शुक्रवार, ९ जुलै, २०२१
आधुनिक मराठी कविता वस्तुनिष्ठ प्रश्न
1. मराठी कवितेमध्ये ‘आरतीप्रभू’ या टोपणनावाने -------------यांनी काव्यलेखन केले.
A) उर्मिला चाकुरकर B) प्रज्ञा पवार C) चि. त्र्यं. खानोलकर D) प्रिया तेंडूलकर
2. “एक असतं इंजेक्शन
फक्त --------- निवडून काढणार
आणि”
A) फुलांनाच B) कळ्यांनाच C) फळांनाच D) पानांनाच
3. ‘संध्याकाळच्या कविता’ या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत?
A) आरतीप्रभू B) ग्रेस C) सुरेश भट D) रामदास केदार
4. हायकू हा मुळात --------- काव्यप्रकार आहे.
A) जपानी B) भारतीय C) फारसी D) इंग्रजी
5. बिरसा मुंडा ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातील आहे?
A) आदिवासी कविता B) मोहोळ C) अभुजमाड D) उलगुलान
6. दुबई येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ---------- यांनी भूषविले.
A) फ. मुं. शिंदे B) सुरेश भट C) मंगेश पाडगावकर D) प्रज्ञा पवार
7. ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाच्या संपादिका ---------- आहेत.
A) प्रज्ञा पवार B) सारिका उबाळे परळकर C) सुचिता खल्लाळ D) संजीवनी तडेगावकर
8. पुढीलपैकी कोणत्या कवीने मराठी साहित्यास देशीवादी वळण दिले?
A) शरदच्चंद्र मुक्तिबोध B) भालचंद्र नेमाडे C) नारायण सुर्वे D) आरतीप्रभू
9. ----------- कवितासंग्रह कवयित्री प्रज्ञा पवार यांचा नाही.
A) अंतस्थ B) मी भिडवू पाहते समग्राशी डोळा C) उत्कट जीवघेण्या धगीवर D) नक्षत्रांचे देणे.
10. महाराष्ट्र भूमीत जन्मा आली
--------- मग राणी झाली
लेकरासामान प्रजेला जपली
होळकरांच्या घराण्यात ती, दिसली रे शोभूनि
A) कल्याणची B) इंदूरची C) झाशीची D) राजाची
11. ‘गोलपिठा’ हा कवितासंग्रह कोणाचा आहे?
A) यशवंत मनोहर B) अण्णा भाऊ साठे C) नारायण सुर्वे D) नामदेव ढसाळ
12. कवी भालचंद्र नेमाडे यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे?
A) जीवन गौरव B) साहित्य अकादमी C) अर्जुन D) यापैकी नाही
13. महानगरीय संवेदनेची कविता कोणत्या कवीने लिहिली?
A) रामदास केदार B) अरुण काळे C) सुरेश भट D) यशवंत मनोहर
14. कवी ग्रेस यांचे संपूर्ण नाव काय आहे?
A) चिंतामण त्र्यंबक खानोलकर B) दिलीप पुरुषोत्तम चित्रे C) नारायण गंगाराम सुर्वे D) माणिक सीताराम गोडघाटे
15. आण्णा भाऊ साठे यांचा ------------ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.
A) शाहीर B) सनद C) यात्रिक D) मोहोळ
16. परभणी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी -------- होते.
A) फ. मुं. शिंदे B) भालचंद्र नेमाडे C) नारायण सुर्वे D) यापैकी नाही
17. ‘असे कसे म्हणता येईल’ ही कविता ------- समाजाच्या रोजीरोटीच्या विवंचनेवर भाष्य करते.
A) आदिवासी B) मुस्लीम C) ग्रामीण D) मध्यमवर्गीय
18. स्त्रीभ्रूण हत्येसारखे पातक करणाऱ्या व्यवस्थेवर कोणती कविता प्रकाश टाकते?
A) अर्थयुद्ध B) निष्णात C) झाडबाबा D) भविष्यातल्या गर्भातल्या बाळाचे रुदन
19. महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार --------- यांना मिळाला.
A) सारिका उबाळे परळकर B) प्रज्ञा पवार C) नारायण सुर्वे D) आरतीप्रभू
20. भुजंग मेश्राम यांच्या कवितेतून --------- जीवनजाणीव व्यक्त होते.
A) आदिवासी B) ग्रामीण C) महानगरीय D) स्त्रीवादी
21. दलित साहित्याचे ‘आंबेडकरी साहित्य’ हे नामकरण कोणी केले?
A) ना. धों. महानोर B) नामदेव ढसाळ C) नारायण सुर्वे D) यशवंत मनोहर
22. याच वस्तीतून आपला ------ येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे. A) चंद्र B) सूर्य C) माणूस D) मित्र
23. ‘उठा गडयांनो’ हा ---------- संग्रह आहे. A) बालगीत B) बालगझल C) बालकथा D) रुबाई
24. ----------- यांच्या कवितेवर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता.
A) नामदेव ढसाळ B) भालचंद्र नेमाडे C) नारायण सुर्वे D) यशवंत मनोहर
25. देगलूर भागातील मराठी बोलीचा प्रभाव -------- कवीच्या लेखनावर आहे.
A) मलगीरवार लक्ष्मण B) रामदास केदार C) संजय वाघ D) आरतीप्रभू
26. वृक्ष संवर्धनाचा संदेश कोणती कविता देते? A) हळद लावाया B) झाडबाबा C) दान D) एल्गार
27. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला -------- A) वामनराव B) भीमराव C) शामराव D) राव
28. “सजुन धजुन करवली सकु, बाई येऊन कपाळी लावी कुंकू, ओल्या डोळ्याच्या बाहुल्या पाणावल्या” या कवितेच्या ओळी कोणत्या कवितेतील आहेत?
A) हळद लावाया B) पुन्हा एकदा C) निष्णात D) बैल दौलतीचा धनी
29. निसर्ग आणि मानवी सह्संबंधाचे सामाजिक चित्रण कोणत्या कवितेतून आलेले आहे?
A) कुणाच्या खांद्यावर B) तीन हायकू C) प्रेम म्हणजे D) हळद लावाया
30. “झाडे लावा, झाडे जगवा
संदेश मनात रुजवून पाहू
उगवणाऱ्या कोंभाला
प्राणपणाने जगवत राहू” या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत?
A) संजय वाघ B) शं. ल. नाईक C) सुरेश भट D) रामदास केदार
31. “मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येते, उर्दूमध्ये ----- म्हणून प्रेम करता येतं”
A) लव्ह B) प्यार C) इश्क D) रिस्क
32. ‘देखणी’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
A) शरदच्चंद्र मुक्तिबोध B) मंगेश पाडगावकर C) सुरेश भट D) भालचंद्र नेमाडे
33. विश्व गझल परिषदेचे अध्यक्षपद --------- यांनी भूषविले आहे.
A) फ. म. शहाजिंदे B) डॉ. शेख इकबाल मिन्ने C) प्रभाकर साळेगावकर D) सुरेश भट
34. पहिल्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान -------- यांना मिळाला.
A) डॉ. शेख इकबाल मिन्ने B) फकरुद्दीन बेनुर C) फ. म. शहाजिंदे D) यापैकी नाही
35. ‘शिरस्नाता’ कवितासंग्रह कोणाचा आहे?
A) प्रज्ञा पवार B) सारिका उबाळे परळकर C) संजय वाघ D) भुजंग मेश्राम
36. ‘चांदोमामा’ हा बालकाव्यसंग्रह --------- यांचा आहे.
A) प्रज्ञा पवार B) शं. ल. नाईक C) मंगेश पाडगावकर D) भुजंग मेश्राम
37. ‘अर्थयुध्द’ ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे?
A) उलगुलान B) नंतर आलेले लोक C) जोगवा D) यापैकी नाही
38. मराठीमध्ये गझल कोणी लोकप्रिय केली?
A)रामदास केदार B) सुरेश भट C) संजय वाघ D) प्रभाकर साळेगावकर
39. ‘तोंवर तुला मला’ या कवितेतील नायक कोणाशी संवाद साधतो?
A) मैत्रिणीशी B) पत्नीशी C) बहिणीशी D) आईशी
40. ‘थेरीगाथा इसवी सन दोन हजार’ ही कविता कोणत्या प्रवाहाची आहे?
A) मार्क्सवादी B) दलित C) स्त्रीवादी D) आदिवासी
लेखन कौशल्य
Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...
-
सांस्कृतिक कार्यक्रम सुत्र संचलन चारोळ्या यात दिलेली माहीती ही संग्रहीत आहे, चारोळ्या अनेकांनी लिहलेल्या आहेत, त्या माझ्या नाहीत मी फक्...
-
१. वाचनाचे महत्व : १.आकलनासह केलेले ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन होय. २.वाचनामुळे व्यक्तीमत्वाचा अंतर्बाह्य विकास होतो. ३.वाचनाने वाणीवर स...
1 टिप्पणी:
9356862724
टिप्पणी पोस्ट करा