गुरुवार, ७ मार्च, २०१९

निमित्त कवी दया पवार यांचा कोंडवाडा

नसत्या इंगळ्या डसल्या नसत्या.......

दया पवार (इ.स. १९३५ - सप्टेंबर २०१९९६) हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.
दया पवार
जन्म नावदगडू मारुती पवार
टोपणनावदया पवार
मृत्यूसप्टेंबर २०१९९६
दिल्लीभारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी
चळवळमराठी दलित साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृतीबलुतं
वडीलमारुती
पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे.जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन पवारमॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्यांच्या मामा आणि आईच्या धीराने त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली. बोर्डिंगच्या अधिकार्‍यांनी दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून पवार बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागलेव इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळवले.
मॅट्रिक नापास झालेल्या दया पवार यांना पद्मश्री पुरस्कारमिळाला आहे.
पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.
पवार यांची मुलगी प्रज्ञा ही एक मराठी कवयित्री आणि गद्यलेखक आहे.

प्रकाशित साहित्यसंपादन करा

  • अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).
  • कोंडवाडा (कवितासंग्रह)
  • चावडी (कथासंग्रह)
  • जागल्या (कथासंग्रह)
  • धम्मपद (कवितासंग्रह)
  • पाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)
  • पासंग(कथासंग्रह)
  • बलुतं (आत्मकथन). ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.
  • बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)
  • विटाळ (वैचारिक)

पुरस्कारसंपादन करा

  • पद्मश्री
  • बलुतं’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार (१९७९)
दया पवार- अर्थात ’दगडू मारुती पवार’. (१९३५-१९९६). स्वत:च्या ’दगडू’ या नावापासूनच त्यांनी आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यायला सुरुवात केली. ते दलित साहित्य चळवळीतले एक महत्वपूर्ण लेखक. जन्म धामणगावातला (अकोला). १०वी पर्यंतचं शिक्षण संगमनेर इथल्या शाळेत. नोकरीच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली. परळ इथल्या पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी सहाय्यक म्हणून काम पहायला सुरुवात केली आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर आपले शिक्षण पुढे चालू ठेवले. anatomy department मधे काम करताना मेलेल्या प्राण्यांची कातडी सोलून त्यांची body preserve करण्यासाठी त्यांच्या शिरांमधे अल्कोहोलचं इंजेक्शन देण्याचं काम त्यांच्या वाट्याला आलं. एका संवेदनशील माणसाला हे काम करताना काय वेदना झाल्या असतील...
त्यांचं बलुतं हे आत्मचरित्र नुकतच वाचून झालं. ’दगडू’नं दयाला सांगितलेलं हे आत्मकथन.जणू स्वतःलाच स्वतःची जुनी ओळख दिल्यासारखं. ”आयुष्यात किमान एकाला तरी घडलेलं सगळं सांगावं” या आईनं दिलेल्या शिकवणीशी प्रामाणिक राहून घडलेलं ’सगळं’ त्यांनी सांगितलं आहे. सगळ्यात शेवट मग ’दया’नं लिहिलेलं एक मनोगत आहे. ही कथा कुण्या ’हिरो’ची नाही. यात आयुष्यात काही ’कर्तबगारी’ करून दाखवलेला कुणी ’पुढारी’सुद्धा नाही. कुठल्याही एकाच कडव्या विचारानं यात बाजी मारलेली नाही. यात एक साधं विश्लेषण आहे. आलेले अनुभव, विचारांचं उठलेलं मोहोळ, जीवनाच्या पटावर भेटलेली टोकाची माणसं.... या साऱ्या भूतकाळाकडे बघणारं एक संवेदनशील मन. स्वतःच्या झालेल्या चुकांवर पांघरूण घालायचा कुठे केविलवाणा प्रयत्न नाही. नरेंद्र जाधव यांनी ”आम्ही आन आमचा बाप” मधे जशी ग्रामीण बोली वापरली आहे तशी बलुतं मधे दया पवारांनी वापरली असती तर ते जास्त जिवंत वाटलं असतं का, असा मनात विचार आला. असो.
आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटत राहतं की या माणसाचं मन इतक्या भयंकर जीवनानुभवानंतरही इतकं संवेदनशील राहिलंच कसं? दारू आणि स्पिरिट च्या व्यसनी लागलेला बाप, काबाडकष्ट करून नवरा गेल्यानंतरही मुलांना शिकवण्यासाठी कष्ट उपसणारी आई, समाजात सतत वाट्याला येणारी उपेक्षा, शिक्षणामुळे येत असलेलं सामाजिक भान पण ते व्यक्त करत असताना होणारी घालमेल, आजूबाजूच्या स्त्रियांचं हलाखीचं जिणं, लहान वयात पाहिलेले, अनुभवलेले भयंकर प्रसंग या सगळ्यात ’दगडू’ हरवला कसा नाही? किंवा तो नावाप्रमाणे ’दगड’ कसा झाला नाही?? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची सत्वपरीक्षा घेतली गेली जणू. त्यांच्या एका कवितेत ’चिलया’ बाळाच्या कथेचा उल्लेख येतो.
”देव एवढे का दुष्ट असतात..
चिलयाचे रक्त,मांस मागतात...?”

...... दया पवारांनी आयुष्यात कधी चिलया बाळाचे तर कधी त्या चिलया बाळाच्या आई-बापाचे अनुभव घेतले.... या कथेला आपण ”भाकड कथा” का म्हणतो?
बलुतंची पहिली edition १९७८ सालची. त्या काळातलं हे साहित्य ’विद्रोही’ म्हणावं का. खरं पाहता बलुतं ने प्रस्थापिताला धक्का दिला पण तरीही ते ’आत्मकथना’च्या पठडीत जास्त चपखल बसणारं आहे. वाट्याला आलेल्या दुःखाचं त्यात शेअरिंग आहे. दुःखाकडे ’अन्याय’ म्हणून बघण्याची त्यात द्रुष्टी दिसत असली तरी ती तितकी ’विद्रोही’ स्वरूपात व्यक्त मात्र होत नाही. ती खरी व्यक्त झाली आहे त्यांच्या ’कोंडवाडा’ या काव्यसंग्रहामधे. बलुतं च्या निमित्तानं मी कोंडवाडा सुद्धा वाचलं. यातल्या कविता दुःख आणि अन्याय या दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होणाऱ्या आहेत. आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव, महार समाजाच्या उन्नतीसाठीची आतून व्यक्त होणारी तळमळ, दलित समाजाला, तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे केलेलं आवाहन आणि अंतर्मुख होऊन मांडलेला अनुभवांचा लेखाजोखा; हे सारं त्यांच्या कवितेतून व्यक्त होतं. कोंडवाड्यामधे आणि बलुतं मधे केवळ सामाजिक बाह्य संघर्ष नाही. यात सामाजिक संक्रमणाबरोबर आंतरिक संघर्षही आहे. शिकल्यामुळे होणारं white collar मन आणि त्यातूनच आपल्या समाजापासून तुटल्याची येणारी भावना यात वेळोवेळी व्यक्त झाली आहे.
कोंडवाडाचं मुखप्रुष्ठ बोलकं आहे. त्याचा ३/४ भाग हा दगड-विटांनी बांधलेल्या (एकही खिडकी नसलेल्या) कोंडवाड्याची भिंत आहे. त्या शेजारून एक ठिपक्याएवढा दिसणारा माणूस (ज्याचा चेहरा दिसत नाही. खांद्यावर झोळी आहे. अंगावर कपडे चांगले आहेत) चालला आहे. दया पवार यांची कविता ही त्यांच्या आयुष्याच्या कोंडवाड्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सापडलेली पायवाट होती. त्यांनी कष्टानं घेतलेलं शिक्षण, केलेलं वाचन एका अर्थानं त्याना मोकळा श्वास घ्यायला शिकवत होतं तर कधी त्यांच्या वेदनांच्या खपल्या उघडणारं होतं. त्यांनी कोंडवाडा कवितेत म्हटलं आहे-

”कशाला झाली पुस्तकांशी ओळख? बरा ओहोळाचा गोटा..
गावची गुरे वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या..”

दया पवारांची कविता वास्तवदर्शी आहे. ”मला निसर्गात रमणं आणि त्यावर कविता करणं कधीच जमलं नाही.” असं त्यानी म्हटलं आहे. किडे-मुंग्यांकडे कौतुकानं बघण्याची त्यांची मानसिकता नव्हती. ते शक्यही नव्हतं. इथे किड्याना खायला रव्याचा दाणा मिळू शकतो पण आमच्यासारख्या माणसांना एक वेळचं खायला मिळेल याची शाश्वती नाही, हे त्यांचं वाक्यच त्यांची मनःस्थिती सांगतं. बलुतं मधे जरी त्यांनी म्हटलं असलं की ही कथा माझ्या पराभवाची आहे तरी तसं पूर्णपणे खरं नाही. ’दगडू’ ते ’दया’ हा प्रवासच मुळी त्यांच्यातला सकारात्मक बदल दाखवतो. कोंडवाडामधे त्या कोंडलेल्या जीवनातून बाहेर येऊन ते म्हणूनच आवाहन करतात-

”प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला आहे
ज्या काजव्यांचा तुम्ही जयजयकार केलात
ते केव्हाच निस्तेज झाले आहेत
आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा
अन क्रांतीचा जयजयकार करा.”
सुरक्षित जगात जगलेल्या माझ्यासारख्या मुलीला बलुतं आणि कोंडवाडा हादरवून सोडतं.......

कोंडवाडा निमित्ताने : दया पवार यांचे स्वगत

खुदद संग्रहातील कवितेसंबंधी तसा मी कमी बोलणार आहे. कवितांच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी तिच्यामागचे अनुभवविश्व, कविता घडण्यापूर्वीची मानसिक अवस्था, घटनांचे क्रम, झालेली विलक्षण घुसमट, याचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न.
संग्रहात सामावलेल्या कविता सोडुन, तसे मुबलक कविता-लेखन मी केलेले आहे. त्यातील एकही कविता या संग्रहात घालण्याची इच्छा होत नाही. यामागील कारणमीमांसा कोणती, कवितेच्या संदर्भात माझ्या जाणिवा कशा बदलत गेल्या, वेळोवेळी मी ज्याने प्रभावित झालो; ते नेमके अस्सल होते की नक्कल, हे पाहणे महत्त्वाचे वाटते.
मी पहिली कविता केव्हा लिहिली असावी? हे शोधण्यापूर्वी, कवितेची जाणीव तरी कशी निर्माण झाली हे तपासायला हवे. बालपणात माझ्या वाट्याला नेमके कोणते संस्कार आले, सांस्कृतिक जीवन कोणते होते, हे सारे पाहिले म्हणजेच माझ्या आजच्या कवितेची वीण व तिची पाळेमुळे कुठवर पोहोचलीत हे समजू शकेल.
मी तसा घाटावरचा. तालुक्यात सह्याद्रीच्या रांगेतील फाटा गेलेला, उंच असे कळसूबाईचे शिखर, तिथून मुंबई बेट टळटळीत दिसणारे. जन्मगावापासून जवळच अमृतवाहिनी प्रवरा दुर्थडी भरून वाहणारी. गाव तर डोंगराच्या कुशीत वसलेले, अशा निसर्गपरिसरात गावकुसाबाहेर कोंडवाड्यात' माझा जन्म झाला.
माझ्या जन्मामुळे कोणत्याही दिशेला तारा निखळला नाही किंवा मला सूर्यबिंब फळासारखे वाटले नाही. जमिनीवर पाय ठेवूनच मी चालू लागलो. कळू लागले, तेव्हापासून वास्तवतेच्या दाहक चटक्यांनी होरपळलो, भोवताली पसरलेला समृद्ध निसर्ग कोट्यासारखा बोचू लागला. मला एकही निसर्ग कविता लिहिता आली नाही त्याचे नेमके कारण हेच असावे. मराठी कवींनी आपल्या कवितांमधून चितारलेला निसर्ग केव्हाच मनाला रिझवू शकला नाही. या देशातील जातिजातीची मडक्यांची उतरंड, नुसती श्रमाची विभागणी नाही; तर श्रमिकांची विभागणी. एक जात नेमकी दुसन्या जातीच्या तोंडावर बसलेली. त्यामुळे गुदमरलेली अवस्था. आपण तर अगदी कॅळचे मडके, त्यातही रांडकीचं रांड प्वारे पाणलोटाने कचरा किना-याला लोटावा, तसं आपलं आयुष्य,
बामनाघरी 'लिव्हणं, कुणब्याघरी दाणं, महाराघरी गाणं. ही म्हण लहानपणापासून ऐकत असू. गाणंबजावणं करणं म्हणजे हिणकस धंदा करणं हा त्यात सूर होता, सवर्णाच्या घरी गाणं आणि महाराघरी गाणं यात सांस्कृतिकदृष्ट्या एकच पातळी नव्हती. केवळ बनृत्यासाठी किंवा पाच-दहा रुपयांसाठी ह्या गाण्यामुळे आपले पूर्वज कोणाचे मनोरंजन करीत होते? या गाण्यातून त्यांनी दु:खाचा शोध घेतलाय काय? तसे जर झाले असते, तर किती मोठा सांस्कृतिक ठेवा आपल्याला मिळाला असता. लिव्हणं आणि दाणं हे आपल्या वाट्याला की नव्हतं? दाणं नसेल, तर गाणं कसं सुचेल? दाणं मिळवण्यासाठी वाजंत्र्याच्या ताफ्यात किंवा ढोलकं तुणतुणं घेऊन आपण तालेवाराच्या पुढं गाणं का गायचं? असे प्रश्न लहान वयातही सुचत होते. ज्या लहान वयात मराठीतले आजचे उच्चवर्णीय कवी ज्ञानेश्वर, तुकाराम, रामायण, महाभारत यांवर कवितेची जाणीव पोसतात, त्या वयात माझ्यापुढे काय ताट वाटून ठेवले होते?
लहानपणी पाहिलेला महारवाडा स्वच्छ दिसतो आहे. दहाबारा वर्षाचे वय असावे. स्वातंत्र्याची जिलबी वर्गात मिळाल्याची आठवण आहे. शाळा सुटली म्हणजे महारवाड्यातील आम्ही मुले चावडीत जमायचो. यातील काही गुरांकडे जाणारी होती. आमच्यापैकी एखाद्या चुणचुणीत पोराला लुगडं नेसवायचं. पायात बाभळीच्या शेंगा चाळ म्हणून बांधल्या जायच्या. इफेडी, डबे यांच्या साथीत 'तमाशा' उभा राहायचा. अगंबयो: शेर ताटीमें लांडगा गयोस्स! सोडा लिंबू बाटलीमध्ये | पोरी दम धर ग छातीमध्ये अशा गाण्यांना झिलक-याच्या साथीत जोर चढायचा, हा सारा प्रकार त्या काळी कुणालाच अश्लील वाटत नव्हता हे विशेष. या प्रतिमांच्या पाठीमागे वेगळेच विश्वे दडलेले आहे हे कळण्यास बराच काळ जावा लागला. | वडिलांचा वाजंत्र्याचा ताफा होता. लग्नसराईत त्यांना भाव यायचा. ताफ्यात वडील कांड' वाजवीत, कधीकधी मी त्यांच्याबरोबर जात असे. संबळ वाजायला लागला की, माझाही देह भारावून जायचा. फावल्या वेळात माझ्या वयाची मुले त्यांचे अनुकरण करीत, तोंडातूनं आवाज काढून सारा ताफा हुबेहूब उभा करीत. फावल्या वेळात तो 'दम' शिकतं. सरमाडाची काडी पोकळ करून इबेड.अगर पाण्यात बुडवून 'दम' घेत, कांड किंवा सूर शिकण्याआधीची ती पूर्वतयारी होती. " पुढे मी शाळकरी झालो, वाजंत्रीपणा शिकणे म्हणजे घाणेरड.ए काम करणे, ही जाव प्रबळ झाली. वाजंत्र्यांच्या पत्रावळ्या उकिरड्यावर. ठायी ठायी मानहानी. हा धंदा गुलामगिरीचे जोखड वाटायचे. आज मला कोणतेच वाद्य वाजविता येत नाही. खरं म्हणजे संगीत घरात पिकत होतं. आपण त्याकडे जाणूनबुजून पाठ फिरवली.
यात आपला किती दोष? हा आनंद कोणी नासवून टाकला? आज एखाद्या सुखवस्तू घराण्यातील पोरगं गॅलरीत बसून अलगूज वाजवताना मी पाहतो, तेव्हा मॅला त्याचा हेवा वाटतो. लहान वयातच कलेकडे पाहण्याची ही दृष्टी! समाजव्यवस्था याला जबाबदार. | वडिलांना लावण्यांचा छंद, खुटीला ढोलकी आणि तुणतुणे टांगलेले. थकून भागून वडील आले म्हणजे, अंगणात जोडीदाराबरोबर ढाल्या सुरात ढोलकीच्या साथींत ते गात. 'तू ग ऐक नंदाच्या नारी.स.' गावात तमाशा आला म्हणजे, तो नेमका आमच्या घरी उतरायचा. त्याची गंमत वाटायची. त्याच्यातला सरदार खाजगीतही खूप शुद्ध बोलतोय असे वाटायचे. रात्रीला ते राजा आणि प्रधान व्हायचे, पण सकाळ उजाडली म्हणजे, विडीला ह्यांच्याजवळ पैसा नसायचा. पावसाळ्यात अळ्यांसारखे तडफडायचे. त्यांच्यात मास्तर नावाचा प्राणी असायचा, नाचणारणीच्या घोळक्यात तो लावण्या बांधायचा. गांजाची चिलीम झोकली म्हणजे त्या तारेत तो शब्द जुळवायचा. मछुम छणाणा | उभी राहून बोल ग जरा |' किंवा 'ये माझ्या लाडक्या छबिल्यो| मैशी बोल |ऽ' अकस्मात मास्तरला ....
....
सदा सर्वदा मी विद्रोही' कविता लिहितो असे काही नाही. अंतर्मुख होऊन माझ्या समाजाचे अंतरंग तपासावे वाटते. अशा वेळी सभा' सुचते. ही निवडणूक चालू असते, तेव्हा मी साक्षी असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडेकरांनंतर त्यांच्या अनयांयात आलेले अराजक, बौदध धम्म घेतलेला पण त्याचा डॉ. आंबेडकरांनी सांगितलेला नवा संदर्भ लक्षात न घेता, दुकान तेच पण पाटी बदललेली हा प्रकार. सांस्कृतिक मने एवढी मागासलेली, की साधा अध्यक्षही निवडणे कठीण, सारा समूह खोट्या प्रतिष्ठेला बळी पडलेला. कोते, स्वार्थी पुढारपण, शिव्यागाळ्या, भांडणे व मारामाच्या यांना ऊत आलेला. देशातील लोकशाहीचेही चित्र पाहिलेले. कवितेला हळूहळू मोठा कॅनव्हॉस मिळतो. जिल्हावाद, प्रांतवाद, बोकाळलेला, कवितेच्या शेवटी गरोदर बाईच्या बाळंतपणातून हे अराजक संपणार आहे, नवे नेतृत्व येणार आहे असा आशावाद. | मराठी वाचक ह्या कवितेचे स्वागत कसे करील सांगता येत नाही. गेली काही वर्षे वेगवेगळ्या पातळ्यांवरील श्रोत्यांच्या समूहापूढे कविता वाचण्याची संधी मिळाली. त्यामुळे काही अनुमान काढू शकतो. ग्राण पातळीवर नवा सुशिक्षित वर्ग मोठ्या संख्येने येतो आहे. तेथील हायस्कूल कॉलेजच्या पातळीवर माझा कविता-वाचन हा तर न विसरणारा अनुभव. पहिली रात्र, सभा अशा कविता श्रोत्यांनी डोक्यावर घेतलेल्या. त्याचबरोबर काही निराशाजनकही अनुभव. मराठीचा प्राध्यापकवर्ग नाक मुरडतो आहे; तर पवई येथील आय.आय.टी. च्या विद्याथ्र्यांपुढे ही कविता वाचताना थंड गोळ्यासारखे वाटते आहे, बर्फावर सुरी फिरवावी तसा हा अनुभव | भारतीय सांस्कृतिक जीवनात ही दरी आहे याची जाणीव पुन्हा प्रकर्षाने येते. हे| सांस्कृतिक दवंदवं नाहीसे करण्याकरिता माझी कविता बळी पडली, तरी चालेल या भूमिकेशी मी आलो आहे. मरण या कवितेत मी लिहितो आहे.
धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात तसं आपण हसत मरावं.
-- दया पवार  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...