शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

प्रयत्न हाच देव

प्रयत्न हाच देव 
देव म्हणजे आपल्याला प्राप्त करायचे निश्चित उद्दिष्ट असा अर्थ आपण अन्वयार्थाने घेतला पाहिजे. प्रत्येकाला देव प्राप्त व्हावा त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचे प्रयत्न सुरू असतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर देव या संकल्पनेची व्याख्या 'जो देतच राहतो तो देव' तेथे घेव नाही. तर प्रत्येकाला आपला देव प्रयत्नाने साध्य करता येऊ शकतो. 'प्रयत्ने कण रगडीता वाळूचे तेलही गळे' असे म्हटले जाते. त्याचबरोबर संत तुकाराम ही म्हणतात, 'असाध्य ते साध्य करिता सायास नाव त्याचे अभ्यास तुका म्हणे'
तर प्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके म्हणतात 'प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे'. प्रयत्न शिवाय आणि कष्टाशिवाय जगामध्ये कुणालाही काही प्राप्त होत नाही. यशाची गाथा बघत असताना प्रयत्न हाच त्यातील महत्त्वाचा गुणधर्म आपणास दिसून येतो. शास्त्रज्ञ, कलावंत, निर्माते, साहित्यिक, उद्योजक, व्यापारी, खेळाडू, अभिनेते सर्वच या सृष्टीतील जीव प्रयत्नानेच यश प्राप्त करून घेऊ शकतो व उच्च पदाला प्राप्त होऊ शकतो. प्रयत्नामध्ये प्रामाणिकता, सत्यता, सातत्य, परिश्रम, सामाजिक उत्तरदायित्व, सामाजिक बांधिलकी, सामूहिकता सामंजस्य, प्रेम भावना आदी बाबी जर आल्या तर हे प्रयत्न देवस्वरूप होतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

https://www.dnyansagar.in/2020/08/shriganesh.html

https://www.dnyansagar.in/2020/08/shriganesh.html