बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

मराठी नाटक प्रारंभ ते १९९५

 मराठी रंगभूमी दिवस

मराठी नाटक प्रारंभ ते १९९५

०५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जातोया दिनानिमित्ताने मराठी नाट्य लेखक  नाट्य कलावंतांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

या दिवसाचे औचित्य साधून आपण आजच्या ब्लॉगमध्ये मराठी रंगभूमीचा किंबहुना मराठी नाट्य वाङ्मयाचा आढावा घेणार आहोत. 


नाटक आणि रंगभूमी

नाटक आणि रंगभूमी या दोन स्वतंत्र संकल्पना आहेतनाटक हे नाट्यसंहितेशी निगडित आहेतर रंगभूमी ही नाटकाच्या प्रयोगाशी निगडित आहेनाट्यसंहितेचा प्रयोग रंगभूमीवर होत असतोनाटककार नाटक लिहितो म्हणजेच तो संहिता तयार करतो आणि त्या संहितेचा प्रयोग  हा रंगभूमीवर सादर होत असतो. तसेच रंगभूमीवर प्रयोग सादर होतो म्हणून नाटककार नाट्यसंहिता लिहितो असेही आपल्याला म्हणता येतेया अनुषंगाने विचार केला तर नाटक आणि रंगभूमीचा संबंध आणि इतिहास हा खूप प्राचीन आणि  नाटक संहिता आधी की रंगभूमी आधी या वादग्रस्त प्रश्नावर जाऊन संपू शकतोया प्रश्नाचा फारसा विचार  करता आपण रंगभूमी म्हणजे नाटक हा रूढ झालेला अर्थ गृहीत धरून आणि उपलब्ध संदर्भ ग्रंथांच्या आधारे मराठी नाट्य इतिहासाचा आढावा घेणार आहोत.

मराठी नाट्य वाङ्मयाचा  इतिहास हा कालखंडानुसार आरंभ ते १८८०१८८० ते १९२०१९२० ते १९५०१९५० ते १९९० असा केला जातोआपणही याच पद्धतीने नाट्य वाङ्मयाचा  इतिहास तपासणार आहोत.

 वर्तमान पातळीवर प्रादेशिक अंगाने विचार केला तर मराठी नाटक हे आज स्वतंत्रपणे विकसित झालेले असले तरी मराठी नाटकांच्या पूर्वीही आपल्याला भारतात नाट्य परंपरा दिसून येतेसाधारणपणे इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन २०० हा कालखंड भरतमुनीच्या नाट्यशास्त्राच्या जडणघडणीचा कालखंड मानला जातो.  आपल्या नाट्यशास्त्रात भरतमुनींनी नाटकाविषयीचे अतिशय सविस्तर आणि दीर्घ विवेचन केलेले आहेरंगभूमी अस्तित्वात होती त्यातूनच हे विवेचन अस्तित्वात आलेले असावे किंबहुना नाट्यपरंपरेचा इतिहास आणि मागोवा घेऊन भरतमुनींनी नाट्यशास्त्राची रचना केली आहेअसे आपल्याला म्हणता येते.  कारण आधी भाषा येते नंतर व्याकरण तोच संबंध येथेही लावता येतो.         

 अंगी कलांचा व्यक्तिशः किंवा समुदायाने अविष्कार करण्याची भूमी किंवा स्थान म्हणजे रंगभूमी” विश्वकोशात असलेली  ही रंगभूमीची व्याख्या लक्षात घेतली तर केवळ संस्कृत नाटकच नव्हे तर रंगभूमीशी निगडित असलेले विविध लोक कलाप्रकार आपल्याला दिसतातयात गोंधळदशावतारी खेळलळीतेदंडारभारुडबहुरूपी आणि तमाशा या लोककला प्रकारात आपल्याला मराठी रंगभूमीची बीजे दिसून येतातसंस्कृत रंगभूमीच्या आधीही हे लोक कलाप्रकार अस्तित्वात होते आणि आज मराठी रंगभूमी विकसित झाल्यावर ही हे लोककलाप्रकार जीवनामध्ये अस्तित्वात आहेत. 

मराठीतले ‘पहिले नाटक

मराठी रंगभूमीच्या आरंभाविषयी मराठी समीक्षकांमध्ये मतभेद दिसून येतात.  “कैविष्णुदास भावे यांनी  नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली येथे सांगलीचे संस्थानिक अप्पासाहेब पटवर्धन यांच्या उपस्थितीत ‘सीता स्वयंवर’ या नावाचा दशावतारी ‘खेळ’ सादर केलाया घटनेच्या आधारे सांगली हे मराठी नाटकाचे ‘माहेरघर’ कैविष्णुदास भावे हे मराठी नाटकाचे ‘जनक’ आणि ‘सीता स्वयंवर’ हे मराठीतले ‘पहिले नाटक’ ही समजूत रूढ झाली आहेही समजूत दृढ व्हावी म्हणून  नोव्हेंबर हा मराठी रंगभूमीचा वर्धापन दिन आहे असे गृहीत धरून हा दिवस साजरा करण्याची प्रथा ही रूढ झालेली आहे.”( प्रादत्ता भगतमराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहासपृ.२९प्रादत्ता भगत यांनी अतिशय सविस्तरपणे मराठी रंगभूमीच्या आद्यत्वाविषयीची चर्चा केलेली आहेयासाठी त्यांनी काही कसोट्याही लावलेल्या आहेत त्यात कालप्रमाण आणि नाट्यसंहिता या दोन कसोट्यांचा विचार केला तर त्यांनी पुढील प्रश्न उपस्थित करून मराठी नाटकाचे आद्यत्व ठरवायचे कसे यासंदर्भातील विवेचन केले आहेत्यांच्या मते 

लक्ष्मीनारायण कल्याण  .१६८४

संसीता स्वयंवर .१८४३

प्रबोध चंद्रोदय .१८५१

तृतीय रत्न .१८५५ 

व्यवहारोपयोगी नाटक   १८५६

नाटक थोरले माधवराव पेशवे याजवर .१८६१.

वरीलपैकी कोणते नाटक पहिले नाटक होय असा ते प्रश्न उपस्थित करतात आणि त्या प्रश्नाचे उत्तरही अतिशय तार्किकपणे देतातत्यांच्या मते

⭐'लक्ष्मीनारायण कल्याण 'मराठी रंगभूमीवरील उपलब्ध पहिले नाटक कारण या नाटकाचे हस्तलिखित उपलब्ध आहेपरंतु याचा प्रयोग झालेला आहे किंवा नाही याविषयीची

माहिती उपलब्ध नसल्याने हस्तलिखित असलेले पहिले उपलब्ध नाटक म्हणून याचा उल्लेख करता येतो.

⭐दशावतारी खेळाच्या आधारे रंगभूमीवर सादर झालेले 'सीता स्वयंवर' हे पहिले व्यावसायिक नाटक आहे. 

⭐'प्रबोध चंद्रोदय' हे पहिले रूपांतरित नाटक. 

⭐महात्मा फुले यांचे 'तृतीय रत्न' हे नाटक पहिले आधुनिक नाटक होय. 

⭐'व्यवहारोपयोगी नाटक' नाटक रूप निबंध आहे. 

⭐'नाटक थोरले माधवराव पेशवे याजवर' हे पहिले ऐतिहासिक नाटक होय.

अशी मांडणी प्रा. दत्ता भगत यांनी केलेली आहे. आणि ही मांडणी आदर्श मांडणी म्हणून ठरवता येते. जिज्ञासूंनी अवश्य ही मांडणी सविस्तरपणे अभ्यासावी.



    ⭐ बुकिशनाटके आणि भाषांतरित नाटकं
साधारणपणे १८ व्या शतकात सुरू झालेल्या मराठी रंगभूमीचा कालखंड हा अतिशय संघर्षाचा होता. नाटक म्हणून अस्तित्व निर्माण करण्यासाठीची धडपड या कालखंडामध्ये दिसून येते. विष्णुदास भावे यांच्या संगीत सीता स्वयंवर पासून प्रेरणा घेऊन पौराणिक नाटकांची लाटच या कालखंडात आली. या पौराणिक नाटकांबरोबरच बुकिश नाटके ही या काळात आली. बुकांच्या स्वरूपात प्रथम प्रसिद्ध होणारी नाटके ती बुकिश नाटके होय. ही बुकिश नाटके प्रसिद्ध होण्याच्या आधीपासूनच मराठीमध्ये संस्कृत नाटकांची भाषांतरे होण्यास सुरुवात झाली होती. हा कालखंड अव्वल इंग्रजी राजवटीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात शाळा महाविद्यालयांमध्ये नवशिक्षित विद्यार्थी इंग्रजी साहित्याच्या अभ्यासाने स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने इंग्रजी नाटकांचे प्रयोग सादर करत असत. त्यामुळे या काळात प्रहसने आणि भाषांतरित नाटकांचे प्रयोग फार मोठ्या प्रमाणात झालेली दिसत नाहीत. खास करून युरोपियन मंडळी शोकात्म अथवा सुखात्म नाटक सादर करत असे नवशिक्षितांसाठी हे सर्व नवे होते आणि म्हणून मग वाचकांनाही ही नाटके उपलब्ध व्हावीत ही प्रेरणा घेऊन आपल्याकडे बुकिशनाटके लिहिली गेली.



 ⭐१८८० ते १९२० : वैभवपर्व
आरंभापासून ते १८८० पर्यंत मराठी नाटक हे आपल्या अस्तित्वासाठी झुंजत होते. आपापल्या परीने नाट्यतंत्रात बदल करून क्वचित पाश्चात्य नाट्यतंत्राचा आधार घेऊन ते विकसित करून खेळरूपाने सुरू झालेले नाटक हे खऱ्या अर्थाने नाट्यसंहितेच्या अनुषंगाने कसे विकसित होऊन प्रयोगक्षम होईल या दिशेने सर्वांचे प्रयत्न होते. मराठी रंगभूमी ही खऱ्या अर्थाने १८८० नंतरच्या कालखंडात उदयाला आली. १८८० ते १९२० हा कालखंड मुख्यतः संगीत नाटकांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडाला मराठी नाटकांचे सुवर्णयुग असेही म्हटले जाते.
         

अण्णासाहेब किर्लोस्कर

अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी दिनांक २१ ऑक्टोबर १८८० साली संगीत शाकुंतल या नाटकाचा प्रयोग केला. या नाटकापासून खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला स्वतःची ओळख निर्माण करता आली. आणि ऐथूनच संगीत नाटकांची सुरुवात झाली. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी शंकर दिग्विजय, संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र इत्यादी नाटके रंगभूमीवर आणली. पहिले संगीत नाटककार म्हणून अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा उल्लेख केला जातो.

गोविंद बल्लाळ देवल


अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे शिष्य गोविंद बल्लाळ देवल यांनी अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाट्यतंत्राला अधिक प्रगत करून संगीत नाटकांना सामाजिकतेची डूब दिली. एक दिवसाची चुकामुक अथवा दुर्गा नाटक, विक्रमोर्वशीय, मृच्छकटिक, झुंजारराव, फाल्गुनराव अथवा तसबीरीचा घोटाळा याचेच पुढे संशयकल्लोळ, शाप संभ्रम, संगीत शारदा अशी नाटके देवलांनी लिहिली. दुर्गा नाटक हे देवलांचे पहिले रूपांतरित नाटक होय. इझाबेल या इंग्रजी नाटकाचे ते मराठी रूप होते. देवलांचे संगीत शारदा हे नाटक सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते यात त्यांनी बालाजरठ विवाह या समस्येचा विचार केलेला आहे.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजुष, मतीविकार, प्रेम शोधन, वधूपरीक्षा, सहचारिणी, परिवर्तन, जन्मरहस्य, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य, मायाविवाह अशी बारा नाटके कोल्हटकर यांनी आपल्या ती ३४ वर्षाच्या कारकीर्दीत लिहिली आणि रंगमंचावर आणली. कोल्हटकर यांच्या नाटकांचे विशेष असे की, त्यांनी मराठी नाट्यसृष्टीला कल्पनाप्रधान अशा स्वतंत्र नाटकांची देणगी दिली. अद्भुतता, नवलपूर्णता, पद्यांच्या नवीन उडत्या चाली, शब्दनिष्ठ विनोद आणि कृत्रिम कथा हे त्यांच्या नाटकाचे विशेष होय.

⭐कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी सवाई माधवरावाचा मृत्यू, कांचनगडाची मोहना, कीचकवध, बायकांचे बंड, भाऊबंदकी, प्रेमध्वज, संगीत मानापमान, संगीत विद्याहरण, सत्वपरीक्षा, संगीत स्वयंवर, संगीत द्रौपदी, संगीत मेनका, सवतीमत्सर, संगीत सावित्री, संगीत त्रिदंडी संन्यास इत्यादी नाटकांची निर्मिती केली. खाडीलकर हे राष्ट्रीय प्रवृत्तीचे नाटककार म्हणून ओळखले जातात. आपल्या नाटकांना इतिहासाचा संदर्भ देऊन वर्तमानाशी त्याची नाळ जोडणारे नाटककार ते आहेत. उदाहरण म्हणून कीचकध या त्यांच्या नाटकाचा उल्लेख करता येतो.
विवाशिरवाडकर


विवाशिरवाडकर यांनी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन केले आणि त्या नावानेच ते प्रसिद्धही झाले.  त्यांनी नाटके मात्र विवाशिरवाडकर या नावानेच लिहिली.  राजमुकुटदूरचे दिवेदुसरा पेशवाकौंतेयययाती आणि देवयानीनटसम्राटवीज म्हणाली धरतीलाचंद्र जिथे उगवत नाही इत्यादी त्यांची लोकप्रिय नाटके आहेतयातील ‘नटसम्राट’ या नाटकाने तर इतिहासच असलेला आहे याच नाटकासाठी त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला.


महेश एलकुंचवार

महेश एलकुंचवार साधारणपणे १९६५ नंतर लिखाण करणारे महत्त्वाचे नाटककार आहेतत्यांनी गार्बोवासनाकांडवाडा चिरेबंदीमग्न तळ्याकाठीयुगांत ही नाटके लिहिली आहेयातील वाडा चिरेबंदीमग्न तळ्याकाठी आणि युगांत या तीन नाटकांच्या संचाला आज मराठी प्रेक्षक नाट्यत्रयी म्हणून ओळखतो.


गो.पुदेशपांडे

गो.पुदेशपांडे यांची उध्वस्त धर्मशाळाअंधारयात्राविष्णूगुप्त चाणक्यसत्यशोधक ही लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाटके आहेतविचार प्रवर्तक नाटककार म्हणून देशपांडे यांचा उल्लेख होतो.


सतीश आळेकर 

सतीश आळेकर यांचे मिकी आणि मेमसाहेबमहानिर्वाणबेगम बर्वेमहापूर इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत. 


दलित रंगभूमी

१९७० ते ९० या दोन दशकात दलित साहित्याने आपली मुद्रा मराठी साहित्यावर नोंदवलीत्यातच दलित रंगभूमी ही आघाडीवर होतीयात प्रादत्ता भगतप्रेमानंद गज्वीसंजय पवाररामनाथ चव्हाणप्रकाश त्रिभुवन इत्यादी लेखकांनी महत्त्वाचे नाट्य लेखन केले आहे.

दत्ता भगत यांचे  वाटा पळवाटाखेळीया,जहाज फुटल आहे आणि इतर एकांकिकाअश्मक इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत. 

दत्ता भगत


प्रेमानंद गज्वी यांचे तनमाजोरीकिरवंतगांधी आंबेडकर इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत तर त्यांच्या ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेने महाराष्ट्रभर ख्याती मिळवलेली आहे. 

रामनाथ चव्हाण यांचे साक्षीपुरमबामणवाडा इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.

प्रकाश त्रिभुवन यांचं थांबा रामराज्य येतंय या नाटकानेही इतिहास घडवला.

संजय पवार यांचे कोण म्हणतं टक्का दिला ?’ हे एक प्रसिद्ध नाटक आहे.

 

सुरेश खरे

१९७०नंतर सुरेश खरे हे ही एक महत्त्वाचे नाटककार म्हणून उदयाला आले. त्यांनी काचेचा चंद्र, सखी शेजारीणी, मला उत्तर हवयं, पप्पा सांगा कुणाचे, असुनी नाथ मी अनाथ, मंतरलेली चैत्रवेल, संकेत मिलनाचा, एका घरात होती अशी सरस नाटके लिहिली सुरेश खरे यांच्या नाटकांनी कानेटकर, शिरवाडकर यांच्या नाटकांसोबतच प्रेक्षकांना रंगभूमीकडे खेचले.



⭐रत्नाकर मतकरी
या कालखंडात रत्नाकर मतकरी हे एक महत्त्वाचे नाव. मतकरी हे कथा, गुढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य, नाटक आणि बालनाट्य लिहिणारे यशस्वी लेखक आहेत. या कालखंडात त्यांचे आरण्यक, लोककथा ७८, अजून यौवनात मी, अश्वमेध, दुभंग, माझं काय चुकलं, कर्ता-करविता, खोल खोल पाणी, गांधी :अंतिम पर्व, ची. सौ. कां. चंपा गोवेकर, जादू तेरी नजर, जावई माझा भला, तनमन, प्रियतमा, बकासुर इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत. एक यशस्वी व्यावसायिक नाटककार म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. 

         पुढील काही लेखकांनी नाटके लिहून मराठी नाटकात विशेष योगदान दिलेले आहे. अनिल बर्वे (थँक्यू मिस्टर ग्लाड), शं.ना. नवरे (गहिरे रंग, गुलाम), विश्राम बेडेकर (टिळक आणि आगरकर),  प्रशांत दळवी (चारचौघी), अजित दळवी (शतखंड), राजीव नाईक (अखेरचं पर्व, या साठेचं काय करायचं?, जातक, ऐन वसंतात अर्ध्या रात्री), मकरंद साठे (चारशे कोटी विसरभोळे), अशोक पाटोळे (आई रिटायर होतेय), अशोक समेळ (कुसुम मनोहर लेले), देवेंद्र पेम (ऑल द बेस्ट), शेखर ताम्हणे (सविता दामोदर परांजपे), प्र.ल‌.मयेकर (अग्निपंख),  शफाअत खान (राहिले दूर घर माझे) इत्यादी नाटककारांनी १९९०च्या दशकात आणि त्यानंतरही दमदारपणे नाट्यलेखन केलेले आहे.

आज मराठीत नव्याने लिहिणारे अनेक नाटककार समर्थपणे नाटक लिहून रंगभूमीकडे प्रेक्षकांना खेचत आहेत. त्याशिवाय मराठी नाटकात, नाट्यसंहितेत विविध प्रयोग करून मराठी नाटकांना एक नवी दिशा देत आहेत. रिंगण नाट्य, न नाट्य असे विविध रंगमंचीय अविष्कार नाटकाच्या क्षेत्रात होत आहेत. मराठी नाटकांनी मराठी अभिरुची संपन्न केली हे खरे असले तरी एक निरीक्षण येथे नोंदवणे गरजेचे आहे ते असे की, मराठी नाटके ही कुटुंबाच्या पलीकडे गेलेली नाहीत. फार कमी आणि थोड्या नाटककारांनी सामाजिक आणि राजकीय जाणिवेची, गंभीर प्रश्नावर प्रकाश टाकणारी नाटके लिहिलेली आहेत. विनोदी आणि सुखात्मिका या मराठी नाटकांमध्ये प्रचंड प्रमाणात आढळतात. यात व्यावसायिक दृष्टिकोन असल्याने नाटकाचे निर्मिती मूल्य खर्च वसूल होण्यासाठी अशा पद्धतीची नाटके लिहिली जातात. कारण गंभीर प्रश्नावर चर्चा करणाऱ्या नाटकांकडे प्रेक्षक वळत नाही म्हणून असे नाटक लिहिणारे ही कमी असतात. किंबहुना व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवल्यामुळे त्यांच्या अशा नाटकांना प्रयोगापर्यंत पोहोचू ही दिले जात नाही. हे वास्तव नाकारता येणारे नाही.


टीप :

 १. कालखंडाला वैभवपर्व, आव्हानपर्व, विकासपर्व या प्रा. दत्ता भगत यांनी दिलेल्या संज्ञा वापरलेल्या आहेत.  

२. मराठी नाट्य इतिहासाचा मागोवा घेताना यात अनावधानाने काही नाटककार आणि गाजलेली नाटके राहून गेली आहेत याची मला कल्पना आहे. त्याशिवाय या इतिहासाचा वेध घेताना कामगार रंगभूमी, बालरंगभूमी यासंदर्भातही लिहावयाचे राहून गेलेले आहे. मराठी नाटकांच्या इतिहासाला कामगार रंगभूमी आणि बालरंगभूमी यांनीही महत्त्वाचे योगदान दिलेले आहे हे नाकारता येणारे नाही. या दोन्ही रंगभूमीवर स्वतंत्रपणे नाट्य लेखन करणारे अनेक नाटककार अजूनही दुर्लक्षित असून त्यांच्याही लेखनाचा वेध घेणे गरजेचे आहे. येथे शब्द मर्यादेमुळे हा वेध घेतला नसून लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये हा वेध घेण्यात येईल. महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनामधून आणि विविध स्पर्धांमधून एकांकिका ही सादर होत असतात. स्वतंत्रपणे एकांकिका लिहिणारे लेखकही आहेत त्यांचाही उल्लेख यात राहून गेलेला आहे. हे ही नम्रपणे नमूद करावे लागेल.

संजय पवार यांचे ‘कोण म्हणतं टक्का दिला ?’ हे एक प्रसिद्ध नाटक आहे.

 साभार - अक्षय किशोर घोरपडे यांच्या प्रज्ञेची मुळाक्षरे ब्लॉग वरून


1 टिप्पणी:

Akshay Kishor Ghorpade म्हणाले...

https://pradnyechimulakshar.blogspot.com/

टिप्पणी पोस्ट करा

सावित्रीबाई जोतिराव फुले - प्रज्ञा दया पवार यांच्या कवितेचा भावार्थ

सावित्रीबाई जोतिराव फुले - प्रज्ञा दया पवार यांच्या कवितेचा भावार्थ परिचय - प्रज्ञा दया पवार (जन्म १९६६) समकालीन मराठी साहित्यविश्वामधील अत्...