बुधवार, १३ जानेवारी, २०२१

संत बसवेश्वर

 बसवेश्र्वर : (११३१-६७). वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी एक महान विभूती. कर्नाटक ही त्याची कर्मभूमी. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्-मय, राजकारण इ. क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे.

बसवेश्र्वर
बसवेश्र्वर

त्यांचा जन्म बागेवाडी (जि. विजापूर) येथे एका शैव ब्राह्मण कुळात झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. दरसाल त्याच दिवशी बसवजयंती साजरी केली जाते. त्यांच्या आईचे नाव मादलांबिके व वडिलांचे मादिराज. लिंगायत लोक बसवेश्र्वरांना शिववाहन नंदीचा (काही वेळा स्वतः शिवाचाही) अवतार मानतात. बसव (सं. वृषभ  = बैल) या नावावरूनही हे सूचित होते. वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून त्यांनी मुंज करून घ्यावयाचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कूडलसंगम (कन्नड — कूडल = संगम) हे स्थान कृष्णा व मलप्रभा यांच्या संगमावर आहे. त्यांना लिंगदीक्षा कोणी दिली, याविषयी विद्वानांत मतभेद असून संगमेश्र्वर, जातवेदिमुनी इत्यादींची नावे या संदर्भात सांगितली जातात. जातवेदिमुनींनाच ईशान्य गुरू असेही म्हटलेले असून तेच कूडलसंगम या विद्याक्षेत्राचे स्थानपती होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्र्वरांचे अध्ययन झाले, असे दिसते. अक्कनागम्मा ही त्यांची वडील बहीण. त्यांना देवराज मुनिप नावाचा थोरला भाऊ असल्याचाही उल्लेख आढळतो. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञाने इत्यादींचा अभ्यास केला. तसेच येथे त्यांना संतसहवास मिळाल्यामुळे व त्यांनी कूडलसंगमेश्र्वराची उत्कट भक्ती केल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ झाले. कूडलसंगम येथून ते मंगळवाड (सध्याचे मंगळवेढे,, जि. सोलापूर) येथे बिज्जल नावाच्या महामंडलेश्र्वराकडे गेले, असे, काही अभ्यासक मानतात. सांप्रदायिक पुराणांतून मात्र मंगळवाड या गावाचा निर्देश  वगळलेला  असून  ते  कल्याणसा  (सध्या बसवकल्याण, जि. बीदर) गेल्याचे म्हटले आहे. बिज्जल हा पुढे राजा बनला. बसवेश्र्वरांनी त्याच्याकडे कर्णिकाच्या (कारकुनाच्या) नोकरीपासून प्रारंभ केला व पुढे ते कोषागार-मंत्री बनले. ते बिज्जलाचे प्रधान मंत्री होते की नाही, याविषयी मतभेद आढळतात. त्यांचा मामा बलदेव हा बिज्जलाचा मंत्री होता. गंगांबिके ही बलदेवाची मुलगी व बसवेश्र्वरांची पत्नी होती. त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नीलांबिका नावाविषयी मतभेद आढळतात. बालसंगय्य हे त्यांच्या मुलाचे नाव होते, असाही उल्लेख आढळतो. कल्याण येथे त्यांनी धर्मसुधारणेचे कार्य केले त्यांना यज्ञयागांतील पशुहत्या, वर्णभेद, वर्गभेद व जातीभेद मान्य नव्हते त्यामुळे सनातनी लोकांनी त्यांच्याविषयी बिज्जलाचे मन कलुषित केले. शेवटी बिज्जलाचे सैन्य वबसवेश्र्वरांचे अनुयायी यांच्यात झगडा सुरू झाला. तेव्हा या हिंसा-चाराला कंटाळून ते कूडलसंगम येथे गेले व त्यांनी तेथे समाधी घेतली. कूडलसंगम येथे त्यांची समाधी आहे. दरवर्षी श्रावण शु. प्रति- पदेला त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

बसवेश्र्वरांचा उदय होण्यापूर्वी कर्नाटकात हिंदू, जैन, बैद्ध इ. धर्म व कापालिक, कालामुख, शाक्त इ. पंथ प्रचलित होते. परंतु ही संयुक्त धर्मपरंपरा भ्रष्ट व अवनत अवस्थेतच होती. या पार्श्र्वभूमीवर बसवेश्र्वरांनी शिव हा एकमेव ईश्र्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला. त्यांच्या उत्कट शिवभक्तीमुळे त्यांना भक्तिभांडारी असे नाव प्राप्त झाले. ते कूडलसंगम येथील संगमेश्र्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ‘ऊँ नमः शिवाय’ हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती.


बसवेश्र्वर हे एक समर्थ योगी असल्यामुळे त्यांना ईश्र्वरी साक्षात्कार झाल्याचे व त्यांनी काही चमत्कार केल्याचेही उल्लेख आढळतात. उदा., पूर आलेला त्यांना कृष्णेने वाट करून दिली, त्यांनी बिज्जलाला गुप्त खजिना दाखविला, धान्यकणांचे रत्नांमध्ये रूपांतर केले इ. कथा सांगितल्या जातात. त्यांच्याकडे चोरी करण्यासाठी व दरोडे घालण्यासाठी आलेले लोकही त्यांचे शिष्य बनले, यावरून त्यांचा प्रभाव ध्यानात येतो.

बसवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. बसवेश्र्वरांनी धर्मप्रसारासाठी संन्यास घेतला नाही, भाष्ये लिहिली नाहीत वा प्रवासही केला नाही परंतु मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. या मंटपातील शून्यपीठाचे अध्यक्षपद ⇨अल्लमप्रभू (बारावे शतक) यांना देण्यात आले होते. येथे होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून बसवेश्र्वरांनी वेगवेगळ्या जातिजमातींच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार-स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली.

पारंपारिक भारतीय समाजातील वर्णजातिमूलक उच्चनीचता व विषमता यांची प्रखर जाणीव बसवेश्र्वरांना झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. परिणामतः त्यांच्याभोवती सर्व वर्णातील व जातींतील अनुयायी जमा झाले. आंतरजातीय रोटीव्यवहार व बोटीव्यवहार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. उदा., त्यांच्या अनुयायांमध्ये मधुवय्या नावाचा ब्राह्मण व हरळय्या नावाचा चांभार यांचा अंतर्भाव होता. त्यांनी मधुवय्याच्या मुलीचे हरळय्याच्या मुलाशी लग्न लावून दिले. त्यांनी शिवनागमय्या व ढोर कक्कय्य या अस्पृश्यांच्या घरी जाऊन भोजन केले होते. बाराव्या शतकात बसवेश्र्वरांनी सुरू केलेले हे कार्य निश्र्चित क्रांतिकारक होते.

 त्यांनी बालविवाहाला विरोध केला तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. सर्व मानव समान आहेत, याचा अर्थ स्त्री व पुरूष हेही समान आहेत, असे त्यांचे मत होते. त्यांच्या अनुभवमंटपातील चर्चेत पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियाही भाग घेत.

अक्कमहादेवी (बारावे शतक), सत्यक्का, नागम्मा यांच्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते. वीरशैव धर्मात स्त्री व पुरूष या दोघांनाही लिंगदीक्षा दिली जात होती. पुरूषभक्तांप्रमाणेच स्त्रीभक्तांनीही वचनसाहित्य निर्माण केले असून त्यात तीस-चाळीस कवयित्रींची वचने आढळतात.

बसवेश्र्वरांनी स्वतःचा उपनयन-संस्कार करून घ्यावयाचे नाकारले, यावरून बालपणापासूनच त्यांचा भावहीन कर्मकांडाला विरोध असल्याचे दिसून येते. भव्य मंदिरे बांधण्यावर खर्च करू नये, तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही यांसारख्या मतांवरूनही त्यांनी कृत्रिम कर्मकांडाला विरोध केल्याचे स्पष्ट होते.

आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले आणि तेथे योग्य व्यक्तींची नियुक्ती केली. काश्मीरपासून केरळपर्यंतच्या, राजापासून रंकापर्यंतच्या आणि ब्राह्मणापासून अस्पृश्यापर्यतच्या अनुयायांचे एक मोहोळच त्यांच्याभोवती जमले होते, यावरून त्यांच्या समर्थ संघटनशक्तीची कल्पना येऊ शकते.

शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे, अशी घोषणा  करणारा ‘कायकवे  कैलास’ हा  बसवेश्र्वरांनी  मांडलेला  एक  महान  सिद्धांत  आहे.  कोणत्याही  प्रकारचे  शारीरिक  श्रम  हे हीन दर्जाचे नाहीत, असे  सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या श्रमावरच आपली उपजीविका चालवावी या बाबतीत जंगमांचाही अपवाद करू नये, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितल्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानात भिक्षावृत्तीला वाव राहिला नाही. परंतु त्यांनी कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. मोक्षासाठी अरण्यात पलायन करण्याची गरज नाही, असे हा सिद्धांत मानतो. श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी मांडल्यामुळे  बसवेश्र्वरांची  वृत्ती  समाजवादी  होती, असे  काही अभ्यासक मानतात.  बसवेश्र्वरांच्या  उपदेशामुळे  वेगवेगळ्या  व्यवसायांना, विशेषतः  ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन  मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला. उदा., त्यांच्या अनुभवमंटपात वेगवेगळ्या जातींचे संत जमत असत. ब्राह्मण मधुवय्या, चांभार हरवळ्या, ढोर कक्कय्य, नावाडी चौंड्या, सुतार बसप्पा, मांग चन्नया, न्हावी आप्पाण्णा, रणशिंगधारी ढक्कद वोमण्णा, सोनार किन्नरी ब्रह्मय्या, गुराखी रामण्णा, दोरखंड करणारा चंद्या, पारधी संगय्या इत्यादींचा त्या संतांमध्ये अंतर्भाव होतो.


बसवेश्र्वरांची समाधी, कूडलसंगम (जि. विजापूर).
बसवेश्र्वरांची समाधी, कूडलसंगम (जि. विजापूर).

आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचावेत म्हणून त्यांनी संस्कृतऐवजी कन्नड भाषेतून आपला उपदेश केला. त्यासाठी त्यांनी आधीच प्रचलित असलेल्या वचननामक साहित्यप्रकाराचा अवलंब केला. शैलीदार, प्रभावी व अंतःकरणाला भिडणारा असा हा साहित्यप्रकार असल्यामुळे त्याला वचनभेद, वचनशास्त्र इ. नावे प्राप्त झाली आहेत. कन्नड साहित्याच्या क्षेत्रात बसवेश्र्वरांचे योगदान म्हणूनच अंत्यत महत्त्वाचे ठरले. बसवेश्र्वरांच्या पट्स्थलवचन, कालज्ञान, मंत्रगौप्य, शिखारत्नवचन या ग्रंथांना श्रेष्ठ धर्मग्रंथांचे अमरत्व कन्नडमध्ये प्राप्त झालेले आहे.

कांचीचे शंकराराध्य (अठरावे शतक) यांनी संस्कृतमध्ये बसवपुराण नवाचा ग्रंथ लिहिला आहे. महाभारतकार व्यासांच्या नावावर असलेला परंतु चौदाव्या शतकानंतर दुसऱ्याच कोणी तरी लिहिलेला बसवपुराण नावाचा आणखी एक संस्कृत ग्रंथ आढळतो. हा ग्रंथ करिबसवशास्त्री यांनी लिहिला असे म्हणतात. तमिळमध्ये बसवपुराण (सु. सतरावे शतक), प्रमुलिंग लीले (मराठी अनु. कविब्रह्मदासकृत लीलाविश्र्वंयभर) आणि बसवपुराणपट्कम अशा तीन ग्रंथांतून बसवेश्र्वरांचे चरित्र आढळते. ⇨हरिहर (सु. ११८०-१२२०) नावाच्या कवीने कन्नडमध्ये ⇨बसवराजदेवररगळे या नावाने त्यांचे चरित्र लिहिले आहे. तसेच ⇨पाल्कुरिकी सोमनाथ (बसवेश्र्वरांना समकालीन) यांनी तेलुगूमध्ये बसवपुराण लिहिले असून भीमकवी यांनी त्याचे कन्नडमध्ये भाषांतर केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी इ. भाषातूनही बसवेश्र्वरांची चरित्रे लिहिण्यात आली आहेत. बसवेश्र्वर जयंतीच्या दिलशी बसव वागेवाडी व कूडलसंगम, बसवकल्याण, उळवी (जि. कारवार) इ. ठिकाणी यात्रा भरतात. बसवेश्र्वरांच्या नावांनी चालणारी ग्रंथालये, शिक्षणसंस्था, बँका, प्रकाशने इत्यादींच्या रूपाने त्यांची अनेक स्मारके करण्यात आली आहेत.

भारतातील मध्ययुगीन धार्मिक प्रबोधनाच्या चळवळीत बसवेश्र्वरांचे कार्य अधिक क्रांतिकारक स्वरूपाचे होते व त्यामागे एक अलौकिक द्रष्टेपणा होता, हे सर्वमान्य होण्यासारखे आहे.

पहा : वीरशैव पंथ.

संदर्भ:    १. Hardekar, Manjappa : Trans, Mailara Rao. A. Basava : The Dimension of Universal Man, Dharwar, 1966.

            २. Jatti, B. D. : Trans. Sundarraj Theodore, A. &amp Hakari, Devendra Kumar,Thus Spoke Basava, Bangalore, 1966.

            ३. Wodeyar, S. S. Ed. Sri Basavesvara : Eighth Centenary Commemoration Volume, Government of Mysore, Bangalore, 1967.

            ४. अरळी, श्रीकांत, लिंगतत्त्वदर्पण और बसव, कोल्हापूर, १९६६. 

            ५. कोठावळे, कुमार घोंडो गंगाधर, महात्मा बसवेश्र्वर, बेळगाव१९६६.

            ६. बसवण्णा मराठी अनु. लिगाडे, जयदेवीताई, बसव- दर्शन, सोलापूर, १९५४.

            ७. मोगलेवार, सुधाककर, मराठी ओवीबद्ध बसवपुराण, नागपूर, १९७५.

            ८. सार्दळ, शं. धों. संपा. कवि ब्रह्मदासकृत लीलाविश्र्वंभर, बेळगाव, १९६४.

 

पाटील, म. पु. संकनवाडे-पाटील, शि. वा.

वचन



" हा कोणाचा , हा कोणाचा , हा कोणाचा असे नच म्हणवावे | हा आमुचा , हा आमुचा , हा आमुचा असेचि वदवावे | कुडलसंगमदेवा तुमच्या घरचा पुत्र म्हणावे !" 

- महात्मा बसवण्णा .



" एक कोळी पाण्यात जाळे टाकुनी अनेक प्राण्यांधा अन्न म्हणुनी खायी , त्याचे एक अपत्य मरता क्शणी हंबरडा फोडतो , हा हँबरडा कशासाठी ? कोळ्याच्या हंबरड्याला हे जग हसे म्हणूनी , चन्नमल्लिकार्जुनाचा भक्त होऊनी जीव हिंसा करणारा ढोर-मांग समजावे "

- महान शिवशरणी अक्कमहादेवी.

" शील बाळगणारे सारे शीलवंत आहेत , भाषा पंडीत सारे भाषावंत आहेत , व्रत ठेवणारे सारे व्रतवंत आहेत , सत्यवान सारे सत्यवंत आहेत , परंतु कूडलचन्नसंगमदेवय्या संगन बसवण्णा एक मात्र लिंगवंत आहेत."

- चन्नबसवण्णा .

" शिळेतिल अग्निपरी , जळातील प्रतिबिंबापरी , बीजातिल व्रक्षापरी , शब्दातिल नि:शब्दापरी , गुहेश्वरा सकळ स्रृष्टिशी तव शरण संबंध . "

- शुन्यपिठाधीश अल्लमप्रभू .


" एक पायली सोडुन दोन पायली तांदूळ आणले , हे तुमच्या मनाने की बसवण्णांच्या तर्कचिंतनाने ? लोभ हा राजाला असतो शिवभक्ताला असतो का ? एवढ्या तांदळाची आशा तुम्हाला का झाली ? ......... हा मारय्याप्रिय अमलेश्वरलिंगाला न आवडणारा नैवेद्य . " ( रोजपेक्षा जास्त तांदुळ आणि कमी वेळात वेचुन आणल्यामुळे लक्कम्मा आपले पती मारय्या यांना सवाल करतात .)

- आयदक्की लक्कम्मा .


" सधन बांधती देवालय , देवा गरिब मी काय करु || देहच माझे देवालय , देवळाचे खांब माझे पाय || मस्तक हे सुवर्णकलश , स्थावर पावे नाश || जंगम हे अविनाश , जाणा कुडलसंगमेशा ||"

- महात्मा बसवण्णा .


" बसव माझा सहोदर साथी , बसवाला प्रेमे कुरुवाळजे मी || बसवा संगनबसवदेवा जयतु , बसवाला मला भेदभाव नाही || बसवाची माझी जुळली रास , बसवप्रिय चन्नसंगय्यामध्ये , बसवाला जन्म न दिलेली बाळंतीण मी , बसवा बसवा || "

- लिंगायत धर्मसंकल्पिका माता नागाई .



" लोकांचे दोष , तुम्ही का सुधारु पाहता ? आपआपली तनु आधी शांत करा | आपापले मन आधी शांत करा | शेजार्याशी पाहूनि रडता कशाला | कुडलसंगमदेव भाळणार नाही | अशांचे केवळ रडणे पाहता |"

- महात्मा बसवण्णा .


" दिसेल त्याला पति म्हणणार्या कुलटेला , पतिव्रता ,सज्जन कसे म्हणता येईल ? लिंगप्रसाद सेवन करुन अन्य देवतांची , स्तुती करणार्या दांभिकासाठी आमच्या कुडलसंगमदेवाने नरक निर्माण केला आहे | "

- महात्मा बसवण्णा .


" कथनी क्या, बिन करनी के ?

करनी क्या, बिन कथनी के ?

कथनी और करनी में

संगती जो जोड़े

शिव-स्वरूपी ऐसे शरणों

के चरणों पर माथा टेके

तर गया मैं, हे बसवप्रिय

कुडलचन्न बसवण्णा "

- शरण हडपद अप्पण्णा.


"ब्राह्मणों की कथनी-करनी में सामंजस्य कहाँ?

उनका मार्ग अलग, उनके शास्त्र का मार्ग अलग,

ब्राह्मण अछुत कुल में पैदा होते है, अभक्ष्य खाते है,

इसका यही प्रमाण है, कूडलसंगमदेवा (समतास्वरूपी तत्त्व)!"

 - महात्मा बसवण्णा .


 "षटस्थल ज्ञान हाची महायोग ! भक्ताचा अनुराग सर्वकाळ !!

शिवावीन अन्य दुजा नाही देव ! भक्तस्थळी भाव हेची शुद्ध !!

महेश्वरा ऐसा असे दुजे स्थळ ! देखिली सकळ शिवरूपी !!

लिंगार्पित सर्व प्रसादची होती ! हेची दृढ चित्ती प्रसादिका !!

लिंग तोची प्राण प्राण तोची लिंग ! असे तो अभंग प्राणलिंग !!

त्रिकाळ पूजन ज्ञानलिंगाठायी ! शरणस्थळी पाही भक्त तैसा !!

सहावे स्थळ ऐक्यभावे श्रेष्ठ ! शिवरूपी दृष्टलीरे शेवा !!

म्हणे मन्मथ बसवभक्तादिका ! सर्वश्रेष्ठ देखा षटस्थल!!"

- लिंगायत शरण मन्मथ माउली .


" सर्व धर्मासी कोण जो धनी ! ज्ञान विज्ञान वर्ते जयापासोनी !!"

अशा गुरुची कल्पना मन्मथ माउली यांनी केली होती.

" सांडोनिया लिंगार्चना ! जो करी अन्य देवता पूजन !

तो शिवभक्त नोव्हे, त्याचिया वदना ! अवलोकू नये !!"

" अमान्य करोनी हृदयीचे लिंग ! जो धरी स्थावरी भक्तीअंग !

तो शिवभक्त नोव्हे केवळ सोंग ! बहुरुपियाचे !! 

- लिंगायत शरण मन्मथ माउली .


" एक कोळी पाण्यात जाळे टाकुनी अनेक प्राण्यांधा अन्न म्हणुनी खायी , त्याचे एक अपत्य मरता क्शणी हंबरडा फोडतो , हा हँबरडा कशासाठी ? कोळ्याच्या हंबरड्याला हे जग हसे म्हणूनी , चन्नमल्लिकार्जुनाचा भक्त होऊनी जीव हिंसा करणारा ढोर-मांग समजावे "

 - महान शिवशरणी अक्कमहादेवी.

 

" बसव माझा सहोदर साथी , बसवाला प्रेमे कुरुवाळजे मी || बसवा संगनबसवदेवा जयतु , बसवाला मला भेदभाव नाही || बसवाची माझी जुळली रास , बसवप्रिय चन्नसंगय्यामध्ये , बसवाला जन्म न दिलेली बाळंतीण मी , बसवा बसवा || "

- लिंगायत धर्मसंकल्पिका माता नागाई .


" अल्लयांची वचने 160 कोटी | बसवण्णांची वचने 4 लक्ष 36 हजार || निलम्माची वचन 1 लक्ष 11 हजार | गंगाबिकेची वचने 1 लक्ष 8000 || अक्कनागम्मांची वचने 3 लक्ष 96 हजार | माडिवाळय्यांची वचने 3 लक्ष 300 || हडपद अप्पण्णांची वचने 11 हजार | मरूळसिद्धांची वचन 68 हजार ||"

- सिद्धरामेश्वर .


" लोकांचे दोष , तुम्ही का सुधारु पाहता ? आपआपली तनु आधी शांत करा | आपापले मन आधी शांत करा | शेजार्याशी पाहूनि रडता कशाला | कुडलसंगमदेव भाळणार नाही | अशांचे केवळ रडणे पाहता |"

 - महात्मा बसवण्णा .


" दिसेल त्याला पति म्हणणार्या कुलटेला , पतिव्रता ,सज्जन कसे म्हणता येईल ? लिंगप्रसाद सेवन करुन अन्य देवतांची , स्तुती करणार्या दांभिकासाठी आमच्या कुडलसंगमदेवाने नरक निर्माण केला आहे | "

 - महात्मा बसवण्णा .


"वेद , शास्त्र , आगम , पूराण । सत्व नाहि त्यात खास ।। .... जैसे कांडल्यावरि धान्य । पहा उरतो मागे भुसा ।।"

 - महान शिवशरणी अक्कमहादेवी.


"वेद म्हणजे पढत गप्पा । शास्त्र म्हणजे बाजाराची उठाठेव ।। ...... पुराण म्हणजे पुंडाच्या गोष्टी । तर्क म्हणजे ठगरांची टक्कर ।।"

 - शुन्यपिठाधीश अल्लमप्रभू .


" शत्रुच्या ललकारीने तलवार उचलतो , युद्धाला तयार होतो . गुरुचे नाव घेऊन तलवारीचा घाव घालतो , हरलो तर आपले नाव सांगणार नाही . मला तुम्ही पारखून घ्यावे कूडलसंगमदेवा. "

 - महात्मा बसवण्णा .


"ज्याने आपल्या घामाने ही काळी माती भिजवली , कष्ट उपसलेत पोटासाठी आयुष्यभर , अखंड श्रमाने ज्याने आपला देह राबविला , ज्याने आपले तन, मन, श्रमपूर्वक झिजवले , श्रमाची पूजा करुन ज्याने शिवाची पूजा केली , श्रमिकांच्या झोपडीला जो कैलास मानतो . ज्याची कथनी तशी करणी असे कूडलसंगमदेवा , तोची जगदगुरु झाला ।।"

 - महात्मा बसवण्णा .


"जाळे पसरुन , दाणे टाकून , चिमण्यांना फसविणार्या चोरासम वाङ्गचातुर्य शिकून , संस्क्रुत भाषेचे जाळे पसरुन , हे कसले बोलणे ? हे शाब्दिक जाल होय , मनाचे वैरी मोरेश्वर ! "

-


"दगडी नागाला दुध पाजती , जिता पाहता मारती त्या ... भुकेल्या जंगमा हाकलुनी देती , लिंगा दाखविती नैवेद्य ." - महात्मा बसवण्णा .


"मी विषारी सापाला घाबरत नाहि , मी अग्नीच्या धगधगत्या ज्वालांना घाबरत नाही , मी तलवारीच्या धारेला घाबरत नाही , पण मी परधन , परस्त्रीच्या स्पर्शाला घाबरतो कुडलसंगमदेवा ।" - महात्मा बसवण्णा .


"करू नको चोरी, करू नको ह्त्या|

नको रागाऊ कधी, बोलू नको मिथ्या||

अन्यांची कधी करू नको घृणा|

नको करू कधी कोणाची मानखंडना||

करू नको कधी आत्मप्रशंसा|

हीच अन्तरंगशुध्दी, हीच बहिरंगशुध्दी||

कूडलसंगमदेवास (समतातत्वास) प्रसन्ना करण्याची हीच रिती||" - महात्मा बसवण्णा .


"न्यान से अन्यान दूर होता है,

ज्योतिसे अन्धकार दूर होता है,

सत्य से असत्य दूर होता है,

पारस से लोहत्व दूर होता है,

आपके शरनो (प्रशिक्षित कार्यकर्ता) के अनुभाव से

मेरा भव (ब्राह्मणों का धार्मिक डर) छुट गया, कूडलसंगमदेव (समतातत्व) "

 - महात्मा बसवण्णा .


" वेद, शाश्त्र, धर्म जो चाहे कहे,

मैं उन्हें अपना नहीं मानूंगा

अपने होते तो यन्य में क्यों सहभागी होते?

वे अपने नहीं, आपकी शपथ, कूडलसंगमदेवा (समतास्वरूपी निर्माता)!"

- महात्मा बसवण्णा .


"वेद पर खड्ग-प्रहार करूंगा, शाश्त्र को बेडी पहनाउंगा |

तर्क की पीठ पर चाबुक जमाउंगा, आगम की नाक काटून्गा ||

मातंग चन्नय्या का लाडला पुत्र हूँ मै, कूडलसंगमदेवा (समतातत्व स्वरूपी) !"

- महात्मा बसवण्णा .


"वेद थर थारा उठे, शाश्त्र मार्ग से हट गए,

तर्क मौनी हो गए, आगम सरक गए,

यह आपके चन्नाय्या के घर प्रसाद सेवन का प्रताप है,

कूडलसंगमदेवा(समता स्वरूपी तत्त्व)!"

 - महात्मा बसवण्णा .


"मैंने आपके नित्य भंडार में,

एक लाख छिईन्नव हजार वचन अर्पित किए|

यह वैसे हुआ, जैसे लोमड़ी पर्वत को देखकर चिकती है,

हे मेरे प्रभु! हे मेरे प्रभु!! कूडलसंगमदेवा (समतातत्व स्वरूपी निर्मिक)||"

- महात्मा बसवण्णा .


"ब्राह्मणों की कथनी-करनी में सामंजस्य कहाँ?

उनका मार्ग अलग, उनके शास्त्र का मार्ग अलग,

ब्राह्मण अछुत कुल में पैदा होते है, अभक्ष्य खाते है,

इसका यही प्रमाण है, कूडलसंगमदेवा (समतास्वरूपी तत्त्व)!"

 - महात्मा बसवण्णा .


"राक्षसी के घर भरपेट भोजन मिला,

यह कहने वालो को देख मुझे आश्चर्य हुआ|

यह पानी में जलती आग रखने जैसा हैं|

ऐसे लोग सायुज्य (सर्वोच्च) पद क्या जाने?

आपके सामरस्य का सुख क्या जाने, कूडलसंगमदेव(समतातत्व स्वरुप)!" - महात्मा बसवण्णा .


"स्वयं रति सुख भोगे बिना, स्वयं भोजन किये बिना,

औरों से ये कार्य नहीं कराए नहीं जाने|

स्वयं इष्टलिंग (समतातत्व) के नियमित साधना किये बिना,

दुसरे से साधना कराई जा सकती है?

यह तो केवल औपचारीकता होगी|

ऐसे लोग आपकी भक्ति और सामर्थ्यका,

गांभीर्य क्या जाने, कूडलसंगमदेव (समतास्वरूपी तत्व)?"

 - महात्मा बसवण्णा .


"भूखा हूँ मैं, भोजन करो तुम,

रति सुख चाहूँ मैं, सतीसे संभोग करो तुम;

ऐसे भी कोई कह सखता है?

जो भी करना है, मनसे करो|

जो भी करना है, तनसे करो|

मन जगाए बिना शारीरिक व्यापार,

कूडलसंगमदेव (समतातत्व) को पसंद नहीं है!"

 - महात्मा बसवण्णा .


"याद रखिए, याद रखिए,

शरीरमें प्राण रहते-रहते साधना (समतातत्व कार्य) कर लीजिए|

पुनर्जन्म मिले, न मिले, कौन जाने?

कर्ता कूडलसंगमदेव (समतातत्व) का स्मरण (आचरण) कर लीजिए|"

- महात्मा बसवण्णा .


"ह्रदय शुध्द नहीं,

तो बाह्य विभूति धारण करने से क्या लाभ?

ह्रदय से स्मरण (समता कार्य) न करने पर,

रुद्राक्ष धारण करने से क्या लाभ?

सच्चे मनसे कूडलसंगमदेव ( समतातत्त्व) का स्मरण न करने पर,

सहस्त्रो ग्रन्थ पढ़ने से क्या लाभ?"

- महात्मा बसवण्णा .


"भक्त (कार्यकर्ता) मोचीही क्यों न हो?

उसके घर के कुत्ते का पंचमहावाद्यों से सम्मान करूंगा|

अहो भाग्य! धन्य 

हुआ मैं, कहूंगा|

कुलश्रेष्ट ब्राह्मण का कदापि सम्मान नहीं करूंगा|

आपके शरणों (पूर्णकालीन कार्यकर्ता) की महिमा अपार है|

कूडलसंगमदेव (समतातत्व स्वरूपी निर्मिक)!

आपपर अविश्वास करनेवाला अछुत है|".

- महात्मा बसवण्णा .

"जंगम निंदा करते हुए,

लिंग साधना करनेवाले भक्त का साहस कैसा ?

शिव- शिव!

निंदा करते हुए साधना करनेका

पातक सुना नहीं जा सकता

गुरु के गुरु है जंगम,

ऐसा है कूडलसंगमदेव (समतातत्व स्वरूपी) का वचन !"

- महात्मा बसवण्णा .


"जाति के होने तक भक्त नहीं हैं,

वंचना के होने तक महेश्वर नहीं हैं,

फल कि इच्छा के होने तक प्रसादी नहीं,

जाति से गुरुक्रुपा भ्रष्ट हुई,

वंचना से लिंगपूजा नष्ट हुई,

फलेछा से दुःख प्राप्त हुआ|

"कुलं छलं धनं चैव यौवन रुपमेव च|

विद्या राज्य, तपश्वैव ये ते चाष्टमदा; स्म्रुता;||"

इस प्रकार,

एक मद रूपी सुरापान करनेवाले, बन्धुमित्रो को नहीं समझते,

तो आठों मद रुपी सुरापान करनेवाले आपको कैसे जान सकेंगे

बसवप्रिय कूडलचेन्नसंगमदे­व ?"

- शरण संगमेंश्वरद अप्पण्णा .


"वीर , विरक्त , भक्त म्हणवून घेणार्या भक्तांनो ऐका ,

वीर तोच आहे ज्याला शत्रुही मानतात ,

विरक्त तोच आहे ज्याला स्त्रियाहि मानतात ,

भक्त तोच आहे ज्याला जंगमही मानतात .

याप्रमाणे वागणार्याला मागेल ते पद देईल कुडलसंगमदेव ।"

- महात्मा बसवण्णा .


"जंगम जंगम म्हण���न जगाच्या रुणात राहता येणार नाही,

लोकांच्या दारात याचना करता येणार नाहि,

जंगमाचे लक्षण कसे असावे तर

आपल्यावर विसंबून असलेल्या भक्ताचे ठिकाणी लिंगरुप होउन पहावे

आपण पाहिलेले लिंगांग स्थिर करुन,

कुणालाहि कळु न देता आपण निघुन जावे,ते जंगम.

असे न करता वाटेल त्यांना त्रास देउन,मागून, दिले तर स्तूति करुन, नाहि दिले तर शिव्या घालुन,आपण कष्टाचे लक्ष्य होउन,दुख करत विटून जाऊन, कष्टि होणार्यास जंगम म्हणावे का?"

-


"हे बकरे! "मार डालते है" कहकर, बार बार क्यों पुकारता है? क्यों रोता है रे! वेद पढ़नेवालों के सामने क्यों रोता है? शास्त्र सुननेवालों के सामने क्यों रोता है? तेरे रोने का उचित बदला लेंगे, अपने कूडलसंगम!"

- महात्मा बसवण्णा .


"वर्णामाजी श्रेष्ठ ब्राह्मण मी एक ,वाखाणी कौतुक लोकांमध्ये !!1!!

क्षमा दया शांती ईश्वराची भक्ती, नसे एकराती भूतदया !!2!!

तेथेची ते वर्म चुकुनिया गेला , भवपाशी गुंतला ८४ च्या !!3!!

उत्तम मिष्टान्न चांडले शिविले ,तैसे तेथे झाले अभिमाने !!4!!

मन्मथ शिवलिंग म्हणे मी पानाचे , घेवूनीया नाचे ओझे माथा !!5!!

(संदर्भ : मन्मथ गाथा , अभंग : ८० , पान न. २५ )

- शिवयोगी लिंगायत शरण मन्मथ स्वामी.


"आचार हाच गुरु आहे, आचार हेच लिंग आहे ;

आचार हाच जंगम आहे, आचार हेच प्रसाद आहे ;

आचार हाच भक्त आहे, आचार हाच शरण आहे !

आचारहीन गुरु, गुरु नसून नर आहे,

आचारहीन लिंग, लिंग नसून पाषाण आहे ;

आचारहीन जंगम, जंगम नसून वेषधारी अन्नभोगी आहे,

आचारहीन प्रसाद, प्रसाद नसून उष्टे आहे ;

आचारहीन भक्त, भक्त नसून भवी आहे,

आचारहीन शरण,शरण नसून मूर्ख आहे.

या सर्वाला मुळ सदाचारच आहे, कुडलसंगमदेव !."

- महात्मा बसवण्णा .


" त्रिपुर - संहार करनेवाला वीरभद्र है,

दक्ष यज्ञ - विध्वंसक वीरभद्र है,

अप्रतिम नरसिहं को परास्त

करनेवाला वीरभद्र है,

हर के कुल में जन्मा वीरभद्र है,

आपके शरण मडिवाळ भी वीरभद्र हैं"

- महात्मा बसवण्णा .


"नित्य निरंजन परम ज्योति

उपदेश के क्षण में गुरु हैं,

करस्थल पर लिंग है !

सांसारिक मोह से छुटकारा

पाने के लिए दसोह करा

लेते समय जंगम है !

इस तरह से गुरु, लिंग,

जंगम एक हैं, भिन्न नहीं !

त्रिविध को त्रिविध अर्पित कर

तीनो को एक बनाने वालाही

प्रसादी हैं, कूडलसंगमदेव"

- महात्मा बसवण्णा .


" सज्जनों का सत्संग कीजिए,

दुर्जनों से दूर रहिए !

साँप कोई भी हो,

विष ही उगलता हैं ;

उसकी संगति से बचिए,

दूर रहिए !

अंतरंग शुद्धीहीनों का संग,

कालकूट विष हैं, कुडलसंगमदेव !"

- महात्मा बसवण्णा .


" छत्रधारी घुड़सवारों को देखते

ही भय से पाँव लड़खड़ाते हैं !

गरीब भक्त को देख कहते हैं -

हट जाओ इधर जगह नहीं हैं !

प्रभु कूडलसंगमदेव, ऐसों को

पटककर, नाक काटे बिना रहेंगे,

क्या ?".......

- महात्मा बसवण्णा .


"सिले हुए फटे बोरे में पानी भर दिया है !

नगर में प्रवेश नहीं करने देते पाँच चोर !

धर्म दिखाई नहीं देता ! सारा नगर लुट जाए,

इससे पहले समरस हो जाइए कूडलसंगमदेव से !"

- महात्मा बसवण्णा .


" एक बैल के पाँच मालिक हैं,

पाँचों के पाँच-पाँच नौकर है !

ये परस्पर उलझकर स्वयं डूबे

और दूसरों को भी ले डूबे,

बैल पर जो बीती,

वह किससे कहूँ, कूडलसंगमदेव"

- महात्मा बसवण्णा .


" दयेविना धर्म तो कोणता ?

सर्व प्राणी मात्रांना दया पाहिजे !

दया हेच धर्माचे मूळ आहे!

अन्यथा जवळ घेत नाही कुडलसंगमदेव!"

- महात्मा बसवण्णा .


"माझ्या पेक्षा लहान कोणी नाही,

शिवभक्ता पेक्षा मोठा कोणी नाही !

या साठी तुम्ही साक्षी आहात,

माझे मन साक्षी आहे आहे !

माझ्या साठी हेच प्रमाण आहे, कुडलसंगमदेव !"

- महात्मा बसवण्णा .


" यदि सिर्फ अध्ययन से ही मोक्ष मिलता,

तो सभी वेदाध्यायी मुक्त न हो गये होते ?

तोता भी पढ़ता है | गंदगी खाते है |

मायाधीन भवि आपको क्या जाने, कूडलसंगमदेव |"

- महात्मा बसवण्णा .


" मकड़ी तार से जाल बना लेती है,

जाल बनाने के लिए वह तार कंहा से लाई ?

न उसके पास तकली है, न रुई, काता किसने ?

अपनीही ही नाभि से तंतु फैलाती है,

उसीमें रमती है ;

अंततां तंतु अपने में ही समेट लेती है,

इसी तरह आप अपनी स्रुष्ठी स्वंय में

समां लेते है, कुडलसंगमदेव!"

- महात्मा बसवण्णा .


" चूल्हे की आग बुझाई जा सकती है,

पर क्या बुझाई जा सकती है जलती हुई धरती ?

बांध जल पीने लगे, मेंड़ खेत खाने लगे,

नारी खुद के घर में ही करने लगे चोरी,

माँ का दूध विष बन हरने लगे प्राण,

तो किससे शिकायत करूँ, कुडलसंगमदेव !" (वचन क्र २६ )...

- महात्मा बसवण्णा .


"आशा धरोनी बोधीना | पूजा मान इच्हीना |

परस्त्रीस पाहीना | कामदृष्टी कदा ||

जीव -हिंसा करीना | शब्दे कोणासी दुखविना |

भुवई उचलीना | कोणावरी ||

जयाचे नाव विरक्त | तो कासयासी नोव्हे लिप्त |

श्वान वमन मानित | भोग विलास सर्व ते ||

तयासी लोह कांचन | गारा आणि समरत्न |

मान अपमान समान | आनंद भरित सर्वदा ||"

- शिवयोगी लिंगायत शरण मन्मथ स्वामी.


"नीज पूर्व स्वभाव बदले बिना लोहे का बंदर,

पारस स्पर्श से चाहे सोना बने,

उसका उपयोग क्या ?

आपको पहचानकर भी,

न पहचानने जैसा आचरण करनेवाले

रहेंगे पूर्ववत पाखंडी ही, कुडलसंगमदेवा !".वचन क्रं ९४

 - महात्मा बसवण्णा .


"देखिए, कल्याण माटी का दीपक !

भरा है जिसमें भक्ति का तेल |

छु जाती है जैसे ही

ज्योति बसवण्णा की आचार वर्तिका से

झिलमिला उठता है प्रकाश से शिव का प्रताप !

उस प्रदीप्त आभा में

हो जाते है देदीप्यमान असंख्य भक्त जन !

हो सकता है क्या यह असत्य

हो जाता है पावन अविमुक्ति क्षेत्र

जंहा रहते है भक्त शिव के ?

हो सकता है क्या यह असत्य

पवित्र है वह देश

जंहा शिवभक्तों का है आवास ?

कहता हूँ मैं

गुहेश्वरलिंग के सम्मुख, ओ सिद्धरामय्य़ा

यह है मेरे परम अराध्य

संगनबसवण्णा की महिमा"

- अनुभव मटंप प्रथम अध्यक्ष अल्लमप्रभु.


"बसवण्णा हा ॐकाराच्या पलिकडचा,

नाद बिंदू कलेच्याही पलिकडचा,

तूंच प्रथमाचारी बसवण्णा,

तूंच होय लिंगाचारी, तूंच जंगमाचारी,

तूंच प्रसादाचारी, मज तूंच असशी सर्वाचारी.

तूंच मज गतीमती होऊन मज वाचविलास,

कुडलसंगमदेवा,को­णतेही झाले नव्हते निर्णय,

तेंव्हा म्हणत होतो मी " ॐ नम: शिवाय "

-  अनुभव मंटप अध्यक्ष चन्नबसवण्णा.


"निगमागम, शास्त्र , पुराण -

कूटे धान का कनकी भूसा जानो रे !

इनको क्यों कूटे क्यों फटकारे ?

भटकते मन की नोक यदि जानो

चन्नमल्लिकार्जु­न खुला शून्य ही शून्य रे !."

- अक्कमहादे­वी .


"देवलोक, मर्त्यलोक भिन्न - भिन्न है क्या ?

इसी लोक में है अनंत लोक !

शिवाचार - शिवलोक, शिवभक्त का निवास - देवलोक ;

शिवभक्त का आंगन - वाराणसी,

काया ही कैलास !

यह अटल सत्य है, कूडलसंगमदेव !"

 - महात्मा बसवण्णा .


" स्थूल पंच महाभूतों में इष्टलिंग प्रतिष्टित है |

सूक्ष्म पंच महाभूतों में प्राणलिंग प्रतिष्टित है |

कारण पंच महाभूतों में तृप्तिलिंग प्रतिष्टित है |

ये स्थूल सूक्ष्म कारण - महाकारण शुद्ध ह्रदय में महाज्योति है |

शरणों का अनुभाव पा इस महाज्योति के

दर्शन किये जा सकते है, कूडलसंगमदेव |"( वचन क्र १४०२ ).

 - महात्मा बसवण्णा .


" जल में छिपी हुई अग्नि के समान,

अंकुर में छिपे हुए स्वाद-रस के समान,

कलिका में छिपे हुए परिमल के समान,

कूडलसंगमदेव का अस्तित्व है - कन्या के स्नेह के समान |"

( वचन क्र ०१ )

 - महात्मा बसवण्णा .


"मी काय करू कुडलसंगमा ?

माझ्या मनरूपी माकडाचा गोंधळ वाढला आहे.

मला कोठेही थांबू देत नाही.

मला क्षणभर बसू देत नाही.

क्षणात पाताळात घेऊन जाते.

क्षणात आकाशात घेऊन जाते.

क्षणात दिशे दिशेला घेऊन जाते.

कुडलसंगमा, या मनरूपी माकडाच्या गोंधळातून

वाचवून केंव्हा मला तुमच्या जवळ घेता".........

( व.क्रं.१०६५)

- महात्मा बसवण्णा .

"उपाधिधारी कायर वीर बन सकता है ?

खाली तलवार हाथ में लिए रहनेवाला योद्धा बन सकता है ?

लँगोट पहन,लाठी ले,अखाड़े में कसरत करने के बाद भी

संघर्ष से बचनेवाला,शिव का कृपापात्र हो सकता है ?

कपटी विप्र की भक्ति, भोले भालों को फन उठाकर डरानेवाले

पालतू साँप जैसी होती है, कूडलसंगमा."

- महात्मा बसवण्णा .

"कायक पुरे लगन और इमानदारीसे करने मेही सच्ची शिव भक्ति है और वही शिव का अस्तित्व है।"

" तलवार चलाना हो या कृषिकार्य करना हो,

पढाई हो, व्यापार हो या लेखनकार्य हो,

किसी भी कायक को करने में, असत्य न हो।

वही असमाक्ष शिव का आगमन है,

पशुपति का अस्तित्व है,

वही हैं एघाटदूर रामेश्वरलिंग।"

- शरण मेरेमिंडय्या .


"वीर , विरक्त , भक्त म्हणवून घेणार्या भक्तांनो ऐका ,

वीर तोच आहे ज्याला शत्रुही मानतात ,

विरक्त तोच आहे ज्याला स्त्रियाहि मानतात ,

भक्त तोच आहे ज्याला जंगमही मानतात .

याप्रमाणे वागणार्याला मागेल ते पद देईल कुडलसंगमदेव ।"

- महात्मा बसवण्णा .

" चीर - चिथड़ा पहननेवाला गुरु नहीं;

काषाय पहननेवाला जंगम नहीं;

शील का नेमी शिवभक्त नहीं;

पानी तीरथ नहीं;

निरा खादन प्रसाद नहीं;

जो हामी भरता इन सब का;

गिन-गिनकर उसके मुहँ पर

आधे मन के जूतें,

एक माशा भी कम नहीं;

तोलं -तोलंकर

टक -टक मारों रे, अंबिगर चौडय्या".

- लिंगायत शरण अंबिगर चौडय्या.


" यदि गुरु कहूँ तो गुरु है मानव;

यदि लिंग कहूँ तो लिंग है पत्थर;

यदि जंगम कहूँ तो जंगम है आत्माक्षर;

यदि पादोदक कहूँ तो पादोदक है नीर (पाणी);

यदि प्रसाद कहूँ तो प्रसाद है आहार,

इस कारण

कंचन (सोने), कामिनी (ललना), जड़-जमीन

इन तीनों से जकड़े होने के कारण

गुरु कहलाता मानव।

अष्टविध-अर्चन, षोड़शोपचार से घिरने के कारण

लिंग बना पत्थर,

आशा-पाश के वशवती होंकर

जंगम बना आत्माक्षर (आत्मकेंद्रित),

जंगम बनकर जो कंचन को हाथ पसारे

उससे यदि प्रसाद पादोदक पाऊँ मैं तो

मेरी गत उस चौपाये -सी

जो फँसा हो दलदल में, प्रभु अमुगेश्वर।"

- स्त्री शरण अमुगे रायम्मा


" उठ भोळ्या शिवाच्या भोळ्या वंशजा लिंगायतां उठ, किती दिवस समतावादी स्वाभिमानी शिवधर्मालाच बुडवायला निघालेल्यां विषमता वाद्यांना स्वताच्या खांद्यावर उचलणार आहेस ????".

" बकरे की भांति उन दाड़ीधारी गुरुजनों को देखो, रे।

कोठी - बंगले के बडप्पन का घमंड कर

त्यजकर आचार, अनाचारों का संचय कर

भक्तों से क्रोध, भ्रष्टों से मेल - मिलाप ---

ये सब नरक के भोगी है, अपने

प्रभु रामेश्वरलिंग में सदाचार ही प्राण हैं।"

- स्त्री शरण अक्कम्मा


" कायक में जब लगे रहो तब भूलना होगा

चाहे आए हो गुरु या करनी हो लिंगपुजा

परवाह न करे सम्मुख खड़े जंगम की

'कायक' ही तो है 'कैलास'

अमरेश्वरलिंग भी तो समाहित कायक में ।"

- शरण आय्दक्की मारय्य;


" गेरुए रंग के कपडे पहन, जटा माला धारण कर,

लंबे बाल बढ़ाने से क्या वे जंगम हो सकेंगे ?

साकार में उनकी सहमती नहीं है,

निराकार में नित्य नहीं है,

जूडा-जटाधारी, गंजा ऐसा उन्हें नहीं कहते हुए,

जो ज्ञानी है वाही जंगम है, ऐसा कहना चाहिए !

जहाँ ज्ञान नहीं वहाँ केवल वेश-भूषा आडंबर है देखो !

कुडलचेन्न संगमा !"

- षटस्थल चक्रवर्ती चेन्नबसवण्णा .


"जटाधारी, गेरुएवस्त्र धारी वेशभूषाधारी हुए तो क्या ?

वे तो केवल निवाले ग्रास के भोगी है परंतु इष्टलिंग के भाजन नहीं है

ऐसी आशा करने वाले वेशभूषाधारी दिखने पर

उन्हें 'बैलपोळा' के बैल जैसा उन्हें मैं ढोंगी कहूँगा देखिए

कुडलचेन्न संगमा।"

 - षटस्थल चक्रवर्ती चेन्नबसवण्णा .


" शिव जिसके आदि पुरुष है,

शिवशरण जिस परिवार के हैं;

उसीमें जन्मा मैं मोची - सूत हूँ !

मेरे पिता ने जाती-पांति का भेद और

जाती-सूतक नष्ट कर दिया हैं !

मैं मोची का बेटा हूँ !

वाग्भूषण कुडलसंगमदेव !

चन्नय्य ही मेरे प्रपितामह हैं !"

- महात्मा बसवण्णा .


" अहो,,,, न बोल सत्याचे, ना वर्तन सदाचाराचे,

धरली न कास सदभक्तीची, ना प्राप्ती निजमुक्तीची,

ना सत्क्रियेचे आचरण, ना सम्यकज्ञान संपादन,

जळो, जळो, --- ही सोंगाढोंगांची भाषा पाहून

गुहेश्वरलिंग हसतसे पहा, चेन्न बसवण्णा."

- अनु­भव मंटप प्रथम अध्यक्ष अल्लमप्रभू.


" अंगावर लिंगसंबंध होता तीर्थक्षेत्राला­ का हो जावे ?

अंगावरील लिंगास स्थावर लिंग स्पर्शिता,

कोणते महान आणि कोणते सान म्हणावे ?

शब्दातील परात्परास न जाणल्याने वाया गेले !

जंगमदर्शन हे शरणु शरणार्थ होता साध्य,

लिंगदर्शन हे करस्पर्शाने साध्य,

सामिपचे लिंग हीन लेखून,

दूरच्या लिंगास नमन करणाऱ्या

व्रत्तहिनाना दाखवू नका हो, कुडल चेन्नसंगय्या !"

- अनुभव मंटप अध्यक्ष चेन्नबसवण्णा.

" अर्थरेषा असून काय उपयोग, आयुष्यरेषा नसेल तर ?

भित्र्याच्या हाती चंद्रायुध असून काय उपयोग ?

आंधळ्याच्या हाती आरसा असून काय उपयोग ?

माकडाच्या हाती माणिक असून काय उपयोग ?

आपल्या कुडलसंगांच्या शरणाना

न जाणणाऱ्यांच्या हाती लिंग असून काय उपयोग ?

शिवपथाची ओळख नसेल तर."

 - महात्मा बसवण्णा .


"फुटकी खापरी देखिल घरी न राही ऐसे करा हो ,

द्या हो देवा माझ्या हातीगवताची काडी ,

आणि जर मी 'मृडदेवा शरनु' म्हणत भिक्षा मागितल्यास ,

तेथे 'पुढे जा' म्हणवा हो ,

कुडलसंगमदेवा ।।"

 - महात्मा बसवण्णा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लेखन कौशल्य

Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...