रविवार, २ सप्टेंबर, २०१८

गोविंद पानसरे

गोविंद पानसरे (२६ नोव्हेंबरइ.स. १९३३ - २० फेब्रुवारीइ.स. २०१५मुंबई) हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते. १९५२ साला पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोल आंदोलनातही अग्रभागी होते. २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचा कोल्हापूरमध्ये खून झाला.
गोविंद पानसरे
जन्म२४ नोव्हेंबर १९३३
कोलहार, अहमदनगर
मृत्यू२० फेब्रुवारी, २०१४

जीवनसंपादन करा

गोविंद पानसरे यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी जिल्हा अहमदनगर, तालुका राहता मधील कोल्हार या गावी झाला. गरीब कष्टकऱ्यांच्या परिवारात ते वाढले. कोल्हार येथून प्राथमिक शिक्षण व राहुरी येथून माध्यमिक शिक्षणानंतर ते उच्चशिक्षणासाठी कोल्हापूरला गेले, जिथे त्यांनी बी.ए. (ऑनर्स) व एल.एल.बी. पूर्ण केले. सुरुवातीला वर्तमानपत्र विक्रेता, मुन्सिपालिटीत शिपाई, माध्यमिक शाळा मंडळात प्राथमिक शिक्षक अशा अनेक नोकऱ्या केल्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. सोबत ते कामगार वकीलीसुद्धा करू लागले. पुढे चालून ते कोल्हापुरमधील एक नावाजलेले वकील झाले व अनेक वर्षे कोल्हापुरातील वकीलांच्या संघटनेचे अध्यक्ष राहिले.

चळवळसंपादन करा

कॉ. पानसरे शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळींकडे आकर्षित झाले होते. सुरुवातीला राष्ट्र सेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. १० वर्षांसाठी ते भाकपचे महाराष्ट्र सेक्रेटरी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती चळवळीत ते सहभागी होते. तडजोड न करता समाजातील सर्वांत जास्त शोषित तबक्क्यांच्या हक्कांसाठी लढणारे ते कार्यकर्ता होते. ते कष्टकऱ्यांच्या शेकडो संघर्षांमध्ये सहभागी झाले व अनेकांचे नेतृत्वदेखील केले, विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दूध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी, इत्यादी. कोल्हापुरमधील टोलविरोधी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

साहित्यसंपादन करा

पानसरे एक लेखक सुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानांमध्ये ते अथकपणे कार्यरत होते. "शिवाजी कोण होता?" हे त्यांच्या सर्वांत प्रसिद्ध लेखणांपैकी आहे. अथक परिश्रमाअंती त्यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे व १.५ लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या वाङ्मयाचे डॉ. असॊक घोसाळकर आणि डॉ. रणधीर शिंदे यांनी संपादित केलेले दोन खंड प्रसिद्ध झाले आहेत. लोकवाङ्मय गृहाने ते प्रकाशित केले आहेत.
कॉ.गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता हे पुस्तक आपल्याला शिवाजींचे दर्शन घडवते.

गोविंद पानसरे यांनी लिहिलेली काही पुस्तकेसंपादन करा

 1. अजून न स्वीकारलेला मंडल आयोग
 2. अवमूल्यन : कळ सोसायची कुणी?
 3. काश्मिरबाबतच्या कलम ३७० ची कुळकथा
 4. कामगारविरोधी कामगार धोरणे
 5. काही कामगार कायद्यांची तोंडओळख
 6. धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा
 7. पंचायत राज्याचा पंचनामा
 8. मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम
 9. मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न
 10. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी: पर्यायी दृष्टिकोन
 11. मार्क्सवादाची तोंड ओळख
 12. मुस्लिमांचे लाड
 13. # राजर्षी शाहू : वसा आणि वारसा
 14. शिवाजी कोण होता?
 15. शेतीधोरण परधार्जिणे

मृत्यूसंपादन करा

पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. नंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून भरधाव वेगाने निघून गेले. ह्या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. पानसरे यांच्या छातीला आणि पोटाला इजा झाली होती आणि त्यांच्या पत्नीला डोक्याला इजा झाली होती. उपचारादरम्यान गोविंद पानसरे यांचे २० फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईमध्ये निधन झाले.[१]

पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा

 • २००३ साली भारतीय पोस्टाने त्यांचे छायाचित्र असलेले तिकिट प्रकाशित केले.
 • पानसरे यांच्या नावाने ’कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली आहे.संदर्भ हवा ] ३ जून, इ.स. २०१५ रोजी पहिला 'कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार' मुक्ता मनोहर यांना देण्यात आला.
शाहू महाराज (जून २६इ.स. १८७४ - मे ६इ.स. १९२२), कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूरराज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज सुधारणावादी समाजसुधारक होते.
शाहू महाराज
छत्रपती, राजर्षी
Maharajah of Kolhapur 1912.jpg
शाहू महाराजांचे छायाचित्र
Flag of the Maratha Empire.svg
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळइ.स. १८८४ - इ.स. १९२२
अधिकारारोहणएप्रिल २इ.स. १८९४
राज्यव्याप्तीकोल्हापूर जिल्हा
राजधानीकोल्हापूर
पूर्ण नावछत्रपती शाहू महाराज भोसले
जन्मजून २६इ.स. १८७४
लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल
मृत्यूमे ६इ.स. १९२२
मुंबई
पूर्वाधिकारीछत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)
'राजाराम ३
उत्तराधिकारीछत्रपती राजाराम भोसले
वडीलआबासाहेब घाटगे
आईराधाबाई
पत्नीमहाराणी लक्ष्मीबाई भोसले
राजघराणेभोसले
राजब्रीदवाक्यजय भवानी
चलन

जीवनसंपादन करा

राजर्षी शाहू महाराज
शाहू महाराजांचा जन्म जून २६इ.स. १८७४ रोजी कागलयेथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

कार्यसंपादन करा

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी संदर्भ हवा ]त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो.
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यातला. आज शाहूंची जयंती. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. राजर्षी शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी फार तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. एवढेच नाही तर ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.
त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अतिशय विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.
गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
राजषी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.
महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.

जातिभेदाविरुद्ध लढासंपादन करा

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

इतर कार्येसंपादन करा

शाहू छत्रपती स्पिनिंग अॅन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. संदर्भ हवा ]

कलेला आश्रयसंपादन करा

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

स्वातंत्रलढ्यातील योगदानसंपादन करा

महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

पारंपिरिक जातिभेदाला विरोधसंपादन करा

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.संदर्भ हवा ]

शाहू महाराजांवरील प्रकाशित साहित्यसंपादन करा

 • Rajarshi Shahu Chatrapati : A Socially revolutionary King (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
 • शाहू महाराजांची चरित्रे. लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ.अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार(यांनी २००१ साली लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती, ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
 • बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
 • राजर्षी शाहू छत्रपती. लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव. नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.
 • कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य. लेखक : एकनाथ केशव घोरपडे
 • राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य: लेखक : रा.ना. चव्हाण
 • राजर्षी शाहू कार्य व काळ. (लेखक - रा.ना. चव्हाण)
 • समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
 • शाहू - कादंबरी- लेखक श्रीराम ग. पचिंद्रे ; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.
 • ‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)

चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकासंपादन करा

 • 'लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
 • राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)

पुरस्कारसंपादन करा

शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे. :-
 • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)
 • कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)
 • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)

सन्मानसंपादन करा

शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.[१]


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शरद baviskar- भुरा

भूरा