मंगळवार, २३ जुलै, २०१९

विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर(२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवीलेखकनाटककार कथाकार व समीक्षकहोते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे.

जीवनसंपादन करा

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. [१] कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबतस्वराज्यप्रभातनवयुगधनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.[ https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF.%E0%A4%B5%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit&section=1]
त्यांच्या टिळकवाडी, नाशिक येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे .

लेखनशैलीसंपादन करा

सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कविता, नाटककादंबरीकथालघुनिबंधइत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.

                  कणा

ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!


कणा"

        नववीत असताना कुसुमाग्रजांची "कणा" ही कविता अभ्यासक्रमात होती...खरतर ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आहे.खूप साध्या शब्दात मांडलेली  ही कविता...स्वाभिमान जपणं शिकवणारी...कठीण परिस्थितीतही जगण्याचे बळ देणारी...शाळेत शिकलेली ही कविता आयुष्यभरासाठी पाठ होऊन गेली कारण तिचा आशय...तिच्यातून  मिळणारी प्रेरणा आणि तिचा साधेपणा !!!
 
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMp4SZ0KMvSU6Lq9ptvS__AnjAfIJv7ufM5ff1-Km_IZe42Z9pPKX9pcM1Q6LgOFs7eA8vKBAUTX23GStljjrRz8bK2Sr8HNzlI_1ajNB-9XCLEW9k0QKiFQE_vbmYz1wY59XptSGbXI4/s1600/1503.jpg
  
     तर, नव्याने संसार थाटलेल्या घरात गंगा नदीच्या पुराचे पाणी येते आणि  संसार उध्वस्त होतो..होत्याचे नव्हते  व्हायला काही क्षण पुरतात आणि शेवटी डोळ्यांतही आसवांचा पूर ओसंडून वाहू लागतो.अशा या परिस्थितीत त्या मुलाला मायेने आपल्यावर हात फिरवणारे,प्रसंगी धीर देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे शिक्षक आठवतात.
    तो सरांना भेटून  सारी कहाणी सांगतो.ते ऐकून सरांचा आपसूक पैशांची मदत करण्यासाठी  खिशाकडे जाणारा हात पाहताच तो सरांना अडवतो आणि म्हणतो, "मी तुमच्याकडे आर्थिक नाही तर मानसिक मदत मागायला आलोय.एकटेपणा जाणवत होता म्हणून धीराचे दोन शब्द ऐकायला आलोय.माझा संसार जरी मोडून पडला असेल तरी माझा पाठीचा कणा (स्वाभिमान) अजूनही ताठ  आहे.तुमचा आशीर्वाद फक्त द्या पुढची लढाई मी लढू शकतो." असा आशय असलेली ही कविता साऱ्यांनाच आयुष्यात प्रेरणादायी वाटते.
    संवादाच्या रिसेप्शन सिद्धांता नुसार, कवितेचा अर्थ वाचणाऱ्याच्या  मानसिकतेनुसार आणि त्याच्या अनुभवानुसार बदलत असतो.परंतु कुसुमाग्रजांची ही कविता मराठी माणसाच्या जवळ असण्याच कारण म्हणजे प्रत्येक मराठी मनाला ही कविता जगण्याच धैर्य देते.एक नवीन आशा निर्माण करते,वाचणाऱ्याच्या  मानसिकतेनुसार तिचा प्रभाव वेगळा ठरू शकतो परंतु आशय हा बदलत नाही.आणि म्हणूनच ती साऱ्यांनाच जवळची वाटते.

साहित्यविचारसंपादन करा

प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते.[२][३]
कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाज जीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.
कुसुमाग्रज, क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते, असे मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार बा. सी. मर्ढेकर आणि कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यविचारांचा संवादसेतू आहे. मर्ढेकरांच्या नंतर मराठी साहित्यात दुर्बोधता, अश्लीलता आणि लैंगिकता हीच श्रेष्ठ साहित्याची लक्षणे रूढ होत होती, त्यावर कुसुमाग्रजांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर पारंपरिक नीतिमत्ता आणि श्लीलता या कल्पनांना ढोंगी ठरवून नकार दिला आहे. नाटक मूलतः वाङमय असते, नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण असते, असे म्हणणे त्यांच्या अहंकार-आविर्भाव सुसंगत आहे. मीपणाशिवाय अहंकार आणि आविर्भाव शक्य नाहीच.
"साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्‍मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसार्‍यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे, की जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही."
कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर हे कवी, नाटककार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके साहित्यमीमांसक म्हणून प्रसिद्ध नाहीत. तसेच त्यांनी आपला साहित्यविचार स्वतंत्रपणे मांडला नाही. ‘रूपरेषा’ या ग्रंथात त्यांचे साहित्य-चिंतन संकलित करण्यात आले आहे. त्याच्याच आधारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार प्रस्तुत निबंधात शोधला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आलेला साहित्यविचारही येथे विचारात घेतलेला नाही. त्यांच्या काव्यविचाराचा अभ्यास व विचार स्वतंत्रपणे करता येईल.

कलेचे आधारभूत तत्त्व 
कुसुमाग्रजांच्या या विचारात मर्ढेकरी कलाविचारातील आत्मनिष्ठा, सौंदर्य किंवा नेमाडेप्रणित लेखकाची नैतिकता, देशीयता यांपेक्षा वेगळी भूमिका दिसते. सर्व संत ज्या अहंकाराच्या विसर्जनाला महत्त्व देतात त्या अहंकाराला शिरवाडकर कलेत महत्त्वाचे मानतात. त्यांचे म्हणणे असे की, लेखकाचा अहंकार अनन्यसाधारण रूप धारण करतो तेव्हाच लेखकाला लिहावेसे वाटते. या अहंकारामुळेच स्वतःचे स्वत्व बाहेर पल्लवीत करण्याचा एक आंतरिक आग्रह त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. अहंकाराची ही प्रवृत्ती नुसत्या आविष्काराने नव्हे तर वर्चस्वाने समाधान पावते. हे वर्चस्व लेखकाला जवळ व दूर प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षात असलेल्या वाचकांच्या संदर्भात प्राप्त होते. म्हणजे वाचकवरील वर्चस्वाच्या भावनेने कलानिर्मिती होते असे त्यांचे म्हणणे आहे.
ही प्रक्रिया रसिक, वाचक कशी स्वीकारतो? तर, वाचक शब्दांच्या माध्यमातून लेखकाच्या विश्वात प्रवेश करतो आणि स्वतःच्या जीवनाचे संन्यसन करून त्या वेळेपुरता लेखकाच्या आधीन होतो. याला Empathy म्हणजे ``अंतरानुभूती म्हणतात. वाचकाच्या दृष्टीने जी अंतरानुभूती; तेच लेखकाच्या दृष्टीने वर्चस्वाचे स्वरूप. कुसुमाग्रज म्हणतात, ”कोणत्याही कलेच्या मुळाशी असलेल्या अहंकाराच्या प्रेरणेने आपल्या अंकित होणार्‍या मनांचे म्हणजेच माणसांचे हे अस्तित्व मूलत:च गृहीत धरलेले असते. या प्रेरणेच्या अभावी साहित्याची अथवा कोणत्याही कलेची निर्मितीच सर्वस्वी अशक्य आहे.” (रूपरेषा, पृ.२३/२४)
या अहंकाराच्या प्रेरणेचा समावेश कुसुमाग्रज निर्मितिप्रक्रियेत करतात. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो. “माणसाचे सारे अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. साहित्य म्हणजे मूलतः अशा प्रकारचा एक संबंध होय. हा संबंध एका बाजूला साहित्यिकाच्या अहंकाराने आणि दुसऱ्या बाजूला वाचकाच्या अनुभवशोधकतेने नियंत्रित झालेला असतो.” (रूपरेषा, पृ.२५/२६)

सोमवार, १५ जुलै, २०१९

कवी केशवसुत यांची *आम्ही कोण* ही कविता!या कवितेचे रसग्रहण मी करणार आहे.कवी केशवसुत या टोपणनावाने ओळखल्या जातात. त्यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे आहे. वडील केशव यांचा सुत म्हणजेच मुलगा म्हणून त्याना *केशवसुत*या नावाने ओळखल्या जातात. *तुतारी* ही त्यांची कविता अतिशय प्रसिद्ध आहे. थोर साहित्यिक म्हणून ख्याती मिळवलेले कवी म्हणजे केशवसुत!
     *आम्ही कोण* ही कविता म्हणजे साहित्यिकांचा महिमा वर्णन करणारी कविता आहे. कवीचा कल्पनाविलास किती अप्रतिम असू शकतो,हे त्यानी यात सांगितले आहे. कवी प्रतिभेच्या जोरावर कल्पनेनेच स्वर्ग,नरक या सगळ्या बाबी त्यानी निर्माण केल्या आहेत. कवीची दृष्टी दिशा आणि काळ यांच्या पलीकडे जाऊन पोहोचलेली असते. ते म्हणतात,देवाने आम्हास साहित्य रचण्यासाठी संपूर्ण पृथ्वी दिली आहे. एखाद्या वस्तूत अप्रतिम सौंदर्य भरणे,वस्तूतील फोलपणा ठरवणे,हे सर्व आमच्या पाणिस्पर्शाने म्हणजे हाताने होत असते. खरे तर राक्षस,देव  आहेत की नाहीत हे कोणाला खात्रीने माहीत नाही,पण आमच्या साहित्यातून आम्ही त्याला वास्तवरुप दिले आहे. आमच्या कृतीतून अमृत पाझरुन त्यातून सुंदर आणि मंगल आम्ही निर्माण करतो. म्हणून आम्ही देवाचे लाडके आहोत.आम्हाला जर जगातून वगळले तर या जगात सौंदर्यच उरणार नाही. लोकाना हे जीवन विरान वाटेल आणि त्यांचे जगणे हे कवडीमोल होईल,आकाशातील तारे हे निष्प्रभ  ठरतील. त्यामुळे आम्हा कलावंतांना आम्ही कोण असा प्रश्न विचारु नका. कलावंतांना वगळल्यावर या जगाला काहीही किंमत उरणार नाही,एवढे आम्ही अनमोल आहोत. कलावंतांचे श्रेष्ठत्व आणि अस्तित्व कवी केशवसुतानी अतिशय मार्मिक आणि प्रभावपूर्ण शब्दात वर्णिलेले आहे. कवीची स्वाभिमानी वृत्ती यातून आपणास प्रत्ययास येते. 
कवी आणि त्याची काव्यनिर्मितीबाबतचा सार्थ अभिमान कवी प्रस्तुत कवितेतून व्यक्त करतो.

ससा रक्षण सालबर्डी लिळा

Mahanubhav abp majha part1

Mahanubhav Documentary : महानुभाव डॉक्यूमेंट्री, :

लीळाचरित्र आणि महानुभाव पंथ याबाबत Prof M R Lamkhade यांनी केलेले उत्तम...

ससीक रक्षण (Sasikam Rakshan) - Home Revise 9th Std. Maharashtra Board Ma...

ससीक रक्षण - आशय

गद्यपाठ १
ससीकरक्षण
ठळक मुद्दे
लेखक: म्हाइंभट
लीळेतील शिकवण - मुक्या जीवांचे रक्षण, शरण आलेल्यांना अभय, दुसऱ्या माणसाचे मतपरिवर्तन, आपल्या
भूमिकेवर ठाम असणे, अहींसा.
चक्रधर स्वामींचे व्यक्तीमत्त्व - उदार, कनवाळू ,अहिंसक, निर्भय, शरण आलेल्या जीवाला अभय देणारे,
मतपरिवर्तक, सुभाषी
भाषिक वैशिष्ट्ये: साधी, सोपी वाक्ये,छोटी ओघवती वाक्यरचना, यादवकाळातील बोली भाषेचे रूप,मधुर,
चक्रधरांची स्वत:ची शैली,’जी-जी, हां गा’ सारखी साधी संबोधके, एकाचप्रकारच्या विरामचिन्हाचा वापर,
भूतकाळाच्या रुपांसारखी भविष्यकाळाची रूपे उदा.’तरी हा गोसावीं राखीला’,
स्वाध्याय- उजळणी प्रश्न, वैचारिक प्रश्न

प्रस्तावना:

‘ससीकरक्षण’ ही लीळा चक्रधरस्वामींच्या चरित्रातून घेतली आहे ज्याचे नाव ‘लीळाचरत्र’ आहे. लीळा म्हणजे आठवणी.
आठवणींच्या स्वरूपातील चरित्र. चरित्र हे एखाद्या व्यक्तीविषयी दुसऱ्या एका व्यक्तीने लिहीलेले असते. तसे ह्या लीळा
म्हाइंभट ह्या चक्रधरस्वामींच्या शिष्ट्याने ऐकू न,आठवून व इतर शिष्ट्यांकडून गोळाकरून लिहिलेल्या आहेत.
चक्रधरस्वामींच्या निधनानंतर शिष्ट्यमंडळी स्वामींच्या लीळा आठवीत बसत. त्यातूनच पुढे ‘लीळाचरित्राची’ निर्मिती
झाली असे समजले जाते.

आद्यचारित्रकार म्हाइंभट


मराठीतील आद्य गद्य म्हणजे लीळाचरित्र आणि आद्य चारित्रकार म्हणजे म्हाइंभट. म्हाइंभट हा अहमदनगर जिल्ह्यातील शिराळे गावचा.  त्याच्या पत्नीचे नाव देभाइसा. म्हाइंभटाने गणपती आपयो यांच्याजवळ पाच शास्त्रांचे अध्ययन केले. तेलंगणात जाऊन सहावे शास्त्र ही शिकला. त्यामुळे तो गर्विष्ठ बनला. पायात गवताची चाळ आणि हातात दिवा घेऊन तो भर दिवसा हिंडत असे. सर्व लोक पंडित माझ्या दृष्टीने तृणवत आहेत व सुर्यप्रकाशापेक्षा माझा ज्ञानप्रकाश श्रेष्ठ आहे असे तो त्यातून सुचवीत असे. मात्र एकदा डोंबेग्रामी त्यांची व चक्रधर स्वामींची भेट झाली, संस्कृतमधून तत्वचर्चा झडली आणि त्यांनी चक्रधारांच्या पुढे हार मानली. पुढे ते त्यांचे एकनिष्ठ शिष्य बनले. लीळाचरित्र, रिद्धपुरचरित्र या चरित्रग्रंथामुळे त्यांची सर्वत्र ख्याती झाली. लीळाचरित्र हा ग्रंथ त्यांनी पूर्वार्ध व उत्तरार्थ अशा दोन भागात लिहिला. पूर्वार्धात श्री चक्रधर स्वामींच्या एकांतातील भ्रमणकाळातील लीळा आहेत तर स्वामींच्या लौकिक जीवनातील आठवणी संकलित आहेत.  म्हाइंभट यांचे कार्य एखाद्या आजच्या संशोधकाला लाजवेल एवढ्या तोडीचे आहे.


ससीक रक्षण लिळेचा आजच्या भाषेत अर्थ


मध्ययुगात श्री चक्रधर स्वामी नावाचे थोर महात्मा होऊन गेले. "प्राणीमात्रांवर दया करावी, कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये, कोणताही जीव मोठा किंवा छोटा मानू नये." अशी त्यांची शिकवण होती.
एकदा काय झाले, रानात दोन पारध्यांच्या गटात शर्यत लागली. ज्यांची कुत्री ससा धरतील , तो गट शर्यत जिंकेल अशी अट ठरली. मग त्यांनी झुडपातून ससा उठविला. ससा जिवाच्या आकांताने घाबरून जोरात पळू लागला. श्री चक्रधर स्वामी एका मोठ्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले होते. घाबरलेल्या सशाला त्यांनी पाहिले. ससा त्यांच्या जवळ जाऊन थांबला. श्री चक्रधर स्वामींनी त्याला प्रेमाने कुरूवाळले. ससा त्यांच्या मांडीखाली जाऊन बसला. इतक्यात कुत्री आणि पारधी श्री चक्रधर स्वामींजवळ पोहचले. पारध्यांनी स्वामी चक्रधरांना ससा देण्याची विनंती केली. "जी! जी! ससा सोडवा" पारधी म्हणाले.
" हा ससा मी तुम्हाला देणार नाही" श्री चक्रधर स्वामी म्हणाले.
पारधी शिकारी म्हणाले, "स्वामी हा आमच्या पैजेचा ससा आहे, त्यामुळे आमच्यात मारामाऱ्या होतील , तो ससा आम्हांला द्या"  यावर स्वामी म्हणाले, "शरण आलेल्या कोणत्याही जीवाला जीवन द्यायचे असते. हा ससा रानात राहतो, गवत खातो, ओढ्या नद्यांचे पाणी पितो, त्याला तुम्ही झुडपातून का उठविले? त्याने तुमचे काय बिघडविले? विनाकारण का मारता त्याला?"
श्री चक्रधर स्वामींच्या बोलण्यावर शिकऱ्यांनी विचार केला. त्यांचे मन परिवर्तन झाले. ते म्हणाले, "महाराज, उगच, आता कोणत्याही प्राण्याला आम्ही मारणार नाहीत."
असे म्हणून पारधी निघून गेले. श्री चक्रधर स्वामींना आनंद झाला. त्यांचा चेहरा प्रसन्न दिसू लागला. त्यांनी हलकेच आपली मांडी उचलली आणि सशाला पाहून म्हणाले" महात्मे हो! पळा आता"
मग सशाने एकदम धूम ठोकली.


लीळाचरित्र याविषयी अधीक माहीती येथे वाचा-
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%
9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0
चक्रधरस्वामींविषयी येथे वाचा-
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%
A7%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0

लीळाचरित्र


महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य ऋद्धिपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी-स्मृती-लीळांचे स्मरण करू लागले. यातूनच म्हाईंभटास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्याने नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. रचनाकाल १२८३ च्या आसपास. 
लीळाचरित्राच्या विविध उपलब्घ प्रतींमधील लीळांची संख्या कमीजास्त आहे. ९०० पासून १५०० पर्यंत ही संख्या आढळते. एकांक, पूर्वाध व उत्तरार्ध असे लीळाचरित्राचे तीन विभाग करण्यात आले. लीळाचरित्राच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील लीळा अनेक शिष्यांकडून मिळाल्या पण त्यांच्या एकाकी अवस्थेतील लीळा कोणालाच ज्ञात नव्हत्या. महदाईसा या जिज्ञासू शिष्येकडून चक्रधरांच्या पूर्वायुष्यातील लीळा मग म्हाईंभटाने मिळवल्या.
चक्रधरस्वामी आणि महानुभाव संप्रदाय यांची वैविध्यपूर्ण माहिती या चरित्रग्रंथातून व्यक्त झाली आहे. चक्रधरस्वामी हे लीळाचरित्राचे नायक आहेत. त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्व यातून साकार झाले आहे. चक्रधर हे एकांतातून लोकांतात कसे कसे आले याची माहिती म्हणजे लीळाचरित्र होय. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून सहजच आले आहे. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, चक्रधरांची वचने इत्यादी अनेक बाबी लीळाचरित्रातून साकार झाल्या आहेत. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत.
लीळाचरित्र हे चक्रधरांचे चरित्र असले तरी त्यातील अनेक लीळांमघून तेव्हाच्या समाजजीवनाच्या विविध अंगांचे आपोआपच दर्शन घडते. त्यावेळचे भोजनपदार्थ, वस्रविशेष, चालीरिती, करमणुकीचे प्रकार,कायदे, सामाजिक सुरक्षितता, सण, उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
लीळाचरित्रात चक्रधरांचे व्यक्तिचित्र व त्या अनुषंगाने गोंविदप्रभू, महदंबा, नागदेव इत्यादींची रेखाटलेली स्वभावचित्रे लक्षणीय वाटतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आलेले संवाद, वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटाने केला आहे. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात. 

केशवसुत


कवी केशवसुत

केशवसुत

जन्म : ७ ऑक्टोबर १८६६
मृत्यू : ७ नोव्हेंबर १९०५
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. काव्यरत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून ‘केशवसूत’ या टोपण-नावाचा स्वीकार केला. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुड ह्या गावी. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी. शिक्षणकालातच १८८० मध्ये त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर (१८८९) मुंबईला १८९७ पर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. १९०१ पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०४ मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. १९०५ साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.
केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल १८८५ ते १९०५ हाच होय. या काळातील त्यांच्या सु. १३५ कविता आज उपलब्ध आहेत. नागपुरास असताना रेव्ह. टिळक व कवी वसंत यांचा सहवास त्यांना लाभला होता. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले.परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्ड्‌स्वर्थ, शेली आणि कीट्स यांसारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले. इंग्रजी अभ्यासक्रमातून व वि. मो. महाजनींनी विविधज्ञानविस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरांवरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांस काहीसे परिचित झाले होते. त्या काव्याच्या चिंतन मननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्मक स्फुट भावकविता लिहिली व मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्माविष्काराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले. त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व, स्त्रीपुरुषांतील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ (सक्षात्कारी) अनुभूती अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो. एका दृष्टीने स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचाच विविध रूपांनी झालेला हा आविष्कार आहे. ह्या मनोवृत्तीचा आविष्कार मराठी काव्यक्षेत्रात निश्चितच क्रांतिकारक ठरला; म्हणूनच केशवसुतांच्या, संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या काव्यरचनेला नंतरच्या काळात स्वतंत्र परंपरा लाभू शकली.
नवीन काव्याबरोबरच काव्यविषयक नवा दृष्टिकोन व नवी अभिरुची निर्माण करण्याची जबाबदारी नव्या कवींवर पडते. केशवसुतांनी अशा जबाबदारीने लिहिलेल्या कवितांपैकी, ‘स्फूर्ति’ (१८९६), ‘कवितेचे प्रयोजन’ (१८९९), ‘आम्ही कोण?’ (१९०१) आणि ‘प्रतिभा’ (१९०४) या महत्त्वाच्या आहेत. व्यापक मानवी जीवनाच्या संदर्भात कवी व कवित्व यांच्या कार्याची आदर्शवादी भूमिका केशवसुतांनी मांडलेली असल्यामुळे त्या भूमिकेत चिरंतन प्रेरकता जाणवते. त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्ड्‌स्वर्थ व एमर्सन यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो. सृष्टीतील सौदर्य काव्याला प्रेरक ठरते व तीत मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्गसहवास सुखद ठरतो, अशा दृष्टीने केशवसुत निसर्गाकडे बघतात. ‘भृंग’ (१८९०), ‘पुष्पाप्रत’ (१८९२) व ‘फुलपांखरूं’ (१९००) या त्यांच्या काही महत्त्वाच्या निसर्गकविता होत. प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या. क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे, ‘तुतारी’ (१८९३), ‘नवा शिपाई’ (१८९८) व ‘गोफण केली छान’ (१९०५) या होत. त्यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्त्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल मानवतावाद ही आहेत. विशेष म्हणजे पृथ्वीला ‘सुरलोकसाम्य’ प्राप्त करून देण्याचे एक महान स्वप्न त्यांच्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहिले होते. त्याचाही निर्देश त्यांच्या काही कवितांतून आढळतो. गूढ अनुभूती व तिची नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली ‘झपूर्झा’ (१८९३) ही त्यांची कविता विशेष गाजली. त्यांच्या अन्य गूढगुंजनात्मक कवितांत ‘म्हातारी’ (१९०१) व ‘हरपले श्रेय’ (१९०५) यांचा समावेश होतो. शैलीच्या द्दष्टीने केशवसुतांच्या काव्यात लालित्य कमी आहे; पण काहीशी राकट आणि रांगडी अभिव्यक्ती त्यांच्या काव्यप्रकृतीशी सुसंगत ठरते.
केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही परिवर्तन घडवून आणले. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे; असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट स्वरूपाचे ठरते; अशा स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक अनुकूल असतात, हे सर्व त्यांनी दाखवून दिले. इंग्रजी काव्यातील सुनीत हा छंदःप्रकार त्यांनी मराठीत प्रथमच रूढ केला. शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही त्यांनी प्रचलित केली.
आयुष्याच्या शेवटीशेवटी आपली काव्यशक्ती नष्ट झाल्याची जाणीव त्यांस झाली होती, असे त्यांच्या एका पत्रावरून वाटते. काव्याशिवाय एक गद्य नाटकही त्यांनी लिहिले होते; पण ते अप्रसिद्ध आहे. काही इंग्रजी कविताही त्यांनी रचल्या होत्या.
केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर हरि नारायण आपटे यांनी १९१६ मध्ये प्रकाशित केला. गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, सोनाळकर, काव्यविहारी यांसारखे कवी स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत. ‘तुतारी-मंडळ’ या नावाचे एक मंडळही स्थापन झाले होते.
केशवसुत हे आधुनिक मराठीतील सर्वांत जास्त वादग्रस्त कवी आहेत. त्यांचे कवित्व, कवीपण, काही दृष्टिकोन, काही कविता, क्रांतिकारकत्व व श्रेष्ठत्व हे सर्वच वादाचे विषय ठरले. एकांगी समीक्षेने पुष्कळदा अशा वादांचा जन्म होतो. ही वादग्रस्तता केशवसुतांच्या श्रेष्ठत्वाचाच एक पुरावा होय. केशवसुतांनंतरच्या गेल्या सत्तर–ऐंशी वर्षांत आधुनिक मराठी काव्यात कितीतरी परिवर्तने व प्रयोग झाले, तथापि केशवसुतांच्या काव्याची प्रेरकता व महत्त्व ही कायमच राहिली.
महाराष्ट शासनातर्फे १९६६ मध्ये केशवसुतांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती.  या समितीने केशवसुतांच्या काव्यसंग्रहाच्या हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती १९६७ मध्ये प्रकाशित केली.
संदर्भ : १. कामत, गजानन; नाडकर्णी, सीताराम; जोशी, सुधाकर, संपा, केशवसुतसमीक्षा, १९०६-१९५६,  पुणे, १९६६, पुणे, १९६६.
२. जोग, रा. श्री. केशवसुत काव्यदर्शन, मुंबई, १९४७.
३. दामले, द. मो. सरस्वतीचे लाडके पुत्र, सोलापूर, १९६६.
४. दामले, पं. चि. संपा. केशवसुंत स्मृतिग्रंथ, पुणे, १९५५.
५. पंडित, भ. श्री. केशवसुत : पाच चिंतनिका, अमरावती, १९६१.
६. पंडित, भ. श्री. समग्र केशवसुत, पुणे, १९६४.
७. बेडेकर, दि. के. केशवसुतांची काव्यदृष्टी, मुंबई, १९६६.
८. माडखोलकर, ग. त्र्यं.आधुनिक-कविपंचक, पुणे, १९२१.
लेखक : रा.श्री.जोग

आम्ही कोण?

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी?आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्र्वी या प्रतिभावले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची द्रुष्टी पहाया शके
सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया –
सौंदर्यातिशया,अशी वसतसे जादु करांमजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्व आम्ही निके!
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!
आम्हांला वगळा-गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा-विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

रविवार, १४ जुलै, २०१९

संतशिरोमणी सावता महाराज

सावता माळी ((जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) हे एक मराठी संतकवी होते. अरण (तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर) हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होत. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.
आपल्या जन्मस्थळाबद्दल सावता माळी म्हणतात:-
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।
सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावीनरहरी सोनारयांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगांत वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे.

अन्य माहितीसंपादन करा

संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५ चा आहे. (संत ज्ञानेश्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे.) ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.
ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.
अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले असे मानले जाते. परंतु या दिनांकाविषयी मतभेद आहेत असे कळते. कालनिर्णय दिनदर्शिकेत सावता माळी यांची पुण्यतिथी २५ जुलै (साल?) अशी दर्शवली आहे.
सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे सत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती. पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखीवर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.
त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे.

गाजलेले अभंगसंपादन करा

‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’
'कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’'
’'लसण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’
अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती
‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.
‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।

हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो.
‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’


समयासी सादर व्हावे | देव ठेवील तैसे राहावे
कोणे दिवशी बसून हत्तीवर 1 कोणें दिवशी पालखी सुभेदार
कोणे दिवशी पायाचा चाकर 1 चालून जावे || २||
कोणें दिवशी बसून याची मन | कोणें दिवशी घरात नाही अन्न |
कोणें दिवशी धान्याची साठवण | कोठे साठवावे ||
कोणें दिवशी यम येती चालून |  कोणें दिवशी प्राण जाती घेऊन
कोणें दिवासी स्मशानी जाऊन | एकटे राहावे ||
कोणें दिवशी होईल सद्गुरूंची कृपा |©कोणें दिवशी चुकतील जन्माच्या खेपा
कोणें दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावें
समयासी सादर व्हावे | देव ठेवील तैसे राहावे ||

कोणें दिवशी
चित्रपटसंपादन करा

  • फाउंटन एंटरटेनमेंटने ’संत सावतामाळी’ नावाची दक्‌श्राव्य सीडी काढली आहे.
  • सुमीत कॅसेट्‌स या कंपनीची ’संत सावता माळी कथा’ नावाची दृक्‌श्राव्य सीडी आहे.
  • संत सावता माळी हा एक प्रसिद्ध मराठी चित्रपट आहे. (पटकथालेखक-दिग्दर्शक राजू फुलकर; संगीत सुरेश वाडकरअजित कडकडे)
  • झी टाॅकीजचा 'ही वाट पंढरीची' हा दूरचित्रवाणीपट
  • भक्तीचा मळा (प्रमुख भूमिका : केशवराव दातेमास्टर विनायक, दिग्दर्शन - केशवराव दाते) (१९४४)

संत सावता माळी


संत सावता माळी हे ज्ञानदेवांच्या काळातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ. स. १२५० चा आहे आणि त्यांनी इ. स. १२९५ मधे देह ठेवला. अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. सावता माळी यांच्या आजोबांचे नाव देवु माळी होते, ते पंढरीचे वारकरी होते. त्यांचे वडिल पूरसोबा आणि आई हे धार्मिक वळणाचे होते, पूरसोबा शेतीचा व्यवसाय सांभाळून भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत.
कर्म करीत रहाणे हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी शिकवण सावता माळी यांनी दिली. वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ संत म्हणुन त्यांचा लौकिक आहे. ते विठ्ठलाचे परम भक्त होते. ते कधीही पंढरपुरला गेले नाहीत. असे म्हटले जाते की खुद्द्द विठ्ठलच त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते.
त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर जप, तप यांची आवश्यकता नाही तसेच कुठे दूर तिर्थयात्रेला जाण्याचीही गरज नाही; केवळ ईश्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन केल्यास आणि श्रद्धा असल्यास ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो असा विचार त्यांनी मांडला.
सावता माळी यांनी ईश्वराच्या नामजपावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तिसाठी संन्यास घेण्याची किंवा सर्वसंगपरित्याग करण्याची गरज नाही. प्रपंच करतानाच ईश्वर प्राप्ति होऊ शकते असे म्हणणार्‍या सावता महाराजांनी त्यांच्या मळ्यातच ईश्वर पाहिला.
”कांदा मुळा भाजी l अवघी विठाबाई माझी ll

लसूण मिरची कोथिंबिरी l अवघा झाला माझा हरी ll ”
सावता महाराजांनी पांडुरंगाला लपवण्यासाठी खुरप्याने आपली छाती फाडून बालमूर्ती ईश्वराला हृदयात दडवून ठेवून वर उपरणे बांधून ते भजन करीत राहिले. पुढे संत ज्ञानेश्वर, नामदेव पांडुरंगाच्या शोधात सावता महाराजांकडे आले, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे पांडुरंग सावतोबांच्या छातीतून निघाले. ज्ञानेश्वर, नामदेव पांडुरंगाच्या दर्शनाने धन्य झाले. सावता महाराज म्हणतात – भक्तीमध्येच खरे सुख नि आनंद आहे. तीच विश्रांती आहे.
सांवता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा l

जेणे मुक्ती द्वारा ओळंगती ll

Categories

शीगवाला / नारायण सुर्वे

क्या लिखतो रे पोरा ! नाही चाचा -- काही हर्फ जुळवतो म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो गोंडेवली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो ...