गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

मुलगी- कविता

 मुलगी काय असते? 

चैत्रातील कवळी पालवी असते

 लेकराचं मन वाचणारी माऊली असते

 मुलगी अंगणातील तुळस असते

 प्रेरणा,चेतना मनमंदिराचा कळस असते मुलगी बापाचं अंत:करण असते 

मुलगी कवीचे सृजन असते

मुलगी सडा- सुगंधी सारवण रांगोळी ठिपकेदाट 

मुलगी असते सायंकाळ आणि पहाट 

मुलगी असते निरंजन घरातील 

सतत सर्वांसाठी तेवणारी 

मुलगी असते आईचा पांग

सुवासिनी स्त्रीचा सिंदूर भांग

मुलगी असते संस्कार, आनंद

बापाची शान अन घरीदारी मान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लेखन कौशल्य

Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...