गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

शाहीर अनंत फंदी -परिचय

फटका

अनंत भवानीबावा घोलप

अनंत भवानीबावा घोलप ऊर्फ अनंत फंदी (शा.श. १६६६ / इ.स. १७४४ - शा.श. १७४१ / इ.स. १८१९) हे एक मराठीकवी, शाहीर होते.

जीवनसंपादन करा

अनंत फंदी हे संगमनेर येथे राहत होते. त्यांचे आडनाव घोलप असे होते. हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात होऊन गेले.
अनंत फंदींच्या आईचे नाव राऊबाई आणि पत्नीचे म्हाळसाबई. अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर यांनीं तमाशा आरंभिला व नंतर तमाशा सोडला. त्यांचे तमाशांतील साथी एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी.
अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. अनंत फंदींनी आठ लावण्या व काही पोवाडे रचले. त्यांची 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते[१]. शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडितशिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको
नास्तिकपणि तुं शिरुनि जनाचा बोल आपणा घेउ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहु नको
मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारमधि फसूं नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करु नको ॥ १ ॥

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा, झटू नको
मी मोठा शाहणा, धनाढ्यहि, गर्वभार हा वाहू नको
एकाहून चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको
हिमायतीच्या बळे गरिबगुरीबाला तू गुरकावू नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको
विडा पैजेचा उचलु नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको ॥ २ ॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करु नको
वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजिभाकरी, तूपसाखरे चोरू नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधिं विटू नको
असल्या गाठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आता तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकु नको
सुविचारा कातरू नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥ ३ ॥

कवी - अनंत फंदी
उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. अजूनही संगमनेर येथे दरवर्षी अनंत फंदी व्याख्यानमाला होत असते. अनंत फंदी यांचे आडनाव घोलप. हे यजुर्वेदी कौन्डिण्य गोत्री ब्राह्मण.
यांचे पूर्वजांचा धंदा गोंधळीपणाचा व सराफीचाही होता. अनंत फंदी यांनी लावण्या बर्या च केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर अनंत फंदी यांनी तमाशा पण केला. त्यांचे तमाशांतील साथी होते, एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. उतारवयात अहिल्याबाई होळकर सांगण्यावरून हे कीर्तन करू लागला, अशी आख्यायिका आहे.
अनंतफंदीस “फंदी” नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले’ अनंत फंदी यांचा ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजी बाळानी गौरव केला होता. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. याची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.
‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ या याचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. याने श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची प्रथम याच्यावर मर्जी होती. ‘रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते.
शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या याच्या काही लावण्या आहेत. मा.अनंत फंदी यांचा मुलगा सवाई फंदी हेही कवी व कीर्तनकार होते. अनंत फंदी यांचे निधन ३ नोव्हेंबर १८१९ रोजी झाले.
काही रचना अनंत फंदी यांच्या समाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणे/सांगणे, म्हणजे फटका. फटका काव्यप्रकाराचे जनक म्हणजे कवी अनंतफंदी! कवी अनंतफंदींच्या अनेक फटक्यांपैकी एक उपदेशपर फटका: बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलुं नको अंगि नम्रता सदा असावी राग कुणावर धरूं नको नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणां घेउं नको भली भलाई कर कांहीं पण अधर्ममार्गीं शिरूं नको मायबापांवर रुसूं नको दूर एकला बसूं नको व्यवहारामधिं फसूं नको कधीं रिकामा असूं नको परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठीं करूं नको संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको वर्म काढुनी शरमायाला उणें कुणाला बोलुं नको बुडवाया दुसर्यााचा ठेवा करुनी हेवा झटूं नको मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहुं नको एकाहुनि एक चढी जगामधि थोरपणाला मिरवुं नको हिमायतीच्या बळें गरिबगुरिबाला तूं गुरकावुं नको दो दिवसांची जाइल सत्ता अपयश माथां घेउं नको बहुत कर्जबाजारी हो‍उनि बोज आपुला दवडुं नको स्ने ह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहुं नको विडा पैजेचा उचलुं नको उणी तराजू तोलुं नको गहाण कुणाचें बुडवुं नको असल्यावर भिक मागुं नको नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरूं नको कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेचि चोरि नको दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढती पाहुं नको उगिच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठीं करूं नको बरी खुशामत शाहण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको आतां तुज ही गोष्ट सांगतों सत्कर्मा ओसरूं नको असल्या गांठीं धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटूं नको सुविचारा कातरूं नको सत्संगत अंतरूं नको द्वैताला अनुसरूं नको हरिभजना विस्मरूं नको गावयास अनंतफंददिचे फटके मागें सरूं नको सत्कीर्तिनौबदिचा डंका गाजे मग शंकाच नको.
अनंत फंदी यांच्या विषयी मा.होनाजी बाळानी एक कविता लिहिली आहे.
फंदी अनंद कवनाचा सागर । अजिंक ज्याचा हातखंडा ॥ चमत्कार चहूंकडे चालतो । सृष्टींवर ज्याचा झेंडा ॥धृ०॥ मूळ संगमनेर ठिकाण त्याचा । कीर्ति उदय जैसा अर्की ॥ नविन तर्हार नारळी डोयीला । पदर पागोटयाची फिर्की ॥ वाचावंत संपत्ती सारखी । बहुतांचें तनमन हारकी ॥ लांगे लुंगे कवि भेदरले । अवघ्यांवर त्याची गुर्की ॥ समोर गातां कोणी टिकेना । मनामधीं बसली कर्की ॥ धन ज्याचा हातचा मळ । केवळ तो रुपयांचा हांडा ॥च० ॥१॥ फंदी आनंदी छंदी वरदी । ब्राह्मण त्याव

मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

कृष्णाबाई नारायण सुर्वे- परिचय

लक्ष्मीबाई टिळक, आनंदीबाई शिर्के, पार्वतीबाई ठोंबरे, सुनीता देशपांडे, कमल पाध्ये, सुमा करंदीकर, यशोदा पाडगावकर, रागिणी पुंडलिक यांच्या सकस आत्मचरित्रांनी मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली. कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं 'मास्तरांची सावली' हे या समृद्ध परंपरेला अधिक श्रीमंत करणारं आत्मचरित्र.



कृष्णाबाई तळेकर यांचा जन्म गिरणगावातला. त्या वर्षसव्वावर्षाच्या असताना त्यांचे वडील वारले, आणि मग काही महिन्यांनंतर त्यांच्या आईने आत्महत्या केली. परळच्या मंगलदास चाळीत आजीनं कृष्णाबाईंना वाढवलं. घरी प्रचंड गरिबी. चारही काका व्यसनाधीन. वयाच्या आठव्या वर्षापासून धुणंभांडी, मजुरी करून कृष्णाबाई आजीला मदत करू लागल्या.
याच मंगलदास चाळीत तिसरी शिकलेला एक कम्युनिस्ट कार्यकर्ता राहत होता. वूलन मिलमध्ये काम करणार्‍या गंगाराम सुर्व्यांनी या मुलाला रस्त्यावरून उचलून आणलं होतं. या बाळगलेल्या मुलाला त्यांनी आपलं नाव दिलं. नारायण गंगाराम सुर्वे.
नारायण सुर्वे कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते होते. पत्रकं वाटणं, घोषणा देणं, प्रचारसभांत भाषणं देणं ही सततची कामं. सुर्वे स्वतः तिसरी शिकले असले तरी कामगारांच्या प्रौढ साक्षरता वर्गांत शिकवत. उत्तम भाषणं करत. 'मास्तरासारखा बोलतो जणू', असं कौतुकानं सारे म्हणत. गिरणगावात मग गंगाराम सुर्व्यांचा हा मुलगा सुर्वे मास्तर या नावानं ओळखला जाऊ लागला.
नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई तळेकरांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हा कृष्णाबाईंच्या घरातून विरोध झाला. दोघांच्या वयांत सातआठ वर्षांचं अंतर. शिवाय नारायण सुर्व्यांच्या जातीचा पत्ता नाही. कृष्णाबाईंनी घरातून पळून जाऊन नायगावच्या कोर्टात नारायण सुर्व्यांशी लग्न केलं. 'मनात प्रेम आहे, मग काळी पोत गळ्यात का बांधायची?' असा प्रश्न पडूनही बुधाजी गोडघाटे या सुर्व्यांच्या मित्रानं दिलेली काळी पोत कृष्णाबाईंनी गळ्यात घातली.
लग्नानंतर राहायला जागा नव्हतीच. कधी फूटपाथ, कधी कुठल्याशा झोपडपट्टीतली किंवा चाळीतली घाणीनं बरबटलेली अंधारी खोली. नारायण सुर्वे एका शाळेत शिपायाची नोकरी करत. कृष्णाबाईही एका शाळेत शिपाईण म्हणून नोकरीला लागल्या.
नारायण सुर्वे पुढे कवी म्हणून नावाजले गेले. 'ऐसा गा मी ब्रह्म', 'माझे विद्यापीठ' हे संग्रह रसिकांनी डोक्यावर घेतले. पद्मश्री, जनस्थान पारितोषिक, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद असे अनेक सन्मान सुर्व्यांना मिळाले. कृष्णाबाई शिपाईण म्हणूनच साठाव्या वर्षी निवृत्त झाल्या. नारायण सुर्व्यांनी नवे विचार मांडले. समानता, तत्त्वनिष्ठा वगैरे मूल्यांचा पुरस्कार केला. मास्तरांच्या सावलीतून बाहेर न येता कृष्णाबाई शांतपणे ही मूल्यं जगल्या. तत्त्वनिष्ठ असणं सोपं नसतं. स्वीकारलेल्या मूल्यांशी बांधिलकी राखणं भल्याभल्यांना जमत नाही. पोटाचा प्रश्न उभा राहिला की तत्त्वनिष्ठ असणं कमी महत्त्वाचं ठरतंच. सुर्वे मास्तरांना मात्र आयुष्यभर मूल्यांशी इमान राखता आलं कारण कृष्णाबाईंची तत्त्वनिष्ठाच तितकी प्रखर होती. म्हणूनच सुर्व्यांना पद्मश्री मिळाल्यावर मुख्याध्यापकांनी बसायला दिलेली खुर्ची नाकारणार्‍या, 'मुलांची शीशू स्वच्छ करायचा मला पगार मिळतो. माझा नवरा कवी असला तरी तो तिकडे स्टेजवर. घरी तो माझा नवरा आणि शाळेत मी शिपाईण. कवीची बायको नाही. माझी ड्युटी मी इमानेइतबारे करणार कारण मी या मुलांच्या जीवावर पगार घेते', असं सुनावणार्‍या, मुलाच्या लग्नात शाळेची खाकी साडी नेसणार्‍या, 'मास्तर गेल्यावर त्यांचे शेवटचे सर्व विधी मीच करणार', असं सांगणार्‍या कृष्णाबाई 'माझ्या मास्तरांना मी घडवलं' असं सांगतात तेव्हा ते अजिबात खोटं वाटत नाही.
कुठल्याशा अंधार्‍या चाळीत राहणारे नारायण गंगाराम सुर्वे संपूर्ण भारतात महाकवी म्हणून ओळखले गेले ते कृष्णाबाईंमुळे. मास्तरांच्या जोडीनं कृष्णाबाई झणझणीत जगल्या. आलेल्या संकटांना सामोर्‍या गेल्या. मुलांची व्यसनं, तरुण मुलाचा मृत्यू हे आघात पचवले. मास्तरांना खचू दिलं नाही. मास्तरांना मोठं केलं. मास्तरांना मोठं करताना स्वतःसुद्धा खूप मोठ्या झाल्या.
कृष्णाबाई मास्तरांना उद्देशून लिहितात, 'शेवटी मृत्यू हा अटळच आहे, पण तो असा आजारीरुपात येऊ नये, आनंदात हसत हसत यावा. तुम्हांलाही आणि मलाही. म्हणूनच फक्त तुम्हांला ज्या गोष्टींत आनंद मिळतोय त्या गोष्टी मीही आनंदानं करीन. कारण मला पैसा, दौलत काहीच नकोय. फक्त माझ्या मास्तरांचं कर्तृत्व त्यांच्या मागेही समाजात राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. बाकी मी तुमच्यासोबतच तुमची सावली म्हणूनच राहणार, आणि तुमचीही सावली माझ्यावर सतत राहू दे. बाकी मला काहीही नको.'
म्हणूनच गेल्या आठवड्यात सुर्वे मास्तर गेल्याची बातमी कळल्यावर सुर्व्यांच्या कवितांआधी आठवल्या त्या कृष्णाबाई...
कृष्णाबाई नारायण सुर्वे यांच्या 'मास्तरांची सावली' या आत्मचरित्रातली ही काही पानं...
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Mastaranchi-Savali.html
mastar 010.jpg
रवी सहावीला असताना मास्तर अनेकदा त्याला घरी कविता शिकवायचे. त्यांचं वाचन अफाट असल्यामुळे आणि कवितेची विशेष आवड असल्यामुळे ते कविता, इतिहास छान शिकवायचे. माझ्या मनात यायचं, मास्तर फक्त तिसरीच शिकलेत तरीही ते सहावीच्या मुलाला इतकं छान शिकवतात. मग ते स्वत:च मास्तर का होत नाहीत? म्हणून एक दिवस मी त्यांना विचारलं, " मास्तर, शिक्षणाची किती डिग्री असते हो?''
''अगं, खूप असते. शिकावं तितकं थोडंच आहे किशा!''
''मग तुम्ही का शिकत नाही मास्तर? आता आपला रवीसुध्दा सातवीला गेला. दोघं मिळून एकत्र परीक्षा द्या ना! तुमचं वाचन, लेखन भरपूर आहे. तुम्हाला काही कठीण जाणार नाही. ''
मास्तर जरा लाजतच होते, कारण वर्गात सगळी लहान लहान मुलं आणि मास्तर म्हणजे चार मुलांचे बाप. मी त्यांना म्हटलं, '' मास्तर, लाज ठेवायची खिशात आणि बसायचं वर्गात. आपल्याला काहीतरी घडवायचंय ना! मग लाजून कसं चालेल?" मास्तरांनी मनावर घेतलं. नेटाने अभ्यास सुरू केला आणि दोघेही बापलेक सातवी पास झाले.
आज मी विचार करते, 'कृष्णाबाई, इतकं नवर्‍याला तू शिकायला सांगितलंस. पण स्वतः का नाही शिकलीस?' कधीकधी खंत वाटते, वाईटही वाटतं, पण त्यावेळची परिस्थितीच अशी होती की वावच नव्हता मला. हे घरात नसायचे, घरातली सगळी कामं, मुलांची दुखणीखुपणी, माझी नोकरी, या सगळ्यांत वेळ कसा जायचा कळायचंच नाही. आणि त्यात कधी अक्षरं गिरवायला बसले की मुलांचा कालवा, कोण पाठीवर येऊन बसतंय, अंगाशी खेटतय, असं असायचं. मग कसला होतोय अभ्यास? जेमतेम सही करायला शिकले हेच खूप होतं. आणि माझं मनही म्हणायचं, 'कृष्णाबाई, तू शिकली नाहीस म्हणून काही संसार अडणार आहे का तुझा? फक्त व्यवहार अडेल, पण बाहेरचा व्यवहार तर मास्तरच बघताहेत सगळा. आणि दोघंही शिकत राहिलात तर घर कुणी पाहायचं?' त्यामुळे मीच फारसं मनावर घेतलं नाही. आणि राहूनच गेलं शिकायचं. पण बापलेक दोघंही सातवी पास झाले याचा मनोमन मला आनंद झाला होता. मी मास्तरांना म्हटलं, "मास्तर आता इथेच थांबायचं नाही. जितकं पुढं जाता येईल तितके पुढं जा. घरची काळजी करु नका."
मास्तरांच्या शाळेत एक मुसलमान शिपाई होता. त्याच्याकडून ते उर्दू लिहायला आणि वाचायलाही शिकले. पुढे या उर्दू भाषेचा त्यांना खूपच उपयोग झाला.
मास्तर सातवी पास म्हणजे व्ह.फा. झाल्यानंतर शिरोडकर हायस्कूलला गेले. तिथे प्राथमिक शिक्षक सनद (पी.टी.सी.)चे म्हणजेच आत्ताचे डी. एड. म्हणतात ना, ते कोर्स चालायचे. सातवी पास झालेल्यांना त्यात प्रवेश मिळायचा, पण हा कोर्स पूर्णवेळ होता. नोकरी करुन तो करता येत नव्हता. म्हणजे तसा नियमच होता, पण मास्तर तर नोकरी करत होते. आणि वर्षभर रजा घेऊन किंवा नोकरी सोडून कोर्सला जाणं शक्यच नव्हतं, परवडणारंही नव्हतं आम्हांला. सगळी तारेवरची कसरत होती, पण मास्तरही धडपड्या स्वभावाचे होते. ते सरळ शिरोडकर हायस्कूलच्या प्राचार्यांना, वा. धों. कुलकर्णींना भेटले. ते स्वतःही कम्युनिस्ट विचारांचे होते, त्यामुळे त्यांनी मास्तरांना पी.टी.सी.ला प्रवेश दिला. सर्वच बाबतीत सहकार्य दिलं. मास्तर तेव्हा एल्फिन्स्टन पुलाजवळच्या शाळेत होते. मुद्दामहून त्यांनी सकाळचं अधिवेशन घेतलं होतं. एक वाजता शाळा सुटली की धावतपळत परळच्या शिरोडकर हायस्कूलला पोचायचे. शाळेतल्या मंडळींनीही 'शिपाई असून शिकतोय' म्हणून सहकार्य दिलं होतं. घरातल्या जबाबदारीतून तर मी त्यांना मुक्तच केलं होतं. सांगते काय, इतकं शिक्षण घ्यायला मी त्यांना प्रवृत्त केलं, पण घरातल्या कोणत्याच साध्या साध्या गोष्टीही मी त्यांना शिकवल्या नाहीत. ती माझ्याकडून झालेली चूकच म्हणावी लागेल. म्हणून तर साध्या चहासाठीही त्यांना दुसर्‍यावर अवलंबून राहावं लागतं, पण सतत बाहेरची कामं केल्यामुळे बाहेरचे व्यवहार छान जमतात. बाजारहाट करणं, खरेदीचे व्यवहार त्यांना छान जमतात. तर असं सगळं करत मास्तर शिकत होते, घडत होते. दुपारी १ ते संध्याकाळपर्यंत 'टीचर्स ट्रेनिंग'च्या वर्गाला बसायचं. वर्ग सुटले की तिथेच थोडा वेळ वाचायचं, अभ्यास करायचा. कारण घरात कुठला इतका निवांतपणा मिळायला? रात्री उशिराच यायचे घरी. कधीतरी मुलांना शिकवूनच 'लेसन'ची की कसली तयारी करायचे. त्या बाबतीत मास्तरांचा हातखंडाच होता. दिवसभर नोकरी आणि रात्रीचा दोनतीन तास अभ्यास असं करुन मास्तर एकसष्ट टक्के मिळवून पी.टी.सी. परीक्षा पास झाले. माझे मस्तर खरेच 'शाळामास्तर' झाले. गमतीजमतीत मी त्यांना आधीपासून 'मास्तर' म्हटलं होतं, पण खरोखरच स्वतःच्या बळावर, कष्टावर ते खरेखुरे मास्तर झाले याचा मला खूपच आनंद झाला होता, पण खरं सांगू? मला ते कौतुक बिवतुक काही करता येत नाही, कसं करायचं तेही कळायचं नाही. फक्त मास्तरांना म्हटलं, "इथवर मजल गाठलीत, आता थांबू नका. जितकं पुढे जाता येईल तितके पुढे जा."
मास्तरांचा कोर्सचा खर्च, रवीची शाळा, त्याचं पुढचं शिक्षण, घरातला खर्च या सगळ्या खर्चाची हाततोंड मिळवणी करता करता जीव थकून जायचा. रवीलाही आठवीसाठी चांगल्या शाळेत घालायचं होतं. मला मुलालाही शिकलेलं पाहायचं होतं आणि त्याच्या बापालाही शिकलेलं पाहायचं होतं, पण काय करावं कळत नव्हतं. त्या वेळी शिरीष पै धावून आल्या. आचार्य अत्रे आणि त्यांची मुलगी शिरीष पै, दोघांचाही मास्तरांवर प्रचंड जीव होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मास्तरही उतरले होते ना! आणि एक कवी म्हणूनही अत्र्यांना आणि शिरीषताईंना मास्तर आवडत होते. शिरीषताई स्वतःहूनच म्हणाल्या, "वैनी, तुम्ही काळजी करु नका. रवीच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च मी करते. मी दरमहा त्याला पंचवीस रुपये देत जाईन." खरं तर आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च दुसर्‍यांनी करावा हे मनाला पटत नव्हतं, पण काय करणार! नाईलाज होता. रवी अगदी कॉलेजला जाईपर्यंत शिरीष पैंनी त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला. बोगद्याच्या चाळीत शिरीषताई आणि वासंती मुजुमदार अनेकदा खास माझ्याशी गप्पा मारायला म्हणून यायच्या. एवढ्या मोठ्या माणसाची मोठी साहित्यिक मुलगी, पण अजिबात गर्व नव्हता. खूप प्रेमाने वागायच्या त्या. मास्तर 'मास्तर' झाले याचा अत्र्यांना, शिरीषताईंना आणि इतर अनेकांना खूपच आनंद झाला होता. अगदी कपिला खांडवाला मॅडमनासुद्धा. त्यांनी तर लगेचच 'शिक्षक' म्हणून रुजू होण्याचा आदेशही दिला.
एक गंमतच होती ती. शाळेत तळमजल्याला मी 'शिपाईण' होते आणि वरच्या मजल्यावर हे 'मास्तर' आणि आमची मुलं 'विद्यार्थी'.
मास्तर नायगावच्या शाळेत 'शिक्षक' म्हणून रुजू झाले तेव्हाचे अनुभव फारच कटू होते. कारण अगदी कालपरवापर्यंत हा माणूस 'शिपाई' होता. आता त्याला एकदम 'अहो गुरुजी' किंवा 'अहो मास्तर' कसं म्हणायचं? असा प्रश्न शाळेतल्या अनेक शिक्षकांच्या चेहर्‍यावर दिसायचा. एक शिपाई तो कसला मास्तर म्हणून शिकवणार पोरांना? असा प्रश्नही अनेकांच्या मनात असायचा. पण माझी खात्री होती. याच मंडळींनी वर्गातल्या मास्तरांचा एक तास जरी ऐकला तरी चाट पडतील, असं मला मनोमन वाटत होतं, पण नुसतं मला वाटून काय होणार होतं?
पहिल्याच दिवशी, मास्तर शाळेत रुजू झाले, तेव्हा त्यांना मुद्दामहून नापास मुलांचा वर्ग देण्यात आला होता. का? तर चांगलं शिकवेल न शिकवेल. जवळजवळ पंधरा दिवस मास्तरांना नापास मुलांच्याच वर्गावर पाठवत होते, पण मास्तरांनी पास-नापास असा भेदभाव केला नाही. आनंदाने शिकवलं. त्या वर्गातल्या मुलांनीही हेडमास्तरांना 'नवे गुरुजी' चांगले आहेत, असं सांगितलं असावं किंवा हेडमास्तरांनी तशी 'चौकशी' केली असावी. नंतर हेडमास्तरांनी 'ह्यांना' बोलावून घेतलं तर त्यांनी तिथेही भाषणबाजी केली बहुधा- 'आज शिक्षणाची गरज का आहे, कशी आहे?' वगैरे वगैरे बोलले. आणि एक दिवस गुपचूप हेडमास्तरांनीही ह्यांचं वर्गातलं शिकवणं वगैरे ऐकलं आणि नंतर सन्मानाने वागणूक दिली. पण सुरुवातीच्या दिवसात मास्तरांना इतर शिक्षकांकडून जे कटू अनुभव विशेषतः जातीपातीवरून आले त्याने मास्तर व्यथित व्हायचे. मला म्हणायचे, "किशा, शिक्षक म्हणून मिरवणारी माणसं सुशिक्षित असतील; पण सुसंस्कृत असतीलच असं नाही."
मी म्हणायची, "जाऊ द्या मास्तर. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. त्याचं योग्य फळ आपल्याला मिळेलच."
आपले पप्पा 'मास्तर', 'गुरुजी' झाले म्हणून मुलंही खूष होती. सगळं कुटुंबच एका शाळेत असल्यामुळे अनेक गमतीजमती व्हायच्या. एकदा काय झालं, शाळेच्या मधल्या सुट्टीत मी काहीतरी करत बसले होते. माझी शाळा तळमजल्यावर गुजराती मीडियम आणि ह्यांची पहिल्या मजल्यावर मराठी मीडियम. शाळेत असताना मी ह्यांच्याशी बोलणं शक्यतो टाळायची. 'उगाच कशाला लोकांना दाखवा आम्ही नवराबायको आहोत ते!' असं मला आपलं वाटायचं. तर हे जिन्यात उभे होते, मला हाक मारून हे म्हणाले कसे, "ओ कृष्णाबाई, बरंय ना तुमचं?" स्वभावच ह्यांचा चेष्टामस्करी करायचा आणि मला कामाच्या ठिकाणी चेष्टा केलेली अजिबात आवडायची नाही. मी लगेच त्यांना हटकलं, "मास्तर, हे घर नाहीये तुमचं. ही शाळा आहे, याचं जरा भान ठेवा. नाहीतरी घरी माझ्याशी गाठ आहे."
"अरे हो मी विसरूनच गेलो. मागेही एकदा तू मला असं सांगितलं होतंस. विसरलोच मी, पुन्हा असं करणार नाही," असं बापुडवाणे होऊन ते बोलले आणि मलाच मग वाईट वाटलं. 'उगीचच बोलले मी त्यांना' असं मनात आलं. मुलींनाही बजावलं होतं, शाळेत सारखं आईपप्पा करायचं नाही. तुम्ही विद्यार्थी आहात. आणि ते तुमचे गुरुजी, तेव्हा त्यांना गुरुजीच म्हणायचं. माझ्या कल्पनाला तर ते वर्गशिक्षकच होते. शाळेत जरा काही बिनसलं की ही आपली पपा-पपा करायची. एकदा काहीतरी आईसफ्रूटसाठी ती त्यांच्याकडे पैसे मागत होती. सारखं आपलं वरखाली जा-ये चाललं होतं. घरी आल्यावर तिला चांगलंच सुनावलं, "तू शाळेत शिकायला जाते, की पप्पा पप्पा करायला? आज तू त्यांना पप्पा म्हटलंस, उद्या दुसरी मुलंही तुझं बघून त्यांना पप्पा म्हणतील किंवा चेष्टा करतील. चालेल तुला? ते शाळेत तुझे गुरुजी आहेत आणि तू त्यांची विद्यार्थिनी. पप्पाटप्पा काय ते घरी. जे काही खाण्यापिण्याचे हट्ट करायचे असतील ते घरी. शाळेत नाही, कळलं?" आपल्याला कुणी हसायला नको, कुणी आपल्याकडे बोट दाखवायला नको, याची मी सतत काळजी घेत असे.
शाळेची अनेकदा ट्रिप जायची. मी ह्यांच्यासोबत मुलांना पाठवायची, पण मी जायची नाही. उगीच कुणी नावं ठेवायला नकोत. 'बरंय, आईस, बापूस, पोरं दुशीकडून दोन हातांनी चापतायत आपलं', असलं काहीबाही कुणी बोलायला नको म्हणून काहीतरी कारण सांगून जाणं टाळायची. कधी कधी असंही होतं, बाहेरच्या वातावरणात गेलं की माणूस मोकळा होतो. त्याच्या वागण्याबोलण्यात सैलपणा येतो. नवरा-बायको म्हटल्यावर इतरही काहीतरी चेष्टा करणार. पिकनिकच्या मोकळ्या वातावरणात मर्यादा ही राखल्या पाहिजेत, म्हणजे आपल्यालाही कमीपणा यायला नको आणि आपल्या माणसालाही, याची मी काळजीपूर्वक खबरदारी घेत असे. पिकनिका आयुष्यभर होतील, पण एकदा का तुमचं नाव धुळीला मिळालं की पुन्हा ते मिळवणं सोपं नाही, याचं भान मला असायचं. म्हणूनच चारचौघांत पटकन मिसळायला माझं मन कचरतं, अजूनही.
सततची आंदोलनं, मोर्चे, संप, धरणी अशा वातावरणात मास्तर घरात कमीच असायचे आणि रात्री आले की वाचत बसायचे, नाहीतर लिहीत बसायचे. खूप कविता करायचे. मला काही वाचता येत नसे, पण मास्तरांनी काहीतरी लिहिलंय म्हणून ते कागद जपून ठेवायची उशीखाली. गादीखाली. शर्टपॅंटच्या खिशात अनेक चिटोरे, कागद सापडायचे. मी ते व्यवस्थित ठेवून द्यायचे, पण मास्तर कधी विचारायचे नाहीत, ’माझे कागद कुठे आहेत?’ त्यांना माहीत असायचं ’ही’ व्यवस्थित जपून ठेवणार आणि मास्तर तसे एकपाठी असायचे. कविता लिहून झाली की त्यांच्या डोक्यात फीट बसायची. विसरायचे नाहीत ते. मला याचं खूप कौतुक वाटायचं.
बर्‍याच दिवसांपासून आपल्या कवितांचा काव्यसंग्रह काढावा असं मास्तरांच्या मनात होतं, पण जमत नव्हतं. एकदा संध्याकाळी मास्तर घरी आले. गप्प गप्पच होते. म्हटलं, "काय झालं मास्तर?" तर म्हणाले, "काही नाही ग, माझ्या कवितांचं पुस्तक काढायचं मनात आहे."
"काढा ना मग!" मी म्हटलं, पण पुस्तक काढतात म्हणजे काय ते मला ठाऊक नव्हतं. आणि त्यासाठी पैसे लागतात हेही माहीत नव्हतं.
"किशा, पुस्तक काढायचं म्हणजे खायची गोष्ट नाही. पैसे नकोत का त्यासाठी?"
"एवढंच ना! होईल सोय." असं मी म्हटलं आणि माझ्या गळ्यातला मंगळसूत्राचा एक सर त्यांच्या हातात ठेवला. तोही माझ्या काकांनी माझ्या चुलतभावांकडून माझ्यासाठी पाठवला होता. तेवढा एकच दागिना माहेरचा होता माझ्याकडे. बुगड्या तर पहिल्या बाळंतपणातच विकल्या होत्या. मनात म्हटलं, ’कृष्णाबाई, मंगळसूत्र तू केव्हाही करू शकशील नंतर, पण मास्तरांचा काव्यसंग्रह पुढे ढकलून चालणार नाही. त्यांना पुढं जाऊ दे.’
माझं मंगळसूत्र विकून पुस्तकं काढणं मास्तरांना पटत नव्हतं, पण मी त्यांना म्हटलं, "मास्तर, मंगळसूत्र गहाण टाकून कितीसे पैसे मिळणार? त्यापेक्षा ते विकून टाकलं तर बर्‍यापैकी पैसे येतील. त्यात नक्कीच पुस्तक काढता येईल."
मंगळसूत्र विकून पाचशे रुपये आले आणि त्या पैशातून मास्तरांचा पहिला काव्यसंग्रह ’ऐसा गा मी ब्रह्म’ अभिनव प्रकाशनातर्फे वा. वि. भट यांनी १९६२ला प्रकाशित केला. मला आपलं दडपणच होतं. त्यामुळे मास्तरांच्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असूनही गेले नाही. मनातून खूप आनंद झाला होता, पण मन म्हणत होतं, ’कृष्णाबाई, तुझे मास्तर खूप मोठे होतायत. त्या सोहळ्याला खूप मोठी मोठी माणसं येणार. तू अडाणी बाई तिथे जाऊन काय करणार? तू तिथे शोभणार नाहीस आणि पोराबाळांचं लेंढार घेऊन कुठे जातेस?’ मास्तर खूप खुशीत होते आणि मास्तरांचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून मीही खुशीत होते.
१९६२ साली ’ऐसा गा मी ब्रह्म’ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि १९६३ला त्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला. हजार रुपयांचा पुरस्कार होता. त्या सोहळ्यालाही मी गेले नाही. मनातला संकोच; दुसरं काय? आता वाटतं, त्या त्या वेळी आपण जायला हवं होतं. घरातले कुणीच जात नव्हते त्यांच्यासोबत सोहळ्याला. मास्तरांना काय वाटलं असेल तेव्हा? हा विचार मी आत्ता करते, पण त्यावेळी मी मुलाबाळांच्या संगोपनातच अधिक लक्ष घातलं. तर, हजार रुपये मिळणार म्हणजे नेमके किती? आणि ते आणायचे कसे? याचं मला टेन्शन होतं. मी आमच्या शेजारणीला शेंडेबाईंना म्हटलं, "तुम्ही जा." कारण ती म्युन्सिपाल्टीत हेडक्लार्क होती. शिकलेली होती म्हणून तिला म्हटलं, "तुमच्या घरातलं पाणी वगैरे संध्याकाळी मी भरते, बाकीची कामंही करते. तुम्ही जा मास्तरांसोबत. आणि एक पिशवी धुवून ठेवलीय. ती न्या. एवढे पैसे आणणार कशातून? मी आले असते, पण ती पैशांची पिशवी कुठे पडलीबिडली तर ’दुष्काळात तेरावा महिना.’ तुम्ही जा. मी वाट पाहते, लवकर या." तिला माझ्या बोलण्याचं हसूच आलं.
संध्याकाळी मास्तर आले. खूपच आनंदात होते. हजारांचा चेक मी प्रथमच पाहिला आणि माझ्या वेडगळपणाचं मलाही हसू आलं. काही दिवसांनी त्याच पैशातून मास्तरांनी मला चौदा कॅरेट सोन्याचं मंगळसूत्र आणि कुडी आणली. माझ्यासाठी ती अमूल्य भेट होती, कारण जवळजवळ वर्षभर मी मंगळसूत्रच घातलं नव्हतं. चाळीतल्या बायका खूप टोमणे मारायच्या. मी गळ्यात मंगळसूत्र घालत नव्हते. कपाळाला टिकली लावत होते. तीसुद्धा कधी लावली तर लावली नाहीतर नाही. ’सुर्वेबाई आता फॅशन करायला लागल्या’ असं काही बायका म्हणायच्या, पण मंगळसूत्र आणि कुंकू लावलं म्हणजे झालं? मनातल्या भावना नि श्रद्धा महत्त्वाच्या नाहीत का? पण मी काहीही उत्तर द्यायची नाही. नंतरही मास्तरांच्या अनेक पुस्तकांचं प्रकाशन झालं. पुरस्कार मिळाले, पण घरातला श्रीरंग वगळता कुणीच जात नव्हतं. श्रीरंगला पप्पांच्या कर्तृत्वाचं कौतुक वाटायचं. पण का कुणास ठाऊक, मला वाटायचं, मी गेले तर सर्व मंडळी मास्तरांनाच हसतील म्हणून मी जात नव्हते. मास्तरांनीही कधी फारसा आग्रह धरला नाही येण्याबाबत.
मुलांची शिक्षणं एकीकडे चालू होती. कल्पनाचा घरातल्या कामांना खूप हातभार लागत होता. ती सातवीत असल्यापासूनच घरातली सगळी कामं हौसेने करीत होती. कविताला मात्र घरकामाची विशेष आवड नव्हती. रवीची एस.एस.सी. झाली. आणि मास्तरांचा एक मित्र प्रा. डॉ. एस.एस. भोसले (संभाजी भोसले) कोल्हापूरला असायचा. त्याला मूलबाळ काहीच नव्हतं. तो म्हणाला, मी रवीला कोल्हापूरला नेतो. मास्तरही तयार झाले आणि रवीही. मला मात्र आपल्या पोराने दुसर्‍याच्या दारात राहून शिकणं पटत नव्हतं, पण मास्तरांनी माझी समजूत काढली, "कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी चांगली आहे, रवीला चांगलं शिक्षण मिळेल तिथे." शेवटी रवी कोल्हापूरला गेला शिक्षणाला. अधूनमधून सुट्टीत राहायला यायचा, पण तो तसा दुरावल्यासारखाच वाटत होता मला. कल्पना, श्रीरंगचं, कविताचं शालेय शिक्षण संपत आलं होतं. बोगद्याच्या चाळीतली खोली अपुरी पडत होती. पुन्हा नव्या जागेत राहायला जायचे विचार मनात घोळू लागले होते.
***
मास्तरांची सावली
कृष्णाबाई नारायण सुर्वे

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

मानवा उद्योग अनेक आहेत || बार्‍यावाईटांत || काळ जातो ||१||
आपहितासाठी उद्योग करीती || मार्ग दावीताती || संतानास ||२||
त्यांपैकी आळशी दुष्ट दुराचारी | जन वैरी करी || सर्व काळ ||३||
जसा ज्याचा धंदा तशी फळे येती || सुखदुःखी होती || जोती म्हणे ||४||
(२)
सत्य उद्योगाने रोग लया जाती || प्रकृती ती होती || बळकटा ||१||
उल्हासीस मन झटे उद्योगास || भोगी संपत्तीस || सर्वकाळ ||२||
सदाचार सौ

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली
27 फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण सारे "मराठी भाषा' दिन म्हणून साजरा करतो. मराठीला दुसरे ज्ञानपीठ मिळवून देणारे कुसुमाग्रज हे महान कवी या मातीत जन्मले हेही आपले भाग्यच होय. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हटलं की, "उठा, उठा चिऊताई'पासून "ओळखलंत का सर मला'पर्यंतच्या पाठ्यपुस्तकातील कविता आठवतात, तशाच पृथ्वीचे प्रेमगीत, स्वप्नांची समाप्ती, अहिनकुल, गर्जा जयजयकार अशा त्यांच्या अजरामर कविता आठवतात, पण मराठी भाषादिनाच्या निमित्ताने विचार करू लागलो की, "पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडोनी वाट वाकडी धरू नका, ' हा त्यांचा फटका आठवतो. मराठी भाषेची झालेली दैन्यावस्था कुसुमाग्रजांनी या फटक्यातून मांडली. शासनाने त्या कवितेची पोस्टर बनविली. शिधावाटप पत्रिकेवर त्यातल्या काही ओळी छापल्या आणि कर्तव्यपूर्तीचा श्वास घेतला. पण मराठीचे दशावतार संपले नाहीत. संपण्याची चिन्हे नाहीत. मराठी कवींनी मराठी भाषेबद्दल वेळोवेळी रचना केल्या आहेत. त्यातून मराठीचा अभिमान तर व्यक्त होतोच, पण काळजीही व्यक्त होते. मराठीचा आवाज सतत वाजता ठेवण्याचं काम मराठी कवींनी सातत्याने 700-800 वर्षे केले आहे. आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण या आवाजाचा वेध घेऊ या.
मराठीची काव्य परंपरा साधारणतः ज्ञानेश्वरांपासून मानली जाते. मराठी कवितेचा भक्कम पाया ज्ञानेश्वरांनी रचला. त्या भक्कम पायावर आज मराठीची परंपरा उभी आहे. संत ज्ञानेश्वर मराठीची थोरवी सांगताना लिहितात-
जैसी दीपांमाझि दिवटी। का तिथी माझि पूर्णिमा गोमटी।
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी। सर्वोत्तम।।
तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी। भाषांमध्ये तैशी।
मऱ्हाटी शोभिवंत।।
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील ओळी तर सर्वश्रुतच आहेत-
माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐसी अक्षरें रसिकें। मेळवीन।।
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर होऊन गेलेल्या संत एकनाथांच्या काळात संस्कृत भाषेचा वृथा अभिमान धरून पंडित प्राकृत भाषेस कमी लेखत होते. त्यांना थेट सवाल करताना एकनाथ महाराज लिहितात-
संस्कृतवाणी देवें केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली?
मराठी भाषेचा अभिमान असा थेट व्यक्त करून एकनाथ महाराजांनी मराठीत विपुल रचना केली. प्रौढ मराठीत तरी केलीच, पण लोकभाषेत भारूडे रचून मराठीला एक नावाच डौल प्राप्त करून दिला.
आज मराठीची प्रामुख्याने इंग्रजीशी तुलना होते. अशी तुलना करताना तुमच्या इंग्रजीत काका आणि मामाला एकच शब्द अंकल आणि काकी आणि मावशीलाही एकच आण्टी शब्द अशी टीका केली जाते. इंग्रजीची शब्दसंपत्ती अमाप आहे. तरी तिच्यातील नेमकी वैगुण्ये हेरून मराठी अभिमानी तिला कमी लेखून आपला अभिमान व्यक्त करतो. संस्कृताचा जोर होता तेव्हा दासोपंतांनी संस्कृताचे असेच वैगुण्य नेमके ओळखून मराठीचा आपला अभिमान व्यक्त केला आहे. तुमच्या संस्कृतात नुसता "घट'. पण आमच्या मराठीत त्याच्या नाना रूपांना नाना शब्द आहेत, हे सांगताना दासोपंत लिहितात-
संस्कृतें घट म्हणती। आतां तयाचे भेद किती
कवणा घटाची प्राप्ति। पावावी तेणें?
हारा, डेरा, रांजणु। मुठा, पडगा, आनु।
सुगडतौली, सुजाणु। कैसी बोलैल?
घडी, घागडी, घडौली। अलंदे वांचिकें वौळीं।
चिटकी, मोरवा, पातली। सांजवणें तें।।
ऐंसे प्रतिभाषे वेगळाले। घट असती नामाथिले।
एकें संस्कृतें सर्व कळे। ऐसें कैसेन?
आज मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. ती राजभाषा नव्हती तेव्हा कवी माधव ज्युलियन यांनी लिहिलेली "आमुची मायबोली' ही कविता आजही सर्वांच्या ओठावर आहे. ज्युलियन लिहितात-
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं,
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं,
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमुच्या मात्र हृन्मदिरी
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी।।
मराठी भाषेचा अभिमान ओवी, अभंग, लावणी, पोवाडा अशा विविध रचनांतून व्यक्त झालेला आपण अनेकदा पाहतो पण रावसाहेब र.लु.जोशी यांनी मराठीची भूपाळी लिहिली आहे. ते लिहितात-
प्रभातकाळी तुझी लागली ओढ मायबोली
भवती गुंजे तव गुण गाणी मंगळ भूपाळी
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा अमृताशी पैजा जिंकते असे म्हटले आहे, हाच धाग धरून अमृताशी मराठीची तुलना करता करता सोपानदेव चौधरी म्हणतात-
अमृतास काय उणे?
सांगतसे मी कौतुकें
माझी मराठी बोलकी
परी अमृत हे मुके!
अमृत आणि मराठी इतर सर्व बाबीत समान, पण अमृताला बोलता येत नाही म्हणू ते थोडे कमीच, असे सोपानदेव म्हणतात. याचबाबत डॉ.ना.गो. नांदापूरकर आपल्या "माझी मराठी' कवितेत लिहितात-
माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे
गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे
मराठी भाषेपुढे अमृताची गोडी फिकी पडल्याने अमृत थेट स्वर्गात पळून गेले अशी अद्वितीय कल्पना नांदापूरकर यांनी केली आहे.
मराठी गझलभास्कर सुरेश भट यांनी मराठीबाबत आपल्या मायबोली रचनेत म्हटले आहे-
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहला खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी भाषेची उपेक्षा आधी संस्कृतकडून आणि आता इंग्रजीकडून होत आहे. ही उपेक्षा मराठीच्या पुत्रांना सदैव सलत आली आहे. म्हणूनच मराठीच्या जन्मापासून मराठी कवींनी मराठीच्या बाजूने सदैव रणशिंग फुंकले आहे. जन्मापासूनच ही भाषा लढते आहे. तिचा लढा अखंड चालू आहे. आजही तो संपलेला नाही. पण ज्या अर्थी ती लढली पण मेली नाही त्या अर्थी ती इथून पुढेही अशीच लढून आपले अस्तित्व नक्की टिकवील. मराठी भाषादिनानिमित्त आपण तिच्या या लढाईला थोडे अधिक बळ देऊ या!
ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण मराठी भाषा दिन साजरा करतो त्या कुसुमाग्रजांनीच बजावून ठेवले आहे-
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषिक होऊन अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका।।
प्रा. नारायण गोविंद नांदापूरकर (जन्म : १४ सप्टेंबर १९०१; मृत्यू : ?) हे एक मराठी कवी आणि , पंतकवींच्या काव्याचे व लोकसाहित्याचे अभयासक होते. मोरोपंत आणि मुक्तेश्वरयांच्या महाभारतावरील काव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी 'मयूर-मुक्तांची भारते' हा ग्रंथ लिहिला. नांदापूरकर हे उस्मानिया विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते.
ना.गो.नांदापूरकर यांची 'माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे' ही कविता प्रसिद्ध आहे.

नारायण नांदापूरकर यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • फुलारी (अनुवादित, मूळ Gardener, लेखक - रवींद्रनाथ टागोर)
  • मयूर-मुक्तांची भारते (मोरोपंत आणि मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील काव्यांचा परामर्श)
  • मायबोलीची कहाणी (मराठी बोलीभाषांचा इतिहास) (पहिली आवृत्ती
  • स्त्री-गीतसंग्रह भाग १ ते ३ (संपादित)
  • हसू आणि आसू (अनुवादित, मूळ Tears and Laughters, लेखक - खलील जिब्रान)

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

गोविंद पानसरे

गोविंद पानसरे (२६ नोव्हेंबरइ.स. १९३३ - २० फेब्रुवारीइ.स. २०१५मुंबई) हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते. १९५२ साला पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोल आंदोलनातही अग्रभागी होते. २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचा कोल्हापूरमध्ये खून झाला.
गोविंद पानसरे
जन्म२४ नोव्हेंबर १९३३
कोलहार, अहमदनगर
मृत्यू२० फेब्रुवारी, २०१४

जीवनसंपादन करा

गोविंद पानसरे यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी जिल्हा अहमदनगर, तालुका राहता मधील कोल्हार या गावी झाला. गरीब कष्टकऱ्यांच्या परिवारात ते वाढले. कोल्हार येथून प्राथमिक शिक्षण व राहुरी येथून माध्यमिक शिक्षणानंतर ते उच्चशिक्षणासाठी कोल्हापूरला गेले, जिथे त्यांनी बी.ए. (ऑनर्स) व एल.एल.बी. पूर्ण केले. सुरुवातीला वर्तमानपत्र विक्रेता, मुन्सिपालिटीत शिपाई, माध्यमिक शाळा मंडळात प्राथमिक शिक्षक अशा अनेक नोकऱ्या केल्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. सोबत ते कामगार वकीलीसुद्धा करू लागले. पुढे चालून ते कोल्हापुरमधील एक नावाजलेले वकील झाले व अनेक वर्षे कोल्हापुरातील वकीलांच्या संघटनेचे अध्यक्ष राहिले.

चळवळसंपादन करा

कॉ. पानसरे शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळींकडे आकर्षित झाले होते. सुरुवातीला राष्ट्र सेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. १० वर्षांसाठी ते भाकपचे महाराष्ट्र सेक्रेटरी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती चळवळीत ते सहभागी होते. तडजोड न करता समाजातील सर्वांत जास्त शोषित तबक्क्यांच्या हक्कांसाठी लढणारे ते कार्यकर्ता होते. ते कष्टकऱ्यांच्या शेकडो संघर्षांमध्ये सहभागी झाले व अनेकांचे नेतृत्वदेखील केले, विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दूध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी, इत्यादी. कोल्हापुरमधील टोलविरोधी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

साहित्यसंपादन करा

पानसरे एक लेखक सुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानांमध्ये ते अथकपणे कार्यरत होते. "शिवाजी कोण होता?" हे त्यांच्या सर्वांत प्रसिद्ध लेखणांपैकी आहे. अथक परिश्रमाअंती त्यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे व १.५ लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या वाङ्मयाचे डॉ. असॊक घोसाळकर आणि डॉ. रणधीर शिंदे यांनी संपादित केलेले दोन खंड प्रसिद्ध झाले आहेत. लोकवाङ्मय गृहाने ते प्रकाशित केले आहेत.
कॉ.गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता हे पुस्तक आपल्याला शिवाजींचे दर्शन घडवते.

गोविंद पानसरे यांनी लिहिलेली काही पुस्तकेसंपादन करा

  1. अजून न स्वीकारलेला मंडल आयोग
  2. अवमूल्यन : कळ सोसायची कुणी?
  3. काश्मिरबाबतच्या कलम ३७० ची कुळकथा
  4. कामगारविरोधी कामगार धोरणे
  5. काही कामगार कायद्यांची तोंडओळख
  6. धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा
  7. पंचायत राज्याचा पंचनामा
  8. मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम
  9. मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न
  10. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी: पर्यायी दृष्टिकोन
  11. मार्क्सवादाची तोंड ओळख
  12. मुस्लिमांचे लाड
  13. # राजर्षी शाहू : वसा आणि वारसा
  14. शिवाजी कोण होता?
  15. शेतीधोरण परधार्जिणे

मृत्यूसंपादन करा

पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. नंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून भरधाव वेगाने निघून गेले. ह्या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. पानसरे यांच्या छातीला आणि पोटाला इजा झाली होती आणि त्यांच्या पत्नीला डोक्याला इजा झाली होती. उपचारादरम्यान गोविंद पानसरे यांचे २० फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईमध्ये निधन झाले.[१]

पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा

  • २००३ साली भारतीय पोस्टाने त्यांचे छायाचित्र असलेले तिकिट प्रकाशित केले.
  • पानसरे यांच्या नावाने ’कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली आहे.संदर्भ हवा ] ३ जून, इ.स. २०१५ रोजी पहिला 'कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार' मुक्ता मनोहर यांना देण्यात आला.
शाहू महाराज (जून २६इ.स. १८७४ - मे ६इ.स. १९२२), कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूरराज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज सुधारणावादी समाजसुधारक होते.
शाहू महाराज
छत्रपती, राजर्षी
Maharajah of Kolhapur 1912.jpg
शाहू महाराजांचे छायाचित्र
Flag of the Maratha Empire.svg
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळइ.स. १८८४ - इ.स. १९२२
अधिकारारोहणएप्रिल २इ.स. १८९४
राज्यव्याप्तीकोल्हापूर जिल्हा
राजधानीकोल्हापूर
पूर्ण नावछत्रपती शाहू महाराज भोसले
जन्मजून २६इ.स. १८७४
लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल
मृत्यूमे ६इ.स. १९२२
मुंबई
पूर्वाधिकारीछत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)
'राजाराम ३
उत्तराधिकारीछत्रपती राजाराम भोसले
वडीलआबासाहेब घाटगे
आईराधाबाई
पत्नीमहाराणी लक्ष्मीबाई भोसले
राजघराणेभोसले
राजब्रीदवाक्यजय भवानी
चलन

जीवनसंपादन करा

राजर्षी शाहू महाराज
शाहू महाराजांचा जन्म जून २६इ.स. १८७४ रोजी कागलयेथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

कार्यसंपादन करा

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी संदर्भ हवा ]त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो.
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यातला. आज शाहूंची जयंती. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. राजर्षी शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी फार तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. एवढेच नाही तर ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.
त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अतिशय विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.
गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
राजषी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.
महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.

जातिभेदाविरुद्ध लढासंपादन करा

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

इतर कार्येसंपादन करा

शाहू छत्रपती स्पिनिंग अॅन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. संदर्भ हवा ]

कलेला आश्रयसंपादन करा

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

स्वातंत्रलढ्यातील योगदानसंपादन करा

महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

पारंपिरिक जातिभेदाला विरोधसंपादन करा

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.संदर्भ हवा ]

शाहू महाराजांवरील प्रकाशित साहित्यसंपादन करा

  • Rajarshi Shahu Chatrapati : A Socially revolutionary King (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
  • शाहू महाराजांची चरित्रे. लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ.अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार(यांनी २००१ साली लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती, ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
  • बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
  • राजर्षी शाहू छत्रपती. लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव. नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.
  • कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य. लेखक : एकनाथ केशव घोरपडे
  • राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य: लेखक : रा.ना. चव्हाण
  • राजर्षी शाहू कार्य व काळ. (लेखक - रा.ना. चव्हाण)
  • समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
  • शाहू - कादंबरी- लेखक श्रीराम ग. पचिंद्रे ; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.
  • ‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)

चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकासंपादन करा

  • 'लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
  • राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)

पुरस्कारसंपादन करा

शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे. :-
  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)
  • कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)
  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)

सन्मानसंपादन करा

शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.[१]


शीगवाला / नारायण सुर्वे

क्या लिखतो रे पोरा ! नाही चाचा -- काही हर्फ जुळवतो म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो गोंडेवली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो ...