शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर माहिती

डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर (जन्म: १५ मे १९३८; लग्न : १९७०) हे एक मराठी वैज्ञानिक आणि लेखक आहेत. हे अच्युत लक्ष्मण दाभोळकर व ताराबाई अच्युत दाभोळकर या दांपत्याच्या दहा अपत्यांपैकी एक. कोकणातील वेंगुर्ल्याजवळच्या दाभोली गावचे मूळ रहिवासी. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दत्तप्रसाद दाभोळकरांचे वडील अच्युतराव साताऱ्याला आले व फौजदारी वकिली करू लागले. वकिली करण्यासाठी दाभोलीकर किंवा दाभोलकर असे आडनाव न लावता त्यांनी दाभोळकर हे आडनाव स्वीकारले. मात्र दत्तप्रसाद यांचे बंधू देवदत्त आणि नरेंद्र हे त्यांचे आडनाव दाभोलकर असे लिहितात.

शिक्षण आणि संशोधन
संपादन करा
दाभोळकरांचे सुरुवातीचे शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढे सिबा कंपनीत असतानाच, इ.स. १९६७ ते १९६९ या काळात त्यांनी पार्ला कॉलेजचे प्रसिद्ध गांधीवादी खादीधारी डॉ.के.एस.नरगुंद यांच्या हाताखाली पीएच.डी. केले. हा सर्व अभ्यास त्यांनी सकाळी आणि रात्री ऑफिसच्या वेळेबाहेर मेहनत घेऊन केला. सिबा कंपनीत चालणारे सर्व संशोधन मुळात त्यांच्या स्वित्झर्लंडमधील मुख्य कंपनीसाठी होते. दाभोळकरांनी पीएच.डी. मिळविलेली कंपनी संचालकांना अजिबात आवडली नाही. ही पीएच.डी परत करा किंवा कंपनीच्या नोकरीचा राजीनामा द्या हा पर्याय दत्तप्रसाद दाभोळकरांपुढे ठेवण्यात आली. दाभोळकरांनी अर्थात राजीनामा दिला.

आठ वर्षे सिबा कंपनीत, तीन वर्षे ॲनासिन बनविणाऱ्या जॉफ्री मॅनर्समध्ये, सात वर्षे राजस्थानातील कोटा गावच्या जे.के.सिंथेटिक्समध्ये आणि शेवटची तेवीस वर्षे दिल्लीच्या श्रीराम इन्स्टिटूटमध्ये संशोधकाची नोकरी करून दत्तप्रसाद दाभोळकर स्वेच्छानिवृत्त झाले. त्या काळात सरकारी क्षेत्रातील संशोधनाचाही त्यांनी अभ्यास केला. भारतातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संशोधनक्षेत्राने दिलेले योगदान अगदी नगण्य म्हणावे असे आहे, असा दाभोळकरांचा निष्कर्ष आहे. म्हणूनच, भारतातील विज्ञान-संशोधन क्षेत्रांत ज्या त्रुटी आहेत, त्यांवर प्रकाशझोत टाकणारे विपुल लिखाण दत्तप्रसाद दाभोळकरांनी केले आहे.

लेखनसंपादन करा

दत्तप्रसाद दाभोळकरांचे बहुतेक लिखाण हे शोधपत्रिकेच्या अंगाने केलेले वैचारिक स्वरूपाचे लेखन आहे. कविताकथाकादंबरी या स्वरूपाचे साहित्य दाभोळकरांनी फारसे लिहिलेलेच नाही. कॉलेजमध्ये असताना काही दोन चार कविता केल्या असतील तेवढ्याच. त्यांतली एक कविता ’बिजली’ या काव्यसंग्रहात छापली गेली आहे. ’ढगांमागून गडगडत’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या बालगीतांचा संग्रह मात्र प्रकाशित झाला आहे.

डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • छाया (कवितासंग्रह)
  • ढगांमागून गडगडत (बालगीतसंग्रह)
  • तुम्हाला विज्ञान युगात जगायचंय
  • दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत
  • ना डावंना उजवं (काश्मीर, रा.स्व.संघ आणि इतर लेख)
  • प्रकाशवाटा : दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख (यांची चरित्रे)
  • बखर राजधानीची
  • (समग्र) माते नर्मदे (नर्मदा बचाव आंदोलनावरील पुस्तक)
  • राजधानी इंद्रप्रस्थ
  • विज्ञानेश्वरी (वैज्ञानिक गल्पमाला). (याच नावाचा एक ग्रंथ रवीन थत्ते यांचा आहे, मात्र तो संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीसंबंधात आहे.)
  • शोध स्वामी विवेकानंदांचा
  • समग्र माते नर्मदे (नर्मदा बांधविरोधी आंदोलनावरील पुस्तक)

दत्तप्रसाद दाभोळकरांवरील पुस्तकेसंपादन करा

  • रंग याचा वेगळा...: दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन (व्यक्तिचित्रण, भानू काळे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लेखन कौशल्य

Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...