बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

ना. धों. महानोर यांची सूर्य नारायणा कविता

सूर्य नारायणा नित्य नेमाने उगवा नामदेव धोंडो महानोर (जन्म : पळसखेड-कन्नड तालुका-औरंगाबाद जिल्हा, १६ सप्टेंबर १९४२) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत.

ना.धों. महानोरhttps://youtu.be/9AfFRyv87hU

महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे.

ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांच्या ‘रानातल्या कवितां'ना खरा मातीचा गंध येतो.

  • झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना गायल्या गेल्या त्या शशांक पोवार याने संगीतबद्ध केल्या होत्या.
  • देवकी पंडित यांनी महानोरांनी लिहिलेली काही चित्रपट गीते गायली आहेत, ती अशी :-
  • जाळीमधी झोंबतोया गारवा (कवी -ना.धों. महानोर, संगीत - आनंद मोडक, चित्रपट - एक होता विदूषक, सहगायक - रवींद्र साठे)
  • तुम्ही जाऊ नका हो रामा (कवी - ना.धों. महानोर, संगीत - आनंद मोडक, चित्रपट - एक होता विदूषक, सहगायक - आशा भोसले)
  • सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा (कवी - ना.धों. महानोर, संगीत - आनंद मोडक, चित्रपट - एक होता विदूषक)
  • श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' ही आशा भोसले यांनी 'एक होता विदूषक' या चित्रपटासाठी गायली आहे.
  • डाॅ. शुभा साठे यांनी ना.धों. महानोरांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
  • संगीत दिगदर्शक हर्षित अभिराज यांनी ना.धों. महानोर यांच्या 'दूरच्या रानात केळीच्या बनात' या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध करून आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली कोती..

जीवनसंपादन करा

महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झालेसंदर्भ हवा ]. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतलेसंदर्भ हवा ]. मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.

प्रकाशित साहित्यसंपादन करा

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
अजिंठा (कवितासंग्रह)दीर्घ कवितापॉप्युलर प्रकाशन१९८४
कापूस खोडवा)शेतीविषयक
गंगा वाहू दे निर्मळकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
गपसपकथासंग्रहसमकालीन प्रकाशन
गावातल्या गोष्टीकथासंग्रहसमकालीन प्रकाशन
जगाला प्रेम अर्पावेकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
त्या आठवणींचा झोकासाकेत प्रकाशन
दिवेलागणीची वेळकविता संग्रहसाकेत प्रकाशन
पळसखेडची गाणीलोकगीतेपॉप्युलर प्रकाशन
पक्षांचे लक्ष थवेपॉप्युलर प्रकाशन
पानझडपॉप्युलर प्रकाशन
पावसाळी कविताकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
पु. ल. देशपांडे आणि मी]]समकालीन प्रकाशन
यशवंतराव चव्हाणसाकेत प्रकाशन
यशवंतराव चव्हाण आणि मीव्यक्तिचित्रणपरसमकालीन प्रकाशन
या शेताने लळा लाविलासमकालीन प्रकाशन
रानातल्या कविताकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
शरद पवार आणि मीसाकेत प्रकाशन
शेती, आत्मनाश व संजीवनशेतीविषयकसाकेत प्रकाशन

नामदेव धोंडो महानोर हे गीतकार असलेले चित्रपटसंपादन करा

चित्रपटवर्ष (इ.स.)
अबोलीइ.स.१९९५
एक होता विदूषकइ.स.१९९२
जैत रे जैतइ.स.१९७७
दूरच्या रानात केळीच्या बनात (आल्बम)इ.स.२०१४?
दोघीइ.स.१९९५
मुक्ताइ.स.१९९४
सर्जाइ.स.१९८७

राजकीय कारकीर्दसंपादन करा

महानोर हे १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे नियुक्त सदस्य झाले.

--ना.धों. महानोर यांच्यासंबंधी आणि त्यांच्या साहित्यावरील पुस्तके==

  • ना. धो. महानोरांची काव्यसृष्टी (सोमनाथ दडस)
  • ना. धों. महानोरांची प्रतिमासृष्टी आणि संपादने (सोमनाथ दडस)

पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा

  • भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार, इ.स.१९९१
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९
  • साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड'
  • विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२०१३)
  • महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७)
  • अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार.
  • जळगाव येथील भॅंवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन सर्वोत्कृष्ट गद्य लेखनासाठी ना.धों. महानोर पुरस्कार देते. १९१६-१७चा हा पुरस्कार किरण गुरव यांना मिळाला होता.
  • सदानंद देशमुख यांनाही निसर्गकवी ना.धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्कार (जळगाव) मिळाला होता.
  • इ.स. १९९३ सालापासून सेवा संघाच्या माध्यमातून सु.ल. गद्रे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साहित्य, कला आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत पुरस्कार ठेवले आहेत. ना.धों. महानोर यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.
  • अनुराधा पाटील यांना 'दिवसेंदिवस' ला बहिणाबाई प्रतिष्ठान, पुणे या संस्थेकडून १९९३ साली उत्कृष्ट काव्यलेखनासाठी कवी ना.धों. महानोर काव्य पुरस्कार मिळाला होता.
  • रणधीर शिंदे यांनाही २०१४ साली जालना येथे ना.धों. महानोर पुरस्कार मिळाला होता.
  • औदुंबर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • प्रकाश होळकर यांनी 'रानगंधाचे गारूड' नावाचा ना.धों.महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ लिहिला आहे.
  • यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील फलटण या गावी, २५ ते २७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी यशवंतराव चव्हाण स्मृति साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे व फलटण शाखा आणि सातारा जिल्हा परिषद यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी ना.धों. महानोर होते.
  • भालचंद्र वनाजी नेमाडे यांना ’देखणी’साठी १९९२ साली ना.धों. महानोर पुरस्कार मिळाला होता.
  • मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
  • १ले जलसाहित्य संमेलन नागपूरमध्ये २००३मध्ये झाले होते . संमेलनाध्यक्ष - श्री. ना.धों. महानोर होते. हे संमेलन नागपूरच्या महिला पाणी मंचाच्या सहकार्याने पार पडले होते.
  • नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबार येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष रानकवी ना. धों. महानोर होते.
  • यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईचा ३ रा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार २०१५


सूर्यनारायणा नित्‌ नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा

ओंजळीनं भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची

आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे

सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

संत संताजी जागनाडे

 संताजी जगनाडे ( जन्म 6 डिसेम्बर 1824) हे संत तुकारामांनी गायलेल्या परिच्छेदांची पटकथा प्रसिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते जातीनुसार तेली होते आणि त्यांना 'संतू तेली' म्हणून देखील ओळखले जाते. संताजींनी रचलेल्या अभंगांना पाचवा वेद म्हणतात. संत तुकाराम महाराज त्यांच्या कीर्तनात अभंग सांगत असत.

संतजी महाराज-जगन्नाडे-महाराज-समाधी-मंदिर-सुदंबरे

जीवन चक्रसुधारणे

श्री संताजी जगनाडे महाराजांचा जन्म 6 डिसेंबर 1824 रोजी चाकण गावात झाला जो सध्या पुणे जिल्ह्यातील खेड तहसीलमध्ये आहे. त्यांचा जन्म जगन्नाडे कुटुंबातील श्री.विठोबा पंत आणि मथुबाई यांच्यात झाला. त्याच्या घराचे वातावरण आध्यात्मिक आणि धार्मिक होते. त्याचे पालक   विठ्ठल भक्त होते. श्री संताजींची आई नियमितपणे चक्रेश्वर मंदिरात जायची. लहान संताजी आईबरोबर दररोज मंदिरात जायचे.

एक दिवस संताजी महाराज आणि त्याची आई चक्रेश्वर मंदिरात जात होते. संताजीला रस्त्यावर एक भिकारी सर्व पाहुण्यांकडे अन्न मागताना दिसला. संताजींनी आईला थांबण्यास सांगितले आणि त्यांच्या हातातून भोगाची प्लेट काढून त्या गरीब भिका beg्याला दिली. असे केल्यावर संताजीची आई त्याला म्हणाली, "हे काय वेडेपणा आहे, आता मी देवाला कोणाला अर्पण करीन?" यावर संताजी म्हणाले, "आई, जर आम्ही त्यांना हे भोजन दिले नसते तर ते मरण पावले. आई कुणाला भुकेला भोजन देण्यासारखे असते ते म्हणजे देव खायला घालण्यासारखे. आईने संताजीचे म्हणणे ऐकले," आई हसले. इतक्या लहान वयातच, तुमच्या आतून असे चांगले विचार कोठून आले? "

मराठी तेली समाज रायपूर छत्तीसगडमध्ये संताजीची पुतळा स्थापित

शिक्षण आणि विवाहसुधारणे

सांताचे शिक्षण वडिलांकडून घरीच झाले. त्यावेळी चाकण हे एक प्रसिद्ध बाजारपेठ होते. संताजीचे वडील विठोबापंत जगनाडे हे खाद्यतेल उत्पादक होते. संताजींनी वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचे कौटुंबिक व्यवसाय तेलाचे उत्पादन शिकले. वयाच्या 12 व्या वर्षी यमुनाबाईशी त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या वेळी यमुनाबाई 6 वर्षांची होती.

संत तुकाराम महाराजांची भेटसुधारणे

एके दिवशी संत तुकाराम महाराज संताजीच्या गावी आले आणि त्यांनी चक्र धार मंदिरात स्तोत्रे गायली, हे ऐकून संतजी संत तुकारामांवर   खूप प्रभावित झाले आणि त्यांनी कुटुंबाला सोडून त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी, संताजीच्या आई-वडिलांच्या सांगण्यावरून, तुकाराम जींनी त्यांना समजावून सांगितले की, कुटुंबात राहूनही देवप्राप्ति होऊ शकते. त्यानंतर संताजी महाराज जगतगुरू तुकाराम महाराजांचे शिष्य झाले. संत तुकाराम महाराज जे त्यांच्या कीर्तनात अभंग सांगत असत, संतजी त्यांची पटकथा लिहीत असत, संत जी त्यांच्याबरोबर संत तुकारामांच्या सावलीप्रमाणे राहत असत. श्री संताजी जगनाडे महाराजांची सेवा करण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी श्रीसंताजी जगनाडे महाराजांना त्यांच्या कार्यसंघाचे चौदा कार्यकारी बनविले.

अखंड डिझाइनसुधारणे

संत तुकाराम महाराजांचा प्रभाव लोकांवर वाढत असताना काही ब्राह्मणांचा व्यवसाय कमी होत होता. या कारणास्तव, काही ब्राह्मणांनी एकत्रितपणे तुकाराम जीची कृत्ये विसरून इंद्रायणी नदीत बुडविण्याचा प्रयत्न केला, पण संताजींनी हार मानली नाही आणि तुकारामजींची अखंड गाथा आठवली आणि त्यांना पुन्हा जागृत केले. या रचनांना 'पाचवा वेद' म्हणतात.

जेव्हा तुकाराम महाराजांना वैकुंठला जाण्याची वेळ आली तेव्हा संताजींनी त्यांच्याबरोबर वैकुंठाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. मग तुकाराम जी त्यांना म्हणाले की तुमचे काम येथे अजून पूर्ण झाले नाही. आपल्याला अखंड निर्मिती लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल आणि त्यांना योग्य मार्ग दाखवावा लागेल. मग संताजींनी त्याला वचन दिले की जेव्हा जेव्हा वैकुंठाकडे जाण्याची वेळ येईल तेव्हा ते स्वत: त्यांना घेऊन येतील. तुकाराम जी संताजींना वचन दिले आणि वैकुंठात गेले.

तुकाराम महाराज वैकुंठात गेल्यानंतर संताजींनी त्यांच्या अखंड निर्मिती जनतेपर्यंत नेल्या.

एकदा त्यांची पत्नी यमुनाबाई तिच्या माय घरी गेली. मग मोगल सैन्याने चाकणवर हल्ला केला आणि सर्व घरे लुटली आणि मराठी निर्मिती नष्ट करण्यास सुरवात केली. मग संताजींनी आपला जीव धोक्यात घालून अनेक किलोमीटर चालत सर्व अखंड रचना सुरक्षितपणे सुडुंबरे येथे नेल्या.

मृत्यूसुधारणे

संताजी मरण पावली तेव्हा लोकांनी त्याचे थडगे बांधण्यासाठी संतांसारखे चिखल ठेवले, परंतु बर्‍याच प्रयत्नांनंतरही लोक त्यांचे डोके झाकून ठेवू शकले नाहीत. मग संत तुकाराम जी त्यांचे वचन पाळण्यासाठी वैकुंठहून आले आणि संताजीवर तीन मूठ माती टाकली, ज्याने संत जीच्या संपूर्ण शरीरावर झाकून टाकले आणि ते त्यांना घेऊन वैकुंठात गेले.

आजही संताजींनी रचलेला अभंग सुदंबरे येथील त्यांच्या समाधीजवळ सुरक्षित आहे.

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

आईची आठवण- माधव जूलियन

 प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलियन ....एक धांडोळा ...



प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !

माधव ज्यूलियन

बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?


नाही जगात झाली आबाळ या जिवाची,

तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,

आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.


ही भूक पोरक्याची होई न शांत आई,

पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही.

वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,

नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !


वक्षी तुझ्या परि हे केव्हा स्थिरेल डोके,

देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,

खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !


आईची महती सांगणारी ही कविता आहे प्रसिद्ध कवी माधव ज्यूलियन यांची. आईची गाथा आपल्या कवितेतून अनेकांनी गायली आहे, प्रत्येक कवीने आपल्या प्रतिभाशक्तीचा वापर करून आपले भाव व्यक्त केले आहेत. 'आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी' ही कवी यशवंतांची कविता असो वा 'आई म्हणजे काय असते' ही फ.मु.शिंदे यांची कविता असो किंवा 'ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता..' ही कवी ग्रेस यांची कविता असो, 'आई'ची थोरवी शब्दबद्ध असलेल्या सकळ कविता सर्व वयाच्या, सर्व वर्गाच्या अन सर्व प्रांतातील लोकांना या कविता भावल्या. आजही या कवितांचा वाचकवर्ग या कवितांना आठवून हळवा होतो. आपल्या मनातील भावनाच कवी मांडतात अशी यामागची भावना रसिक वाचकांमध्ये असते. माधव ज्युलियन यांच्या या कवितेस आता पाचेक दशके उलटून गेलीत पण ही कविता आजही अनेकांना तोंडपाठ आहे ! यातील आशय अन शब्दांची निवड एकमेकाशी इतके एकरूप झाले की ही कविता माधवरावांची ओळख बनून गेली.


'बालपण देगा देवा' असं संतांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना वाटत असते, त्यातील एक सहज स्वाभाविक कारण आईच्या प्रेमाच्या ओढीत दडलेले आहे. आई शैशवापासून ते वृद्धत्वापर्यंत सर्वांनाच हवीहवीशी असते. मात्र एक वेळ अशी येते की तिच्यापासून आपण दुरावतो. कारण काहीही असो, आपले घरदार सोडून कधी बाहेर जावे लागले तर सर्वात आधी आठवण येते आईचीच ! 'आईची आठवण झाली नाही' असं सांगणारा माणूस कधी कुणी पाहिला नाही. या कवितेत माधवरावांनी आईपासून विरक्त झालेल्या एका मुलाच्या मनातले आर्त भाव व्यक्त केले आहेत. जगातील कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील प्रेमाचे प्रथम स्वरूप आईचेच असते, म्हणून ते प्रेमस्वरूप आई या शब्दाने कवितेची सुरुवात करतात. मायेचा, वात्सल्याचा जगातला सर्वात मोठा सागर हा आईच्या रूपाने प्रत्येकास जन्मदत्त भेटीत प्राप्त होतो. म्हणून ते पुढे म्हणतात, वात्सल्यसिंधू आई !   


आई जर सोबतीस असेल तर कधीच आबाळ वा परवड होत नाही, मात्र तीच आई आपल्यासवे नसेल तर


जगातली सर्व सुखे असूनही तिची उणीव भासतेच. अशा 'आईस कोणत्या समरप्रसंगी आठवावे ?'असा प्रश्न कुणलाच पडत नाही कारण आई जेंव्हा नसते तेंव्हा साधीसोपी अडचण देखील यक्षप्रश्न बनून समोर उभी राहते. म्हणून माधवराव लिहितात की, "बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?". कारण आई सोबत असली की कुठला प्रश्न उरत नाही अन आई जेंव्हा नसते तेंव्हा कशाचेच उत्तर हाती लागत नाही !

अशा आईची अनेक लक्षावधी रूपे आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात, अगदी पाळण्यात घातल्यापासून ते घराबाहेर पडताना निरोपासाठी डोळ्यात आलेले पाणी लपवत हात हलवणारी आई असो वा पाठीवर थरथरता हात ठेवून आभाळभर आशीर्वाद देणारी आई असो वा आपल्या आजारपणात आपल्या बिछान्यात अहोरात्र बसून राहणारी आई असो वा आपल्या परीक्षा सुरु असताना आपल्याबरोबर भल्या पहाटे उठून जागी राहणारी आई असो किंवा घरकाम करताना व देवघरातल्या देव्हारयात फुले वाहताना एकाच तन्मयतेने रमणारी आई असो किंवा स्वतः उपाशी राहून आपल्या पिलांना सुखाचे घास भरवणारी आई असो वा माहेरचे उंबरठे टाळून आयुष्यभर मुलांच्या कल्याणासाठी सासरी राहून आपला चंदनदेह झिझवणारी आई अशा अनेक प्रतिमा डोळ्यापुढे येतात. म्हणून कवी म्हणतात की आईची नेमकी कोणती एक विशिष्ठ प्रतिमा मनःचक्षुपुढे येत नाही. अन त्यामुळेच की काय आई हवी हा हेका मन जीवनाच्या अंतापर्यंत कोणीच सोडत नाही. कारण आईच्या मायेची शिदोरीच अशी असते की ती उरतही नाही अन पुरतही नाही.


अशा भावविभोर परिस्थितीत जर अन्य कुणा मातेला तिच्या मुलांवर माया प्रेम करताना पाहिले तर आईच्या आठवणीनी डोळ्यात अश्रू दाटून येणं साहजिक आहे. अशा वेळेस मनात विचार येतात की आपण इथून तडक निघून जावं अन थेट आईच्या कुशीत डोकं टेकवून तिचा हात आपल्या मस्तकी धरावा. कारण आईच्या कुशीत जे सुख आहे ते जगाच्या पाठीवर कधी कुणी देऊ शकणार नाही अन त्याची सर अन्य कुणाला कधी येणार नाही. कितीही पोरका माणूस देखील अन्य कुणाच्या आईच्या कुशीत शिरला तरी त्याला तिथं जी माया प्रेम मिळते ती अवर्णनीय असते. कारण आपण आईच्या कुशीत असताना ती प्रसन्नहास्यवदनाने आपल्याकडे डोळे भरून पाहत असते अन आपण तिला चित्ती साठवत जातो. हे स्वर्गीय सुख घेण्यासाठी आईच्या कुशीतच मस्तक टेकवावे लागते.


मन जेंव्हा अधिक अस्थिर होते, व्यवहारी जगातील तिमिर तांडवात आपले वारू भरकटते तेंव्हा आपण अधीर होतो, बेचैन होतो, सैरभैर होऊन जातो. अशा प्रसंगी आईच्या छातीवर अल्वारपणे माथा टेकला की तिच्या हृदयातील शांत स्पंदनांचा जणू ती झुला झुलवते अन त्यावर आपण नकळत हिंदोळे घेतो. मग मनातले कुंद आभाळ तिथं निवळते. अशा आईची सर कुणाला येऊ शकत नाही, मनात तिच्या सहवासाची इच्छा अधुरी राहते, मन भरत नाही. तेंव्हा माधवराव म्हणतात की, :"आई तू पुन्हा जन्म घे अन मीही पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईन. (तेंव्हा कुठे तुझ्या प्रेमाची तहान कदाचित पूर्ण होऊ शकेल).

माधव ज्यूलियन कवितेच्या शेवटी देवालाच विनवणी करतात की, 'आपल्या जीवनात ही एकच अपेक्षा मनी राहिली आहे अन मनातली ही आस खरी ठरवण्याचे काम आता देवाने करावे !"


अत्यंत साध्या सोप्या तरल शब्दांत प्रत्येक पंक्तीगणिक कवी माधव ज्युलियन आईच्या प्रेमाची महती सांगताना तिच्या विरहावस्थेत येणारे भाव कथन करतात. अन वाचणारा त्यात आपल्या जीवनातील क्षण शोधू लागतो, आपल्या आईला आठवू लागतो. आपल्या आईची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे तरळत राहते अन आपल्या नकळत आपले डोळे ओले होतात. हे या कवितेचे सर्वोच्च यश म्हणावे लागेल. साहित्यिक परीमाणातील यशापयशाच्या मापददंडापेक्षा रसिक वाचकांच्या पसंतीस उतरून साहित्यिक मुल्ये जपण्याचे काम या कवितेने मोठ्या सहजतेने साध्य केले आहे. 


‘प्रेमस्वरूप आई’ या कवितेने अजरामर झालेले, मराठी कवितेच्या प्रसारासाठी स्थापन झालेल्या ‘रविकिरण’ मंडळातील लोकप्रिय कवी, उर्दू-फारसीचे अभ्यासक आणि गझल या काव्यप्रकाराची मराठी वाङ्मयामध्ये समर्थपणे भर घालणारे ज्येष्ठ कवी माधव ज्यूलियन उर्फ साहित्यिक माधवराव पटवर्धन हे मराठी साहित्यातील पहिल्या डी. लिट. पदवीचे मानकरी होते. मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन यांना ‘छंदोरचना’ या ग्रंथाबद्दल डी. लिट. पदवी देण्याचा निर्णय घेतला. ग्रंथाला डॉक्टरेट देण्याची ही मराठीतील पहिली घटना होती. त्याबरोबरच मराठी वाङ्मयाला हा बहुमान मिळवून देणारे माधव ज्यूलियन हे पहिलेच साहित्यिक ठरले आहेत. विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात माधव ज्यूलियन यांना डी. लिट. प्रदान करण्यात आली. या बहुमानानंतर अवघ्या काही महिन्यांतच म्हणजेच २९ नोव्हेंबर १९३९ रोजी माधव ज्यूलियन यांचे निधन झाले. पुढे महाराष्ट्र साहित्य परिषदेने संस्थेच्या सभागृहाचे माधवराव पटवर्धन सभागृह असे नामकरण करून माधव ज्यूलियन यांच्या वाङ्मयीन कार्याची स्मृती जतन केली.


माधवरावांची ओळख श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंद:शास्त्राचे व्यासंगी,  साहित्य विमर्शक आणि मराठी 


भाषा शुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कृतें, प्रचारक अशी बहुआयामी आहे.  काव्य रचनेसाठी त्यांनी घेतलेल्या ‘माधव जूलियन्’ ह्या टोपण नावातील ‘जूलियन्’ हे नाव, सुप्रसिद्ध इंग्रज कादंबरीकर्त्री मारी कोरले हिच्या गॉड्स गुडमॅन ह्या  कादंबरीतील ‘जूलियन् ॲडर्ली’ ह्या  उत्कट मनोवृत्तीच्या, सौंदर्यपूजक आणि स्वच्छंद कवीच्या व्यक्तिरेखे वरून त्यांनी घेतले आणि आपल्या ‘माधव’ या नावाला जोडले. माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले असा लोकोपवादही प्रसिद्ध आहे. माधवराव पटवर्धन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी बडोदा येथे  त्यांच्या आजोळी झाला. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो. माधव ज्युलियनांनी "दित्जू", "मा.जू." आणि "एम्‌.जूलियन" या नावांनीही लेखन केले असून, पैकी काही लिखाण इंग्रजीतही आहे. कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन त्यांनी केले आहे. 'प्रेम कोणीही करेना', 'मराठी असे आमुची मायबोली', 'कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी', 'अनाम वीराची समाधी', 'शिवप्रताप', 'जीव तुझा लोभला माझ्यावरी रे शोभना' या त्यांच्या अन्य काहीलोकप्रिय कविता होत.


पुणे जिल्ह्यातील आवळस या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक इंग्रजी शिक्षण त्यांनी बडोदे, अहमदाबाद आणि मुंबई येथे पूर्ण केले (१९०९). बडोदे कॉलेजातून १९१६ मध्ये बी. ए. झाल्यानंतर बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल मध्ये वर्षभर त्यानी अध्यापन केले. १९१८ मध्ये मुंबईच्या एल्‌फिन्स्टन महाविद्यालयातून फार्सी आणि इंग्रजी हे विषय घेऊन ते  एम्. ए. झाले. जून १९१८ ते ऑक्टोबर १९२५ ह्या  कालखंडात पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ‘फर्ग्युसन महाविदयालय  ह्या  शिक्षण संस्थांतून त्यांनी अध्यापन केले. न्यू इंग्लिश स्कूलचे ते काही काळ उपप्रमुखही होते. १९१९ मध्ये ह्या  संस्थेचेते आजीव सदस्यही झाले. १९२१ मध्ये कवी श्री. बा. रानडे ह्यांच्याशी यांचा निकटचा परिचय झाला. श्री. बा. रानडे, गिरीश, यशवंत इ. कवींबरोबर, माधवरावही रविकिरण मंडळ ह्या कवि मंडळाचे संस्थापक सदस्य होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी तीव्र मतभेद झाल्या मुळे त्या संस्थेचा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चा काही काळ मनस्ताप आणि खडतर परिस्थिती ह्यांना तोंड देत त्यांनी काढला; अनिकेत, व्यवसायहीन अवस्थेतही त्यांना राहावे लागले . पुढे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये काही काळ शिक्षक म्हणून राहिल्यानंतर, १९२८ मध्ये कोल्हापूरच्या राजाराम महाविदयालयात फासींचे प्राध्यापक म्हणून त्यांना नेमणूक मिळाली. त्याच वर्षी त्यांचा विवाहही झाला.


माधवरावांच्या काव्य लेखनाला पूर्ववयात त्यांच्या बडोदे येथील वास्तव्यातच आरंभ झाला. बडोदे येथील


त्यांच्या पूर्व वयातील वास्तव्यात काव्य प्रेमी मित्रांचा,  तसेच कवी चंद्रशेखरांचा सहवास त्यांना लाभला. कविमन हे कसे रसिक आणि संस्कारक्षम असते, ह्याचा अनुभव चंद्रशेखरांच्या सहवासात त्यांना मिळाला. निर्दोष व अर्थानुकूल काव्य रचनेचे भान, माधवरावांना चंद्रशेखरांकडून मिळाले. पुण्यास आल्यानंतर त्यांच्या काव्यलेखना लागती आली. रविकिरण मंडळाच्या किरण (१९२३), मधु-माधव (१९२४) आदी सामूहिक प्रकाशनांतून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. ख्यातनाम फार्सी कवी उमर खय्याम ह्याच्या रुबायांचा माधवरावांनी केलेला मराठी अनुवाद १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला (उमर खय्यामकृत रुबाया ). उमर खय्यामच्या रुबाया त्यांनी तीन वेळा अनुवादिल्या. उमर खय्यामकृत रुबाया त्यांनी मूळ फार्सी रुबायांवरुनच अनुवादिल्या (एकूण५२४). त्यानंतर एडवर्ड फिट्सलेरल्डने उमरखय्यामच्या रुबायांचे केलेले इंग्रजी रुपांतर 'द्राक्षकन्या' ह्या  नावाने त्यांनी अनुवादिले.‘मधुलहरी’ हे रुबायांचे, त्यांनी केलेले तिसरे भाषांतर. रुबायांच्या फिट्सजेहल्डकृत भाषांतराच्या चौथ्या आवृत्ती वरून हे भाषांतर माधवरावांनी केले होते. 'विरहतरंग' आणि 'सुधारक' ही त्यांची सामाजिक खंडकाव्ये त्यांनी रुबायाच्या केलेल्या पहिल्या अनुवादापूर्वी च प्रकाशित झालेली होती. 'नकुलालंकार' हे त्यांनी लिहिलेले आणखी एक खंडकाव्य. त्यांनी लिहिलेल्या गझल त्यांच्या 'गज्जलांजली'तून  आणि सुनीते 'तुटलेलेदुवे' (१९३८) ह्या  त्यांच्या संग्रहातून संगृहीतआहेत. 'तुटलेले दुवे' ह्या  संग्रहातील सुनीतांतून एक कथासूत्र गुंफण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 'स्वप्नरंजन'  हा त्यांच्या स्फुट कवितांचा संग्रह. उपर्युक्त ‘मधुलहरी’ व माधरावांच्या अन्य काही कवितामधुलहरी व इतर कविता ह्या  नावाने १९४० मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्या.


माधवराव हे मूलतः  कवी होते. काव्य हाच त्यांच्या समग्रवाङ्‍मय निर्मितीचा केंद्र बिंदू होता; तसेच प्रयोगशीलता हा त्यांच्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक होता. काव्याच्या संदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले. प्रयोगशीलते च्या दृष्टीने केशवसुत आणि मर्ढेकर ह्या  दोन युगप्रवर्तक कवींच्या मधील एकमेव दुवा म्हणून माधवरावांचे नाव गौरवाने घेतले जाते. केशवसुती काव्य कल्पनेचे विस्तरण करून मराठी काव्य कल्पने वर एक नवे अंतर्बाह्य संस्करण करण्याचे श्रेय ही त्यांना दिले जाते. त्यांच्या काही कवितांतून मर्ढेकर प्रतिमा सृष्टीची चाहूल लागते. गझल हा काव्य प्रकार मराठीत रुजवण्याचे पहिले श्रेयही त्यांचेच. स्वातंत्र, प्रेम आणि शांती ही मूल्ये त्यांनी आयुष्यभर जोपासली आणि त्यांच्या काव्यातही त्यांचे प्रत्यंतर येते. प्रीती हा त्यांच्या कवितेचा महत्त्वाचा विषय असून प्रेम भावनेच्या अनेक तरल छटा तीत व्यक्त झाल्या आहेत. फार्सी प्रेमकाव्याचा प्रभावही तीवर आहे.


काव्य निर्मिती प्रमाणेच माधवरावांनी काव्य समीक्षा आणि काव्य विचार ही केला. आधुनिक मराठी कवी आणि कविताह्यांच्या संदर्भात त्यांनी आपले समीक्षात्मक लेखन मुख्यतः केले; तिच्यातील न्यूनाधिक्य त्यांच्या दृष्टिकोणातून दाखवून दिले. आधुनिक मराठी कविता बरीचशी परपुष्ट आणि अनुकरण शील आहे, असे त्यांचे मत होते. आधुनिक मराठी कवितेवर त्यांनी इंग्रजीतूनही लेखन केले. चिकित्सकपणा आणि रसग्राही वृत्ती ह्यांचा समतोल समीक्षकाने सांभाळला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी ‘काव्यचिकित्सा’ ही लेखमालाही लिहिली. रसव्यवस्था आणि वाङ्‍मयानंद मीमांसा ह्या विषयांवरही त्यांनी लेखन केले. काव्यविहार व काव्यचिकित्सा हे त्यांचे कविकाव्य विषयक लेखसंग्रह आहेत.


माधवरावांचा फार्सी–मराठीकोश १९२५ मध्ये प्रसिद्ध झाला. तो करताना तौलनिक आणि ऐतिहासिक दृष्टीचा अवलंब त्यांनी केला होता. त्यांची परिश्रम शीलता, सावधानता व सूक्ष्म अभ्यासह्यांचा प्रत्यय ह्या कोशातून येतो. ऐतिहासिक कागद पत्रांच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचे साधन ह्या कोशामुळे उपलब्ध झाले. त्यानंतर दोनच वर्षांनी पद्यरचना शास्त्रावरील छंदोरचना हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध झाला . छंद:प्रकार कसे परिणत होत आले, ह्याचे विवेचन करावे आणि छंद:शास्त्राची पुनर्घटना करावी अशा हेतूने हा ग्रंथ त्यांनी लिहिला. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय, हा सिद्धांत त्यांनी ह्या ग्रंथात मांडला. तसेच पद्यरचनाही वृत्तजाति छंद:स्वरूप अशी त्रिविध आहे, हे त्यांनी संशोधन पूर्वक दाखवून दिले. ह्या ग्रंथाची दुसरी परिवर्धित आवृत्ती (१९३७) माधवरावांनी डी. लिट्. ही पदवी मिळविण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे सादर केली आणि १९३८ मध्ये ही पदवी त्यांना प्राप्त झाली. ह्या ग्रंथाने मराठी पद्यरचनाशास्त्राचा पाया घातला. छंदोरचनेचाच विषय घेऊन त्यांनी पद्यप्रकाश लिहिले. शिक्षक आणि विद्यार्थी ह्याच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.


कवितांच्या व्यतिरिक्त पटवर्धनांनी भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कार करणार्‍या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ सन १९२५ साली सुरु केली आणि त्यांची भूमिका ज्यांना पटली त्यांनीही ती चळवळ पुढे चालविली. या विषयावर अनेक वादविवाद झाले अणि हळुहळू भाषाशूद्धीचे तत्त्व लोकांना पटू लागले. भाषाशुद्धीचे सर्वच पुरस्कर्ते सावरकरांचे अनुयायी होते असे नाही. माधव ज्यूलियन हे पूर्वी भाषाशुद्धीचे विरोधक होते. पण आंधळा विरोध करण्याऐवजी या विषयाचा अभ्यास करुनच तिचे खंडन करावे या हेतूने त्यांनी भाषाशुद्धीचा अभ्यास केला. पण अभ्यास केल्यावर तेच भाषाशुद्धीचे

कट्टर समर्थक बनले ! ते इतके की पूर्वी ते आपल्या कवितांमध्ये फारसी शब्दांची खैरात करत असत. ह्या कविता त्यांनी पुन्हा शुद्ध स्वरूपात लिहून काढल्या ! भाषा शुद्धीचे प्रखर पुरस्कर्ते म्हणूनही ते प्रसिद्ध झाले . त्यासाठी पुढे त्यांनी महाराष्ट्राबाहेरही अनेक व्याख्याने दिली. लेखही लिहिले, भाषाशुद्धिविवेक (१९३८) ह्या ग्रंथात त्यांचे हे लेख संगृहीत आहेत. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. ‘परकीय शब्द न वापरणे, जुन्या मराठी शब्दांचा आठव ठेवून पुरस्कार करणे आणि नव्या नडी स्वावलंबनाने कष्टून भागवणे’ हा आपला संकल्प त्यानी भाषाशुद्धिविवेका च्या प्रस्तावनेत व्यक्त केला. त्यांच्या प्रकाशित साहित्या मध्ये स्फुट गझला, खंडकाव्य दीर्घकाव्य, काव्यसंग्रह, अनुवादितलेख, संशोधनात्मक व भाषांतरीत वाङ्मय प्रकारांचा समावेश आहे.


१९३३ साली नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे जूलियन अध्यक्ष होते, तर १९३४ रोजी बडोदे येथे झालेल्या साहित्य संमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष तर १९३६ मध्ये जळगाव येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद माधव जूलियन यांनी भुषवलं. आचार्य अत्र्यांचा "झेंडूची फुले" हा काव्यसंग्रह माधव ज्यूलियन व रविकिरण मंडळाचे इतर सदस्य ह्यांच्या हलक्या फुलक्या प्रेमकवितांचे विडंबन आहे. माधव ज्युलियन यांच्या सर्व कवितांचे संकलन व संपादन प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले, डॉ. सु.रा. चुनेकर यांनी 'समग्र माधव ज्यूलियन' या नावाने केले आहे. माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे  या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत.एका विशिष्ठ वयात माधवरावांच्या कवितांच्या प्रेमात पडलेला रसिक वाचक दुर्मिळच म्हणावा लागेल. तत्कालीन इतर दिग्गज कवींच्या साहित्यनिर्मितीहून वेगळे आणि नवे काव्यलेखन माधवरावांनी केले आणि मराठी कवितेच्या शब्दभांडारात मौलिक भर घातली.

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

बी.कॉम. व बी.एस्सी. पदवी प्रथम वर्षासाठी नियोजित अभ्यासक्रम
बी.ए., द्वितीय भाषा मराठी- अक्षरलेणी 
 *अभ्यासपत्रिकेचे उद्दिष्टे* 
 १. मध्ययुगीन व आधुनिक मराठी गद्य व पदयांचे  कालविशिष्ट स्वरूप विशेष समजून घेणे. 
२. मराठी वाङ्गमय निर्मितीच्या प्रेरणांची उकल करणे.
३. मराठी साहित्याची आवड निर्माण करणे.
४. मराठी प्रमाण लेखन विषयक नियमाबद्दल जागृती घडविणे. 
५. मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातीचा परिचय करणे. *उपयोगिता-* 
 १. मध्ययुगीन व आधुनिक गद्य-पद्य वाङ्ग्मयाचा परिचय.
 २. मराठीतील वाङ्गमय प्रकाराची ओळख.
३.  मराठी साहित्य निर्मिती आणि त्यांच्या प्रेरणासंबंधी आकलन 
४. मराठी भाषेतील व्याकरणाचे उपयोजन
५.  भाषाज्ञान
बी. ए. सत्र II ऐच्छीक मराठी अभ्यासपत्रिका IV
आधुनिक मराठी कविता IV
अभ्यासपत्रिकेचे उद्दिष्टे* 

उपयोगीता
१.
२.
३.
४.
बी कॉम. सत्र I द्वितीय भाषा मराठी - साहित्यागाथा भाग 1
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.
बी कॉम. सत्र II द्वितीय भाषा मराठी - साहित्यागाथा भाग 2
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.
बी कॉम. सत्र III द्वितीय भाषा मराठी - साहित्यधारा भाग 1
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.
बी कॉम. सत्र IV द्वितीय भाषा मराठी - साहित्यधारा भाग 2
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.

पदवी तृतीय वर्ष अभ्यासक्रम - श्रेयांक पद्धतीनुसार CBCS सत्र पद्धती
कौशल्ये विकास SEC - IV। बी.ए. sem.V
अभ्यासपत्रिकेचे नाव : मराठी भाषिक कौशल्ये विकास भाग 1 SEC-  III
उपयोगिता
१. मराठी भाषिक क्षमतांच्या वाढीस मदत
२. मराठी भाषिक कौशल्ये विकासास वाव
३. विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी
४. मराठी भाषेतील ग्रंथ प्रकाशनाचे स्वरूप समजावून घेण्यास मदत
अभ्यासपत्रिकेचे नाव : मराठी भाषिक कौशल्ये विकास भाग 2 SEC-  IV
उपयोगिता
१. विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन
२. देहबोलीच्या वापरातून प्रभावी संभाषण
३. मुद्रितशोधनासाठीचे कौशल्ये विकसन
४. अनुदिनी व पटकथा लेखन कौशल्ये विकसन
५.प्रमाण मराठीच्या नियमांचे लेखनामध्ये उपयोजन
बी.ए. सत्र IV अभ्यासपत्रिकेचे नाव :- मराठी मध्ययुगीन गद्य पद्यांचा अभ्यास -  VIII
उपयोगिता
१. मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाङ्मय प्रकारांचा परिचय
२. मध्ययुगीन कालखंडातील वाङ्मयातून प्रकट झालेल्या मानवी मूल्यांचे आकलन
३. तत्कालीन भाषिक जाणिवांचे, शैलीचे दर्शन व आकलन
बी.ए. सत्र III अभ्यासपत्रिकेचे नाव :- आधुनिक मराठी वाङ्मय प्रकारचा अभ्यास - आत्मचरित्र  V
उपयोगिता
१. आत्मचरित्र वाङ्मय प्रकाराचा परिचय व आकलन
२. आत्मचरित्र वाङ्मय प्रकारातून प्रकट होणाऱ्या मानवी मूल्यांचे आकलन
३.



महत्त्वाची लिंक

डिजिटल लायब्ररी https://ndl.iitkgp.ac.in