मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

कवी ग्रेस - दान

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२) हे मराठी कवी होते. मर्ढेकरोत्तरनवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. "वाऱ्याने हलते रान" ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत.
माणिक गोडघाटे
Grace IMG 1263.jpeg
ग्रेस
जन्म नावमाणिक सीताराम गोडघाटे
टोपणनावग्रेस
जन्म१० मे, इ.स. १९३७
नागपूर
मृत्यू२६ मार्च, इ.स. २०१२
पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य, मराठीचे अध्यापन, विश्वकोश संपादक मंडळात समावेश.
भाषामराठी
साहित्य प्रकारकविता, ललितलेखन
कार्यकाळ१९६७-२०१२
प्रसिद्ध साहित्यकृतीसंध्याकाळच्या कविता, चर्चबेल
प्रभावअभिजात उर्दू परंपरा, रोमांचवादी इंग्रजी काव्य.
वडीलसीताराम
आईसुमित्रा
अपत्येमिथिला, माधवी आणि राघव
पुरस्कार
  • संध्याकाळच्या कविता ह्या संग्रहास महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक, १९६८
  • कविवर्य केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार, २०१०
  • वाऱ्याने हलते रान ह्या ललित लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१२

सुरूवातीचे जीवन व शिक्षणसंपादन करा

१० मे, १९३७ रोजी नागपूरमध्ये ग्रेस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करी व्यवसायात होते. त्यांची रसिकता उल्लेखनीय होती.[माहितीज्ञान पोकळी] कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळित झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षण यांच्याशी त्यांना झगडावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम.ए. ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला. इ.स. १९६६ मध्ये मराठी विषयातील ना.के. बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे एम.ए. झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले.[१]
इ.स. १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. 'सौंदर्यशास्त्र' या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. इ.स. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.

संपादनकार्यसंपादन करा

  • 'युगवाणी' या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राचे १९७१ ते १९७४ या काळात ग्रेस यांनी संपादन केले. मुंबईतील 'संदर्भ' या लेखक केंद्राचेही ते काही काळ संपादक होते.
  • १९७५ च्या सालात रामदास भटकळ यांनी रायटर्स सेंटर मुंबई या संस्थेचं 'संदर्भ' हे वाङ्मयीन द्वैमासिक सुरू केले. त्याचे संपादन कवी ग्रेस करत असत.' संदर्भ'चे अवघे दहाबारा अंक निघाले. ग्रेस एखादा विषय प्रत्येक कला क्षेत्रातल्या दिग्गजांना देऊन त्यावर त्यांचे टिपण किंवा लेख मागवत असत.

'ग्रेस' या नावाविषयीसंपादन करा

इ.स. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी "ग्रेस" हे साहित्यिक नाव धारण केले. ''दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस'' या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.[२] वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत ह्या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या, आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली.

दुर्बोधतेचा आरोपसंपादन करा

"कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वत: निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते पण, हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे," असे प्रतिपादन त्यांनी राळेगाव येथील भाषणात केले होते. [३] कविता दुर्बोध असल्याच्या आरोपांना उत्तर देताना "मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही" असे त्यांनी अनेकदा म्हटले होते. [४] माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेस यांनी 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' या ललितलेखात म्हटलेले आहे. [५] याच लेखात पुढे त्यांनी "आपण दुर्बोधतेच्या आरोपाचे निराकरण करीत नाही," असेही म्हटलेले आहे.
श्रीनिवास हवालदार (निवृत्त अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवाइंदूरमध्य प्रदेश) यांनी कविवर्य ग्रेस यांच्या प्रातिनिधिक कवितांचे विश्लेषण आणि त्यांना आकळलेले रसग्रहण करून ग्रेसच्या कविता 'दुर्बोध' आणि 'आत्मकेंद्रित' असल्याचा समज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. [६]

दुर्बोध गणल्या गेलेल्या/गाजलेल्या कवितासंपादन करा

१. असे रंग आणि ढगांच्या किनारी
२. अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे
३. आठवण
४. ओळख
५. ओळखीच्या वार्‍या तुझे घर कुठे सांग?
६. ऊर्मिलेचा सर्पखेळ’
७. कंठात दिशांचे हार
८. कर्णभूल
९. कर्णधून
१०. क्षितिज जसे दिसते
११. ग्रेसची वृत्ती.
१२. घर थकलेले संन्यासी
१३. घनकंप मयूरा
१४. जे सोसत नाही असले
१५. डहाळी
१६. तुळशीतले बिल्वदल
१७. ती गेली तेव्हा रिमझिम
१८. तुला पाहिले मी नदीच्या किनारी
१९. .तांबे-सोन्याची नांदी
२०. तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी...
२१. तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले
२२. देखना कबीर
२३. देवी
२४. दुःख घराला आले
२५. दु:ख
२६. निनाद
२७. निरोप
२८. प्रणाली. (अपूर्ण यादी)

प्रसिद्ध कवितासंपादन करा

प्रकाशित साहित्यसंपादन करा

पुस्तकेसंपादन करा

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
ओल्या वेळूची बासरीललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २०१२
कावळे उडाले स्वामीललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २०१०चंद्रमाधवीचे प्रदेशकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. १९७७
चर्चबेलललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. १९७४
मितवाललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. १९८७
बाई! जोगिया पुरुषकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशनआगामी
मृगजळाचे बांधकामललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २००३
राजपुत्र आणि डार्लिंगकवितासंग्रहअमेय प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशनइ.स. १९७४
वार्‍याने हलते रानललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २००८
संध्याकाळच्या कविताकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. १९६७
संध्यामग्न पुरुषाची लक्षणेललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २०००
सांजभयाच्या साजणीकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २००६
सांध्यपर्वातील वैष्णवीकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. १९९५

इतर प्रकाशित साहित्यसंपादन करा

ध्वनिफितीसंपादन करा

  • संध्यासूक्तांचा यांत्रिक, फाऊंटन, मुंबई २००४
  • साजणवेळा, शब्दवेध, मुंबई १९९८
  • सांध्यपर्व, माधवी वैद्य, मुंबई

चित्रपटसंपादन करा

निवडुंग (१९८९) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटात 'वाऱ्याने हलते रान' ही ग्रेस यांची रचना गीतबद्ध झालेली आहे.

मालिकासंपादन करा

दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या 'महाश्वेता' या मालिकेत ग्रेस यांच्या 'निष्पर्ण तरूंची राई' (चंद्रमाधवीचे प्रदेश) या कवितेचा शीर्षकगीत म्हणून (भय इथले संपत नाही) वापर करण्यात आला.

इतर भाषांमध्ये अनुवादसंपादन करा

डॉ. जया मेहता यांनी ग्रेस यांच्या चर्चबेल व मितवा या ललित लेखसंग्रहांचे गुजरातीत भाषांतर केले आहे. ग्रेस यांच्या निवडक कविता डॉ. उमाशंकर जेठालाल जोशी यांनी गुजरातीत अनुवादित केलेल्या आहेत.

रंगमंचीय सादरीकरणसंपादन करा

प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्यगायन आणि विवेचन अशा द्विदल कार्यक्रमाचे सादरीकरण कवी ग्रेस यांनी २००८ मध्ये सुरू केले. इचलकरंजी येथे 'मैत्र जीवाचे' या नावाने अशा द्विदल कार्यक्रमांचा पहिला प्रयोग झाला होता.

ग्रेस यांच्या साहित्यावरील समीक्षात्मक ग्रंथसंपादन करा

  • ग्रेस-अंबरफुलांचे दिवे (डॉ. चं.वि. जोशी) : या ग्रंथाला मसापचा २०१७ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
  • ग्रेस आणि दुर्बोधता, डॉ. जयंत परांजपे (१९८६)
  • ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे, श्रीनिवास हवालदार (२०१४, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे) या पुस्तकास मध्य प्रदेशातील मराठी साहित्य अकादमीच्या म.प्र.संस्कृति परिषद (भोपाळ)ने 'राजकवि भास्कर रामचन्द्र तांबे ' पुरस्कार दिला आहे.(४ जुलै २०१८)
  • ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे" [उत्तरार्ध ][प्रकाशन वर्ष २०१६] लेखक-श्रीनिवास हवालदार [कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे]
  • ‘दूरस्थ ग्रेस- कवी ग्रेस यांना न लिहिलेली पत्रें ‘लेखक- श्रीनिवास हवालदार प्रकाशन वर्ष २०१८ [कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे]
  • धुके आणि शिल्प, त्र्यं. वि. सरदेशमुख (१९८५)
  • ग्रेसविषयी, डॉ. अक्षयकुमार काळे (२००९)
  • रचनेच्या खोल तळाशी, डॉ. नंदकुमार मुलमुले

पुरस्कार व गौरवसंपादन करा

  • गौरववृत्ती (फेलोशिप), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, इ.स. २००५
  • जी. ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार, पुणे, इ.स. २०१०
  • जीवनव्रती पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, इ.स. १९९७
  • दमाणी पुरस्कार, सोलापूर, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (ललितबंध)साठी
  • नागभूषण पुरस्कार, नागभूषण फाऊंडेशन, नागपूर इ.स. २०१०
  • महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’साठी (काव्य)
  • महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘चर्चबेल’साठी (ललितबंध)
  • महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘राजपुत्र आणि डार्लिंग (काव्य)
  • महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘संध्याकाळच्या कविता (काव्य)
  • मारवाडी सम्मेलन पुरस्कार, मुंबई, ‘मितवा’साठी (ललितबंध)
  • वाग्विलासिनी पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे
  • विदर्भ गौरव पुरस्कार, कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर
  • विदर्भ भूषण पुरस्कार, इ.स. २०११[७]
  • सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
  • साहित्य अकादमी पुरस्कारइ.स. २०११ - वार्‍याने हलते रान या ललितलेखसंग्रहासाठी.
  • कवी ग्रेस हे इ.स. २०१२ साली झालेल्या दुसर्‍या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

मृत्यूसंपादन करा

कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी २६ मार्च २०१२ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.

संदर्भसंपादन करा

  1. ^ संध्याकाळच्या कविता : एक अभ्यास, प्रा. अजय आणि इतर, साहित्य सेवा प्रकाशन (सातारा).
  2. ^ काळे, अक्षयकुमार (इ.स. २००९). ग्रेसविषयी(मराठी मजकूर). विजय प्रकाशन. पान क्रमांक १९.}.
  3. ^ लोकसत्ताhttp://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=128277:2011-01-10-15-05-37&Itemid=1.[मृत दुवा]Sep 29, 2012
  4. ^ सकाळhttp://www.esakal.com/esakal/20101225/5432976455069330558.htm. Sep 29, 2012
  5. ^ मितवा (मराठी मजकूर). पॉप्युलर प्रकाशन. इ.स. १९८७. पान क्रमांक १९८.}.
  6. ^ A study and research centre for Marathi poet Grace on net
  7. ^ तरुण भारत http://tarunbharat.net/ftp/e-paper/2012-03-27/mpage6_20120327.htm[मृत दुवा]

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

According to Stanford Medical, It is really the SINGLE reason this country's women live 10 years more and weigh on average 42 lbs less than we do.

(And by the way, it has totally NOTHING to do with genetics or some secret-exercise and really, EVERYTHING about "HOW" they eat.)

BTW, What I said is "HOW", not "WHAT"...

Click this link to find out if this short questionnaire can help you discover your real weight loss possibility

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...