| बाळ सीताराम मर्ढेकर | |
|---|---|
| जन्म नाव | बाळ सीताराम मर्ढेकर |
| जन्म | डिसेंबर १, १९०९ |
| मृत्यू | मार्च २०, १९५६ |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | साहित्य |
| भाषा | मराठी |
| साहित्य प्रकार | कविता |
| वडील | सीताराम मर्ढेकर |
बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.
प्रकाशित साहित्य
| नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
|---|---|---|---|
| मर्ढेकरांची कविता | कविता संग्रह | मौज प्रकाशन | |
| रात्रीचा दिवस/तांबडी माती/पाणी | तीन कादंबर्या | मौज प्रकाशन | |
| सौंदर्य आणि साहित्य | मौज प्रकाशन | ||
| कला आणि मानव | मौज प्रकाशन |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा