बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

ना. धों. महानोर यांची सूर्य नारायणा कविता

सूर्य नारायणा नित्य नेमाने उगवा नामदेव धोंडो महानोर (जन्म : पळसखेड-कन्नड तालुका-औरंगाबाद जिल्हा, १६ सप्टेंबर १९४२) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत.

ना.धों. महानोरhttps://youtu.be/9AfFRyv87hU

महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे.

ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांच्या ‘रानातल्या कवितां'ना खरा मातीचा गंध येतो.

 • झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना गायल्या गेल्या त्या शशांक पोवार याने संगीतबद्ध केल्या होत्या.
 • देवकी पंडित यांनी महानोरांनी लिहिलेली काही चित्रपट गीते गायली आहेत, ती अशी :-
 • जाळीमधी झोंबतोया गारवा (कवी -ना.धों. महानोर, संगीत - आनंद मोडक, चित्रपट - एक होता विदूषक, सहगायक - रवींद्र साठे)
 • तुम्ही जाऊ नका हो रामा (कवी - ना.धों. महानोर, संगीत - आनंद मोडक, चित्रपट - एक होता विदूषक, सहगायक - आशा भोसले)
 • सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा (कवी - ना.धों. महानोर, संगीत - आनंद मोडक, चित्रपट - एक होता विदूषक)
 • श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' ही आशा भोसले यांनी 'एक होता विदूषक' या चित्रपटासाठी गायली आहे.
 • डाॅ. शुभा साठे यांनी ना.धों. महानोरांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
 • संगीत दिगदर्शक हर्षित अभिराज यांनी ना.धों. महानोर यांच्या 'दूरच्या रानात केळीच्या बनात' या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध करून आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली कोती..

जीवनसंपादन करा

महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झालेसंदर्भ हवा ]. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतलेसंदर्भ हवा ]. मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.

प्रकाशित साहित्यसंपादन करा

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
अजिंठा (कवितासंग्रह)दीर्घ कवितापॉप्युलर प्रकाशन१९८४
कापूस खोडवा)शेतीविषयक
गंगा वाहू दे निर्मळकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
गपसपकथासंग्रहसमकालीन प्रकाशन
गावातल्या गोष्टीकथासंग्रहसमकालीन प्रकाशन
जगाला प्रेम अर्पावेकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
त्या आठवणींचा झोकासाकेत प्रकाशन
दिवेलागणीची वेळकविता संग्रहसाकेत प्रकाशन
पळसखेडची गाणीलोकगीतेपॉप्युलर प्रकाशन
पक्षांचे लक्ष थवेपॉप्युलर प्रकाशन
पानझडपॉप्युलर प्रकाशन
पावसाळी कविताकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
पु. ल. देशपांडे आणि मी]]समकालीन प्रकाशन
यशवंतराव चव्हाणसाकेत प्रकाशन
यशवंतराव चव्हाण आणि मीव्यक्तिचित्रणपरसमकालीन प्रकाशन
या शेताने लळा लाविलासमकालीन प्रकाशन
रानातल्या कविताकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
शरद पवार आणि मीसाकेत प्रकाशन
शेती, आत्मनाश व संजीवनशेतीविषयकसाकेत प्रकाशन

नामदेव धोंडो महानोर हे गीतकार असलेले चित्रपटसंपादन करा

चित्रपटवर्ष (इ.स.)
अबोलीइ.स.१९९५
एक होता विदूषकइ.स.१९९२
जैत रे जैतइ.स.१९७७
दूरच्या रानात केळीच्या बनात (आल्बम)इ.स.२०१४?
दोघीइ.स.१९९५
मुक्ताइ.स.१९९४
सर्जाइ.स.१९८७

राजकीय कारकीर्दसंपादन करा

महानोर हे १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे नियुक्त सदस्य झाले.

--ना.धों. महानोर यांच्यासंबंधी आणि त्यांच्या साहित्यावरील पुस्तके==

 • ना. धो. महानोरांची काव्यसृष्टी (सोमनाथ दडस)
 • ना. धों. महानोरांची प्रतिमासृष्टी आणि संपादने (सोमनाथ दडस)

पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा

 • भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार, इ.स.१९९१
 • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९
 • साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड'
 • विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२०१३)
 • महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७)
 • अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार.
 • जळगाव येथील भॅंवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन सर्वोत्कृष्ट गद्य लेखनासाठी ना.धों. महानोर पुरस्कार देते. १९१६-१७चा हा पुरस्कार किरण गुरव यांना मिळाला होता.
 • सदानंद देशमुख यांनाही निसर्गकवी ना.धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्कार (जळगाव) मिळाला होता.
 • इ.स. १९९३ सालापासून सेवा संघाच्या माध्यमातून सु.ल. गद्रे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साहित्य, कला आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत पुरस्कार ठेवले आहेत. ना.धों. महानोर यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.
 • अनुराधा पाटील यांना 'दिवसेंदिवस' ला बहिणाबाई प्रतिष्ठान, पुणे या संस्थेकडून १९९३ साली उत्कृष्ट काव्यलेखनासाठी कवी ना.धों. महानोर काव्य पुरस्कार मिळाला होता.
 • रणधीर शिंदे यांनाही २०१४ साली जालना येथे ना.धों. महानोर पुरस्कार मिळाला होता.
 • औदुंबर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
 • प्रकाश होळकर यांनी 'रानगंधाचे गारूड' नावाचा ना.धों.महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ लिहिला आहे.
 • यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील फलटण या गावी, २५ ते २७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी यशवंतराव चव्हाण स्मृति साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे व फलटण शाखा आणि सातारा जिल्हा परिषद यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी ना.धों. महानोर होते.
 • भालचंद्र वनाजी नेमाडे यांना ’देखणी’साठी १९९२ साली ना.धों. महानोर पुरस्कार मिळाला होता.
 • मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
 • १ले जलसाहित्य संमेलन नागपूरमध्ये २००३मध्ये झाले होते . संमेलनाध्यक्ष - श्री. ना.धों. महानोर होते. हे संमेलन नागपूरच्या महिला पाणी मंचाच्या सहकार्याने पार पडले होते.
 • नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबार येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष रानकवी ना. धों. महानोर होते.
 • यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईचा ३ रा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार २०१५


सूर्यनारायणा नित्‌ नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा

ओंजळीनं भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची

आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शरद baviskar- भुरा

भूरा