डॉ. प्रल्हाद दत्तराव भोपे
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी...
सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५
शीगवाला / नारायण सुर्वे
शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५
कोलंबसचे गर्वगीत
कुसुमाग्रजांचा कोलंबस !
- Dr. Vishvadhar Deshmukh
अजूनही लक्षात आहे ती तारीख. 08 जानेवारी 2004. सकाळची 7 वाजून 50 मिनिटे झाली होती. कोचिंग क्लासमधला पहिला तास सुरू होता. तास सुरू होऊन वीस मिनिटे झालेली; तास चांगलाच रंगात आला होता. तितक्यात निरोप आला,‘आई गेली!’ जवळपास सहा वर्षांपासून तिच्या कर्करोगावर उपचार सुरू होते; पण सहा महिन्यांपूर्वीपासून तिचे उपचाराला प्रतिसाद देणे मंदावत गेले म्हणजे ती आता फार काळ जगू शकणार नाही, हे तसे स्पष्टच होते…तरीही ‘ती होती’ हा आधार खूप मोठा होता आणि आता ‘आई नाही’ ही गोष्ट पोटात हजारो फुटांचा खड्डा पाडून गेली. तीव्र अशा वेदनेचा उमाळा दाटून आला आणि गहिवरून गेल्याने सगळे पाश तोडून हुंदका ओठापर्यंत वेगाने आला. पण मी रडलो नाही, साडेआठ वाजेपर्यंत रडलो नाही. न दुःख दिसू दिले न हुंदक्याला ओठाबाहेर वाट मोकळी करून दिली…हे कसे घडले? आई या साध्या शब्दाने जिथे माझ्या भावनेचा बर्फ वितळतो तिथे पाऊन तास मी माझे दुःख गोठवून ठेवले ते कुणाच्या बळावर?
याचे उत्तर आहे कोलंबस! त्या दिवशी दहावीच्या वर्गात कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कविता शिकवत होतो. संकट असो वा दुःख, ते भले आपल्यावर हजार जिव्हांनी चाल करून येईल…पण आपण मात्र डगमगायचे नाही हा लढाऊ बाणा शिकवणारा ‘प्रेरणापुरुष’ माझ्यासोबत होता, म्हणून बहुदा आई गेल्याच्या वेदनेनंतरही माझ्या भावनेचा बांध फुटला नाही.
…कोलंबस. पूर्ण नाव ख्रिस्तोफर कोलंबस. जन्मगाव जिनोवा. मध्य व दक्षिण अमेरिका शोधणारा दर्यावर्दी. इसवी सन 1451 ते 1506 हा त्याचा कालखंड. साध्या वीणकराचा मुलगा. आर्थिकदृष्ठ्या यथातथा. शिक्षण घेता-घेता वडिलांना व्यवसायात मदत करणे ही त्याची दिनचर्या; पण लहानपणापासूनच वृत्तीने धाडसी, बुद्धीने चौकस. समुद्राचे अपार आकर्षण आणि सतत काहीतरी शोधण्याची ओढ…. यातून त्याने नौकानयनाचे शिक्षण घेण्यासाठीची धडपड सुरू केली. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी फ्रेंच चाच्यांसोबत तो बोटींवर जायला लागला.
समुद्राचे आकर्षण आणि अज्ञात गोष्टींचा वेध घेण्याची त्याची वृत्ती त्याला स्वस्थ बसू देईना; म्हणून मग आपली प्रेयसी फिलीपाच्या गव्हर्नर असलेल्या वडिलांना मध्ये घालून त्याने पोर्तुगालच्या राजदरबारात प्रवेश मिळवला आणि त्यांच्यासमोर त्याने 1484 मध्ये भारतात जाण्याची कल्पना मांडली. पण मध्ययुगीन मानसिकतेच्या दृष्टीने ही कल्पनाच इतकी अजब होती की ती राजाच्या सल्लागारांच्या काही पचनी पडली नाही आणि त्यांनी कोलंबस व त्याची ही अजब कल्पना दोघांचीही यथेच्छ टर उडवली.
पण प्रतिकुलतेने निराश होईल,तो कोलंबस कसला? पुन्हा एकदा या कल्पनेचे बारीसारीक तपशील त्याने जमा केले आणि आता स्पेनचा राजा फेर्दिनांद व राणी इसाबेला या दोघांपुढे आपल्या धाडसी मोहिमेची कल्पना नव्याने मांडली. खरेतर ही कल्पना राजा-राणीच्या गळी नीटपणे उतरली नव्हती, पण कोलंबसाचे झपाटलेपण इतके दिपून टाकणारे होते की, त्यामुळे या मोहिमेला त्यांनी हिरवा कंदील दाखवला.
या झपाटलेपणातून कोलंबसने 3 ऑगस्ट 1492 ते 1504 या काळात चार महत्वाकांक्षी मोहिमा आखल्या. काही नवी बेटे आणि काही नवे भूप्रदेशही शोधून काढले. आणि अखेर इस.1506 मध्ये संधीवाताच्या आजाराने अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
इतिहासाच्या पुस्तकात त्याची माहिती मिळते ती इतकीच. पण कुसुमाग्रजांनी मात्र आपल्या कवितेतून इतिहासातील निर्जीव तपशीलांत जणू नवे प्राण फुंकून विलक्षण जिद्दी, करारी, धाडसी अशी कोलंबसाची व्यक्तिरेखा उभी केली आहे.
मराठी कवितेच्या इतिहासात कुसुमाग्रजांची ओळख ‘क्रांतिकवी’, ‘अग्निसंप्रदायाचे प्रवर्तक’ अशी आहे. नारायण सुर्वे यांनी आपल्या या समकालीन कवीचे मोठेपण नोंदवताना म्हटले आहे, ‘…कुसुमाग्रजांच्या कवितेचा केंद्रबिंदू माणूस हाच आहे. माणसावर आणि त्याच्या कर्तृत्वावर इतका अदम्य विश्वास असलेला कवी मराठीत दुसरा नाही.’ संकटांनी वेढलेल्या, दुःख-दैन्याने ग्रासलेल्या माणसाच्या ऐहिक जीवनाला सतत भव्यतेची आणि दिव्यत्वाची ओढ असायला हवी, हा भाव त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः ‘विशाखा’ या संग्रहातील त्यांची कविता अशा अलौकिकत्वाचे सूक्त आळविणारी आहे.
कुसुमाग्रजांचा कोलंबस आकाराला आला आहे तो कर्तृत्वावरील याच अदम्य विश्वासातून. म्हणून तर ज्या समुद्राचे त्याला लहानपणापासून अपार आकर्षण आहे, तोच जेव्हा त्याच्या रोरावणार्या लाटांनी कोलंबसाच्या मोहिमेचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या लाटांच्या उंचीपेक्षा नव्या वाटा शोधण्याची माणसाची जिद्द मोठी असते, तेव्हा त्याला ठणकावून सांगतो,
‘हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे
ढळू दे दिशाकोन सारे’
एकवेळ आकाशातले तारे डळमळू दे, किंवा वाटेत विराट वादळाने पाण्याचे पर्वत उभे करू देत, मी ही मोहीम अर्ध्यावर टाकून परत फिरणार नाही. एकीकडे खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे आकाशातून विजांच्या कडकडाटांसह प्रमत्त सैतानासारखा तांडव करणारा पाऊस भल्याभल्यांची पाचावर धारण बसायला ही परिस्थिती पुरेशी, पण छे, कोलंबस कशाचा विचलित होतोय, उलट उधाणलेल्या समुद्राच्या डोळ्यांशी डोळा भिडवून तो विचारतो,
‘ताम्रसुरा प्राशुनी मातु दे दैत्य नभामधले
दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
कराया पाजळू दे पलिता’
माथ्यावर नभ फुटू दे, नाहीतर उल्का कोसळू दे, आपल्या ध्येयपथावरून बाजूला हटायचे नाही, यासाठी स्वतःवर किती दृढविश्वास असावा लागतो. बरे इथे प्रश्न फक्त कोलंबसाचा एकट्याचा नाही. तो काही एकटा ‘आउटिंग’ करण्यासाठी बाहेर पडलेला नाही. तो या मोहिमेचा कर्णधार आहे, चार प्रवासी जहाजे आणि नव्वद खलाशांना सोबत घेऊन नवीन प्रदेशाच्या शोधासाठी तो या सफरीवर निघालाय. हा मध्ययुगीन कालखंड आहे. ना दळणवळणाची साधने आहेत, ना संपर्काची माध्यमे. आणि त्या काळात 3 ऑगस्ट 1492 ला कोलंबस या मोहिमेवर निघालाय, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर संपला तरी नवा भूप्रदेश काही नजरेच्या टप्प्यात यायला तयार नाही. तेव्हा सोबतचे खलाशी हताश झाले. त्यांना यात यशाची शक्यता दिसेना. त्यांची चलबिचल सुरु झाली, परतीच्या प्रवासाचे खयाल त्यांच्या मनात गर्दी करायला लागले.
इथे कोलंबसाच्या समोर निर्वाणीचा पेच निर्माण झाला. समुद्र खवळलाय,आकाश फाटावे तसा सैतानी पाऊस कोसळतोय, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यांनी वातावरण भेसूर झालंय आणि त्यात आपले सहकारी गर्भगळीत होऊन परतीची भाषा बोलताहेत. अशावेळी समुद्राशी झटापट करणार्या कोलंबसाची ‘लीड फ्रॉम फर्स्ट’च्या जातकुळीतली लिडरशीपच नजरेत भरते.
निराश, खिन्न आणि निरुत्साही झालेल्या आपल्या सहकार्यांमधले ‘लढाऊपणाचे स्पिरीट’ तो ज्या भाषेत जागे करतो, ती भाषा आपणाला रोमांचित करते. तो त्यांना थेट त्यांच्या जन्मप्रयोजनाचे स्मरण करून देतो. आपला बाणा काय आहे, याची आठवण करून देतो आणि इथून अपयश हाती घेऊन परत आपल्या देशी गेलो तर जो अपमान सोसावा लागेल, त्याचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभे करतो. पराभूत होऊन परत फिरण्यापेक्षा जलसमाधी घेऊन स्वतःला समर्पित करण्यामध्ये ‘खरा पुरुषार्थ’ असल्याचे सांगून त्यांच्या कर्तृत्वाला आवाहन करतो,
‘काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा अपुला बाणा
त्याहून घेवू जळी समाधी सुखे, कशासाठी
जपावे पराभूत प्राणा.’
मध्य समुद्रात आपल्या सहकार्यांना ‘नाविकधर्मा’ची स्मृती करुन देणारा कोलंबस आणि कुरुक्षेत्रात अर्जुनाला ‘क्षात्रधर्मा’ची आठवण करून देणारा कृष्ण या दोघांचा देश, काळ आणि परिस्थिती भले वेगळी असली तरी आपल्या सहकार्यांतले ‘फायटिंग स्पिरीट’ जागृत करण्याची दोघांची शैली मात्र सारखीच !
लढाऊ बाणा न दाखवता आपण परत फिरलो तर कोट्यवधी किडामुंगींसारखे क्षुद्र होऊन मरण येण्याची पाहत जगत राहणे आपल्या वाट्याला येईल. उलट आपल्या ‘कर्तव्या’चे भान ठेऊन लढण्याचा पर्याय निवडला तर मात्र ‘नवी क्षितिजे निर्माण करण्याचे’ कर्तृत्व आपल्या नावावर नोंदविले जाईल.
‘आपण स्वतःच्या क्षमतेला कसे मोजतो?’ ही आयुष्यातली सगळ्यात मूलभूत निवड असते. खरेतर ध्येयमार्गावर चालण्यापासून आपणाला पैसा, पत्नी किंवा उंबरठा…हे क्षणभरीचे मोह आपणाला अडवणारे नसतात. आपल्यातली सगळ्यांत मोठी ताकद आपणच असतो आणि वाटेतला सगळ्यात मोठा गतिरोधकही आपण स्वतःच असतो. म्हणून स्वतःला धोंडा मानायचे की ध्वज ते आपले आपणालाच ठरवायचे असते.
‘आधी केले आणि मग सांगितले’ या कॅटेगरीतले हे कोलंबसाचे तत्वज्ञान. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून त्याने विक्राळ समुद्राला आपल्या अंगाखांद्यावरून खेळविले. नव्या प्रदेशाच्या ओढीने हजारो रात्री कुर्बान केल्या. मोहिमेच्या स्वप्नाला शेकडो लोकांसोबत वाटून घेतले. आणि आता तब्बल साठ दिवस खर्चून मोहीम ऐन भरात असताना समुद्राने सामोरे येण्याची आणि सहकार्यांनी पळून जाण्याची भाषा करावी, हे कोलंबसाच्या प्रकृतीला पचनी पडणारे नाही. म्हणून तर तो एकीकडे रोरावत अंगावर चाल करून येणार्या समुद्राला शड्डू ठोकून आव्हान देतो तर दुसरीकडे सहकार्यांना त्यांच्या कर्तव्याचे स्मरण करून देऊन लढत राहण्याचे आवाहन करतो :
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला !
समुद्र असेल वा अन्य कोणतेही संकट, ते थेट पुढे येऊन उभे ठाकले की भयानक भासायला लागते. पण माणसाची ध्येयासक्ती आणि आशावाद यांच्या चष्म्यातून त्याच्याकडे पाहिले की ते त्याचे छोटेपण लक्षात यायला लागते.
कोलंबसाने प्रत्येक संकटाकडे असे आशावादाचा दीप हाती धरून ध्येयाच्या ध्यासाने पाहिले आणि ही ‘दर्यावर्दी दृष्टी’ आपल्या सहकार्यांमध्येही संक्रमित केली म्हणून तर आपल्या पंचावन्न वर्षांच्या अल्प आयुष्यातही ‘सॅन साल्वादोर’,‘क्युबा’,‘डॉमिनिका’,‘माँटेसराट’,‘अँन्टिग्वा’,‘रेडोंडा’, ‘नेवीस’,‘सेंट कीट्स’,‘मार्टिनिक’ अशी बेटे आणि ‘इसाबेला’,‘होन्डुरास’,‘निकाराग्वा’,‘कोस्टारिका’ आणि ‘पनामा’ असे प्रदेश शोधले.
आपल्याच मर्यादेत कैद होऊन खितपत पडलेले कितीतरी ‘चौकट राजे’ आपण सभोवताली पाहत असतो; म्हणून ‘अनंत अमुची ध्येयासक्ती,अनंत अन् आशा’ हे सांगून क्षितिजापलीकडचे अज्ञात प्रदेश शोधण्याची प्रेरणा देणारा कोलंबस स्पेनसारख्या एका देशापुरता मर्यादित राहत नाही, तर पाहतापाहता स्वतःच्या स्वप्नांसारखाच असीम आणि अनंत होत जातो आणि कधी कुसुमाग्रजांसारखा क्रांतिकवी तर कधी माझ्यासारखा शांत शिक्षक यांना अखंड प्रेरणा देत राहतो.
असे म्हणतात की जवळपास अडीच महिन्यांनंतरच्या कष्टप्राय मोहिमेनंतर जेंव्हा पहिल्यांदा ‘नवा प्रदेश’ दिसला तेव्हा जणू समुद्राची भरती कोलंबसच्या डोळ्यांत दाटून आली …..
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
सत्य सर्वांचे आदी घर - महात्मा जोतीराव फुले
बुधवार, २० ऑगस्ट, २०२५
' माझी कन्या '
'माझी कन्या' कवितेचा भावार्थ
कवी बी यांचा परिचय
नारायण मुरलीधर गुप्ते (१८७२-१९४७) 'बी' या टोपणनावाने काव्यलेखन. अव्वल इंग्रज काळातील मराठीतील एक महत्त्वाचे कवी. त्यांचा जन्म विदर्भातील मलकापूर या गावी झाला. सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर त्यांनी काव्यलेखन केले. कवी केशवसुतांनंतरचे एक महत्त्वाचे कवी म्हणून त्यांची ओळख आहे. तेज आणि स्फूर्तीने भरलेली त्यांची कविता नव्याजुन्या रचनावैशिष्ट्यांनी समृद्ध झालेली आहे. 'फुलांची ओंजळ', 'पिकले पान' हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध. त्यांनी कवितेसोबतच गद्यलेखनही केले आहे. काव्यरसिकांना मंत्रमुग्ध करण्याचे सामर्थ्य त्यांच्या काव्यात आहे. ऐतिहासिक कथाकाव्य लोकप्रिय करणारे, दीर्घ कविता लिहिणारे कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. शालेय व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या कवितांचा समावेश झाला आहे. तत्त्वचिंतन, आध्यात्मिक दृष्टी, विचारशीलता, शब्दवैपुल्य व रचनावैविध्य हे त्यांच्या कवितेचे विशेष होत. गरिबीमुळे अपमानित झालेल्या मुलीची समजूत काढताना पितृहृदयातील वात्सल्यभाव प्रस्तुत कवितेत प्रकट झाला आहे. पिता आणि मुलगी यांच्यातील हा भावनिक नातेबंध लक्ष वेधून घेणारा आहे.
कवी बी यांच्या गाजलेल्या रचनेतील एक कविता म्हणजे माझी कन्या होय. ही कविता गेल्या तीनेक पिढ्यांना तरी चांगलीच ठाऊक आहे. एका छोट्याशा मुलीला तिच्या वर्गातील काही मुली 'भिकारीण' म्हणून चिडवतात. त्यामुळे ती घरी येऊन स्फुंदूनस्फुंदून रडते आहे आणि तिचे वडील तिची समजूत काढताहेत, अशा कल्पनेतून कविने ही कविता लिहिलेली आहे. थोडक्यात हा स्वानुभव नसून कवीची नित्याच्या अवलोकनातून जन्मलेली प्रतिभा आहे.
शोकाने रडणाऱ्या आपल्या लहानग्या मुलीला पाहून पिता तिला विचारतो,
गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्त चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?
खरेतर मुलीने घरी आल्याआल्याच वर्गात काय घडले? कोण काय बोलले? ते सांगितलेले असणार. जसे लहान बाळाला काही लागले की, आपण माहीत असताना त्याचे लक्ष वळविण्यासाठी विचारतो की, 'काय लागले? कोठे लागले?' हेतू हाच की बाळाचे लक्ष इतरत्र वळवून रडणे थांबवावे. तसेच कवितेतील वडील मुलीला विचारतात. त्या बोलण्यात मिश्किलतेची नाजूक छटा ही आहे. म्हणूनच तू का रडतेस असे सरळ न विचारता? डोळ्यातून ओघळणाऱ्या आसुंना तो गंगायमुना संबोधतो. सोबतच ती मातापित्याची चित्तचोरणारी आहे, असे सांगत तिचे नि त्याचे लडिवाळ नाते व्यक्त करतो. येथे तो तिला गोरटी असे म्हणतो. कारण प्रत्येक माता पित्याना आपली मुलं कशी का असेना सुंदरच वाटत असतात. हा भाव कळत नकळत त्यातून व्यक्त होतो. त्याच तंद्रीत तो तिला बोलतो, ' नाकातून उष्ण वारे वाहताहेत, लाल झालेल्या गालावर ओघळून ते अश्रू सुकलेले आहेत. कोण माझ्या छबेलीला बोलले बरे?' असे पुन्हा विचारतो. या कडव्यात कविने नाक व गाल यांना अनुलक्षून वापरलेले नासिक व काश्मीरचे रूपक केवळ मनोहर नि चित्तवेधकच नाही तर मराठी कवितेचे लेणे ठरलेले आहे.
लिहितो,
"गावि जातो" ऐकता त्याच काली,
पार बदलुनि ती बाल सृष्टी गेली!
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञवाचा !
या अत्यंत मधूरतम पंक्ती कवी लिहितो. यात रेशमाचा करपाश ही कल्पनाच अद्भुत आहे. ह्या शेवटच्या कडव्यात कविने बाल मनाची निर्व्याज्यता सहज पकडत बाल मानसशास्त्राची जाण अचूक टिपली आहे.
ह्या कवितेकडे पाहताना कित्येकांना वाटत असते, ही कवीच्या घरात घडलेली, कविने अनुभवलेली घटना असावी. पण ते खरे नाही. हा कवीचा केवळ कल्पनाविलास आहे, अनुभव नाही. अनुभवाविण जर कोणी कवी इतकी उंच तरीही सत्य वाटणारी झेप घेत असेल तर त्यांच्या काव्याची प्रत अत्युच्च दर्जाची आहे असेच म्हणावे लागेल.
जाता जाता हे ही सांगावेसे वाटते की, कवीच्या ही कविता त्याच्या इतर कविता प्रमाणे मत मतांतरात अडकलेली नसून अर्थदृष्ट्या अत्यंत सरळ, सुगम, सहज असून ही अत्यंत उच्च कोटीची ठरलेली आहे.
तिच्या डोळ्यातून घळघळ गळणाऱ्या अश्रूचे टपोरे थेंब पाहून तो त्यांना नक्षत्रांची सुरेख उपमा देतो. ते जमिनीवर पडल्याने उत्पात घडून येईल, असे म्हणत तिचे लक्ष पुन्हा एकदा इतरत्र वळवू पाहतो. आणि मग स्वत: च मूळ कारणावर येत तो बोलतो, 'तुझ्या वर्गातील विभा, विमला या श्रीमंताच्या मुली सजून धजून वर्गात आल्या आणि तुला साध्या कपड्यात, बिना अलंकाराच्या पाहून 'अहा ! आली ही पहा भिकारीण !' बोलल्या एवढेच ना? अगं, त्यांचे बोलणे एवढे का मनावर घ्यायचे? शाळेतल्या मुली चटोरच असतात. एकमेकींना भीडभाड न बाळगता काहीही कठोर बोलून टाकतात. पण त्यांचे बोलणे मनात धरायचे नसते. त्यातला त्यात समजदार मुलांनी तरी त्या बोलण्याला किंमत द्यायची नसते.' बापाचे मुलीला हे सांगणे नीट बघितले तर लक्षात येते, तो त्या मुलींना नावं ठेवत नाही, मी त्यांना पाहून घेईल अशी भाषा वापरत नाही, तर आपल्या मुलीची सहनशीलता वाढविण्यावर भर देतो. हे त्याच्यातील समंजस पालकाचे दर्शन घडविणारे आहे.
पुढल्या कडव्यात तिला समजाविताना तो म्हणतो..'रत्न सोने मातीतून मिळतात पण त्याला मोठे मोठे राजे महाराजे मस्तकावर धारण करतात. कमळ चिखलात जन्मते, पण सत्कारप्रसंगी तेच वापरले जाते. अर्थात् मूळ पाहिले जात नाही तर कोण किती मोठे ते त्याच्या कर्तृत्वावर नि गुणवत्तेवर अवलंबून असते. हे सांगतानाच चिखलामुळे कमळाची किंमत कमी होत नसते, धुळीत जन्मलेल्या हिऱ्याची किंमत कमी होत नसते. मग माझ्यामुळे तुझी किमंत थोडीच कमी होणार आहे?' असे समजावत तो तिला मौल्यवान तर स्वतःला क; पदार्थ गणतो. तुझ्या नशीबाची कमान चढतीच राहणार आहे. तुझ्यासारख्या मुलामुलीतूनच उद्याचे महान नरनारी उदयाला येणार आहेत, याची निश्चिती देतो.
तो तिला सांगतो तुझ्याकडे रूप अन् गुण या गंगायमुना आहेत. ज्याप्रमाणे गंगा यमुनाच्या संगमात सरस्वती गुप्त रूपाने वास करत असते. तसेच जिथे रूप गुणांचा संगम असतो, तेथे भाग्य हमखास वास करत असते असा आशावाद व्यक्त करतो.
नकळत त्याला आपल्या छोट्या मुलीच्या रुपसौंदर्याची जाणीव होऊ लागते, व तो म्हणतो, 'तुझ्या नेत्रगोलातून जेंव्हा जिज्ञासा दाखविणारे बालकिरण येऊन मुखावर आनंदाचे भाव उठवतात. तेंव्हा ते त्यांच्यापुढे हिरे मोती ही फिके वाटतात. हसताना तुझ्या गालावर जी खळी पडते त्यातून तुझे सौंदर्यच उसळून वर येते.' हे वर्णिताना कवी लिहितो,
लाट उसळओनि जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हसता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्य वर वहावे !
कवीच्या या पंक्ती हदयंगम आहेत. निष्पाप लावण्याचे असे तंतोतंत वर्णन क्वचितच कोणी केले असेल. पिता कन्येला म्हणतो, की जिथे निसर्गानेच तुला एवढे अलंकार दिलेले आहेत. तेथे कृत्रिम अलंकाराची तुला गरजच पडू नाही. पण त्याला अचानक स्मरते, नटण्या थटण्याची नैसर्गिक आवडच स्त्रियात असते. अगदी आदिमाये पासून ती आहे. त्यामुळेच नश्वर जग सुंदर झालेले आहे. याच नैसर्गिक ओढीतून तुला अलंकारादिचा सोस वाटत असणे स्वाभाविक आहे. मला वाटते भविष्यात तू विलासाची मोगरी होशील अर्थात् शाश्वत सुख भोगशील. कारण आज जरी तू माझी कन्या असलीस, तरी भविष्यात तू कोणाचे तरी भाग्य असणार आहेस. हे वर्णन करताना कवी लिहितो,
नाही ही विवश भावना त्याला सतावते हे आहे. म्हणून कवी समर्पक शब्दात लिहितो,
प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित् पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे हृदय कसे होते,
न ये वदता, अनुभवी जाणती ते !
आपल्या मुलांचे लाड आपल्याला किंचित् ही पुरविता येत नसतील तर जीवाला काय वेदना होतात. ते अनुभवानेच कळते. येथे कवी 'किंचित् लाड' म्हणतो. याचाच अर्थ मुलांचे सर्वच लाड पुरवावे, असे त्याला वाटत नाही हे चाणाक्ष वाचकांच्या नजरेत आलेच असेल.
पिता मनाशीच बोलताना म्हणतो, गरीब असूनही मी कधी लाचार झालो नाही, माझा अभिमान सोडला नाही. पण जेंव्हा असे प्रसंग येतात तेंव्हा हृदय दुभंगल्याचे दुःख होते. देव सद्गुणी बालकांना सर्व काही देतो. मग माझ्या सारख्या करण्ट्याच्या पोटी एवढे गुणी रत्न त्याने का घातले असावे?
याच तंद्रीत तो म्हणतो,
लांब त्याच्या गावास जाऊनिया
गूढ घेतो हे त्यास पुसोनिया!
देव खूप लांब राहतो असे आपण लहान बाळांना सांगत असतो. त्या लांब असणाऱ्या देवाच्या गावी जाऊन हे रहस्य मी विचारून येतो. असे उद्वेगाने पिता म्हणतो. त्यातील 'गावी जातो' शब्द ऐकताच स्फुंदून स्फुंदून रडणारी, इतक्या वेळ विविध प्रकारे समजावून सांगितल्यावर ही शांत न होणारी त्याची निरागस कन्या सारे काही विसरून पित्याच्या गळ्याला मिठी मारून' मी पण येते तुमच्या सोबत' म्हणत सारे काही विसरत त्याच्या मागे लागते. या मधूर प्रसंगाचे वर्णन करताना कवी लिहितो,
"गावि जातो" ऐकता त्याच काली,
पार बदलुनि ती बाल सृष्टी गेली!
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञवाचा !
या अत्यंत मधूरतम पंक्ती कवी लिहितो. यात रेशमाचा करपाश ही कल्पनाच अद्भुत आहे. ह्या शेवटच्या कडव्यात कविने बाल मनाची निर्व्याज्यता सहज पकडत बाल मानसशास्त्राची जाण अचूक टिपली आहे.
जाज्वल्य देशभक्तीचे प्रतीक : वीर सावरकर
ह्या कवितेकडे पाहताना कित्येकांना वाटत असते, ही कवीच्या घरात घडलेली, कविने अनुभवलेली घटना असावी. पण ते खरे नाही. हा कवीचा केवळ कल्पनाविलास आहे, अनुभव नाही. अनुभवाविण जर कोणी कवी इतकी उंच तरीही सत्य वाटणारी झेप घेत असेल तर त्यांच्या काव्याची प्रत अत्युच्च दर्जाची आहे असेच म्हणावे लागेल.
जाता जाता हे ही सांगावेसे वाटते की, कवीच्या ही कविता त्याच्या इतर कविता प्रमाणे मत मतांतरात अडकलेली नसून अर्थदृष्ट्या अत्यंत सरळ, सुगम, सहज असून ही अत्यंत उच्च कोटीची ठरलेली आहे.
सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५
संविधान सभेतील बाबासाहेबांचे अंतिम भाषण
"जर यापुढे गोष्टी चुकीच्या झाल्या, तर आपल्याला कोणीही दोषी ठरवणार नाही", संविधान सभेतील डॉ. आंबेडकरांचे शेवटचे भाषण

भारतीय राष्ट्राच्या पायाभूत सुरुवातीमध्ये डॉ. बी.आर. आंबेडकरांनी दिलेले योगदान निश्चितच या वस्तुस्थितीची साक्ष देते की भारतीय संविधानाचे जनक या मानकांनुसार जगले.
या वर्षी आपण आंबेडकर जयंती साजरी करत असताना, आपण २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. आंबेडकरांच्या शेवटच्या भाषणावर एक नजर टाकूया.
या भाषणात, डॉ. आंबेडकर संविधानाचे समर्थन, त्याचा मसुदा तयार करण्यासाठी केलेल्या प्रक्रियेच्या संदर्भात तसेच त्याच्या अंतिम स्वरूपाच्या संदर्भात मांडतात.
उल्लेखनीय म्हणजे, डॉ. आंबेडकर पुढे काही मानके देखील मांडतात ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे जर भारताला एक राष्ट्र म्हणून प्रगती करायची असेल तर आवश्यक आहे. या भाषणाच्या आशयावरून एका दूरदर्शीचे चित्र समोर येते, जो देशाला त्याचे स्वातंत्र्य गृहीत धरण्याच्या धोक्यांपासून सावध करण्यासाठी पुरेसा शहाणा होता.
कार्यरत संसदीय लोकशाहीचे महत्त्व
या पैलूवर थेट चर्चा होत नसली तरी, संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी झालेल्या उत्पादक चर्चेवरील आंबेडकरांचे विचार समकालीन महत्त्व प्राप्त करतात, विशेषतः संसदीय कामकाज तहकूब करणे हे आजकालचे सामान्य काम असल्याचे दिसून येते.
" जर ही संविधान सभा केवळ एक विविधरंगी गर्दी, सिमेंटशिवाय एक तुकडा असलेला फरसबंदी, येथे एक काळा दगड आणि तेथे एक पांढरा दगड असता तर मसुदा समितीचे काम खूप कठीण झाले असते, ज्याचा प्रत्येक सदस्य किंवा प्रत्येक गट स्वतःसाठी एक कायदा असता. तर अराजकतेशिवाय काहीही झाले नसते..."
… जर सर्व सदस्यांनी पक्षाच्या शिस्तीच्या नियमांना बळी पडले असते तर या संविधान सभेचे कामकाज खूपच कंटाळवाणे झाले असते. पक्ष शिस्तीने, तिच्या सर्व कडकपणासह, या सभेला होकारार्थींच्या मेळाव्यात रूपांतरित केले असते. ”
आंबेडकर खरं तर विधानसभेच्या मजल्यावरील चर्चेला समृद्ध केल्याबद्दल मतभेद असलेल्या आवाजांचे आभार मानतात.
"सुदैवाने, काही बंडखोर होते," आंबेडकर म्हणतात. " ते होते श्री. कामत, डॉ. पी. एस. देशमुख, श्री. सिधवा, प्रो. सक्सेना आणि पंडित ठाकूर, दास भार्गव आणि त्यांच्यासोबत मी प्रो. के. टी. शाह आणि पंडित हिरदयनाथ कुंजरू यांचा उल्लेख करायलाच हवा. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे बहुतेक वैचारिक होते."
ज्या काळात विरोधी पक्षाची भूमिका अनेकदा आंधळेपणाने निषेध करण्याइतकीच कमी केली जाते किंवा आवाज म्हणून नाकारली जाते, अशा काळात आंबेडकरांची भूमिका अनुकरणीय आहे.
" मी त्यांच्या सूचना स्वीकारण्यास तयार नव्हतो म्हणून त्यांच्या सूचनांचे मूल्य कमी होत नाही किंवा विधानसभेच्या कामकाजाला चैतन्य देण्यासाठी त्यांनी दिलेल्या सेवेला कमी करत नाही. मी त्यांचा आभारी आहे. परंतु त्यांच्याशिवाय, संविधानातील तत्वे स्पष्ट करण्याची संधी मला मिळाली नसती जी संविधान मंजूर करण्याच्या केवळ यांत्रिक कामापेक्षा जास्त महत्त्वाची होती. "
संविधान हे अंमलात आणण्यासाठी बोलावलेल्यांवर अवलंबून आहे.
आंबेडकरांनी आपल्या भाषणात इशारा दिला आहे की संविधानाचे कार्य हे त्या दस्तऐवजावर अवलंबून नसते, तर शेवटी त्याचा परिणाम त्याच्या अंमलबजावणीचे काम करणाऱ्यांवर अवलंबून असतो.
" ... संविधान कितीही चांगले असले तरी ते वाईट ठरणारच कारण ज्यांना ते अंमलात आणण्यासाठी बोलावले जाते ते वाईट असतात. संविधान कितीही वाईट असले तरी, ज्यांना ते अंमलात आणण्यासाठी बोलावले जाते ते चांगले असल्यास ते चांगले ठरू शकते."
…राज्यघटना फक्त कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यासारख्या राज्याच्या अवयवांची तरतूद करू शकते. राज्याच्या त्या अवयवांचे कामकाज ज्या घटकांवर अवलंबून असते ते म्हणजे लोक आणि त्यांच्या इच्छा आणि राजकारण पूर्ण करण्यासाठी ते स्थापन करणार असलेले राजकीय पक्ष. ”
राष्ट्रावर धर्मप्रथा ठेवण्याचे धोके
१८५७ मध्ये मोहम्मद-बिन-कासीमचे सिंधवरील आक्रमण, पृथ्वीराज चौहानविरुद्ध लढण्यासाठी मोहम्मद घोरीचे आक्रमण, तसेच ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या लढाईत भारतीयांमध्ये निर्माण झालेला फूट यासारख्या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करताना आंबेडकरांनी नमूद केले आहे की,
" ... भारताने केवळ एकदाच आपले स्वातंत्र्य गमावले नाही, तर तिच्याच काही लोकांच्या बेवफाई आणि विश्वासघातामुळे ते गमावले ."
या संदर्भात, तो पुढे म्हणतो,
" इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? हाच विचार मला चिंतेत टाकतो. जाती आणि पंथांच्या स्वरूपात आपल्या जुन्या शत्रूंव्यतिरिक्त, आपल्याकडे विविध आणि विरोधी राजकीय विचारसरणी असलेले अनेक राजकीय पक्ष असतील या वस्तुस्थितीची जाणीव झाल्यामुळे ही चिंता आणखी वाढली आहे."
भारतीय लोक देशाला त्यांच्या पंथांपेक्षा वर ठेवतील की पंथांना देशापेक्षा वर ठेवतील?
मला माहित नाही. पण एवढे मात्र निश्चित आहे की जर पक्षांनी देशापेक्षा धर्माला प्राधान्य दिले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे नष्ट होईल. या घटनेपासून आपण सर्वांनी दृढनिश्चयाने सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबाने आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा आपण दृढनिश्चय केला पाहिजे. ”
सत्याग्रह, क्रांती म्हणजेच अराजकतेचे व्याकरण विरुद्धचा खटला
" जर आपल्याला लोकशाही केवळ स्वरूपातच नव्हे तर प्रत्यक्षातही टिकवायची असेल, तर आपण काय केले पाहिजे? माझ्या मते, आपण पहिली गोष्ट म्हणजे आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संवैधानिक पद्धतींना घट्ट धरून राहणे."
याचा अर्थ असा की आपण क्रांतीच्या रक्तरंजित पद्धती सोडून दिल्या पाहिजेत. याचा अर्थ असा की आपण सविनय कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या पद्धती सोडून दिल्या पाहिजेत.
जेव्हा आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संवैधानिक पद्धतींचा कोणताही मार्ग उरला नव्हता, तेव्हा असंवैधानिक पद्धतींचे समर्थन मोठ्या प्रमाणात होते. परंतु जिथे संवैधानिक पद्धती खुल्या आहेत, तिथे या असंवैधानिक पद्धतींचे समर्थन होऊ शकत नाही. या पद्धती अराजकतेच्या व्याकरणाशिवाय दुसरे काहीही नाहीत आणि जितक्या लवकर त्या सोडून दिल्या जातील तितके आपल्यासाठी चांगले. ”
राजकारणात नायकपूजा, भक्ती हा हुकूमशाहीचा निश्चित मार्ग आहे.
" देशासाठी आयुष्यभर सेवा देणाऱ्या महापुरुषांबद्दल कृतज्ञ राहण्यात काहीही गैर नाही. परंतु कृतज्ञतेलाही काही मर्यादा आहेत, जसे आयरीश देशभक्त डॅनियल ओ'कॉनेल यांनी चांगले म्हटले आहे, कोणताही पुरुष त्याच्या सन्मानाच्या किंमतीवर कृतज्ञ असू शकत नाही, कोणतीही स्त्री तिच्या पवित्रतेच्या किंमतीवर कृतज्ञ असू शकत नाही आणि कोणतेही राष्ट्र त्याच्या स्वातंत्र्याच्या किंमतीवर कृतज्ञ असू शकत नाही."
इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या बाबतीत ही खबरदारी खूपच आवश्यक आहे. कारण भारतात, भक्ती किंवा ज्याला भक्ती किंवा नायक-पूजेचा मार्ग म्हणता येईल, ती त्याच्या राजकारणात अशी भूमिका बजावते जी जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घेतलेल्या भूमिकेपेक्षा मोठी आहे. धर्मात भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकतो. परंतु राजकारणात, भक्ती किंवा नायक-पूजा हा अधोगती आणि शेवटी हुकूमशाहीकडे जाण्याचा निश्चित मार्ग आहे. ”
सामाजिक लोकशाहीचा मुद्दा
डॉ. आंबेडकर शेवटी यावर भर देतात की लोकांनी केवळ राजकीय लोकशाहीवर समाधान मानू नये, तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांसह सामाजिक लोकशाहीसाठी प्रयत्न करावेत.
"सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाहीचा अर्थ काय? याचा अर्थ असा जीवनपद्धती आहे जी स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांना जीवनाची तत्वे म्हणून ओळखते..."
… ते त्रिमूर्तीचे एक संघटन करतात या अर्थाने की एकमेकांपासून वेगळे होणे म्हणजे लोकशाहीचा उद्देशच नष्ट करणे आहे …
समानतेशिवाय, स्वातंत्र्यामुळे काही लोकांचे अनेकांवर वर्चस्व निर्माण होईल.
बंधुत्वाशिवाय, स्वातंत्र्य अनेकांवर काही लोकांचे वर्चस्व निर्माण करेल.
बंधुत्वाशिवाय, स्वातंत्र्य आणि समानता ही नैसर्गिक प्रक्रिया होऊ शकत नाही. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एका हवालदाराची आवश्यकता असेल .
खऱ्या राष्ट्राचा मार्ग मोकळा करण्यावर
भारतासारखा विविधतापूर्ण देश आपोआप एक राष्ट्र बनेल हे गृहीत धरण्याविरुद्ध आंबेडकर इशारा देतात . अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या देशाला संयुक्त राष्ट्रांऐवजी अमेरिका असे संबोधण्याच्या जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ देत , आंबेडकर म्हणतात,
" जर अमेरिकेतील लोकांना आपण एक राष्ट्र आहोत असे वाटत नसेल, तर भारतीयांना आपण एक राष्ट्र आहोत असे वाटणे किती कठीण आहे. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकीयदृष्ट्या विचारसरणीचे भारतीय 'भारताचे लोक' या अभिव्यक्तीला नाराज करायचे. त्यांना 'भारतीय राष्ट्र' ही अभिव्यक्ती जास्त आवडायची."
आपण एक राष्ट्र आहोत असे मानून आपण एक मोठा भ्रम बाळगत आहोत असे माझे मत आहे. हजारो जातींमध्ये विभागलेले लोक एक राष्ट्र कसे असू शकतात?
जगाच्या सामाजिक आणि मानसिक अर्थाने आपण अद्याप एक राष्ट्र नाही हे जितक्या लवकर आपल्याला कळेल तितके आपल्यासाठी चांगले. तरच आपल्याला एक राष्ट्र बनण्याची आवश्यकता कळेल आणि ध्येय साध्य करण्याचे मार्ग आणि मार्गांचा गांभीर्याने विचार करता येईल .
या ध्येयाची पूर्तता करणे खूप कठीण होणार आहे - अमेरिकेपेक्षा कितीतरी जास्त कठीण. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत ... परंतु जर आपल्याला प्रत्यक्षात एक राष्ट्र बनायचे असेल तर आपल्याला या सर्व अडचणींवर मात करावी लागेल. कारण बंधुता ही एक वस्तुस्थिती तेव्हाच असू शकते जेव्हा एक राष्ट्र असेल. बंधुत्वाशिवाय, समानता आणि स्वातंत्र्य रंगाच्या थरापेक्षा खोलवर राहणार नाही .
जर गोष्टी चुकीच्या झाल्या, तर आपल्याला स्वतःशिवाय कोणीही दोषी राहणार नाही.
आंबेडकरांचे या विषयावरील शेवटचे शब्द संविधानात नमूद केल्याप्रमाणे भारताची कल्पना जपण्यासाठी किती जबाबदारी आहे याबद्दलचे त्यांचे विचार सारांशित करतात.
"... आपण हे विसरू नये की या स्वातंत्र्याने आपल्यावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही चुकीसाठी ब्रिटिशांना दोष देण्याचे निमित्त आपण गमावले आहे. जर यापुढे काही चूक झाली तर आपल्याला दोष देण्यासाठी कोणीही राहणार नाही. स्वतःशिवाय..."
…जर आपल्याला संविधान जपायचे असेल ज्यामध्ये आपण लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालणारे सरकार हे तत्व समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, तर आपण आपल्या मार्गात असलेल्या आणि लोकांना लोकांद्वारे चालणाऱ्या सरकारपेक्षा लोकांसाठी चालणारे सरकार पसंत करण्यास प्रवृत्त करणाऱ्या वाईट गोष्टी ओळखण्यात उशीर न करण्याचा आणि त्या दूर करण्याच्या आपल्या पुढाकारात कमकुवत न होण्याचा संकल्प करूया.
देशाची सेवा करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. मला यापेक्षा चांगला मार्ग माहित नाही .
आंधळ्यांची रात्रशाळा
न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता
या जेव्हा कविता होतात
आणि संविधान खेळणे होते
तेव्हा लोक गुलाम आणि सत्ताधारी मालक होतात.
जेव्हा संसद सरकारची बटिक होते
आणि पक्ष सत्तेचे झेंडे खांद्यावर घेतो
तेव्हा देशातली लोकशाही मरते
आणि हुकूमशहा तिचे हत्यारे होतात.
जेव्हा सत्ता कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही
आणि विरोधक हतबल होताना दिसतात
तेव्हा जनता अनाथ होते
आणि सत्ताधारी अनाथालयाचे संचालक होतात.
जेव्हा प्रशासन निष्क्रिय आणि
संरक्षक यंत्रणा निकामी होतात
तेव्हा स्त्रीवरचे बलात्कार हे सत्तेचे सन्मान होतात.
आणि गरिबांची दुर्दशा हे धनवंतांचे भूषण होते.
श्रीमंतांचे वर्ग जेव्हा अरण्ये उध्वस्त करतात
तेव्हा ते गरिबांचे विस्थापन
आणि श्रीमंतांचे उत्पादन होते
या विध्वंसात मरण स्वस्त
आणि जीवन महागडे होते.
जेव्हा उद्योगवंत एकत्र येतात
आणि श्रमवंत जातीवर्गात विभागले जातात
तेव्हा समाजवाद हे स्वप्न होते
आणि धर्माचा अंतकाळ जवळ येतो.
जेव्हा देशभक्ती अपराध होते
आणि अंधश्रद्धा हाच धर्म होतो
तेव्हा ज्ञानाचा अंत होतो
आणि माणसांची मेंढरे होतात.
जेव्हा अधिकार विस्मरणात जातात
आणि आज्ञापालन हाच संस्कार होतो
तेव्हा समाज माणसांचा रहात नाही
तो गुराढोरांचा कळप होतो.
जेव्हा दारिद्र्याहून जात
आणि अभावाहून कूळ मोठे होते
तेव्हा पुढाऱ्यांची दैवते होतात
आणि विद्यापीठांची अज्ञानपीठे होतात.
विचारांची आराधना संपते आणि
आराधनाच जेव्हा विचार होतो
तेव्हा फक्त दैवते धनवान होतात
आणि भक्त भिकेला लागतात.
वर्तमान विषाक्त झाले
की माणसे इतिहासाच्या शस्त्रागारात शिरतात
आणि त्यातल्या शस्त्रांचा शोध हिंसेसाठी घेतात
त्यात वर्तमानाचा विसर पडतो
आणि भविष्याचे भान उरत नाही.
जेव्हा पक्षांच्या जाती
आणि धर्मांचे समाज बनतात
तेव्हा माणसांची बुद्धी हरवते
आणि ते सत्तेचे पुजारी होतात.
जेव्हा पुजारी आणि पुरोहित राजकारणी होतात
तेव्हा राजकारण लोककारण विसरते
आणि सत्ताधाऱ्यांच्या दारात
जनतेची श्रद्धास्थाने उभी होतात.
जेव्हा विचारांना आंधळेपण येते
तेव्हा सॉक्रेटिस आणि गांधी मारले जातात
आणि त्यांच्या खुन्यांची देवळे बांधून
त्यांच्या पूजांचा आरंभ होतो.
जात आणि धर्म, अंत आणि अनंत
यात माणसे विभागली जातात तेव्हा
देश राष्ट्र रहात नाही
ती केवळ माणसांची गर्दी होते.
मतदार जेव्हा मते विकतात
आणि उद्योगपती त्यांची श्रद्धास्थाने पळवितात
तेव्हा त्यांच्यातले वैर कायम राहिले तरी
त्यांचे आंधळेपण एक होते.
जेव्हा पुढाऱ्याचा शब्द धर्माज्ञा होतो
आणि अनुयायी विचारावाचून तो स्वीकारतात
तेव्हा पक्षांचे कळप होतात.
आणि नेते गुराखी व सदस्य पाळीव होतात.
शाळा विषाक्त आणि देवळे बलात्कारी होतात
तेव्हा ज्ञान बेपत्ता आणि ईश्वर बेपर्वा होतो
मात्र विषाला अमृत मानले
आणि बलात्कारच व्यवसाय ठरविले गेले तर....
शिवाय आता हे समाजमान्य होत आहे
त्याला कायद्याचे संरक्षण लाभत आहे.
संविधान जाळू म्हणणाऱ्यांच्या मनात
हीच उद्याची दिशा असेल तर
तशी वाटचालही आता सुरू झाली आहे.
-प्रा. सुरेश द्वादशीवार
शोभायात्रा नाटक
रविवार, २७ जुलै, २०२५
नाटक वाड्मय प्रकार : स्वरूप
नाटक :
नाटक हा एक साहित्यप्रकार आहे असे म्हणण्यापेक्षा तो एक दृक्श्राव्य कलाप्रकार आहे, असे म्हणणे युक्त ठरेल. नाटक या संज्ञेचा मूळ अर्थ अभिनय करणे असा आहे. ‘नट’ हा संस्कृत शब्द मुळात प्राकृतातील असून तो ‘नर्त’ (म्हणजे नाचणारा) या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृतात आला.मूळ अर्थाप्रमाणे पाहता नाटक या शब्दाचा अर्थ नाचणे असाच आहे. नट म्हणजे अभिनय करणारा, सोंग करणारा व नाटक म्हणजे नाट्यरूपाने, सोंगाच्यारूपाने दाखविणे वा सादर करणे असा अर्थ रूढ झाला. इंग्रज्रीतील ‘ड्रामा’ हा शब्द मूळ ग्रीक ‘ड्रॅन’ (Dran) या शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ कृती करणे (टू डू) असा आहे. ‘ड्रॉमेनॉन’ (Dramenon) म्हणजे केलेली कृती व ‘मायथॉस’ (Mythos) म्हणजे सांगितलेली कृती असा फरक प्राचीन ग्रीसमध्ये केला जाई. नाटक या शब्दाची व्याख्या करणे कठीण आहे. मात्र नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्या द्वाराव्यक्त होणारा संघर्षमय कथात्म अनुभव असे म्हणता येईलकिंवा नाटक म्हणजे माणसाच्या अंतर्बाह्य क्रिया-प्रतिक्रियांचे दर्शन घडविणारा आकृतिबंध होय.नाटक निर्माण करते ती द्वंद्वात्मक जीवनाची जाणीव. नाटकातूनच मानवी अस्तित्वाचे या विश्वरचनेशी काय नाते आहे, ते कळते.नाटकास पंचमवेद म्हणतात. ऋग्वेदातून ‘पाठ्य’, यजुर्वेदातून ‘अभिनय’, सामवेदातून ‘गीत’ व अथर्ववेदातून ‘विविध रस’ असे अंश घेऊन नाट्यवेद निर्माण झाला,असे भरताने म्हटले आहे. याचा अर्थ संवाद, अभिनय, संगीत आणि रस हे नाटकाचे चार घटक ठरतात. नाटकाला ‘क्रीडनीयक’ (खेळ) म्हणून निर्देशितानाते ‘दृश्य’ आणि ‘श्राव्य’ काव्य आहे, असे भरताला सुचवायचे आहे. विविध भावांनी संपन्न आणि विविध प्रसंगांनी युक्त असलेल्या लोकवृत्ताची, जगातील लोकांच्या आचारविचारांची अनुकृती म्हणजे नाटक नाटक म्हणजे भावानुकीर्तन नाटक म्हणजे जीवनाचे दर्शन घडविणारा आरसा, असे भरत म्हणतो.
नाटकाचा उगम : नाट्यवेद निर्मून ब्रह्मदेवाने तो भरताच्या हाती दिला, या कल्पित कथेपेक्षा नाटकाचा उगम धार्मिक गोष्टीत अथवा लोकजीवनाच्या स्वाभाविक प्रवृतीत आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. ऋग्वेदातील अनेक संवादसूक्तांतूननाट्याची परिणती झाली असावी. कदाचित पुराणातील सूत परंपरेत नाटकाचा उगम असावा. ग्रीकांचे नाटक धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने आले. डायोनायससनामक स्फूर्तिदात्या पुरुषदेवतेच्या उत्सवप्रसंगी जे वृंदगीत (डिथिरॅम) गाइले जाई, त्या वृंदाला नाट्यरूप देण्याचा प्रयत्न थेस्पिस (इ.स.पू. सहावे शतक) याने केला.
नाटकातील वृत्यंतरे आणि स्थित्यंतरे:स्थूल आढावा : भरतमुनीने निर्दिष्ट केलेली त्रिपुरदाहनामक ‘डिम’ म्हणजे वीरश्री आणि युद्ध यांनी युक्त असलेले नाटक व ब्रह्माने रचलेले अमृतमंथन ही नाटके प्राथमिक स्वरूपाची असू शकतील. पाणिनीने नटसूत्र या नाट्यशास्त्रावरील ग्रंथाचा उल्लेख केला असून पांतजल महाभाष्यात कंसवध या नाटकाचा निर्देश आला आहे. यानंतरचे प्रकरण-नाट्य म्हणजे अश्वघोषाचेसारिपुत्र–प्रकरण. कालिदासपूर्व भासाच्या तेरा नाटकांपैकी स्वप्नवासवदत्त आणि प्रतिज्ञयौगंधरायण ही उदयनकथेवर रचलेली नाटके जुन्या आख्यायिकांवर आधारलेली चारुदत्त आणि अविमारक, रामायणाच्या कथेवर आधारलेली अभिषेक व प्रतिमा ही नाटके आणि महाभारतातील कथानकांवर आधारलेली पंचरात्र, दूतवाक्य, दूतघटोत्कच, ऊरूभंग, कर्णभार इ. नाटके उपलब्ध आहेत. ती विचारात घेतली, तर सत्त्व, रज आणि तम या गुणांतून उफाळून येणाऱ्या लोकचरिताची अर्थपूर्णता भासाने सामर्थ्याने रंगविली होती, हे लक्षात येते. महाकवी कालिदासाने मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतलहीतीनच नाटके लिहून श्रेष्ठ नाटककार म्हणून कीर्ती मिळविली. मीलन, विरह आणि पुनर्मीलन अशा अवस्थांमधून परिणत होणाऱ्या या प्रणयकथांतील आर्तता व उत्कटता प्रेक्षकांना संपन्न नाट्यानुभव देऊ शकली. कालिदासाच्या नाटकाचे सौंदर्य त्याच्या प्रभावी नाट्यबंधात आणि काव्यात्म आविष्कारशैलीत आहे. शूद्रकाच्या मृच्छकटिक नाटकाची कथा चारुदत्त व वसंतसेना यांच्या प्रणयाची आहे आणि एक राज्यक्रांती आणि त्या निमित्ताने दुष्ट पालक राजाचा वध होऊन आर्यकाची राजसिंहासनावर स्थापना हा राजकीय कथाभाग त्यांत मिसळून गेला आहे. उत्तररामचरित लिहिणारा भवभूती, प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद ही नाटके लिहिणाराहर्ष, मुद्राराक्षसकर्ता विशाखादत्त, वेणीसंहाराचा कर्ता भट्टनारायण, कर्णसुंदरीकार बिल्हण,जयदेव,महादेव, मधुसुदन इ. संस्कृत नाटककारांनी आपल्या कृतींनी ‘काव्येषु नाटकं रम्यम्’ हा अभिप्राय सार्थ केला. जीवनाचे रसपूर्ण व संपन्न दर्शन तर त्यांनी घडविलेच, पण त्रैलोक्यातील लोकवृत्ताच्या मुळाशी जीवनाचा जो गूढ आशय दडला आहे, त्याचेही दर्शन घडविले. या नाटकातील पात्रे पुराणातील असली, तरी ती ‘मानवी’ आहेत आणि म्हणूनच त्यांच्या रतिशोकादी भावनांशी प्रेक्षक समरस होऊ शकला. संस्कृत नाट्यरचनेचे जे ‘शास्त्र’ विकसित झाले, त्यात नाट्यवस्तूच्या पाच ‘अर्थप्रकृती’ (बीच, बिंदू, पताका, प्रकरी आणि कार्य), पाच अवस्था (आरंभ, यत्न, प्राप्त्याशा, नियताप्ती आणि फलागम) आणि पाच संधी (मुख, प्रतिमुख, गर्भ, विमर्श आणि निर्वहण) यांचा समावेश आहे.नाट्यरचनेतील घटनाव प्रसंग अंतिम उद्दिष्टाची परिपूर्ती करण्यासाठी त्याच्याशी निगडित असली पाहिजेत.
संस्कृत नाटकांतून निर्माण झालेले काटेकोर संकेत हे संस्कृत नाटकांच्याउत्तरकालीन ऱ्हासाला कारण ठरलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यापेक्षा भास, कालिदास, शूद्रक, भवभूती इ. अभिजात नाटककारांच्यातोडीच्या नाटककारांचा अभाव, राजाश्रयाने स्वतंत्र प्रज्ञेचा घेतलेला बळी, दृश्य अंगावर श्राव्य भागाने केलेलीमात, कलात्मकतेविषयीच्या भ्रामक समजुती इ. कारणांनी संस्कृत नाट्यपरंपरेचा ऱ्हास झाला असावा.
ग्रीक व रोमन नाटक : गावोगाव भटकून नाटके सादर करणाराथेस्पिस हाच ग्रीक नाटकाचा जनक.धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने उदयास आलेल्या ग्रीक नाटकात निसर्ग आणि देवदेवता यांच्यावर अधिराज्य गाजविणाऱ्या नियतीला महत्त्व आहे.या नियतीचे दर्शन घडविणारी शोकात्मिका आणि समकालीन राजकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनाचे दर्शन घडविणारी सुखात्मिका आणि हलकेफुलके विडंबननाट्य, हे ग्रीक नाटकांचे प्रमुख प्रकार. इ.स.पू. ५५० ते ३०० हा ग्रीक नाटकांचा कालखंड.एस्किलसच्या नव्वद नाटकांपैकी पेर्से (इं.शी.द. पर्शियन्स), प्रोमेथेउस बाउंड इ. सात नाटकेच उपलब्ध आहेत. १३० नाटके लिहिणाऱ्या सॉफोक्लीझच्या ईडिपस टिरॅनस (ईडिपस रेक्सनावानेही परिचित), अँटिगॉन इ. सात शोकात्मिका उपलब्ध आहेत. शोकात्मिका लिहिण्याची त्याची खरी प्रकृती. बांधेसूद कथावस्तू, कलात्मक संवाद इ. वैशिष्ट्यांनी युक्त असलेली ईडिपस टिरॅनसही आदर्श शोकात्मिका. तीतून त्याने नियतीच्या हातचे खेळणे बनलेल्या माणसाचा शोध घेतला आहे.धर्म व नीती यांचा विचार करण्यापेक्षा माणसाच्या मनातील विचारविकारांचे वास्तवपूर्ण चित्रण युरिपिडीझने ट्रोजन विमेन, हिपॉलिटस, मीडीअ इ. नाटकांतून केले आणि ग्रीक नाटक मानवी पातळीवर आणले. ॲरिस्टोफेनीस आणि मिनँडर यांनी ग्रीक सुखात्मिका संपन्न केली. तत्कालीनराजकीय परिस्थिती, शिक्षणप्रणाली आणि ग्रीक शोकात्मिका यांचाआपल्या नाटकांतून ॲरिस्टोफेनीस याने तीव्र उपहास केला. द नाइट्समध्ये क्लीऑन या राजकीय नेत्याचे त्याने व्यंगचित्रण केले. द क्लाउडसमध्ये सॉक्रेटीसचे व्यंगचित्र आहे. जुन्या ग्रीक सुखात्मिकेत शांतता, लोकशाही, शिक्षण यांसारख्या राष्ट्रीय प्रश्नांचा समाचार घेतला होता, तर नव्या सुखात्मिकांची कथावस्तू जन्मरहस्य, गैरसमज यांतून निर्माण झालेली दिसते. वृंद, मुखवटे, काव्यात्म संवाद, स्थल-काल-कृती यांचे ऐक्य ही ठळक वैशिष्ट्ये असलेले ग्रीक नाटक ग्रीक सत्तेबरोबर अस्त पावले.
रोमन नाटकही उत्सवातून निर्माण झाले.आपल्याकडे शिमग्यात जशी अचकट-विचकट हावभावयुक्त भाषणे चालतात तशी भाषणे, अश्लील संवाद इ. योजून लोक एकमेकांना रिझवीत.त्याला ‘फेसनाइन जेस्टिंग’ म्हणत. त्यात कालांतराने इट्रुस्कन नृत्याची सांगड घातली गेली. ग्रीक नाटकांची लॅटिनमध्ये भाषांतरे करणारा गुलाम अँड्रोनिकस हा रोमन नाटकाचा जनक.त्यानंतर यशस्वी झाल्या, त्या प्लॉटस व टेरेन्स यांच्या सुखात्मिका. उच्चकुलीन देखणे आणि दुबळे नायक, कनिष्ठवर्गातील नायिका, श्रीमंत, वृद्ध आईबाप, नायक-नायिकेचे मीलन घडवून आणणारे गुलाम अशी सांकेतिक पात्रे घेऊन नाटक रचले जाई. काही नाटके नाम-रूप-सादृश्य या कल्पनेवर रचत. टेरेन्सने नांदीची (प्रोलॉग) कल्पना अमान्य ठरवून नाटकातील गुंतागुंत आपोआप उलगडत जावी, असे सांगितले. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवीत न्यावी आणि रहस्यस्फोट करून त्यांना विस्मयाचा धक्का द्यावा, हे तंत्र त्याने योजिले. मीडीअ, ॲगमेनन इ.नाटके लिहिणारा सेनीका मात्र शोकात्मिकांसाठी प्रसिद्ध आहे.
मध्ययुगीन नाटक : ख्रिस्त अथवा ख्रिस्तानुयायांच्या जीवनकथा वा त्यातील महत्त्वाच्या घटनांच्या आधारे रचले गेलेले नाटक म्हणजे अद्भुत नाटक (मिरॅकल प्ले). सदाचार नाटकांमध्ये (मोरॅलिटी प्ले किंवा सेंट्स प्ले) बायबलमधील शिकवण ठसविली जाईल, अशी कथा असे.या प्रकारच्या नाटकातून ज्ञान श्रेष्ठ, अज्ञान त्याज्य हे सूत्र असे. छोटे कथानक, कमी पात्रे, विपुल पद्यरचना आणि नैतिक विचार असलेल्या सदाचार नाटकांचे प्रयोग चर्चमध्ये किंवा हमरस्त्यांच्या चौकात केले जात. धर्मसुधारणा आंदोलनानंतर सदाचार नाटकांचे स्वरूप ऐतिहासिक किंवा राजकीय बनले.सदाचार नाटकातून माणूस कसकसा उत्क्रांत होत गेला, तेही दर्शविले जाई. दंभ, सत्य, लोभ, दया, शांती इ. पात्रे अशा नाटकांत असत. ही सदाचार नाटके फार काळ मात्र तग धरू शकली नाहीत.
प्रबोधनकालीन नाट्यपरंपरा : प्रबोधनकालीन नाट्यपरंपरांचा शोध घेताना लक्षणीय रूप जाणवते, ते इटालियन संगीतिकांचे (ऑपेरा). या संगीतिकेत तसे बंदिस्त कथानक नसते. त्यातील पात्रे बोलत नाहीत, तर ती गातात. हेन्री पर्सेलरचित डिडो अँड इनिअस (१६८९)व जॉन गेचीबेगर्स ऑपेरा (१७२८) या संगीतिका इंग्लंडच्या रंगभूमीवर आल्या व त्यांनी या प्रकारास रसिकमान्यता मिळवून दिली. जोव्हान्नी पेर्गोलेसीचा La Serva Padrona (इ. शी. द सर्व्हंट मिस्ट्रेस, १७३३) हा संगीतिकेचा मानदंड मानला जातो. संगीतिकेत वाङ्मयीन भाषामहत्त्वाची आणि संगीत गौण मानले पाहिजे. संगीतिकासदृश रचना मराठीत एकोणिसाव्या शतकात अण्णासाहेब किर्लोस्करांनी सौभद्रच्या रूपाने केली.
प्रबोधनकालीन सुखात्मिकेचा निर्माता आरिऑस्तो याची La Cassaria (इंं.भा.दस्ट्राँगबॉक्स) ही सुखात्मिका १५०८ मध्ये अवतरली. १५०८ते १५२८पर्यंत त्याने ज्या सुखात्मिका लिहिल्या, त्यांच्या कथावस्तू लॅटिन वळणाच्या होत्या. गैरसमजावर रचलेले कथानक, प्रणयलीला, वृद्धांची थट्टा इ. वैशिष्ट्ये असलेली त्याची सुखात्मिका प्राधान्याने अभिजात सुखात्मिकेचा घाट स्वीकारीत होती.
तास्सो या इटालियन नाटककाराची गोपनाटके (पास्टोरल ड्रामा) चित्तवेधक होती. त्याचे Aminta (१५७३) हे गोपनाटक अतिशय लोकप्रिय ठरले. इटलीत गोपनाटके ऱ्हास पावली पण इंग्लंडमध्ये अठराव्या शतकापर्यंत ती केली जात. शेक्सपिअरच्या ॲज यू लाइक इट, द विंटर्स टेल इ. नाटकांतून ग्रामजीवनाची, ग्रामीण भाषेची वेगवेगळी रूपे जाणवतात.
सोळाव्या शतकातील इटलीतील ‘Commedia dell’arte’ हा नाट्यप्रकार म्हणजे एक प्रकारे तत्कालस्फूर्त सुखात्मिका (इंप्रोव्हाइज्ड कॉमेडी) होती. तिला लिखित संहिता नसे. तिच्यात शब्दांपेक्षा दृश्य महत्त्वाचे होते. त्यातील काही पात्रे आपल्या तमाशातील सोंगाड्यासारखी ऐनवेळी सुचेल तसे चतुर भाषण करणारी व हसवणारी असत. प्रबोधनकाळात इटलीत आरिऑस्तो याने जीसुखात्मिकासिद्ध केली, तिला ‘Commedia erudita’ असे म्हणतात. तिची स्वतंत्र संहिता असते.
एलिझाबेथकालीन नाटक : एलिझाबेथकालीन नाट्यवाङ्मय वैपुल्य, विविधता, प्रयोगशीलता व निखळ कलागुण ह्यांनी समृद्ध आहे. या काळात अभिजात व मध्ययुगीन परंपरा अस्तित्वात होत्या. या दोन्ही परंपरांचा सुरेख संगम असलेले नवे नाटक विल्यम शेक्सपिअरने (१५६४-१६१६) लिहिले. शेक्सपिअरच्या नाट्यकृतींमुळे या कालखंडाला नाटकांचा सुवर्णकाळ असे म्हणतात. प्रत्येक नाट्यकृतीत एक नवी मयसभा निर्माण करूनत्याने अनेक जीवनसत्ये उलगडून दाखविली. मानवी आत्म्याचे अमर सौंदर्य आणि त्याची चिरंतन कुरूपता त्याने व्यक्त केली. त्याचे नाट्यलेखन कल्पनाशील रंभूमीसाठी होते. प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीचे सहकार्य मिळवून त्यांना नाट्यानुभव देणे हे त्याचे उद्दिष्ट. नेपथ्यादी प्रसाधनांचा वापर कमीत कमी करून प्रेक्षकांची कल्पनाशक्ती जागृत व उत्तेजित करणे, त्याच्या नाटकांना शक्य झाले. सत्याभास निर्माण करण्यासाठी पार्थिव साधनांची आवश्यकता असतेच असे नाही, हे त्या नाटकांनी स्पष्ट केले.
या काळात शेक्सपिअरने जी नाटके लिहिली, त्यांत सुखात्मिका, शोकात्मिका, शोक-सुखात्मिका आणि ऐतिहासिक नाटके या प्रकारांचा समावेश होतो. समृद्ध आणि बलाढ्य राष्ट्र म्हणून इंग्लंडला लाभलेली प्रतिष्ठा, धर्मसुधारणेच्या चळवळीमुळे होत असलेली विचारक्रांती इ. कारणांमुळे गतेतिहास व त्यातील व्यक्ती यांचा शोध घेण्याची प्रवृत्ती वाढली व त्यातून ऐतिहासिक नाटके रंगमंचावर आली. आठवा हेन्री व पोप यांच्यातील संघर्षाचे दर्शन घडविणारा जॉन बेल, पहिल्या एडवर्डची कारकीर्द उभी करणारा पील, जेम्स राजाला उभा करणारा ग्रीन, डॉ. फॉस्टसचा निर्माता मार्लो इ. नाटककारांनी शेक्सपिअरच्या नाट्यलेखनाला स्फूर्ती दिली. चौथा, पाचवा, सहावा आणि आठवा हेन्री, तिसरा रिचर्ड, जॉन इ. ऐतिहासिक व्यक्तींतील माणूस तर शेक्सपिअरने शोधलाच, पण त्याचबरोबर या राजांच्या कारकीर्दीतील लोकजीवनाचे दर्शनही घडविले. मानवी जीवनाच्या सर्वंकष दर्शनाचा प्रयत्न ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, ॲज यू लाइक इट, मिडसमर नाइट्स ड्रीम, ट्वेल्थ नाइट, मच ॲडो अबाउट नथिंग इ. सुखात्मिकांतून केले. या सुखात्मिकांत प्रणयकथा आहेत. त्यात वास्तव व रम्याद्भुत अशी दोन्ही विश्वे एकमेकांत मिळून जातात. प्रेमिकांची भेट, प्रेमातील अडथळे, प्रेमिकांची ताटातूट, पुरुषवेषधारी प्रणयिनी, कोसळणारी संकटे आणि अखेरमीलन होऊन आनंदीआनंद, असेच जवळजवळ सर्व सुखात्मिकांचे रूप आहे.सुखात्मिकेपेक्षा शोकात्मिकेतून शेक्सपिअरची वेगळीचजीवनदृष्टी जाणवते. हॅम्लेट, मॅक्बेथ, किंग लीअर आणि ऑथेल्लो या चार जगप्रसिद्ध शोकात्मिकांतून माणसाला भोगावे लागणारे दुःख केवळ नियतिकृत नसते, तर ते त्याने स्वतःच निर्माण केलेले असते, हे जीवनसत्य त्याने मांडले. या शोकात्मिकांतील हॅम्लेट, लीअर, मॅक्बेथ इ. व्यक्ती जे दुःख भोगतात, त्यापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व महान ठरते. कालप्रवाहाची जाणीव व्यक्त करणारा, मानवी मनाचे व्यापार जाणणारा, जीवनातील द्वंद्वे रंगविणारा, जीवनसत्ये विशद करणारा, रंगभूमीचे सामर्थ्य आणि मर्यादा जाणणारा शेक्सपिअर हा महान नाटककार होय.
मोल्येरहा फ्रेंच नाटककार शेक्सपिअरपेक्षा वेगळ्या दृष्टीने अनुभव व्यक्त करीत होता. मोल्येरने प्रामुख्याने विडंबनात्मक प्रहसने रचली. त्यातून कधी प्रचलित चालीरीतींचा, समाजातील अपप्रवृतींचा उपहास केला, तर कधी अतिलोभी, कंजूष, ढोंगी व्यक्तींची व्यंगचित्रे रेखाटली. माणसाचे मुखवटे दूर सारणारा मोल्येर जीवनमूल्येही जपट होता. त्याला जीवनातील विसंगतीबरोबर संगतीची जाणीव होती. म्हणून त्याच्या लव्ह इज द बेस्ट डॉक्टर, द कंपल्सरी मॅरेज, मॅग्निफिसंटलव्हर्सइ.प्रहसनांनादेखील चिरंतनत्व लाभले.
फ्रान्समध्ये मोल्येरइतकी लोकप्रियता कॉर्नेय व रासीन यांनालाभली. रासीनच्या शोकात्मिकेमागे त्याचा आत्मप्रत्यय होता. नियतीच्या हातची खेळणी बनलेल्या स्त्रीपरुषांच्या अंतर्मनातले द्वंद्व त्याने विलक्षण सामर्थ्याने रंगविले.
(सतीश आळेकर) इ.नाटकांच्या निमिताने मराठी नाटकाच्या विविध दिशा स्पष्ट झाल्या.
यूराेपमध्ये तर नाटकाचे भिन्नभिन्न आविष्कार प्रेक्षकांना स्तिमित करीत होते. ब्रेक्टप्रणीत महाकाव्यसदृश किंवा आर्षनाट्य (एपिक थिएटर)उदयास आले. सामाजिक वास्तव व सामाजिक नैतिक समस्या यांचा विचार करणाऱ्या आधुनिक नाटकाला ॲरिस्टॉटलप्रणीत नाट्यतत्त्वे अपुरी व असमाधानकारक वाटू लागली. बांधेसूद कथानक, उत्कंठा व विस्मयनिर्माण करणारी रचना, नेत्रदीपक दृश्यांचा अवलंब इ. बाबी ब्रेक्टने आपल्या थ्रीपेनी ऑपेरा, कॉकेशियन चॉक सर्कल इ.नाटकांतून नाकारल्या. मार्क्सचे सामाजिक तत्त्वज्ञान त्याने मांडले. जीवनातील समस्या वस्तुनिष्ठ दृष्टीने विचारात घ्याव्यात व बौद्धिक निर्णय घ्यावा अशी त्याची अपेक्षा. रंगमंचावरील कृति-उक्तींशी प्रेक्षकाने समरस होऊ नये, असा त्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. नाटकाने भावनेपेक्षा बुद्धीला आवाहन करावे, हे त्याचे मुख्य सूत्र. जीवनातील अर्थशून्यतेची, व्यर्थतेची जाणीव व्यक्त करणारे ⇨ मृषानाट्य वा निरर्थनाट्य (थिएटर ऑफ द ॲब्सर्ड) यूरोप व अमेरिकेत १९५० ते १९६० च्या दरम्यान पुढे आले.सार्त्र व काम्यू यांनी व्यस्ततावादी जाणीव आपल्या लेखनातून व्यक्त केली.या विश्वरचनेपासून माणूस विलग झाला आहे, ही जाणीव त्यांतून प्रामुख्याने व्यक्त होते.माणसाच्या बाह्यविश्वापेक्षा त्याच्या गुंतागुंतीच्या अंतर्विश्वाचा शोध व्यस्ततावादी नाटक घेते.त्यात रूढार्थाने संविधानक नसते,असतात ती एकामागोमाग येणारी, अंतर्मुख करणारी दृश्ये. वेटिंग फॉर गॉडोमध्ये बेकेट ईश्वरासाठी थांबणे कसे व्यर्थ आहे,ते सांगतो. आता ईश्वराशिवाय दुसरे काही उरले नाही त्याच्या अस्तित्वाविषयी आपण शंकाकुल आहोत, हे तत्त्वज्ञान या नाटकातील विदूषक सांगतो व तत्त्वज्ञ बनतो. बेकेट म्हणतो, जीवन हा एक खेळ आहे. खेळ म्हणजे मूर्खपणा, अर्थहीन कृती. बेकेट माणसाचे विरूपीकरण होत असल्याचे सांगतो. आपल्या आविष्कारशैलीने बेकेटने नाटकाचे सर्कशीत रूपांतर करून टाकले व माणसांना विदूषक बनविले.आर्तोप्रणीत क्रौर्यनाट्य (द थिएटर ऑफक्रुएल्टी) हा आणखी एक नवनाट्यप्रकार.यानाटकात शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व असते. माणूस, समाज, निसर्ग, विश्व यांचे परस्परसंबंध शोधण्याचा त्यात प्रयत्न आहे. माणसाच्या प्रत्येक कृतीमागे एक प्रकारची निर्दयता असते, असे त्याचे मत. त्याने नाटकातून दर्शन घडविले ते माणसाच्या आदिमप्रकृतीचे. जॉन ऑस्बर्नच्यालुक बॅक इन अँगर या नाटकामुळे सामाजिक निषेधनाट्याचा (प्ले ऑफ सोशल प्रोटेस्ट) आविष्कार घडून आला.जीवनातील प्रस्थापित मूल्यांविरुद्ध, प्रस्थापित सामाजिक आणि राजकीय संस्थांविरुद्ध, प्रस्थापित वाङ्मयीन संकल्पनांविरुद्ध निषेधाचा आवाज त्याने उठवला. आपल्या नाटकांतून त्याने एक प्रकारची नकारार्थी भूमिका मांडली, त्याचप्रमाणे प्रचलित समाजव्यस्थेविषयीची खंतही व्यक्त केली.आजचे नवनाट्य झपाट्याने विविध रूपे घेत आहे.घटिते (हॅपनिंग्ज), तत्कालस्फूर्त नाट्याविष्कार (इम्प्रोव्हायझेशन) इ. नवनवे आविष्कार आणि त्यांचे सामर्थ्य प्रगट होत आहे.आधुनिक नाटककार आपापल्या प्रवृत्तींनुसार आणि आधुनिक युगधर्मानुसार नाटकाची विविध रूपे साकार करीत आहेत.या माध्यमाच्या अधिकाधिक शक्यता धुंडाळत आहेत.नाटकाचे रूप कोणतेही असो नाटक म्हणजे दृक्-श्राव्यकाव्य हे सूत्र अबाधितच राहणार.
आकारमानसौंदर्य प्रकटकरण्याला समर्थ असावे व ते स्वयंपूर्ण असावे, त्याला सजीव एकात्मता असावी, कथानकांतर्गत सर्वघटना अपरिहार्य अशा कार्यकारणसंबंधाने बद्ध असाव्यात. ॲरिस्टॉटलच्या ऐक्यत्रयाच्या संकल्पनेत स्थलैक्य, कालैक्य व कृत्यैक्य यांचा समावेश आहे. कथानक एकाच ठिकाणी घडलेले असावे.तसेच कथानक एकाच वेळेस न घडता, निरनिराळ्या दिवशी वा कालांतराने घडले असे जरी नाटकात दाखविले असले, तरी जर एकूण नाटकाचा परिणाम चांगला होत असेल, तर तो दोष नाही.
संस्कृत नाटकाचा आरंभ ⇨ नांदीनेहोतो.नाटकांतर्गत प्रस्तावना सूत्रधार-नटीच्या प्रवेशातून होते आणि भरतवाक्याने नाटकाची परिसमाप्ती होते. संस्कृतनाट्यशास्त्राप्रमाणे नाटकाची कथावस्तू दोनप्रकारची असते. नाटकातील नायकाशी संबद्ध अशी जी मुख्य घटनात्याचे फल नायकाच्या पदरी पडते. या मुख्य घटनेला ‘अधिकारिक वस्तू’ म्हणतात.या मुख्यघटनेचा क्रमवारविकासदाखविण्यासाठी नाटककाराला रचनेत अनेक प्रसंग उभे करावे लागतात.अशा प्रसंगांची वस्तू ती ‘प्रासंगिक’.अधिकारिक व प्रासंगिक कथावस्तूचे स्वरूप आणि त्यांचा परस्परसंबंध स्पष्ट व्हायला हवा.या दोन्ही वस्तूंचेलक्ष्य निश्चित फलाकडे आहे.शेक्सपिअर आपल्या नाटकात मुख्य कथानकाला मूळ नदीस मिळणाऱ्या उपनद्यांप्रमाणे उपकथानकांची जोड देतो व त्यामुळे मूळ नाट्यानुभव परिपुष्ट होतो. आरंभ, यत्न, विघ्न व संघर्ष यातून निर्माण झालेले द्वंद्व व त्यामुळे धूसर झालेली प्राप्त्याशा,अडचणीवरमात होऊन अनुकूल गोष्टी घडू लागल्याने उद्दिष्ट निश्चित प्राप्त व्हावे अशी आशा उत्पन्न करणारी नियताप्ती व शेवटी उद्दिष्टगाठल्यावर हाती आलेला फलागम, असा हा नाट्यवस्तूचा विकासक्रम आहे.
स्थूलमानाने ॲरिस्टॉटलप्रणीत नाट्यविषयक संकल्पना पाश्चात्त्य नाटककारांनी स्वीकारलेल्या दिसतात. शेक्सपिअरने ऐक्यत्रयाची संकल्पना जशीच्या तशी स्वीकारली नाही, तसेच शोक नाट्यात दैवगतीपेक्षा नायकाच्या स्वभावदोषामुळे शोकनाट्य सिद्ध होते, असे म्हटले. जॉन ड्रायडन याने देखील ऐक्यत्र यापेक्षा नाट्यात्म परिणाम साधण्यासाठी नाटककाराने स्वातंत्र्य घ्यावे आणि शोकात्मिका व सुखात्मिका यांचा संमिश्र रूपबंध स्वीकारावा, असे प्रतिपादिले.स्वच्छंदतावादी टीकाकारांनी नाटक रम्याद्भुत असले पाहिजे, असे म्हटले. इब्सेनप्रणीत वास्तववादी विचारधारा नाटक हे संसाराचे खरेखुरे चित्र आहे, हेसूत्र पुरस्कृत करते. विसाव्या शतकात मात्र वास्तववादाची जागा अभिव्यक्तिवादाने घेतली. काव्यात्म नाटक, प्रतीकात्म नाटक, वैचारिक नाटक, सामूहिकनाट्याविष्कार इ.नवीनाट्यरूपे व त्यांच्या विचारप्रणाली पुढे आल्या.
संवाद : संवाद हे नाटकाचे माध्यम आहे.कथावस्तू संवादातूनच व्यक्त होते.प्रत्यक्ष संवाद लिहिताना गद्य आणि पद्य अशा उभयरचनेचा अवलंब संस्कृत नाटकात केला जाई. गद्यपद्ययुक्त मिश्रशैलीने संवाद प्रभावी वाटत. तसेच नाटकीय पात्रांची उत्तम, मध्यम व नीच अशा प्रकारची वर्गवारी करूनउत्तम व मध्यम पात्रांची भाषा संस्कृत असावी आणि दासी, सेवकादी कनिष्ठ पात्रांची आणि स्त्रियांची भाषा प्राकृत असावी, असा दंडक होता. संवादात सर्वश्राव्य म्हणजे प्रकटभाषण, नियतश्राव्य म्हणजे आत्मगत वा ⇨ स्वगत, जनान्तिक म्हणजे एकीकडे, बाजूला आणि अपवार्य म्हणजे गुप्तकिंवा रहस्यमय अशांचा समावेश केला जातो. संवाद कथानकाची गती कायम ठेवतात व त्या त्या पात्रांचे मनोगत व्यक्त करतात. संवादातूनच नाट्यात्मक आशय मांडला जातो.पात्रांच्या मनातील सूक्ष्म आंदोलने चित्रित करण्यासाठी स्वगतासारखे दुसरे प्रभावी साधन नाही. शेक्सपिअरने स्वागताचा समुचित उपयोग केला. शेक्सपिअरच्या मुक्तच्छंदसदृश काव्यमय भाषेने भारलेल्या नाट्यसंवादांमुळे प्रेक्षकांवर फार मोठा प्रभावपडतो. इब्सेनने अंगीकारिलेल्या वास्तववादीशैलीमुळे नाटकातील स्वगते व एकमुखी दीर्घ भाषणे यांना फाटा मिळाला आणि संवादाची भाषा अनलंकृत व घरगुती झाली. अर्थातच संवादाचे स्वरूप नाटकाच्या प्रकृतीनुसारच ठरत असते.
नाटकाचे वेगवेगळे रूपबंध : नाटकातून निर्माण झालेले वेगवेगळे रूपबंध विचारात घेतले तर असे लक्षात येईल, की सर्व रूपबंधांच्या ठायी ‘नाट्यानुभव’ गोचर करण्याचे सामर्थ्य आहे. नाटक व एकांकिका यांतील नाते कादंबरी आणि लघुकथा यांतील नात्यासारखे आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आलेल्या एकांकिका या प्रकारात पात्र-प्रसंगांचा मितव्यय असतो. नाटकाप्रमाणे त्यात मोठे कथानकव त्याची उपकथानके नसतात. मोजक्याच पात्रांच्या परस्परसंबंधांतून एकात्म परिणाम करणारी घटना एंकाकिकेत असते. तिच्यातुलनेत नाटकातून व्यक्त होणारा आशय अधिक व्यापक, अधिक गुंतागुंतीचा असतो.
नाटकाचे माध्यम गद्यपद्यमय मिश्रसंवाद हे आहे, पण संगीतिकेतील संवाद म्हणजे स्वर-लयीतगुंफलेली गीते.नाटकात पात्रे बोलतात, संगीतिकेत ती गातात. तरीही संगीतिकेत संगीत गौणस्थानी व साधनरूप असते महत्त्वाचा असतो, तो गीतांच्या आधारे व्यक्त होणरा नाट्यानुभव!
नाटक व लोकनाट्य यांच्यामध्ये भेद आहे. मराठीतील ⇨ तमाशा हा लोकनाट्याचा प्रकार कमीतकमी पात्रे, कमीतकमी नेपथ्य, संकेतांचा वापर, उत्स्फूर्त संवाद, लोककथेचा आधार असलेली कथावस्तू, सामान्य ग्रामजनांची जाणीव इ. विशेषांमुळे नाटकापेक्षाही अधिक लोकप्रिय आहे. लोकनाट्याची कीर्तन,भारूड, बहुरूपी, लळित, ⇨ यक्षगान इ. विविध रूपे लोकजीवनाचे दर्शन घडवितात.
⇨अतिनाट्य हे मूलतः संगीतिकेसारखे होते. नाटकाच्या तुलनेत अतिनाट्याची आविष्कारशैली भडक असते. तीव्र परिणाम साधण्याच्या प्रयत्नात अतिनाट्य व्यक्ती आणि घटना यांना भडक स्वरूपात सादर करते. अतिदुष्ट व अतिसद्गुणी असा संघर्ष त्यात रंगविलेला असतो.
प्रहसन (फार्स) जीवनातील औचित्य-विसंगतीचे हलकेफुलके,क्वचित अतिशयोक्त दर्शन घडविते. हास्यरस निर्माण करणाऱ्या घटना,ढोबळ व्यक्तिचित्रण,संभवनीय वाटेल असे गतिमान कथानक इ. प्रहसनाचे ठळक विशेष. मराठीतील प्रहसन लघुनाट्य (इंटरल्यूड) म्हणून आले. विदूषकी चाळे,अचरट व पांचट कोट्या आणि हास्यास्पद घटना यांनी ठासून भरलेला फार्स लोकप्रिय ठरतो.
⇨नभोनाट्य हे केवळ संवाद,पार्श्वसंगीत,वातावरण निर्माण करणारी ध्वनियोजना यांवर अवलंबून असते. नाटकाचे दृश्य अंग नभोनाट्याला श्राव्य अंगाने सिद्ध करावे लागते. दूरचित्रवाणीवरील नाटकाला चित्र या माध्यमाचा सामर्थ्याने वापर करता येईल. त्यामुळे दूरचित्रवाणीवरील नाटक श्राव्य भागापेक्षा दृश्य अंगावर अधिक भर देते.
‘रेव्ह्यू’हा एक नाट्याविष्कार करणारा फ्रेंच रचनाप्रकार आहे. त्याला नाटकाप्रमाणे संविधानक नसते. केवळ रंजनार्थ नृत्य, गीते व छोट्या घटना यांच्या साहाय्याने व्यक्ती आणि समकालीन घटना यांचे उपहासपर चित्रण त्यात केलेले असते.
नाटक व त्याचा प्रेक्षक : नट, नाटककार, नाट्यप्रयोजक आणि प्रेक्षक यांच्या परस्परसंबंधांतून व सहभागातून नाट्य आविष्कृत होते. नाटक केवळ गर्दीसाठी नसते, तर ते प्रेक्षकसमूहासाठी असते. गर्दीला चेहरा-मोहरा नसतो,पण प्रेक्षकाला व्यक्तिमत्त्व असते,नाट्यानुभवाचा आस्वाद घेण्याची शक्ती असते,जे घडते त्याला प्रतिसाद देणारे संवेदनाशील मन त्याच्याजवळ असते. स्टॅनिस्लॅव्हस्की म्हणतो,की नाटकाचा प्रेक्षक रंगशालेत येतो, ते नाट्यसंहितेचे अंतर्गत रूप आस्वादण्यासाठी. नाट्यसंहिता त्याला एकांतात बसून वाचता आली असती, पण नाटक प्रयोगरूपातच कृतार्थ होते. ते प्रेक्षकांशी जेव्हा संवाद साधते,तेव्हाच ते जिवंत होते. नाटकाचा अवतार प्रेक्षकांसाठी असल्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षांचा, त्यांच्या अभिरुचीचा प्रभाव नाट्यलेखनावर होत असतो. नाटक कधीकधी प्रेक्षकांच्या पारंपरिक अभिरुचीला धक्काही देते आणि त्यातून त्याची अभिरुची नव्याने घडविण्याचा प्रयत्न करते. कारण प्रेक्षकांची अभिरुची सांकेतिक होत जाईल,तर नाटकातील नवनवीन आविष्कारांचे तो स्वागत करू शकणार नाही. म्हणून प्रेक्षक संवेदनाशील, नीरक्षीरविवेक असलेला आणि प्रयोगशीलतेचे स्वागत करणारा असावा. अगदी आरंभी करमणूक व्हावी म्हणून आलेला प्रेक्षक नाटकाचा केवळ साक्षी होता. हळूहळू तो रंगमंचावरील घटनांशी, व्यक्तींशी समरस होऊ लागला. एक भिंत ढासळल्यामुळे जे त्याच्यासमोर घडत असते, त्याचा तो आस्वाद तर घेतोच पण त्यातील घटना व व्यक्तींविषयी अंतर्मुख होऊन विचार करतो आणि त्यांच्या कृति-उक्तींचे मूल्यमापनही करतो. रंगभूमीवर उभा असलेला ‘वर्तमान’ प्रेक्षकाला आवाहन करीत असतो. नाट्यात्मक आशय, नाटकाची प्रकृती आणि नाटकाची आविष्कारशैली यांनुसार प्रेक्षकाचा प्रतिसाद ठरतो. एखादे नाटक प्रेक्षकांशी संवाद साधू शकले नाही, तर ते नाटक यशस्वी होत नाही. आधुनिक रंगभूमीवर नाटक-प्रेक्षक सहयोगाचे अनेक प्रयोग होत आहेत. ब्रेक्टसारखा नाटककार प्रेक्षकांच्या ठायी ‘परात्मभाव’ उत्पन्न होईल अशा प्रयत्नात दिसतो,तर प्रेक्षकाला नाटकात सहभागी करून घेतले तर त्याला एक वेगळाच थरारक अनुभव देता येईल, असा काही नाटककारांचा प्रयत्न असतो. नाट्यगृहात आलेला प्रेक्षक विविध स्तरांतून आलेला असतो याउलट निकटनाट्याचा (इंटिमेट थिएटर) प्रेक्षक एकाच प्रकारचे तिकिट काढून आलेला आणि सारख्याच स्तरावरचा असल्यामुळे आस्वादक्रिया सुलभ होते. विशेषतः नव्या स्वरूपाच्या प्रयोगशील नाटकाला निकटनाट्यमंच अतिशय उपयुक्त ठरतो. नाटक आणि प्रेक्षक यांचा संवाद त्यात प्रत्यक्ष घडत असतो. नाटक प्रेक्षकाला वास्तवाचा अनुभव तर देतेच,पण त्याही पलीकडे घेऊन जाते.
नाटक हा मानवी मनाचा सांस्कृतिक उद्गार आहे. नाटक हे ज्या समाजात अवतरते, तेथील संस्कृतीचे प्रतीकरूप घेऊनच ते अवतरते. भिन्नभिन्न संस्कृतींमुळे नाटकाची रूपेही भिन्नभिन्न संभवतात. महाराष्ट्रात इंग्रज राजवटीत दोन भिन्न संस्कृतींचा संघर्ष झाला व त्यानंतर मराठी नाटक पाश्चात्त्य धर्तीवर अधिक विकास पावू लागले. नाटक हे मूलतः जरी लोकरंजनार्थ अवतरत असले, तरी नाटक समाजप्रबोधन करू शकते. ते समाजातील दोषांचे आविष्करण करू शकते किंवा मानवी दोषांवर प्रकाशही टाकू शकते. नाटकाचा विषय माणूस आणि त्याचे भावविश्व हा आहे. कधी ते माणसातले उदात्तत्व व्यक्त करते, तर कधी मानवी सामर्थ्याची किंवा त्याच्या मर्यादांची जाणीवही व्यक्त करते. आजचे नाटक माणसाच्या बाह्यविश्वापेक्षा अंतर्विश्वात अधिक रस घेत आहे. नाटकातून व्यक्त होतो तो नाट्यानुभव! या नाट्यानुभवाने माणसाचा लौकिक जीवनानुभव समृद्ध होतो आणि त्याच्या जाणिवेच्या कक्षा व्यापक होतात. कळसूत्री बाहुल्या असोत किंवा मुखवटे धारण करणारी पात्रे असोत किंवा अंधार-प्रकाशात वावरणारी माणसे असोत,ती जोपर्यंत मानवी भावनांचा आविष्कार करतात, तोपर्यंत अशा माणसांनी घडविलेले नाटक प्रेक्षकांना हलवणारच,त्यांच्या जाणिवेची कळा संपन्न करणारच.
पहा: अभिनय एकांकिका नाट्यप्रयोग रंगभूमि रंगमंच रंगमंदिर लोकनाट्य शोकात्मिका संगीतिका सुखात्मिका.
संदर्भ : 1. Barnet, Sylvan Berman, Morton Burto, William, Ed. Aspects of the Drama, Boston, 1962.
2. Beckerman, Bernard, Dynamics of Drama, New York, 1970.
3. Boulton, Marjorie, The Anatomy of Drama, London, 1960.
4. Downs, H., Ed. Theatre and Stage, 2 Vols., London, 1951.
5. Egri, Lay3wuo, The Art of Dramatic Writing, New York, 1963.
6. Eliot, T. S. Poetry and Drama, London 1951.
7. Ellis-Fermor, Una, The Frontiers of Drama, London, 1964.
8. Gassner, J. Quinn, E. G. Ed. The Reader’s Encyclopedia of World Drama, London, 1970.
9. Hartnoll, Phyllis, Ed. The Oxford Companion to the Theatre, London, 1962.
10. Melchinger, Siegfried Trans. Wellwarth, George, The Concise Encyclopedia of Modern Drama, London, 1968.
11. Styan, J. L. The Dramatic Experience, London, 1965.
12. Styan, J. L. The Elements of Drama, London, 1963.
१३. कानेटकर, वसंत, नाटक : एक चिंतन, पुणे,१९७४.
१४. काळे, के. ना. नाट्यविमर्श, मुंबई,१९६१.
१५. काळे, के. ना. प्रतिमा, रूप आणि रंग, पुणे, १९७६.
१६. प्रीस्टले, जे. बी. अनु. गोळे, व. ह. नाटककाराची कला, पुणे,१९७४.
१७. देसाई, व. शां. नट, नाटक आणि नाटककार, पुणे, १९५६.
फडके, भालचंद्र
मराठी नाटक : स्वरूप
१. उत्पत्ती व विकास
मराठी नाटकाची परंपरा धार्मिक व लोकनाट्यरूपांपासून सुरू झाली.
दासवाणी, कीर्तन, हरिकथा, भारूड, तमाशा, लावणी, गोंधळ इत्यादी लोककला ही मराठी नाट्यपरंपरेची पायाभरणी ठरली.
आधुनिक मराठी नाटकाला विशेष गती १९व्या शतकात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर (१८४३) पासून मिळाली.
२. स्वरूपाची वैशिष्ट्ये
1. संवादप्रधानता – मराठी नाटक गद्य व पद्य यांच्या साहाय्याने कथानक पुढे नेते. संवादातून पात्रांचे विचार, भावना व कथानक उलगडते.
2. गायन व अभिनय – आरंभीची नाटके संगीतनाट्य स्वरूपात होती. आजही मराठी रंगभूमीवर संगीतनाट्याला विशेष स्थान आहे.
3. वास्तववादी आणि सामाजिक आशय – नाटक हे केवळ मनोरंजनापुरते न राहता समाजातील प्रश्न, दुःख, अन्याय, संस्कार यांचे चित्रण करते.
4. पात्रे व रंगमंचीय रचना – ठरावीक व्यक्तिरेखा, संवाद, काव्य, संगीत व रंगमंचीय चित्रीकरण हे यातील आवश्यक घटक.
5. अनेक प्रकारांची विभागणी
संगीत नाटक (उदा. कीर्तन-प्रधान, लावणी-प्रधान)
पौराणिक व ऐतिहासिक नाटके
सामाजिक नाटके
प्रायोगिक व आधुनिक नाटके
३. विषयवैविध्य
धार्मिक – देव-देवतांची कथा (सीता स्वयंवर).
ऐतिहासिक – शिवचरित्र, पेशव्यांचा काळ (स्वराज्याचे शिलेदार).
सामाजिक – समाजातील प्रथा, दांभिकता, स्त्रीशिक्षण (संगीत शारदा – गोविंद बल्लाळ देवल).
राजकीय व सुधारक – अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्ध (वि. वा. शिरवाडकरांचे नटसम्राट).
प्रायोगिक – नवे प्रयोग, कथानक व मांडणीतील नवे तंत्र (विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार).
४. महत्त्व
मराठी नाटक हे मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षणाचे प्रभावी साधन ठरले.
समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण, स्वातंत्र्यसंग्राम, मानवी मूल्ये यांचा प्रचार नाटकांद्वारे झाला.
मराठी रंगभूमीने आजवर अनेक जागतिक दर्जाचे नट-नट्या व लेखक घडवले आहेत.
✅ थोडक्यात :
मराठी नाटक हे संवादप्रधान, संगीतप्रधान व समाजाभिमुख वाड्मय प्रकार असून धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक ते प्रायोगिक अशा विविध अंगांनी समृद्ध झाले आहे. हे लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणारे प्रभावी माध्यम आहे.
मराठी नाटकाचा विकास – कालानुक्रम
🕉️ १. प्राचीन काळ (लोकनाट्य परंपरा)
भारूड, गोंधळ, कीर्तन, लावणी, तमाशा, दशावतार, जत्रा
धार्मिक व मनोरंजनप्रधान स्वरूप
---
🎭 २. आद्य मराठी नाटक (१९वे शतक)
१८४३ : विष्णुदास भावे → सीता स्वयंवर (आद्य मराठी नाटक)
मुख्यत्वे पौराणिक व धार्मिक आशय
गद्य-पद्य मिश्रण
---
🎶 ३. संगीत नाटकांचा सुवर्णकाळ (१८७० – १९२०)
गोविंद बल्लाळ देवल → संगीत शारदा
बाळकृष्ण बुआ इचलकऱंजीकर, अण्णासाहेब किर्लोस्कर
ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक विषय
संगीत व अभिनय यांचा संगम
---
📘 ४. सामाजिक नाटकांची भरभराट (१९२० – १९४०)
किर्लोस्कर मंडळी, सरस्वती मंडळी
विष्णु सखाराम खांडेकर, नारायण मुलगावकर
विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण, दारूबंदी यासारखे विषय
समाजसुधारक आशय
---
⚔️ ५. राष्ट्रवादी व स्वातंत्र्यपूर्व नाटक (१९४० – १९४७)
स्वातंत्र्यसंग्राम प्रेरक नाटके
देशभक्ती, शौर्य, बलिदान, जनजागृती
नाटकांचा वापर लोकशिक्षणासाठी
---
🎭 ६. स्वातंत्र्योत्तर नाटक (१९५० – १९७०)
वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) → नटसम्राट
पुलं. देशपांडे → तुझे आहे तुजपाशी, वाऱ्यावरची वरात
मनोरंजन व सामाजिक वास्तव यांचा संगम
---
🧩 ७. प्रायोगिक नाटक व आधुनिक प्रवाह (१९७० – आजपर्यंत)
विजय तेंडुलकर → घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर
महेश एलकुंचवार → वाढदिवसाची भेट, युगांत
गोविंद निहलानी, सतीश आलेकर, मकरंद साठे
प्रयोगशील मांडणी, आधुनिक तंत्रज्ञान, प्रतीकात्मकता
शहरी जीवन, अस्तित्ववादी प्रश्न, सामाजिक विसंगती यांचे दर्शन
---
📌 निष्कर्ष
मराठी नाटकाचा प्रवास
लोकनाट्य → पौराणिक → संगीत नाटक → सामाजिक → राष्ट्रवादी → आधुनिक व प्रायोगिक
असा झाला आहे.
यातून मराठी समाजाचा सांस्कृतिक व सामाजिक विकास प्रतिबिंबित होतो.
शीगवाला / नारायण सुर्वे
क्या लिखतो रे पोरा ! नाही चाचा -- काही हर्फ जुळवतो म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो गोंडेवली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो ...
-
सांस्कृतिक कार्यक्रम सुत्र संचलन चारोळ्या यात दिलेली माहीती ही संग्रहीत आहे, चारोळ्या अनेकांनी लिहलेल्या आहेत, त्या माझ्या नाहीत मी फक्...
-
नवा शिपाई ही कवी केशवसुतांची प्रसिद्ध कविता आहे. 'केशवसुत" या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांनी काव्य लेखन केलेले आ...