पुस्तकांसारखी माणसं
नीट वाचावीत
तीनं सांगितलं होतं
तिचं म्हणन शिरसावंद्य मानलं
मग तिला एकदा म्हंटल
तुझ्या सांगण्याचा काही
उपयोग झाला नाही
गुंते तर कितीक झाले
ते सुटता सुटत नाही
ती हसली अन म्हणाली
नेहमीसारखा हाच धांदरटपणा केला
पुस्तकासारखी माणसं वाचलीस
नीट हा शब्द विसरली
अक्षरावरून डोळे फिरवून
अर्थही समजुन घ्यावा
तसा माणूस वाचताना
बाह्यरुपासह मनीचा
तळ गाठावा
मग पुस्तक कळत जातं
तसा मानुसही कळत जातो.
वाचतानाच केव्हा तरी
आपलासा होतो.
आणखी एक सांगते
नीट घे ध्यानी
पुस्तकासारखी मानसंही
पुन: पुन्हा वाचावीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा