वामन कर्डक
वामन तबाजी कर्डक (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ - १५ मे, इ.स. २००४, वामनदादा नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.[१]कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखणीतून महाराष्ट्राच्या घराघरात खेड्यापाड्यात, वाडी तांड्यात पोहचवण्याचे काम आंबेडकरी चळवळीचे पाईक लोककवी, लोकशाहीर वामन कर्डक यांनी केले. बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाचा शेवटापर्यंत फिरत राहिले. याने समाज जागृत होत राहिला
वामन कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ साली नाशिक जिल्ह्यातील ता. सिन्नर मधील देशपंडी या छोट्याशा खेड्यात झाला. वडीलांचे नाव तबाजी कर्डक, आईचे नाव सईबाई, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहिण सावित्री असा वामनदादांचा परिवार होता. त्यांच्या घरी १८ एकर शेती होती. धान्य घरात यायचं तरीही हंगाम संपला की आईने डोंगरात जाऊन लाकडं गोळा करून मोळी बांधून ते जळतन सिन्नर बाजारात विकायचं. वडील टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकणे व हेडीचा धंदा करायचे. सर्वांनी कष्ट केल्यावरही आषाढ श्रावणात आबाळ व्हायची. कधी तरवट्याची भाजी, माठाची भाजी, कधी भाकरीच खावी लागायची.
कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिलमध्ये नोकरी, इत्यादी कामे केली. त्यांना वाचनाचा छंद होता तसेच त्यांनी लल्लाट लेखया नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती.
वैवाहिक जीवन
वयाच्या १९-२०व्या वर्षी वामनचं लग्न अनुसया नावाच्या मुलीशी झाले. पुढे त्यांच्या कुटुंबात मीरा नावाच्या मुलीने जन्म घेतला. वामनदादांचं जीवन सुखात गेले नाही. बायको त्यांना सोडून गेली आण् पुढे आजारपणात मीराचेही निधन झाले. हा त्यांचा जीवनाला फार मोठा धक्का होता, ते मीराचं दुःख कधीही विसरू शकले नाहीत.
मुंबईला प्रयाण
मुलगी मीराच्या निधनानंतर पुढे आईसोबत पोटाची खळजी भरण्याकरिता वामनदादा मुंबईत आले. त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केले. कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला. चिक्की विक्रीचा, आईस फ्रूट विक्रीचा धंदा केला. मिळेत ते काम केले. नंतर त्यांना टाटा कंपनीत नौकरी मिळाली. शिवडीच्या बीडीडी चाळीत राहत असतांना ते समता सैनिक दलात सामील झाले. इथपर्यंत वामनदादांना अक्षरांचा परिचय नव्हता.
अक्षर ओळख
एकदा त्यांच्या चाळीमधीस एका मनासाने वामनदादांना पत्र वाचायला सांगितले. दादांना पत्र वाचता लिहिता येत नव्हते. याचे त्यांना खूप वाईट वाटले. शिक्षण नसल्यामुळे आपण लिहू-वाचू शकत नाही हे त्यांना अवघड वाटू लागलं व ते रडू लागले. आणि त्यांनी देहलवी नावाचा मास्टराकडून बाराखडी, मुळाक्षरे शिकली. जोडाक्षरे ते दुकानाच्या पाट्या, बोर्ड वाचून शिकले. हळू-हळू त्यांच लेखन वाचन वाढू लागलं. सोबतच ते विविध खेळही खेळायचे व व्यायामही करायचे.
आंबेडकरी चळवळीत सहभागी
त्यावेळी आंबेडकरी चळवळ सर्वत्र वेगाने जोर धरू लागली. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते. वामनदादाही बाबासाहेबांच्या सभेला जात. समता सैनिक दलातील तरूणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देत. नायगाव येथे १९४३ साली वामन कर्डक यांना बाबासाहेबांचे पहिले दर्शन झाले
कवी
वामन कर्डक यांच मराठी व हिंदी वाचन बरचं पुढे गेलं होतं. त्यांना चित्रपट कथाकार, अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. ते अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये गेले. पण त्यांना मिनर्व्हा फिल्म कंपनीत एक्ट्रा म्हणून प्रवेश मिळाला. ते कारदार स्टूडिओ, रणजीत स्टुडीओ मध्येही कामाला जायचे. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणी बागेत तासंतास बसायचे. असेच १९४३ मध्ये राणी बागेत बसले असता वामनदादा कर्डक यांनी पहिले हिंदी गीताचे विडंबन गीत करायचं सुचलं व त्यांनी ३ मे १९४३ रोजी गीताचं विडंबन केलं आणि रात्री चाळीतील लोकांसमोर ते गाऊन दाखवलं. लोकांना प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि वामन कर्डक कवी झाले.
त्यानंतर २००४ पर्यंत गीतलेखन व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. कर्डक हे डॉ. आंबेडकर टांचे अनुयायी होते, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाइ.स. १९४३ साली नायगांव येथे पहिल्यांदा पाहिले व त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांत गायन केले.
काव्यसंग्रह
- ‘वाटचाल’ (गीतसंग्रह) १९७३
- ‘मोहळ’ (गीतसंग्रह) १९७६
- ‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) १९७७
- ‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) १९९६
ध्वनिफिती व चित्रपट गीते
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट
- भीमज्योत
- जय भीम गीते
- सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला (चित्रपट - सांगत्ये ऐका)
- चल गं हरणे तुरू तुरू (चित्रपट - पंचारती)
अन्य गीतरचना
- ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा, तुझ्याकडे बघून हसतोय गं, काही तरी घोटाळा दिसतोय गं (संगीत- मधुकर पाठक; स्वर- श्रावण यशवंते)
पुरस्कार व सन्मान
वामन कर्डकांना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहेत.- दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.
- महाराष्ट्र राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार.
- महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व.
- महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व.
- औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७).
- प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७).
- मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१)
- प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन.
- नाशिक, बुलढाणा येथे नाणेतुला
- परभणी येथे प्रख्यात उर्दू शायर बशर नवाज यांचे सोबत वहीतुला. नंतर या वह्यांचे गरीब मुलांना वाटप करण्यात आले.
- साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्न’ ही गौरववृत्ती.
- ’युगांतर प्रतिष्ठान’तर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (१९९७).
- जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा ‘संत नामदेव पुरस्कार’
- मुंबईच्या बौद्ध कलावंत संगीत अकादमीचा ‘भीमस्मृती पुरस्कार’
- भोपाळ येथे ताम्रपट मिळाला..
- भुसावळ येथे चांदीचे मानपत्र मिळाले.
- हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथे संजय मोहड यांनी आयोजित केलेल्या ‘स्वरार्हत संगीत संगीती’ या कार्यक्रमात नागरी सत्कार आणि गायन
- मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’
- इ.स. १९९३ मध्ये, वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.
कर्डकांवर लिहिलेली पुस्तके
- ‘एका कवीचे जीवनगाणे’ ही वामन कर्डक यांची चरित्रकथा असून त्याचे लेखक बबन लोंढे हे आहेत.
- आंबेडकरी प्रतिभेचा महाकवी : वामनदादा कर्डक - लेखक: डॉ. अशोक जोंधळे व डॉ. शत्रुघ्न जाधव, प्रतिभास प्रकाशन - परभणी, पृष्ठे ८०[२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा