रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

अनंत फंदी

अनंत फंदी : (१७४४—१८१९). उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. याचे आडनाव घोलप. हा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारा. हा ब्राह्मण धंद्याने गोंधळी होता. ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजीने याचा गौरव केला आहे. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. याची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ या याचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. उतारवयात अहिल्याबाई होळकर सांगण्यावरून हा कीर्तन करू लागला, अशी आख्यायिका आहे. याने श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची प्रथम याच्यावर मर्जी होती. तथापि पुढे त्यांचे बिनसलेले दिसते. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या याच्या काही लावण्या आहेत. याचा मुलगा सवाई फंदी हाही कवी व कीर्तनकार होता. धोंड, म. वा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माधव ज्युलियन यांची कविता

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श...