शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

दिनमित्रकार मुकुंदराव पाटील

 मुकुंदराव पाटील: ग्रामीण पत्रकारितेचा आद्य तपस्वी

फक्त दुसरीपर्यंत शिक्षण असूनही ते इंग्रजी आणि मराठी वाचायला शिकले. आपली सगळी विद्या आणि कौशल्ये त्यांनी स्वतःच्या बळावर सेल्फ लर्निंगनं मिळवली होती. सत्यशोधक समाजात सगळ्यात मूलगामी काम करून देश हादरवून टाकणाऱ्या आणि इंग्लंडच्या राजपुत्राची चौकात फलक दाखवून काढणाऱ्या कृष्णराव भालेकरांचा हा दुसरा पोरगा. नाव मुकुंदराव. जन्म २० डिसेंबर १८८५. 

भालेकरांच्या बहिणीचा म्हणजेच काशीबाई सखाराम क्षीरसागर पाटील यांचा एकुलता एक पोरगा गणपतराव पाटील. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. गणपतरावांना मुलबाळ नव्हतं. आपल्या बहिणीला आधार म्हणून कृष्णराव भालेकरांनी ७ ऑगस्ट १८९३ रोजी आपल्या सात वर्षांच्या पोराला तिच्या पदरात दिलं. मुकुंदराव भालेकर आता मुकुंदराव पाटील झाले.

फक्त दुसरी इयत्ता शिकलेला हा इसम भारतात ग्रामीण पत्रकारितेची पायाभरणी करणारा माणूस होता. शेतकऱ्यांच्या हक्कांना वाचा फोडणारा आणि समाजाच्या रूढींना हादरे देणारा लेखक होता. शेतीचा इतिहास लिहून त्यांनी शेती देशोधडीला लागायची कारणे शोधली. शेतकऱ्यांची स्थिती काँग्रेसच्या राजकारणाने सुधारणार नाही हे ओळखून त्यांनी शेतीप्रश्नाचा सविस्तर अभ्यास केला. 

१९०६ साली अहमदनगरला नवीन थेटर बांधायचं काम सुरू होतं. ‘बागडे’ नावाच्या या थेटरचं बांधकाम मुकुंदराव बघत होते. त्यामुळे नगर भागात त्यांचं राहणं झालं. वाचायच्या आवडीमुळे त्यांची ओळख रेव्हरंड टिळक आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्याशी झाली. तेव्हा त्यांनी घरच्या घरी इंग्रजी लिहायचा आणि वाचायचा सराव सुरू केला. या कामाची त्यांना इतकी सवय झाली होती की “रोज काहीतरी लिहिल्या आणि वाचल्याशिवाय मला चैनच पडत नाही” असं त्यांनी एका पत्रात लिहिलं होतं. इथंच त्यांची भेट मँचेस्टर युनिव्हर्सिटीहून परतलेल्या मराठा समाजातील दलितांसाठी काम करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी झाली. 

सत्यशोधक समाजाची अनेक मुखपत्रे जोतीराव फुलेंच्या काळात सुरू होती. पण नंतरच्या काळात ही पत्रे हळूहळू बंद पडत गेली. मुकुंदरावांना गावातील लोकांच्या जनजागृतीसाठी पत्राची गरज होती. ‘दीनमित्र’ म्हणजे गरिबांचा दोस्त या नावाचा पेपर सुरू होता. हे पत्र नंतर काळाच्या ओघात बंद झाले. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी २३ नोव्हेंबर १९१० रोजी हा पेपर पुनरुज्जीवित केला. त्यांनी वडिलांना हे पत्र किमान १२ वर्षे चालवण्याचे आश्वासन दिले होते. पण पुढची ६० वर्षे पेन हातात धरायला जमत होता तोपर्यंत त्यांनी ‘दीनमित्र’ कोणताही गॅप न पडू देता प्रकाशित केला.

मुकुंदरावांनी आपल्या लेखनातून ग्रामीण भागातील माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्या काळची सगळी पत्रे-नेते-परिषदा-ठराव तद्दन शहरी असत. एकाच शहरात ४० वर्ग-किलोमीटरच्या अंतरात लोकांचे क्रांती आणि राजकारण असे उद्योग चालत. आपल्याला वाटते तेच समाजाचे मागणे आहे आणि आपणच समाजाचे नेते आहोत असा थाट या लोकांचा असायचा. अशा शहरी लोकांना आपली पातळी दाखवण्यात ‘दीनमित्र’ अग्रेसर होता. 

‘केसरी’सारख्या देशभरात गाजावाजा असणाऱ्या पेपरमधील चुका, फाजील विधाने यांचा समाचार ते ‘सारासार विचार’ या आपल्या सदरात घेत असत. एकदा ‘केसरी’ने बाळ टिळक संपादक असताना ४ जुलै १९१७ च्या अंकात दादाभाई नौरोजी यांचे निधन झाल्याची बातमी छापली. त्याबरोबर एक मोठा श्रद्धांजलीचा लेखही छापला. नौरोजी इंग्लंडमध्ये निवडणूक लढवून खासदार झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा जीव होता. पुण्यात अचानक शोककळा पसरली. पण नौरोजी जिवंत आहेत हे समजून घेण्याची तसदीही पुण्यातल्या जागरूक नागरिकांनी घेतली नाही. शेवटी ‘दीनमित्र’ने या फेक न्यूजचा समाचार घेतला. “केसरी पत्र आणि त्यातील मजकूर ब्रह्मदेवांची लेखणी समजणाऱ्यांनी ही घोडचूक पाहून सावध व्हावे” असा टोला लावला. टिळकांच्या राजकारणावर त्यांनी मुद्देसूद आणि ग्रामीण शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करत वेळोवेळी टीका केली आहे. “चातुर्वण्याची पुन्हा स्थापना झाली पाहिजे असे म्हणणारे राष्ट्रउन्नतीच्या कार्यास कवडीच्याही उपयोगाचे नाहीत” असं धाडसाने म्हणणारे समग्र भारतातील ते एकमेव संपादक असावेत.

मुकुंदराव शहरातील तज्ञ, ज्येष्ठ जाणकार आणि विश्लेषक बनून राहिले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांची जागृती करण्यासाठी गावागावात जाऊन प्रयत्न केले. “शेतकऱ्यांना दारिद्र्याचा रोग लागला आहे. त्याच्यावर उपाय केला नाही तर आपली पुढची पिढी कुत्र्यामांजरापेक्षाही नीच स्थितीत खिदबू खिदबू मरेल” इतक्या तळतळाटाने लिहिणारा पत्रकार वैयक्तिक पातळीवर इतकं दुःख अनुभवल्याशिवाय हे लिहू धजणार नाही.

त्यांनी रूढीवादी, देवळा-बामनांना दान देणारा शेतकरी पाहिला होता. या शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या पत्रातून आवाज उठवला. त्यांच्या लिखाणात उगाच उरबडवेगिरी नव्हती. विनोदबुद्धी वापरून सुम्बडीत काटा काढायचं कसब त्यांच्या लेखणीला साधलं होतं. आपल्या धारदार पण फिरकी घेणाऱ्या लिखाणातून त्यांनी असे उद्योग करणाऱ्या लोकांची बिनपाण्याने केली. त्याचबरोबर मराठा जातीच्या पुढाऱ्यांनी फक्त ब्राह्मणविरोधासाठी सत्यशोधक समाजाचा वापर करू पाहिला. त्यावेळी त्यांचाही समाचार मुकुंदरावांनी घेतला. “आपल्या जातीतील दोष जो परखडपणे सांगतो तोच खरा सत्यशोधक” अशी भूमिका त्यांनी घेतली.

कऱ्हाडला १ जानेवारी १९२० रोजी सत्यशोधक समाजाची नववी परिषद भरली. त्याचे अध्यक्षस्थान मुकुंदराव पाटलांना देण्यात आले होते. शाहू महाराजांनी त्यांना या कामी मोलाची मदत केली. आपल्या कामात मोठ्या माणसांना नेहमी सहभागी करून त्यांच्या मदतीने आणि सहकार्याने लोकांचं कल्याण साधण्याची ही हातोटी सत्यशोधक समाजाची खासियत होती. १९२४ साली ब्रिटिश सरकारने त्यांच्या कामाचं महत्व ओळखून त्यांना ‘रावसाहेब’ हा किताब दिला. मोहनदास गांधींच्या राजकारणाशी ते सहमत नव्हते. तरीही गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांनी या किताबाचा त्याग केला आणि आपली ‘रावसाहेब’ उपाधी ब्रिटनला पाठवून दिली.

१५ मार्च १९२५ साली महार परिषद पाथर्डी येथे भरली. त्याचे अध्यक्षपद मुकुंदरावांना देण्यात आले. त्यात त्यांनी फक्त शिक्षण या गोष्टीवर जोर दिला. मंदिर प्रवेश आणि सत्याग्रह असल्या मार्गांनी अस्पृश्यांचे कल्याण होणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती.  १९२५ साली तरवडी येथे मातंग परिषद तसेच १९२६ सालची भिल्ल परिषद त्यांनी भरवली. यातून शिक्षणाचा प्रसार आणि आर्थिक स्वावलंबन एवढी दोन उद्दिष्टे त्यांनी ठेवली होती.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी सात उपाय सुचवले. यालाच मुकुंदरावांची सप्तसूत्री म्हटले जाते. याच्यात शेतकऱ्यांची स्थिती सुधारायची असेल तर त्यांनी काय केले पाहिजे याचा वस्तुपाठ आहे. शेतकरी संघटनेपासून ते आद्य शेतकरी नेत्यांनी केलेल्या मागण्या आणि काढलेल्या योजना या सगळ्यांची बीजे त्यांच्या लेखनात सापडतात. शेतकऱ्यांच्या पोरांचं शिक्षण आणि शेतकऱ्यांची एकजूट हे त्यातील सगळ्यात मुख्य मुद्दे होते.

आज बलुतेदारी आणि त्या व्यवस्थेचे गुण गाणारे मोठे लोक, साहित्यिक भेटतात. या माणसाने त्या काळात “बलुतेदारी पद्धत मुळातच चुकीची आहे. प्रत्येक जातीच्या माणसाला वडिलोपार्जित कामं सोडून आपल्या आवडीचा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. सगळ्या जातीतील मुलांना शिक्षण देऊन कमी कष्टात जास्त उत्पादन कसे मिळते हे प्रशिक्षण दिलं पाहिजे” असे मत मांडले. माणूस हा प्राणी काबाडकष्ट करण्यासाठी नसतो तर आपल्या बुद्धिमत्ता आणि कल्पकतेने निसर्गाला आपल्यासाठी काम करायला लावतो हीच मांडणी ते करतात. जातीपाती तोडण्यापासून ते आर्थिक सक्षमीकरण करण्यापर्यंत सगळ्या विचारांची पाळेमुळे मुकुंदरावांच्या भूमिकेत आढळतात. सत्यशोधक माणसांना आपण गांभीर्याने घेतले नाही म्हणून आपण अजून याच मुद्द्यांवर चाचपडत बसलो आहोत.

लोखंडाचा फाळ नांगराला लावल्यावर जमीन कोपते अशी अंधश्रद्धा शेतकऱ्यांमध्ये पसरली होती. आपल्या आज्यापंज्याने केलं तर बरोब्बरच असणार असं शेतकरी म्हणायचे. यावर “ज्या आज्याला सत्यनारायण माहीत नव्हता त्याचा पोरगा वडिलांची चाल सोडून सत्यनारायण का घालतो? अशा वेळी तुम्ही आपल्या परंपरा बदलून ब्राह्मणी परंपरा स्वीकारता आणि वैज्ञानिक गोष्टी नाकारता” असा त्यांचा आक्षेप होता.


शेतकऱ्यांसाठी लिहिणारे आणि इंग्रजीत थयथयाट करणारे एनजीओवाले लय पत्रकार आपल्या ओळखीत आहेत. पण इतका क्रांतिकारी विचार मांडून तेवढ्याच ताकदीचं काम ग्राउंडवर करणारा मुकुंदराव पाटलांसारखा दुसरा पत्रकार निपजल्याचे आमच्या बघण्यात नाही.

​महात्मा फुले यांचे विचार तळागाळातील माणसापर्यंत पोहचविण्याचे महान कार्य दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी केले. समाजात असलेली जातीयता, अस्पृश्यता, निरक्षरता जाबी म्हणून त्यांनी आपल्या दीनमित्र वृत्तपत्राच्या माध्यमातून जनजागृती केली. १९१० रोजी सुरू झालेली दीनमित्र ​​वृत्तपत्र १९६७ पर्यंत ५७ वर्षे त्यांनी चालविने स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक परिस्थितीचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून दीनमित्र अंकाच्या सर्व फाईल्स पाहिल्यावर लक्षात येते. तर स्वातंत्र्यानंतरचा २२ वर्षाचा काळ दीनमित्र ने पाहून बहुजनांच्या सामाजिक परिस्थितीला प्रकाश टाकला आहे. महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसारासाठी दीनमित्राने बजावलेली कामगिरी अतिशय मोलाची आहे. मुकुंदराव पाटील यांनी आपल्या वृत्तपत्रातून कुलकर्णी वतनाबद्दल सातत्याने लिहून ते रद्द करण्याची मागणी केली. या संदर्भात कुलकर्णी हा शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करतो या संदर्भात ‘कुलकर्णी लीलामृत’ नावाचे खंडकाव्य लिहिले. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. त्याचा परिणाम असा झाला की, विधीमंडळात चर्चा झाली आणि कुलकर्णी वतनदारी बंद होऊन तलाठी नेमण्यात आले. शेतकऱ्यांच्या बाजुची फार मोठी लढाई मुकुंदरावांनी जिंकली. त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी मुकुंदरावांचे ऋणी राहायला पाहिजे. मुकंदराव पाटील केवळ संपादक नव्हते तर ते चांगले वक्ते, सिद्धहस्त लेखक होते. निद्रीत अवस्थेत असलेल्या बहुजन समाजाला जागे करून सनातन्याविरुद्ध आवाज उठविण्याचे पाठबळ दीनमित्राने दिले. भारतातील पहिले ग्रामीण पत्रकार म्हणून मुकुंदराव पाटील वांच्या नावाची दखल माध्यम क्षेत्रातील तज्ञांनी घेतली आहे. तरवडी ता.नेवासा येथे मुकुंदराव पाटील यांचे सर्व साहित्य दीनमित्र अंकाच्या फायली, पत्रव्यवहार आदी महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहे. अभ्यासकांना सत्यशोधकी साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून तरवडी येथे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून मुकुंदरावांची अनेक

पुस्तके प्रसिध्द केली आहेत. तसेच पुरोगामी व परिवर्तनपर साहित्यास दरवर्षी पुरस्कार दिले जात आहेत.


​सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांचे वाडमय

​दीनमित्र (साप्ताहीक) इ. स. १९१० ते १९६७

१)वैचारीक

* हिंदू आणि ब्राम्हण * विठोबाची शिकवण

* विचार किरण भाग १ ते १० * पेशवाईतील मौजा

शास्त्रोक्त गप्पा

* पुराणातील गंमती * देवाची परिषद

२)काव्य

* कुळकर्णी लीलामृत

* शेटजी प्रताप * देशभक्त लीलासार

* सुबोध श्लोक

३)कथा-दीनमित्र, किर्लोस्कर, मनोहर,

बालबोधमेवा इ. मासिकातून सुमारे ५० कथा

४)नाटक – * राक्षसगण * हेडमिस्ट्रेट 

५)चित्रपटकथा- पतीचा पाठलाग


६)कादंबरी

* होळीची पोळी

* चंद्रलोकीची बिलक्षण

* तोबातोबा

*बदहाशास्त्री परान्ने * राष्ट्रीय तारूण्य

७)आग्रलेख २०५०

८) आसुडाचे फटके १०,००० ९) सारासार विचार ७५००

१०) अध्यक्षीय भाषण:

कन्हाड, मुंबई,कोल्हापूर या ठिकाणी झालेली

सत्यशोधक समाज परिषद व कर्जत, नेवासा, पुणतांबा, मढी येथील भाषणे.

११)प्रसंग कथा सुमारे ४५०

संदर्भ - गूगल search



बुधवार, १० मार्च, २०२१

निवडक मराठी गद्य V- सराव

Tutorial questions १) छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिवाजी विनायकास पत्राद्वारे कर्तव्याची जाणीव कशाप्रकारे करून दिले आहे ते लिहा. २) बखर कार मल्हार रामराव चिटणीस यांनी दुतांचे अचारसहिता कशाप्रकारे बखरीतून मांडली ते लिहा. ३)स्वामी विवेकानंद यांनी धर्म आणि विज्ञान यांची जोड कशा प्रकारे विशद केली ते धर्म आणि विज्ञान पाठाच्या आधारे लिहा. ४) आ. ह. साळुंखे यांनी प्रा. श्रीनिवास दीक्षित यांनी घेतलेल्या आक्षेपाला कसे उत्तर दिले विशद करा. ५) आदिवासी समाजाला शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या यातायतीचे वास्तव चित्रण 'शिक्षणाच्या प्रवाहात' या पाठातून कसे व्यक्त होते ते लिहा. ६) आपल्या स्व-कथनातून डॉ. अभय बंग यांनी हृदय रोगाची कारणे व त्याच्या निराकरणासाठी सांगितलेल्या बाबींचा परामर्श घ्या. ७) इंद्रजित भालेराव यांनी कृषी संस्कृतीतील सांगितलेले अनुभव तुमच्या शब्दात लिहा. ८) गंगाप्रसाद अग्रवाल यांचे कार्य थोडक्यात लिहा. वस्तुनिष्ठ प्रश्न १.छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिवाजी विनायकास पत्र केव्हा लिहिले? १८ जानेवारी १६७५ २. मामले प्रभावळीचा सुभेदार यास आरमाराचा ऐवज व गल्ला कोणाकडे पोहोचता करायचा होता? दौलतखान व दर्यासारंग ३.------ म्हणून कोण मुलाहिजा करु पाहतो ?या उपरी तरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंती देविला असे तो देवितील. ब्राह्मण ४. जिवाजी विनायकाचा पत्र हा पत्र उतारा यातून घेतला आहे? शिवकालीन पत्र सार संग्रह खंड 1 ५. दूत म्हणजे राजा याचे तुम्ही------- होत. नेत्र ६. छत्रपती शिवाजी मल्हार रामरावास सन्मानाने काय संबोधित असत? पुरातन सेवक ७. मल्हार रामराव यांचा पणजोबाचे नाव काय होते? चिटणीस खंडो बल्लाळ ८. मराठ्यांच्या राजनीतीचे विवेचन करणारा कोणता ग्रंथ मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिला? राजनीती ९. दूताची निसृष्टार्थ मितार्थ व ------ असे तीन प्रकार. शासनवाहक १०.दुताने एकटेच निद्रा करावी व स्त्रियांचा संग करू नये व-------ही करुं नये. मद्यपान ११. मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या सात ग्रंथाच्या लेखनाला--------- म्हणून संबोधले जाते. सप्त प्रकरणात्मक बखरी १२. धर्मामुळे येणारे कर्मकांड आणि------- दूर व्हावयास हव्यात. अंधश्रद्धा १३. शोध स्वामी विवेकानंदाचा कोणी लिहिला? दत्तप्रसाद दाभोळकर १४. पुढील ग्रंथ दत्तप्रसाद दाभोळकर यांचे आहेत? A. विज्ञानेश्वरी B. तुम्हाला विज्ञान युगात जगायचंय C. प्रकाशवाटा D. वरील सर्वच १५.पुणे मराठी ग्रंथालयाने दत्तप्रसाद दाभोळकर यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे? साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार १६. छाया हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? दत्तप्रसाद दाभोळकर दत्तप्रसाद दाभोळकर यांना औद्योगिक संशोधनाचा कोणता पुरस्कार मिळाला आहे? फाय फाउंडेशन पुरस्कार १७. विज्ञान तुमचे व माझे ------अस्तित्व नाकारते. शाश्वत १८. रामराजे आत्राम यांचे उघड़ा दरवाजा हे-------आहे. आत्मचरित्र १९.पुढीलपैकी लेखक हे आदिवासी, वंचितांच्या प्रश्नावर लेखन करणारे आहेत. रामराजे आत्राम २०. मसनवटा हा कथासंग्रह कोणाचा आहे? रामराजे आत्राम २१. माझी माँ ------होती. अक्षरांची अन तिची कधी भेट झालीच नव्हती. अनाडीच २२.लेखक रामराजे आत्राम कोठे शाळा शिकले? मेहकर २३. शाळेतला पहिला दिवस होता. मास्तरानं ----------- येथून सुरुवात केली. ओनामा सिंधम २४.वैदिक परंपरेची घमेंड वेचा कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे? *आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल!* २५. भारतीय वैदिक आणि अवैदिक संस्कृतीमध्ये सतत ------- दिसून येतो. *संघर्ष* २६. 'चार्वाकदर्शन' हा ग्रंथ कोणाचा आहे? *आ. ह. साळुंखे* २७. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी कुणाच्या आक्षेपांना उत्तर दिले? *प्रा. श्रीनिवास दीक्षित* २८. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी -------साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. *विचारवेध* २९. अनुभवाच्या रसायनातून 'मी' आणि 'माझे' काढून टाका. जे उरेल ते ------ होय. मी ते अनुभवले आहे. *निर्वाण* ३०. या भारत देशाची घटना एका महामानवाने देशाच्या सच्च्या भक्तानं म्हणजे ----------यांनी लिहिली होती. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* ३१. महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर व महाराष्ट्र महाविद्यालयाची स्थापना कोणी केली? *डॉ. शिवाजीराव निलंगेकर* ३२. महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक कोण होते? *गोविंदराव फाटे* ३३. अभय बंग हे ----या वैद्यकीय संशोधन संस्थेचे संस्थापक आहेत. *सर्च* ३४. गडचिरोली जिल्हा---------- आंदोलन सामान्य जनतेला सोबत घेऊन अभय बंग यांनी यशस्वी केले. *दारूमुक्ती* ३५. आदिवासी समाजाच्या कुपोषणावर व नवजात अर्भकाच्या मृत्यूवर अभय बंग यांचा -------- नावाचा शोधनिबंध खूप गाजला. *कोवळी पानगळ* ३६. डॉ. अभय बंग यांचे संशोधनपर लेख कोणत्या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकातून प्रसिद्ध झाले? *द लॅनसेट* ३७. डॉ अभय बंग यांना कोणते पुरस्कार मिळाले? * पद्मश्री व महाराष्ट्र भूषण पुरस्कार* ३८. माझा साक्षात्कारी हृदयरोग हे -------आहे. *स्वकथन* ३९. काळाची------- समजली म्हणजे आपली पाऊल बेताल होत नाहीत. *लय* ४०. अभय बंग सर्वांना कोणती शुभेच्छा देऊ इच्छितात? *प्रत्येकाला एकदा तरी मृत्यूचं दर्शन अवश्य व्हावे.* ४१. 'मराठी मातीचे वैभव' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? *उत्तम सूर्यवंशी* ४२. मराठवाड्याचे गांधी: गंगाप्रसाद अग्रवाल हे व्यक्तीचित्रण कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे? *थोरवी* ४३. मराठवाड्याचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते ? *गंगाप्रसाद अग्रवाल* ४४. गंगाप्रसाद अग्रवाल यांना सर्वजण प्रेमाने-------- म्हणून संबोधित असत.*भाईजी* ४५. निजामाच्या हस्तकांनी म्हणजे प्रामुख्याने रजाकार व------------------ मुसलमीन संघटना यांनी नुसता उच्छाद मांडला होता. *मजलिस-ए-इत्तेहादुल* ४६. दि १८ जुलै १९४८ ला गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली चार कॅम्पसच्या सैनिकांनी -------येथे गोवळकोंडा रेजिमेंट विरुद्ध सर्व ताकदीनिशी लढा दिला. *आजेगाव* ४७. वसमत नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त------- म्हणूनही अग्रवाल यांचा सन्मान झाला. *अध्यक्ष* ४८. ----------–राष्ट्र सेवादलाच्या कलापथकात आला आपल्या पहाडी आवाजाने साथ दिली. *लोकशाहीर प्रभाकरराव वाईकरांनी* ४९. कोणत्या विद्यापीठाने आपली पहिली मानद डी. लिट. गंगाप्रसाद अग्रवाल यांना दिली? *स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ* ५०. गंगाप्रसाद अग्रवाल यांना भुदान पदयात्रेत लोकांनी किती एकर जमीन दान दिली? *सतरा* ५१. -------- यांच्या नवनिर्माण आंदोलन ना निमित्त गंगाप्रसाद अग्रवाल यांनी देशभर दौरा केला.*जयप्रकाश नारायण* ५२. मोहन धारिया, डॉ. बापुसाहेब काळदाते,---------- यांनी त्यांच्या प्रबोधन यात्रेत भाईजींना जीवाभावाची साथ केली.*अनंत भालेराव* ५३. मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात गोविंदभाई श्राफ आणि------------ यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.*शंकरराव चव्हाण* ५४. भाईजींचे ----------हे पुस्तक तरुण वर्गात चांगलेच गाजले. *संपूर्ण क्रांति: एक रूपरेषा* ५५. गंगाप्रसादजी २००२ मध्ये ------येथील महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष झाले.*वर्धा* ५६. मराठवाड्याचे गांधी अशा शब्दात गंगाप्रसाद अग्रवाल यांचा गौरव कोणी केला? *प्रा. मधु दंडवते* ५७. महात्मा गांधींच्या ------- या ग्रंथाला 2009 साली शंभर वर्ष झाली.*हिंद स्वराज* ५८. भाईजींनी वसमत, हिंगोली, कळमनुरी या तीन तालुक्यातील शाळा कॉलेजच्या मुलांना घेऊन ---- दिवसाची भूदान पदयात्रा काढली. *२८* ५९. ------ हे गंगाप्रसाद अग्रवाल यांचे स्वप्न होते. *सर्वोदय* ६०. "गांधीजींनी केवळ स्वतःची उंची वाढविली नाही तर सामान्यांची ही उंची वाढविली म्हणून ते ----- झाले". *महात्मा* ६१. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून भाईजी यांनी --------- कामे हाती घेतली. *ग्राम विकासाची* ६२. ------स्वप्नातील भारत मूर्त स्वरूपात आणण्यासाठी गंगाप्रसाद अग्रवाल शेवटपर्यंत संघर्षशील होते. *गांधीजींच्या* ६३.'गाई आल्या घरा' हा ललित लेख कोणी लिहिला? १) उत्तम सूर्यवंशी २) इंद्रजीत भालेराव ३) अभंग बंग ४) मल्हार रामराव चिटणीस ६४. इंद्रजित नारायणराव भालेराव यांनी किती कवितासंग्रहचे लेखन केले १) १४. २)१५ ३)१०. ४)१२ ६५. देवाधर्माचे ओव्या कोण म्हणत असत? १) आई. २) आजी ३) बहिण ४) मावशी ६६. अंगणी कशाचा पूर आला ? १) पावसाचा २) पाण्याचा ३) दुधाचा ४) गोतरचा ६७. थूना नदीच्या कोणत्या डोहावर येऊन गुरे पाणी पाजुन आणवी लागत ? १) धर्मवाडी डोह २) गिराम डोह ३)शेत तळ ४)रानमळा डोह ६८. मोठ्या पेरणीसाठी सकाळी लवकर उठून लेखकाला काय जमा करावे लागत होते? १) गोमतर २) दूध २) पाणी ४) यापैकी नाही ६९. लेखकाच्या शाळा कशामुळे बंद होत्या ? १)19 कोविंड २) दुष्काळामुळे ३) पावसामुळे ४) यापैकी सर्वच ७०. कासराभर अंतरावर काय दिसायचं ? १) झळा २) पाणी ३) नदी ४) तलाव ७१. संध्याकाळी गावातील सर्व गुरे पाणी पिण्यासाठी कुठे जमा होत असत ? १) हापसिवर २) बारवावर ३) आडावर ४) हौदावर ७२. गर्दीमुळे एकेक पोहरा शेंदायला किती वेळ लागायचा ? १) एक घंटा. २) पाच मिनिट ३) सतरा मिनिट. ४) दोन तास ७३. लेखक पाणी पाजुन आल्यावर रानात गुरं कुठे बांधायचे ? १) कोठ्यात २) रानातल्या उघड्या दावणीला ३) अंगणात ४) घराजवळ ७४. घरी भाकरी भाजलेली नसेल तर लेखक आपल्या सोबत काय नेत असत ? १) कुरवड्या खारवड्या २) चिवडा ३) शिळी भाकर ४) यापैकी सर्वच ७५. लेखकाच्या अंगाची जेव्हा आग होत असेल तेव्हा त्यांचे वडील लेखकाच्या पायाला काय लावत होते ? १) औषध २) ओली राख ३) माती ४) बर्फ ७६ दुष्काळाच्या वर्षी उंटा वरून शेळ्या राखणारे कोण आले होते ? १) राजस्थानी धनगर २) बेपारी ३) बिहारी ४) यापैकी सर्वच ७७ डापण्या गायी घेऊन दूर देशाचे आले होते ? १) ब्राह्मण २) लमाण ३) पोर्तुगीज ३) बेपारी ७८ दुष्काळात कोणता महिना आला होता ? १) चौदावा २) तेरावा ३) बारावा ४) यापैकी सर्वच ७९. गुराखी कामावर साला वर राहताना पडी करण्याची कबुली का करत होते ? १) दिवाळीसाठी २) दसऱ्यासाठी ३) जत्रेसाठी ४) गावाला जाण्यासाठी ८०.औंढा नागनाथ मंदिर कोणत्या राजाने बांधले ? १) महाराणा प्रताप २) शिवाजी राजे ३) विराट राजा ४) हरिश्चंद्र ८१. प्रत्येक गाईच्या पाठीमागे कोण उभा असतो ? १) कृष्ण २) महादेव ३) चक्रधर स्वामी ४) मारुती ८२. दुपारच्या उन्हात डोळे दिपू लागले की लेखकाला वाटायचं की आपल्याला दर्शन कोण देत आहे ? १) श्रीकृष्ण २) भीम ३) मारुती ४) अर्जुन ८३. चक्रधराची एक लीळा कोणत्या गावाची होती ? १) परभणी २) बाराशिव ३) सुकी ४) नांदेड ८४. गोदावरीच्या पात्रात एका खडकावर ध्यानस्थ बसले होते ? १) श्रीकृष्ण २) चक्रधर ३) मारुती ४) यापैकी नाही ८५. बैलाची उरलेली चिपाट संध्याकाळी गायीला टाकायला कोण सांगत ? १) आण्णा २) दादा ३) आई ४) बहिण ८६. गाईला हिरवा चारा टाकण्यासाठी कोनामध्ये भांडण होत असे ? १) आण्णा दादा २) आई वडील ३) डोघेही ४) यापैकी नाही ८७. तान्हा वासराजवलून कोणाचा पाय निघत नसे ? १) गाईचा २) बैलाचा ३) वासराचा ४) मैसीचा २६) सर्व गुराखी आपल्या भाकरी कशात बांधुन आणत ? १) डब्ब्यात २) धुडक्यात ३) कागदात ४) यापैकी नाही २७) कुणाच्या सूनेन लेखकाला वाटेत आडवून भाकरी मागितल्या ? १) वारकाच्या २) माळ्याच्या ३) छायाबईच्या ४) गिताबाईच्या २८) लेखकाला पिण्यासाठी शेळीच दूध कोणी काढून दिलं ? १) भिम्यान २) आण्णानं ३) दादानं ४) मित्रानं २९) धूडक्यात काहाचा चेंडू केला ? १) कापसाचा २) भाकरीचा ३) भाजीचा ४) यापैकी नाही

मंगळवार, २ मार्च, २०२१

अक्षरविद्या वस्तुनिष्ठ प्रश्न - सरावासाठी


बी. ए / बी. कॉम. बी.एस्सी.द्वितीय भाषा मराठी (SL)

अक्षरविद्या – पे.क्र.- III, सत्र -III

प्र. १) गाडगे बाबांनी खेड्यापाड्यातील अज्ञानी .......... जनतेला कीर्तनातून प्रबोधन केले.  

  1. देवभोळया         ब) दैववादी           क) आळशी          ड) अंधश्रद्ध  

   २) ज्ञानाबरोबरच .......... विषयी गाडगे बाबांनी प्रबोधन केले. 

      अ) स्वच्छता          ब) अज्ञाना           क) मनोरंजना        ड) लोककला 

   ३) ............ देव आहे जगात जनार्दन आहे.   

      अ) आकाशात         ब) देवळात           क) पुर्थईवर          ड) हृदयात  

   ४) बाबासायेबानं काही लहानसहान कमाई नाही केली, हिंदुस्थानची .......... केली. 

      अ) बांधणी           ब) फाळणी            क) घटना           ड) पत 

   ५) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे ....... वे राष्ट्रपती होते.  

      अ) ११ वे            ब) १२ वे             क) १३वे             ड) १४ वे 

   ६) डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ........... येथे आहे.  

      अ) हैदराबाद          ब) तामिळनाडू         क) चेन्नई           ड) कोईम्बतूर 

    ७) क्षेपणास्त्र विकास कार्यातील......... या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभरातून                

       कौतुक झाले.  

      अ) अग्नी            ब) GSLV            क) आर्यभट्ट         ड) चंद्रयान - २ 

    ८) .......... या दिवशी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी डीआरडीएल ची सूत्रे हातात घेतली  

      अ) १ जून १९८२      ब) १ जाने १९८२        क) १ जुलै १९८२      ड) १ मार्च १९८२

    ९) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना …… विद्यापीठांकडून डॉक्टरेट पदवी देवून सन्मानित 

       करण्यात आले. 

      अ) ४०              ब) ४४                क) ३०               ड) ४५ 

    १०) भारत सरकारतर्फे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ....... पुरस्कारांनी सन्मानित करण्यात 

        आले. 

      अ) पद्मश्री           ब) पद्मभूषण         क) पद्मविभूषण       ड) फक्त अ व ब 

    ११) मी कोणी संत ..........नव्हतो आणि नेता तर नव्हतोच.   

       अ) महंत           ब) साधू              क) महात्मा          ड) सज्जन   

   १२) गनिमत ,……….. ने चाक पोटाच्या डाव्या बाजूवरुन गेले होते. 

      अ) नशीबा           ब) दुर्दैवाने            क) सुदैवाने          ड) कडे

   १३) .......... नावाच्या गणिकेची कन्या कान्होपात्रा होय.   

      अ) दमा             ब) शामा              क) रमा            ड) पोर्णिमा

   १४) हरिणीचे पाडस ........ धरियेले

       मजलागी जाहले तैसे देवा |||| 

      अ) व्याघ्रे            ब) सिंव्हे              क) लांडगे           ड) कुत्रे 

   १५) संत जनाबाई ......... संप्रदायातील संत कवयित्री  

      अ) महानुभाव         ब) नाथ               क) दत्त            ड) वारकरी 

   १६) सर्व विश्वामध्ये एक तत्व आहे ते म्हणजे निर्गुणाचाच ............ आकार  

     अ) निर्विकार           ब) सगुण              क) सगुण निर्गुण    ड) अनादी 

   १७) धुळपेर हा कवितासंग्रह ......... यांचा आहे.  

     अ) आ.य. पवार        ब) नागराज मंजुळे       क) रविचंद्र हडसनकर ड) शेषराम धांडे

   १८) बैलाला .......... महिलाला मास्क पीक येईल वस्कं 

     अ) मुस्कं              ब) मुंडावळ            क) घुंगरमाळा        ड) रिस्क  

   १९) राजा ढाले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ........ पुरस्काराने गौरविण्यात आले.   

      अ) साहित्यरत्न        ब) सम्यक विचारधारा    क) दलितमुक्ती       ड) जीवनगौरव  

   २०) ......... नित्य वनामधे राहणारे म्हणून वनाचाच एक भाग बनून गेले.   

      अ) वनवासी           ब) आदिवासी           क) भिक्खु           ड) बुद्ध 

   २१) माणसं स्वत:च्या स्वार्थासाठी परस्परातील.......... धोक्यात आणिम आहेत   

       अ) प्रेम              ब) बंधुत्व             क) जिव्हाळा          ड) आपलेपणा 

   २२) घरी मुले बिचारी ! केवढे कष्टे केवढे........... 

        अ) दु:खी            ब) उदास             क) सहनशील          ड) निराशा 

   २३) विद्रोही या काव्यसंग्रहाचे कवी ....... हे होत. 

       अ) नारायण सुर्वे       ब) नामदेव ढसाळ      क) शेषराव धांडे        ड) यापैकी नाही  

   २४) कितीकही बदलू दे......... मान,

       जात वैभवावर टिकून आहे व्यवस्था. 

       अ) जीवन             ब) जग              क) राहणी            ड) हवा  

    २५) ........... नसते ठेवणीतल्या शब्दकोशातील ग्रंथासारखी.  

       अ) जगणं             ब) दंगल             क) वागणं            ड) कन्हण 

    २६) ........... शासकीय व्यवस्थेविरुद्ध विदुर महाजनांनी दिलेला भ्रष्टाचाराविरुद्ध लढा.

       अ) भ्रष्ट              ब) बदनाम            क) निष्क्रीय          ड) बेजबाबदार  

     २७) प्रवाहाच्या विरुद्ध .......... नाका तोंडात पाणी जायची तयारी ठेवा. 

       अ) चालताना          ब) संघर्ष करतांना       क) बोलतांना          ड) पोहातांना 

 

     २८) नागराज मंजुळे लेखक, कवी बरोबरच ........... म्हणूनही प्रसिद्ध होत. 

        अ) कलावंत           ब) गायक           क)  दिग्दर्शक        ड) गुरुजी 

     २९) उन्हाच्या कटाविरुद्ध या कविता संग्रहास .......... २०११ च पुरस्कार मिळाला.  

       अ) कुसुमाग्रज          ब) गोविंदाग्रज        क) कवी अनिल      ड) भैरु रतन दयानी 

     ३०) त्याचा काय नेम नाय हे स्वरचित .......... होय. 

        अ) लोकगीत          ब) ग्रामीणगीत        क) नाट्यगीत       ड) भावगीत         

     ३१) आसवांचा झूला हे ........... गीत प्रसिद्ध आहे.  

        अ) विरह             ब) प्रेम              क) भक्ती          ड) स्त्री  

     ३२) काय बोलू काय नाही, असं ताईला झालेलं

         जरी बोलते माझ्याशी, मन ...... गेलेलं 

        अ) बाहेरी            ब) शिवारी             क) माहेरी          ड) सासरी 

     ३३) दारिद्रय आणि अज्ञानाच्या काळोखात गडण झालेल्या ............ त अक्षरांची पहाट होते

        अ) समाजा           ब) घरा               क) झोपडी         ड) वस्तीत  

     ३४) बुडतीकडे ....... झुकली की घराच्या ओढीने चालत होती.   

        अ) चांदणी            ब) सांज             क) तारका          ड) नाव 

     ३५) कोणत्याही चांगल्या बापाला पोरगं ............ , मोठं व्हाव असाच वाटतं 

        अ) शिकावं            ब) कष्टानं           क) गुणानं          ड) यापैकी नाही  

     ३६) .......... मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. 

        अ) संवाद             ब) संघर्ष            क) परिश्रम          ड) यापैकी नाही 

     ३७) भाषेला स्वत: ची अशी एक रचना असते. यालाच आपण ..... प्रणाली असे म्हणतो.  

       अ) संकेत              ब) भाषा            क) भाव            ड) वाचिक 

     ३८) .......... चिन्हांमुळे वाक्यांचा अर्थ नेमकेपणानं कळतो

       अ) विराम              ब) संकेत           क) हावभाव         ड) सर्व पर्याय योग्य  

     ३९) आधुनिक युगात भाषेचे लिखाण हे उपयुक्त व आवश्यक ...... बनले आहे.   

        अ) घटक              ब) अंग            क) कौशल्य         ड) संकेत 

     ४०) मनुष्याची ......... सृष्टी पूर्णत: कोरी निर्लेप अशी असते.  

        अ) आशय             ब) अभिव्यक्त       क) अनुभव         ड) भाव  

अक्षरविद्या – पे.क्र.- III, सत्र - III

उत्तरपत्रिका २

 

प्र. क्र.

उत्तर

प्र. क्र.

उत्तर

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

१०

३०

११

३१

१२

३२

१३

३३

१४

३४

१५

३५

१६

३६

१७

३७

१८

३८

१९

३९

२०

४०

प्र. १) लोकजागृतीसाठी गाडगे बाबांनी ............ या मार्गाचा अवलंब केला. 

  1. लोकनाट्य        ब) कीर्तन          क) प्रवचन         ड) कलापथक 

   २) ............ शिका, अन गरिबाले विद्यासाठी मदत करा. 

      अ)  शाळा           ब) गणित          क) विद्या         ड) विज्ञान 

   ३) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारताचे ......... मॅन म्हणून ओळखले जाते.

      अ) आयर्न मॅन       ब) मिसाईल मॅन     क) फक्त       ड) यापैकी नाही 

   ४) राष्ट्रीय विज्ञान संस्था .......... येथे आहे.

      अ) हैदराबाद         ब) बंगलोर          क) पुणे           ड) मद्रास  

   ५) सर्जननामा हे............. यांचे आत्मचरित्र आहे. 

      अ) डॉ.जे.जी.वाडेकर   ब) डॉ. प्रकाश खरात  क) राजा ढाले      ड) आ.य. पवार 

   ६) नळाच्या पाण्याखाली लाइफबॉय साबण लावून डेटॉल लोशनने केस आणि..........स्वच्छ धुवून 

      काढली. 

      अ) चेहरा           ब) पाठ             क) कवटी         ड) मान

    ७) खर्‍या अर्थाने............. वैद्यकीय क्षेत्रातला विकास झाला आहे का ? 

      अ) दंत             ब) अस्थि           क) भारतीय       ड) परकीय

    ८) कान्होपात्रांच्या नावावर एकूण .......... अभंग उपलब्ध आहेत.

      अ) ३६             ब) ५६              क) २६           ड) ५२

    ९) कान्होपात्रा अभंगातून ......... आणि उज्ज्वल व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते.

      अ) व्रतस्थ          ब) प्रसन्न           क) भारदस्त       ड) चरित्र 

    १०) जनाई च्या नावावर एकूण ........ एकूण अभंग उपलब्ध आहेत. 

      अ) ३५०            ब)३५१              क) ३५५          ड) ३६५

 

    ११) संत जनाईने ........... आख्यान रचले आहे.

       अ) हरीचंद्राख्यान      ब) श्रीकृष्णाख्यान     क) रुक्मिणीख्यान   ड) यापैकी नाही 

   १२) आ.य.पवार यांच्या कवितांवर प्रसिद्ध असणारा ........ हा समीक्षा ग्रंथ 

      अ) रानमाती           ब) रानगंध          क) तापसी         ड) येरु

   १३) ब्रम्हाहाती ....... गती नुरेल जगी आजारपण.

      अ) अधो              ब) प्र               क) हृदय         ड) विशेष

   १४) राजा ढाले यांनी ............. नावाची सामाजिक संघटना काढली.

      अ) दलित मुक्ती        ब) प्रबुद्ध           क) दलित पॅथर   ड) दलित आघाडी 

   १५) ………. मध्ये ही थेरवादी विचारधारेच्या बुद्ध धम्माच्या पाऊलखुणा जागोजागी सापडतात 

      अ)मधुबन              ब)थेरबन            क) सागबन      ड) सालईबन 

   १६) माझ्या प्रयोगशील देशात हे लेखन ....... स्वरूपाचे आहे. 

     अ) वैचारिक              ब) कथात्म         क) काव्यात्म     ड) नाट्यत्म 

   १७) .......... एकांकिका चे संपादन विलास वैद्य यांनी केले. 

     अ) बारा                 ब) बावीस          क) दोन         ड) अनेक

   १८) आर बाब्या......... नको, तिकडं चुलीवर भगोनं ठेव. 

     अ) फिरू                 ब) झोपू            क) भांडू         ड) मारू 

   १९) सरावन महिना आला की ही कविता........... या काव्यसंग्रहातून घेतली आहे. 

      अ) गीत नवे तेज नवे     ब) अरे मानसा मानसा क) देणगी      ड) हळद उन्हे

   २०) ........ नंतरच्या कालखंडातील उदयोन्मुख कवी म्हणून शेषराव धांडे ओळखले जातात.

      अ) १९८२               ब) १९८५            क) १९८७       ड) १९९०

   २१) भारतीय संविधानाने........वादी मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले.

       अ) समता             ब) मानवता          क) न्याय       ड) उदारमत

   २२) चष्माचे काच बदलून घेतल्याने बदलत नाही .........

        अ) रंग               ब) रूप             क) आकार      ड) दृष्टीकोन

   २३) शोधयात्रा हे विदुर महाजनांचे .......... होय.

       अ) प्रवासवर्णन          ब) कथासंग्रह        क) आत्मकथन   ड) वैचारिक

   २४) एक ......... ही लायबिलिटी काढता आली नाही, अशी पहिलीच कंपनी पाहिली.

       अ) साधी               ब) रुपया           क) पैसा         ड) यापैकी नाही

    २५) नागराज मंजुळे यांच्या ...... या लघुपटास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

       अ) सैराट               ब) फॅन्ड्री           क) नाळ         ड) पिस्तुल्या

    २६) ............ चित्रपटाने सर्व रेकॉर्डस मोडून १०० कोटींच्या क्लब मध्ये नेले. 

       अ) सैराट               ब) नाळ            क) फॅन्ड्री       ड) पिस्तुल्या

     २७) हनुमंत चांदगुडे एक प्रसिद्ध कवी व ........... आहेत.

       अ) लेखक               ब) समीक्षक          क) गीतकार     ड) शेतकरी 

     २८) झाड व्हायचं दोघांनी हा .......... प्रकारचा काव्यसंग्रह आहे.

        अ) दीर्घकाव्य           ब) निसर्गकाव्य      क) भावकाव्य    ड) लघुकाव्य

 

     २९) बहीण भावाच्या मनातील भाव- भावनांचा .......... किनकीन घुंगुराची या कवितेतून व्यक्त      

         होतो.

       अ) गुंता                 ब) ओलावा          क) आपलेपणा     ड) जिव्हाळा 

     ३०) डोकं फुटलं भावाचं, वाहे रगताचा पुर

         ........... म्हणणारा भाऊ, असा झाला गपगार. 

  1. गीत               ब) गाणं             क) गप्प गं       ड) का गं बहीण बाई

     ३१) डॉ. प्रकाश खरात ........ निर्मिती व वैचारिक लेखनामुळे परिचित.

        अ) सृजनशील          ब) सर्जंनशील         क) भाव          ड) काव्य 

     ३२) ........ वर स्वार होऊन पोटात अन्न ओतण्यासाठी धावत होतो. 

        अ) गाडी              ब) ऋतु              क) परिस्थिती     ड) यापैकी नाही 

     ३३) हरीकडे पाहून त्या सगळ्याच कुटुंबाला दरिद्रयाच्या आभाळातही .......... ची पहाट फुलते   

         आहे हा विश्वास जाणवला.

  1. श्रीमंती            ब) अक्षरां             क) सूर्या         ड) सुखा

     ३४) अलंकाराचे दोन प्रकार एक शब्दलंकार तर दूसरा ............ होय. 

        अ) यमक             ब) अर्थालंकार          क) अनुप्रास      ड) यापैकी नाही 

     ३५) काव्याला परिपुष्ट करतो तो............

        अ) यमक             ब) अलंकार            क) अनुप्रास      ड) श्लेष 

     ३६) मराठी भाषेतील विरामचिन्हानांची संख्या........... एवढी आहे.

        अ) १२               ब) १३                क) १४           ड) १६

     ३७) ........... हा शंकरराव चव्हाण यांच्या जीवनावरील ग्रंथ डॉ. करुणा जमदाडे यांचा आहे.

       अ) ऊर्जा               ब)  अथांग            क) यशोधरा      ड) सर्जननामा 

     ३८) .......... अंध:कारात माणूस होरपळून एक दिवस नष्ट होतो. 

       अ) अज्ञानाच्या          ब) आळसाच्या         क) विषमतेच्या    ड) भेदभावाच्या 

     ३९) डॉ. अरुणाचलम ही एक संभाषण चतुर ....... आहेत. 

        अ) व्यक्ती            ब) माणूस             क) गृहस्थ        ड) वक्ते  

     ४०) इस्रोमध्ये प्रोफेसर साराभाई, प्रोफेसर.......... सारखे द्रष्टे नेते पुरोगामी होते.

        अ) धवन             ब) अरुणाचलम         क) पी.मार्शल       ड) अय्यर  

अक्षरविद्या – पे.क्र.- III, सत्र - III

उत्तरपत्रिका 1

 

प्र. क्र.

उत्तर

प्र. क्र.

उत्तर

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

१०

३०

११

३१

१२

३२

१३

३३

१४

३४

१५

३५

१६

३६

१७

३७

१८

३८

१९

३९

२०

४०

शीगवाला / नारायण सुर्वे

क्या लिखतो रे पोरा ! नाही चाचा -- काही हर्फ जुळवतो म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो गोंडेवली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो ...