सोमवार, ८ एप्रिल, २०१९

मध्ययुगीन गद्य पद्यांचा अभ्यास viii वस्तुनिष्ठ प्रश्न

१. मराठीतील पाहिले भावकवी म्हणून कोणास ओळखले जाते?  संत नामदेव
२. संत ज्ञानेश्वरांनी भगवदगीतेस काय म्हटले आहे?  धर्म कीर्तन
३. सुत्रपाठ हा ग्रंथ कोणी लिहिला?  केसोबास
४. ११४ दृष्टातांचे संपादन केसोबासांनी कोणत्या ग्रंथात केले आहे?  दृष्टांतपाठ
५.निष्ठेने एकाच परमेश्वराची सेवा केली तर उचित फळ मिळते हा विचार तुम्ही अभ्यासलेल्या गद्य उताऱ्यातून येतो? सिंदेराणेयाचा दृष्टांत
६. कान्हेरदेवासोबत लोणार सरोवरास कोण आले होते? रामदेवराय यादव
७. ------म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा साहूकार
८. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?   आळंदी
९. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला?  आपेगाव
१०. आज्ञापत्र ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? रामचंद्रपंत अमात्य
११. माझा मराठाचि बोलू कौतुकेl परी अमृतातेही। ----- जिंके   पैजा
१२.मराठी भाषेविषयीचा अभिमान संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या कोणत्या अध्यायातून व्यक्त केलेला आहे?   सहाव्या अध्यायातून
१३. वारकरी पंथाची पताका पंजाबपर्यंत नेण्याचे कार्य कोणी केले?   संत नामदेव
१४. संत नामदेवाचे अभंग ------------ या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत.   गुरुग्रंथसाहेब
१५. कडू वृंदावन साखरे घोळीळे l तरी काय गेलें----------? कडुपण
१६.नामा म्हणे संत सज्जन - - - -। ऐशासही गती काळांतरी । संगती
१७.किर्तन परंपरेचे पाईक म्हणून कोणास ओळखले जाते ? संत नामदेव
१८.संत नामदेवांचे पूर्ण नाव काय आहे? नामदेव दामाशेटी रेळेकर
१९. होनाजी बाळाचे पूर्ण नाव काय आहे? होनाजी सयाजी शिलारखाने
२०. घनश्याम सुंदरा..... ही अजरामर भूपाळी कोणाची आहे?   शाहीर होनाजी बाळा
२१. लखलखाट चकचकाट जैसे दुकान ---------- बोलणे मंजुळ मैनाचे ।। बोहोऱ्याचे
२२. माधव निधान ही प्रसिद्ध रचना कोणाची आहे?   शाहीर अनंत फंदी
२३.बिकट वहिवाट नसावी ------- मार्गा सोडु नको। धोपट
२४. कोणाच्या उपदेशामुळे तमाशाचा त्याग करून अनंत फंदी किर्तनाकडे वळले? अहिल्याबाई होळकर
२५.मोरोपंतांचे पूर्ण नाव काय आहे? मोरोपंत रामचंद्र पराडकर
२६. हंसकाकीख्यान ही कथा कोणी कोणास सांगितली आहे?   शल्याने कर्णास
२७. भाजले ते बीज -------- कदा। न मिळेचि दुधामाजी लोणी।।  अंकुरेना
२८. संत बहिणाबाई ह्या संत--------- च्या शिष्या होत्या.  तुकाराम
२९.संतकृपा झाली इमारत फळा आली ही रचना कोणाची आहे?  संत बहिणाबाई
३०. दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? समर्थ रामदास
३१.संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे? नारायण सुर्याजीपंत ठोसर
३२.समर्थ संप्रदायाचे प्रवर्तक कोणास मानले जाते? संत रामदास
३३. बरा कुणबी केलों। नाहीं तरि -------असतो मेलो।।  दंभेचि
३४. संसार करितां दगदगले मनीं। ----- विकल्या चौघीजणी।। नंदा
३५. संत एकनाथांचे जन्मगाव कोणते? पैठण
३६. हिंदी भाषिक असूनही मराठी अभंगांची रचना कोणत्या संतांने केली? संत सेना न्हावी
३७. सेना म्हणे ऐशा दांभिका -------। दोघेही जाताती अधोगती।।  भजती
३८. सकल संतगाथेत संत सेना न्हावी यांच्या किती रचना आहेत?   १४३
३९. वारकरी संप्रदायातील कोणत्या संतास काका हे संबोधन सर्व संत वापरतात?  गोरोबा
४०. संत गोरा कुंभार यांनी आपल्या अभंगात कोणत्या संतांचा उल्लेख केलेला आहे?
 संत नामदेव
४१. सारितेचा ओघ -------------आटला । विदेही भेटला मनामन । सागरी
४२. संत कर्ममेळा हा संत चोखामेळा व संत--------- यांचा पुत्र होता.  सोयराबाई
४३. जन्म गेला उष्टे खातां । ----- न ये तुमचे चित्ता ।। लाज
४४. संत गोरोबाकाका यांचे जन्मगाव कोणते?  तेरढोकी
४५. नामयाची दासी जनी हे बिरुद विनम्रपणे कोणती संत कवयित्री लावते? संत जनाबाई
४६. तुझे गेले मढे । तुला पाहून------- रडे ।।  काळ
४७. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे गाव कोणत्या संतांचे जन्मगाव आहे? संत जनाबाई
४८. विठ्ठलाचा एकेरी उल्लेख संत जनाबाई कसा करते? अरे विठ्या विठ्या
४९. ज्ञानेश्वरीचे मूलनाव काय आहे? भावार्थदीपिका
५०. भाऊसाहेबांची बखर या बखरीचे कर्ते कोण आहेत? कृष्णाजी शामराव
५१. शिवकालीन आचारसंहिता म्हणजे ---------- हा ग्रंथ होय. आज्ञापत्र
५२. सुरजमल जाट किती रुपयाची खंडणी धुडकावून लावतो?  एक करोड रुपये
५३. सुरजमल जाट व मराठे यांच्यातील युध्दात कोनास गोळी लागते? खंडेराव होळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लेखन कौशल्य

Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...