पँथर " दलित पँथर म्हणजे काय होते नक्की ? १९७२ नंतरच्या काळात पँथर या नावाचा दरारा का होता ?
पँथर " दलित पँथर म्हणजे काय होते नक्की ?
१९७२ नंतरच्या काळात पँथर या नावाचा दरारा का होता ?
पुर्वीचे दलित आताचे अनुसुचित जाती-जमाती यांच्यावर बऱ्याच वर्षानुवर्ष अन्याय अत्याचार होत आला व आताही होत आहे. जातीव्यवस्था -वर्णव्यवस्थामुळे अनुसुचित जाती-जमातीचे नुकसान हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनाजाव्यवस्था -वर्णव्यवस्था
त्रास सहन करावा लागला. व या प्रतेक महापुरुषांनी हि ह्या जातीव्यवस्थेला व वर्णव्यवस्थेचा विरोध केला. ह्या जाती व्यवस्थेमुळे छत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक थांबवला होता.महाराष्ट्रातील कोणताहि भट ह्या राज्याभिषेकाला तयार नव्हता, ह्याच वर्णव्यवस्थेमुळे महात्मा फुलेना व माई सावित्रीबाई फुले यांना शिक्षन देन्यासाठी जात असताना शेनाचे गोळे मारले गेले, छत्रपती शाहु महाराज यांच्या बाबतीत हि काहि वेगळे नव्हते.
डाँ.बाबासाहेब आंबेडकरांना हि शिक्षनासाठी वर्गाच्या बाहेर बसाव लागल, ह्या अत्याचाराला कंटाळुन अनेकांनी हि व्यवस्था संपवन्याचा पर्यंन्त केला. पण जेवढा हा प्रयंत्न झाला त्या काळात थोड्या काळा पुरता अन्याय कमीहि झाला. पण संपलेला नाहि आजहि बऱ्याच जिल्ह्यात ह्या गोष्टी घडतात.
१९७२ मध्ये काहि चळवळीतील कार्यकर्त्यानी बंड केला व तेव्हा खरा पँथर जन्माला आला. पँथर म्हणजे कोन्ही व्यक्ती नसुन एक संघटना होती तीचा कार्यकाळ अंदाजे १८ महिने ईतकाच होता पण त्या संघटनेने केलेले कार्य हे त्या काळातील सर्वाच्य कार्य होते व यांची दखल तात्कालीन प्रधानमंत्री असलेल्या दिवंगत इंदिरा गाधी याना घ्यावी लागली होती. दलित पँथर म्हटले कि काहि नेत्या मंडळीच्या बुडाला घाम येत होता. प्रतेक पँथर म्हणजेच एक धगधगता ज्वालामुखी होता.
" दलित पँथर" ''लोकशाही मध्यवर्तित्व' हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत, असे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करीत होती. प्रामुख्याने मागास, कष्टकरी, कामगार, भूमिहीन, शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जाति-जमाती, आदिवासी या घटकांना घेऊन सामाजिक लढा उभारण्यात अग्रणी असणारी संघटना म्हणून समाजात दलित पँथर ओळखली जात होती.
सन. १९७० च्या आसपास मागासवर्गीय जातींवरील अत्याचारांनी कळस गाठला. पेरुमल समितीने त्याचा स्पष्ट निर्देश केला. हे प्रकरण (मागासवर्गीय जातींवरील अत्याचार) इतके गंभीर बनले की २४ मे १९७२ ला खा.मधु लिमयेंनी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला. व चळवळीतील काहि जहाल कार्यकर्त्यानी बंडाचे शस्त्र उभारले. व तेथेच २९ मे १९७२ रोजी काहि कार्यकर्त्यानी एकत्र येउन " दलित पँथर " नामक संघटना उभारली व त्याची पहिली सभा ९ जुलै १९७२ सिध्दार्थ नगर मुंबई येथे करन्यात आली.
सन १९६६ मधील अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकाचा प्रेरनास्त्रोत असलेली Black Panther या संघटनेचा फार मोठा प्रभाव दलित पँथर ह्या संघटनेवर होता. व सन.१९७२ मधील काँग्रेस सरकार त्या वेळी जातीय अत्याचार थांबवन्यास असंमर्थ ठरली होती.म्हणुन ९ जुलै च्या सभेत सर्वच दलित समाज्याच्या तंरुनांनी एका झेंड्या खाली एकत्र यावे "माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू" असे आव्हान केले गेले.
त्यामधे नामदेव लक्ष्मन ढसाळ ,राजा पिराजी ढाले, जयराम विठ्ठल पवार, भाई संगारे असे नावे पुढे आले पण याचा पुढिल प्रवास अल्पकाळ पण लक्षवेधी होता. त्यांनी या काळात अनेक प्रश्न हाताळले जसे
१) दलितावरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलने केले.
२) झोपडपट्टयांचा विस्तार व विकास घडवून आणला. व झोपडपट्टयांमधील रहिवाशांचे प्रश्न सोडविले.
३) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर लढे उभारुन मोठे लढे दिले.
४) मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलने केले.
५) दलितांच्या राखीव जागांच्या प्रश्नावर आंदोलन केले.
६) नवबौद्धांना सवलतीची मागणी केली.
७) बेरोजगारी दूर करण्यासाठी आंदोलने केली.
त्यांची गाजलेली व जश्यास तेसे दिलेले उत्तर म्हणुन काहि आंदोलने.
१) वरळी दंगलीत जशास तशे उत्तर
२) इंदापूरच्या बावड्यातील दलित बहिष्कार विरोधी आंदोलन
अत्याचार निषेधार्थ केलेले गीतादहन आंदोलन
३) इ.स. १९७३ कोल्हापूरला शंकराचार्य मिरवणूकीवर चप्पलफेक आंदोलन
४) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कँपीटेशन फि विरोधी आंदोलन.
५) चौधरी चरणसिंग यांच्या विरोधात संघर्ष व आंदोलन.
असे बरेच आंदोलन त्या वेळस केले गेले. त्यामुळे विद्यर्थी वर्ग, बेरोजगार,वर्ग, व शिक्षीत वर्ग हा दलित पँथर मध्ये फार मोठ्या प्रमानात सामील झाला. यामुळे अनेक आंदोलने ,मोर्चे मोठ्या संख्येने यशस्वी झाले .
पण दादर भोईवाडा येथील मोर्चाच्या वेळी बाजुच्या ईमारती हुन फेकुन मारलेल्या दगडी पाटा मुळे भागवत जाधवांचा जागीच मृत्यु झाला. त्याच वेळी नेमल्या गेलेल्या वरळी दंगली भस्मे आयोगाने पँथरच्या सर्व शिफारशी मान्य केल्या व काहि काळात दलित पँथर या संघटनेचा दरारा वाढला .
पुढे दलित पँथर हि संघटना गुजरात,पंजाब, दिल्ली,व परदेशात लंडन येथ पर्यंत पोहचली व येथे दलित पँथरच्या शाखा उघडल्या गेल्या.
पँथर हि संघटना प्रतेक अन्याय ग्रस्थाला आपलीशी वाटुलागली. प्रतेक तंरुन पँथरच्या दिशेने वाटचाल करु लागला. व त्यातच एक महत्वाची नवी गोष्ट घडली जी म्हणजे डाँ. बाबासाहेब आंबेडकराचे अप्रकाशीत साहित्या प्रकाशीत करन्यासाठी तातकालीन सरकारला भाग पाडले.पँथरच्या दबावामुळे डाँ. बाबासाहेब आंबेडकराचे २४ खंड, मुखनायक,बहिष्कृत भारत हे साहित्य प्रकाशीत करन्यात आले.
मग जर २१ व्या शतकात जर पुन्हा पँथर उभी होत आहे मग रोष का ?
" आजहि बऱ्याचश्या संघटना मागासवर्गीय समाज्यावर (दलितांवर ) होनाऱ्या अन्याया विरुध्द लढतात मग हा लढा तर पँथरचाच ना ?
" काहि संघटना विद्यार्थाच्या प्रश्नावर लढतात तर ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?
" काहि संघटना नवबुध्दाच्या सवलती साठी लढा देत आहे माझ्या मतो ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?
" बेरोजगारी कमी करन्यासाठी आजहि काहि संघटना लढतात मग तर ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?
" आज बऱ्याच संघटना मुलभुत गरजासाठी लढतात मग तर ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?
लढा तोच पण वेगवेगळ्या पध्दतीने वेगवेगळे होउन लढला जात आहे. पण राजकिय पक्ष जेव्हा दलित पँथरचे नाव येते तेव्हा आता तो काळ नाहि त्या मुळे दलित पँथरची आज गरज काय ? असा प्रश्न उपस्थीत करतात.
माझे याला एकच उत्तर आहे पँथर पँथर आणि पँथर.
आंबेडकर चळवळीचा जेव्हा जेव्हा विषय येनार तेव्हा दलित पँथरच्या नावाशिवाय विषय पुर्ण होनारच नाहि असे माझे मत आहे.
समता न्युज
✍✍✍
अमोल पो.जगताप
9834035397
ठाणे/बदलापुर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा