गुरुवार, ७ मार्च, २०१९

आधुनिक मराठी प्रवाहाची कविता MCQ

१. कोंडवाडा हा कवितासंग्रह कोणत्या कवीचा आहे?
दया पवार
२. दया पवार यांना १९९० साली भारत सरकारकडून कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?  पद्मश्री
३." गावची गुरे वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या" या कवितेच्या ओळी कोणत्या कवीच्या आहेत?   दया पवार
४. विषमतामूलक समाजाने माणसाचे माणूसपण हिरावून घेतल्याची खंत कोणत्या कवितेतून व्यक्त होते?
कोंडवाडा
५. "किती जन्माची कैद , कुणी निर्मिला हा----------"
कोंडवाडा
६. दया पवार यांचे पूर्ण नाव काय आहे?   दगडू मारोती पवार
७. "आज विषाद वाटतो,
कशा वागविल्या मनामनाच्या बेड्या गाळात ---- कळप रुतावा, तशा ध्येय , आकांक्षा रुतलेल्या"    हत्तीचा
८. उभा राहिला पँथर एकलव्या त्याने मागितला द्रोण सरांचा------ हाताचा अंगठा       उजव्या
९.पँथर एकलव्य ही कविता कोणत्या कवितासंग्रहातून घेतलेली आहे?  ब्रोकन मेन

मराठीभाषा- राज्यकर्त्यांचीं उदासिनता

Wednesday, March 6, 2019

राज्यकर्त्यांच्या तावडीत घुसमटतेय मराठी भाषा




राज्यकर्त्यांच्या तावडीत घुसमटतेय मराठी भाषा-
-प्रा.हरी नरके,समन्वयक, अभिजात मराठी भाषा समिती

पंधरा वर्षांपुर्वी तमीळ भाषेला अभिजात दर्जा दिला गेला. त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि उडीया यांनाही तो मिळाला. मराठीला हा दर्जा द्यावा अशी साहित्य अकादमीनं एकमतानं केलेली लेखी शिफारस मोदी सरकारनं दुर्लक्षित केलीय. राज्य सरकारही त्याबाबत संपुर्ण उदासिन आहे. मराठी भाषा,साहित्य, संस्कृती, शिक्षण हे सारेच विषय गेली ५ वर्षे विनोदाचे विषय बनवले गेलेत. राज्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेली मराठी तर अक्षरश: गुदरतेय. राज्यातल्या प्रमुख चारही पक्षांचं मराठीप्रेम पुतणा मावशीचं आहे. मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठ, मराठीचं २५ वर्षांचं धोरण, मराठी सक्तीचा कायदा आणि अभिजात दर्जा या चारही बाबतीत खात्याचे मंत्री विनोद तावडे हे कृतीशून्य नी बोलघेवडे ठरलेले आहेत. खरंतर झेपत नसेल तर त्यांनी पायउतार व्हायला हवं.

माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. माणसाचं ते जीवसृष्ठीतील आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे.लाखो वर्षांच्या मानवी स्मृती भाषेच्या माध्यमातून जतन केल्या गेलेल्या आहेत.
त्यानं साहित्य, संस्कृती, कला, तत्वज्ञान यांची निर्मिती केली. माणसं संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडं पोचवत असतात.
माणूस मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषा ही एकप्रकारे माणसाच्या अस्तित्वाला विचारांचा प्राणवायू पुरवत असते. ते त्याचे ओळखपत्र असते. मातृभाषा ही माणसाची अस्मिता आणि अस्तित्वखूण असते.शहरी, महानगरी मराठी माणूस बहुभाषिक आहे. रोजगार, उद्योग, व्यापार, आर्थिक प्रगतीसाठी त्यानं बहुभाषिकतेची कास धरलेली आहे. पोटासाठी त्यानं इतर भाषा शिकायला कोणाचाच विरोध नाही. परंतु मराठी ही हलकी भाषा आहे, डाऊन मार्केट आहे म्हणुन त्याला तिची लाज वाटत असेल तर मात्र ती शरमेची बाब आहे. इंग्रजीतून, हिंदीतून बोलण्याला आज सार्वजनिक जीवनात विशेष प्रतिष्ठा आहे. समोरच्या माणसाला मराठी येत नसेल तर त्याच्याशी त्याला समजेल अशा भाषेत बोलयला काहीच हरकत नाही. पण मराठी माणूस बोलायला सुरूवातच मुळात हिंदी किंवा इंग्रजीतून करतो. त्यामुळे अनेकदा बराच वेळ बोलल्यानंतर लक्षात येते की दोघेही मराठीच असूनही ते उगीचच हिंदी किंवा इंग्रजीतून बोलत होते.मराठी माणसाला मराठीची लाज वाटते.

१९०७ साली ग्रियरसनने भारतीय भाषांचे सखोल सर्व्हेक्षण केले. तो म्हणतो की जी भाषा रोजगार देते तीच जगते. जी भाषा रोजगारक्षम नसते ती मरते. नष्ट होते. इंग्रजी आणि हिंदीच्या तुलनेत मराठीची रोजगार देण्याची क्षमता कमी आहे असं मराठी माणसाला मनोमन वाटतं, त्यामुळं तो आपल्या मुलाला मराठी माध्यमात घालायला तयार नसतो. मराठी मरणार अशी काळजी राजवाड्यांनी शतकापुर्वीच व्यक्त केली होती.बोलीभाषांची विविधता हे मराठीचं खरं वैभव असून, त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. जिला जास्त ओढे ती नदी मोठी, याच न्यायाने मराठीला रसद पुरवणार्‍या या सर्व बोली महत्वाच्या आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. बहिणाबाई, उद्धव शेळके, रंगनाथ पठारे, व्यंकटेश माडगूळकर, प्र. ई. सोनकांबळे, बा. भ. बोरकर, नामदेव ढसाळ आदींमुळे मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्यानं मराठीला सामाजिक दस्तऎवज देऊन तिला खुप श्रीमंत केलेलं आहे.

"एक होता कावळा नी एक होती चिमणी..." ही प्रत्येक मराठी घरात आजही सांगितली जाणारी गोष्ट आहे. ती पहिल्यांदा ग्रंथात लिहिली गेली ८०० वर्षांपुर्वी. लिळाचरित्रात धानाई नावाच्या हट्टी मुलीला श्री चक्रधरांनी ती सांगितली असली तरी ती त्याआधी हजारबाराशे वर्षे मराठी लोकजीवनात सांगितली जात होती. ती विलक्षण लोकप्रिय होती.
तमिळ भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात "संगम साहित्याचा" मोठा वाटा आहे. हे साहित्य २३०० वर्षे जुने आहे. कावेरी नदीवर धरण बांधले जात असल्याचा प्रसंग त्यात आला आहे. या धरणाच्या कामासाठी जगभरातून तज्ञ मागवण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील मराठी गवंडी मोठे कुशल असल्याचे वर्णन त्यात आले आहे.

इसवी सनाच्या २ र्‍या शतकात वररूचीने "प्राकृतप्रकाश " हा व्याकरण ग्रंथ लिहिला. त्यात त्याने शौरसेनी, मागधी, पैशाची व महाराष्ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण सिद्ध केले. आधीचे सगळे नियम सांगून झाल्यानंतर शेवटचा नियम सांगताना तो म्हणतो, " शेषं महाराष्ट्रीवत." यावरून देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रचलित असलेल्या सगळ्या भाषांना मराठीचे नियम लागू पडत होते. यातून मराठीची प्रतिष्ठा, मान्यता आणि श्रेष्ठता स्पष्ट होते.

संस्कृत महाकवी कालिदास आणि शूद्रक यांच्या "शाकुंतल" आणि "मृच्छकटिक" या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठीत आहेत. महाभारत या जगप्रसिद्ध महाकाव्यात अनेक मराठी शब्द आलेले आहेत. यज्ञाच्या वेळी पंडीतांना मराठीत बोलायला बंदी घालण्यात आल्याची नोंद भागवत यांनी दाखवून दिलेली आहे. संस्कृत ही धर्मभाषा असली तरी हे पंडीत खाजगीत मराठीत बोलत असत हे यातून उघड होते. संत एकनाथांनी "संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासोनी झाली?" असे संतप्त उद्गार काढले होते. "विंचू चावला..." ही  एकनाथांची भारूडांची मराठी आजची अस्सल मराठी असूनही ते तिला प्राकृत म्हणतात कारण महाराष्ट्री प्राकृत हीच मराठी आहे. रघुनाथराव गोडबोले यांनी १८६३ साली प्रकाशित केलेल्या मराठी शब्दकोशाला "महाराष्ट्रीय भाषेचा" कोश म्हटले आहे, ते यामुळेच.

जुन्या काळात धर्मग्रंथांची भाषा होती संस्कृत. पण तिचा जन्म झाला वैदीक भाषेपासून आणि वैदीकची आई होती वैदीकपुर्व बोली भाषा. हार्वर्ड विद्यापिठाचे डॉ. मायकेल विट्झेल यांनी आपल्या "ट्रेसिंग दि वैदीक डायलेक्ट्स" या ग्रंथात हे दाखवून दिले आहे. तेव्हा संस्कृत ही सर्व भाषांची मूळ भाषा होती ही माहिती खरी नाही. पाणिनीने जेव्हा या भाषेचे व्याकरण लिहिले तेव्हा तो तिला "छंद" भाषा म्हणतो. महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपुर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म. राजारामशास्त्री भागवत, विदुषी दुर्गा भागवत यांचे आजोबा, यांनी १८८५ सालीच दाखवून दिले होते. त्यांचा "मराठ्यासंबंधी चार उद्गार" हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. त्यांचा "मराठीची विचिकित्सा" हाही ग्रंथ महत्वाचा आहे. १९२७ साली ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास दोन खंडात लिहिला. त्यात त्यांनी मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.

मुल लहान असताना, रांगत असताना पीएच.डी. करू शकेल का? नाही.
मग कोणतीही भाषा बालवयातच "ज्ञानेश्वरी, लिळाचरित्र आणि विवेकसिंधू"  यांसारखे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ ग्रंथ कसे प्रसवू शकेल? आठशे वर्षांपुर्वी मराठीत हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा मराठी बालभाषा नव्हती, तर ती एक परिपक्व झालेली समृद्ध भाषा होती.संत ज्ञानेश्वर मराठीची गोडी अमृताहूनही जास्त असल्याचे प्रतिपादन कोणाला उद्देशून करीत होते?
ज्ञाननिर्मिती, साहित्य, विचार, तत्वज्ञान आणि संस्कृतीची त्याआधीची फार मोठी परंपरा मराठीला होती.

मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, " गाहा सत्तसई " { गाथा सप्तसती} गाथा म्हणजे कविता. सातशे लोककवितांचा संग्रह म्हणजे हा ग्रंथ होय. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपुर्वी पन्नास कवींच्या या कविता संकलित केल्या.सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जिथे जिथे राज्य होते, तिथे तिथे या ग्रंथाची हस्तलिखिते मिळालेली आहेत. सातवाहनांचे संपुर्ण भारतावर तर राज्य होतेच परंतु पार अफगाणिस्तानपर्यंत राजभाषा मराठीची पताका फडकत होती.गाथा सप्तसती, पादलिप्त, हरिभद्राची समरादित्याची कथा, उद्योतन सुरीची कुवलयमाला, चक्रधरांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, एकनाथांची भारूडे, माझा प्रवास, गावगाडा, धग, कोसला, बनगरवाडी, बॅरिस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर, गोलपिठा, शांतता कोर्ट चालू आहे, हे ग्रंथ इतके चिरेबंदी आहेत की मराठीची श्रेष्ठता स्वयंस्पष्ट आहे. फुले-आंबेडकर, टिळक - आगरकर, राजवाडे-केतकर, राजारामशास्त्री भागवत, प्रबोधनकार ठाकरे यांचे वैचारिक लेखन श्रेष्ठ प्रतीचे आहे.

मराठीला अभिजात दर्जा मिळणं म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे. त्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होईल. मराठी शिकवण्याची सोय देशातील 450 विद्यापीठांमध्ये होईल. मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी 500 कोटी रुपये मिळतील. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ, वाचन संस्कृती वाढणे, ग्रंथालये संवर्धित केली जाणे, मराठी पुस्तके स्वस्तात मिळणे, मराठी मुलामुलींना अधिकाधिक रोजगार मिळणे यासाठी या दर्जामुळे खुप मदत होईल.
मराठीचे गोमटे व्हायला अभिजात दर्जा गती देईल.

राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना दुर्गा भागवतांनी म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. मराठी संस्कृतोद्भव नाही. ती संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे.
गाथा सप्तसतीतील मराठी, जे महाराष्ट्री प्राकृत या नावाने ओळखले गेले, हरिभद्र, भद्रबाहू, उद्योतन सुरी आदींचे लेखन आणि चक्रधर, ज्ञानेश्वर, चोखा, चोंभा, सावतामहाराज, नामदेव, संत बहिणाबाई, एकनाथ, बखरी, ते फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, लोकहितवादी, आगरकर, रानडे, टिळक, विष्णुभट गोडशे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरूजी, बेडेकर, भाऊ पाध्ये, नेमाडॆ, ढसाळ, कोलटकर, चित्रे, यांच्या साहित्याची महत्ता आणि त्यांचे "जैविक नाते" महत्वाचे आहे.

अभिजात मराठी भाषा म्हणजे श्रेष्ठ मराठी भाषा. खांद्यावर मायमराठीची पताका घेतलेल्या साडेबारा कोटींची ती "भाषांमाजी भाषा साजिरी आहे." संत एकनाथ म्हणतात, ती चोरांपासून जन्मलेली नाही. ती कष्टकर्‍यांची-ज्ञानवंतांची भाषा आहे. ही श्रमाची-घामाची, निर्मितीची भाषा आहे. मराठी ज्ञानभाषा आहे. धर्मभाषा आहे. अक्षरभाषा आहे. अजरामर भाषा आहे. जगातील सर्व भाषा मेल्या आणि अवघ्या चार जगल्या तरी मराठी जगणार आहे.स्वत:चे राज्य आणि श्रेष्ठ साहित्य असलेली मराठी ही जगातली चौथ्या क्रमांकाची राज्य भाषा आहे. मराठीतले कोश वांड्मय तर जगातले दुसर्‍या क्रमांकाचे कोश वांड्मय आहे.

आपण दक्षिण भारतात गेलो की तिथली सगळी माणसं त्यांच्या मातृभाषेबद्दल आग्रही असलेली दिसतात. तमीळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम हे सगळेच लोक आपापल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतात. या बहुतेक सर्व राज्यांनी शिक्षण, साहित्य, संस्कृती, कला आदी क्षेत्रात फार मोठी भरारी घेतलेली आहे. मानव विकास निर्देशांकात ही राज्यं पुढं आहेत. हे सारे आपले शेजारी असूनही आपण त्यांच्याकडून मातृभाषाप्रेम मात्र शिकायला तयार नाही. तिथल्या सरकारांनी स्थानिक भाषेच्या सक्तीबाबत अतिशय कडक पावलं उचललेली आहेत. इंग्रजी आणि हिंदीच्या आक्रमणाचा प्रश्न त्यांनाही भेडसावतो आहे. पण त्यांनी त्यावर कशी मात केलीय हे आपण त्यांच्याकडून समजून घ्यायला हवं. तिथं भाषिक मतबॅंक, व्होटबॅंक असल्यानं राज्यकर्त्यांना ठाम आणि कडक भुमिका घ्यावीच लागते.

एखादी भाषा मरते तेव्हा एक संस्कृती संपते. तिच्या निर्मिती आणि संवर्धनासाठी शेकडो वर्षे लाखो लोक राबलेले असतात.
मराठी शाळांचा दर्जा चांगला नसतो अशी टिका केली जाते. मराठी शाळांचा दर्जा वाढवायला हवा याबाबत दुमत नाही. परंतु काही मोजक्या ईंग्रजी शाळा सोडल्या तर उरलेल्या शाळांना दर्जा सुमार असतो. पण संस्कृतीकरणाचा सिद्धांत सांगतो, सामान्य लोक अभिजनांचं, महाजनांचं अनुकरण करीत असतात. महाराष्ट्रात ज्या दिवशी बुद्धीजिवी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गानं मराठीचं बोट सोडलं, त्यादिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.
सावरकरांची क्षमा मागून सांगायचं झालं तर, ते जणू म्हणताहेत, "सागरा प्राण तळमळला, ने मजशी ने इंग्रजी शाळेला."

ज्यांनी ज्ञाननिर्मिती केली, देश समृद्ध केला असे बहुतेक सर्वजण मातृभाषेतून शिकलेले आहेत. परममहासंगणक बनवणारे विजय भटकर, मोबाईलची क्रांती घडवून आणणारे सत्यनारायण गंगाराम पित्रोदा, महान शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, वसंत गोवारीकर, माधव गाडगीळ, ज्ञानपीठ विजेते खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी सावंत, तेंडूलकर, सुर्वे, एलकुंचवार, यशस्वी सनदी अधिकारी शरद जोशी, माधव गोडबोले, माधव चितळे, स.गो.बर्वे, राम प्रधान, ज्ञानेश्वर मुळे ते भूषण गगरानी हे सारेच मातृभाषेतून शिकलेले आहेत.

-प्रा.हरी नरके
harinarke@gmail.com
लेखक अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक आहेत.
http://epaperlokmat.in/main-editions/Mumbai%20Main%20/-1/8
लोकमत,पुणे, संपादकीय पृष्ठ, गुरूवार, दि. ७ मार्च २०१९

रविवार, ३ मार्च, २०१९

साहित्यगाथा भाग २ MCQ

 १.  मूकनायक या नियतकालिकाचे संपादक कोण होते? 
      उत्तर -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 २. तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय -----  या न्यायाने  
     आता आपण स्वतःच आपल्यातील कमीपणा घालविण्याचा
      प्रयत्न केला पाहिजे.
       उत्तर-  आरसा
३.   प्रत्येक माणसाची काया, वाचा व ---- अशी त्रिशुद्धी झाली
      पाहिजे. 
         उत्तर- मने
४.   शिक्षणाबरोबर माणसाने ----ही सुधारले पाहिजे.
       उत्तर- शि
५.  सांजवात हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
      उत्तर- आनंदीबाई शिर्के
६.  सांजवात या पाठात कोणत्या  संस्थानिक राजांचे कार्य सांगितले आहे?
     उत्तर-  सयाजीराव गायकवाड
७. महानगरीय जाणिवेचा वेध तुम्ही अभ्यासलेल्या कोणत्या कथेतून आला आहे?
   उत्तर-   टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन
८. देशातील पहिली मुलींची शाळा कोणी काढली?
      उत्तर- सावित्रीबाई फुले
९. सयाजीराव गायकवाड यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्या शिक्षिकेची नियुक्ती केली होती?
  उत्तर-   मिसेस भोर
१०. बडोद्यास दुष्काळ कधी पडला होता?
     उत्तर- १८७७
११.  बहुजनप्रतिपालक ही उपाधी सार्थ करणारे रयतेचे राजे म्हणून कोणास ओळखले जाते?
  उत्तर-  छत्रपती शिवाजी महाराज
१२. शिवकालीन भाषेवर कोणत्या भाषेचा प्रभाव दिसून येतो?      उत्तर-  अरबी, फारसी
१३. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजाबरोबरच माणसाला जगण्यासाठी समाज आणि ----- चीही गरज असते.  
  उत्तर-    संस्कृती
१४. कार्यक्रमाला सुरुवात करून शिस्तीत पुढे घेऊन जाणाऱ्याला-------- म्हणतात.          
   उत्तर-      सूत्रसंचालक
१५.  सूत्रसंचालन हा कार्यक्रमाचा ------  असतो.
     उत्तर-  प्राण
१६. सामान्यतः पत्राचे अनौपचारिक व –-------- प्रकार पडतात.   उत्तर-    औपचारिक
   १७. टेंगशेंच्या मुलीचे नाव काय होते?
   उत्तर-   नवमी
१८. जयंत पवार कोणत्या दैनिकाचे सहसंपादक आहेत?   
उत्तर-   महाराष्ट्र टाईम्स
१९.  साहित्य अकादमीचा पुरस्कार जयंत पवारांच्या कोणत्या ग्रंथास मिळाला?
    उत्तर-     फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
२०. परळी येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
       उत्तर-   द.मा. मिरासदार
२१. मनुष्याने स्वार्थच करीत न राहता थोडाफार ---------ही केला पाहिजे.
      उत्तर-   परमार्थ
२२. बुद्धास दोन प्रश्न कोणी विचारले?
    उत्तर-    लोहित नावाच्या ब्राम्हणाने
२३. शाळेत डॉ . आंबेडकरांना किती रुपये शिष्यवृत्ती मिळत असे?
     उत्तर-  ३ रुपये
२४.  डॉ. आंबेडकरांनी धर्माची गोष्ट सांगतांना कोणत्या संतांचा दाखला दिला आहे?
      उत्तर-    संत कबीर
२५.  हिंदुस्थानांत जातीभेद राहीला याला मुख्य दोन कारणे आहेत. एक तर सर्वांना ---- वापरण्याची परवानगी नव्हती व दुसरी गोष्ट ------
      उत्तर-     शस्त्र, अज्ञान
२६. टिप्पणी म्हणजे -------- सोयीसाठी लिहिलेला मजकूर
       उत्तर-   वरिष्ठांच्या
२७. कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
    उत्तर-   दुर्गा भागवत
२८. संत नामदेवांनी वारकरी पंथाची पताका ------- पासून पंजाबपर्यंत नेली.  
    उत्तर- पंढरी
२९. पांढरे ढग फसवे म्हणतात; पण ज्येष्ठाचे नाव सार्थ करणाऱ्या शुभ्र------, मला तू फार आवडतेस.  
    उत्तर-  मेघमाले
३०. मृगजळातल्या यक्षघराला हा ललीतलेख कोणत्या ललीतसंग्रहातून घेतलेला आहे?
     उत्तर-   डोह
३१. पंजाबराव देशमुखांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे?  
 उत्तर -   भाऊसाहेब
३२. पंजाबराव देशमुखांनी कोणत्या शिक्षणसंस्थेची स्थापना केली?
  उत्तर-  शिवाजी
३३.  सौमित्र या टोपण नावाने कोणी काव्यलेखन केले?   
उत्तर-  किशोर भानुदास कदम
३४. छत्रपती शिवाजी महाराजांचा  जन्म  कोणत्या  वर्षी  झाला  ?
       उत्तर  -  १६३०

३५. छत्रपती  शिवरायांनी  आपल्या  पात्रातून  कोनास उपदेश  केला  आहे  ?
उत्तर-   लष्करी  अधिकारी  

३६. शिवाजी महाराज आपल्या पात्राची  सुरुवात  कोणत्या शब्दाने  करत  ? 
उत्तर - श्री  भवानी  शंकर  

३७. शिवकालीन  मराठी  भाषेवर  कोणत्या  भाषेचा  प्रभाव  जाणवतो  ? 
  उत्तर-  फारशी  

३८."......कटकाचा मुक्काम  होता  याकरिता  दाभोळच्या  सुबेयांत  पावसाल्याकारने  पागेस  साम  व    दाणा  वरकड  केला होता तो  किती खर्च  होऊन गेला."
उत्तर-  चिपल्लुनी  चिपळूनी 

  ३९. हे तुम्ही  बरे  जाणून  ,सिपाही हो अगसर  पावखळख  पावखलख हो गाव  राहिले  असाल  त्यांनी  ......काडीचा आजार  द्यावंच  गरज  नाही .       
उत्तर-   रयतेस  

 ४०.कोण्हावरी  जुलूम  अगर  ज्याजती  अगर कोणलासी  कलागती  करावयाची  गरज  नाही व पागेस साम केला आहे  तो .......पुरळ  पाहिजे .  
उत्तर-  पावसाळा  

४१. आगीचा  दगा  न हो .खान  गवत  वाचेल  ते  करण म्हणजे  पावसाळा  ...... वाचली  .
उत्तर--  घोडी  

४२. प्रस्तुत  पत्र  कोणत्या  तारखेस  लिहिलेले  आहे ?
   उत्तर--    १९ मे १६७३ 

४३. छत्रपती शिवरायांचा  जीवनकाल  कोणता ?
        उत्तर-  १६३० ते  १६८०

 ४४. डॉ. आनंद यादव हे .......साहित्य  चळवळीचे  प्रवर्तक
        म्हणून  ओळखले  जातात  .
        उत्तर:-  ग्रामीण

४५.......या  लोकप्रिय आत्मचरित्रात्मक  कादबारीचे  लेखक       डॉ. आनंद यादव यांनी  केले  आहे.
       उत्तर :-  झोंबी

 ४६. 'माळ्याची  माती'  या कविता  संग्रहाचे  कवी  कोण  
       आहेत?
       उत्तर:- आनंद यादव

४७. 'उखडलेले  झाडे'  या ......लेखक आनंद यादव    
       यांनी  केले आहे
      उत्तर:-  कथासंग्रहाचे

४८. डॉ. आनंद यादव यांनी पुढीलपैकी  कोणत्या विनोदी  कथासंग्रहांचे लेखन  केले आहे ?
   उत्तर:-  घरजावई

४९. स्पर्श  कमळे, पानभवरे  या लेखसंग्रहाचे  लेखक कोण
       आहेत ?
    उत्तर :-  डॉ. आनंद यादव

५०. गोतावळा, माऊली  या कादंबरीचे लेखक कोण आहे ?
    उत्तर:- डॉ. आनंद यादव

५१.  'नटरंग'  या कादंबरीचे  लेखक कोण आहेत?
        उत्तर:- डॉ. आनंद यादव

५२. अंधाराच्या  खोलीमध्ये  पाय  बांधलेले  ......कशी  
        काढावी  बाहीर  चवकटीला सांग  नक्षी  ?
         उत्तर :-  पक्षी

५३..........साली परळी येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद  द. मा. मिरासदार यांनी भूषविले आहे.
उत्तर - १९९८

५४. मृगजळातल्या यक्षघराला हा पाठ खालीलपैकी कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे ?
  उत्तर-  डोह



शनिवार, २ मार्च, २०१९

भाषिक कौशल्ये


१. वाचनाचे महत्व :
१.आकलनासह केलेले ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन होय.
२.वाचनामुळे व्यक्तीमत्वाचा अंतर्बाह्य विकास होतो.
३.वाचनाने वाणीवर सुसंस्कार होतात.
४.वाचनाने सौदर्य बोध व आनंदबोध घ्या दोन्ही साध्य होतात.
५.वाचन क्षमतेचा परिपूर्ण विकास हा त्यातून निघणाऱ्या अर्थनिष्पतीवर अवलंबून असतो.
२.वाचनाची प्रमुख उद्दिष्टे :
१.ज्ञान प्राप्ती :ग्रंथाचे व इतर पुस्तकाचे वाचन केल्यामुळे ज्ञान प्राप्ती होते.
२.आनंदप्राप्ती :आनंदप्राप्तीसाठी उत्तम साहित्याचे वाचन व्हावे.
३.संस्कार :व्यक्तीच्या मनावर चांगले संस्कार वाचनातून होतात.
४.रसास्वाद :कथा,काव्य,कादंबऱ्या ,नाटके ,यातून रसग्रहण दृष्टी लाभते.
५.आनंदवृत्ती :वाचनामुळे मन आनंदाच्या अनुभुतीने भरून जाते.

३.वाचनाची पूर्वतैयारी करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.शारीरिक तयारी :
१.वाचन कौशल्याची शरीरातील ज्ञानेंद्रिय परिपक्व व्हायला हवीत.
२.श्वासावर ताबा असावा.
२.भावनिक तयारी :
१.आवाजात चढ-उतार करण्याची क्षमता यावी.
२.भावनिक समतेसाठी मनाची तयारी हवी.
३.बौद्धिक तयारी :
१.व्यक्ती,वस्तु,स्थल,प्रसंग यांचा सहचर्य समजण्याची क्षमता असावी.
२.मेंदूची संदेश ग्रहण करण्याची तयारी असावी.
४.वाचनाचे प्रकार :
१.प्रगट वाचन :अक्षर ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात.
प्रगट वाचनाचे प्रकार
१.सस्वर वाचन :-स्ववासासाठी केलेल विद्यार्थाने ;वाचन त्यास सस्वर वाचन म्हणतात.
२.सुस्वर वाचन :-विद्यार्थासाठी शिक्षकाने केलेले वाचन यास सुस्वर वाचन म्हणतात.
२.मुकावचन :   लिखित अथवा मुद्रित अक्षर रूप डोळ्याने मेंदूने अर्थग्रहण करणे.
मुकवाचन प्रकार :
१.संदर्भ वाचन :संदर्भ पुस्तकाचे वाचन करणे.
२.सखोल वाचन :एखाद्या ग्रंथाचे वाचन करणे.
३.विस्तृत वाचन :-काव्य,नाटक,मासिके वाचन.
३.गतीवाचन :योग्य गतीने वाचन करण्यास गती वाचन म्हणतात.

५.प्रगट वाचनाचे शिक्षणातील महत्व :
१.उच्चार स्पष्टता :संयुक्त स्वराचे व व्यंजनाचे उच्चार अचूकपणे करणे.
२.ओघ व अस्खलितपणा :एक शब्द किंवा अनेक शब्दाचे योग्य शब्दसमूह करून वाचन करणे.
३.स्वाभाविकता:-वाचन बोलण्यासारखे व्हावे .
४.भावपुर्णता :चेहऱ्यावर हवभाव व आवाजात चढउतार करावा.
६.मुकवाचनाचे शिक्षणातील महत्व :
१.स्वतंत्रपणे आशय समजुत देणे:-
मनोगत वाचन हा प्रगट वाचनाचा प्राण आहे तो स्वतंत्रपणे आशय समजावुन देतो .
२.गती-संगती प्रगती साधने :वाचनाची गती वाढवणे व वाचलेल्याची संगती ओळखणे.
३.यथार्थता :-लेखनाच्या अनुभुतीचा साक्षात्कार पुर्णपणे आपल्याला मुकवाचाने होतो.
७.प्रगटवाचन व मुकवाचनातील फरक :
१.अक्षर रूप ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात व लिखित अथवा मुद्रित अक्षर डोळ्याने पाहून नंतर मेंदूने अर्थग्रहण करण्यास मुकवाचन म्हणतात .
२.प्रगट वाचनाचे सस्वर वाचन व सुसस्वर वाचन दोन प्रकार आहेत व मुकवाचनाचे संदर्भवाचन सखोलवाचन विस्तृत वाचन होण्यास मदल होते.
३.प्रगट वाचनचे शक्षणात उच्चार स्पष्टता ,ओघव अस्खलीतपणा ,स्वाभाविकता भावापुर्णता साधन येते व मुकवाचनाने शिक्षणात स्वतंत्रपणे आशय समजावून देणे,गती संगती प्रगती साधने ,यथार्थता इत्यादी गुण येतात.
४. प्रगट वाचन भाव व विचाराचे प्रगटीकरणकरण होते .व मुकवाचनने शांतता व चीतंशीलता या वृत्तीची जोपासणा करता येते.
५.प्रगट वाचन इतरांना आनंद देते व मुकवाचन स्वान्त सुखाय असते .
६.प्रगटवाचनाचा वेग कमी असतो व मुकवाचनाचा वेग अधिक असतो .

८.वाचनातील दोष व त्यावर उपाय :
१.अस्पष्ट आवाजात वाचन करणे :-दैवत-देवत.
२.चुकीचे उच्चारण : श,ष,स.
३.उच्चार भेदाचे अज्ञान वाचा व दृष्टीदोष .
४.वाचनातील अशुध्दता :तीर्थ ,तिर्थ.
५.अपूर्ण शब्द उच्चारण .
६.अडखळत वाचणे हेलकाढून वाचणे .
७.चुकीच्या जागी शब्द तोडून वाचणे.
८.शब्द गाळणे नवीन शब्द टाकून वाचन करणे.

९.वाचन कौशल्यात शारीरिक व्यंगामुळे निर्माण झालेल्या उणीवा व उपाय .
नाक,कान,डोळा,जिव्हा,दात :-डॉक्टर कडून करणे.
१०.वाचनातील योग्य आसनबंध :
१.पाठीचा कणा ताठ असावा.
२.प्रकाश डावीकडून यायला हवा.
३.दृष्टीच्या पातळीशी ४० अंश कोन करणे.
४.पुस्तक व नजर यात ९ ते १२ इंच अंतर आहे.
५.झोपुन वाचणे घातक आहे.
६.पुस्तक वाचताना संपूर्ण उघडणे डावाहात खाली ठेवणे.
७.इतर काम करतांना पुस्तक वाचू नये.
८.उभे राहून पुस्तक वाचतांना दोन्ही पायावर सरळ भार द्यावे .
११.निकोप वाचन सवयी :
१.पुस्तकावर खुणा करू नये.
२.पुस्तकाला कव्हर घालावी .
३.वाचलेल्या पुस्तकातील मुद्दे वहीत नोंदवी .
४.दुसऱ्याचे अथवा ग्रंथालयाचे पुस्तक वेळेवर नेऊन द्यावे.
५.वाचनलेले पुस्तक कपाटात बंद करू ठेवावे.
६.वाचलेल्या पुस्तकावर स्वताचा अभिप्राय तयार करणे.
१२.वाचन कौशल्य विकासाठी उपक्रम :
१.भिन्न-भिन्न प्रकारचे वाचन तक्ते दाखवणे अर्थ स्पष्ट करणे.
२.कार्डस ,कृतीदर्शक चित्रे दाखवणे.
३.टेपरेकॉर्डर च्या माध्यमातुन स्पर्धा घेणे .
४.भाषेचे खेळ व पाठांतर स्पर्धा घेणे.
५.भेंड्या व व्याकरणाचे खेळ घेणे .
६.अवांतर वाचन करायला लावणे.

१३.परिणामकारक वाचन कौशल्याची वैशिष्टे :
१.सुस्पष्ट वाचन : प्रत्येक अक्षराचा व शब्दाचा उच्चार सुस्पष्ट होणे आवश्यक आहे.
२.योग्य आरोह -आवरोह : उतार –चढाव होय.
३.स्वराघात : स्वरावर जोर देणे.
४.गती :योग्य गतीने वाचन करणे.
५.लय : काव्य वाचनाचे महत्वाचे लक्षण लय आहे.
६.योग्य हवाभाव :-डोळे ,भुवया ,मान,हाताची हालचाल.

लेखनकौशल्य
वाचनाने ज्ञान वाढते, सभेत बोलल्याने माणूस हजरजबाबी होतो, मात्र लिहिण्याने माणसाचा विचार नेटका व काटेकोर होतो- बेकन (तत्त्ववेत्ता).
भाषिक कौशल्यांच्या पायऱ्या
लेखन कौशल्य
वाचनकौशल्य
भाषण-संभाषण कौशल्य
श्रवणकौशल्य
हा बेकन या तत्त्ववेत्याचा विचार आणि बाजूला दाखविलेल्या पायऱ्या पाहिल्या की लक्षात येईल, की लेखनकौशल्य प्राप्त करण्यापूर्वी आधीच्या तीनही पायरऱ्या यशस्वीपणे चढाव्या लागतील. आधीची तीनही कौशल्ये व्यवस्थितपणे आत्मसात करावी लागतील. कारण लेखनात आत्माविष्कार प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य असते. ‘लेखन’ हे साधनही आहे, आणि लेखनकौशल्य प्राप्त करणे ही ‘साधना’ ही आहे. ती साधना योग्य मार्गाने व दिशेने होणे आवश्यक आहे, त्यासाठी काही किमान तांत्र‌िक बाबींचा स्वीका‍र, आंगीकार विद्यार्थ्यांनी आवश्य करावा-
> आपले अक्षर फार मोठे अथवा फार बारीकही नसावे.
> अक्षरांवर शिरोरेषा द्याव्यातच. त्याने अक्षरांचे आणि शब्दांचे सौंदर्य वाढते.
> आपली अक्षरे सुवाच्य, सुंदर योग्य वळणाने लिहिलेली असावीत.
> दोन अक्षरे, दोन शब्द, दोन ओळीत योग्य अंतर असावे.
> लेखनात आवश्यक असणारी योग्य गती तर हवीच, त्यात सातत्यही हवे.
या तांत्र‌िक (टेक्निकल) गोष्टी आपण स्वत:मध्ये आणि विद्यार्थी-पाल्यांमध्येही सवय म्हणून मुरवल्या पाहिजेत. नव्हे, त्या पाचही उत्तम भाषिक सवयी आहेत, हे स्वत:च्या मनात रूजवावे.
लेखनकौशल्याची सुरूवात लिपिज्ञानाने होते. ज्यात सर्वप्रथम स्ट्रोक्स (ज्यात उभ्या आडव्या तिरप्या रेषा काढण्याची दिशा महत्त्वाची असते) वळणे- (वर्तुळ, अर्धवर्तुळ, वेलांट्या आणि सर्व वळणे काढण्याचा क्रम, वळण रेखाटण्याची दिशा महत्त्वाची असते) या सर्व गोष्टींच्या मदतीने लिपिज्ञान होते. ही लेखन कौशल्याची सुरूवात आहे, खरेतर चारही भाषिक कौशल्यांमध्ये ‘लेखन’ हे शिखरीभूत कौशल्य आहे असे म्हणतात. म्हणजेच लेखन कौशल्य ही सर्वात वरची पायरी किंवा सर्व कौशल्यांचा कळस आहे. लेखन कौशल्य उत्तमरितीने प्राप्त झाले, म्हणजे सर्व भाषिक कौशल्ये प्राप्त झाली असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. कारण थोर विचारवंत श्री.शिवाजीराव भोसले यांच्या मते- ‘‘लेखन ही अक्षरक्रीडा आहे, ती आनंदाने करता यावी.’’
लेखनाचे टप्पे
लेखन कौशल्य काही सगळ्यांना हातात लेखणी घेतल्याबरोबर प्राप्त होत नाही. ते टप्प्याटप्प्या विकसित होणारे कौशल्य आहे. त्याचे महत्वाचे तीन टप्पे आहेत.
> हस्ताक्षर (सुवाच्य ते वळणदार)
> शुद्धलेखन(ऱ्हस्व,दीर्घ, ऋकार, रफार, विसर्ग, विरामचिन्हे)
> लेखन प्रकारांनुसार स्वत:चे स्वतंत्र लेखन.
या तीनही टप्प्यांना सारखेच महत्त्व आहे. कारण लेखनाची सुरूवातच अक्षरलेखनापासून होते. ते त्या वेळीच ‘सुवाच्य’ म्हणजे सहज वाचता येईल ह्या पातळीपासून, ‘वळणदार’ म्हणजे अक्षर लेखनासाठीचे स्ट्रोक्स आणि वळणे योग्य दिशेने देऊन काढलेले सुंदर अक्षर याा पातळीपर्यंत विकसित करण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. ही एक आयुष्यभरासाठी केलेली फार मोठी गुंतवणुक असते. पुढे संपूर्ण आयुष्यभर तुमचे हे सुंदर हस्ताक्षर तुमच्या उत्तम व्यक्तिमत्वाचा महत्वाचा गुण म्हणून अनेक फायदे मिळवून देणारा असतो.
दुसरा टप्पा आहे शुद्धलेखन. हस्ताक्षर छान वळणदार झाले ; की मग आपल्या शुद्धलेखनाकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरूवात करावी. काना, मात्रा, वेलांटी, उकार, ऋकार, रफार, विसर्ग आणि विरामचिन्हे यांच्याकडे लक्ष असावे म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व विकासात आणखी एक मानाचा तुरा खोवला जातो. कारण ऱ्हस्व-दीर्घांच्या चुका नसलेले, विरामचिन्हांचा योग्य वापर करून लिहिलेले लिखाण वाचणाऱ्याच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण करणारे असते. मग तो साधा रजेचा अर्ज असो , वा कुणाला पाठवलेले पत्र असो !
तिसरा टप्पा हा भाषाविकसनाच्या दृष्टीने थोडा अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण. इथे आपण खऱ्या अर्थानी लेखनकौशल्याचा वापर करणार असतो. इतरांचे लेखन, साहित्यीकांचे साहित्य, विविध वाङ्मयप्रकारांची आपण ओळख करून घेतघेत भाषाशिक्षणात पुढे जात असतो. त्या बरोबरच आपणही असेकाही लिहावे हे अपेक्षित असते, किंबहुना आपल्यालाही असे काही आपल्या मित्रमै‌‌त्र‌िणींना, नातेवाईकांना, शिक्षकांना, वर्गमित्रांना सांगावे वाटते. काही मुले तसे लिहिण्याचा चांगला प्रयत्नही करतात. असा प्रयत्न करणे, हेच भाषाशिक्षणात अपेक्षित असते. आपले विचार, मत ,भावना आपल्या भाषेत योग्यरितीनी लिहिता अथवा सांगात येणे ; म्हणजेच भाषेचा वापर करता येणे ! हा तिसरा टप्पा म्हणजे भाषेचा प्रभावी वापर करण्याचा टप्पा आहे. ज्यामध्ये पत्रलेखन (कौटुंबिक पत्र आणि कार्यालयीन पत्रे)अर्ज लिहिणे, परिच्छेद लेखन, जाहिरात लेखन, निबंधलेखन, वैचारिक लेखन, वर्णनात्मक लेखन, कल्पनाविस्तार, संवादलेखन, वृत्तान्त लेखन, सारांश लेखन, स्वानुभव ‌किंवा आत्मकथनात्मक लेखन आणि रसग्रहणात्मक लेखन. अशा चढत्याक्रमाने ‘अनुभवग्रहण’ ते ‘अनुभव कथन’ असा हा लेखनप्रवास असतो, आणि तो तसा, त्या क्रमानेच व्हावा हे भाषाशिक्षणात अपेक्षितही असते. ‘मराठी’ ही माझी ‘मातृभाषा’ आहे, तर मला हे जमलेच पाहिजे, हा निग्रह आपल्या मनात असावा. आणि त्या दृष्टीने आपण सतत प्रयत्नशील राहाणे आवश्यक आहे.
भााषण-संभाषण

भाषणाचे महत्व :
१.बोलणाऱ्याच्या शब्दामधून होणारे त्याच्या मनोवृत्ती व विचाराचे अर्थपूर्ण प्रगटीकरण म्हणजे भाषण होय.
२.यशस्वी जीवनाचे लक्षण असते भाषण क्षमतेचा संपूर्ण विकास.
३.आपला योग्य विचार स्पष्टपणे सांगुन जन्मत आपल्या बाजुंनी वळवता येते.
४.बोलणे हे आत्माविष्काराचे प्रमुख व प्रभावी साधन आहे.
५.भाषणाचे प्रकार :
१.स्वगत भाषण :विचार हे मनोगत भाषण असते.
२.प्रगत भाषण : सभेतील व्याख्यान प्रगट भाषण असते.
२.भाषणाचे व्यावहारिक उद्दिष्टे :
१.आत्माविष्कार :आपल्या मनातील विचार ,कल्पना,भावना दुसऱ्याला सांगणे .
२.आनंदप्राप्ती:आपली सुख व दुखे दुसऱ्याला सांगुन आनंद मिळवणे.
३.संदेशपोहचवणे:आपला निरोप दुसऱ्याला भाषेद्वारे पोहचवणे.
४.स्वमतप्रचार : आपली मते इतरापुढे मांडणे.
५.सृजन शक्तीला प्रोत्साहन :शब्दाच्या उच्चारातून अर्थ छटाची निर्मिती करणे.
६.अंतरक्रिया : एकमेकाच्या विचाराचा मेळ घालणे.

३.बालकाच्या जीवनात आत्मविष्काराला महत्वाचे स्थान आहे:
१.आपल्या मनातील विचार,कल्पना,भावना व्यक्त करण्यासाठी भाषण कौशल्य आवश्यक आहे.
२.कानावर पडणाऱ्या प्रत्येक शब्द मुलांचा नवा अनुभव असतो.
३.बालक भाषण कौशल्याकडून अत्माविष्काराची गरज भागवते.
४.बालक आपल्या मनातील विचार ,कल्पना,भावना व्यक्त करते म्हणून बालकाच्या जीवनात आत्माविष्काराला महत्वाचे स्थान आहे.
४.संभाषणाचे प्रकार :
१.अनौपचारिक संभाषण :
२.औपचारिक संभाषण :

१.अनौपचारिक संभाषण :संभाषणाची भाषा जेव्हा घरेलू असते तेव्हा त्याला अनौपचारिक संभाषण म्हणतात.
१.कौटुंबिक संवाद : कुटुंबातील व्यक्ती-व्यक्ती एकत्र येऊन आप-आपली विचार व्यक्त करतात.
२.गप्पा गोष्टी :मनातील विचार,कल्पना,भावना मुक्तपणे व्यक्त होतात.
३.गाणी ,पाठांतर ,भेंड्या ,अंताक्षरी ,कोडी ,उखाणी: भाषा शुध्द होण्यासाठी मदत होते.
४.संदेश पोहचविणे : आपला निरोप दुसऱ्याला भाषेद्वारे पोहचवणे .

२.अनौपचारिक संभाषण : दोन अपरिचीत व्यक्ती जेव्हा पहिल्याच वेळेस एकमेकांना भेटतात व संभाषण करतात त्याला अनौपचारिक संभाषण म्हणतात.
१.वर्णन : व्यक्ती ,वस्तु ,स्थल,प्रसंग याचे चित्र उभे करण्यासाठी भाषण करणे व मुलाची जिज्ञासा वाढविणे.
२.कथन :घटना ,इतिहास,चरित्र्य,कथा याचे कथन करणे व कथनाला रसभरीतपणा हा गुण आवश्यक आहे.
३.चर्चा : एखाद्या विषयाचे विविध पैलु उलगडून दाखवणे प्रत्येकाने आपले विचार व्यक्त करणे .
४.निवेदन : स्वता जाणुन घेणे नंतर दुसऱ्याला सांगणे त्यास निवेदन म्हणतात.
५.स्पष्टीकरण :कविताच्या पंक्ती,सुभाषिते ,वाक्यप्रचार ,म्हणी ,कठीण शब्दाचे अर्थ स्पष्ट करण्यासाठी स्पष्टीकरण करणे.
६.व्याख्यान : सभेत श्रोत्यांना उद्देशुन केलेले भाषण यास व्याख्यान म्हणतात व व्याख्यात हा बहुश्रुत विद्वान असतो.
७.संवाद : दोन किंवा अधिक व्यक्ती एकमेकांना बोलतात त्यांना संवाद म्हणतात व नाट्यीकरण संवाद लेखन करावे लागते.
८.वादविवाद :एकाच प्रश्नाची दोन उतरे असल्यास योग्य उत्तर कोणते ?यासाठी वादविवाद घातला जातो.
९.मुलाखत :एकाद्या व्यक्तीच्या व्यवसाय संबंधी माहिती विचारणे .
१०.चित्रचर्चा : मुले चित्रकाराच्या चित्राचे उत्तर आपल्या कल्पने नुसार देतात.


५.संभाषण कौशल्याची सहा अंगे :
१.उच्चार :उच्चार स्पष्ट असावे.
१.अनुस्वार : चिंता –चिता.
२.आकार:अजन्म –आजन्म .
३.ऱ्हस्वदिर्घ: सुत-सूत
४.वर्णाची उच्चारस्थाने :कंठ,तालव्य,मुर्धव्य,दंत्य ,ओष्ठ .
२.स्वराघात :मी पुस्तक वाचतो,मी पुस्तक वाचतो.
३.विराम : मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी.
४.स्वरातील चढउतार :योग्य आरोह ,अवरोह होय.
५.गती व उंची : दीड डार्ल कुटार .
६.व्यंजन भेद :श,ष,स, व ड. ण,न,
६.भाषणातील उणीवा व त्यावर उपाय :
१.शारीरिक पातळीवरील उणीवा :
१.जीभ जाड असणे.
२.पडजीभ टाळूला चिकटणे.
३.ओठ फाटलेले असणे.
४.दांताचे वेडी वाकडी वाढ.
५.नाकाचे हाड अयोग्य रीतीने वाढणे.
उपाय : डॉक्टरला दाखवून दोष दूर करणे.

२.मानसिक अस्वास्थामुळे :
१.तोतरेपणा
२.हेलकाढून बोलणे.
३.वाक्य अर्धवट उच्चार करणे.
उपाय :आत्मविश्वास निर्माण करणे.

३.अज्ञानातून निर्माण झालेल्या उणीवा :
१.अस्पष्ट आवाजात भाषण करणे.
२.चुकीचे उच्चार करणे.
३.उच्चार भेदाचे अज्ञान वाचा जिव्हा दोष .
४.भाषणातील अशुद्धता .
५.अपूर्ण शब्द उच्चारण .
६.अडखळत बोलणे हेलकाढून बोलणे.
७.चुकीच्या जागी शब्द तोडुन बोलणे.
८.शब्द गाळणे नवीन शब्द वापरून बोलणे.
उपाय :शिक्षकाने रोजच्या अध्यापनातून ही दोष दूर कर करता येतात.
७.भाषण कौशल्यात मौखिक कार्याचे महत्व :
मौखिक कार्य : बोलणे हे एक मौखिक कार्य आहे.
१.संभाषण :अनौपचारिक व औपचारिक .
२.वादविवाद :एकाच प्रश्नाची दोन उत्तरे असल्यास योग्य उत्तर कोणते ? यासाठी वादविवाद घातला जातो.
३.चर्चा : एखाद्या विषयाचे विविध पैलू उलगडून दाखवणे प्रत्येकाने आपली मते व्यक्त करणे.
४.संवाद :दोन किंवा अधिक व्यक्ती एकमेकांना बोलतात त्यांना संवाद म्हणतात.

८.भाषण –संभाषण कौशल्यासाठी उपक्रम :
१.मौखिक कार्य :संभाषण ,वादविवाद,चर्चा संवाद याच्या माध्यमातून मौखिक कार्य घडते.

२.भाषा व्याकरणाचे खेळ :
१.एका वर्ण अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाची सूची बनविणे.
२.सामान्य ध्वनी शब्द वेगळे करणे.
३.वस्तुची सुची बनविणे.
४.कथा सांगणे.
५.एखाद्या विषयाचे वर्णन करणे.
६.वक्तृत्व स्पर्धा घेणे.
७.अंताक्षरी स्पर्धा घेणे.
८.कविता व गायन स्पर्धा घेणे.
९.समानार्थी शब्दाचा संग्रह करणे.
१०.विरुद्धार्थी शब्दाचा संग्रह करणे.

३.कथा-कथन : कथा सांगणे,चित्राचे वर्णन करायला लावणे,बाजाराचे उत्सवाचे वर्णन करायला लावणे.
४.अवसर :विद्यार्थाला ,घरी व शाळेत आपल्या मनातील विचार ,कल्पना ,भावना मांडण्याचा मोका देणे .
९.बालवाडीत गोष्ट सांगण्याचे उद्देश :
१.बालकाला अवधान पूर्वक ऐकण्याची सवय लावणे.
२.बलाकाचे मनोरंजन करणे.
३.बालकाला चांगल्या सवयी लावणे.
४.बालकावर चांगले संस्कार करणे.
९.बलासभा घेण्याचे हेतू :
१.बालकांचा परस्परांशी परिचय होतो .
२.बालकाची भीती कमी होते.
३.बालकाला शिक्षकाबद्दल आपुलकी निर्माण होते.
४.त्याचे मन शाळेत रमते.
५.बालकाचे मन मोकळे पणाने आपले विचार ,कल्पना ,भावना मांडते.

शुक्रवार, १ मार्च, २०१९

साहित्यधारा भाग २ MCQ


१. पंचधारांचा प्रदेश या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
          उत्तर - डॉ. प्रल्हाद लुलेकर

२. एकेश्वरी पंथाचा विजय हा वैचारिक लेख कोणत्या ग्रंथातून घेतलेला आहे?
   उत्तर-  परीपुर्ती

३. इ.स. १६४२ मध्ये ........या शास्त्रज्ञाने बेरीज व वजाबाकी करणारे अटोमॅटिक मशीन तयार केले.
   उत्तर-ब्लेझ पास्कल

४. संगणकाला-------- असेही म्हणतात.
  उत्तर- गणकयंत्र

५.  संगणकाचा जनक कोणास मानले जाते?
    उत्तर- चार्लस बॅबेज

६.  संगणकाच्या प्रत्येक पिढीचा कालावधी सर्वसाधारणपणे किती वर्षाचा मानला जातो?
   उत्तर-  दहा

७.  उंबरठा कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
    उत्तर- व्यंकटेश माडगूळकर

८.  कोठे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्यंकटेश माडगूळकर होते?
उत्तर- अंबाजोगाई
९.  तणकट ही कादंबरी कोणी लिहिली?
    उत्तर- राजन गवस

१०. जनता या नियतकालिकांचे संपादक कोण होते?
   उत्तर-    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

११. रातपाळी या कथेतून दुःख, दारिद्र्याशी एकाकीपणे संघर्ष करणाऱ्या ------ चे चित्रण आले आहे.    
  उत्तर-  सुभद्रा

१२. 'आले ढग गेले ढग'  हा कवितासंग्रह ------- यांचा आहे.
        उत्तर- डॉ.प्रल्हाद लुलेकर

१३. तू तरी शीक खरा, शीक ----- धडा.
    उत्तर- भीमाचा

१४. प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ व आत्मविश्वास तुम्ही अभ्यासलेली कोणती कविता देते?   
     उत्तर-     मेलं नाही अजून आभाळ...
१५. आज नाही तर उद्या शिवारात उधाणेलही पीक
       एक ना एक दिवस तू घालशील -------भीक
   उत्तर-   कुबेरलाही
१६. भारतीय समाजाची उभारणी, पुनर्रचना -------- आधारित करावी, यासाठी सातत्याने लेखणी आणि वाणीचा विवेकनिष्ठेने त्यांनी वापर केला.  
    उत्तर- समतेवर
१७.  भ्रष्ट व मूल्यहीन शिक्षणसंस्थांचे विदारक वास्तव कोणत्या पाठातून चित्रित झाले आहे?          
    उत्तर-  प्रमाणपत्र
१८. चिडल्याने  --------- संपतो, शांतपणे बोलण्यानं चर्चा होते.           उत्तर-  विवेक
१९.  रंगहोळी हा कवितासंग्रह कोणाचा आहे?  
 उत्तर-  अनिल कांबळी
२०. प्रत्येक माणसाला कित्येक जीर्ण व्याधी; माणूस ------- जुळवून घेत आहे. 
       उत्तर-   औषधांशी
२१. 'कोरा कागद निळी शाई' या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
    उत्तर-  बालाजी इंगळे
२२. हर मोसमात खंडीखंडीन तुझ्या घरी रास येऊन पडेल
       लांब उभारून बघत तुझ्यावर------- सारी जळेल 
     उत्तर- दुनिया
२३. २१ वे शतक हे महिती आणि -----------शतक आहे.  
     उत्तर-   तंत्रज्ञानाचे
२४. वर्ड रॅप हे अत्यंत मूलभूत----------- चे लक्षण आहे.   
     उत्तर-   वर्ड प्रोसेसिंग
२५. WWW चा लॉंगफॉम् काय आहे? 
      उत्तर-  वर्ल्ड वाईड वेब
२६. HTML चा लॉंगफॉम् काय आहे? 
       उत्तर- हायपर टेक्स मार्कअप लँग्वेज
२७. सभोतालचे वातावरण आत्महत्या करण्यासही पोषक नसल्याची भावना कोणत्या कवीने मांडली आहे?   
       उत्तर-   मनोज बोरगावकर
२८. ''असेल जन्म पुढचा तर
       माझा देहच कविता व्हावा
       अन अजरामर कविता म्हणून
       आपण साऱ्यांच्या ओठी राहावं... '' ह्या ओळी कोणत्या कवितेतील आहेत?
     उत्तर- आत्महत्येपूर्वीचे स्वगत
२९. 


कवी कुसुमाग्रज

कुसुमाग्रज
वि.वा. शिरवाडकर यांचे खरे नांव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक गेल्यामुळे त्यांचे नांव विष्णु वामन शिरवाडकर झाले. २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातून पास झाले.
kusumagraj
१९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्‍या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. त्यांचा आवडता लेखक पी. जी. वुडहाऊस व आवडता नट चार्ली चाप्लिन होता.
१९४२ साली प्रसिध्द झालेला 'विशाखा' हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भुरळ घालते. 'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' व 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली 'वैष्णव' ही कादंबरी व 'दूरचे दिवे' हे नाटक प्रसिध्द झाले.
'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत नाजुक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरूणांचाही वृध्दांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला.
कुसुमाग्रज एक वेगळं व्यक्तिमत्व 
त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ, त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले. नाशिकच्या प्रसिध्द सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असं असूनही यश साजरं करतांना ते मागे राहणंच पसंत करत.
साहित्यसूर्य मावळला 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कुसुमाग्रजांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. नाशिककरांना तर आपल्या घरातील वडीलधारं माणूस गमावल्याचं दु:ख आहे. मानवतेचा कळवळा व मराठी भाषेवरचं प्रभुत्व यामुळेच 'नटसम्राट' व 'विशाखा' सारखे साहित्य जन्माला आले. एवढं उत्तुंग कर्तृत्व व अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व अत्यंत साधे तर होतेच पण शेवटपर्यंत अत्यंत नम्र व सत्कार्याला वाहून घेतलेले जीवन ते शेवटपर्यंत जगले. शिक्षणक्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आजची परीक्षा पध्दती मुलांसाठी निष्ठुर पध्दती आहे असे त्यांचे मत होते. इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवले. त्यांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे समाजातील गरीब, गरजू व मागासलेल्या जनतेसाठी योगदान वाखाणण्यासारखे आहे.

मराठी म्हणी संग्रह



मराठी म्हणी


1.    अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.
2.    अंगापेक्षा बोंगा जास्ती.
3.    अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
4.    अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
5.    अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
6.    अंथरूण पाहून पाय पसरावेत.
7.    अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
8.    अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
9.    अंधारात केले पण उजेडात आले.
10.    अंधेर नगरी चौपट राजा.
11.    अकिती आणि सणाची निचिती.
12.    अक्कल खाती जमा.
13.    अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
14.    अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
15.    अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
16.    अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
17.    अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
18.    अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
19.    अघळ पघळ अन घाल गोंधळ.
20.    अघळ पघळ वेशीला ओघळ.
21.    अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.

22.    अडला हरी गाढवाचे पाय धरी.
23.    अडली गाय खाते काय.
24.    अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
25.    अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
26.    अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
27.    अढीच्या दिढी सावकाराची सढी.
28.    अती केला अनं मसनात गेला.
29.    अती झालं अऩ हसू आलं.
30.    अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
31.    अती तिथं माती.
32.    अती परीचयात आवज्ञा.
33.    अती राग भिक माग.
34.    अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
35.    अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
36.    अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही. 
37.    अपयश हे मरणाहून वोखटे.
38.    अपापाचा माल गपापा.
39.    अपुऱ्या घड्याला डबडब फार.
40.    अप्पा मारी गप्पा.
41.    अर्धा वैद्या मरणास खाद्य.
42.    अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
43.    अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
44.    अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
45.    अल्प बुध्दी, बहु गर्वी.
46.    अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.

47.    अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
48.    अळी मिळी गुपचिळी.
49.    अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.
50.    अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
51.    असं कधी घडे अन सासुला जाव‌ई रडे.
52.    असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
53.    असतील चाळ तर फिटतील काळ.
54.    असतील मुली तर पेटतील चुली.
55.    असतील शिते तर जमतील भूते.
56.    असुन नसुन सारखा.
57.    असून अडचण नसून खोळांबा.
58.    असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
59.    असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
60.    असेल दाम तर हो‌ईल काम.
61.    असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
62.    आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
63.    आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?
64.    आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
65.    आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
66.    आंधळीपेक्षा तिरळी बरी.
67.    आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
68.    आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.
69.    आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.
70.    आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.
71.    आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभाऊ.
72.    आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
73.    आखुड शिंगी आणि बहुदुधी.
74.    आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
75.    आग लागल्यावर विहीर खणणे.
76.    आगीशिवाय धूर दिसत नाही.
77.    आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
78.    आज अंबारी, उद्या झोळी धरी.
79.    आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.
80.    आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.
81.    आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
82.    आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
83.    आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
84.    आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो. 
85.    आधणातले रडतात, सुपातले हसतात.
86.    आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
87.    आधी करा मग भरा.
88.    आधी करावे मग सांगावे.
89.    आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
90.    आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
91.    आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
92.    आधी नमस्कार मग चमत्कार.
93.    आधी पोटोबा, मग विठोबा.
94.    आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.
95.    आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.
96.    आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
97.    आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
98.    आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
99.    आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
100.    आपण आपल्याच सावलीला भितो.
101.    आरे म्हटले की कारे आलेच.
102.    आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
103.    आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
104.    आपण सुखी तर जग सुखी.
105.    आपलंच घर, हागुन भर.
106.    आपला आळी, कुत्रा बाळी.
107.    आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.
108.    आपला हात, जग्गन्नाथ.
109.    आपलाच बोल, आपलाच ढोल.
110.    आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून. 
111.    आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
112.    आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
113.    आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून. 
114.    आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
115.    आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
116.    आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
117.    आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे.
118.    आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
119.    आपल्या कानी सात बाळ्या.
120.    आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
121.    आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
122.    आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
123.    आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
124.    आय नाय त्याला काय नाय.
125.    आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार.
126.    आयत्या बिळात नागोबा.
127.    आराम हराम आहे.
128.    आरोग्य हीच संपत्ती.
129.    आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?
130.    आला भेटीला धरला वेठीला.
131.    आली अंगावर, घेतली शिंगावर.
132.    आली चाळीशी, करा एकादशी.
133.    आली सर तर गंगेत भर.
134.    आलीया भोगासी असावे सादर.
135.    आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
136.    आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
137.    आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
138.    आळश्याला दुप्पट काम.
139.    आळी ना वळी सोनाराची आळी.
140.    आळ्श्याला गंगा दूर.
141.    नावडतीचे मीठ आळणी.
142.    आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर. 
143.    आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.) 
144.    आवसबा‌ई तुझ्याकडे पुतनबा‌ई माझ्याकडे
145.    आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासुन आली माघारा.
146.    आशा सुटेना अन देव भेटेना.
147.    आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
148.    ओ म्हणता ठो ये‌ईना.
149.    ओठात एक आणि पोटात एक.
150.    ओठी ते पोटी.
151.    ओल्या बरोबर सुके जळते.
152.    ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.
153.    ओळखीचा चोर जीवे मारी.
154.    ओसाड गावी एरंडी बळी.
155.    औटघटकेचे राज्य.
156.    औषधावाचून खोकला गेला
157.    कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
158.    कच्च्या गुरुचा चेला.
159.    कठीण समय येता कोण कामास येतो.
160.    कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच. 
161.    कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
162.    कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
163.    कपटि मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
164.    कपिलाषष्टीचा योग.
165.    कमळ भुंग्याला अन चिखल बेडकाला.
166.    कर नाही त्याला ड़र कशाला?
167.    करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
168.    करणी कसायची, बोलणी मालभावची.
169.    करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती.
170.    करवंदीच्या जाळीला काटे.
171.    करायला गेलो एक अऩ झाले एक.(भलतेच).
172.    करावे तसे भरावे.
173.    करीन ती पूर्व.
174.    करुन करुन भागले अनं देवपुजेला लागले.
175.    करुन गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
176.    करू गेले काय? अन उलटे झाले काय?
177.    कर्कशेला कलह गोड, पद्मीनीला प्रीती गोड.
178.    कळते पण वळत नाही.
179.    कशात काय अन फाटक्यात पाय.
180.    कशात ना मशात, माकड तमाशात.
181.    कष्ट करणार त्याला देव देणार.
182.    का ग बा‌ई उभी, घरात दोघी तिघी.
183.    काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
184.    काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव?
185.    काखेत कळसा अऩ गावाला वळसा.
186.    काजव्याकडून सुर्याची समीक्षा.
187.    काट्याचा नायटा होतो.
188.    काट्याने काटा काढायचा.
189.    काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
190.    काडी चोर तो माडी चोर.
191.    कानात बुगडी, गावात फुगडी.
192.    काप गेले नि भोका रवली(भोके राहिली).
193.    काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही.
194.    काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम.
195.    काम नाही कवडीचं, रिकामपण नाही घडीच.
196.    काम नाही घरी सांडून भरी.
197.    काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
198.    कामाचा ना धामाचा भाकरी खातो नेमाचा.
199.    कामापुरता मामा अऩ ताकापुरती आजी.
200.    काय करु अऩ कस करु?
201.    काय बा‌ई अशी तु शिकवले तशी.
202.    काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
203.    काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची.
204.    कावळा गेला उडून गू खा चाटून.
205.    कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी.
206.    कावळा बसायला आणि फांदी तुटायला.
207.    कावळ्याचे दांत शोधण्यासारखे (मोजण्यासारखे).
208.    कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
209.    कावळ्याने कितीही अंग घासले तरी बगळा होत नाही.
210.    कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते.
211.    काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली.
212.    कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?
213.    कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच.
214.    कुठे इंद्राची ऐरावत आणि कुठे शांभाट्टाची तट्टानी. 
215.    कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
216.    कुठे तरी पाल चुकचुकतेय.
217.    कुठेही जा, पळसाला पाने तीनच.
218.    कुडास कान ठेवी ध्यान.
219.    कुडी तशी पुडी.
220.    कुणाचा कुणाला पायपूस नाही.
221.    कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस.
222.    कुणाला कशाचे बलुत्याला पशाचे.
223.    कुणी वंदा, कुणी निंदा, माझा स्वहिताचा धंदा.
224.    कुत्र्या मांजराचे वैर.
225.    कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
226.    कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ.
227.    कुसंतनापेक्षा निसंतान बरे.
228.    केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी.
229.    केल्याने होत आहे आधी केले ची पाहिजे.
230.    केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले.
231.    केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी.
232.    केळ्याचा डोंगर, दे‌ई पैशाचा डोंगर.
233.    केवड्याने दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
234.    कोंड्याचा मांडा करुन खाणे.
235.    कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
236.    कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं. (कोणाला कशाचे मळणीला लसणाचे.)
237.    कोल्हा काकडीला राजी.
238.    कोल्ह्यास द्राक्षे आंबट.
239.    कोळसा कितीही उगाळला तरी काळाच.
240.    क्रियेवण वाचळता व्यर्थ आहे.
241.    खतास महाखत.
242.    खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं.
243.    खऱ्याला मरण नाही.
244.    खा‌ई त्याला खवखवे.
245.    खा‌ईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
246.    खा‌ऊ जाणे तो पचवू जाणे.
247.    खा‌ऊन माजावे पण टाकून माजू नये.
248.    खाजवुन अवधान आणणे.
249.    खाजवुन खरुज काढणे.
250.    खाटकाला शेळी (गाय) धार्जिणी.
251.    खाण तशी माती.
252.    खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
253.    खाणाऱ्याला चव नाही, रांधणाऱ्याला फुरसत नाही.
254.    खाणे खाण्यातले आणि दुखणे पहिल्यातले.
255.    खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे.
256.    खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत.
257.    खादाड खा‌ऊ लांडग्याचा भाऊ.
258.    खायची बोंब अन हगायचा तरफडा.
259.    खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे.
260.    खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी.
261.    खायला कहर आणि भु‌ईला भार.
262.    खायला कोंडा अऩ निजायला धोंडा.
263.    खायला बैल, कामाला सैल. (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मस्त, कामाला सुस्त).
264.    खायाला फुटाणे अन टांग्याला आठाणे.
265.    खालल्या घरचे वासे मोजणारा.
266.    खाली मुंडी, पाताळ धुंडी.
267.    खाल्ल्याघरचे वासे मोजणारा.
268.    खावून खग्रास हागुन सत्यानाश.
269.    खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला.
270.    खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा.
271.    खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी.
272.    खुंटीवरचा कावळा ना घरचा ना दारचा.
273.    खुंट्याची सोडली नि झाडाले बांधली.
274.    खोट्याच्या कपाळी गोटा.
275.    "ग" ची बाधा झाली.
276.    गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.
277.    गंगेत घोडं न्हालं.
278.    गरज सरो अऩ वैद्य मरो.
279.    गरजवंताला अक्कल नसते.
280.    गरजेल तो पडेल काय?
281.    गरीबाच्या दाराला सावकाराची कडी. 
282.    गरीबानं खपावं, धनिकाने चाखावं. 
283.    गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी.
284.    गळ्यातले तुटले ओटीत पडले.
285.    गवयाचे मुल सुरांनीच रडणार. 
286.    गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे. 
287.    गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
288.    गाठ पडली ठकाठका. 
289.    गाढव माजला की तो अखेर आपलेच मुत पितो. 
290.    गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने. (घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं.) 
291.    गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता.
292.    गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ. 
293.    गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी. 
294.    गाढवाच्या लग्नांला शेंडीपासून तयारी.
295.    गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य.
296.    गाढवाला गुळाची चवं काय?
297.    गाता गळा, शिंपता मळा.
298.    गावंढ्या गावात गाढवी सवाशीण. 
299.    गाव करी ते राव न करी.
300.    गाव करील ते राव करील काय? 
301.    गाव तिथे उकिरडा. 
302.    गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड.
303.    गावात घर नाही रानात शेत नाही. 
304.    गुप्तदान महापुण्य. 
305.    गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर). 
306.    गुरुची विद्या, गुरुलाच फळली. 
307.    गुलाबाचे कांटे जसे आ‌ईचे धपाटे. 
308.    गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून? 
309.    गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैद्य. 
310.    गुळाला मुंगळे चिकटतातच.
311.    गोगल गाय पोटात पाय.
312.    गोड बोलून गळा कापणे.
313.    गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे. 
314.    गोरा गोमटा आणि कपाळ करंटा. 
315.    गोष्ट लहान, सांगण महान. 
316.    गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी. 
317.    गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट.
318.    घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी. 
319.    घटाकभर नाही माप अन रात्री ये‌ई हिवताप.
320.    घर गेले विटाळा शेत गेले कटाळा.
321.    घर चंद्रमोळी पण बायकोला साडीचोळी. 
322.    घर ना दार चावडी बिऱ्हाड. (घर ना दार वाऱ्यावर बिऱ्हाड.)
323.    घर फिरले की वासेही फिरतात.
324.    घर साकड नि बा‌ईल भाकड.
325.    घरचा उंबरठा दारालाच माहीत.
326.    घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.
327.    घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे.
328.    घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याहयाने धाडलाय वानवळा.
329.    घरांत नाही दाणा मला बाजीराव म्हणा. 
330.    घराची कळा अंगण सांगते.
331.    घरात घरघर चर्चा गावभर.
332.    घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान. 
333.    घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ.
334.    घरात नाही कौल, रिकामा डौल.
335.    घरात नाही तुरी भट भटणीला मारी.
336.    घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा. 
337.    घरासारखा गुण, सासू तशी सून.
338.    घरी नको झालेल्या माणसाला रस्त्यावरची माकडे पण दगड मारतात.
339.    घरोघरी त्याच परी, सांगेना तीच बरी. 
340.    घरोघरी मातीच्या चुली.
341.    घा‌ईत घा‌ई अन म्हातारीला न्हाणं येई.
342.    घाण्याचा बैल.
343.    घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. 
344.    घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर.
345.    घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक. 
346.    घे सुरी आणि घाल उरी.
347.    घेणे न देणे, कंदिल लावून जाणे.
348.    घोंगड अडकलं.
349.    घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा.
350.    घोडामैदान जवळ असणे.
351.    घोडे खा‌ई भाडे.
352.    घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.
353.    चढेल तो पडेल.
354.    चने खा‌ईल लोखंडाचे तेव्हा ब्रम्हपदि नाचे.
355.    चमडी जा‌ईल पण दमडी जाणार नाही.
356.    चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.
357.    चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
358.    चांदणे चोराला, उन घुबडाला.
359.    चांभाराची नजर जोड्यावर.
360.    चांभाऱ्याच्या देवाला खेटराची पूजा.
361.    चार आण्याची कोंबडी अऩ बाराण्याचा मसाला.
362.    चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
363.    चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती.
364.    चालत्या गाडीला खीळ घालणे.
365.    चिंती परा ते ये‌ई घरा.
366.    चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते.
367.    चिपट्यात काय काय करू?
368.    चुकलेला फकीर मशिदीत.
369.    चुलीतले लाकुड चुलीतच जळाले पाहिजे.
370.    चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच.
371.    चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना.
372.    चोपदार तुपाशी, राजा उपाशी.
373.    चोर तो चोर वर शिरजोर.
374.    चोर नाही तर चोराची लंगोटी.
375.    चोर सोडून संन्याशाला सुळी.
376.    चोराच्या उलट्या बोंबा.
377.    चोराच्या मनांत चांदणं.
378.    चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
379.    चोराच्या हाती जामदाखान्याच्या किल्या.
380.    चोराला सुटका, आणि गावाला फटका.
381.    चोरावर मोर.
382.    चोरीचा मामला हळू हळू बोंबला.
383.    चोरून पोळी खा म्हटले तर बोंबलून गुळवणी मागायची. 
384.    चोळीला आणि पोळीला कुणी कमी नसते.
385.    छडी लागे छमछम विद्या येई घमघम.

386.    जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर.
387.    जगाच्या कल्याणा संताची विभुती.
388.    जनाची नाही तरी मनाची तरी जरा.
389.    जनात बुवा आणि मनात कावा.
390.    जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला.
391.    जमता दशमा ग्रह.
392.    जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.
393.    जलात राहून माशाशी वैर कशाला?
394.    जळतं घर भाड्याने कोण घेणार?
395.    जवा येतील चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळं.
396.    जशास तसे.
397.    जशी कामना तशी भावना.
398.    जशी देणावळ तशी धुणावळ.
399.    जशी नियत तशी बरकत.
400.    जसा गुरु तसा चेला.
401.    जसा भाव तसा देव.
402.    जा‌ईचा डोळा नि आसवांचा मेळा.
403.    जातीसाठी खावी माती.
404.    जात्यातले रडतात, सुपातले हसतात.
405.    जात्यावर बसले की ओवी सुचते.
406.    जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.
407.    जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड.
408.    जाव‌ई पाहुणा आला म्हणून रेडा दुध दे‌ईल काय?
409.    जाव‌ई माझा भला आणि लेक बा‌ईलबुध्या झाला.
410.    जावयाचं पोर हरामखोर.
411.    जावा जावा आणि उभा दावा.
412.    जावा जावा हेवा देवा.
413.    जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
414.    जिकडे सु‌ई तिकडे दोरा.
415.    जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
416.    जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी. 
417.    जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.
418.    जिथे कमी तिथे आम्ही.
419.    जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.
420.    जुनं ते सोनं नवं ते हवं.
421.    जे न देखे रवि ते देखे कवि.
422.    जे पिंडी ते ब्रम्हांडी.
423.    जे फुकट ते पौष्टीक.
424.    जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
425.    जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत.
426.    जो गुण बाळा तो जन्म काळा.
427.    जो नाक धरी, तो पाद करी.
428.    जो श्रमी त्याला काय कमी.
429.    जोकून खाणार, कुंथुन हागणार.
430.    जोवरी पैसा तोवरी बैसा.
431.    ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.
432.    ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये.
433.    ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.
434.    ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
435.    ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला.
436.    ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही.
437.    ज्याची करावी चाकरी त्याचीच खावी भाकरी.
438.    ज्याची दळ त्याचे बळ.
439.    ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपोआप.
440.    ज्याच्या हाती ससा तो पारधी.
441.    ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.
442.    ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी.
443.    ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
444.    ज्याला समजावा कोरड्या पाटीचा तोच निघाला आतल्या गाठीचा.
445.    ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
446.    टक्केटोणपे खाल्ल्यावाचून मोठेपण येत नाही.
447.    टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
448.    टिटवेदेखील समुद्र आटविते.
449.    ठकास महाठक. 
450.    ठण ठण पाळ मदन गोपाळ.
451.    ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला. 
452.    ठेवले अनंते तैसेची रहावे. 
453.    ठोसास ठोसा. 

454.    डाग झाला जुना आणि मला प्रतिव्रता म्हणा.
455.    डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.
456.    डोंगर पोखरून उंदीर काढणे. 
457.    डोंगरा‌एवढी हाव, तिळा एवढी धाव.
458.    डोळे आणि कान यांच्यात चार बोटाचे अंतर असते.
459.    डोळ्याला नाही असू, तुझी मेली सासू.
460.    ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो.
461.    ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.
462.    ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी. 
463.    ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे. 
464.    ढोंग धतोरा, हाती कटोरा.
465.    ढोरात ढोर, पोरात पोर.
466.    त वरून ताकभात.
467.    तण खाई धन.
468.    तरणी पडली धरणी अन म्हातारी झाली हरिणी.
469.    तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या. 
470.    तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे. 
471.    तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ.
472.    तळहाताने चंद्र झाकत नाही.
473.    तळे राखी तो पाणी चाखी.
474.    तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
475.    तहान लागल्यावर आड खणणे.
476.    ताकातल्या तुपासारखे, सौंदर्य. 
477.    ताकापुरते रामायण.
478.    ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे.
479.    तागास तूर लागू न देणे.
480.    ताटाखालचं मांजर.
481.    ताटात सांडलं काय नि वाटीत सांडलं काय एकच.
482.    तारेवरची कसरत.
483.    ती नाही घरी नी गमजा करी.
484.    तीन तिघडा काम बिघाडा.
485.    तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे.
486.    तुकाराम बुवांची मेख.
487.    तुझं अऩ माझं जमेना तुझ्यावाचुन करमेना.
488.    तुप खाल्ले की लगेच रुप येत नाही.
489.    तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा.
490.    तुरात दान, महापुण्य.
491.    तुला नं मला, घाल कुत्र्याला.
492.    तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी.
493.    तेरड्याचे रंग तीन दिवस.
494.    तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे.
495.    तेलणीवर रुसली अंधारात बसली.
496.    तोंड करी बाता अन ढुंगण खा‌ई लाथा.
497.    तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
498.    तोंडात तीळ भिजत नाही.
499.    तोबऱ्याला पुढे लगामाला मागे.
500.    त्यात काही राम नाही.

501.    थांबला तो संपला.
502.    थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे.
503.    थेंबे थेंबे तळे साचे.
504.    थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे. 
505.    थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान.
506.    थोरांचे दुखणे आणि मणभर कुंभणे.
507.    दक्षिणा तशी प्रदक्षिणा.
508.    दगडापेक्षा विट मऊ.
509.    दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत.
510.    दहा गेले पाच उरले.
511.    दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.
512.    दही वाळत घालून भांडण.
513.    दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत.
514.    दांत कोरून पोट भरतो.
515.    दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो. 
516.    दानवाच्या घरी रावण देव.
517.    दाम करी काम.
518.    दारात नाही आड म्हणे लावतो झाड.
519.    दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा आणि मोरीला बोळा घालायचा.
520.    दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा. 
521.    दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
522.    दिवस बुडाला मजूर उडाला.
523.    दिवस मेला इथं तिथं अन रात्र झाली निजु कुठं.
524.    दिवसा चुल रात्री मूल.
525.    दिवाळी दसरा हात पाय पसरा.
526.    दिव्याखाली नेहमीच अंधार.
527.    दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं. 
528.    दुःख रेड्याला न डाग पखालीला.
529.    दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.
530.    दुध पोळलं की ताक फुंकून प्यावे. 
531.    दुधात साखर आणि आंघोळीत लघवी.
532.    दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्त. 
533.    दुभत्या गा‌ईच्या लाथा गोड.
534.    दुरून डोंगर साजरे.
535.    दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा. 
536.    दुष्काळात तेरावा महिना.
537.    दुसऱ्या वरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
538.    दुसऱ्याची कामीनी ती मानवाची जननी. 
539.    दृष्टी आड सृष्टी.
540.    दृष्टी सर्वांवर प्रभुत्व एकावर. 
541.    दे बाय लोणचे, बोलेन तुझ्या हारचे! 
542.    दे माय धरणी ठाय. (हे माय, धरणी ठाय.) 
543.    देखल्या देवा दंडवत.
544.    देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं. 
545.    देण कुसळाच, करणं मुसळाच.
546.    देणाऱ्याचे हात हजार.
547.    देणे ना घेणे दोन्ही सांजचे येणे. 
548.    देणे ना घेणे रिकामे गाणे.
549.    देव तारी त्याला कोण मारी.
550.    देव भावाचा भुकेला.
551.    देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला. 
552.    देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
553.    देवाची करणी आणि नारळात पाणी.
554.    देश तसा वेश.
555.    देह देवळात चित्त पायतणात.
556.    दैव देतं अऩ कर्म नेतं.
557.    दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
558.    दोघींचा दादला उपाशी.
559.    दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. 
560.    दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
561.    द्या दान सुटे गिरान (ग्रहण).
562.    धनगराच्या मॆंढ्या अन शेतकऱ्याला लेंढ्या.
563.    धनवंताला दंडवत.
564.    धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा.(धन्याला कन्या अनं चोराला मलिदा.)
565.    धमनीतला पडला भोक हवा गेली बर फोक. 
566.    धरल तर चावतय आन सोडलर तर पळतय.
567.    धर्माने दिले नेसायला तर परसात गेली मोजायला.
568.    धाक ना दरारा, फुटका नगारा.
569.    धावत्यापाठी यश.
570.    धावल्याने धन मिळत नाही.
571.    धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे. (वाढ म्हणलं की वाढावं कोणं जेवतेयं वाकून बघू नये.) 
572.    धुडुम धडवा अन आंब्बसेला (अमावसेला) पाडवा. 
573.    धुतल्या तांदळातला खडा.

574.    न कर्त्याचा वार शनिवार.
575.    न खाणाऱ्या देवाला नेवेद्य.
576.    न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ. 
577.    नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न.
578.    नकटे व्हावे पण धाकटे हो‌ऊ नये.
579.    नको तिथं बोटं घालू नये, घातलेच तर वास घेत बसू नये. 
580.    नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?
581.    नमनाला घडाभर तेल.
582.    नरो वा कुंजारोवा.
583.    नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
584.    नवरा केला सुखासाठी, पैसा नाही कुकासाठी.
585.    नवरा नाही घरी सासरा जांच करी.
586.    नवऱ्याने मारले पावसाने झोडपले तक्रार कुणाकडे न्यायची.
587.    नवा कावळा शेण खायला शिकला.
588.    नव्याची नवलाई.
589.    नव्याचे न‌ऊ दिवस.
590.    नसुन खोळंबा असुन दाटी.
591.    ना घरचा ना घाटचा.
592.    नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
593.    नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.
594.    नांव गंगुबा‌ई अऩ तडफडे तान्हेने. (नांव गंगाबा‌ई अन तडफडे तहानेने). (नांव गंगाबा‌ई, रांजनात पाणी नाही).
595.    नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.
596.    नांव मोठे लक्षण खोटे.
597.    नांव सगुणी करणी अवगुणी.
598.    नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
599.    नांव सोनुबा‌ई अन हाथी कथिलाचा वाळा.
600.    नाक दाबले की तोंड उघडते.
601.    नाकपेक्षा मोती जड.
602.    नाकाला नाही जागा, नाव चंद्रभागा
603.    नाकावर पदर अन विशीवर नजर.
604.    नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
605.    नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?
606.    नाचता ये‌ईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक ये‌ईना म्हणे ओली लाकडे.
607.    नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.
608.    नाम असे उदार कर्ण, कवडी देता जा‌ई प्राण.
609.    नारो शंकराची घंटा.
610.    नालासाठी घोडं.
611.    नाव सोनुबा‌ई हाथी कथिलाचा वाळा.
612.    नाव्ह्याचा उकरंडा कितीही उकरला तरी केसच निघणार. 
613.    नाही चिरा, नाही पणती.
614.    नाही निर्मल मन काय करील साबण.
615.    निर्लज्याच्या गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला.
616.    नेमेचि येतो मग पावसाळा.
617.    नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन.
618.    न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा.

619.    पंचमुखी परमेश्वर.
620.    पंत मेले, राव चढलॆ.
621.    पडतील स्वाती तर पिकतील मोती.
622.    पडत्या फळाची आज्ञा.
623.    पडलो तरी नाक वर.
624.    पडू आजारी, मौज वाटे भारी.
625.    पत्रावळी आधी दोणा, तो जाव‌ई शहाणा. 
626.    पदरी पडले आणि पवित्र झाले.
627.    परदु:ख शितल असते.
628.    पराचा कावळा करणे.
629.    पळत भु‌ई थोडी.
630.    पहिला दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पयी, तिसऱ्या दिवशी थारी अक्कल आधी गयी.
631.    पहिले पाठे पंच्चावन्न.
632.    पाचावर धारण बसली.
633.    पाटलाचं घोडं महाराला भुषण.
634.    पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये. 
635.    पाण्यात म्हैस वर मोल.
636.    पाण्यात राहून माशाशी वैर?
637.    पाण्यावाचून मासा झोपा घे‌ई केसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. 
638.    पादऱ्याला पावटाचे निमित्त. (पादऱ्याला पावट्याच आधार.)
639.    पादा पण नांदा.
640.    पानामागून आली अन तिखट झाली. (अगसली ती मागासली, मागाहून आली ती गरोदर राहीली.)
641.    पाप्याचं पितर आणि वर आला जवर.
642.    पाय धु म्हणे तोडे केवढ्याचे?
643.    पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम. 
644.    पायाखालची वाळू सरकली.
645.    पायातली वाहन पायात.
646.    पारध्याच गोड गाणं, हरिणीसाठी जेवघेणं. 
647.    पारावरला मुंजा.
648.    पालथ्या घडावर पाणी. (पालथ्या घागरीवर पाणी.)
649.    पिंजऱ्यामध्ये व्याघ्र सापडे, बायका मुले मारती खडे.
650.    पिंपळाला पाने चार.
651.    पिकतं तिथे विकत नाही.
652.    पिकले पान केव्हातरी गळून पडणारच.
653.    पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा.
654.    पितळ उघडे पडले.
655.    पी हळद अऩ हो गोरी.
656.    पुढच्याच ठेच मागचा शहाणा.
657.    पुत्र व्हावा ऎसा गुंडा ज्याचा तिन्ही लौकी झेंडा. 
658.    पुराणातील वानगी पुराणात.
659.    पुरुषांचे मरण शेती, बायकाचे मरण वेतीं (प्रसुती). 
660.    पेरावे तसे उगवते.
661.    पैशाकडेच पैसा जातो.
662.    पोकळ वाशांचा आवाज मोठा.
663.    पोट भरे खोटे चाले.
664.    पोटात नाही दाणा म्हणे रामकृष्ण म्हणा.
665.    प्रयत्नांती परमेश्वर.
666.    प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे.

667.    फुकट घालाल जेवू तर सारेजन येवू, काही लागेल देणं तर नाही बा येणं.
668.    फुकटचंबू बाबूराव. 
669.    फुकटचे खाणे आणि हागवणीला कहर.
670.    फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका? 

671.    बड़ा घर पोकळ वासा.
672.    बळी तो कान पिळी.
673.    बा‌ई ही काही काळाची पत्नी असते पण अनंत काळाची माता असते.
674.    बा‌ईचा मात्र हट्ट, पुरुषाची मात्र जिद्द. 
675.    बा‌ईल गेलीया अऩ झोपा केला. 
676.    बा‌ईल वेडी लेक पिसा, जाव‌ई मिळाला तोहि तसा.
677.    बाज बघुन बाळंतीण व्हावे.
678.    बाजारात नाही तुरी भट भटणीला मारी.
679.    बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा.
680.    बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.
681.    बापा परी बाप गेला बोंबलताना हात गेला.    
682.    बाबा गेला आणि दशम्याही गेल्या. 
683.    बायको नाही घरी धोपाटणे उड्या मारी. 
684.    बारा गावच्या बारा बाभळी. 
685.    बारा घरचा मुंजा उपाशी.
686.    बारा झाली लुगडी तरी भागुबा‌ई उघडी. (बारा लुगडी तरी बा‌ई उघडी.)
687.    बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात. 
688.    बुडत्याचे पाय खोलात.
689.    बुडत्याला काडीचा आधार.
690.    बुढ्ढ्याले आली मस्ती, नातींशी खेळे कुस्ती.
691.    बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली. 
692.    बोल बोल नाऱ्या धोतर गेलं वाऱ्या. 
693.    बोलणाऱ्याचे उडीद सुध्दा विकले जातात पण न बोलणाऱ्याचे गहू पडुन राहतात. 
694.    बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू. 
695.    बोलाचीच कढी अऩ बोलाचाच भात.
696.    बोले तैंसा चाले त्याची वंदावी पा‌ऊले. 
697.    बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय? 
698.    भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी. 
699.    भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत. 
700.    भरवश्याच्या म्हशीला टोणगा.
701.    भले भले गेले गोते खात, झिंझुरटे म्हणे माझी काय वाट?
702.    भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात.
703.    भागला पडला बावीत, बाव झाली झळझळीत. 
704.    भातापेक्षा वरण जास्त.
705.    भाराबर चिंद्या, शेळीचे शेपुट.
706.    भावीण नाचते म्हणून न्हावीण नाचते. 
707.    भिंतीला कान असतात.
708.    भिक नको पण कुत्रा आवर.
709.    भिकेत कावळा हागला.
710.    भितीवर डोकं आपटून काही होत नाही उलट स्वत:लाच खोक पडते.
711.    भित्यापाठी ब्रम्हराक्षस.
712.    भुकेच्या तापे करवंदीची कापे.
713.    भुकेपेक्षा ब्रम बरा.
714.    भुकेला केळं, उपासाला सिताफळ.
715.    भुकेला कोंडा अन निजेला धोंडा.
716.    भुकेला पिकलं काय? अऩ हिरवं काय?
717.    भुरक्यावाचून जेवण नाही अन मुरक्यावाचून बा‌ई नाही.
718.    भुरि आणी दहा गुण चोरी.
719.    भोळी ग बा‌ई भोळी, लुगड्यावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी.

720.    म‌ऊ लागले म्हणून कोपऱ्याने खणू नये.
721.    मड्याच्या टाळुवरचे लोणी खाणारा. 
722.    मनी चिंती ते वैरीही न चिंती. 
723.    मनी नाही भाव देवा मला पाव.
724.    मनी वसे ते स्वप्नी दिसे.
725.    मरावे परी किर्तिरुपे उरावे.
726.    मला नं तुला, घाल कुत्र्याला.
727.    मला पहा अन फुलं वहा.
728.    महादेवापुढे नंदी असायचाच.
729.    मांजर डोळे मिटून दुध पिते पण ते जगाला दिसतचं.
730.    माकड म्हणतं माझीच लाल.
731.    माकडाच्या हातात कोलीथ.
732.    माझा लोक तुझ्या घरी अन तुपानं तोंड भरी.
733.    माझा ह्यां असा, बायकोचा तां तसा, गणपतीचा हो‌ऊचा कसा?
734.    माणूस पाहून शब्द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा. 
735.    मातीचे कुल्ले वाळले की पडायचेच. 
736.    मानूस म्हनावा तर अक्कल न्हायी आनी गाढाव म्हनावा तर शेपुट नायी. 
737.    माय मरो पण मावशी उरो.
738.    मारा पण तारा.
739.    मालकाचे हाल शेजारचा तांबडा पाल.
740.    माळावर बोंबलायला पाटलाला काय विचारायचं? 
741.    मिंया बिबी, तेगार भिंतीला उभी.
742.    मिया मुठभर, दाढी हातभर.
743.    मी नाही त्यातली अऩ कडी लावा आतली. 
744.    मी बा‌ई संतीण माझ्या मागे दोन तीन. 
745.    मी हसते लोकांना अनं शेबुड माझा नाकाला.
746.    मुंगी व्यायली, शींगी झाली, दुध तिचे किती, बारा रांजण भरून गेले, सतरा हत्ती पि‌उन गेले.
747.    मुंगी हत्तीच्या ढुंगणाला चावू शकते पण हत्ती मुंगीच्या नाही.
748.    मुंगेच्या मुताला महापूर.
749.    मुग गिळून गप्प बसावे.
750.    मुठभर घुगऱ्या अन सारीरात मचंमचं. 
751.    मुर्ती लहान पण किर्ती महान.
752.    मुळांपोटी केरसुनी.
753.    मुशा पाहून मुशारा घोडा पाहून खरारा. 
754.    मेलेलं कोंबडं आगीला भित नाही.
755.    मेल्या म्हशीला मणभर (शेरभर) दूध. 
756.    मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.
757.    मोडेन पण वाकणार नाही.
758.    मोले घातले रडाया, नाही आसू, नाही माया.
759.    मोह सुटेना अऩ देव भेटेना.
760.    म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली. 
761.    म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं. 
762.    म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवा‌ईला नव्हता नवरा. 
763.    म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो.

764.    याची देहा, याची डोळा.
765.    याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?
766.    ये ग साळू दोघं लोळू.
767.    येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
768.    येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे.
769.    येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.
770.    रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी! 
771.    रंग झाला फिका आणि दे‌ईना कुणी मुका.
772.    रंगाने गोरी हजार गुण चोरी.
773.    रंग गोरापान आणि घरात गु घान.
774.    रा‌ईचा पर्वत. 
775.    राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
776.    राजा तशी प्रजा. 
777.    राजा बोले अऩ दल चाले.
778.    राजाला दिवाळी काय ठाऊक?
779.    रात्र थोडी अऩ सोंग फार. 
780.    रिकामा नावी कुडाला तुंबे लावी. (रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.) 
781.    रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी. 
782.    रुखवत आले, रुखवत आले दणाणली आळी, पहातात तो अर्धीच पोळी. 
783.    रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या.
784.    रोज मरे त्याला कोण रडे.

785.    लंगडं लागलं कामाला आन चौघं तंगडं धरायला.
786.    लंकेत सोन्याच्या विटा.
787.    लकडी शिवाय मकडी वळत नाही.
788.    लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
789.    लढा‌ईमे बढा‌ई आणि खजिनेमे गवऱ्या.
790.    लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
791.    लवकर उठे, लवकर निजे त्यास आरोग्य, संपत्ती लाभे. 
792.    लहान तोंडी मोठा घास.
793.    लांड्यामागे पुंडा.
794.    लाखाचे बारा हजार.
795.    लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही. 
796.    लाडावली गुरंविन देवळात हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे.
797.    लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
798.    लाल केला मागील पाठ विसरून गेला.
799.    लेक द्यावी श्रीमंताघरी सून करावी गरीबाकडली.
800.    लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खाऊन घ्यावे.
801.    लेकी बोले सुने लागे.
802.    लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं. 
803.    लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
804.    लोकाचे लेणे ले ग लुचरे, मागायला आली दे ग कुत्रे.
805.    वड्याचे तेल वांग्यावर.
806.    वर झगझग आत भगभग.
807.    वर मुकुट आणि खाली नागडं.
808.    वराती मागून घोडे.
809.    वरुन दिसे सोज्वळ आतून सावळा गोंधळ.
810.    वरून कीर्तन आतून तमाशा.
811.    वळचळीचे पाणी आड्याला कसे चढेल.
812.    वळले तर सूत नाही तर भूत. (असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत).
813.    वळवाचा पाऊस.
814.    वळू ऊठला पण संशय फिटला.
815.    वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी.
816.    वाचेल तो वाचेल.
817.    वाजे पा‌उल आपले म्हणे मागून कोण आले.
818.    वाटाण्याच्या अक्षता.
819.    वासरात लंगडी गाय शहाणी.
820.    वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठीक.
821.    विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
822.    विचारांची तूट तेथे भाषणाला उत.
823.    विनाशकाले विपरीत बुध्दी.
824.    विल्याभोपळाचे साक्ष.
825.    विषाची परीक्षा.
826.    विहीणाचा पापड वाकडा.
827.    वीतभर गजरा गावभर नजरा.
828.    वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत.
829.    वेळेला केळं अऩ वनवासाला सिताफळं.
830.    वेश असे बावळा परी अंतरी नाना कळा.
831.    वैरी गेला अन जागा पैस झाला.
832.    शब्दांचा सुकाळ तेथे बुध्दीचा दुष्काळ.
833.    शहाणं हो‌ईना अन सांगता ये‌ईना.
834.    शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.
835.    शहाण्याला शब्दाचा मार.
836.    शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
837.    शितावरून भाताची परीक्षा.
838.    शिर सलामत तर पगड़ी पचास.
839.    शिराळ शेती दाट.
840.    शिळ्या कढीला ऊत.
841.    शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली.
842.    शेणं आपण खायचं अनू तोंड दुसऱ्याचं हुंगायचं.
843.    शेरास सव्वाशेर.
844.    शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी? 
845.    शेळीचे शेपुट न माशा हाकालणारे न अब्रु झाकनारे. 
846.    शोधा म्हणजे सापडेल.
847.    संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून (सुरुवात) तयारी. 
848.    सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान.
849.    सगळं मुसळ केरात.
850.    सतरा कारभारी ऐक नाही दरबारी.
851.    सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.
852.    सदाला चोळी आणि वऱ्हाडाला पोतेरी.
853.    सरड्याची धांव कुंपणापर्यंत अन मुल्लाची मशिदीपर्यंत. 
854.    सळो की पळो केले.
855.    सवळं दाट अन महारवाड्यातून वाट.
856.    ससा उठला आणि कुत्रे हागायला बसले.
857.    साखरेचे खाणार द्याला देव देणार.
858.    साठी बुध्दी नाठी.
859.    साडी नेली बायनं नि चिंधी नेली गायनं.
860.    सात सुगरणी, भाजी अळणी.
861.    साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.
862.    साता समुद्राकडे राजाने लावला भात, ऐक ऐक शीत न‌ऊ न‌ऊ हात.
863.    साधली तर शिकार नाही तर भिकार.
864.    साधी राहणी अनं उच्च विचार सरणी.
865.    साध्वा जाते विधवेपाशी आशिर्वाद मागायला, ती म्हणते माझ्यासारखीच हो!
866.    साप मुंगसाचे वैर.
867.    साप म्हणू नये आपला, नवरा म्हणू नये आपला.
868.    सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.
869.    सासू तशी सून आणि उंबऱ्या तुझा गुण.
870.    सासू न सासरा जांच करे तिसरा.
871.    सासू नाही घरी, नणंद जाच करी.
872.    सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.
873.    सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
874.    सासू सांगे सुनेला आणि आपण जा‌ई गोल्या पाठून.
875.    सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.
876.    साहेबंनी रेड्याचे दुध काढले तर तो चरवी कुठे आहे म्हणून विचारतो.
877.    सुंठेवाचून खोकला गेला.
878.    सु‌ईण आहे, तो पर्यंत बाळंत हो‌ऊन घ्यावे.
879.    सुख रा‌ई एवढे दु:ख पर्वता एवढे.
880.    सुगंध पसरावयाचा असेल तर चंदनाला झिजावे लागते. 
881.    सुतावरून स्वर्ग गाठायचा.
882.    सुसरबा‌ई, तुझी पाठ मऊ.
883.    सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा, यांची संगत नको रे बाप्पा. 
884.    सोन्याची सुरी असली म्हणून काय उरात खुपसुन घ्यायची. 
885.    सोन्याहून पिवळे.
886.    सोवळं सोडल्यावर ओवळं सापडू नये.
887.    स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
888.    स्वत:ची सावली विकून खाणारी माणसं.
889.    स्वभावाला औषध नाही.
890.    स्वामी तिन्ही जगाचा आ‌ईविना भिकारी.
891.    हगत्या लाज की बघत्या लाज?
892.    हजाराचा बसे घरी, दमडीचा येरझाऱ्या घाली.
893.    हजीर तो वजीर.
894.    हत्ती गेला अऩ शेपुट राहिले.
895.    हत्ती पोसवतो पण लेक नाही पोसवत. 
896.    हत्तीवर अंबारी जाते कुत्री भुंकत राहतात.
897.    हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
898.    हसणाऱ्याचे दांत दिसतात.
899.    हा सुर्य अऩ हा जयद्रथ.
900.    हागणाऱ्याला लाज नाही पण भागणाऱ्याला आहे.
901.    हात दाखवून अवलक्षण.
902.    हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.
903.    हातचं (गणित) ठेवून वागावे.
904.    हातचे सोडून पळत्याच्या मागे.
905.    हातच्या काकणाला आरसा कशाला?
906.    हाताची पाचही बोटे कधीही सारखी नसतात. 
907.    हातात कवडी विद्या दवडी.
908.    हातानं हो‌ईना काही तोंड घेतं घाई. 
909.    हाती घ्याल ते तडीस न्या.
910.    हाती नाही अडका, बाजारात धडका. 
911.    हाती नाही आणा, मला कारभारी म्हणा. 
912.    हिंग गेला, वास राहीला.
913.    ही काळ्या दगडावरची रेघ.
914.    हे बालाजी, छप्पन्न कोटींचा चतुर्थांश. 
915.    हेंदरं ते हेंदरं आणि गावंदरीला चरायला चाललयं. 
916.    होता जिवा म्हणून वाचला शिवा.
917.    होळी जळाली, थंडी पळाली.
918.    हौसेनं केला पति, त्याला भरली रक्तपीती. 
919.    ज्ञान सांगे लोका शेंबुड आपल्या नाका.
920.    ’श्री’ आला की ’ग’ सुध्दा येतो.

परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा व परभणी जिल्ह्यातील वास्तुशिल्प कला

परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा व  परभणी जिल्ह्यातील वास्तुशिल्प कला