पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी...आपल्याच घरी हाल सोसते मराठी....
माझ्या मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
असे मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनीकेले आहे. तर सुरेश भट यांनी आपल्याकाव्यपंक्तीतून मराठीचा गोडवापुढीलप्रमाणे गायला आहे.
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
पण आज ह्याच मायबोलीची लेकरेतिच्यापासून दुरावत आहेत. आम्ही मराठीभाषिक आहोत असे अभिमानाने सांगणारेआज संख्येने फार मोजके आहेत. मराठीभाषेला जो मुलायम साज संत ज्ञानेश्वरांनीदिला, त्याच मराठी भाषेला स्वत:च्याचमातीत उपेक्षिताचे जिणे जगावे लागते आहेही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे नाईलाजानेम्हणावे वाटते की "पाहुणे जरी असंख्यपोसते मराठी, परी आपुल्याच घरी हालसोसते मराठी"
आज शहरातील अनेक उच्चशिक्षित (सोकॉल्ड) मराठी घरांतून मराठी अभावानेचबोललं जातं. याचं एक कारण असं असावंकी आपण मराठी बोललो तर चारचौघांतआपल्याला कमी लेखतील अशी भीती युवापिढीला असावी. मराठीऐवजी इंग्रजीबोलल्यास 'इम्प्रेशन' पडतं हा ही एक फोफावलेला गैरसमज आहे. आपल्याआईवर प्रेम करायला कुणी शिकवायलालागत नाही आणि आईवरील प्रेम हेकमीपणाचे लक्षणही मानले जात नाही मगमातृभाषेवर प्रेम करणे हा काय जागतिकगुन्हा आहे का? अनेक चांगल्या समजल्या जाणाऱ्याशाळांमधून मराठी भाषेविषयी फारशीआस्था आढळून येत नाही. मराठीलिहिताना होणाऱ्या व्याकरणाच्या चुकादाखवण्याबद्दल बरेच शिक्षक उदासीनअसतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधूनमराठी हा विषय सक्तीचा असल्याने मराठीभाषिक असलेली आणि नसलेली मुले योग्यमार्गदर्शनाअभावी भाषेचे लचके तोडतानादिसतात. ऱ्हस्व, दीर्घ,आकार,उकार,काना,मात्रा,वेलांट् या याभाषांतर्गत व्याकरणाच्या भानगडी इंग्रजीभाषेत नसल्याने मायमराठीपेक्षा मुलांनाइंग्रजी जवळची वाटू लागते. मराठीतूननिबंध लिहिणे म्हणजे शिक्षा असा मुलांचासमज होतो. मुळात या भाषेची महती, याभाषेचे सौंदर्य मुलांना पटवून देण्यात घरीपालक आणि शाळेत शिक्षक कमी पडतात.एखाद्या कथेचा अगर कवितेचा आस्वादघेणे तर लांबच पण साधे अंक, वाऱ, सणसुद्धा मराठीतून माहित नसावेत आणि तेहीमराठी घरांतील मुलांना ह्याला कायम्हणावे?
“हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्यामखमलीचे” किंवा “श्रावणमासी हर्षमानसी” किंवा “एक तुतारी द्या मजआणूनी” या काव्यांमधील सौंदर्याचे दर्शनआणि आनंदाची अनुभूती मुलांना कशीयेणार? कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, बालकवी,केशवसुत, केशवकुमार हे कधीतरी एखाद्याइयत्तेच्या पाठ्यपुस्तकातून डोकावतातएवढेच! एरवी या समस्त कवीजनांचा आणियुवा पिढीचा दुरदूरचाही संबंध नाही. व्हॉटइज श्रावण? असे विचारणारी मराठी मुलेआहेत. आता श्रावण म्हणजे काय माहितनाही, श्रावणातील निसर्ग कसा दिसतो तेमाहित नाही तर श्रावणावरील कविता कायकप्पाळ कळणार? सोमवार, मंगळवार म्हणजे इंग्रजीत कुठलाडे किंवा अठ्ठेचाळीस, एकोणपन्नास म्हणजेइंग्रजीत कुठला नंबर हे न समजणारी खूपमराठी मुले आहेत. 'यू नो, माय सन स्पीक्सओन्ली इंग्लिश' असं एक मराठी आई तिच्यामराठी मैत्रिणीला तोंडावर सांगून आपलाभाव वाढवत असते. हळूहळू घरातलं हे “अ-मराठी” कल्चर मुलांच्या चांगलंचअंगवळणी पडतं आणि मग मराठी वाचन,मराठी गाणी, मराठी गोष्टी, मराठी संवाद यागोष्टींची आणि या मुलांची कायमचीताटातूट होते. 'चांदोबा', 'किशोर' असंकाहीतरी वाचणारी मुलं 'डाऊन मार्केट'वाटायला लागतात. आजकाल बऱ्याचमराठी घरांत सातत्याने परदेशवाऱ्याकरणारी माणसे असतात. ती हे इंग्रजीचंवारं घरात खेळतं ठेवायला मदत करतात.
आपल्या भावना आपल्या मातृभाषेतूनव्यक्त करण्यातील महत्व अनेकांनासमजलेलंच नसतं. पाश्चात्य देशांतीलअनेक अभ्यासू, भारतात येथील संस्कृतीचा,परंपरांचा, भाषेचा, संत-साहित्याचाअभ्यास करण्यासाठी, त्यावर संशोधनकरण्यासाठी येत असतात पण आपल्याचलोकांना मात्र या भाषेचा, साहित्याचा गंधहीनसतो. टाळ-मृदुंगांच्या गजरात पंढरपूरलाजाणाऱ्या वारकऱ्याविषयी पाश्चात्यांनाकुतूहल असते. संत-साहित्यावर पी.एच.डी.करणाऱ्या एका परदेशी विदुषीने टी.व्ही.वरएकदा 'पसायदान' म्हटल्याचे मला आठवते.तसेच बी.ए. किंवा एम.ए. ची परीक्षा देतअसताना '३० मार्कांचे ज्ञानेश्वर, २० मार्कांचेतुकाराम आणि ४० मार्कांचे नाटककार मीतयार ठेवले आहेत' असे काही परीक्षार्थींचेमौलिक विचार अधीमधी कानावर पडतात.केवढा हा लाजिरवाणा विरोधाभास!
फाडफाड इंग्रजी बोलणारा माणूस तेवढाहुशार मग अस्खलित मराठी बोलणारामाणूस काय मठ्ठ असतो? भाषा कुठलीहीअसो, ती उत्तम बोलता यायला हवी, प्रत्येकभाषेची इज्जत करायला हवी याबद्दल दुमतनाही पण आपल्या आईला बाजूला सारूनदूरच्या मावशीला तिच्या जागी बसवण्याचाअट्टाहास का? जिथे आवश्यक आहे तिथे तीभाषा जरूर बोलली गेली पाहिजे. पण घरीताटावर बसल्यावर तरी 'भात' वाढ म्हणालकी 'राईसच' म्हणणार?
'माझ्या आईच्या हातच्या थालीपीठाची सरकश्या-कश्यालाही नाही' या वाक्याचाजसाच्या तसा इंग्रजी अनुवाद करूनदाखवावा असे आव्हान पु.ल. देशपांडेनीत्यांच्या पुस्तकातून दिले होते. तात्पर्य कायतर प्रत्येक भाषेची गोडी ही वेगळीच असते.'थंडीने गुलाब सुकत आहे' हे भाषांतरितवाक्य ती मजा आणू शकत नाही. प्रत्येकभाषेची नजाकत, नखरा, ऐट ही वेगळीचअसते. कुठलीही भाषा आवडणे, नआवडणे ही वैयक्तिक बाब जरी असली तरीमराठी मातीत जन्माला येऊन मराठी भाषेचेबोट सोडून देणे हे करंटेपणाचेच लक्षणआहे.
आज शहरातील अनेक उच्चशिक्षित (सोकॉल्ड) मराठी घरांतून मराठी अभावानेचबोललं जातं. याचं एक कारण असं असावंकी आपण मराठी बोललो तर चारचौघांतआपल्याला कमी लेखतील अशी भीती युवापिढीला असावी. मराठीऐवजी इंग्रजीबोलल्यास 'इम्प्रेशन' पडतं हा ही एक फोफावलेला गैरसमज आहे. आपल्याआईवर प्रेम करायला कुणी शिकवायलालागत नाही आणि आईवरील प्रेम हेकमीपणाचे लक्षणही मानले जात नाही मगमातृभाषेवर प्रेम करणे हा काय जागतिकगुन्हा आहे का? अनेक चांगल्या समजल्या जाणाऱ्याशाळांमधून मराठी भाषेविषयी फारशीआस्था आढळून येत नाही. मराठीलिहिताना होणाऱ्या व्याकरणाच्या चुकादाखवण्याबद्दल बरेच शिक्षक उदासीनअसतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधूनमराठी हा विषय सक्तीचा असल्याने मराठीभाषिक असलेली आणि नसलेली मुले योग्यमार्गदर्शनाअभावी भाषेचे लचके तोडतानादिसतात. ऱ्हस्व, दीर्घ,आकार,उकार,काना,मात्रा,वेलांट्
“हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्यामखमलीचे” किंवा “श्रावणमासी हर्षमानसी” किंवा “एक तुतारी द्या मजआणूनी” या काव्यांमधील सौंदर्याचे दर्शनआणि आनंदाची अनुभूती मुलांना कशीयेणार? कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, बालकवी,केशवसुत, केशवकुमार हे कधीतरी एखाद्याइयत्तेच्या पाठ्यपुस्तकातून डोकावतातएवढेच! एरवी या समस्त कवीजनांचा आणियुवा पिढीचा दुरदूरचाही संबंध नाही. व्हॉटइज श्रावण? असे विचारणारी मराठी मुलेआहेत. आता श्रावण म्हणजे काय माहितनाही, श्रावणातील निसर्ग कसा दिसतो तेमाहित नाही तर श्रावणावरील कविता कायकप्पाळ कळणार? सोमवार, मंगळवार म्हणजे इंग्रजीत कुठलाडे किंवा अठ्ठेचाळीस, एकोणपन्नास म्हणजेइंग्रजीत कुठला नंबर हे न समजणारी खूपमराठी मुले आहेत. 'यू नो, माय सन स्पीक्सओन्ली इंग्लिश' असं एक मराठी आई तिच्यामराठी मैत्रिणीला तोंडावर सांगून आपलाभाव वाढवत असते. हळूहळू घरातलं हे “अ-मराठी” कल्चर मुलांच्या चांगलंचअंगवळणी पडतं आणि मग मराठी वाचन,मराठी गाणी, मराठी गोष्टी, मराठी संवाद यागोष्टींची आणि या मुलांची कायमचीताटातूट होते. 'चांदोबा', 'किशोर' असंकाहीतरी वाचणारी मुलं 'डाऊन मार्केट'वाटायला लागतात. आजकाल बऱ्याचमराठी घरांत सातत्याने परदेशवाऱ्याकरणारी माणसे असतात. ती हे इंग्रजीचंवारं घरात खेळतं ठेवायला मदत करतात.
आपल्या भावना आपल्या मातृभाषेतूनव्यक्त करण्यातील महत्व अनेकांनासमजलेलंच नसतं. पाश्चात्य देशांतीलअनेक अभ्यासू, भारतात येथील संस्कृतीचा,परंपरांचा, भाषेचा, संत-साहित्याचाअभ्यास करण्यासाठी, त्यावर संशोधनकरण्यासाठी येत असतात पण आपल्याचलोकांना मात्र या भाषेचा, साहित्याचा गंधहीनसतो. टाळ-मृदुंगांच्या गजरात पंढरपूरलाजाणाऱ्या वारकऱ्याविषयी पाश्चात्यांनाकुतूहल असते. संत-साहित्यावर पी.एच.डी.करणाऱ्या एका परदेशी विदुषीने टी.व्ही.वरएकदा 'पसायदान' म्हटल्याचे मला आठवते.तसेच बी.ए. किंवा एम.ए. ची परीक्षा देतअसताना '३० मार्कांचे ज्ञानेश्वर, २० मार्कांचेतुकाराम आणि ४० मार्कांचे नाटककार मीतयार ठेवले आहेत' असे काही परीक्षार्थींचेमौलिक विचार अधीमधी कानावर पडतात.केवढा हा लाजिरवाणा विरोधाभास!
फाडफाड इंग्रजी बोलणारा माणूस तेवढाहुशार मग अस्खलित मराठी बोलणारामाणूस काय मठ्ठ असतो? भाषा कुठलीहीअसो, ती उत्तम बोलता यायला हवी, प्रत्येकभाषेची इज्जत करायला हवी याबद्दल दुमतनाही पण आपल्या आईला बाजूला सारूनदूरच्या मावशीला तिच्या जागी बसवण्याचाअट्टाहास का? जिथे आवश्यक आहे तिथे तीभाषा जरूर बोलली गेली पाहिजे. पण घरीताटावर बसल्यावर तरी 'भात' वाढ म्हणालकी 'राईसच' म्हणणार?
'माझ्या आईच्या हातच्या थालीपीठाची सरकश्या-कश्यालाही नाही' या वाक्याचाजसाच्या तसा इंग्रजी अनुवाद करूनदाखवावा असे आव्हान पु.ल. देशपांडेनीत्यांच्या पुस्तकातून दिले होते. तात्पर्य कायतर प्रत्येक भाषेची गोडी ही वेगळीच असते.'थंडीने गुलाब सुकत आहे' हे भाषांतरितवाक्य ती मजा आणू शकत नाही. प्रत्येकभाषेची नजाकत, नखरा, ऐट ही वेगळीचअसते. कुठलीही भाषा आवडणे, नआवडणे ही वैयक्तिक बाब जरी असली तरीमराठी मातीत जन्माला येऊन मराठी भाषेचेबोट सोडून देणे हे करंटेपणाचेच लक्षणआहे.
या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला गतवैभवप्राप्त करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर पुन्हाएकदा जन्माला यावेत असे मला मनोमनवाटते.
1 टिप्पणी:
फारच छान
टिप्पणी पोस्ट करा