मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर माहिती
आठ वर्षे सिबा कंपनीत, तीन वर्षे ॲनासिन बनविणाऱ्या जॉफ्री मॅनर्समध्ये, सात वर्षे राजस्थानातील कोटा गावच्या जे.के.सिंथेटिक्समध्ये आणि शेवटची तेवीस वर्षे दिल्लीच्या श्रीराम इन्स्टिटूटमध्ये संशोधकाची नोकरी करून दत्तप्रसाद दाभोळकर स्वेच्छानिवृत्त झाले. त्या काळात सरकारी क्षेत्रातील संशोधनाचाही त्यांनी अभ्यास केला. भारतातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संशोधनक्षेत्राने दिलेले योगदान अगदी नगण्य म्हणावे असे आहे, असा दाभोळकरांचा निष्कर्ष आहे. म्हणूनच, भारतातील विज्ञान-संशोधन क्षेत्रांत ज्या त्रुटी आहेत, त्यांवर प्रकाशझोत टाकणारे विपुल लिखाण दत्तप्रसाद दाभोळकरांनी केले आहे.
लेखनसंपादन करा
दत्तप्रसाद दाभोळकरांचे बहुतेक लिखाण हे शोधपत्रिकेच्या अंगाने केलेले वैचारिक स्वरूपाचे लेखन आहे. कविता, कथा, कादंबरी या स्वरूपाचे साहित्य दाभोळकरांनी फारसे लिहिलेलेच नाही. कॉलेजमध्ये असताना काही दोन चार कविता केल्या असतील तेवढ्याच. त्यांतली एक कविता ’बिजली’ या काव्यसंग्रहात छापली गेली आहे. ’ढगांमागून गडगडत’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या बालगीतांचा संग्रह मात्र प्रकाशित झाला आहे.
डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा
- छाया (कवितासंग्रह)
- ढगांमागून गडगडत (बालगीतसंग्रह)
- तुम्हाला विज्ञान युगात जगायचंय
- दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत
- ना डावंना उजवं (काश्मीर, रा.स्व.संघ आणि इतर लेख)
- प्रकाशवाटा : दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख (यांची चरित्रे)
- बखर राजधानीची
- (समग्र) माते नर्मदे (नर्मदा बचाव आंदोलनावरील पुस्तक)
- राजधानी इंद्रप्रस्थ
- विज्ञानेश्वरी (वैज्ञानिक गल्पमाला). (याच नावाचा एक ग्रंथ रवीन थत्ते यांचा आहे, मात्र तो संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीसंबंधात आहे.)
- शोध स्वामी विवेकानंदांचा
- समग्र माते नर्मदे (नर्मदा बांधविरोधी आंदोलनावरील पुस्तक)
दत्तप्रसाद दाभोळकरांवरील पुस्तकेसंपादन करा
- रंग याचा वेगळा...: दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन (व्यक्तिचित्रण, भानू काळे)
बुधवार, १० ऑगस्ट, २०२२
संत कान्होपात्रा
नको देवराया अंत आता पाहु।
प्राण हा सर्वता जावू पाहे।।
हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले।
मजलागी जाहले तैसे देवा।।
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी।
धावे वो जननी विठाबाई।।
मोकलूनी आस झाले मी उदास।
घेई कान्होपात्रेस हृदयास।।”
बुधवार, ५ जानेवारी, २०२२
रविवार, २ जानेवारी, २०२२
पुस्तकं
शनिवार, १ जानेवारी, २०२२
प्रिया तेंडुलकर
प्रिया तेंडुलकर (ऑक्टोबर १९, इ.स. १९५४ - सप्टेंबर १९, इ.स. २००२) ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.
प्रिया तेंडुलकर | |
---|---|
जन्म | प्रिया विजय तेंडुलकर ऑक्टोबर १९, इ.स. १९५४ |
मृत्यू | सप्टेंबर १९, इ.स. २००२ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय(चित्रपट, नाटक, टीव्ही); कथालेखन |
भाषा | मराठी, हिंदी |
प्रमुख चित्रपट | गोंधळात गोंधळ मुंबईचा फौजदार |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | रजनी |
वडील | विजय तेंडुलकर |
प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून त्यांनी नाट्यसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.
प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्मेदार कौन, किस्से मियॉं बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
चित्रपट/चित्रवाणी कारकीर्दसंपादन करा
- इ.स. १९७४- अंकुर
- इ.स. १९७८- देवता
- इ.स. १९८३- माहेरची माणसे, राणीने डाव जिंकला
- इ.स. १९८४- गोंधळात गोंधळ
- इ.स. १९८५- मुंबईचा फौजदार, रजनी(दूरचित्रवाणी मालिका)
- इ.स. १९८७- कालचक्र
- इ.स. १९८८- किस्से मियॉं बीवी के (दूरचित्रवाणी मालिका)
- इ.स. १९८९- एक शून्य शून्य (दूरचित्रवाणी मालिका)
- इ.स. १९९०- घर (दूरचित्रवाणी मालिका)
- इ.स. १९९४- मोहरा - चित्रपट
- इ.स. १९९५- त्रिमूर्ती - चित्रपट
- इ.स. १९९६- प्रिया तेंडुलकर टॉक शो (दूरचित्रवाणी मालिका)
- इ.स. १९९७- और प्यार हो गया, जिम्मेदार कौन(दूरचित्रवाणी मालिका), गुप्त - चित्रपट, हम पांच (दूरचित्रवाणी मालिका)
- इ.स. २०००- राजा को रानी से प्यार हो गया
- इ.स. २००१- प्यार इश्क और मोहोब्बत
- इ.स. २००२- देवता
अभिनय केलेली नाटकेसंपादन करा
- एक हट्टी मुलगी
- गिधाडे
- ती फुलराणी
आत्मचरित्रसंपादन करा
- फर्स्ट पर्सन (पॉप्युलर प्रकाशन)
अन्य पुस्तकेसंपादन करा
- असंही (ललित निबंध संग्रह)
- जन्मलेल्या प्रत्येकाला (कथासंग्रह) - जीवनानुभव
- जावे तिच्या वंशा (कथासंग्रह)
- ज्याचा त्याचा प्रश्न (कथासंग्रह)
- तिहार (असंग्रहित कथांचा संग्रह - प्रकाशन सन २०१५) (ललित प्रकाशन)
- पंचतारांकित - स्वतःविषयी असलेले अनुभवप्रधान लेखन २००६, पहिली आवृत्ती, डिंपल प्रकाशन, चौथी आवृत्ती राजहंस प्रकाशन पुणे, भारत
लक्ष्मीकांत देशमुख
रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१
अनंत फंदी
शुक्रवार, १६ जुलै, २०२१
निवडक कादंबरी वाङ्मय - ७
गुरुवार, १५ जुलै, २०२१
वैचारिक साहित्य IV
मंगळवार, १३ जुलै, २०२१
भाषाशास्त्र आणि व्याकरण
शीगवाला / नारायण सुर्वे
क्या लिखतो रे पोरा ! नाही चाचा -- काही हर्फ जुळवतो म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो गोंडेवली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो ...
-
सांस्कृतिक कार्यक्रम सुत्र संचलन चारोळ्या यात दिलेली माहीती ही संग्रहीत आहे, चारोळ्या अनेकांनी लिहलेल्या आहेत, त्या माझ्या नाहीत मी फक्...
-
नवा शिपाई ही कवी केशवसुतांची प्रसिद्ध कविता आहे. 'केशवसुत" या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांनी काव्य लेखन केलेले आ...