लेखन कौशल्य
भाषिक कौशल्यातील लेखन ही कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे. मौखिक भाषेचे ते चिन्हांकित रूप असते. अक्षर ओळख असलेली सुशिक्षित व्यक्ती आपले बोलणे विचार अक्षरुपाने प्रकट करते तेव्हा नकळत या लेखन कौशल्याचा ती स्वीकार करते. अध्ययन अध्यापनामध्ये वाचनाप्रमाणेच लेखन कौशल्यही अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखन कौशल्यासाठी भाषेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भाषेतील विविध शब्द, त्यांचे अर्थ रस्व दीर्घ व या उच्चाराप्रमाणे त्यांचे लेखन, व्याकरणिक नियम, अक्षरओळख, शब्दसंग्रह, सुवाच्च लेखन, हस्ताक्षर, मनातील विचार समर्पक शब्दात मांडण्याची क्षमता इत्यादी गोष्टीचा स्वीकार केला म्हणजे या भाषिक क्षमतेचा विकास साधता येतो.
लेखन म्हणजे काय?
व्यावहारिक जीवनात भाषेचा विविध स्तरावर आपण वापर करतो. पत्रलेखन, कार्यालयीन लेखन, अध्ययन अध्ययन क्षेत्रातील लेखन, वृत्तपत्र लेखन, ग्रंथ लेखन इत्यादी आपल्या परिचयाचे क्षेत्रात त्यांचा आपण अनुभव घेतो. या विविध स्तरावरील भाषिक रचना छापील किंवा मुद्रित स्वरूपात असतात त्यासाठी शुद्धलेखनाचे नियम, व्याकरणिक नियमांचा आधार घेतलेला असतो. त्यामुळे लेखनाला एक वेगळे स्वरूप प्राप्त होते. लेखन हे आपल्या विचाराचे मूर्त स्वरूप असते
लेखनाच्या व्याख्या
१. आशयाची मूर्त रूपाने केलेली मांडणी म्हणजे लेखन होय.
२. अक्षराच्या माध्यमातून परस्परांशी साधलेला संवाद म्हणजे लेखन होय.
३. मनातील विचारांचे अक्षरुप म्हणजे लेखन होय.
अक्षर-शब्द-वाक्य यांची व्याकरणिक नियमाच्या आधारे मांडणी केलेले लेखन हे ‘शुद्धलेखन’ असल्याचे म्हटले जाते. त्यासाठी मनाची पूर्वतयारी असणे आवश्यक आहे. काय लिहायचे? व कसे लिहावयाचे? हे दोन प्रश्न नेहमी लेखकाच्या मनात निर्माण होतात. त्याची विचारपूर्वक सोडून केली म्हणजे लेखन क्षमतेचा आधार घेऊन मनातील विचार अक्षर रूपाने मांडण्याची प्रेरणा मिळते. त्यातूनच लेखन साकारते.
चांगले लिहिता येणे यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत.
१) विषयाचे पूर्ण ज्ञान.
२) काय लिहावयाची याविषयी स्पष्टता. ३) मराठी लेखनविषय नियमाचा परिचय. ४) शब्दसंग्रहाचे विपूलता
५) समर्पक शब्दांची निवड करण्याची क्षमता.
६) मनाची एकाग्रता
७) सुंदर हस्ताक्षर - त्यासाठी लेखनाचा सराव.
८) योग्य पद्धतीने विचार मांडण्याची क्षमता, नेमकेपणा.
९) भाषेवरील प्रभुत्व.
१०) व्याकरणिक नियमांचा परिचय.
वरील गुणांच्या आधारे आपले लेखन कौशल्य जाणीवपूर्वक विकसित करता येते. त्यासाठी मनाची तयारी असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आपणा सर्वांना लेखनाचा कंटाळा येतो. याची प्रमुख कारण म्हणजे दैनंदिन जीवनात लेखनाची गरज कमी असते. बोलण्यापेक्षा लिहीण्याचा जास्त वेळ लागतो. चटकन संवाद साधून आपण लेखनाकडे दुर्लक्ष करत होतो. त्यामुळे आपले लेखन क्षमता विकसित होणे थांबते म्हणून लेखनाचा सराव करा,अधिक वाचन करा, त्यावर चिंतन करा, मनातील विचारांचे त्वरित लेखन करा, त्यांचा उपयोग आपल्या लेख शैक्षणिक स्तरावरील अध्ययन अध्यापन प्रक्रियेत होतो. विद्यार्थीदशेतच लेखन कौशल्य आत्मसात केले तर त्यामुळे भविष्यात चांगले जीवन जगता येते.
लेखनासाठी प्राथमिक कौशल्ये
माणसाने आपल्या भाषेला लिपी प्राप्त करून दिल्यानंतर व ती अधिक स्थिरस्थायी आहे हे लक्षात आल्यावर माणसे आपले विचार, मते, कल्पना लेखननिविष्ट करू लागली. लेखन ही
स्वयं -अध्ययनाची जशी पायरी आहे तसे ते आत्मविष्काराचे, ज्ञानाच्या प्रसाराचेही महत्त्वाचे साधन आहे. औद्योगिकिकरण व जागतिकीकरणामुळे ज्ञानप्रक्रियेला व लेखन प्रक्रियेला गती आली. म्हणून जलद लेखनाचे महत्त्व आहे. त्याचबरोबर लेखन योग्य झाले पाहिजे याचा अभ्यास व्हायला लागला.
लेखनाची प्राथमिक कौशल्य आपण सात टप्प्यात शिकणार आहोत. प्रथम जलद लेखन कसे करावे ते पाहू. दुसऱ्या भागात लेखनाचे दर्शनी रूप कसे असते ते पाहू. आज्ञेबर हुकूम करावयाच्या लेखनातही उचित शब्द lलेखनाला कसे महत्त्व आहे ते तिसऱ्या व चौथ्या भागात पाहू. संपन्न शब्दसंग्रहाचे महत्त्व काय, शुद्धतेचा परिणाम काय होतो व योग्य शब्दांचा वापर न केल्यास कोणती तोटे होतात ते पुढील भागात पाहू.
लेखनगती
प्रौढपणी आपण अभ्यासास सुरुवात केल्यावर लेखनाला गती येत नाही. कित्येक वर्षात लेखनाचा सराव नसतो. लिहिण्यामुळे हात दुखतात. शब्द नेमका कसा लिहावयाचा ते आठवत नाही. जोडाक्षर लेखन त्रासदायक वाटते. पर्याप्त वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे लिहिण्याचा कंटाळा येतो. जलद लिहावे तर अक्षर बिघडते. सावकाश लिहावे तर लवकर संपत नाही अशी द्विधा स्थिती होते. लेखन करताना कोणी अचानक प्रश्न विचारल्यास गती खुंटते. ऐकणे व लिहिणे या क्रिया एकाच वेळी करणे जमत नाही. बोलताना वाक्यक्रम तसेच भाषा याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही; पण लेखनात ते मुद्दाम पाहिले जाते व त्यावर प्रभुत्व नसते म्हणून लेखन नकोसेच वाटते. बोलताना पूर्वतयारी नसली तरी चालते. काही वेळा वेळ मारून नेता येते; पण लिहिण्यासाठी संदर्भ सामग्री असावी लागते. मजकूर कळलाच नसेल तर लिहिता येत नाही. तो पाठ नसेल किंवा तयार नसेल तर एक अक्षर लिहून होत नाही. लेखनविस्तार करता येण्यासाठी अधिक वाचनाची, अभ्यासाची गरज असते. कौशल्यांचे स्थलांतरण करता येण्याची क्षमता असल्यास लेखनाला गती येते.
लेखन गतिमान न होण्याची कारणे
१) लिहिण्याचा सराव नसणे.
२) जोडाक्षर लेखन किचकट वाटणे.
३) लेखन वेळखाऊ साधन मानसिकता. ४) लिहिण्यापेक्षा अक्षर खराब होण्याची भीती.
५) एकाच वेळी ऐकणे-लिहिणे करावे लागणे.
६) लिखित विश्वाची ओळख नसणे.
७) लेखनासाठी संदर्भ सामग्रीच नसणे.
८) आकलन स्पष्ट न होणे.
९) लेखन विस्ताराची तंत्रे माहीत नसणे.
१०) लेखन कौशल्य स्थलांतराची सवय नसणे आदी कारणामुळे लेखन गतिमान होत नाही. त्यासाठी काही उपाय सुचविता येतात. सरावाने व प्रयत्नाने लेखन कौशल्य सुधारते.
लेखन गतिमान करण्यासाठी उपाय
समर्थ रामदासांनी म्हटलेले आहे, ‘दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंड वाचीत जावे’ लेखनामध्ये नेहमी सातत्य ठेवले की, ते अंगवळणी पडते व त्याचा त्रास वाटत नाही. जोडाक्षरे लिहिण्याचा सराव करावा. शुद्धलेखनावरील पुस्तके पहावित, होत असलेल्या चुकांची दुरुस्ती करावी. लेखनाचे महत्त्व जाणून घ्यावे. प्रथम वेळेत मजकूर संपवणे महत्त्वाचे मानून नंतर सुलेखनाकडे वळावे. ऐकून लिहिण्याचा सक्तीने करण्याचा सराव करावा. खूप चिकित्सक वाचन करावे व ते वाढवित जावे. विषय, हेतू, आराखडा करून संदर्भसामग्री जमा करावी. नेमका आशय समजून घ्यावा. न समजल्यास संकोच न करता मार्गदर्शकाची मदत घेऊन लक्षात घ्यावा. लेखन विस्तारात ज्या तंत्रांची ओळख करून घ्यावी. कौशल्य स्थलांतराची सवय करावी. आंतरक्षत्रिय संबंधाची व्यापकता अनुभवावी व त्याची सवयी लावावी. तंतोतंत लेखन करण्याचा प्रयत्न करावा.
लेखनास गती येण्यासाठी हे करून पहा.
१. एक छोटा परिच्छेद पाहून लिहा. सुवाच्च, शुद्ध, अचूक व भराभर लिहा. एका दमात पाच-सहा शब्द अथवा एक- दोन ओळी वाचून न पाहता लिहा. परिच्छेद लेखनास किती वेळ लागतो ते नोंदवा. तोच परिच्छेद पुन: पुन्हा लिहा. दुसऱ्या व तिसऱ्या लेखनाला कमी वेळ लागलेला दिसेल.
२. जे लेखन आपणास पाहून लिहावयाचे आहे ते लिहिण्यापूर्वी एकदा वाचून काढा. वाचल्यामुळे आशय, मजकूर ध्यानात येतो. त्याचा परकेपणा नाहीसा होतो. त्यामुळे पाहून लिहिताना आधी वाचल्यामुळे विषयानुरूप शब्द सहज आठवतात व लेखनात गती येते.
सुलेखन
डोळ्यांना सहज दिसेल असे स्पष्ट, सुटे, मोकळे सुवाच्च लिहिणे म्हणजे सुलेखन होय. असे लेखन करणे प्रत्येकाला शक्य आहे. परंतु त्यासाठी प्रयत्न व सातत्य ठेवणे आवश्यक आहे.
अनेकांना इंग्रजीतील लपेटीप्रमाणे एकात एक अक्षरे लिहिण्याची काहिंना सवय असते, त्यामुळे एका अक्षरातील मात्रा बऱ्याच वेळा पुढील वा मागील अक्षरावर गेलेली असते. उकार स्पष्ट नसतो अक्षराची गाठ स्पष्ट नसते. अक्षर फारच बारीक असते, त्यामुळे नीट वाचता येत नाही. दोन शब्दात आवश्यक ते आंतर राखलेले नसते. सांकेतिक वर्णाऐवजी दुसऱ्याच वर्णाची योजना केलेली असते. (षहामृग, आमाला) नको तिथे अविष्कार कौशल्य दाखवून अक्षर वाचणे अवघड करून टाकलेले असते. आपण असे काही लिहीत नाही ना? अशी एखादी सवय असल्यास ती घालविण्याचा प्रयत्न करा.
सुलेखनाची संकल्पना केवळ अक्षर लेखनापूर्ती मर्यादित नाही. तर एकंदर टीपण / लेखन टापटीप असावे अशी आहे. शीर्षक, उपशीर्षके देऊन ती अधोरेखित करावीत. सुटे, स्वतंत्र परिच्छेद पाडावेत. परिच्छेदाच्या सुरुवातीचे आद्याक्षर मोठे, प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र ओळ, नंतर समाविष्ट करावयाच्या मजकुरासाठी पुरेशी जागा, चोहोबाजुंनी मोकळी जागा ठेवावी. पारिभाषिक शब्द, संकल्पना, व्याख्या यासाठी स्वतंत्र चौकटी कराव्यात.संदिग्ध मजकूर पेन्सिलीने लिहावा. विषय बदलण्यासाठी निरनिराळ्या रंगाचे स्केचपेन वापरावे. अशाप्रकारे लेखन आकर्षक करता येते. अक्षर वळणदार करण्यासाठी सुलेखन पाट्या, कित्तावही यांचाही वापर करता येतो. आज टंकलेखन व संगणकाची सोय झाल्याने सुलेखनाकडे दुर्लक्ष होते. पण टंकलेखन करणारे आपणच असल्याने सुलेखनातील वाईट सवयी त्यातही उतरणार नाहीत का? म्हणून सुवाच्च नीटनेटके लेखन असावायला हवे.
सुलेखनाची वैशिष्ट्ये
१) वाचता येईल इतपत (सुवाच्च) मोठे अक्षर.
२) सुटे, सरळ एकसारखे अक्षर.
३) शब्दांत, वाक्यांत, परिच्छेदांत पुरेसे अंतर.
४) सर्व बाजूंनी पुरेसा समास.
५) नवीन माहितीची भर घालण्यासाठी पुरेशी जागा.
६) आवश्यक तेथे अधोरेखा, अंक, चौकटी, रंगीत पेन यांचा वापर.
शब्दलेखन
इंग्रजीत शब्दांचे स्पेलिंग चुकीचे असू नये असे म्हटले जाते. त्याप्रमाणे मराठीतही शब्द/ वर्ण /अक्षरे चुकीची वापरू नयेत. मराठी माणसे इंग्रजी लेखनात जितकी काटेकोर व आग्रही असतात तेवढीच ती आपल्याच भाषेतील लेखनात नसतात. ही अनास्था योग्य नव्हे.
पुढील शब्दातील चुका ओळखा व दुरुस्त केलेले शब्द पुन्हा लिहा.
कृषीप्रधान, पेनटर, तासुन, थुका
आता पुढे दिलेले काही शब्द चुकीच्या पद्धतीने लिहा.
प्रतिबिंब, श्रेष्ठ, ऑफिस, जनार्दन
चुकीचे लिहिताना काय होते?
१) संकेत मोडला जातो.
२) अर्थ बदलतो.
३) अप्रतिष्ठा वाटते.
४) अज्ञान सिद्ध होते.
५) उच्चारातच दोष वाटतो
म्हणून शब्दलेखन नियमाबर हुकूम व प्रमाणबद्ध असायला हवे.
शब्दसंग्रह
मोठा शब्दसंग्रह हे कोणत्याही लेखकाचे बळ असते. यासाठी विपुल व चिकित्सक वाचन हवे. एखादा नवा शब्द ऐकल्यास वाचल्यास तो टिपुण, लिहून घेण्याची दृष्टी हवी. असा शब्द मनात पुन: पुन्हा उच्चारावा. घोळवावा. अनेक संदर्भात वापरून पहावा. यामुळे अर्थकक्षा लक्षात येतात व तो आपल्या संग्रही नांदू लागतो.
शब्दसंग्रह वाढविण्यासाठी अन्य भाषकांशी संवाद सहाचर्य वाढवावे. देवाणघेवाण ठेवावी. परभाषेबद्दल कुतूहल व आस्था असावी. त्यांच्या सहवासात हे शब्द उच्चारावेत, वापरावेत, शब्दकोश वाक्यसंप्रदाय कोश, संस्कृती कोश, मराठी विश्वकोश, वाडमय परिभाषा कोश, उत्पत्ती कोश असे कोश कुतूहल म्हणून नेहमी चाळावेत. परभाषेतील भाषणे ऐकावीत. परभाषेतील चित्रपट पाहावेत. जुने नवे साहित्य सतत वाचत राहावे.
शुद्धता
व्याकरणातील नियमांना अनुसरण निर्दोष लेखन म्हणजे शुद्धलेखन.
लेखन सुवाच्च, अर्थपूर्ण व परिणामकारक व्हाववयाचे असेल तर विशिष्ट लिपीचा वापर करून लेखन करताना समाजमान्य नियम किंवा संकेत पाळण्याची पद्धती म्हणजे शुद्धता होय. अशुद्ध लेखन गैरसमज, चुकीचा ग्रह होण्यास कारण ठरते. माणूस बोलताना भरपूर स्वातंत्र्य घेतो. उच्चारणाची लकब, स्वरांचा चढ-उतार, आघात, विराम आणि अनुनासिके, उच्चारणाची पद्धती, आवाज वेगवेगळा असतो. पण लेखन एकाच प्रकारचे होण्यासाठी शुद्धतेचे नियम केलेले असतात. यामुळे वाचणाऱ्या सर्व तरेहच्या व्यक्तींना ते समजते.
शुद्धता ही केवळ व्याकरणीच असते असे नाही तर ती अर्थाच्या बाबतीत देखील असते. ‘वारा वाहतो’ - या करता क्रियापद रचनेप्रमाणे ‘रस्ता वाहतो’, ‘माणूस वाहतो’ या रचना व्याकरणिक नियमांनुसार बरोबर आहेत पण रचनेप्रमाणे ‘सुतार वाहतो’, ‘बंगला वाहतो’ या रचना व्यावहारिक अर्थ देत नाहीत. म्हणून अशा रचना अशुद्ध समजाव्यात व लेखनात हे भान ठेवून तसे शब्द वापरावेत, रचना कराव्यात.
योग्य शब्दांचा वापर
ऐकलेल्या व वाचलेल्या मजकुराचे लेखन करताना ते अर्थपूर्ण योग्य व स्पष्ट होईल असे पाहावे. लेखनात शब्दरचनेला (शब्दसिद्धी), शब्दयोजनेला व त्यांच्या स्थानाला फार महत्त्व असते.
शब्दरचना
मराठीत नुसते मूळ शब्द एकापुढे एक ठेवून रचना होत नाही. वाक्य योजनेप्रमाणे शब्दात अनेक बदल करावे लागतात. ही बदल प्रत्यय, सामान्यरूपे, शब्दयोगी अव्यय, वचन, आख्यात प्रत्यय वगैरे लावून होतात. यालाच शब्दरचना म्हणावयाचे.
पुढील वाक्य वाचा.
नदीला पूर आला आहे; अशाप्रकारे तेथे पाऊस झाला असला पाहिजे.
आता पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्याचे तपासणी करा.
१) मूळ वाक्य मोठ्याने वाचा.
२) कानाला ते कसेसेच वाटत असल्यास अर्थ कायम ठेवून तेच वाक्य पुन्हा लिहा.
३) पहिली वाक्य व दुरुस्त केलेले दुसरे वाक्य यांची तुलना करा.
४) पहिला व पाचवा शब्द यांची रचना पहा चुकीची वाटल्यास दुरुस्त करा. दुरुस्त केलेला व मूळचा शब्द या दोन्हींचा परिणाम पहा. दुरुस्त केलेले दुसरे वाक्य आपणास येथोचित वाटेल यावरून लेखनात शब्दरचलेला किती महत्त्व असते ते स्पष्ट होईल.
शब्दयोजना
शब्दरचनेत शब्दाला लावण्यात येणारे प्रत्यय, शब्दसिद्धीचे नियम लावण्यात चूक झालेली असते. परंतु शब्दयोजना करताना लेखकाचा हेतू स्पष्ट नसल्याने, मनात संभ्रम असल्याने, शब्दांचा अर्थ चुकीचाच माहीत असल्याने लेखनात उचित शब्द वापरले जात नाहीत. अशावेळी लेखकाचा आपल्यावरील प्रभाव कमी होतो. चुकीचा अर्थ स्मरणात राहतो व माहितीच्या प्रसारणात अडथळा येतो.
पुढील वाक्ये वाचा - ‘हल्ली तुझी बरीच व्याप्ती वाढलीय नाही?’, ‘मला तुझा आजन्मात कधी राग येणार नाही.’या वाक्यात शब्दयोजनेत काही चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी पुढील दिलेल्या सूचनांचा अवलंब करा.
१) आपल्या हेतूची पुन्हा तपासणी करा. नेमकी काय म्हणावयाचे आहे ते ठरवा.
२) प्रत्येक शब्दाचा अर्थ शब्दकोशात पहा. संदर्भाने अर्थ निश्चित करा.
३) अशाच अर्थाचे /रचनेचे इतरांनी लिहिलेले / बोललेले विधान ऐका / पाहा. आपले व त्यांचे विधान ताडून पाहा. मूल्यमापन दुसऱ्याकडून करून घ्या.
शब्दांचे स्थान
वाक्यात शब्दांच्या स्थानाला / क्रमाला महत्त्व असते. मराठीत काही शब्दांची योजना चुकीच्या स्थानी झाल्यास अर्थ कसा बदलतो ते पाहा. १) ‘आमचे शिक्षक छान मराठी शिकवतात.’ या वाक्यात ‘मराठी’ या शब्दाच्या आधी छान हा शब्द योजल्याने मराठी हा विषय छान आहे, असा अर्थ होईल. येथे त्यांचे शिकवणे छान आहे हे सांगायचे आहे म्हणून हे वाक्य असे हवे - ‘आमचे शिक्षक मराठी छान शिकवतात.’यावरून हे लक्षात येते की, लेखनात शब्दरचना, योजना व स्थान यांना महत्त्व असते.
लेखनाचे घटक
मागील घटकात आपण लेखनाची प्राथमिक कौशल्य कसे आत्मसात करावी हे पाहिल्यानंतर आता प्रत्यक्ष लेखन करताना लेखनाच्या कोणत्या घटकाकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे हे पाहणार आहोत.
आपणास जीवन व्यवहारात बऱ्याचदा लेखन करावे लागते. सर्वच तोंडी सांगून भागत नाही. असे तोंडी सांगितलेले विचार कितीही महत्त्वाचे असले तरी ते काही काळानंतर विस्मृतीत जातात. पुष्कळदा खूप काही बोलायचे असते पण वेळेच्या अभावी तज्ञ श्रोत्यांअभावी, योग्य जागेअभावी आपण बोलत नाहीत. बोलताना आयत्यावेळी अनेक विचार प्रविष्ट होतात. योजलेले मागे राहतात वा गळून जातात. अनेक बाह्य अडथळ्यांमुळे, श्रोत्यांच्या प्रश्नामुळे, आयत्या वेळेच्या आपत्तीमुळे विषयांतर होते. बोलण्यात प्रवाहित्व असते. भाषेच्या ओघाला, उच्चारणाला श्रोत्यांच्या प्रतिसादाला वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले जाते. त्यामुळे तत्काळ परिणाम झाला तरी त्यात गंभीर आशय, विचारांची जडता राहू शकत नाही. भाषणात एखादा विचार महत्त्वाचा वाटला, त्यावर अधिक सूक्ष्म विवेचन व्हावे असे वाटले तरी ते सांगितले जात नाही. कारण मागे जाऊन विचार करायला सवड नसते. सवड असली तर श्रोत्यांना कंटाळा येतो. ओघ राहत नाही. यासाठी सुव्यवस्थित लेखनाची गरज आहे काय? आणि कसे लिहावयाचे? याची पूर्वकल्पना आपणास आहेच. आता प्रत्यक्ष लेखन करताना कोणत्या महत्त्वाच्या घटकाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे हे आपणास लक्षात घ्यावयाचे आहे.
मांडणी
लेखनात मांडणीचे महत्त्व आधार बिंदूसारखे असते. मांडणीचे नियोजन केल्याशिवाय लेखनाचा आवाका ध्यानात येत नाही. कोणतेही नवीन कौशल्य शिकताना सुलभतेकडून कठीणतेकडे असा क्रम ठेवावा लागतो. नवीन पोहायला शिकणारा ज्याप्रमाणे आधार घेतो. त्याप्रमाणे लेखक मांडणीच्या साहाय्याने लेखन करू शकतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना निबंध लिहिण्यासाठी आराखडा वा रूपरेषा दिली जाते. त्यामुळे सराईत नसलेल्या विद्यार्थ्यालाही निबंध लिहिणे सोपे वाटते.
प्रथम लेखकाने काय सांगायचे / लिहायचे ते निश्चित करून आपण कोणासाठी व कशासाठी लिहीत आहोत हे निश्चित करावे. आपल्या लेखनाचा हेतू / उद्देश काय ते ठरवावे. वाचक सामान्यपणे क्रमवार वाचत असतो हे लक्षात ठेवून घटका-घटकात सारखी संगती राखली पाहिजे हे लक्षात घ्यावे. तपशीलवार व संथपणे वाचणाऱ्या वाचकांसाठी आपण जसे लिहितो तसे वेळ कमी असणाऱ्या, वरवर वाचणाऱ्या समारोप सूचीवरून विषयाचा अंदाज व गुणवत्ता लक्षात घेणाऱ्या वाचकांसाठीही लिहावयाचे असते हे लक्षात घ्यावे. म्हणून मुद्द्यांची संख्या महत्त्व व क्रम या घटकाकडे मांडणी करताना लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक मुद्दा हा स्वतंत्र घटक असून तो एका मोठ्या विषयाचा एक भाग आहे हेही लक्षात घ्यावे.
मुद्द्यांची संख्या
एखादा विषय विशद करताना लेखकाने तो अधिकाधिकपणे स्पष्ट केला पाहिजे. एखादी कल्पना विचार गृहीतकृत्ये किंवा तत्व लक्षात आल्यावर ते मांडताना अनुकूल, प्रतिकूल, व्यक्तीसापेक्ष, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दृष्टिकोन त्यांना असतात हे लक्षात घ्यावे. त्यामुळे विषयाची व्याप्ती स्पष्ट होते. यासाठी संवादाची मूलभूत तंत्रे व कौशल्ये या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकातील ‘कल्पनास्फोट व प्रविव्याव्यावी’ या तंत्राच्या साह्याने मुद्दे शोधावेत व लिहावेत. पुन्हा पुन्हा मुद्द्यांच्या साह्याने चिकित्सक परीक्षण करावे.
१. सारखाच आशय / विषय स्पष्ट करणारे मुद्दे कोणते?
२. ते एकमेकात समाविष्ट होऊ शकतील का? कसे?
३. एखादा मुद्दा इतरांपेक्षा अधिक व्यापक आहे असे आपणास वाटते काय?
४. संदिग्ध मुद्दा कोणता?
५. त्याचे स्पष्टीकरण कसे कराल?
६. प्रत्येक मुद्द्यापुढे प्रश्नचिन्ह ठेवून त्याचे उत्तर देता येते का ते पहा.
७. विषयाच्या विरुद्ध जाणारा मुद्दा कोणता?
८. मुद्द्यातील व्यक्तीसापेक्षा स्पर्श स्पष्ट करा.
९. कालसापेक्ष मुद्दा कोणता?
१०. कालातीतता स्पष्ट करणारा मुद्दा कोणता?
सदरील मुद्दे कोणत्याही विषयाच्या मुद्दे लेखनासाठी वापरता येतील. अशा प्रकारे मुद्द्यांची संख्या आपल्याजवळ जास्त झाल्यावर नियोजित विषयाची व्याप्ती नक्कीच वाढलेली दिसेल.
महत्व
मुद्दे काढले पण कोणत्या मुद्द्याला अग्रक्रम द्यावा. कोणता दुय्यम, कमी महत्त्वाचा हे ठरवावे. हे लेखकाचा हेतू, वाचकाच्या अपेक्षा, लेखनाच्या गरजा यानुसार ठरत असते. म्हणून लिहिण्यापूर्वी यापैकी एखादी गोष्ट निश्चित करावी. तीनही महत्त्वाच्या वाटत असतील तर त्यात क्रम ठरवावा. नाहीतर लेखनाची रचना तीन भागात करावी.
क्रम
क्रमरचनेत मांडणीला महत्त्व असते. क्रम ठरवताना अंधारातून उजेडाकडे, व्यापकतेकडून सूक्ष्मतेकडे, प्रश्नातून उत्तराकडे, संदिग्धरतेकडून स्पष्टतेकडे, विशिष्टाकडून सामान्यतेकडे, अनेकातून एकतेकडे मुद्द्याची दिशा असावी. ही दिशा बोध स्पष्ट होण्यास व्यापक व सूक्ष्म विचार करण्यास मदत करते.
अशाप्रकारे मुद्दे आणि त्यांच्या महत्त्व नुसार क्रम ठरविल्यावर एकेका घटकाचा स्वतंत्र विचार होणे व मूळ विषयाचा भाग म्हणून होणे आवश्यक असते. यासाठी प्रारंभी व्यापक भूमिका मांडून नंतर एकेका घटकांना न्याय द्यावा या पद्धतीने लेखनाची मांडणी करावी.
अनुक्रम
प्रत्येक वेळी मांडणी कागदावर उतरलेलीच असते असे नाही. पण अनुक्रम मात्र नोंदवलेला असतो. मांडणी म्हणजे अनुक्रमाचा कच्चा, मनातील आराखडा; तर अनुक्रम म्हणजे मांडणीचा दृश्य, लिखित, संक्षिप्त आराखडा. अनुक्रमणिकेत आपण काय सांगणार आहोत ते तर संबंधिताचा संपूर्ण तपशील तयार झाल्यावरच ठरविता येते. लेखनास सुरुवात करण्यापूर्वी तात्पुरती अनुक्रमणिका आपण गृहीत धरू शकतो; पण प्रत्यक्ष लेखनात त्यात अनेक बदल होतात. मुद्दे-उपमुद्दे यांची भर पडते. घटकाचे विश्लेषण होऊन त्यातून स्वतंत्र घटकांचीही निर्मिती होऊ शकते. प्रत्येक घटक सारख्याच पद्धतीने लिहिला पाहिजे असे बंधन नसते. परिपूर्ण अनुक्रमणिका लेखकाचा अभ्यास, भाषा, तयारी, वेगळेपणा स्पष्ट करीत असते. तपशीलवार अनुक्रमणिका सत्यता, स्पष्टता दाखविते. संक्षिप्त, पुनरुक्त संदिग्ध शब्द अनुक्रमणिकेलाच नव्हे तर लेखनालाही दोषास्पद ठरवितात.
लेखनात मांडावयाची सर्व विषय अनुक्रमणिकेत स्पष्ट झाले पाहिजेत. जसे- मनोगत, ऋणनिर्देश, भूमिका, प्रास्ताविक, विषय विवेचन, भागश:, घटकश:, प्रकरण:, मांडणी, पूरक माहिती, संदर्भसाधने अशी सर्व अभ्यास सामग्री स्पष्ट झाली पाहिजे. त्यात तार्किकता पाहिजे. सुरुवात व शेवटचे घटक अभ्यासप्रक्रियेचे पूर्णता दाखवतात. जिथून सुरुवात झाली तेथेच येऊन पोहोचले की एका प्रश्नाच्या ठिकाणी किती बाजू असू शकतात ते समजते. किंवा एखादा अस्पष्ट विषय प्रत्येक घटकातून अधिकाधिक स्पष्ट होत जाऊन मन नि:संदिग्ध होते.
उदा. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ या पुस्तकाची अनुक्रमणिका तयार करण्याची तत्वे लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे करता येईल.
१. मनोगत
२. प्रास्ताविक
३. भाषेचा लेखनासाठी नियमाची आवश्यकता
४. भाषेची वर्णमाला व लिपी
५. अनुस्वारासंबंधीचे नियम
६. रस्वा-दीर्घासंबंधीचे नियम
७. किरकोळ व इतर नियम
८. जोडाक्षराचे लेखन लेखनातील विरामचिन्हे
९. वाक्यरचना
१०. हे शब्द असे लिहा.
स्वाध्यायासाठी -
तुम्हाला ‘प्रभावी व्यक्तिमत्व’ या विषयावर सामान्य वाचकांसाठी एक २५ पृष्ठांची पुस्तिका तयार करावयाची आहे या पुस्तिकेची अनुक्रमणिका कशी कराल?
तर्क संगती
आपले लेखन तर्कसंगत आहे किंवा नाही याचे प्रत्यंतर अनुक्रमातून येऊ लागते. संगतीही आराखड्यात कशी असायला हवी तशी ती विवेचनातही असायला हवी. तर्क म्हणजे काय? तर अनुमान. हे अनुमान तर्क बुद्धीस पटणारे हवे. ते केव्हा पटेल - तर एखाद्या विषयाचे सूक्ष्म अन्वेषण करून त्याविषयी सामान्य तत्वे निश्चित करून त्यापैकी मूलभूत तत्त्वांचा शोध घेऊन, त्या तत्त्वापासून बाकीच्यांची निष्पत्ती झाली आहे असे सांगू तेव्हा. याचा अर्थ आपले अनुमान साधार व लोकांना पटणारे हवे. हे केव्हा पटेल तर आपण संगतवार सांगू तेव्हा मग संगती म्हणजे काय? तर पुढील भाग मागच्याशी संबंधित असणे व तसा तो जुळवून सांगणे. प्रत्येक भागात एक शिस्त असून तो पद्धतशीर, क्रमाने, समतोलाने, समरूपतेने विचार संगतीने मांडलेला असणे होय. आपण आपल्या लेखनात ही तत्वे कशी सांभाळाल? यासाठी पुढे एक प्रश्न सूची दिली आहे. या सुचीचा वापर करून लेखनात संगती आली आहे किंवा नाही त्याचा पडताळा आपण घेऊ शकतो.
प्रश्नसूची
१. लेखनाचा मुख्य विषय प्रश्न समस्या कोणती?
२. प्रश्नाच्या उत्तराची संभाव्य, किमान चार व कमाल कितीही उत्तरे शोधा.
३. उत्तराची घरी, दारी, कचेरीत चर्चा करून आपल्या उत्तरास पाठबळ किती आहे ते पहा.
४. उत्तर सखोल असल्याकडे कटाक्ष ठेवा. ५. आपले उत्तर बरोबरच आहे, असे आपणास का वाटते त्याची किमान चार कारणे लिहा.
६. उत्तराचे मूलगामित्व ठरविण्यासाठी शब्दकोश, व्युत्पत्तीकोश, विश्वकोश आणि तज्ज्ञ व्यक्ती यांचे सहाय्य घ्या.
७. आपले लेखन कमीतकमी पण अर्थपूर्ण व वेचक शब्दांत मांडा.
भाषाविष्कार
भाषाविष्कार म्हणजे लोकनिहाय भाषिक अभिव्यक्ती होय. एकच आशय व्यक्त करण्यासाठी भाषेत एकापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध असतात. लेखकाचे वेगळेपण त्याच्या पर्याय निवडीवरच अवलंबून असते. लेखकाने योजलेले शब्द, वापरलेले निवेदन पद्धती, वाक्यरचना, साहाय्यास घेतलेले संदर्भ, दिलेले दृष्टांत, हाताळलेले लेखन प्रकार, केलेली मा