बालकवी यांच्या फुलराणी कवितेचा भावार्थ
परिचय - त्र्यंबक बापूजी ठोंबरे (१८९०-१९१८)
ते निसर्गकवी म्हणून ओळखले जातात. १९०७मध्ये जळगावात पहिले कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी बालकवींच्या सभाधीटपणाला बघून 'बालकवी' ही उपाधी दिली.
त्यांच्या बहुतेक कवितांमध्ये निसर्ग मध्यवर्ती असला तरी निसर्गसौंदर्याचे वर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गातील विविध दृश्यांमध्ये त्यांना मानवी भावना दिसतात, म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही तर निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचा तो सहजोद्वार आहे. प्रेमाचे स्वरूप, बालवृत्ती, उदासीन प्रतिमासृष्टी, निसर्गाशी तादात्म्य, मानवी भावनांची गुंतवणूक, मानवी जीवनाच्या अपूर्णतेची जाणीव हे त्यांच्या काव्याचे विशेष दिसून येतात.
प्रस्तुत कविता त्यांच्या फुलराणी या कवितासंग्रहातून घेतलेली आहे.
प्रस्तुत कवितेत बालकवीने निसर्गसौंदर्याचे सुंदर शब्दशिल्प निर्माण केले आहे. रविकरण आणि फुलराणी यांच्या मनोरम प्रेमाविष्काराचे चित्र वाचकांसमोर विविध भाववृत्तीसह उभे केले आहे. या कवितेतून आलेले निसर्गसौंदर्य वाचकांचे लक्ष वेधून घेणारे आहे.
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालींचे;
त्या सुंदर मखमालीवरतीं फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणांत व्याज मनें होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला.
आईच्या मांडीवर बसुनी झोंके घ्यावे, गावीं गाणीं;
याहुनि ठावें काय तियेला--साध्या भोळ्या फुलराणीला ?
पुरा विनोदी संध्यावात डोलडोलवी हिरवें शेत;
तोच एकदां हांसत आला चुंबून म्हणे फुलराणीला--
"छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती?
कोण बरें त्या संध्येंतून - हळुच पाहतें डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा आवडला अमुच्या राणींना?"
लाजलाजली या वचनांनीं साधी भोळी ती फुलराणी !
आंदोलीं संध्येच्या बसुनी त्या रजनीचे नेत्र विलोल झोंके झोंके घेते रजनी; नभीं चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनीं केला निजलीं शेतें; निजलें रान चैन पडेना फुलराणीला; निजले प्राणी थोरलहान.
अजून जागी फुलराणी ही आज कशी ताळ्यावर नाहीं?
लागेना डोळ्याशीं डोळा काय जाहलें फुलराणीला ?
या कुंजांतुन, त्या कुंजांतुन मध्यरात्रिच्या निवांत समयीं इवल्याशा या दिवठ्या लावुन, खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर झुलुनि राहिलें सगळे रान प्रणयचिंतनीं विलीनवृत्ति डुलतां डुलतां गुंग होउनी निर्झर गातो; त्या तालावर -स्वप्नसंगमर्मी दंग होउन ! कुमारिका ही डोलत होती; स्वप्नें पाही मग फुलराणी
"कुणी कुणाला आकाशांत हळुच मागुनी आलें कोण प्रणयगायनें होतें गात; कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्तीं तों व्योमींच्या प्रेमदेवता विरहार्ता फुलराणी होती; वाऱ्यावरतीं फिरतां फिरतां हळूच आल्या उतरुन खालीं- फुलराणीसह करण्या केली, परस्परांना खुणवुनि नयनीं त्या वदल्या ही अमुची राणी !
स्वर्भूमीचा जुळवित हात नाचनाचतो प्रभातवात; खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला हळुहळु लागति लपावयाला आकाशींची गभीर शांती मंदमंद ये अवनीवरतीं;
विरूं लागलें संशयजाल संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचें वस्त्र लेवुनी स्वप्नसंगमीं रंगत होती हर्षनिर्भरा नटली अवनी; तरीहि अजुनी फुलराणी ती !
तेजोमय नव मंडप केला जिकडेतिकडे उधळित मोतीं लाल सुवर्णी झगे घालुनी कुणीं बांधिला गुलाबि फेटा आकाशीं चंडोल चालला हें थाटाचें लग्न कुणाचें ! लख्ख पांढरा दहा दिशांला, दिव्य वऱ्हाडी गगनीं येती; हांसत हांसत आले कोणी; झकमकणारा सुंदर मोठा ! हा वानिश्चय करावयाला; साध्या भोळ्या फुलराणीचें !
गाउं लागले मंगलपाठ, वाजवि सनई मारुतराणा नाचुं लागले भारद्वाज, नवरदेव सोनेरी रविकर लग्न लागतें! सावध सारे! दंवमय हा अंतःपट फिटला सृष्टीचे गाणारे भाट, कोकिळ घे तानांवर ताना ! वाजविती निर्झर पखवाज, नवरी ही फुलराणी सुंदर ! सावध पक्षी! सावध वारे ! भेटे रविकर फुलराणीला !
वधूवरांना दिव्य रवांनीं- कुर्णी गाइलीं मंगल गाणीं; त्यांत कुणीसें गुंफित होतें परस्परांचें प्रेम! अहा तें! आणिक तेथिल वनदेवीही दिव्य आपुल्या उच्छ्वासांहीं लिहीत होत्या वातावरणीं- फुलराणीची गोड कहाणी! गुंगतगुंगत कवि त्या ठायीं स्फूर्तीसह विहराया जाई; त्यानें तर अभिषेकच केला नवगीतांनीं फुलराणीला !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा