज़ में है रागिनी
शीशे के जैसा अंग है फूलों के जैसा रंग है
नदियों के जैसी चाल है क्या हुस्न है क्या हाल है
ये जिस्म की रंगीनियाँ जैसे हज़ारों तितलियाँ
बाहों की ये गोलाईयाँ, आँचल में ये पार्चछाइयाँ
ये नगरियाँ है ख्वाब की, कैसे बताऊं मैं तुम्हे, हालत दिल-ए-बेताब की
कैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो? कैसे बताऊं, कैसे बताऊं
कैसे बताऊं मैं तुम्हे?
मेरे लिए तुम धरम हो, मेरे लिए ईमान हो
तुम ही इबादत हो मेरी, तुम ही तो चाहत हो मेरी
तुम ही मेरा अरमान हो ताकता हूँ मैं हर पल जिससे, तुम ही तो वो तस्वीर हो
तुम ही मेरी तक़दीर हो, तुम ही सीतारा हो मेरा तुम ही नज़ारा हो मेरा
यू ध्यान में मेरे हो तुम, जैसे मुझे घेरे हो तुम
पूरब में तुम पश्चिम में तुम, उतर में तुम दक्षिण में तुम
सारे मेरे जीवन में तुम, हर पल में तुम हर छिन में तुम
मेरे लिए रास्ता भी तुम, मेरे लिए मंज़िल भी तुम
मेरे लिए सागर भी तुम, मेरे लिए साहिल भी तुम
मैं देखता बस तुमको हो, मैं सोचता बस तुमको हूँ
मैं जानता बस तुमको हूँ, मैं मानता बस तुमको हूँ
तुम ही मेरी पहचान हो कैसे बताऊं मैं तुम्हे देवी हो तुम मेरे लिए मेरे लिए भगवान
हो कैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो?
कैसे.............?
तिसरी  दामोदर कोरे ची कविता  त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलेली 
वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे          कधी बाजारी कधी नदीच्या काठी          राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी          हळु थबकत जावे कधी कानोसा घेत          कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लावून अंगुली कलिकेला हळुवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार परि जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा         गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर         झुळ्झुळ झर्‍याची पसरावी चौफेर         शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत         खुलवीत मखमली तरंग जावे गात वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज कणसांच्या कानी सांगावे हितगूज शिंपावी डोही फुले बकुळीची सारी गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी           दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी           टवटवी मुखावर आणावी बिलगोनी           स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा           घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा. 
आपण सर्वांनी या कविता ऐकल्या असतीलच कविता वाचून पुन्हा एकदा युट्युब वर बघा,  ऐकणे एक  मैफिल होऊन जाईल.

सकारात्मक संवाद साधताना..

बोलताना तुमचा पवित्रा नीट असावा. बोलताना तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या हालचालींवर नियंत्रण असावे.बोलताना तुमची देहबोली व्यक्त व्हायला हवी. हावभावांमधून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील खुलेपणा आणि ऊब जाणवते.

.. या गोष्टींचा सराव करा.
 • बोलताना समोरच्याकडे बघत बोला. अर्थात समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलणे म्हणजे त्यांच्याकडे रोखून बघणे नव्हे. यामुळे समोरची व्यक्ती अस्वस्थ होते. सतत डोळ्यात रोखून बघणे किंवा अजिबातच नजरानजर न करणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या ठरतात. बोलताना मध्येच तितकासा महत्त्वाचा मुद्दा नसल्यास समोरच्या व्यक्तीवरून नजर हटवता येईल. सतत त्या व्यक्तीशी नजर मिळवत बोलणे हे विरोधाचे लक्षण मानले जाते.
 • बोलताना तुमचा पवित्रा नीट असावा. बोलताना तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या हालचालींवर नियंत्रण असावे.  विशेषत: मानेच्या, खांद्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवा, कारण त्यातून तुमच्या बोलण्यातील सकारात्मकता अथवा विरोध दिसून येतो. पाठ सरळ असावी म्हणजे खांदे आपोआपच मागे जातात आणि त्यातून तुमचा आत्मविश्वास व्यक्त होतो. तुमच्या बोलण्यात ताण जाणवायला नको. देहबोलीबाबत जागरूक राहा आणि शांतपणे बोला.
 • बोलताना तुमची देहबोली व्यक्त व्हायला हवी. हावभावांमधून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील खुलेपणा आणि ऊब जाणवते. दोन्ही हात मोकळे ठेवत, तळवे खुले ठेवून बोलणे, खुल्या हातांच्या गोलाकार हालचाली करणे, हसणे, नाक मुडपणे इत्यादी.
 • बोलताना अस्पष्टता टाळा. तुम्हाला जे म्हणायचेय ते सुस्पष्ट पद्धतीने बोला. चाचपडत बोलू नका.
 • शांतता बाळगणे हे एक साधन आहे. बोलताना पॉजचा सहेतुक वापर करा. मोठय़ा समुदायासमोर बोलताना अशा विरामांचा उपयोग होऊ शकतो.
 • मी’ या शब्दाचा अधिकाधिक उपयोग करा- समोरच्याला उद्देशून बोलताना तू हा शब्द कमीत कमी वापरा. तू या शब्दाचा अधिक वापर केल्याने बोलणाऱ्याच्या शब्दाची पकड, नियंत्रण कमी होते आणि ऐकणाऱ्याचे महत्त्व वाढते.
 • अं.., म्हणजे, तुम्हाला माहीत असेलच, हं.. असे शब्द सारखे वापरणे, वाक्याचा शेवटचा शब्द आणि दुसरे वाक्य यांत पॉज न घेणे.. हे टाळायला हवे. पुटपुटण्यापेक्षा मध्ये पॉज घेण्याचा सराव करा. बोलताना मधली शांतता टाळण्यासाठी उगीचच काही ना काही बोलत राहणे, तोंडातल्या तोंडात पुटपुटणे, गोलगोल बोलणे, मोठमोठाली वाक्ये न थांबता बोलणे.. यांतून संवाद घडत नाही, उलट तो थांबण्याचीच शक्यता अधिक असते.
 • योग्य भाषा वापरा. उगीचच शपथा घेऊ नका किंवा उद्धटपणे बोलू नका. अर्वाच्च भाषेच्या वापरातून सकारात्मकता दिसून येत नाही. उलट त्यातून तुमचा तिरसट स्वभाव आणि असमंजसपणा आणि बेजबाबदार वृत्ती दिसून येते.
 • बोलताना तुमच्या टोनवर लक्ष असू द्या. तो नेहमीच मध्यम असावा.
 • रडू येईल किंवा राग येतोय.. असे तुम्हाला वाटले तर खोलवर श्वास घ्या..
 • बोलताना तुमच्या आवाजाकडे लक्ष द्या. तो खूपच मृदू असला तर तुम्ही आपल्यापासून काहीतरी लपवत आहात, अशी समोरच्या व्यक्तीची भावना होते. जर तुम्ही खूपच मोठय़ा आवाजात बोललात तर समोरच्याच्या मनात तुमच्याविषयी कडवटपणा येतो अथवा ते दबून जातात.
 • हे लक्षात असू दे की, समोरच्यासमोर तुमच्या सादर होणाऱ्या व्यक्तिमत्त्वाकरता तुम्हीच जबाबदार आहात, इतर कुणीही नाही.
 • भावना स्पष्टपणे व्यक्त करा. सतत इतरांची संमती आवश्यक वाटते असा जर तुमचा स्वभाव असेल तर ही सवय तुमची एका रात्रीत जाणार नाही, पण प्रयत्नांनी नक्कीच जाऊ शकेल. घडून गेलेल्या काही घटनांमध्ये तुमचा प्रतिसाद कसा होता, हे वारंवार तपासा. त्या वेळचा तुमचा प्रतिसाद आणि आताचा प्रतिसाद यांतील फरक जाणून घ्या. आपण कसे वागलो आणि आपल्याला कसे वागायला हवे होते.. हे सतत पडताळत राहायला हवे. यातूनच आपली भावनिक आणि वर्तणुकीतील प्रगती शक्य होते. समोरच्याला खूश करण्याची सवय सोडायला हवी.
 • ओरडून बोलू नका किंवा असे काही बोलू नका, ज्याचा नंतर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल. हा सोपा पर्याय वाटतो खरा, मात्र आठवणींमध्ये डोकावून पाहिले तर त्या घटनेच्या नुसत्या आठवणीनेही बोलणाऱ्याचे किंवा ऐकणाऱ्याचेही पित्त खवळते, राग- राग येतो.
 • जर बाचाबाची होऊन वातावरण गरम झाले तर थोडा विश्रांतीसाठी वेळ घ्या. इतरांकरिता नाही तर तुम्हाला थकवा आला आहे, तुम्ही गोंधळून गेले आहात असे स्पष्ट करून प्रतिसादासाठी तुम्हाला अवधी हवा आहे आणि थोडय़ा वेळानंतर आपण संवाद पुढे सुरू ठेवू या.. असे सांगता येईल.
 • सकारात्मक पद्धतीने संवाद साधायला शिकण्यास वेळ लागतो. पण हार मानण्याचे कारण नाही. दररोजच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये वागण्याबोलण्याचा सराव करा.
हे करा..
 • देहबोली सकारात्मक असू द्या. समोरच्या व्यक्तीशी नजर मिळवत बोला.
 • खोलवर श्वास घ्या आणि बोला. शांतपणे, सावकाश आणि समोरच्याला ऐकू जाईल अशा पद्धतीने बोला.
 • समोरच्यांचे लक्ष नसेल तर त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करा. तुमचा मुद्दा मांडा आणि लक्ष देण्याची विनंती करा.
 • तुम्हाला काय साध्य करायचेय हे तुमच्या ध्यानात असू द्या. त्यानुसार बोलण्यावर लक्ष केंद्रित करा.
 • तुमचे मत निर्भीडपणे मांडा.
 • समोरच्या व्यक्तींशी नेहमीच आदराने बोला.
हे करू नका..
 • खाली पाहू नका.
 • आवाज कापरा नको.
 • भराभर बोलू नका.
 • पेहराव अजागळ नको.
 • एकच मुद्दा वारंवार फिरवून फिरवून बोलू नका.
 • अस्पष्ट, पसरट बोलू नका.
 • बोलताना कुणावर दोषारोप करू नका.
 • बोलताना आक्रमक होऊ नका.
 • समोरच्याचा अंदाज घेत, चाचपडत बोलू नका.
 • बोलण्यात आक्रस्ताळेपणा नको.
सकारात्मक संवाद म्हणजे काय?
 • सकारात्मक संवाद म्हणजे तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नेमक्या गरजा काय आहेत, ते आवाज न चढवता सांगणे.
 • तुम्ही कुणावर अन्याय तर करीत नाही ना, कुणाला घालून-पाडून बोलत नाही ना, तिरकस टोमणे मारत नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. तुमचे बोलणे ऐकून समोरच्याला काय वाटेल, हे तुम्ही समजून घ्यायला हवे. अन्यथा, अशा बोलण्याने तुम्हालाच नंतर दुर्बल वाटू शकते.
 • श्रोत्याला दुखवायचे नाही हे लक्षात घेत बोलताना तुम्हाला संकोच वाटणे हे समजण्यासारखे आहे. मात्र, सहभाव म्हणून नाही तर भीतीपोटी जर तुम्ही बोलायला संकोचत असाल तर तो तुमच्या व्यक्तिमत्त्वातील नकारात्मक भाग झाला आणि त्यावर तुम्ही काम करायला हवे.
मोकळेपणाने बोला..
आपण काही करण्याआधी अथवा बोलण्याआधी आपल्या कृतीला, वक्तव्याला लोकांची मान्यता मिळावी, असा प्रयत्न आपल्यातील अनेक जण करतात. अशा वागण्याने अथवा बोलण्याने समोरची व्यक्ती चिडेल का, असा आपण विचार करतो. जरी आपण योग्य बोलत अथवा करत असू तरीही समोरच्याचा आकस ओढवेल अशा गोष्टी करायच्या अथवा बोलायच्या आपण टाळतो, आपण आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करत नाही. आपल्याबद्दल इतरांना काय वाटेल याची चिंता न करता आपण गोष्टी केल्या अथवा बोलल्या तर त्यातून सकारात्मकता दिसून येते आणि त्यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपणा, ठामपणा अधोरेखित होतो.
ताण येऊ नये म्हणून..
संवाद साधताना जर तुम्हाला ताण येत असेल किंवा दडपण येऊन तुम्ही नेहमी आपल्या भावना दाबून ठेवत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीराच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो आणि ते दबून जातात.  व्यायाम यावर चांगला उपाय ठरू शकतो. अशा स्नायूंना शिथिल करण्याकरिता व्यायाम उपयोगी ठरतो. व्यायामाने आपल्या भावना मोकळ्या व्हायला मदत होते, आपला आत्मविश्वास वाढतो.  श्वसनक्रिया सुधारते. तुमचा पवित्रा अधिक सकारात्मक होतो.
सरावासाठी..
 • खोलवर श्वास घेण्याचा सराव करा.
 • आरशात बघून बोलण्याचा सराव करा.
 • कुटुंबीय अथवा मित्रमैत्रिणी यांच्यासोबत बोलण्याचा सराव करा
.- अपर्णा राणे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...