शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

मुलाखत-स्वरूप

 मुलाखत 
व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजेही मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजेही मुलाखत होय.
प्रशिक्षित मुलाखतकार नेमले प्रश्न विचारुन व निरिक्षणे करून व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात. चारचौघांमध्ये मिसळून ज्याला संवाद साधता येतो तो व्यक्ती सहजपणे मुलाखत देऊ शकतो.

मुलाखतीचे प्रकारसंपादन करा

नोकरी विषयकसंपादन करा

नोकरी विषयक मुलाखती म
  • हुशारी
  • चाणाक्षपणा
  • लवचिकता
  • इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
  • भावनिक सक्षमता
या बाबी तपासल्या जातात. नेमलेल्याला कामाचे अधिकारपद देण्यापूर्वी उमेदवार ती भूमिका बजावण्यास लायक आहे की नाही हे जाणून घेतले जाते. बौद्धीक, मानसिक आणि कौशल्यवृद्धीची आवड मुलाखतीत दिसून आल्यास निवडीची शक्यता असते.

स्वरूपसंपादन करा

मुलाखत देतांना आपला नैसर्गिक स्वभाव जसा आहे तसेच वर्तन केलेले योग्य असते. या मुळे मुलाखतही सहजतेने होते. म्हणूनच आपला नैसर्गिक स्वभाव न दाबता जे उमेदवार मुलाखतीस सामोरे जातात त्यांना निकालाची कधीच काळजी नसते. मुलाखतीत बहुदा स्वतःबद्दल बोलावे लागते. त्यासाठी उत्तम आत्मविश्वास असावा लागतो. आपण कोणकोणत्या विषयात आणि कौशल्यांमध्ये पारंगत आहोत हे व्यवस्थित जाणणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य ते चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. उमेदवाराला ज्या कामासाठी अर्ज केला आहे त्या क्षेत्रात आपण कसे योग्य आहोत हे पटवून देता आले पाहिजे. मुलाखतीत संभ्रमीत करणारे प्रश्न येऊ शकतात. कोणत्याही प्रश्नांचे उत्तरे किती शांतपणे आणि विचारपुर्वक देतो त्यावर उमेदवाराची हुशारी दिसून येते. उमेदवाराचा स्वभाव आणि एकंदरीत वागण्याची पद्धत यांचे निरिक्षण मुलाखत घेणारा करत असतो. उमेदवाराची कठीण परिक्षा घेण्यापेक्षा रिक्त जागेकरिता सर्वात चांगला उमेदवार निवडण्याची जबाबदारी मुलाखतकर्त्यावर असते. म्हणून त्या जागेकरिता 'मीच कसा योग्य आणि उपयुक्त आहे' हे कळत नकळतपणे मुलाखत देणाऱ्याने दखावून द्यायचे असते.संदर्भ हवा ]

मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी तंत्रसंपादन करा

  • स्वतःबद्दल सांगण्याची तयारी आरशासमोर करा. हे वारंवार करून त्यात नैसर्गिकता आणा
  • हसरा चेहरा महत्त्वाचा असतो. चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या. हसऱ्या चेहऱ्याची सवय करा.
  • योग्य व्यावसायीक पेहराव तुम्हाला उठाव देणारा असावा. योग्य कोट व टाय असल्यास चांगले परिणाम साधले जातात. काळी विजार व पांढरा शर्ट असल्यास उत्तम अथवा निळसर, करडे कपडे चालतात.
  • ही मुलाखत माझ्यासाठीच आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच आहे असाच विचार करा.
  • मुलाखतीच्या ठिकाणी जाणवणाऱ्या गंभीर वातावरणामुळे भांबावून जाऊ नका. आपण निवांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी संथ श्वसन करा ताण कमी होईल.
  • तुमच्या अवगत कौशल्यांबाबत सांगताना उत्साहाने त्यामध्ये केलेले कार्य सांगा. उदाहरणे द्या.
  • मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका.
  • मुलाखतीत घाई गडबड न करता शांत चित्ताने प्रश्नांची उत्तरे द्या.
  • प्रश्न न समजल्यास विनयाने परत विचारा, यात काही चुकीचे नाही.
  • मुलाखतकर्त्याच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल याची काळजी घ्या.
  • मुलाखती नंतर विनम्रतेने आभार माना
व्यावसायिक मुलाखतीत बसणे, बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, निटनेटकेपणा आणि प्रथमदर्शनी प्रभाव यांचा विशेष भाग असतो हे लक्षात घ्या. स्पर्धात्मक युगात इतरांपेक्षा सरस ठरण्याकरिता स्वतःचे वेगळेपण आणि विशिष्ट चमक दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःचा बायोडाटा किंवा करिक्युलम व्हिटे वेळोवेळी वर्तमान करत राहणे गरजेचे असते.

मुलाखतीतले सामान्य प्रश्न्रसंपादन करा

  • तुमच्याबद्द्ल काही सांगा?
(टेल मी समथींग अबाऊट युअरसेल्फ) या विशेष प्रश्नाकरीता बायोडाटा व्यतिरिक्त या नोकरीकरिता उपयुक्त असणारे स्वतबद्दलचं तुम्ही काय सांगू शकता, हे पाहिले जाते. या प्रश्नाची तयारी करण्यासाठी वारंवार याचे उत्तर देण्याची तयारी करा.
  • इथे का काम करायचे आहे? नेमकी कारणे द्या. त्यात अजून चांगला अनुभव आणि संस्थेसोबत स्वतःची प्रगती असेही सांगता येते.
  • पगाराची काय अपेक्षा आहे? - मोकळेपणाने अपेक्षा सांगा. येथे लाजू नका.
  • तुमच्या खुबी आणि तुमच्या कमतरता कोणत्या? - कोणतेही काम वेळेवर आणि परिपूर्ण करणे, कामाकडे लक्ष देणे, नव नवीन गोष्टी शिकणे, कंपनीच्या पद्धतींचा अभ्यास करण्याची हातोटी असणे, साध्या भाषेत महत्त्वाच्या गोष्टी समजावता येणे, फोनवर सहजतेने बोलता येणे अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता. कमतरता सांगताना त्यातही चलाखीने खुबीच सांगा - जसे की, 'मला कोणतेही काम पूर्ण करायला आवडते त्यामुळे मला पर्फेक्शनिस्ट मानले जाते. अर्थातच मी कामाचा जरा ताण घेतो.'
  • अगोदरची नोकरी का सोडत आहात? - जे कारण आहे ते स्पष्टपणे द्या. वेळ कुणावरही आलेली असते.
संस्थेला किंवा कंपनीकरिता तुमचे योगदान काय असेल हे योग्यपणे सांगितले तर चांगले गुण प्राप्त होतात.
वरील मुद्द्यांचा उपयोग केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग आदी परीक्षांमध्येही होऊ शकतो. अशा मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांचे समकालीन वास्तव, त्यातील घडामोडी व कळीचे मुद्दे या विषयक दृष्टिकोन व भूमिका तपासली जाते. विद्यार्थ्यांला समकालीन बाबींची जाण व स्वतःची स्पष्ट भूमिकादेखील असावी लागते. विद्यार्थी समन्यायी धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी संतुलित विचार करणारा आहे किंवा नाही ते पाहिले जाते. अर्थात विद्यार्थ्यांची देहबोली, भाषा, संवादकौशल्य, विचारातील स्पष्टता, आत्मविश्वास या बाबी मुलाखतीत महत्त्वाच्या ठरतात. बोलण्याचा भरपूर सराव, गटचर्चा, अधिकाधिक मॉक इंटरव्ह्यूद्वारे मुलाखतीची तयारी करता येते.
===दूरदर्शन वरील मुलाखत===सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा
Mulkhat.com ला भेेेट द्या.


जॉब साठी मुलाखत कशी द्यावी ?

जॉब साठी मुलाखत कशी द्यावी ?



मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून मुलाखत मंडळाला तुमच्या मन:स्थितीविषयीचा पूर्ण अंदाज आलेला असतो.
मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून मुलाखत मंडळाला तुमच्या मन:स्थितीविषयीचा पूर्ण अंदाज आलेला असतो. तुम्ही तणावात आहात, तुमच्यात आत्मविश्वास आहे, तुम्ही शांत आहात की घाबरलेल्या- गोंधळलेल्या मन:स्थितीत आहात याचा संदेश तुमच्या देहबोलीद्वारे समोरच्या मंडळींपर्यंत पोहोचत असतो.
केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांतील मुलाखतींना सामोरे गेलेल्या आमच्या अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव असा आहे की, उमेदवार घाबरलेला किंवा तणावात दिसला की मुलाखत मंडळ उमेदवाराला सहकार्य करते. ‘तुम्ही शांतपणे आणि आरामात बसा. घाबरू नका. चहा, कॉफी, किंवा थंड पाणी घ्याल का?’ असे उमेदवाराला विचारले जाते. सुरुवातीपासूनच त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार न करता, उमेदवाराला रिलॅक्स करण्यासाठी नाव, गाव, शैक्षणिक पात्रता अशा वैयक्तिक माहितीवर आधारित साध्या, सोप्या प्रश्नांपासून मुलाखतीला सुरुवात होते. मुलाखत मंडळाकडून चहा किंवा पाण्याची ऑफर झालीच तर सकारात्मकपणे स्वीकारावी. अशा वेळी पाणी हळूहळू घोट- घोट प्यावे. घाईघाईत घटाघट संपवण्याचा प्रयत्न करू नये. मात्र मंडळासमोर बसून चहा/कॉफी घेताना अवघडलेपणा येईल असे वाटत असेल तर नम्रपणे ऑफर नाकारली तरीही हरकत नाही. कधी कधी मुलाखतीची १०-१५ मिनिटे झाल्यानंतर उमेदवाराला तहान लागू शकते. अशा वेळी सरळ समोरचा ग्लास उचलून पाणी प्यायला सुरुवात करू नये. मुलाखत मंडळाची ‘सर, मी पाणी पिऊ शकतो का / शकते का?’ अशा शब्दांत परवानगी घ्यावी. परवानगी मिळाल्यावर त्यांना धन्यवाद देऊन पाणी घ्यावे.
मुलाखत मंडळाकडून विचारले जाणारे प्रश्न लक्षपूर्वक ऐकावेत. प्रश्न विचारणाऱ्या सदस्याकडे पाहून उत्तर द्यावे. एखादा प्रश्न विचारला जात असताना पूर्णपणे ऐकून न घेता, मध्येच बोलू नये. पूर्ण प्रश्न ऐकल्यानंतरच उत्तराला सुरुवात करावी. सहमतीदर्शक प्रश्न विचारला गेल्यास, ‘होय सर! मी या मताशी सहमत आहे’ किंवा असहमती दर्शविताना नम्रपणे आपली असहमती नोंदवावी. लक्षात ठेवा, मुलाखतीतील प्रश्नांची उत्तरे चूक किंवा बरोबर अशी नसतात. तेव्हा प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे उत्तर द्यावे. तुमची उत्तरे व्यवहार्य व तुमची स्वत:ची असावीत. त्यातून फाजील आत्मविश्वास दिसता कामा नये. उत्तरात धीटपणा असावा, पण अहंभाव किंवा अविचार असू नये.
विचारलेला प्रश्न नीट कळला नसेल तर नम्रपणे तसे सांगून अधिक तपशील विचारावा. असे केल्याने तुमचे मार्क्‍स कमी होत नाहीत, उलट तुमचा प्रामाणिकपणा दिसून येतो. कधी कधी विचारलेल्या प्रश्नाचे नेमके उत्तर उमेदवाराला ठाऊक नसते. अशा वेळी प्रश्नार्थक चेहऱ्याने हात हातावर चोळणे, वर पाहणे, डोके खाजवणे अशा कोणत्याही नकारात्मक भावमुद्रेचे प्रदर्शन करू नये. माहीत नसलेल्या उत्तराविषयी नम्रतापूर्वक मला याबाबत फारशी माहिती नाही, असे सांगावे.
आपण अनभिज्ञ असलेल्या विषयावर तर्क बांधून, ओढूनताणून उत्तर देण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. त्याऐवजी ‘मला याविषयी माहीत नाही,’ हे प्रांजळपणे कबूल केलेले उत्तम. कोणताही उमेदवार सर्वज्ञ नसतो, हे मुलाखत मंडळाला ठाऊक असते. त्यामुळे पारदर्शी असण्यातून उमेदवाराचा स्पष्टपणा व लवचीकता दिसून येते.
मुलाखत जशी ज्ञानाची परीक्षा आहे तशी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचीही परीक्षा आहे. चांगल्या उत्तराची स्तुती किंवा उत्तर न देता येणारी स्थिती तुम्ही कशी हाताळता, कशा पद्धतीने सामोरे जाता, ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा आहे. मुलाखत मंडळाकडून तुमच्या दृष्टीने चांगल्या असलेल्या उत्तराबाबत प्रतिक्रियेची अपेक्षा करू नका. तुमच्या चांगल्या-वाईट कुठल्याही उत्तराबाबतची तुमची मन:स्थिती तुमच्या देहबोलीतून सामोरी येऊ देऊ नका.
मुलाखतीदरम्यान आपल्या कामगिरीबाबत विचार करायला सुरुवात करू नये. मुलाखत सुरू असतानाच, तुमच्या दृष्टीने चांगली कामगिरी झाली असेल तर चांगले गुण मिळणार किंवा तुमच्या दृष्टीने वाईट कामगिरी झाली असेल तर कमी गुण मिळणार अशा विचारांमध्ये गुरफटून गेल्यास अशा विचारांचा आपल्याही नकळत आपल्या देहबोलीवर परिणाम होत असतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुलाखत सर्वसाधारणपणे २५ ते ३५ मिनिटे तर राज्य लोकसेवा आयोगाची मुलाखत २० ते ३० मिनिटे चालते. उमेदवाराच्या कामगिरीनुसार हा वेळ वाढतो किंवा कमीसुद्धा होऊ शकतो. अशा वेळी संयम ठेवावा. मनगटावरील घडय़ाळात वेळ पाहण्यासारखा आततायीपणा तर अजिबात करू नये.
मुलाखत पूर्ण झाल्यानंतर उमेदवार कक्षाबाहेर येण्याची वेळ येते. पण अशा वेळी मुलाखत मंडळाने उमेदवाराला ‘मुलाखत संपली, तुम्ही आता बाहेर जाऊ शकता,’ असे सांगितल्याशिवाय उमेदवाराने आपल्या आसनावरून उठू नये किंवा समोर ठेवलेली कागदपत्रांची फाइल आवरायला घेऊ नये. मुलाखत मंडळाकडून सांगितल्यानंतर शांतपणे, कागदपत्रांचा जास्त आवाज न होऊ देता फाइल घ्यावी व सहजतेने आसन सोडावे. खुर्चीवरून उठल्यानंतर खुर्ची पूर्ववत ठेवावी. व्यवस्थित उभे राहून मुलाखत मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांना प्रसन्नतापूर्वक अभिवादन करावे. धन्यवाद / थँक यू म्हणायला विसरू नये. मुलाखत कक्षातून बाहेर येताना चालण्याचा, दरवाजा उघडण्याचा आवाज येणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेर पडताना मागे वळून सदस्यांकडे पाहणे टाळावे. असे बारीकसारीक वर्तणुकीचे संकेत पाळले की मुलाखतीचा अनुभव चांगलाच ठरतो.


रेडियो वरील मुलाखतसंपादन करा

राजकिय मुलाखतसंपादन करा

गाजलेल्या मुलाखतीसंपादन करा

बेरोजगार युवक आणि कंपनी मालक यांच्यातील मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...