मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

राष्ट्रीय सेवा योजना-युवा चळवळ

आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे.

maharashtra-times
   
प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ/ प्रा. रवींद्र अशोक आहिरे
युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय.
राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते.

डॉ. डी. एस. कोठारी शिक्षण आयोगाने शिक्षणाच्या सर्वच टप्प्यांवर विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जावा, अशी शिफारस १९६४-६६ दरम्यान केली आणि १९६७ मध्ये राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेत एनसीसीसोबत एनएसएस असावे हे मान्य झाले. त्यानंतर कुलगुरूंच्या परिषदेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वागत होऊन २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तेव्हाच शिक्षणमंत्री व्ही. के. आरव्ही राव यांनी देशातील ३७ विद्यापीठांत प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. आज देशातील हजारो महाविद्यालये व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी झाले आहेत. २४ सप्टेंबर हा ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ म्हणून साजरा केला जातो.

‘Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आजचा स्वयंसेवक हा बोधचिन्हाच्या आठ आरेनुसार अष्टौप्रहर समाजसेवेसाठी बांधील आहे व लाल रंग हे तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठी असल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा, यासाठी राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर या दोन उपक्रमांद्वारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य करीत आहे. नियमित कार्यक्रमांद्वारे महापुरुषांचे विचार हे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमातून घेऊन श्रमदान, युवा सप्ताह, कार्यशाळा, शिबिर, सरकारच्या विविध कार्यक्रमांत सहभागी होतात.

महात्मा गांधींचा ‘खेड्याकडे चला’ हा विचार घेऊन गावांमध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरांमार्फत निर्मलग्राम, सर्वांगीण व शाश्वत ग्रामविकास, चर खोदणे, रस्ते बांधणी, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, रक्तदान आदी कार्य श्रमदान, पथनाट्य, रॅली, उद््बोधक चर्चा, शिवारफेरी, गावकरी संवाद या माध्यमांतून समाजाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात युवाशक्ती वा ऊर्जास्त्रोत पुरविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह हे या उपक्रमाचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करतात. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना हा भारत सरकारचा अभिनव उपक्रम आहे.

अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठे तरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे. पर्यावरणासंबंधी वृक्षारोपण, सीसीटीव्हीचे काम, ग्रीन ऑडिट, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता, निर्माल्य संकलन, जलसाक्षरता, समाजाप्रती कन्यारत्न वाचवा अभियान, आर्थिक, कौटुंबिक व शैक्षणिक सर्वेक्षण आदी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची ही युवा चळवळ अखंड सुरू राहावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मूलभूत योजनांचा सतत प्रचार व प्रसार या युवा चळवळीच्या माध्यमातून करीत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची ही युवा चळवळ राष्ट्र व समाजासाठी तत्पर व सक्षम व्हावी, यासाठी तो कवी दिलशादच्या ओळी म्हणत आपला उद्देश मांडतो.

उठे समाज के लिए उठे उठे

जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे

स्वयं सजे वसुंधरा संवार दे

स्वयं सजे वसुंधरा संवार दे| 

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

संत नामदेव - पाप्या नावडे संतसंगती

    संत नामदेवांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७०चा. म्हणजे ते शिवाजी महाराजांच्याही जवळपास चारशे वर्षं आधीचे. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली होती. दक्षिणेत त्याचा पायरव ऐकू येत होता. धर्माच्या नावाने हिंदू धर्ममार्तंड आणि मुस्लिम शासक बहुसंख्य भारतीयांना दुय्यम दर्जाचं जिणं जगण्यास भाग पाडत होते. त्याविरुद्ध संतपरंपरेनं मोठी क्रांती घडवली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या या क्रांतीचं नेतृत्व नामदेवांनी केलं.

   ते एका शिंपी परिवारात जन्मले. त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावात किंवा पंढरपुरात झाला. वडील दामाशेटी. आई गोणाई. आऊबाई बहीण. अकराव्या वर्षी लग्न झालं ते राजाईंशी. नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल ही चार मुलं. लिंबाई मुलगी. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सुना. असा छान बहरलेला संसार त्यांनी केला. त्यांच्या देवपिसे होऊन केलेल्या भक्तीला सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर त्यांनी सगळ्यांना आपलं बनवलं. या सगळ्या परिवारानेच नामदेवांच्या प्रभावात अभंगरचना केली आहे.

    अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. पांडुरंगच त्यांचं सर्वकाही होता. आई बाप सोयरा सखा गुरू देव स्वामी तोच होता. विठ्ठलाशी ते संवाद साधत. या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला, अशी स्रर्वात प्रसिद्ध कथा आहे. पुढे दगडाचा देव बोल नाही, अशी आपल्या अभंगातून ग्वाही देणा-या नामदेवांनी लहानपणीच अध्यात्मिक क्षेत्रात मोठाच अधिकार प्राप्त केला होता, एवढं मात्र यातून नक्कीच म्हणता येईल. पण नामदेवांची दुसरी कथा यापेक्षाही महत्त्वाची आहे. सुकी भाकरी पळवून नेणा-या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन जाणारे नामदेव, देवाला दूध पाजणा-या नामदेवांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते लहान वयातच सर्वांभूती भगवंत पाहू शकत होते, हे महत्त्वाचं.

   नामदेवांनी सत्य समजून घेण्यासाठी वेदज्ञ, शास्त्रज्ञांकडे हेलपाटे घातले. पण ज्ञातिहीन नामदेवांना कोण उभं करणार? त्यामुळे त्यांनी भक्तीतून म्हणजे थेट भगवंतालाच आधार मानून स्वतःच बुद्धीचा कस लावत विश्वाचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून ते लंगोटी नेसून चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करत सद्विचारांचा प्रसार करू लागले होते. ही वाट स्वतःच शोधायची होती. त्यातून साधनेची नवीनवी साधनं निर्माण होऊ लागली. श्रोत्यालाही सामावून घेणारी वारकरी सामूहिक कीर्तन भजनाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. त्यासाठी त्यांनी अभंग या छंदाची निर्मिती केली. अभंग हा छंद गाळला, तर मराठी वाङमयात काय उरतं, याचा विचार केलेला बरा. नामदेवांनीच वारक-यांचा लाडका काल्याचा सोहळाही सुरू केला.

   तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी नुकतीच भगवद्गीतेची गंगा मराठीत आणली होती. त्यातून नामदेवांना आपल्या कामासाठी तत्त्वज्ञानाचं अधिष्ठानच मिळालं होतं. कुशल संघटक असणा-या निवृत्तीनाथांना आणि नामदेवांना एकत्र यावसं वाटणं स्वाभाविकच होतं. त्यासाठी वयाने आणि कर्तृत्वाने ज्येष्ठ असून नामदेव स्वतः आळंदीला गेले. तिथे संत गोरा कुंभारांच्या नेतृत्वात झालेल्या संतसंमेलनांमधल्या चर्चांमधून नामदेवांना भगवद्कार्यासाठी अधिक ज्ञान मिळवण्याची गरज लक्षात आली. त्यासाठी त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून देवाच्या सगुण निर्गुण रूपाविषयी स्पष्टता मिळवली. याच देवळात कीर्तन करताना त्यांचा पुरोहितांनी केलेला अपमानही त्यांच्यासाठी विचारांचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल इतका ताकदीचा आहे, हेदेखील लक्षात ठेवायला हवं.

    नामदेव ज्ञानदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला येत होता. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. त्यातून कीर्तनाच्या रंगी नाचत देशभर ज्ञानदीप लावण्यासाठी दोघांच्याही प्रभावातली सगळी संतमंडळी एकत्र झाली. त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरू झाली. महाराष्ट्र पिंजून गुजरात, राजस्थान आणि पंजाबापर्यंत हे संत गेले. माणसाला माणूस बनवण्याची ही धडपड होती. नामदेव कीर्तन करत. चोखामेळ्यासारखे अस्पृश्यही टाळकरी बनून त्यांना साथ देत. जनाबाईंसारखी जातीने अतिशूद्र असणारी स्त्री कीर्तनाचं संचलन करत. ज्ञानदेव अभंग सूचवत. अशा जातीपातीच्या भिंती तुटत होत्या. गोरा कुंभार, सावता माळी, परिसा भागवत, चोखा महार आणि त्यांचा परिवार, जगन्मित्र नागा, नरहरी सोनार, दासी जनी सगळेच त्यात होते. पंजाबातून जाल्हण सुतारही पंढरपुरापर्यंत सोबत आले. हे संत म्हणजे टाळकुटे विरक्त नव्हते तर त्या त्या समाजांचे धार्मिक, वैचारिक आणि सामाजिक नेतेच होते.

     या ऐतिहासिक तीर्थयात्रेचं उद्यापन पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटावर झालं. स्पृश्य अस्पृश्य, उच्च नीच असे सगळे भेदाभेद सहभोजनात गळून पडले. धर्माच्या नावाखाली चालणा-या नीच जातिभेदांना दिलेला हा मोठा धक्का होता. पुढे नामदेवांनी पंढरपुरातल्या विठ्ठलमंदिराच्या दारात उभी केलेली चोखोबांसारख्या अस्पृश्याची समाधी त्यांच्या खंबीर क्रांतिकारत्वाचा पुरावाच आहे. यानंतर लवकरच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्याचा अत्यंत हृदयद्रावक आंखो देखा हाल नामेदवांनी लिहून ठेवलाय. पुंडलिकापासून जनाबाईंपर्यंतच्या भक्तांचं चरित्र लिहून नामदेवांनी या क्रांतिकारक चळवळीचं मोठंच डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. ते महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचे चरित्रकार मानायला हवेत आणि ते आद्य आत्मचरित्रकारही आहेत.

      त्यांनी एक कोटी अभंग लिहिले, असं मानलं जातं. याचा अर्थ त्यांनी विपुल संख्येने साहित्यरचना केली असा घ्यायला हरकत नाही. त्यांच्या साहित्याची भाषा खूपच सोपी आहे. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, चांगदेव या त्यांच्या समकालीनांच्या तुलनेत आज आपल्याला त्यांची भाषा लगेच कळते. त्यांनी कायम अत्यंत सर्वसामान्यांसाठी लिहिलं. त्यात संवाद आणि नाट्य आहे. लोककलांचे विविध फॉर्म त्यांनी हाताळलेत. श्रीकृष्णाच्या लीला सांगताना त्यांनी मराठीतल्या पहिल्या बालकविताही लिहिल्यात. मराठीतल्या गझलेची पहिलं पावलं शोधतानाही संशोधक त्यांच्यापर्यंत पोहोचतात, इतकं त्यांचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे. तरीही त्यांचं खूपच कमी साहित्य आज उपलब्ध आहे.

       ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतरही नामदेवांनी तीर्थयात्रा करून रामेश्वरापासून मुलतानपर्यतचा भारत पालथा घातला. जिथे गेले तिथले बनले. लोकभाषांतून काव्य केलं. हिंदी साहित्याला नवं भान दिलं. त्यांच्या कामातूनच पुढे रामानंद, कबीर, नानक, दादू दयाळ, मीरा, नरसी मेहता, मलूकदास अशी संतांची मांदियाळी देशभर उभी राहिली. पंजाबात तर ते दोन दशकांहून अधिक काळ राहिले. तिथे त्यांनी केलेल्या मशागतीतून शीख धर्माचा वटवृक्ष उभा राहिलाय. नारायण आणि नामदेव एकच आहे असं मानणा-या शीख परंपरेच्या गुरू ग्रंथसाहेबातही नामदेवांची ६१ पदं आहेत.

       नामदेवांचा देशभरावरचा प्रभाव आजही पाहता येतो. महाराष्ट्र आणि पंजाबाबरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत त्यांची मंदिरं आहेत. तामिळनाडूपासून जम्मूपर्यंतचे लाखो लोक त्यांचं नाव एकतर आडनाव म्हणून किंवा जातीची ओळख म्हणून अभिमानाने मिरवतात. इतकी वर्षं संपूर्ण देशभर प्रभाव असणारा दुसरे कुणी लगेच डोळ्यासमोर येत नाही. ३ जुलै १३५० रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला. त्यांची एक समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे. तर दुसरी पंजाबमधील घुमान येथे आहे.   

पाप्या नावडे संतसंगती हा संत नामदेवांचा अभंग ईश्वराच्या नामाची महती सांगणारा असून त्यातून कलयुगाचे वर्णन आलेले आहे.


साभार : 'रिंगण' सचिन परब

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

आज्ञापत्र- रामचंद्रपंत अमात्य

आज्ञापत्रात एकूण नऊ प्रकरणे आहेत. पहिल्या दोन प्रकरणांत शिवाजीने स्वराज्यस्थापनेसाठी केलेल्या परिश्रमांचे आणि संभाजी व राजाराम यांनी ते टिकविण्याकरिता घेतलेल्या कष्टांचे वर्णन आलेले आहे. तीन ते नऊ ही प्रकरणे मुख्यत: राजनीतिविषयक असून त्यांत राजधर्म, प्रधानसंयोजन, सावकारी किंवा व्यापार, वतनदारांचे दायादत्व आणि त्यांचे नियंत्रण, वंशपरंपरागत सेवा-इनाम देण्यात प्रतिकूलत्व, सामाजिक वृत्तीविषयी अनुकूलत्व, गडकोटांचा बंदोबस्त, आरमाराचे महत्त्व आणि त्याची व्यवस्था असे विषय आले आहेत. आज्ञापत्रातअष्टप्रधान संस्थेचा उल्लेख कोठेही नाही; सरकारकुनांचा आहे. प्रधानाची निवड करताना कोणते गुण ध्यानी घ्यावेत, या संबंधीचे विवेचन अत्यंत मार्मिक आहे. स्वराज्यात सावकारांचे व व्यापाऱ्यांचे स्थान काय आहे हे सांगून फिरंगी, इंग्रज, फ्रेंच वगैरे परकीय सावकारांच्या आक्रमक मनोवृत्तीचे वर्णन केले आहे. टोपीकरांस स्थललोभ कसा आहे, ती जात हट्टी कशी आहे, “हातास आले स्थळ मेलियाने” कसे सोडीत नाहीत, यांच्या “वखारेस जागा देणे आलेच ”, तर ती खाडीच्या तोंडाशी का देऊ नये इ. बाबींचे स्पष्टीकरण लक्षणीय आहे. गडकोटांविषयीचे प्रकरण विशेष महत्त्वाचे आहे. “संपूर्ण राज्याचे सार ते दुर्गे” असा आज्ञापत्रकारांचा निष्कर्ष आहे. गडकोटांसंबंधीचे विवेचन त्यांनी अत्यंत बारकाईने केले आहे. वतनदारांविषयी आज्ञापत्राततीव्र तिटकारा व्यक्त केलेला आहे. कोणालाही कोणत्याही कारणास्तव जमिनी इनाम देऊ नयेत, हे स्पष्ट केले आहे. तथापि धर्मार्थ जमीन देणे असल्यास धर्माधर्माचा सूक्ष्म विचार करून ती द्यावी, असेही म्हटले आहे. आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे, असे सांगून “ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र” असे मार्मिकपणे नमूद केले आहे. आज्ञापत्राची लेखनशैली संस्कृतप्रचुर असली, तरी प्राय: अनलंकृत आहे.लेखनकाळानुसार आज्ञापत्रात फार्सी शब्दही आले आहेत. विषयाचा अचूक वेध घेणारी शब्दयोजना हे आज्ञापत्राचे एक वैशिष्ट्य आहे. पुष्कळदा विशेषणे लावताना शब्दांची माळ निर्माण केली जाते, तर अनेकवार राजनीतिविषयक सखोल आशय छोट्या छोट्या वाक्यांतून सहजपणे व्यक्तविला जातो. मराठेशाहीतील उत्तम गद्यलेखनाचा तो एक नमुना आहे.

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती ( Part Of Speech )


मराठी भाषेप्रमाणे इंग्रजी भाषेतही शब्दांच्या आठ जाती आहेत. शब्दांच्या जाती माहीत असल्यास व्याकरणाचे आकलन लवकर होते, वाक्यरचना सुलभ होते आणि शब्दातील भेद समजण्यास मदत होते.

शब्दांच्या जाती  :-

अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात.

शब्दांच्या २ जाती आहे.
 विकारी (सव्यवबदल होणे         :-  नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
 अविकारी (अव्यव ) बदल  होणे:-  क्रियाविशेषण अव्यव, शब्दयोगी अव्यव,                                                                          उभयन्हावी अव्यव, केवलप्रयोगी अव्यव

शब्दांच्या आठ जाती

  1. नाम ( Noun )
  2. सर्वनाम ( Pronoun )
  3. विशेषण ( Adjective )
  4. क्रियापद ( Verb )
  5. क्रियाविशेषण ( Averb )
  6. शब्दयोगी अव्यय ( Preposition )
  7. उभयान्वयी अव्यय ( Conjunction )
  8. केवलप्रयोगी अव्यय ( Interjection )

नाम -

असा शब्द की जो एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणासंबंधी वापरला जातो.
उदा. Sanjay; Cow; Gold etc
Image result for शब्दांच्या जाती
(संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा,
  1. व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
  2. जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
  3. भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
  4. समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
  5. द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना

सर्वनाम -

असा शब्द की जो नामाव्यतिरिक्त वापरला जातो.
उदा. I; He; She; It; They; You; My etc

नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
  1. पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
  2. निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
  3. अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
  4. संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
  5. प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?

विशेषण-

असा शब्द की जो नाम किंवा सर्वनाम यांविषयी अधिक माहिती सांगतो.
उदा. Rakesh is a good boy.
या वाक्यात good हे विशेषण आहे.

नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
  1. गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
  2. संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
  3. परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
  4. संकेत वाचक विशेषण :हे ,ते .

क्रियापद ( Verb )-

असा शब्द की जो व्यक्ती, वस्तू, ठिकाण किंवा कृती यांविषयी माहिती सांगतो.
उदा. I eat a Mango.
या वाक्यात eat हे क्रियापद आहे.

 एखादी क्रिया घडणे .

  1. सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
  2. अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
  3. संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .

Image result for शब्दांच्या जाती

क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
  1. स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
  2. कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
  3. परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
  4. रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात 

शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे .


उभयान्वयी अव्यय ( Conjunction )-

असा शब्द की जो दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्यासाठी वापरला जातो.
दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .
उदा. 1) Ajay and Vijay are Brothers.

केवलप्रयोगी अव्यय ( Interjection )-

असा शब्द की जो भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जातो.
आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !
उदा. Oh !; Hello !; etc

संदर्भ 
marathivyakran.blogspot.com/
http://gurumitra.in/gurumitra

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जीवन परिचय


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री, बौद्ध धर्म पुनरुत्थानक आणि स्वातंत्र भारताचे जनक होते. याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्य, कामगार व स्त्रियांच्या अधिकारांचे पुरस्कर्ते होते.


आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते. सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या, कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधनासाठीचे एक विद्वान म्हणून प्रतिष्ठित झाले.
आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि भारताच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील एक उच्च उपाधी प्रदान केली. इ.स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीसह जगभरातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांचा जन्मदिवस आंबेडकर जयंती सुद्धा दरवर्षी भारतासह जगभरात साजरी केली जाते. इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (द ग्रेटेस्ट इंडियन) या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर विजयी ठरले आहे. तर इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात बुद्धिमान विद्यार्थी (फर्स्ट कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम) म्हणून घोषित केले आहे.

उच्च शिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपले उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, बॉन विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या संस्थांमधून घेतले आहे. त्यांनी इ.स. १९१२ मध्ये बी.ए., इ.स. १९१५मध्ये दोन वेळा एम.ए., इ.स. १९१७ मध्ये पी.एचडी., इ.स. १९२१ मध्ये एम.एस्‌‍सी., इ.स. १९२२ मध्ये बार-ॲट-लॉ, इ.स. १९२३ मध्ये डी.एस्सी., इ.स. १९५२ मध्ये एल्‌एल.डी., इ.स. १९५३ मध्ये डी.लिट् आणि इतर अशा अनेक पदव्या मिळवल्या.
बाबासाहेब आंबेडकर परदेशात अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएचडी) मिळवणारे पहिले भारतीय होते. याशिवाय संपूर्ण दक्षिण आशियातून दोन वेळा डॉक्टरेट (पीएचडी व डी.एससी.) मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. बाबासाहेब त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक बुद्धिमान व सर्वाधिक उच्च विभूषित भारतीय व्यक्ती होते.

मुंबई विद्यापीठ

भीमराव आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३ मध्ये ते बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती.
मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.

कोलंबिया विद्यापीठ

महाराज बडोदा संस्थान त्यांच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. महाराज सयाजीराव गायकवाड भीमरावांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वावर प्रसन्न होते. महाराजांनी, भीमरावांना होकार दिल्यामुळे ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती.
त्यानंतर बोटीने प्रवास करून भीमराव आंबेडकर २० जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोहचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र शाखेत त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय अर्थशास्त्र व इतर विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले.
न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीस ते कोलंबिया विद्यापीठाच्या धईले हॉलमध्ये राहिले आणि नंतर रस्ता नं. ११४ वरील कॉस्मोपॉलिटन क्लब, न्यूयॉर्क पश्चिम ५६४ इथे राहिले, कारण इथे काही भारतीय विद्यार्थी रहात होते. तसेच सातारा हायस्कूलमधील त्यांचा एक वर्गमित्र सुद्धा तेथेच होता.

लंडनमधील सन्मान

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलीटिकल सायन्समध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा स्थापला गेला आहे. आणि त्याठिकाणी पुतळा असणारे ते प्रथम भारतीय आहेत.
ग्रेज इनमध्येही आंबेडकरांचे तैलचित्र लावण्यात आले आहे. या संस्थेत तैलचित्र असणारे ते एकमेव भारतीय आहेत. ६ डिसेंबर २०१६ रोजी ग्रेज-इन, लंडनमध्ये बाबासाहेबांचे नवीन तैलचित्र लावण्यात आले. ग्रेज-इन हे ब्रिटनच्या चार कोर्ट् ऑफ लंडनपैकी एक असून येथे १९२२ मध्ये बाबासाहेबांनी ‘बॅरिस्टर अॅट लॉ’ कायद्याची पदवी दिला गेली होती. येथे १२ तैलचित्र आहेत, त्यापैकी १० प्रसिद्ध ब्रिटिश न्यायधीशांची आहेत, १ आयरीश न्यायधीशाचे आहे आणि १२ वे तैलचित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. बाबासाहेबांचे हे तैलचित्र हेझल मोर्गन या ब्रिटिश महिलेने तयार केलेले आहे.
डॉ. आंबेडकर राहत असलेल्या युनायटेड किंग्डमच्या वायव्य लंडनमधील १० किंग हेनरी मार्गावर असलेल्या वास्तुला महाराष्ट्र सरकारद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बनवले गेले असून याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक १४ नोव्हेंबर २०१५ रोजी करण्यात आले. हे स्मारक तीन मजली असून क्षेत्रफळ २०५० चौरस फुट आहे. या वास्तुवर ‘सामाजिक न्यायाचे भारतीय पुरस्कर्ते, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५०), यांनी १९२१-२२ मध्ये येथे वास्तव्य केले’ अशी अक्षरे कोरलेली आहेत.

वकीली

ऑक्टोबर इ.स. १९२६ मध्येआंबेडकरांनी काही महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता ब्राह्मण तीन गैर-ब्राह्मण नेते के. बी. बागडे, केशवराव जेधे आणि दिनकरराव जावळकर यांच्यावर ब्राह्मणांनी देश उद्ध्वस्त केला अशा आशयाची पत्रके लिहिली होती म्हणून त्या तिघावर खटला भरण्यात आला होता. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल. बी. भोपटकर होते.आंबेडकरांनी आपला खटला अतिशय विश्वासाने लढला, अतिशय प्रशंसनीय बचाव केला आणि खटला जिंकला.

अस्पृश्यतेचा विरोध

बाबासाहेबांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.

मनुस्मृतीचे दहन मनुस्मृतिकाराची चूक

शूद्रावर कशा प्रकारचे अन्याय ब्राह्मणी हिंदू वाङमयाने वा शास्त्राने केलेले आहेत, ते थोडक्यात खाली दिलेले आहेत. स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख करावा लागेल.
1. समाजात शुद्राचे स्थान सर्वांच्या पायदळी असावे.
2. शुद्र अपवित्र असल्यामुळे कोणतेच धार्मिक पवित्र कार्य त्याची उपस्थितीत करू नये.
3.इतर वर्गाप्रमाणे त्याला मान देऊ नये.
4. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या जीवासारखी शूद्राच्या जीवास एका कवडीची पण किंमत नाही.
5. कसल्याच प्रकारची नुकसान भरपाई न देता शुद्राचा जीव घेण्यास कसलीच आडकाठी असू नये.
6. शुद्राने शिक्षण घेऊ नये. त्यांना शिक्षण देणे हे पाप आहे.
7. शुद्राने कसल्याच प्रकारची संपत्ती कमविण्याचा हक्क नाही. जर ब्राह्मणास आवश्यक असेल तर ते शुद्रांची कमविलेली संपत्ती घ्यावी.
8. सरकार दरबारी शुद्रास नोकरीस ठेवू नये. वरिष्ठ वर्गाची सेवाचाकरी हेच शुद्राचे मुख्य कर्तव्य आहे. हाच त्याचा धर्म आहे आणि त्यातच त्यांची मुक्ती आहे.
9. उच्चवर्णियांनी शुद्राशी आंतरजातीय विवाह करू नयेत. शुद्राची स्त्री रखेल म्हणून ते ठेवू शकतात.
10. उच्चवर्णीय स्त्रीस शुद्राने नुसता स्पर्श जरी केला तरी, त्यास जबर शिया करावी. शुद्राचा जन्म गुलामगिरीत होतो आणि त्याने गुलामगिरीतच मरावे.

मनुस्मृती दहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. काही हिंदूंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे. हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदूंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो. मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले. मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे. म्हणून मनुस्मृतीचे २५ डिसेंबर इ.स. १९२७ रोजी समारंभपूर्वक जाहीरपणे दहन केले.
ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला धक्का होता. या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली. मनुस्मृती दहनापूर्वी डॉ. आंबेडकरांनी लोकांसमोर भाषण केले.
मनुस्मृती दहनभूमीसाठी एक ६ इंच खोल खड्डा आणि एक अर्धा फुट चौरस खड्यात चंदनाच्या लाकडांची तुकडे टाकून भरण्यात आली होती. सभेतील मंडपाच्या चारही कोपऱ्यांवर तीन खांबांवर फलक (बॅनर) बसविले होते. ज्यावर “मनुस्मृतीची दहनभूमी”, अस्पृश्यता नष्ट करा आणि ‘ब्राह्मणवाद गाडा’ असा मजकूर होता.
२५ डिसेंबर १९२७ च्या संध्याकाळी सभेत आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पी.एन. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सरणावर मनुस्मृती ठेऊन तिचे दहन करण्यात आले. हे काम आंबेडकर आणि ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच सहा इतर दलित सहकाऱ्यांनी पूर्ण केले. मंडपात केवळ मोहनदास करमचंद गांधी यांचाही एकच फोटो होता.
३ फेब्रुवारी इ.स. १९८८ ला बहिष्कृत भारत या त्यांच्या वृत्तपत्रात त्यांनी या विषयावर सांगितले की, मनुस्मृतीच्या वाचनाने त्यांची खात्री पटली आहे कि त्यांनी सामाजिक समतेच्या विचाराचा दूरवर पुरस्कार केलेला नाही.
१९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत स्वत: बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावर जोर देऊन म्हटले होते, ‘‘ते एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदूंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही.
मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वत: समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!’’
तेव्हापासून दरवर्षी ‘२५ डिसेंबर’ हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो.

मंदिर सत्याग्रह अंबादेवी मंदिर सत्याग्रह

अमरावती येथील प्राचीन ‘अंबादेवी मंदिरात’ प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला. देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.

पर्वती मंदिर सत्याग्रह

अमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून अर्ज फेटाळला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां ना राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां ना राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.

काळाराम मंदिर सत्याग्रह

काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. या सत्याग्रहात स्त्रीयांचा सहभाग होता आणि 1934 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सत्याग्रह मागे घेण्यात आला
(विकिपीडिया मधून साभार)

परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा व परभणी जिल्ह्यातील वास्तुशिल्प कला

परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा व  परभणी जिल्ह्यातील वास्तुशिल्प कला