सगुण म्हणजे गुणांसहित शरीरधारणा. ते गुण म्हणजे सत्व, रज, तम. ‘सत्वगुण’ म्हणजे शुद्ध वर्तन, प्रामाणिकता, औदार्य, त्याग, प्रेम, दया. ‘तमोगुण’ म्हणजे दृष्टपणा, कपट, स्वार्थ, आळस, राग, खादाडपणा, त्याच त्याच चुका करणे. ‘रजोगुण’ महत्त्वाचं आहे. गीतेमध्ये रजोगुणाला ‘रागात्मकम्’, ‘तृष्णासंग’, ‘कर्मसंग’ ही विशेषणं लावली आहेत.
आजच्या संदर्भात अर्थ समजून घेऊया. रागात्मक- passionate, इच्छापूर्तीची प्रचंड तळमळ, अस्वस्थता, बेचैनी. तृष्णासंग- एखाद्या गोष्टींची तहान. भागली तरी वाढत जाणारी तहान. कर्मसंग- अविरत काम करणं, (action). हे न जमलं तर ते, नाही तर दुसरं काहीतरी पण स्वस्थ न बसणं, हवं ते मिळवण्यासाठी अविरत जीवनाशी झटापट चालू असणं.
प्रत्येक मनुष्य हे तीनही गुण घेऊनच जन्माला येतो. प्रमाण कमी अधिक असू शकतं. हवेतल्या तपमानाप्रमाणे गुण कधी कधी जास्त प्रमाणात. एखाद्या क्षणी सत्व गुण प्रभावी तर दुसऱ्या क्षणी तमोगुण प्रभावी. आपण कधी गरीब भिकाऱ्याला पैसे देतो, तर कधी त्याच भिकाऱ्याला पाहून किळस वाटते. एखादा दिवस कंटाळवाणा, तर एखाद्या दिवशी उत्साह. कधी सगळ्या जगाचा राग येतो. कडाडून भांडावंसं वाटतं, कधी शांssत. मुलाबाळांविषयी प्रेम, जोडीदाराबरोबर सिनेमाला जावंसं वाटतं. हे खेळ आपल्यातल्या सत्व-रज-तम गुणांचे आहेत.
आपण आपल्या जीवनाचा एकूण आलेख पहावा. आपल्या मनावर कोणत्या गुणाचा वरचष्मा आहे, ते समजून घ्यावं. स्वतःशी विचार करावा. आपल्यातल्या गुणांचा लघुत्तम साधारण विभाजक काढला तर आपण कोणत्या गुणाच्या कब्जामध्ये चटकन जाऊ शकतो ते लक्षात येतं. राजोगुणाविषयी थोडं अधिक. सतत कामात गर्क असणं याला वर्कोहोलिक म्हणतात. सात्विकेच्या बैठकीवर राजोगुणाचा विकास साधणे म्हणजे इतरांसाठी, समाजासाठी धडपडणारी सेवाभावी माणसं; तर पैशाकरिता, अधिकाराकरिता सतत व्यग्र असणारा सत्तापिपासू 'कर्मसंगी' म्हणजे तामसी बैठक असणारा रजोगुणी असा व्यापारी, पुढारी आपण पाहातो. दोघेही उपभोग घेतात. सेवाभावी सेवेपोटी आनंद मिळवतो. तर व्यापारी बँकबॅलन्स वाढल्याने सुखी होतो. दोघेही भरपूर काम करतात. म्हणून रजोगुण सत्व आणि तमच्यामध्ये आहे.
यापुढची पायरी अशी की, सात्विकतेपासून प्रेरणा घेऊन सतत कार्यमग्न राहाणाऱ्याला आपोआप चांगले काय, कल्याणकारी काय हे समजायला लागते. अशी व्यक्ती हळू हळू सात्विकतेकडे झुकते. राजस भाव कमी होत जातो. उपभोगाचे महत्त्व कमी होते. दुसऱ्याचा आनंद आणि याचा आनंद वेगळा असत नाही. तेथे केवळ आनंद असतो. त्या वेळेपुरती असली, तरी ही एक भावना आतबाहेर अनुभवता येते. याउलट तामसी गुणापासून स्फूर्ती घेणारा हावरटपणा, लोभ, लालसा यापोटी गोंधळात पडतो. एकटा पडतो. त्याला सोबती उरत नाहीत. अखेरीला अशा व्यक्तीमध्ये ना सुरुवातीची तप्त धग ना विझलेली राख राहात, नुसते धुमसत राहाणे नशिबी येते. या गुणांच्या पलीकडे आहे तो निर्गुण निराकार परमेश्वर

सत्त्वगुण
(सात्त्विक,सात्विक,सत्व,सत्य,सत्त्व) ह्या नावांनी उल्लेख होणारा गुणधर्म किंवा सृष्टीचा गुण आहे.सांख्य शास्त्रात उल्लेखीत केल्याप्रमाने ,सत्व(सात्त्विक) म्हणजे शुद्ध किंवा "प्रकाशमान" तर रज(राजसीक) म्हणजे "मंद" आणि तम (तामसीक) म्हणजे "गडद"/काळोख/अंधारासम तत्व.ह्या गुणात कोणतीही क्रमवारी किंवा उच्च नीच असे न मानता ह्या गुणांका एकमेकांचे "पुरक" असे मानण्यात आले आहे,व प्रत्येक गुण हा "अविभाज्य" मानण्यात आले आहे.सत्त्व गुण हा प्रकृती मुळे निर्माण झालेल्या तीन गुणांपैकी एक गुणआहे. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्तीमिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते.
ज्ञान, परोपकार, दान, समाधान, देवभक्ती, विवेक, उत्साह, वासनांवर विजय, मनावर ताबा ही सत्त्वगुणाची लक्षणे आहेत.

सात्त्विक वस्तु
एखादी वस्तु किंवा व्यक्ती सात्त्विक असण्यासाठी तीच्याद्वारे कोणताही रोग,वाईट/उपद्रवी प्रवृत्ती किंवा दुषितपणा फैलणार नाही हे आवश्यक असते,तसेच ती कोणत्याही इतर मुलद्रव्यांपासून दुषित असता कामा नये,शुद्धता हा मुख्य गुणधर्म असणार्या वस्तुंना सात्त्विक संबोधले जाते.ह्या उलट ज्या वस्तुंमुळे किंवा व्यक्तींमुळे त्यांच्या आस्तित्वाने आजुबाजूचे वातावरण शुद्ध होते अशा वस्तु किंवा व्यक्तीसात्त्विक होय.जेव्हा एखादी व्यक्ती सात्त्विक अन्न ग्रहण करते (खाते)त्यावेळी तिला शुद्धतेचा अनुभव मिळुन मनाचे समाधान मिळते.
सात्त्विक मनुष्याची लक्षणं
- सात्विक मनुष्याची लक्षण खालील प्रमाणे.
त्याचे मन स्थिर,एकाग्र आणि शांत ,प्रसन्नचित्त असते.त्याच्या बोलण्यात कधीही अश्लिल किंवा उद्धटपणा नसतो.त्यास कसलाच लोभ,मोह,नसतो व ईर्ष्या नसते.त्यास काम आणि क्रोध विचलीत करू शकत नाही.तो कुणासही फसवत नाही किंवा चुकीचे उपदेश देत नाही,त्याउलट त्याच्या वाणीत सदैव सत्यवचन असून त्याचे बोलणे नियंत्रीत असते.कर्म करित असतांना फळाची अपेक्षा न ठेवता निर्व्याज वृत्तीने कर्म करणे हे त्याचे ध्येय असते.तो धर्माने नेमुन दिलेल्या तत्त्वांनुसार जीवन व्यतीत करतो.शांत आणि मृदू स्वभाव हि त्याची ठळक लक्षणं असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा