गुरुवार, ७ मार्च, २०१९

आदिवासी नायक

विरांगना झलकारीबाई जयंती दिन
     झाशीच्या पळपुट्या राणीऐवजी रणांगणात तिच्या वेशात लढलेली आदीवासी कोरी जमातीत जन्मलेली शुर मुलनिवासी महीला योद्धा…
     लोकगीतांमधे आजवर तिचा गौरवशाली इतिहास आदीवासी बंधुंनी जतन करुन ठेवला नसता तर खोट्या कपोलकल्पीत भाकड कथेला तुम्ही आम्हीही कवटाळून बसलो असतो…
     पण नियतीच्या मनात काही औरच होते…
     लक्षमीबाईला मदतीशिवाय साधे घोड्यावार देखील बसता येत नव्हते, लढणे तर दूरच. तिने किल्ल्याच्या तटावरुन खाली घोड्यावर उडी मारल्याची थाप ब्राम्हणी ईतिहासच मारु शकतो…
     पण ३ महीने इंग्रजांशी किल्ला लढवून प्राणार्पण करणा-या झलकारीबाईचा पराक्रम लिहायला मात्र त्यांच्या हातांना लकवा मारतो. त्यासाठी बहुजनांमध्येच इतिहासकार जन्माला यावा लागतो…
     हा दबलेला आदिवासी इतिहास बाहेर येवूनसुद्धा आज सर्वमान्य नाही. शूर स्त्रीला आजही झलकारीबाईची ऊपमा दिली जात नाही…
    “खुब लडी वो मर्दानी थी
      लक्ष्मी नही झलकारी थी”
     असं म्हणण्याची ही हिम्मत आमच्यात कधी येणार मित्रहो…
जयंती दिनी विरांगना झलकारी बाईंना मानाचा मुजरा…..!!!
“आदिवासींचा इतिहास जगासमोर आणण्याची जबाबदारी आदिवासींची आहे. त्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
  -आदिवासी आवाज
image
आद्य आदिवासी क्रांतिकारक….
शूरवीर भागोजी नाईक…..
नाशिक व नगर जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या वतीने राघोजी भांगरे यांनी ब्रिटिशांविरुद्ध पहिला उठाव केला. शेतकर्यांकडून इंग्रज त्याकाळी शेतसारा वसूल करीत असत. त्यामुळे आदिवासी बांधव सरकारविरुद्ध नेहमी बंड करीत. याच काळात इंग्रजांनी आदिवासी समाजाचील युवकांची पोलीस दलात भरती सुरु केली. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे भागोजी नाईकही पोलीस दलात भरती झाला.
१८५७ च्या काळात भारतभर इंग्रजांविरुद्ध उठाव झाले. भागोजी पोलीस दलात असल्याने आपल्याच बांधवांच्या विरुद्ध लढा द्यायचा, याबद्दल त्याला खेद वाटत होता. याच काळात अकोले, संगमनेर, सिनार, कोपरगाव, निफाड, पेठ या भागातील महादेव कोळी व भिल्ल बंडखोरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. भागोजींनीही याचवेळी बंडाचा पवित्रा घेऊन नांदूरशिंगोटे-चास दरम्यान असलेल्या खिंडीत पन्नास जणांची तुकडी तैनात करुन त्यांना मार्गदर्शन केले.
भागोजींनी ब्रिटीशांना ’सळो की पळो’ करुन सोडले. चास खिंडीत जेम्स हेन्री याच्या नेतृत्वाखालील सैन्यात व भागोजी नाईक यांच्यात जोरदार लढाई झाली. या लढाईत ४ Oct १८५१ रोजी ब्रिटीश अधिकारी हेन्री मारला गेला. त्यानंतर इंग्रज सरकार भागोजी नाईकच्या मागावर होते.
सिन्नर तालुक्यातील सांगवी, मिठसागरे, पंचाळे या भागात इंग्रजांविरुद्ध भागोजीची शेवटची लढाई झाली. ११ Nov १८५१ रोजी झालेल्या लढाईत फितुरीमुळे भागोजीला वीरमरण आले. तसेच त्यांच्याबरोबर असलेले ५० पैकी ४८ क्रांतिकारक मारले गेले. भागोजी व त्यांचे क्रांतिकारक सहकारी त्याकाळी शरण न जाता सारखे लढत राहिले. नांदूरशिंगोटे येथे सुरु झालेले क्रांतियुद्ध सांगवी येथे संपले.
राम कोणाचा.....? रावण कोणाचा....?

रामायण खरं कि खोटं या विवादात पडण्यापेक्षा रामायण हे महाकाव्य नक्कीच आहे.कवीची उत्तुंग कल्पना म्हणून दाद द्यावीच लागेल.पण एक मात्र सत्य हे आहे की साहित्यातल्या कुठल्याही प्रकारात समकालीन व भूतकालीन मानवी जीवनाचे संदर्भ मात्र नक्कीच जडलेले असतात.या  गृहितावर रामायणाचा अभ्यास केल्यास राम कोणाचा व रावण कोणाचा ह्या प्रश्नाचे उत्तर कळते.

राम हा आर्यांचा (आताचे ब्राह्मण यांचा)सेनापती होता तर रावण हा दक्षिण प्रदेशातील मूलनिवासी आदिवासींचा राजा होता.
मग झालं काय ? रामाला देव म्हणून आदराने पुजले जाते तर  रावणाला राक्षस म्हणून का हिनवले जाते?
यामागे ब्राह्मणांनी नियोजनपूर्वक रावणाला बदनाम करून रामाचे महत्त्व वाढविण्यासाठी खेळलेली ती एक चाल आहे.हे शिकलेल्या स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या आदिवासींच्याही पटकन लक्षात येत नाही.ते स्वतः काहीच वाचत नाहीत.वाचलं तरी समजून घेत नाहीत.जुने विचार त्यांच्या डोक्यातून जात नाहीत.त्यांच्या मेंदूवर ब्राह्मणांनी पूर्ण त्यांच्या पोथ्या ,पुराणे व धार्मिक ग्रंथांतून कब्जा केलेला असल्यामुळे त्यांना सत्य काय अन असत्य काय या भानगडीत पडायचेच नाही.फक्त चालत आलेल्या परंपरा डोळे झाकून श्रद्धेने पाळणे एवढेच आपले काम अशी स्वतःची धारणा त्यांनी करून घेतलेली दिसते.

त्यामुळे रावणाविषयी ,त्याच्या चांगुलपणाविषयी कितीही सांगितले तरी ते मानणार नाहीत.त्यांच्या डोक्यात एकच राम हा देव होता आणि रावण हा राक्षसांचा राजा होता.त्याने रामाची सीता पळवली.त्याचा बदला घेण्यासाठी रामाने रावणाशी युद्ध केले.या पलीकडे जाऊन ते कधीच काही समजून घेणार नाहीत.स्वतः विचारही करणार नाहीत.म्हणून अशा माणसांचा नाद सोडून देऊन खऱ्या आदिवासींच्या अस्तित्वासाठी कार्य करत राहणे हे आदिवासी संघटनांचे उद्दिष्ट हवे.

आदिवासींनी रावणाचे दहन करू नये किंवा दहन करणाऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊ नये.

रावण हा आदिवासींचा शूर ,वीर,हुशार व कल्याणकारी राजा होता.त्याने देवांशी दुष्मनी केली असे म्हटले जाते.याचा अर्थ त्याने आर्य ब्राह्मणांशी दुष्मनी केली होती.आर्य  साम,दाम,दंड,भेद,नीती या त्यांच्या तत्वाने त्यांचे साम्राज्य वाढवत होते.तर आदिवासी राजे आर्यांच्या आक्रमणापासून आदिवासींचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करत.काही आदिवासी राजे आर्यांवर प्रति आक्रमण करत.रावणानेही तेच केले.त्याने आदिवासींचे रक्षण केले म्हणून त्याला राक्षस म्हटले गेले.बऱ्याच आदिवासी राजांना अशाच प्रकारे राक्षस कल्पिले गेले.राक्षस हे दुष्ट ,अक्राळविक्राळ वगैरे दाखविले गेले.हे फक्त आर्यांच्या फायद्यासाठी.आर्यांनी त्यांचा इतिहास लिहिला.त्यात त्यांनी   त्यांच्या फायद्याच्या गोष्टी लिहिल्या.

रावणाला अतिशय विकृत स्वरूपात त्यांनी दाखविले.खरं म्हणजे रावणाला दहा तोंडे नव्हती.आदिवासी गोंडी भाषेत रावण म्हणजे राजा.आदिवासींत असे पराक्रमी दहा रावण म्हणजे आदिवासींचे राजे होऊन गेले.ज्यांना आर्यांनी चातुर्याने संपविले.म्हणून आर्य ब्राह्मण लोक दहा तोंडी रावणाचा पुतळा जाळतात तर आदिवासी लोक या दहा रावणांचं प्रतीक म्हणून रावणाची ताटी आपल्या भोवड्यांमध्ये नाचवतात.भोवाड्यांमध्ये सगळ्यात आकर्षण व मान हा रावणाच्या ताटीला असतो.

जो लंकापती रावण आहे.ज्याच्यावर आधारित रामायण लिहिले गेले आहे.तो  रावण दुष्ट नव्हता.वाईट नव्हता हे मूळ वाल्मिकीच्या रामायणात होते.परंतु तुलसीदासने लिहिलेल्या रामायणात बरेच नवीन प्रसंग घुसडून रावणाला बदनाम केले आहे.सगळ्या tv मालिका या तुलसीदासने लिहिलेल्या रामायणावर आधारित आहेत.
वाल्मिकी रामायणाच्या सुंदरकांड मध्ये दहावा श्लोक मध्ये रावणाला दहा तोंडे वगैरे काही नव्हती हे स्पष्ट होते.त्या श्लोकात रावण हा रूपवान,रुबाबदार व्यक्तिमत्वाचा होता.असे सांगितले आहे.तसेच 9वे सर्ग श्लोक 68 व 69 मध्यें लिहिले आहे की रावणाच्या राण्यांमध्ये राजर्षी आणि ब्रह्मर्षींची कन्यासुद्धा रावणावर मोहित होऊन रावणाच्या पत्नी झाल्या होत्या.श्लोक 70 मध्ये असे लिहलेले आहे की अशी कोणतीच स्त्री नव्हती की जी रावणाने जबरदस्तीने पळवून आणली होती.

मग खरंच रावणाने सीता पळवली का? रावणाची बहीण जिला सूर्पनखा म्हटले गेले.ती सूर्पनखा नसून सुरूपशिखा होती.तिचे एक नाव सुवर्णरेखा असेही होते.ती रावणासारखीच रुबाबदार व सुंदर होती.लंका हे बेट तेंव्हा भारतीय उपखं डाला प्रवाळ कीटक जे मृत झाल्याने पाण्यावर तरंगतात.कालांतराने त्यांच्या अवशेषांचे खडकात रूपांतर होते.अशा प्रवाळ कीटकांच्या अवशेषांच्या खडकाने जोडलेले होते.आता ते खडक पाण्याखाली आहेत.या खडकांवरून येण्याची तेंव्हा सोय होती.
कोणीतरी वनवासी राम, लक्ष्मण, सीता हे दंडवनात आलेले आहेत असं कळल्यानंतर ही सुरूपशिखा जेंव्हा आली.तेव्हा लक्ष्मण तिच्यावर भाळला व लग्नाची बोलणी करू लागला.तेंव्हा तिने माझ्या भावाला रावणाला विचारून सांगते असे म्हटल्यानंतर लक्ष्मणाला राग आला.रामाने मग सांगितले की ही तुझ्याशी लग्न करत नसेल तर हिचे नाक ,कान कापून टाक.विद्रुप कर.स्वतःला काय समजते.हाच प्रकार उलटा करून सांगितलाय.तिने काय लक्ष्मणावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला काय? म्हणून त्याने तिचे नाक कां कापले?
आजपर्यंत असा इतिहास आहे का, कि एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषावर बलात्कार केला आहे?

सीता पळवणे हे नाटक होते.राम व लक्ष्मणाला सुरूपशीखेची विटंबना करतांना सीतेने पहिले होते.बहिणीच्या विटंबना का केली ह्याचा जाब विचारण्यासाठी   जेंव्हा रावण आला तेंव्हा राम, लक्ष्मण वनात निघून गेले.मग रावण सीतेला म्हणाला मी तुला काहीच करणार नाही.माझ्या बहिणीचा बदला मी तुला विद्रुप करून नाही घेऊ शकत.मला रॅम लक्ष्मण कोण आहेत त्यांना जाब विचारायचा आहे.तू माझ्याबरोबर चल म्हणजे ते तुला शोधत तिकडे येतील.मग मी त्यांना बघेन.
सीताही तयार झाली.स्वखुशीने रावणाबरोबर गेली.कारण तिने त्याच्या बहिणीवरचा अत्याचार बघितला होता.एका स्त्रीत्वाचा अपमान केला होता.

खरं तर रामाचा वनवास हे एक नाटक होतं.रावणाचे राज्य संपवून त्यांना ब्राह्मण धर्म पूर्ण देशात वाढवायचा होता.हे आयतेच कारण त्यांना सापडले.त्यासाठी बारा तेरा वर्ष ते तेथे येऊन राहिले होते.नळ,नीळ, जांभवंत, सुग्रीव, मारुती,बली यांच्याशी दोस्ती करण्याचा प्रयत्न केला.यात सगळे फसले पण बली मात्र फसला नाही.त्याने रामाचा कावा जाणला होता.म्हणून त्याला रामाने झाडाआड लपून बाण मारून मारले.हे सगळे कारस्थान लपून राहावे व रामाचे देवपण लोकांच्या मनात कायम राहावे म्हणून बलीने सुग्रीवची बायको पळवली व राज्य बळकावले असा बनाव केला.तसेच रामाला मदत करणारी सगळी आदिवासी माणसेच होती.ती माकडे नव्हती.पण हे झाकून राहावे म्हणून त्यांना माकडे कल्पिले गेले.रावणाच्या भावालाही आपल्या बाजूला वळवून रावणाला संपविले गेले.रावण आदिवासी धर्मासाठी शहीद झाले.रावणानंतर आदिवासी धर्माचे रक्षण करणारा कोणताच प्रतापी पुरुष उरला नाही.आदिवासींना वाली नसल्याने ते सैर भैर झाले.दऱ्या खोऱ्यात जाऊन राहिले.काही स्वाभिमानी आदिवासींनी आपली संस्कृती मात्र तरीही टिकवून ठेवली.म्हणून आजही रावणाचा पुतळा न जाळता सन्मानाने रावणाची ताटी नाचवली जाते.
जे आदिवासी रावणाचा पुतळा जाळतील ते गद्दार आदिवासी,भटाळलेले आदिवासी म्हणून ओळखले जातील.असे खरे व स्वाभिमानी आदिवासी प्रतिपादन करत आहेत.

जय आदिवासी।    हर हर महादेव।   जय रावण।  
जय भगवान एकलव्या।    जय राघोजी।   जय बिरसा।
 https://marathi.pratilipi.com/story/o1lpa28vx5hf?utm_campaign=Shared&utm_source=whatsapp
बिरसा मुंडा
 बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते.
आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.
Birsa Munda

आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा – Birsa Munda History In Marathi

बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील उलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे.
बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरीशींही होता. त्यांची प्रतिभा पाहुन एका पारधी नेत्यांनी शाळेत टाकण्याचा सल्ला दिला.
परंतू त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागणार होता त्यांच्या वडीलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्याचे नाव डेविड केले त्याचा दाखला जर्मन मिशन स्कुल येथे झाला परंतू तेथे धार्मीक सक्तीमुळे त्यांनी शाळा सोडली व ते प्रसिध्द वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले.
वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिन्दू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळया धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा.
बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हंटले ‘‘ आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविला, बिरसा मुंडास पकडून देणा-यास 500 रूपये बक्षिस जाहीर केले.
बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यास अटक केली. त्यांच्या सोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली.
9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले.
3 फेब्रुवारी 1900 रोजी त्यांना इंग्रजांनी अटक केली होती. 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडाची जयंती साजरी केली जाते. सध्याचे झारखंड राज्यात रांची येथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. तेथे दरवर्षी जयंती निमित्त कार्यक्रम होतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शरद baviskar- भुरा

भूरा