बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

जग खूप सुंदर आहे.

जग खूप सुंदर आहे 
फक्त ते जगता यायला हवं 
त्याचा निर्माता किती सुंदर असेल 
हे अनुभवता यायला हवं 
संघर्षामधून आणि परिश्रमातूनच नव जन्माला येतं 
निर्मात्याची दूरदृष्टी आणि निर्मात्याचे नित्यनूतनत्व नित्य जगायला हवं 
दृष्टी तर प्रत्येकालाच आहे
त्यातही डोळस व्हायला हवं
निसर्ग पहा तो देतच राहतो 
त्याच्याकडील दातृत्व घ्यायला हवं 
आयुष्य किती आहे पुष्पाचे?
त्यांचे रंग व सुगंध व्हायला हवं
निसर्ग विविध रंगी याप्रमाणे नित्यनूतन होता यायला हवं 
सुरवंटाचे फुलपाखरू व्हायला हवं 
रडण्यात काय मजा!
थोडं हसायला हवं 
आयुष्य थोडं आहे 
भरभरून जगायला हवं 
प्रकाश पसरवून आपण आकाशभर 
माणसा-माणसानेच जग जोडायला हवं
द्वेष, राग, दंभ यांची होळी करून 
वात्सल्य-मानवतेची दिवाळी साजरी करूयात आपण सारे
जग फारच सुंदर आहे ते फक्त जगता यायला हवं
जग अप्रतिमच आहे ते मुक्तपणे जगता यायला हवं
प्रल्हाद भोपे, दिनांक 29.08.2024, प्रवासात..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विंदा करंदीकर यांच्या 'घेता' कवितेचा भावार्थ

विंदा करंदीकर यांच्या 'घेता' कवितेचा भावार्थ परिचय - गोविंद विनायक करंदीकर (१९१८-२०१०) मराठीतील अतिशय महत्त्वाचे प्रयोगशील कवी, अनुव...