गुरुवार, ७ मार्च, २०१९

आदिवासी चळवळ आणि स्त्रिया

आदिवासी चळवळ आणि स्त्रिया

आदिवासी जमातींमध्ये भेडसावणारे प्रश्नही अनेक होते.

आदिवासी जमातींमध्ये भेडसावणारे प्रश्नही अनेक होते. जमिनींच्या ताब्याचा प्रश्न तर होताच, पण दारिद्रय़, कुपोषण, अज्ञान, अनारोग्य, बेरोजगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धेचा पगडा, पिळवणूक, स्त्रियांवरचे अत्याचार असेही अनेक प्रश्न त्यांचे जीवन कठीण करीत होते.
आदिवासी चळवळींचा इतिहास आपल्याला पार चौदाव्या शतकापर्यंत घेऊन जातो. वेळोवेळी महंमद तुघलक, बिदरचा राजा, बहामनी सरदार यांच्याविरुद्ध एकजूट करून आदिवासींनी आपल्या ताब्यात असलेल्या जमिनी, किल्ले यांचे रक्षण केले होते.
इंग्रजांच्या काळातही त्यांना अनेक वेळा लढावे लागले. त्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांना आदिवासींच्या जमिनी हडप करण्यासाठी स्थानिक जमीनदार आणि धनिक मदत करीत. १७८८ ते १७९५ या काळात छोटा नागपूर येथे तमाड जमातीने, १८१२ मध्ये राजस्थानात भिल्ल जमातीने, तसेच १८१८ ते १८३० ईशान्यपूर्व भारतात नागा, मिझो, लुशाई, मिशिपी, दफम्त इत्यादी जमातींनी, बिहारमध्ये मुंडा, कोल, खैरनार जमातींनी, १८३२ मध्ये संथालांनी इंग्रजांच्या कारवायांना कडाडून विरोध केला. इंग्रजांच्या निर्दयतेने शेतसारा वसूल करण्याच्या पद्धतीला बिरसा मुंडा याने आदिवासींना ‘शेतीत पेरणीच करू नका’ असे सांगून अभिनव पद्धतीने विरोध नोंदवला होता.
महाराष्ट्रातही आदिवासी चळवळ पहिल्यापासूनच प्रभावी होती, याचे कारण नैसर्गिकपणे त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी, किल्ले आणि निसर्गसंपत्तीने संपृक्त जंगले यावर नेहमीच त्या त्या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांचा डोळा असे. जंगलातील कच्चा माल इंग्रज बाहेर नेत असत. त्यापासून स्वत:चे रक्षण करताना या सर्व जमाती लढाऊ बनल्या. त्यातही आदिवासी स्त्रियांचा लढाऊपणा काही औरच होता. अगदी इंग्रजांच्या काळातही दाशरीबेन चौधरी, झलकारी, राणी दुर्गावती, राणी गायदिजनलु, सुदेशा अशा स्त्रियांनी स्वातंत्र्यलढय़ातील आपला वाटा उचलला होता असा उल्लेख डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या लिखाणात त्यांनी केला आहे.
परंतु, आदिवासी जमातींमध्ये भेडसावणारे प्रश्नही अनेक होते. जमिनींच्या ताब्याचा प्रश्न तर होताच, पण दारिद्रय़, कुपोषण, अज्ञान, अनारोग्य, बेरोजगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धेचा पगडा, पिळवणूक, स्त्रियांवरचे अत्याचार असेही अनेक प्रश्न त्यांचे जीवन कठीण करीत होते. या संदर्भात, महाराष्ट्रात मोठे काम उभारले ते कॉ. गोदावरी आणि शामराव परुळेकर यांनी. त्यांच्या ‘माणूस जेव्हा जागा होतो’ हे आत्मचरित्र अत्यंत स्फूर्तिदायक आहे. १९४९ मध्ये किसान सभेच्या स्थापनेपासून वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्या डहाणू या दुर्गम आदिवासी भागात काम करीत राहिल्या. त्यांनी वारलींच्या पिळवणुकीचा आणि वेठबिगारीचा प्रश्न हाती घेतला. त्या काळी आदिवासी स्त्रिया म्हणजे जणू जमीनदारांची खासगी मालमत्ता असे. त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे, नांगराला जुंपणे हे नित्याचे होते. गोदुताईंनी आदिवासींना भयमुक्त होऊन याविरोधात आवाज उठवण्यास शिकविले. आदिवासी समाज जोपर्यंत राजकीयदृष्टय़ा जागृत होत नाही तोपर्यंत क्रांती अशक्य आहे अशी त्यांची भूमिका होती.
त्याचप्रमाणे, ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्हय़ात बोर्डी इथे बालशिक्षणाचा पाया घातला. १९४६ मध्ये गांधीजींशी चर्चा करून त्यांनी कामाची दिशा ठरवली. ताराबाईंचे वैशिष्टय़ असे की, त्यांनी परिस्थितीनुसार बालवाडी इत्यादी शिक्षणाचे नमुने तयार केले. आदिवासींसाठी त्यांच्या अंगणातच शाळा सुरू करून ‘अंगणवाडी’, तर गुरे चारणाऱ्या मुलांसाठी ‘कुरणशाळा’, एकाच छपराखाली पाळणाघर, बालवाडी, प्राथमिक शाळा असलेली ‘विकासवाडी’ ही संकल्पना जन्माला घातली.
आजही भारतात अनेक कार्यकर्त्यां स्त्रिया आदिवासींसाठी काम करत आहेत. मध्य प्रदेशात कत्ठीवाडी इथे साधना खोचे स्ट्रय़ुबेल शिक्षणप्रसार, व्यसनमुक्ती, ग्रामसभा घेण्यास बचतगट स्थापण्यास प्रवृत्त करणे असे काम करीत आहेत; तर राजमुंद्रीजवळ अडतीगल्ला या छोटय़ा गावात नफिसा डिसुझा आणि तिचे पती डॉमनिक यांनी तेथील कोंडा रेड्डी, कोया दोरास, कोंडा कामरास या जमातींमध्ये जमिनी हस्तांतरणाच्या, शिक्षणाच्या प्रश्नावर काम केले आहे. स्त्रियांमधून नेतृत्व पुढे यावे, स्त्रियांना किमान मजुरी मिळावी, त्यांना कौशल्याचे शिक्षण द्यावे यासाठी तिने विशेष प्रयत्न केले. याच गावात अरुणा नावाची एक आदिवासी महिला आज मनयसिमा आदिवासी सहकारी बँकेची सीईओ म्हणून आत्मविश्वासाने काम करीत आहे. तसेच, पान्तुरू सूर्यकांता आणि इतर महिलांच्या कहाण्या ‘पाऊल पुढे पडताना’ या पुस्तकात वंदना अत्रे आणि भारती ठाकूर यांनी लिहिल्या आहेत. त्याचप्रमाणे छत्तीसगड बस्तरमध्ये आपल्या जमातीला आपल्या हक्कांविषयी जागृत करणारी गोंड जमातीतील पत्रकार सोनी सोरी, जंगल, जमीन आणि आदिवासींचे हक्क यासाठी लढा देणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आंदोलक झिलाबाई वसावे या आदिवासींसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.
नर्मदा आणि तापीच्या खोऱ्यात आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढय़ाचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्यावर एक चित्रपटही निघाला आहे. मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, विद्युत भागवत आणि विद्युलता पंडित, मंदा आमटे आणि राणी बंग या बिगरआदिवासी महिलांचे काम स्वतंत्र लेखातच बघावे लागेल इतके व्यापक आहे.
या संदर्भात ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते आणि लेखक, कवी वाहरू सोनावणे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘‘आमचा असा अनुभव आहे की, कोणतीही चळवळ स्त्रियांच्या सहभागाशिवाय गतिशील होत नाही. त्या काळात, आमच्या धुळे जिल्हय़ात शहादा तालुक्यात श्रमिक संघटनेने आदिवासींच्या हस्तांतरित जमिनी परत मिळविण्यासाठी चळवळ केली, तेव्हा मोर्चे, सभा यामध्ये महिलांचा सहभाग प्रामुख्याने असायचा. १९७४ मध्ये जरी सातबारा, पीकपाणी, कायदा आदिवासींच्या बाजूने होता तरी हिंमत कोण करणार, असा प्रश्न असायचा, कारण जमिनी धनदांडग्यांच्या हातात होत्या आणि सरकारची त्यांनाच साथ होती. मग काय? एकेका गावातून शंभर-दीडशे स्त्रियांपुढे यायच्या आणि जमिनीचा ताबा घ्यायच्या. कुरुंजी, शिरखेड, भागापूर इत्यादी गावांत अशा चळवळी झाल्या.’’
‘‘श्रमिक संघटनेच्या महिला शिबिरात अंबर महाराज सांगायचे, ‘रथाची दोन्ही चाके मजबूत असतील तरच आपण उद्दिष्टांपर्यंत पोहोचू. तसेच, त्यासाठी आपण निर्दोष असले पाहिजे, दारू इत्यादी व्यसने आपण सोडली पाहिजेत.’ मग महिलांनी पुढाकार घेऊन पुरुषांची दारू सुटण्यासाठी प्रयत्न केले. व्यसनामुळे आपण भूलथापांना बळी पडलो, सर्व जमिनी गमावून बसलो असे त्या सांगत असत.’’ वाहरुजी म्हणाले.

‘‘तसेच त्या केवळ जमिनीच्या प्रश्नांवर नाही, तर जीवनाच्या विविध प्रश्नांवर काम करीत. मजुरी वाढवून मागणे, अन्याय-अत्याचाराविरोधातही त्या पुढे असत,’’ असे ते म्हणाले. १९७६ साली एका मुस्लीम महिलेवर अन्याय झाला तर महिला म्हणाल्या, ‘हा लढा आम्ही बायाच लढणार’ आणि त्यांनी तो व्यवस्थित हाताळला. हजारावर महिला जमा झाल्या. संबंधित पुरुषाला कळले तर तो घाबरून पळून गेला. महिलांना आत्मविश्वास मिळाला. वाहरुजींनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘हे समजल्यावर इतर महिला आपले प्रश्न घेऊन त्यांच्याकडे येऊ लागल्या. महिलांमधून असे नेतृत्व तयार झाले.’’
ठगीबाई, सरोसतीबाई, विमलबाई, भुरीबाई, हिकराना सोनावणे, रुक्माबाई अशा काही महिला चळवळीसाठी गाणी लिहीत, गात असत, असेही वाहरुजींनी सांगितले. आदिवासी महिलांनी साहित्य क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे. नजुबाई गावित या कार्यकर्त्यां तसेच लेखिकापण आहेत. त्याचप्रमाणे, कुसुम आलाम, उषाकिरण आत्राम, कविता आत्राम, शांती किराडे, रंजना पावरा इत्यादी स्त्रिया लेखनामधून आपला दृष्टिकोन व्यक्त करत आहेत, असे ते म्हणाले. वाहरुजी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे सरसचिव आहेत.
आजही आदिवासींचे, आदिवासी स्त्रियांचे प्रश्न सुटलेले नाहीत. स्त्रियांवर होणारे हल्ले आणि लैंगिक हिंसेचे प्रकार वाढलेले आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत, ग्राहकनिष्ठ व्यवस्थेत स्त्रियांचे वस्तुकरण वेगाने होत आहे. त्याचा परिणाम आदिवासी स्त्रियांवरही होत आहे. पर्यावरणाचा वेगाने होणारा नाश आदिवासी भागातील जीववैविधतेचे नुकसान करतो आहे. नष्ट होत चाललेली त्यांची संस्कृती आणि त्यांच्यावर लादलेला भ्रामक विकास, तसेच, त्यांच्यावर लादले जात असलेले धर्मातर हे त्यांच्या समोरचे भीषण प्रश्न आहेत; पण आदिवासी आणि बिगरआदिवासी स्त्रिया या सर्व प्रश्नांना पूर्ण क्षमतेने तोंड देत आहेत, हे महत्त्वाचे आहे.

खरे तर, एका लेखाच्या परिघात कुठलीच चळवळ मावत नाही; पण यानिमित्ताने स्त्रियांच्या योगदानाकडे, त्यांच्या क्षमतेकडे लक्ष वेधले जाते हेच या लिखाणाचे संचित.
– अंजली कुलकर्णी

आदिवासी नायक

विरांगना झलकारीबाई जयंती दिन
     झाशीच्या पळपुट्या राणीऐवजी रणांगणात तिच्या वेशात लढलेली आदीवासी कोरी जमातीत जन्मलेली शुर मुलनिवासी महीला योद्धा…
     लोकगीतांमधे आजवर तिचा गौरवशाली इतिहास आदीवासी बंधुंनी जतन करुन ठेवला नसता तर खोट्या कपोलकल्पीत भाकड कथेला तुम्ही आम्हीही कवटाळून बसलो असतो…
     पण नियतीच्या मनात काही औरच होते…
     लक्षमीबाईला मदतीशिवाय साधे घोड्यावार देखील बसता येत नव्हते, लढणे तर दूरच. तिने किल्ल्याच्या तटावरुन खाली घोड्यावर उडी मारल्याची थाप ब्राम्हणी ईतिहासच मारु शकतो…
     पण ३ महीने इंग्रजांशी किल्ला लढवून प्राणार्पण करणा-या झलकारीबाईचा पराक्रम लिहायला मात्र त्यांच्या हातांना लकवा मारतो. त्यासाठी बहुजनांमध्येच इतिहासकार जन्माला यावा लागतो…
     हा दबलेला आदिवासी इतिहास बाहेर येवूनसुद्धा आज सर्वमान्य नाही. शूर स्त्रीला आजही झलकारीबाईची ऊपमा दिली जात नाही…
    “खुब लडी वो मर्दानी थी
      लक्ष्मी नही झलकारी थी”
     असं म्हणण्याची ही हिम्मत आमच्यात कधी येणार मित्रहो…
जयंती दिनी विरांगना झलकारी बाईंना मानाचा मुजरा…..!!!
“आदिवासींचा इतिहास जगासमोर आणण्याची जबाबदारी आदिवासींची आहे. त्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
  -आदिवासी आवाज
image
आद्य आदिवासी क्रांतिकारक….
शूरवीर भागोजी नाईक…..
नाशिक व नगर जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या वतीने राघोजी भांगरे यांनी ब्रिटिशांविरुद्ध पहिला उठाव केला. शेतकर्यांकडून इंग्रज त्याकाळी शेतसारा वसूल करीत असत. त्यामुळे आदिवासी बांधव सरकारविरुद्ध नेहमी बंड करीत. याच काळात इंग्रजांनी आदिवासी समाजाचील युवकांची पोलीस दलात भरती सुरु केली. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे भागोजी नाईकही पोलीस दलात भरती झाला.
१८५७ च्या काळात भारतभर इंग्रजांविरुद्ध उठाव झाले. भागोजी पोलीस दलात असल्याने आपल्याच बांधवांच्या विरुद्ध लढा द्यायचा, याबद्दल त्याला खेद वाटत होता. याच काळात अकोले, संगमनेर, सिनार, कोपरगाव, निफाड, पेठ या भागातील महादेव कोळी व भिल्ल बंडखोरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. भागोजींनीही याचवेळी बंडाचा पवित्रा घेऊन नांदूरशिंगोटे-चास दरम्यान असलेल्या खिंडीत पन्नास जणांची तुकडी तैनात करुन त्यांना मार्गदर्शन केले.
भागोजींनी ब्रिटीशांना ’सळो की पळो’ करुन सोडले. चास खिंडीत जेम्स हेन्री याच्या नेतृत्वाखालील सैन्यात व भागोजी नाईक यांच्यात जोरदार लढाई झाली. या लढाईत ४ Oct १८५१ रोजी ब्रिटीश अधिकारी हेन्री मारला गेला. त्यानंतर इंग्रज सरकार भागोजी नाईकच्या मागावर होते.
सिन्नर तालुक्यातील सांगवी, मिठसागरे, पंचाळे या भागात इंग्रजांविरुद्ध भागोजीची शेवटची लढाई झाली. ११ Nov १८५१ रोजी झालेल्या लढाईत फितुरीमुळे भागोजीला वीरमरण आले. तसेच त्यांच्याबरोबर असलेले ५० पैकी ४८ क्रांतिकारक मारले गेले. भागोजी व त्यांचे क्रांतिकारक सहकारी त्याकाळी शरण न जाता सारखे लढत राहिले. नांदूरशिंगोटे येथे सुरु झालेले क्रांतियुद्ध सांगवी येथे संपले.
राम कोणाचा.....? रावण कोणाचा....?

रामायण खरं कि खोटं या विवादात पडण्यापेक्षा रामायण हे महाकाव्य नक्कीच आहे.कवीची उत्तुंग कल्पना म्हणून दाद द्यावीच लागेल.पण एक मात्र सत्य हे आहे की साहित्यातल्या कुठल्याही प्रकारात समकालीन व भूतकालीन मानवी जीवनाचे संदर्भ मात्र नक्कीच जडलेले असतात.या  गृहितावर रामायणाचा अभ्यास केल्यास राम कोणाचा व रावण कोणाचा ह्या प्रश्नाचे उत्तर कळते.

राम हा आर्यांचा (आताचे ब्राह्मण यांचा)सेनापती होता तर रावण हा दक्षिण प्रदेशातील मूलनिवासी आदिवासींचा राजा होता.
मग झालं काय ? रामाला देव म्हणून आदराने पुजले जाते तर  रावणाला राक्षस म्हणून का हिनवले जाते?
यामागे ब्राह्मणांनी नियोजनपूर्वक रावणाला बदनाम करून रामाचे महत्त्व वाढविण्यासाठी खेळलेली ती एक चाल आहे.हे शिकलेल्या स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या आदिवासींच्याही पटकन लक्षात येत नाही.ते स्वतः काहीच वाचत नाहीत.वाचलं तरी समजून घेत नाहीत.जुने विचार त्यांच्या डोक्यातून जात नाहीत.त्यांच्या मेंदूवर ब्राह्मणांनी पूर्ण त्यांच्या पोथ्या ,पुराणे व धार्मिक ग्रंथांतून कब्जा केलेला असल्यामुळे त्यांना सत्य काय अन असत्य काय या भानगडीत पडायचेच नाही.फक्त चालत आलेल्या परंपरा डोळे झाकून श्रद्धेने पाळणे एवढेच आपले काम अशी स्वतःची धारणा त्यांनी करून घेतलेली दिसते.

त्यामुळे रावणाविषयी ,त्याच्या चांगुलपणाविषयी कितीही सांगितले तरी ते मानणार नाहीत.त्यांच्या डोक्यात एकच राम हा देव होता आणि रावण हा राक्षसांचा राजा होता.त्याने रामाची सीता पळवली.त्याचा बदला घेण्यासाठी रामाने रावणाशी युद्ध केले.या पलीकडे जाऊन ते कधीच काही समजून घेणार नाहीत.स्वतः विचारही करणार नाहीत.म्हणून अशा माणसांचा नाद सोडून देऊन खऱ्या आदिवासींच्या अस्तित्वासाठी कार्य करत राहणे हे आदिवासी संघटनांचे उद्दिष्ट हवे.

आदिवासींनी रावणाचे दहन करू नये किंवा दहन करणाऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊ नये.

रावण हा आदिवासींचा शूर ,वीर,हुशार व कल्याणकारी राजा होता.त्याने देवांशी दुष्मनी केली असे म्हटले जाते.याचा अर्थ त्याने आर्य ब्राह्मणांशी दुष्मनी केली होती.आर्य  साम,दाम,दंड,भेद,नीती या त्यांच्या तत्वाने त्यांचे साम्राज्य वाढवत होते.तर आदिवासी राजे आर्यांच्या आक्रमणापासून आदिवासींचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करत.काही आदिवासी राजे आर्यांवर प्रति आक्रमण करत.रावणानेही तेच केले.त्याने आदिवासींचे रक्षण केले म्हणून त्याला राक्षस म्हटले गेले.बऱ्याच आदिवासी राजांना अशाच प्रकारे राक्षस कल्पिले गेले.राक्षस हे दुष्ट ,अक्राळविक्राळ वगैरे दाखविले गेले.हे फक्त आर्यांच्या फायद्यासाठी.आर्यांनी त्यांचा इतिहास लिहिला.त्यात त्यांनी   त्यांच्या फायद्याच्या गोष्टी लिहिल्या.

रावणाला अतिशय विकृत स्वरूपात त्यांनी दाखविले.खरं म्हणजे रावणाला दहा तोंडे नव्हती.आदिवासी गोंडी भाषेत रावण म्हणजे राजा.आदिवासींत असे पराक्रमी दहा रावण म्हणजे आदिवासींचे राजे होऊन गेले.ज्यांना आर्यांनी चातुर्याने संपविले.म्हणून आर्य ब्राह्मण लोक दहा तोंडी रावणाचा पुतळा जाळतात तर आदिवासी लोक या दहा रावणांचं प्रतीक म्हणून रावणाची ताटी आपल्या भोवड्यांमध्ये नाचवतात.भोवाड्यांमध्ये सगळ्यात आकर्षण व मान हा रावणाच्या ताटीला असतो.

जो लंकापती रावण आहे.ज्याच्यावर आधारित रामायण लिहिले गेले आहे.तो  रावण दुष्ट नव्हता.वाईट नव्हता हे मूळ वाल्मिकीच्या रामायणात होते.परंतु तुलसीदासने लिहिलेल्या रामायणात बरेच नवीन प्रसंग घुसडून रावणाला बदनाम केले आहे.सगळ्या tv मालिका या तुलसीदासने लिहिलेल्या रामायणावर आधारित आहेत.
वाल्मिकी रामायणाच्या सुंदरकांड मध्ये दहावा श्लोक मध्ये रावणाला दहा तोंडे वगैरे काही नव्हती हे स्पष्ट होते.त्या श्लोकात रावण हा रूपवान,रुबाबदार व्यक्तिमत्वाचा होता.असे सांगितले आहे.तसेच 9वे सर्ग श्लोक 68 व 69 मध्यें लिहिले आहे की रावणाच्या राण्यांमध्ये राजर्षी आणि ब्रह्मर्षींची कन्यासुद्धा रावणावर मोहित होऊन रावणाच्या पत्नी झाल्या होत्या.श्लोक 70 मध्ये असे लिहलेले आहे की अशी कोणतीच स्त्री नव्हती की जी रावणाने जबरदस्तीने पळवून आणली होती.

मग खरंच रावणाने सीता पळवली का? रावणाची बहीण जिला सूर्पनखा म्हटले गेले.ती सूर्पनखा नसून सुरूपशिखा होती.तिचे एक नाव सुवर्णरेखा असेही होते.ती रावणासारखीच रुबाबदार व सुंदर होती.लंका हे बेट तेंव्हा भारतीय उपखं डाला प्रवाळ कीटक जे मृत झाल्याने पाण्यावर तरंगतात.कालांतराने त्यांच्या अवशेषांचे खडकात रूपांतर होते.अशा प्रवाळ कीटकांच्या अवशेषांच्या खडकाने जोडलेले होते.आता ते खडक पाण्याखाली आहेत.या खडकांवरून येण्याची तेंव्हा सोय होती.
कोणीतरी वनवासी राम, लक्ष्मण, सीता हे दंडवनात आलेले आहेत असं कळल्यानंतर ही सुरूपशिखा जेंव्हा आली.तेव्हा लक्ष्मण तिच्यावर भाळला व लग्नाची बोलणी करू लागला.तेंव्हा तिने माझ्या भावाला रावणाला विचारून सांगते असे म्हटल्यानंतर लक्ष्मणाला राग आला.रामाने मग सांगितले की ही तुझ्याशी लग्न करत नसेल तर हिचे नाक ,कान कापून टाक.विद्रुप कर.स्वतःला काय समजते.हाच प्रकार उलटा करून सांगितलाय.तिने काय लक्ष्मणावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला काय? म्हणून त्याने तिचे नाक कां कापले?
आजपर्यंत असा इतिहास आहे का, कि एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषावर बलात्कार केला आहे?

सीता पळवणे हे नाटक होते.राम व लक्ष्मणाला सुरूपशीखेची विटंबना करतांना सीतेने पहिले होते.बहिणीच्या विटंबना का केली ह्याचा जाब विचारण्यासाठी   जेंव्हा रावण आला तेंव्हा राम, लक्ष्मण वनात निघून गेले.मग रावण सीतेला म्हणाला मी तुला काहीच करणार नाही.माझ्या बहिणीचा बदला मी तुला विद्रुप करून नाही घेऊ शकत.मला रॅम लक्ष्मण कोण आहेत त्यांना जाब विचारायचा आहे.तू माझ्याबरोबर चल म्हणजे ते तुला शोधत तिकडे येतील.मग मी त्यांना बघेन.
सीताही तयार झाली.स्वखुशीने रावणाबरोबर गेली.कारण तिने त्याच्या बहिणीवरचा अत्याचार बघितला होता.एका स्त्रीत्वाचा अपमान केला होता.

खरं तर रामाचा वनवास हे एक नाटक होतं.रावणाचे राज्य संपवून त्यांना ब्राह्मण धर्म पूर्ण देशात वाढवायचा होता.हे आयतेच कारण त्यांना सापडले.त्यासाठी बारा तेरा वर्ष ते तेथे येऊन राहिले होते.नळ,नीळ, जांभवंत, सुग्रीव, मारुती,बली यांच्याशी दोस्ती करण्याचा प्रयत्न केला.यात सगळे फसले पण बली मात्र फसला नाही.त्याने रामाचा कावा जाणला होता.म्हणून त्याला रामाने झाडाआड लपून बाण मारून मारले.हे सगळे कारस्थान लपून राहावे व रामाचे देवपण लोकांच्या मनात कायम राहावे म्हणून बलीने सुग्रीवची बायको पळवली व राज्य बळकावले असा बनाव केला.तसेच रामाला मदत करणारी सगळी आदिवासी माणसेच होती.ती माकडे नव्हती.पण हे झाकून राहावे म्हणून त्यांना माकडे कल्पिले गेले.रावणाच्या भावालाही आपल्या बाजूला वळवून रावणाला संपविले गेले.रावण आदिवासी धर्मासाठी शहीद झाले.रावणानंतर आदिवासी धर्माचे रक्षण करणारा कोणताच प्रतापी पुरुष उरला नाही.आदिवासींना वाली नसल्याने ते सैर भैर झाले.दऱ्या खोऱ्यात जाऊन राहिले.काही स्वाभिमानी आदिवासींनी आपली संस्कृती मात्र तरीही टिकवून ठेवली.म्हणून आजही रावणाचा पुतळा न जाळता सन्मानाने रावणाची ताटी नाचवली जाते.
जे आदिवासी रावणाचा पुतळा जाळतील ते गद्दार आदिवासी,भटाळलेले आदिवासी म्हणून ओळखले जातील.असे खरे व स्वाभिमानी आदिवासी प्रतिपादन करत आहेत.

जय आदिवासी।    हर हर महादेव।   जय रावण।  
जय भगवान एकलव्या।    जय राघोजी।   जय बिरसा।
 https://marathi.pratilipi.com/story/o1lpa28vx5hf?utm_campaign=Shared&utm_source=whatsapp
बिरसा मुंडा
 बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते.
आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.
Birsa Munda

आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा – Birsa Munda History In Marathi

बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील उलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे.
बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरीशींही होता. त्यांची प्रतिभा पाहुन एका पारधी नेत्यांनी शाळेत टाकण्याचा सल्ला दिला.
परंतू त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागणार होता त्यांच्या वडीलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्याचे नाव डेविड केले त्याचा दाखला जर्मन मिशन स्कुल येथे झाला परंतू तेथे धार्मीक सक्तीमुळे त्यांनी शाळा सोडली व ते प्रसिध्द वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले.
वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिन्दू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळया धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा.
बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हंटले ‘‘ आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविला, बिरसा मुंडास पकडून देणा-यास 500 रूपये बक्षिस जाहीर केले.
बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यास अटक केली. त्यांच्या सोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली.
9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले.
3 फेब्रुवारी 1900 रोजी त्यांना इंग्रजांनी अटक केली होती. 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडाची जयंती साजरी केली जाते. सध्याचे झारखंड राज्यात रांची येथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. तेथे दरवर्षी जयंती निमित्त कार्यक्रम होतात.

स्त्रीवाद- चर्चा - प्रवीण बांदेकर- मटा

       महाराष्ट्रातील स्त्री प्रश्नांसह विविध सामाजिक प्रश्नांसाठी आणि स्त्रीला आत्मसन्मान प्राप्त करून देण्यासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या आजवरच्या कार्याविषयीची कृतज्ञता ‘निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या विश्वस्त गीताली वि. म. आणि विद्याताईंच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या सहकाऱ्यांनी एका अभिनव पद्धतीने व्यक्त केली आहे. विद्याताई संपादित करीत असलेल्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हे निमित्त साधून विद्याताई आयुष्यभर ज्या स्त्रीवादी विचारांची गांभीर्याने मांडणी करीत आहेत, त्याच विचारविश्वाची सांगोपांग चर्चा करणारा ‘संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. सुमारे ५८० पृष्ठांच्या या बृहद् ग्रंथात जवळपास बावन्न अभ्यासकांनी लिहिलेले स्त्रीवादाशी निगडित विविध विषयांची मांडणी करणारे लेख समाविष्ट करण्यात आलेत.

आपल्याकडे आधुनिक दृष्टीने स्त्रीकडे पाहण्याची सुरुवात पाश्चात्य स्त्रीवादी विचारांमुळेच झाली असे दिसते. स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही तर व्यवस्थेकडून तिला स्त्री बनवले जाते, असे प्रतिपादन करणाऱ्या स्त्रीवादी विचारवंत सिमॉन द बोवा यांच्या स्त्रीच्या विचार व भावविश्वाची पूर्णतः स्वतंत्र व आधुनिक दृष्टीने मांडणी करू पाहणाऱ्या काही संकल्पनांमुळे पाश्चात्य जगतातील स्त्रीला स्वतःकडे नव्याने पाहायला प्रवृत्त केलेले जाणवते. १९७५ मध्ये युनोने जाहीर केलेले आंतरराष्ट्रीय महिला वर्ष व नंतरची स्त्रीदशकाची घोषणा यांमुळे स्त्रीवाद या संकल्पनेची जगभरात चर्चा होऊ लागली. भारतीय संस्कृती आणि समाजव्यवस्थेच्या संदर्भात विचार करताना मात्र आपल्याकडे अशा काही स्त्रीवादी दृष्टिकोनातून स्त्रीच्या अस्तित्त्वाचा, तिच्या प्रश्नांचा विचार करता येऊ शकतो, याची विशेष जाणीव असल्याचे दिसत नाही. अगदी महाराष्ट्राच्याच बाबतीत पाहू गेले तरी, ताराबाई शिंदे यांच्यासारख्या सामाजिक प्रश्नांकडे गंभीरपणे पाहणाऱ्या एखाद्या स्त्रीने लिहिलेल्या स्त्रीपुरुष तुलना यांसारख्या दीर्घ निबंधाचा वा पंडिता रमाबाईंसारख्या विदूषीने लिहिलेल्या स्त्रीधर्मनीतीचा अपवाद वगळता ग्रंथरूपातही स्त्रीवादी जीवनदृष्टी मांडण्याचा प्रयत्न कुणी केल्याचे आढळत नाही. मात्र स्त्री-प्रश्नांचे, स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे वा स्त्रीपुरुष समानतेचे वगैरे कसलेही प्रागतिक भान आपल्याकडे आढळत नाही, असे म्हणता येत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच लोकहितवादी, म. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, र. धों. कर्वे अशा कृतिप्रवण विचारवंतांनी स्त्रीप्रश्नांकडे आधुनिक विचारांनी पाहण्याची भूमिका आग्रहाने लावून धरलेली दिसून येईल. रुढीपरंपरांच्या जोखडातून स्त्रीला मुक्त करणे, स्त्रीसुधारणांसाठी शिक्षण व कौटुंबिक हक्कांचा आग्रह धरणे, नोकरी व राजकारणात स्त्रीचा सहभाग वाढवणे, स्त्री-पुरुषांमध्ये प्रगल्भ साहचर्य असणे अशा स्वरूपाची मागणी व मांडणी पुढील काही दशकांत स्त्रीसंदर्भातील विचारांमध्ये केंद्रवर्ती राहिली. या अनुषंगाने ‘संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये वंदना भागवत यांनी भारतीय परिप्रेक्ष्यातून आपल्याकडे रुजलेल्या स्त्रीवादाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. यशवंत सुमंत, गोपाळ गुरू, विद्युत भागवत, राजा दीक्षित, जास्वंदी वांबुरकर यांनीही त्यांच्या लेखांतून आवश्यकतेनुसार कमीअधिक प्रमाणात हा धांडोळा घेतला आहे. विशेषतः आधुनिक भारताच्या राजकीय तत्त्वचिंतनातील स्त्रीप्रश्नाची जाण हा यशवंत सुमंत यांचा दीर्घ लेख या संदर्भात महत्त्वाचा आहे. इंग्रजांच्या राजवटीत भारतात सुरू झालेली वासाहतिक आधुनिकीकरणाची प्रक्रिया, पश्चिमी संस्कृतीशी वाढत गेलेला संवाद, तत्कालीन स्त्रीप्रश्नांच्या संदर्भात सुधारणावादाचे चर्चाविश्व, १९व्या शतकातील धर्म आणि समाजसुधारणा चळवळींचा स्त्रीप्रश्नांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर झालेला परिणाम, फुले-आगरकरांसारख्या विचारवंतांचा समाजमानसावरील प्रभाव, स्त्रीसंघटनांचा उदय, स्त्रीहक्कांच्या चळवळी, अशा विस्तृत मुद्द्यांच्या अनुषंगाने डॉ. सुमंत यांनी चर्चा केली आहे. 
साधारणतः विसाव्या शतकातील ७०-८०व्या दशकापासून आपल्याकडे स्त्रीप्रश्नांकडे पाहताना लिंग, वर्ग, जात, विविधांगी शोषण, सामाजिक व नैतिक बंधने या सगळ्याच्या अनुषंगाने विचार सुरू झालेला दिसतो. स्त्रीसमस्यांची चर्चा करणाऱ्या चळवळी, स्त्रीकेंद्री संस्था, साहित्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण व स्त्रीसुधारणाविषयक काही नवे कायदे इत्यादींमुळे आधुनिक स्त्रीलाही आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान येऊ लागले होते. विद्या बाळ यांच्यासारख्या कार्यकर्त्या, स्त्री, मिळून साऱ्याजणी, बायजा, स्त्री उवाच यांसारखी स्त्रीप्रश्नांची चर्चा करणारी नियतकालिके आणि गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, कविता महाजन, प्रज्ञा दया पवार, नीरजा यांच्यासारख्या लेखिका यांमुळे स्त्रीविश्व आणि एकूणच संस्कृती यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होऊ लागलेले जाणवतात. स्त्रीकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी प्रवृत्त करणारे हे सर्व कार्यकर्ते सिमॉन बोव्हा, बेटी फ्रिडन अशा पाश्चात्य स्त्रीवादी विचारवंत लेखिकांच्या सम्यक विचारांमुळे प्रभावित झालेले आहेत, हेही जाणवून येते. आधुनिक काळात विविध सामाजिक व राजकीय विचारधारांमध्येही स्त्रीवादी विचारांचा प्रभाव कसा दिसून येतो, याविषयी सविस्तर विवेचन करणारे लेखही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘दलित स्त्रीवाद आणि स्त्रीवादी दलितत्व’ या लेखात प्रवीण चव्हाण यांनी भारतीय समाजव्यवस्थेचा अपरिहार्य भाग बनलेल्या जातिव्यवस्थेच्या संदर्भात स्त्रीवादाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. दलित स्त्रीवाद ही दलितत्वाची वर्ग जाणीव आणि स्त्रीवादी जाणीव यांच्या एकात्मीकरणातून निर्माण झालेली एकसंध अशा स्वरुपाची जाणीव आहे आणि लिंगभाव जडणघडणीच्या गाभ्याशी असणारी जातजाणीव ही दलित स्त्रीवादाच्या केंद्रस्थानी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. मात्र दलित स्त्रीवादाने जाहीरपणे सैद्धांतिक पातळीवर आणि व्यावहारिक पातळीवर स्त्रीवादी दलितपणाला नाकारले पाहिजे, तसेच पितृसत्ताक व ब्राह्मणी असंवेदनशीलतेबद्दल प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे, असेही त्यांना वाटते. छाया दातार यांनीही त्यांच्या लेखात स्त्रीमुक्ती चळवळीच्या विविध संकल्पनांचा ऊहापोह करीत मार्क्सवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद, उदारमतवादी स्त्रीवाद, पर्यावरणवादी स्त्रीवाद अशा अंगांची चर्चा केली आहे.

स्त्रीवादाचे यथामूल स्वरूप समजावून घेण्याच्या दृष्टीने या ग्रंथातील जवळ जवळ सर्वच लेख अत्यंत उपयुक्त असे आहेत. लैंगिकतेच्या वा लिंगभानाच्या दृष्टिकोनातून स्त्रीचळवळीतील लैंगिकतेच्या राजकारणाचे बहुसुरी कथन (अनघा तांबे), विज्ञान, लिंगभाव आणि शरीर (चयनिका शहा), स्त्रियांची समलैंगिकता आणि धर्म-पितृसत्तेचे राजकारण (आनंद पवार), लिंगभाव व मानसशास्त्र (साधना नातू) यांसारखे लेख महत्त्वाचे आहेत. तर जात, धर्म, परंपरा, नैतिक बंधने, हिंसा, शोषण, पुरुषी मानसिकता यासंदर्भात स्त्रीवादाची गरज अधोरेखित करणारे हिंसा-अहिंसाः एक तात्त्विक ऊहापोह (दीप्ती गंगावणे), हिंसा आणि स्त्रीजीवन (कल्पना कन्नबिरन), हिंदु धर्म आणि स्त्री (सदानंद मोरे), बहुजन स्त्रीची लैंगिकता आणि जात (संध्या नरे-पवार) हे लेख उल्लेखनीय आहेत. हिंदू धर्माप्रमाणेच जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख या धर्मातील स्त्रीप्रश्नांच्या अनुषंगानेही लिहिलेले चिकित्सक लेख यात समाविष्ट आहेत.

आधुनिक मराठी साहित्यामध्ये ऐंशी-नव्वदच्या दशकातील स्त्रियांच्या लेखनामध्ये स्त्रीवादी जाणिवा केंद्रस्थानी आलेल्या दिसतात. विविध सांस्कृतिक व वर्गीय स्तरातील स्त्रियांना आपले अनुभवविश्व लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करावसे वाटू लागण्यालाही सामाजिक संदर्भात एक प्रतीकात्मक अर्थ आहे. या लेखिकांच्या लेखनामागील प्रेरणा, त्यांतून व्यक्त होणाऱ्या जाणिवा, स्त्रियांचा आत्मशोध, अन्य सांस्कृतिक घटक व त्यांना उपलब्ध असलेले सामाजिक पर्यावरण यांचा, स्त्रियांच्या कथा (बंदना बोकील-कुलकर्णी), कविता (नीलिमा गुंडी), कादंबऱ्या (रेखा इनामदार-साने) व नाटकांच्या (मकरंद साठे) अनुषंगाने धांडोळा घेणारा स्वतंत्र विभाग या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रज्ञा दया पवार यांचा ‘जात, वर्ग, लिंगभाव आणि दलित साहित्यासमोरील आव्हाने’ हा लेख विशेष महत्त्वाचा आहे.

संदर्भासहित स्त्रीवाद
संपादक : वंदना भागवत, कुमार अनिल, गीताली वि. म.
प्रकाशक : शब्द पब्लिकेशन, मुंबई
पृष्ठे : ५७९, किंमत : ७०० रु.

दलित पँथर ?

पँथर " दलित पँथर म्हणजे काय होते नक्की ? १९७२ नंतरच्या काळात पँथर या नावाचा दरारा का होता ?






 पँथर " दलित पँथर म्हणजे काय होते नक्की ?
१९७२ नंतरच्या काळात पँथर या नावाचा दरारा का होता ?

           पुर्वीचे दलित आताचे अनुसुचित जाती-जमाती यांच्यावर बऱ्याच वर्षानुवर्ष अन्याय अत्याचार होत आला व आताही होत आहे. जातीव्यवस्था -वर्णव्यवस्थामुळे अनुसुचित जाती-जमातीचे नुकसान हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू  महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनाजाव्यवस्था -वर्णव्यवस्था
त्रास सहन करावा लागला. व या प्रतेक महापुरुषांनी हि ह्या जातीव्यवस्थेला व वर्णव्यवस्थेचा  विरोध केला. ह्या जाती व्यवस्थेमुळे छत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक थांबवला होता.महाराष्ट्रातील कोणताहि भट ह्या राज्याभिषेकाला तयार नव्हता, ह्याच वर्णव्यवस्थेमुळे महात्मा फुलेना व माई सावित्रीबाई फुले यांना शिक्षन देन्यासाठी जात असताना शेनाचे गोळे मारले गेले, छत्रपती शाहु महाराज यांच्या बाबतीत हि काहि वेगळे नव्हते. 
डाँ.बाबासाहेब आंबेडकरांना हि शिक्षनासाठी वर्गाच्या बाहेर बसाव लागल, ह्या अत्याचाराला कंटाळुन अनेकांनी हि व्यवस्था संपवन्याचा पर्यंन्त केला. पण जेवढा हा प्रयंत्न झाला त्या काळात थोड्या काळा पुरता अन्याय कमीहि झाला. पण संपलेला नाहि आजहि बऱ्याच जिल्ह्यात ह्या गोष्टी घडतात.
१९७२ मध्ये काहि चळवळीतील कार्यकर्त्यानी बंड केला व तेव्हा खरा पँथर जन्माला आला. पँथर म्हणजे कोन्ही व्यक्ती नसुन एक संघटना होती तीचा कार्यकाळ अंदाजे १८ महिने  ईतकाच होता पण त्या संघटनेने केलेले कार्य हे त्या काळातील सर्वाच्य कार्य होते व यांची दखल तात्कालीन प्रधानमंत्री असलेल्या दिवंगत इंदिरा गाधी याना घ्यावी लागली होती. दलित पँथर म्हटले कि काहि नेत्या मंडळीच्या बुडाला घाम येत होता. प्रतेक पँथर म्हणजेच एक धगधगता ज्वालामुखी होता. 

         " दलित पँथर" ''लोकशाही मध्यवर्तित्व' हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत, असे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करीत होती. प्रामुख्याने मागास, कष्टकरी, कामगार, भूमिहीन, शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जाति-जमाती, आदिवासी या घटकांना घेऊन सामाजिक लढा उभारण्यात अग्रणी असणारी संघटना म्हणून समाजात दलित पँथर ओळखली जात होती.

          सन. १९७० च्या आसपास मागासवर्गीय जातींवरील अत्याचारांनी कळस गाठला. पेरुमल समितीने त्याचा स्पष्ट निर्देश केला. हे प्रकरण (मागासवर्गीय जातींवरील अत्याचार) इतके गंभीर बनले की २४ मे १९७२ ला खा.मधु लिमयेंनी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला. व चळवळीतील काहि जहाल कार्यकर्त्यानी बंडाचे शस्त्र उभारले. व तेथेच २९ मे १९७२ रोजी काहि कार्यकर्त्यानी एकत्र येउन " दलित पँथर " नामक संघटना उभारली व त्याची पहिली सभा ९ जुलै १९७२ सिध्दार्थ नगर मुंबई येथे करन्यात आली. 
          सन १९६६ मधील अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकाचा प्रेरनास्त्रोत असलेली Black Panther या संघटनेचा फार मोठा प्रभाव दलित पँथर ह्या संघटनेवर होता. व सन.१९७२ मधील काँग्रेस सरकार त्या वेळी जातीय अत्याचार थांबवन्यास असंमर्थ ठरली होती.म्हणुन ९ जुलै च्या सभेत सर्वच दलित समाज्याच्या तंरुनांनी एका झेंड्या खाली एकत्र यावे  "माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू" असे आव्हान केले गेले. 

 त्यामधे नामदेव लक्ष्मन ढसाळ ,राजा पिराजी ढाले, जयराम विठ्ठल पवार, भाई संगारे असे नावे पुढे आले पण याचा पुढिल प्रवास अल्पकाळ पण लक्षवेधी होता. त्यांनी या काळात अनेक प्रश्न हाताळले जसे 

१) दलितावरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलने केले.
२) झोपडपट्टयांचा विस्तार व विकास घडवून आणला. व  झोपडपट्टयांमधील रहिवाशांचे प्रश्न सोडविले.
३) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर लढे उभारुन मोठे लढे दिले.
४) मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलने केले.
५) दलितांच्या राखीव जागांच्या प्रश्नावर आंदोलन केले.
६) नवबौद्धांना सवलतीची मागणी केली.
७) बेरोजगारी दूर करण्यासाठी आंदोलने केली.

त्यांची गाजलेली व जश्यास तेसे दिलेले उत्तर म्हणुन काहि आंदोलने.

१) वरळी दंगलीत जशास तशे उत्तर
२) इंदापूरच्या बावड्यातील दलित बहिष्कार विरोधी आंदोलन
अत्याचार निषेधार्थ केलेले गीतादहन आंदोलन
३) इ.स. १९७३ कोल्हापूरला शंकराचार्य मिरवणूकीवर चप्पलफेक आंदोलन
४) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कँपीटेशन फि विरोधी आंदोलन.
५) चौधरी चरणसिंग यांच्या विरोधात संघर्ष व आंदोलन.

       असे बरेच आंदोलन त्या वेळस केले गेले. त्यामुळे विद्यर्थी वर्ग, बेरोजगार,वर्ग, व शिक्षीत वर्ग हा दलित पँथर मध्ये फार मोठ्या प्रमानात सामील झाला. यामुळे अनेक आंदोलने ,मोर्चे मोठ्या संख्येने यशस्वी झाले .
पण दादर भोईवाडा येथील मोर्चाच्या वेळी बाजुच्या ईमारती हुन फेकुन मारलेल्या दगडी पाटा मुळे भागवत जाधवांचा जागीच मृत्यु झाला. त्याच वेळी नेमल्या गेलेल्या वरळी दंगली भस्मे आयोगाने पँथरच्या सर्व शिफारशी मान्य केल्या व काहि काळात दलित पँथर या संघटनेचा दरारा वाढला .
पुढे दलित पँथर हि संघटना गुजरात,पंजाब, दिल्ली,व परदेशात लंडन येथ पर्यंत पोहचली व येथे दलित पँथरच्या शाखा उघडल्या गेल्या.
पँथर हि संघटना प्रतेक अन्याय ग्रस्थाला आपलीशी वाटुलागली. प्रतेक तंरुन पँथरच्या दिशेने वाटचाल करु लागला. व त्यातच एक महत्वाची नवी गोष्ट घडली जी म्हणजे डाँ. बाबासाहेब आंबेडकराचे अप्रकाशीत साहित्या प्रकाशीत करन्यासाठी तातकालीन सरकारला भाग पाडले.पँथरच्या दबावामुळे डाँ. बाबासाहेब आंबेडकराचे २४ खंड, मुखनायक,बहिष्कृत भारत हे साहित्य प्रकाशीत करन्यात आले. 
 मग जर २१ व्या शतकात जर पुन्हा पँथर उभी होत आहे मग रोष का ?

" आजहि बऱ्याचश्या संघटना मागासवर्गीय समाज्यावर (दलितांवर ) होनाऱ्या अन्याया विरुध्द लढतात मग हा लढा तर पँथरचाच ना ? 

 " काहि संघटना विद्यार्थाच्या प्रश्नावर लढतात तर ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?

" काहि संघटना नवबुध्दाच्या सवलती साठी लढा देत आहे माझ्या मतो ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?

" बेरोजगारी कमी करन्यासाठी आजहि काहि संघटना लढतात मग तर ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?

" आज बऱ्याच संघटना मुलभुत गरजासाठी लढतात मग तर ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?

 लढा तोच पण वेगवेगळ्या पध्दतीने वेगवेगळे होउन लढला जात आहे. पण राजकिय पक्ष जेव्हा दलित पँथरचे नाव येते तेव्हा आता तो काळ नाहि त्या मुळे दलित पँथरची आज गरज काय ? असा प्रश्न उपस्थीत करतात.
माझे याला एकच उत्तर आहे  पँथर पँथर आणि पँथर.

आंबेडकर चळवळीचा जेव्हा जेव्हा विषय येनार तेव्हा दलित पँथरच्या  नावाशिवाय विषय पुर्ण होनारच नाहि असे माझे मत आहे.


       समता न्युज
        ✍✍✍
    अमोल पो.जगताप 
      9834035397
       ठाणे/बदलापुर

निमित्त कवी दया पवार यांचा कोंडवाडा

नसत्या इंगळ्या डसल्या नसत्या.......

दया पवार (इ.स. १९३५ - सप्टेंबर २०१९९६) हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.
दया पवार
जन्म नावदगडू मारुती पवार
टोपणनावदया पवार
मृत्यूसप्टेंबर २०१९९६
दिल्लीभारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी
चळवळमराठी दलित साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृतीबलुतं
वडीलमारुती
पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे.जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन पवारमॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्यांच्या मामा आणि आईच्या धीराने त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली. बोर्डिंगच्या अधिकार्‍यांनी दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून पवार बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागलेव इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळवले.
मॅट्रिक नापास झालेल्या दया पवार यांना पद्मश्री पुरस्कारमिळाला आहे.
पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.
पवार यांची मुलगी प्रज्ञा ही एक मराठी कवयित्री आणि गद्यलेखक आहे.

प्रकाशित साहित्यसंपादन करा

  • अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).
  • कोंडवाडा (कवितासंग्रह)
  • चावडी (कथासंग्रह)
  • जागल्या (कथासंग्रह)
  • धम्मपद (कवितासंग्रह)
  • पाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)
  • पासंग(कथासंग्रह)
  • बलुतं (आत्मकथन). ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.
  • बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)
  • विटाळ (वैचारिक)

पुरस्कारसंपादन करा

  • पद्मश्री
  • बलुतं’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार (१९७९)
दया पवार- अर्थात ’दगडू मारुती पवार’. (१९३५-१९९६). स्वत:च्या ’दगडू’ या नावापासूनच त्यांनी आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यायला सुरुवात केली. ते दलित साहित्य चळवळीतले एक महत्वपूर्ण लेखक. जन्म धामणगावातला (अकोला). १०वी पर्यंतचं शिक्षण संगमनेर इथल्या शाळेत. नोकरीच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली. परळ इथल्या पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी सहाय्यक म्हणून काम पहायला सुरुवात केली आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर आपले शिक्षण पुढे चालू ठेवले. anatomy department मधे काम करताना मेलेल्या प्राण्यांची कातडी सोलून त्यांची body preserve करण्यासाठी त्यांच्या शिरांमधे अल्कोहोलचं इंजेक्शन देण्याचं काम त्यांच्या वाट्याला आलं. एका संवेदनशील माणसाला हे काम करताना काय वेदना झाल्या असतील...
त्यांचं बलुतं हे आत्मचरित्र नुकतच वाचून झालं. ’दगडू’नं दयाला सांगितलेलं हे आत्मकथन.जणू स्वतःलाच स्वतःची जुनी ओळख दिल्यासारखं. ”आयुष्यात किमान एकाला तरी घडलेलं सगळं सांगावं” या आईनं दिलेल्या शिकवणीशी प्रामाणिक राहून घडलेलं ’सगळं’ त्यांनी सांगितलं आहे. सगळ्यात शेवट मग ’दया’नं लिहिलेलं एक मनोगत आहे. ही कथा कुण्या ’हिरो’ची नाही. यात आयुष्यात काही ’कर्तबगारी’ करून दाखवलेला कुणी ’पुढारी’सुद्धा नाही. कुठल्याही एकाच कडव्या विचारानं यात बाजी मारलेली नाही. यात एक साधं विश्लेषण आहे. आलेले अनुभव, विचारांचं उठलेलं मोहोळ, जीवनाच्या पटावर भेटलेली टोकाची माणसं.... या साऱ्या भूतकाळाकडे बघणारं एक संवेदनशील मन. स्वतःच्या झालेल्या चुकांवर पांघरूण घालायचा कुठे केविलवाणा प्रयत्न नाही. नरेंद्र जाधव यांनी ”आम्ही आन आमचा बाप” मधे जशी ग्रामीण बोली वापरली आहे तशी बलुतं मधे दया पवारांनी वापरली असती तर ते जास्त जिवंत वाटलं असतं का, असा मनात विचार आला. असो.
आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटत राहतं की या माणसाचं मन इतक्या भयंकर जीवनानुभवानंतरही इतकं संवेदनशील राहिलंच कसं? दारू आणि स्पिरिट च्या व्यसनी लागलेला बाप, काबाडकष्ट करून नवरा गेल्यानंतरही मुलांना शिकवण्यासाठी कष्ट उपसणारी आई, समाजात सतत वाट्याला येणारी उपेक्षा, शिक्षणामुळे येत असलेलं सामाजिक भान पण ते व्यक्त करत असताना होणारी घालमेल, आजूबाजूच्या स्त्रियांचं हलाखीचं जिणं, लहान वयात पाहिलेले, अनुभवलेले भयंकर प्रसंग या सगळ्यात ’दगडू’ हरवला कसा नाही? किंवा तो नावाप्रमाणे ’दगड’ कसा झाला नाही?? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची सत्वपरीक्षा घेतली गेली जणू. त्यांच्या एका कवितेत ’चिलया’ बाळाच्या कथेचा उल्लेख येतो.
”देव एवढे का दुष्ट असतात..
चिलयाचे रक्त,मांस मागतात...?”

...... दया पवारांनी आयुष्यात कधी चिलया बाळाचे तर कधी त्या चिलया बाळाच्या आई-बापाचे अनुभव घेतले.... या कथेला आपण ”भाकड कथा” का म्हणतो?
बलुतंची पहिली edition १९७८ सालची. त्या काळातलं हे साहित्य ’विद्रोही’ म्हणावं का. खरं पाहता बलुतं ने प्रस्थापिताला धक्का दिला पण तरीही ते ’आत्मकथना’च्या पठडीत जास्त चपखल बसणारं आहे. वाट्याला आलेल्या दुःखाचं त्यात शेअरिंग आहे. दुःखाकडे ’अन्याय’ म्हणून बघण्याची त्यात द्रुष्टी दिसत असली तरी ती तितकी ’विद्रोही’ स्वरूपात व्यक्त मात्र होत नाही. ती खरी व्यक्त झाली आहे त्यांच्या ’कोंडवाडा’ या काव्यसंग्रहामधे. बलुतं च्या निमित्तानं मी कोंडवाडा सुद्धा वाचलं. यातल्या कविता दुःख आणि अन्याय या दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होणाऱ्या आहेत. आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव, महार समाजाच्या उन्नतीसाठीची आतून व्यक्त होणारी तळमळ, दलित समाजाला, तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे केलेलं आवाहन आणि अंतर्मुख होऊन मांडलेला अनुभवांचा लेखाजोखा; हे सारं त्यांच्या कवितेतून व्यक्त होतं. कोंडवाड्यामधे आणि बलुतं मधे केवळ सामाजिक बाह्य संघर्ष नाही. यात सामाजिक संक्रमणाबरोबर आंतरिक संघर्षही आहे. शिकल्यामुळे होणारं white collar मन आणि त्यातूनच आपल्या समाजापासून तुटल्याची येणारी भावना यात वेळोवेळी व्यक्त झाली आहे.
कोंडवाडाचं मुखप्रुष्ठ बोलकं आहे. त्याचा ३/४ भाग हा दगड-विटांनी बांधलेल्या (एकही खिडकी नसलेल्या) कोंडवाड्याची भिंत आहे. त्या शेजारून एक ठिपक्याएवढा दिसणारा माणूस (ज्याचा चेहरा दिसत नाही. खांद्यावर झोळी आहे. अंगावर कपडे चांगले आहेत) चालला आहे. दया पवार यांची कविता ही त्यांच्या आयुष्याच्या कोंडवाड्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सापडलेली पायवाट होती. त्यांनी कष्टानं घेतलेलं शिक्षण, केलेलं वाचन एका अर्थानं त्याना मोकळा श्वास घ्यायला शिकवत होतं तर कधी त्यांच्या वेदनांच्या खपल्या उघडणारं होतं. त्यांनी कोंडवाडा कवितेत म्हटलं आहे-

”कशाला झाली पुस्तकांशी ओळख? बरा ओहोळाचा गोटा..
गावची गुरे वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या..”

दया पवारांची कविता वास्तवदर्शी आहे. ”मला निसर्गात रमणं आणि त्यावर कविता करणं कधीच जमलं नाही.” असं त्यानी म्हटलं आहे. किडे-मुंग्यांकडे कौतुकानं बघण्याची त्यांची मानसिकता नव्हती. ते शक्यही नव्हतं. इथे किड्याना खायला रव्याचा दाणा मिळू शकतो पण आमच्यासारख्या माणसांना एक वेळचं खायला मिळेल याची शाश्वती नाही, हे त्यांचं वाक्यच त्यांची मनःस्थिती सांगतं. बलुतं मधे जरी त्यांनी म्हटलं असलं की ही कथा माझ्या पराभवाची आहे तरी तसं पूर्णपणे खरं नाही. ’दगडू’ ते ’दया’ हा प्रवासच मुळी त्यांच्यातला सकारात्मक बदल दाखवतो. कोंडवाडामधे त्या कोंडलेल्या जीवनातून बाहेर येऊन ते म्हणूनच आवाहन करतात-

”प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला आहे
ज्या काजव्यांचा तुम्ही जयजयकार केलात
ते केव्हाच निस्तेज झाले आहेत
आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा
अन क्रांतीचा जयजयकार करा.”
सुरक्षित जगात जगलेल्या माझ्यासारख्या मुलीला बलुतं आणि कोंडवाडा हादरवून सोडतं.......

कोंडवाडा निमित्ताने : दया पवार यांचे स्वगत

खुदद संग्रहातील कवितेसंबंधी तसा मी कमी बोलणार आहे. कवितांच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी तिच्यामागचे अनुभवविश्व, कविता घडण्यापूर्वीची मानसिक अवस्था, घटनांचे क्रम, झालेली विलक्षण घुसमट, याचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न.
संग्रहात सामावलेल्या कविता सोडुन, तसे मुबलक कविता-लेखन मी केलेले आहे. त्यातील एकही कविता या संग्रहात घालण्याची इच्छा होत नाही. यामागील कारणमीमांसा कोणती, कवितेच्या संदर्भात माझ्या जाणिवा कशा बदलत गेल्या, वेळोवेळी मी ज्याने प्रभावित झालो; ते नेमके अस्सल होते की नक्कल, हे पाहणे महत्त्वाचे वाटते.
मी पहिली कविता केव्हा लिहिली असावी? हे शोधण्यापूर्वी, कवितेची जाणीव तरी कशी निर्माण झाली हे तपासायला हवे. बालपणात माझ्या वाट्याला नेमके कोणते संस्कार आले, सांस्कृतिक जीवन कोणते होते, हे सारे पाहिले म्हणजेच माझ्या आजच्या कवितेची वीण व तिची पाळेमुळे कुठवर पोहोचलीत हे समजू शकेल.
मी तसा घाटावरचा. तालुक्यात सह्याद्रीच्या रांगेतील फाटा गेलेला, उंच असे कळसूबाईचे शिखर, तिथून मुंबई बेट टळटळीत दिसणारे. जन्मगावापासून जवळच अमृतवाहिनी प्रवरा दुर्थडी भरून वाहणारी. गाव तर डोंगराच्या कुशीत वसलेले, अशा निसर्गपरिसरात गावकुसाबाहेर कोंडवाड्यात' माझा जन्म झाला.
माझ्या जन्मामुळे कोणत्याही दिशेला तारा निखळला नाही किंवा मला सूर्यबिंब फळासारखे वाटले नाही. जमिनीवर पाय ठेवूनच मी चालू लागलो. कळू लागले, तेव्हापासून वास्तवतेच्या दाहक चटक्यांनी होरपळलो, भोवताली पसरलेला समृद्ध निसर्ग कोट्यासारखा बोचू लागला. मला एकही निसर्ग कविता लिहिता आली नाही त्याचे नेमके कारण हेच असावे. मराठी कवींनी आपल्या कवितांमधून चितारलेला निसर्ग केव्हाच मनाला रिझवू शकला नाही. या देशातील जातिजातीची मडक्यांची उतरंड, नुसती श्रमाची विभागणी नाही; तर श्रमिकांची विभागणी. एक जात नेमकी दुसन्या जातीच्या तोंडावर बसलेली. त्यामुळे गुदमरलेली अवस्था. आपण तर अगदी कॅळचे मडके, त्यातही रांडकीचं रांड प्वारे पाणलोटाने कचरा किना-याला लोटावा, तसं आपलं आयुष्य,
बामनाघरी 'लिव्हणं, कुणब्याघरी दाणं, महाराघरी गाणं. ही म्हण लहानपणापासून ऐकत असू. गाणंबजावणं करणं म्हणजे हिणकस धंदा करणं हा त्यात सूर होता, सवर्णाच्या घरी गाणं आणि महाराघरी गाणं यात सांस्कृतिकदृष्ट्या एकच पातळी नव्हती. केवळ बनृत्यासाठी किंवा पाच-दहा रुपयांसाठी ह्या गाण्यामुळे आपले पूर्वज कोणाचे मनोरंजन करीत होते? या गाण्यातून त्यांनी दु:खाचा शोध घेतलाय काय? तसे जर झाले असते, तर किती मोठा सांस्कृतिक ठेवा आपल्याला मिळाला असता. लिव्हणं आणि दाणं हे आपल्या वाट्याला की नव्हतं? दाणं नसेल, तर गाणं कसं सुचेल? दाणं मिळवण्यासाठी वाजंत्र्याच्या ताफ्यात किंवा ढोलकं तुणतुणं घेऊन आपण तालेवाराच्या पुढं गाणं का गायचं? असे प्रश्न लहान वयातही सुचत होते. ज्या लहान वयात मराठीतले आजचे उच्चवर्णीय कवी ज्ञानेश्वर, तुकाराम, रामायण, महाभारत यांवर कवितेची जाणीव पोसतात, त्या वयात माझ्यापुढे काय ताट वाटून ठेवले होते?
लहानपणी पाहिलेला महारवाडा स्वच्छ दिसतो आहे. दहाबारा वर्षाचे वय असावे. स्वातंत्र्याची जिलबी वर्गात मिळाल्याची आठवण आहे. शाळा सुटली म्हणजे महारवाड्यातील आम्ही मुले चावडीत जमायचो. यातील काही गुरांकडे जाणारी होती. आमच्यापैकी एखाद्या चुणचुणीत पोराला लुगडं नेसवायचं. पायात बाभळीच्या शेंगा चाळ म्हणून बांधल्या जायच्या. इफेडी, डबे यांच्या साथीत 'तमाशा' उभा राहायचा. अगंबयो: शेर ताटीमें लांडगा गयोस्स! सोडा लिंबू बाटलीमध्ये | पोरी दम धर ग छातीमध्ये अशा गाण्यांना झिलक-याच्या साथीत जोर चढायचा, हा सारा प्रकार त्या काळी कुणालाच अश्लील वाटत नव्हता हे विशेष. या प्रतिमांच्या पाठीमागे वेगळेच विश्वे दडलेले आहे हे कळण्यास बराच काळ जावा लागला. | वडिलांचा वाजंत्र्याचा ताफा होता. लग्नसराईत त्यांना भाव यायचा. ताफ्यात वडील कांड' वाजवीत, कधीकधी मी त्यांच्याबरोबर जात असे. संबळ वाजायला लागला की, माझाही देह भारावून जायचा. फावल्या वेळात माझ्या वयाची मुले त्यांचे अनुकरण करीत, तोंडातूनं आवाज काढून सारा ताफा हुबेहूब उभा करीत. फावल्या वेळात तो 'दम' शिकतं. सरमाडाची काडी पोकळ करून इबेड.अगर पाण्यात बुडवून 'दम' घेत, कांड किंवा सूर शिकण्याआधीची ती पूर्वतयारी होती. " पुढे मी शाळकरी झालो, वाजंत्रीपणा शिकणे म्हणजे घाणेरड.ए काम करणे, ही जाव प्रबळ झाली. वाजंत्र्यांच्या पत्रावळ्या उकिरड्यावर. ठायी ठायी मानहानी. हा धंदा गुलामगिरीचे जोखड वाटायचे. आज मला कोणतेच वाद्य वाजविता येत नाही. खरं म्हणजे संगीत घरात पिकत होतं. आपण त्याकडे जाणूनबुजून पाठ फिरवली.
यात आपला किती दोष? हा आनंद कोणी नासवून टाकला? आज एखाद्या सुखवस्तू घराण्यातील पोरगं गॅलरीत बसून अलगूज वाजवताना मी पाहतो, तेव्हा मॅला त्याचा हेवा वाटतो. लहान वयातच कलेकडे पाहण्याची ही दृष्टी! समाजव्यवस्था याला जबाबदार. | वडिलांना लावण्यांचा छंद, खुटीला ढोलकी आणि तुणतुणे टांगलेले. थकून भागून वडील आले म्हणजे, अंगणात जोडीदाराबरोबर ढाल्या सुरात ढोलकीच्या साथींत ते गात. 'तू ग ऐक नंदाच्या नारी.स.' गावात तमाशा आला म्हणजे, तो नेमका आमच्या घरी उतरायचा. त्याची गंमत वाटायची. त्याच्यातला सरदार खाजगीतही खूप शुद्ध बोलतोय असे वाटायचे. रात्रीला ते राजा आणि प्रधान व्हायचे, पण सकाळ उजाडली म्हणजे, विडीला ह्यांच्याजवळ पैसा नसायचा. पावसाळ्यात अळ्यांसारखे तडफडायचे. त्यांच्यात मास्तर नावाचा प्राणी असायचा, नाचणारणीच्या घोळक्यात तो लावण्या बांधायचा. गांजाची चिलीम झोकली म्हणजे त्या तारेत तो शब्द जुळवायचा. मछुम छणाणा | उभी राहून बोल ग जरा |' किंवा 'ये माझ्या लाडक्या छबिल्यो| मैशी बोल |ऽ' अकस्मात मास्तरला ....
....
सदा सर्वदा मी विद्रोही' कविता लिहितो असे काही नाही. अंतर्मुख होऊन माझ्या समाजाचे अंतरंग तपासावे वाटते. अशा वेळी सभा' सुचते. ही निवडणूक चालू असते, तेव्हा मी साक्षी असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडेकरांनंतर त्यांच्या अनयांयात आलेले अराजक, बौदध धम्म घेतलेला पण त्याचा डॉ. आंबेडकरांनी सांगितलेला नवा संदर्भ लक्षात न घेता, दुकान तेच पण पाटी बदललेली हा प्रकार. सांस्कृतिक मने एवढी मागासलेली, की साधा अध्यक्षही निवडणे कठीण, सारा समूह खोट्या प्रतिष्ठेला बळी पडलेला. कोते, स्वार्थी पुढारपण, शिव्यागाळ्या, भांडणे व मारामाच्या यांना ऊत आलेला. देशातील लोकशाहीचेही चित्र पाहिलेले. कवितेला हळूहळू मोठा कॅनव्हॉस मिळतो. जिल्हावाद, प्रांतवाद, बोकाळलेला, कवितेच्या शेवटी गरोदर बाईच्या बाळंतपणातून हे अराजक संपणार आहे, नवे नेतृत्व येणार आहे असा आशावाद. | मराठी वाचक ह्या कवितेचे स्वागत कसे करील सांगता येत नाही. गेली काही वर्षे वेगवेगळ्या पातळ्यांवरील श्रोत्यांच्या समूहापूढे कविता वाचण्याची संधी मिळाली. त्यामुळे काही अनुमान काढू शकतो. ग्राण पातळीवर नवा सुशिक्षित वर्ग मोठ्या संख्येने येतो आहे. तेथील हायस्कूल कॉलेजच्या पातळीवर माझा कविता-वाचन हा तर न विसरणारा अनुभव. पहिली रात्र, सभा अशा कविता श्रोत्यांनी डोक्यावर घेतलेल्या. त्याचबरोबर काही निराशाजनकही अनुभव. मराठीचा प्राध्यापकवर्ग नाक मुरडतो आहे; तर पवई येथील आय.आय.टी. च्या विद्याथ्र्यांपुढे ही कविता वाचताना थंड गोळ्यासारखे वाटते आहे, बर्फावर सुरी फिरवावी तसा हा अनुभव | भारतीय सांस्कृतिक जीवनात ही दरी आहे याची जाणीव पुन्हा प्रकर्षाने येते. हे| सांस्कृतिक दवंदवं नाहीसे करण्याकरिता माझी कविता बळी पडली, तरी चालेल या भूमिकेशी मी आलो आहे. मरण या कवितेत मी लिहितो आहे.
धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात तसं आपण हसत मरावं.
-- दया पवार  

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...