संवाद कौशल्य
Maharashtra Times | Updated: 18 Sep 2017, 04:00 AM
बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणाऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी बोलणाऱ्या व्यक्तीजवळ संवाद कौशल्याची गरज असते. बोलणाऱ्याजवळ ही कला नसेल तर बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणारा ऐकतो खरा, पण त्याचा योग्य अर्थ त्याच्यापर्यंत पोचत नाही. यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात.

मानव हा एक समाजप्रिय प्राणी आहे, असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. कुणी एकान्त प्रिय असला तरी तो बारा महिने चोवीस तास तसा राहू शकणार नाही. त्याच्या या वृत्तीमुळे कदाचित कुटुंबव्यवस्था तयार झाली असावी. कुणाशी तरी बोलावं, आपले विचार सांगावे ही आंतरिक गरज प्रत्येक मानवी जीवामध्ये असते. अगदी तान्हं मूलही याला अपवाद नाही.
नव्या जगात आलेलं प्रत्येक बालक सुरुवातीला आपल्या गरजा पूर्ण करण्यात, करवून घेण्यात मशगूल असतं. गरजा पूर्ण करण्यासाठी आई आसपास असते. या निमित्तानं आईशी निर्माण होणाऱ्या जवळीकीनं बालकाच्या सामाजिक गरजेची पूर्तता होते. सुरुवातीला भाषिक संवाद नसतोच. आईच्या मिठीमधून ‘मला तू आवडतोस’ ही भावना पोचते. बालकाचं वय वाढतं तसं दुसऱ्या-तिसऱ्या वयातलं मूल बघणाऱ्याच्या नजरेला नजर मिळवतं, बोललेल्या शब्दांना हुंकारानं उत्तर देतं. ऐकलेसे शब्द व हुंकार या संवादातून मूल ऐकलेले शब्द उच्चारायला शिकतं. दोन ते अडीच वर्षे वयाचं मूल भोवतीच्या व्यक्तींशी शब्दांनी संवाद साधू लागतं.
खरं तर संवादाच्या व्याख्येमध्ये ‘चेहऱ्यावरचे भाव, हावभाव, खुणा व बोललेली भाषा यांच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण’ असं संमिलित असतं.
संवादामध्ये एक व्यक्ती बोलणारी व एक ऐकणारी अशा किमान दोघांची गरज असते. बोलणाऱ्या व्यक्तीनं बोललेले शब्द, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, हावभाव हे कान व डोळे या माध्यमातून मेंदूपर्यंत पोचवले जातात. या सगळ्या गोष्टींच्या समन्वयातून व ऐकणाऱ्याच्या आकलनक्षमतेनुसार ऐकणाऱ्याचा मेंदू अर्थ लावतो. बोलणाऱ्याची व ऐकणाऱ्याची भाषा, अनुभव, मानसिक परिस्थिती, भावनिक संतुलन यावर ऐकलेल्या शब्दाचं आकलन होत असतं.
बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणाऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी बोलणाऱ्या व्यक्तीजवळ संवाद कौशल्याची गरज असते. बोलणाऱ्याजवळ ही कला नसेल तर बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणारा ऐकतो खरा, पण त्याचा योग्य अर्थ त्याच्यापर्यंत पोचत नाही. यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि बोलणाऱ्याला ‘मला असं म्हणायचं नव्हतं’ असं बोलून क्षमा मागावी लागते.
जो उत्तम वक्ता असतो तो त्याला अपेक्षित असलेला संदेश सगळ्या श्रोत्यांपर्यंत तंतोतंत पोचविण्यात यशस्वी होत असतो. त्यानी सांगितलेल्या विनोदाला श्रोते हसून दाद देतात. एखादा विचार आवडला तर टाळ्या वाजवून प्रतिक्रिया देतात. अपेक्षित क्षणी बोललेल्या भाष्याला अपेक्षित प्रतिसाद मिळणं ही संवाद कौशल्याची पावती असते. चांगला वक्ता अशावेळी आपलं बोलणं योग्य वेळी थांबवतो व त्यावेळी अपेक्षित असलेला प्रतिसाद हंशा किंवा टाळ्या या स्वरूपात मिळतो.
व्याख्यात्यांचा कौशल्याचा वापर एका वेळी अनेक श्रोत्यांसाठी असतो. रोजच्या व्यवहारामध्ये घरी. नातेवाइकांमध्ये कार्यालयांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये, डॉक्टरांच्या दवाखान्यात, दुकानांमध्ये या संवाद कौशल्याचा उपयोग होत असतो. संवाद कौशल्य असेल तर माणसं भावनिकरित्या जोडली जातात. एखादा व्यावसायिक, एखादा डॉक्टर, एखादा विक्रेता यशस्वी होण्यामागे त्याच्यातील संवाद कौशल्याचा मोलाचा वाटा असतो.
संवाद कौशल्य हे जन्मजात नसतं, अनुवांशिकरित्याही मिळत नसतं. त्यासाठी घरचं पोषक वातावरण, शाळा-कॉलेजातील शिक्षकांचं मार्गदर्शन, संबंधित व्यक्तीचं वाचन, भाषेवरील प्रभुत्व, त्याचं आत्मभान, आत्मविश्वास, सहसंवेदना ही जीवन कौशल्ये या सगळ्या घटकांचं योगदान असतं.
संवाद म्हणजे आदान - प्रदान, देवाण - घेवाण, संप्रेषण, संज्ञापन इत्यादी. थोडक्यात संवाद म्हणजे आपल्या मतांचा केलेला आदान - प्रदान किंवा देवाण - घेवाण होय.
"एका व्यक्तीद्वारे इतर व्यक्तीकडे अथवा व्यक्ती समूहा कडे चिन्हाद्वारे माहितीचे प्रेषण किंवा प्रक्षेपण होय."
"संदेशा द्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद".
संवाद हि संस्कृतीशी संबधित प्रक्रिया आहे. याचाच अर्थ ज्या व्यक्तीला संवाद साधायचा आहे. तिची आणि ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे या दोघांचीही संस्कृतिक पार्श्वभूमी एकच असल्यास संवाद अधिक प्रभावी होतो.
ज्यावेळी विविध प्रसार माध्यमांचा वापर करून संवाद केला जातो व तो संदेश खूप लोकापर्यंत पोहोचविला जातो त्यास जनसंज्ञापन म्हणतात.मानवी जीवनामध्ये संवादाला खूप महत्वाचे स्थान आहे. संवादाला मानवी जीवनामध्ये फार महत्वाचे स्यान आहे. संवामुळे विचारांची देवाण घेवाण होते.
संवाद हा परस्परांमध्ये होणे खूपच गरजेचा असतो. कारण कोणताही मनुष्य हा एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय राहूच शकत नाही. [१]
=संवादाचे प्रकार
१) आत्म संवाद - प्रत्येक व्यक्ती दर क्षणाला स्वत:शी एक संवाद साधत असते, म्हणजे प्रत्येक क्षणी त्या-त्या प्रसंगानुसार आपल्या मनात विचार येत असतात. आणि तो आपल्या विवेक बुद्धीच्या जोरावर त्या-त्या प्रसंगाचे मूल्यमापन करीत असतो, आणि त्या नुसार तो निर्णय घेत असतो. स्वतालाच प्रश्न विचारणे, स्वत उत्तर देणे म्हणजे स्वतःलाच संप्रेषकाची भूमिका आणि श्रोत्याची भूमिका दोन्ही असते. या आत्मसंवादाच्या प्रक्रियेत एक आणि केवळ एकच व्यक्ती सामील होते. २) द्वीव्य्क्तीय संवाद - दोन व्यक्तींमधील संवाद यात सहसा तिसरा व्यक्ती सामील नसतो. हा संवाद व्यक्तिगत,थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो. ज्यात शब्द,हातवारे ए.चा वाव असतो.या संवादामुळे व्यक्तीचे मन वळवणे,तसेच एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होते.या संवादामध्ये मौखिक आणि अमौखिक संवाद शक्य असतो. तसेच तात्काळ प्रतिसादही मिळतो. ३) समूह संवाद - जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्तींचा समूह तयार होतो, यात समूहाच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त संख्या ठरत असते. सदर संवाद हा नियंत्रित वातावरणात पार पडते.द्वीव्य्क्तीय संवादाच्या वैशिष्ट्यांचे कमी प्रमाणात असलेले अस्तित्व हे समूह संवादाच्या ठळक वैशिष्ट्य असते. ४) जनसंवाद - समूह संवादाचे रूप म्हणजे जनसंवाद. यामध्ये संप्रेषक आणि श्रोता यांचा थेट संवाद प्रस्थापित न होता तो एखाद्या जनसंवाद माध्यमाद्वारे प्रस्थापित होतो. हा थेट संवाद नसल्यामुळे संप्रेषक आणि श्रोता एकमेकांना ओळख्त नाहीत, त्यामुळे संवादाछ म्हणावा तसा प्रभाव श्रोत्यांवर होत नाही आणि श्रोत्यांची प्रतिक्रिया देखील संप्रेषकाकडे उशिरा पोह्चते.
संवाद कौशल्याची गरज
माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये तणावाचे व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन यांचे जसे महत्त्व असते तसे संवाद कौशल्याचे महत्त्व असते. विशेषतः राजकारणामध्ये गोड बोलणारा माणूस यशस्वी होतो. ज्याच्या जिभेवर खडीसाखर असते तो राजकारणात पुढे जातो आणि जो नेहमी मस्तीत बोलतो आणि लोकांचा उपमर्द करून बोलतो तो राजकारणात नेहमीच अडचणीत येतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे संवाद कौशल्य याबाबतीत अफलातून होते. सध्या कॉंग्रेसची सद्दी सुरू नसली तरी सुशीलकुमार शिंदे हे नेते सतत राजकारणात वर चढत गेलेले दिसतात. न्यायालयात शिपायाची नोकरी करणारे शिंदे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि शेवटी केंद्रीय गृहमंत्री झाले. त्यांच्या परिस्थितीचा फार तपशीलात आढावा घेण्याची गरज नाही. परंतु त्यांच्या या विकासामध्ये त्यांचे संवाद कौशल्य हे सर्वाधिक उपयोगी पडलेले आहे.
शिवाजी महाराजांचे संवाद कौशल्य फार जबरदस्त होते. असे अनेकदा सांगितले जाते. त्याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. संत रामदास स्वामींनी याचे महत्त्व ओळखलेले होते. म्हणून ते म्हणत असत, अरे म्हणता कारे येते बोलल्यासारखे उत्तर येते | मग कठोर बोलावे ते काय कारणे ॥ आपण लोकांना ज्या शब्दात बोलू त्या शब्दात त्यांच्याकडून उत्तर येते. कधी कधी ते ताबडतोब येत नाही. परंतु शब्दाने दुखावला गेलेला माणूस पुढे आयुष्यात कधी तरी त्या शब्दाची परतफेड कोणत्याही प्रकारे केल्याशिवाय राहत नाही. सध्या छगन भुजबळ अडचणीत आहेत. त्यामागे हेच कारण आहे. त्यांनी हातात सत्ता असताना अनेकांना दुखावले. ते सतत गुर्मीत बोलत असत. त्यांनी दुखावलेल्या लोकांनीच त्यांना अडचणीत आणले आहे असे अनेक पत्रकारांचे म्हणणे आहे.सध्या अजितदादा पवार यांच्याबाबत एक हकीकत चर्चिली जात आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि फडणवीस सरकार आपल्यामागे का लागले आहे असा सवाल त्यांना केला. तेव्हा फडणवीस यांनी हात वर केले आणि अजित पवार यांच्या मागे लागलेला ससेमिरा आपल्यामुळे नसून आर. आर. पाटील यांच्यामुळे आहे असे सांगितले. त्या संबंधातली फाईलसुध्दा फडणवीस यांनी अजितदादा यांना दाखवली आणि ती पाहिल्यानंतर अजित पवार यांनी कपाळावर हात मारून घेतला. अशी एक बातमी काही वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे. आर. आर. पाटील यांनी कारवाईचा आग्रह धरला आणि गृहमंत्री या नात्याने केवळ अजित पवारच नव्हे तर छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या सोळा नेत्यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कारवाईखाली चौकशी करण्याची मागणी करणारी फाईल नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवली.हे सगळे ऐकले म्हणजे माणसाचे बोलणे त्याला किती महागात पडते याचे प्रत्यंतर येते. मागे एकदा जाहीर सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांचा भर सभेत तंबाखू खाण्यावरून अपमान केला होता. एवढेच नव्हे तर आपण स्वतः कसे हजारोंच्या मताधिक्क्याने निवडून येतो आणि आर. आर. पाटलांना मात्र २-३ हजारांच्या लीडसाठी किती आटापिटा करावा लागतो असे म्हणून त्यांचा पाणउतारा केला होता. त्यावर आर. आर. पाटलांनी थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली खरी परंतु हा अपमान आणि सल त्यांच्या मनामध्ये नक्कीच ठसठसत राहिलेला असला पाहिजे आणि त्यापोटीच त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा वापर करून अजित पवार यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेतला असला पाहिजे. राजकारणात बोलताना कसे सावध राहिले पाहिजे याचा हा धडाच आहे.राजकारणातले काही नेते हाती सत्ता येताच मग्रूर होतात आणि बड्या बड्या लोकांचा सतत अपमान करत राहतात. लोकांशी अतीशय ताठ्याने वागतात. ताठ्याने बोलतात. पण सत्ता ही कायम राहत नसते. हे त्यांच्या लक्षात येत नाही. सत्ता जाताच ते उघडे पडतात आणि मग एखादा दुखावलेला माणूस त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन कधीतरी डंख मारतो. तेव्हा सत्तेवर असताना लोकांशी इतक्या नम्रपणे बोलले पाहिजे आणि लोकांची एवढी कामे केली पाहिजेत की सत्तेवर गेल्यानंतरसुध्दा लोकांनी त्यांचा आदरच केला पाहिजे. राजकारणात हे सर्वांनाच जमत नाही परंतु ज्यांना जमते त्यांच्याविषयी आपण किती चांगले ऐकतो. ते सत्तेवरून गेले तरी सर्वत्र त्यांचे मित्र असतात आणि त्यांची कामे होतच राहतात.
काव्य आणि संवाद कौशल्य
नाना पाटेकर म्हणजे अभिनय क्षेत्रातील एक उच्चस्थ शिखर त्यातही संवाद कौशल्य म्हणजे परमोच्च बिंदू. अनेक चित्रपटातील संवाद त्या मुळेच अजरामर झाले आहेत. क्रांतिवीर , यशवंत, परिंदा,वजूद , थोडासा रुमानी हो जाय अश्या अनेक चित्रपटाची यादी देता येईल. अमोल पालेकरच्या थोडासा रुमानी हो जाय मधील नानांचा हा संवाद म्हणजे सुंदर काव्य आणि संवाद कौशल्य याचा सुरेख मिलाफ.
हां मेरे दोस्त वही बारिश वही बारिश जो आसमान से आती है बूंदों मैं गाती है पहाड़ों से फिसलती है नदियों मैं चलती है नहरों मैं मचलती है कुंए पोखर से मिलती है खप्रेलो पर गिरती है गलियों मैं फिरती है मोड़ पर संभालती है फिर आगे निकलती है वही बारिश ये बारिश अक्सर गीली होती है इसे पानी भी कहते हैं उर्दू में आप मराठी में पानी तमिळ में कन्नी कन्नड़ में नीर बंगला में… जोल केह्ते हैं संस्कृत में जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते हैं ग्रीक में इसे aqua pura अंग्रेजी में इसे water फ्रेंच में औ’ और केमिस्ट्री में H2O केह्ते हैं ये पानी आंखों से ढलता है तो आंसू कहलता है लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है और कभी कभी यह पानी सरकारी फाइलों में अपने कुंए समेत चोरी हो जाता है पानी तो पानी है पानी जिन्दगानी है इसलिए जब रूह की नदी सूखी हो और मन का हिरण प्यासा हो दीमाग में लगी हो आग और प्यार की घागर खाली हो तब मैं….हमेशा ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूं मेरी मानिए तो ये बारिश खरीदिये सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश सिर्फ 5 हज़ार रुपये में इस्से कम में दे कोई तो चोर की सज़ा वो मेरी आपकी जूती सिर पर मेरी मेरी बारिश खरीदये सस्ती सुन्दर टिकाऊ बारिशदुसरी अशीच एक कविता आहे वजूद मधीलकैसे बताऊं मैं तुम्हे?मेरे लिए तुम कौन हो?, कैसे बताऊं?कैसे बताऊं मैं तुम्हेतुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत होतुम ज़िंदगी तुम बंदगी, तुम रोशनी तुम ताज़गीतुम हैर ख़ुशी तुम प्यार हो, तुम प्रीत हो मनमीत हो....!आँखों में तुम यादों में तुम, साँसों में तुम आहों में तुमनींदों में तुम ख्वाबों में तुमतुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात मेंतुम सुबाह में तुम शाम में, तुम सोच में तुम काम में......!मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुममेरे लिए हासना भी तुम, मेरे लिए रोना भी तुमऔर जागना सोना भी तुम जाऊं कहीं देखूं कहींतुम हो वहाँ तुम हो वहीं कैसे बताऊं मैं तुम्हे?, तुम बीन तो मैं कुछ भी नहींकैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो?ये जो तुम्हारा रूप है ये ज़िंदगी की धूप हैचंदन से तराशा है बदन, बहती है जिस में एक अगनये शोखियाँ ये मस्तियाँ, तुमको हवाओं से मिलीज़ूल्फें घटाओं से मिली होंठों में कालियाँ खिल गयी आँखों को झीले मिल गयीचेहरे में सिमटी चाँदनी, आवाज़ में है रागिनीशीशे के जैसा अंग है फूलों के जैसा रंग हैनदियों के जैसी चाल है क्या हुस्न है क्या हाल हैये जिस्म की रंगीनियाँ जैसे हज़ारों तितलियाँबाहों की ये गोलाईयाँ, आँचल में ये पार्चछाइयाँये नगरियाँ है ख्वाब की, कैसे बताऊं मैं तुम्हे, हालत दिल-ए-बेताब कीकैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो? कैसे बताऊं, कैसे बताऊंकैसे बताऊं मैं तुम्हे?मेरे लिए तुम धरम हो, मेरे लिए ईमान होतुम ही इबादत हो मेरी, तुम ही तो चाहत हो मेरीतुम ही मेरा अरमान हो ताकता हूँ मैं हर पल जिससे, तुम ही तो वो तस्वीर होतुम ही मेरी तक़दीर हो, तुम ही सीतारा हो मेरा तुम ही नज़ारा हो मेरायू ध्यान में मेरे हो तुम, जैसे मुझे घेरे हो तुमपूरब में तुम पश्चिम में तुम, उतर में तुम दक्षिण में तुमसारे मेरे जीवन में तुम, हर पल में तुम हर छिन में तुममेरे लिए रास्ता भी तुम, मेरे लिए मंज़िल भी तुममेरे लिए सागर भी तुम, मेरे लिए साहिल भी तुममैं देखता बस तुमको हो, मैं सोचता बस तुमको हूँमैं जानता बस तुमको हूँ, मैं मानता बस तुमको हूँतुम ही मेरी पहचान हो कैसे बताऊं मैं तुम्हे देवी हो तुम मेरे लिए मेरे लिए भगवानहो कैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो?कैसे.............?तिसरी दामोदर कोरे ची कविता त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलेलीवाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी हळु थबकत जावे कधी कानोसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लावून अंगुली कलिकेला हळुवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार परि जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर झुळ्झुळ झर्याची पसरावी चौफेर शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज कणसांच्या कानी सांगावे हितगूज शिंपावी डोही फुले बकुळीची सारी गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी टवटवी मुखावर आणावी बिलगोनी स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा.आपण सर्वांनी या कविता ऐकल्या असतीलच कविता वाचून पुन्हा एकदा युट्युब वर बघा, ऐकणे एक मैफिल होऊन जाईल.
सकारात्मक संवाद साधताना..
बोलताना तुमचा पवित्रा नीट असावा. बोलताना तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या हालचालींवर नियंत्रण असावे.
मंदार गुरव | November 4, 2015 05:10 pm
Xबोलताना तुमची देहबोली व्यक्त व्हायला हवी. हावभावांमधून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील खुलेपणा आणि ऊब जाणवते.
.. या गोष्टींचा सराव करा.
- बोलताना समोरच्याकडे बघत बोला. अर्थात समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलणे म्हणजे त्यांच्याकडे रोखून बघणे नव्हे. यामुळे समोरची व्यक्ती अस्वस्थ होते. सतत डोळ्यात रोखून बघणे किंवा अजिबातच नजरानजर न करणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या ठरतात. बोलताना मध्येच तितकासा महत्त्वाचा मुद्दा नसल्यास समोरच्या व्यक्तीवरून नजर हटवता येईल. सतत त्या व्यक्तीशी नजर मिळवत बोलणे हे विरोधाचे लक्षण मानले जाते.
- बोलताना तुमचा पवित्रा नीट असावा. बोलताना तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या हालचालींवर नियंत्रण असावे. विशेषत: मानेच्या, खांद्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवा, कारण त्यातून तुमच्या बोलण्यातील सकारात्मकता अथवा विरोध दिसून येतो. पाठ सरळ असावी म्हणजे खांदे आपोआपच मागे जातात आणि त्यातून तुमचा आत्मविश्वास व्यक्त होतो. तुमच्या बोलण्यात ताण जाणवायला नको. देहबोलीबाबत जागरूक राहा आणि शांतपणे बोला.
- बोलताना तुमची देहबोली व्यक्त व्हायला हवी. हावभावांमधून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील खुलेपणा आणि ऊब जाणवते. दोन्ही हात मोकळे ठेवत, तळवे खुले ठेवून बोलणे, खुल्या हातांच्या गोलाकार हालचाली करणे, हसणे, नाक मुडपणे इत्यादी.
- बोलताना अस्पष्टता टाळा. तुम्हाला जे म्हणायचेय ते सुस्पष्ट पद्धतीने बोला. चाचपडत बोलू नका.
- शांतता बाळगणे हे एक साधन आहे. बोलताना पॉजचा सहेतुक वापर करा. मोठय़ा समुदायासमोर बोलताना अशा विरामांचा उपयोग होऊ शकतो.
- मी’ या शब्दाचा अधिकाधिक उपयोग करा- समोरच्याला उद्देशून बोलताना तू हा शब्द कमीत कमी वापरा. तू या शब्दाचा अधिक वापर केल्याने बोलणाऱ्याच्या शब्दाची पकड, नियंत्रण कमी होते आणि ऐकणाऱ्याचे महत्त्व वाढते.
- अं.., म्हणजे, तुम्हाला माहीत असेलच, हं.. असे शब्द सारखे वापरणे, वाक्याचा शेवटचा शब्द आणि दुसरे वाक्य यांत पॉज न घेणे.. हे टाळायला हवे. पुटपुटण्यापेक्षा मध्ये पॉज घेण्याचा सराव करा. बोलताना मधली शांतता टाळण्यासाठी उगीचच काही ना काही बोलत राहणे, तोंडातल्या तोंडात पुटपुटणे, गोलगोल बोलणे, मोठमोठाली वाक्ये न थांबता बोलणे.. यांतून संवाद घडत नाही, उलट तो थांबण्याचीच शक्यता अधिक असते.
- योग्य भाषा वापरा. उगीचच शपथा घेऊ नका किंवा उद्धटपणे बोलू नका. अर्वाच्च भाषेच्या वापरातून सकारात्मकता दिसून येत नाही. उलट त्यातून तुमचा तिरसट स्वभाव आणि असमंजसपणा आणि बेजबाबदार वृत्ती दिसून येते.
- बोलताना तुमच्या टोनवर लक्ष असू द्या. तो नेहमीच मध्यम असावा.
- रडू येईल किंवा राग येतोय.. असे तुम्हाला वाटले तर खोलवर श्वास घ्या..
- बोलताना तुमच्या आवाजाकडे लक्ष द्या. तो खूपच मृदू असला तर तुम्ही आपल्यापासून काहीतरी लपवत आहात, अशी समोरच्या व्यक्तीची भावना होते. जर तुम्ही खूपच मोठय़ा आवाजात बोललात तर समोरच्याच्या मनात तुमच्याविषयी कडवटपणा येतो अथवा ते दबून जातात.
- हे लक्षात असू दे की, समोरच्यासमोर तुमच्या सादर होणाऱ्या व्यक्तिमत्त्वाकरता तुम्हीच जबाबदार आहात, इतर कुणीही नाही.
- भावना स्पष्टपणे व्यक्त करा. सतत इतरांची संमती आवश्यक वाटते असा जर तुमचा स्वभाव असेल तर ही सवय तुमची एका रात्रीत जाणार नाही, पण प्रयत्नांनी नक्कीच जाऊ शकेल. घडून गेलेल्या काही घटनांमध्ये तुमचा प्रतिसाद कसा होता, हे वारंवार तपासा. त्या वेळचा तुमचा प्रतिसाद आणि आताचा प्रतिसाद यांतील फरक जाणून घ्या. आपण कसे वागलो आणि आपल्याला कसे वागायला हवे होते.. हे सतत पडताळत राहायला हवे. यातूनच आपली भावनिक आणि वर्तणुकीतील प्रगती शक्य होते. समोरच्याला खूश करण्याची सवय सोडायला हवी.
- ओरडून बोलू नका किंवा असे काही बोलू नका, ज्याचा नंतर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल. हा सोपा पर्याय वाटतो खरा, मात्र आठवणींमध्ये डोकावून पाहिले तर त्या घटनेच्या नुसत्या आठवणीनेही बोलणाऱ्याचे किंवा ऐकणाऱ्याचेही पित्त खवळते, राग- राग येतो.
- जर बाचाबाची होऊन वातावरण गरम झाले तर थोडा विश्रांतीसाठी वेळ घ्या. इतरांकरिता नाही तर तुम्हाला थकवा आला आहे, तुम्ही गोंधळून गेले आहात असे स्पष्ट करून प्रतिसादासाठी तुम्हाला अवधी हवा आहे आणि थोडय़ा वेळानंतर आपण संवाद पुढे सुरू ठेवू या.. असे सांगता येईल.
- सकारात्मक पद्धतीने संवाद साधायला शिकण्यास वेळ लागतो. पण हार मानण्याचे कारण नाही. दररोजच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये वागण्याबोलण्याचा सराव करा.
हे करा..
- देहबोली सकारात्मक असू द्या. समोरच्या व्यक्तीशी नजर मिळवत बोला.
- खोलवर श्वास घ्या आणि बोला. शांतपणे, सावकाश आणि समोरच्याला ऐकू जाईल अशा पद्धतीने बोला.
- समोरच्यांचे लक्ष नसेल तर त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करा. तुमचा मुद्दा मांडा आणि लक्ष देण्याची विनंती करा.
- तुम्हाला काय साध्य करायचेय हे तुमच्या ध्यानात असू द्या. त्यानुसार बोलण्यावर लक्ष केंद्रित करा.
- तुमचे मत निर्भीडपणे मांडा.
- समोरच्या व्यक्तींशी नेहमीच आदराने बोला.
हे करू नका..
- खाली पाहू नका.
- आवाज कापरा नको.
- भराभर बोलू नका.
- पेहराव अजागळ नको.
- एकच मुद्दा वारंवार फिरवून फिरवून बोलू नका.
- अस्पष्ट, पसरट बोलू नका.
- बोलताना कुणावर दोषारोप करू नका.
- बोलताना आक्रमक होऊ नका.
- समोरच्याचा अंदाज घेत, चाचपडत बोलू नका.
- बोलण्यात आक्रस्ताळेपणा नको.
सकारात्मक संवाद म्हणजे काय?
- सकारात्मक संवाद म्हणजे तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नेमक्या गरजा काय आहेत, ते आवाज न चढवता सांगणे.
- तुम्ही कुणावर अन्याय तर करीत नाही ना, कुणाला घालून-पाडून बोलत नाही ना, तिरकस टोमणे मारत नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. तुमचे बोलणे ऐकून समोरच्याला काय वाटेल, हे तुम्ही समजून घ्यायला हवे. अन्यथा, अशा बोलण्याने तुम्हालाच नंतर दुर्बल वाटू शकते.
- श्रोत्याला दुखवायचे नाही हे लक्षात घेत बोलताना तुम्हाला संकोच वाटणे हे समजण्यासारखे आहे. मात्र, सहभाव म्हणून नाही तर भीतीपोटी जर तुम्ही बोलायला संकोचत असाल तर तो तुमच्या व्यक्तिमत्त्वातील नकारात्मक भाग झाला आणि त्यावर तुम्ही काम करायला हवे.
मोकळेपणाने बोला..आपण काही करण्याआधी अथवा बोलण्याआधी आपल्या कृतीला, वक्तव्याला लोकांची मान्यता मिळावी, असा प्रयत्न आपल्यातील अनेक जण करतात. अशा वागण्याने अथवा बोलण्याने समोरची व्यक्ती चिडेल का, असा आपण विचार करतो. जरी आपण योग्य बोलत अथवा करत असू तरीही समोरच्याचा आकस ओढवेल अशा गोष्टी करायच्या अथवा बोलायच्या आपण टाळतो, आपण आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करत नाही. आपल्याबद्दल इतरांना काय वाटेल याची चिंता न करता आपण गोष्टी केल्या अथवा बोलल्या तर त्यातून सकारात्मकता दिसून येते आणि त्यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपणा, ठामपणा अधोरेखित होतो.ताण येऊ नये म्हणून..संवाद साधताना जर तुम्हाला ताण येत असेल किंवा दडपण येऊन तुम्ही नेहमी आपल्या भावना दाबून ठेवत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीराच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो आणि ते दबून जातात. व्यायाम यावर चांगला उपाय ठरू शकतो. अशा स्नायूंना शिथिल करण्याकरिता व्यायाम उपयोगी ठरतो. व्यायामाने आपल्या भावना मोकळ्या व्हायला मदत होते, आपला आत्मविश्वास वाढतो. श्वसनक्रिया सुधारते. तुमचा पवित्रा अधिक सकारात्मक होतो.सरावासाठी..
- खोलवर श्वास घेण्याचा सराव करा.
- आरशात बघून बोलण्याचा सराव करा.
- कुटुंबीय अथवा मित्रमैत्रिणी यांच्यासोबत बोलण्याचा सराव करा
.- अपर्णा राणे
1 टिप्पणी:
संकल्पना क्लिअर झाली ...तुमच्या articalcha संदर्भ लिहिते मी माझ्या थिसेस साठी
टिप्पणी पोस्ट करा