सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५
विंदा करंदीकर यांच्या 'घेता' कवितेचा भावार्थ
बालकवी यांच्या फुलराणी कवितेचा भावार्थ
बालकवी यांच्या फुलराणी कवितेचा भावार्थ
परिचय - त्र्यंबक बापूजी ठोंबरे (१८९०-१९१८)
ते निसर्गकवी म्हणून ओळखले जातात. १९०७मध्ये जळगावात पहिले कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी बालकवींच्या सभाधीटपणाला बघून 'बालकवी' ही उपाधी दिली.
त्यांच्या बहुतेक कवितांमध्ये निसर्ग मध्यवर्ती असला तरी निसर्गसौंदर्याचे वर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गातील विविध दृश्यांमध्ये त्यांना मानवी भावना दिसतात, म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही तर निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचा तो सहजोद्वार आहे. प्रेमाचे स्वरूप, बालवृत्ती, उदासीन प्रतिमासृष्टी, निसर्गाशी तादात्म्य, मानवी भावनांची गुंतवणूक, मानवी जीवनाच्या अपूर्णतेची जाणीव हे त्यांच्या काव्याचे विशेष दिसून येतात.
प्रस्तुत कविता त्यांच्या फुलराणी या कवितासंग्रहातून घेतलेली आहे.
प्रस्तुत कवितेत बालकवीने निसर्गसौंदर्याचे सुंदर शब्दशिल्प निर्माण केले आहे. रविकरण आणि फुलराणी यांच्या मनोरम प्रेमाविष्काराचे चित्र वाचकांसमोर विविध भाववृत्तीसह उभे केले आहे. या कवितेतून आलेले निसर्गसौंदर्य वाचकांचे लक्ष वेधून घेणारे आहे.
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालींचे;
त्या सुंदर मखमालीवरतीं फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणांत व्याज मनें होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला.
आईच्या मांडीवर बसुनी झोंके घ्यावे, गावीं गाणीं;
याहुनि ठावें काय तियेला--साध्या भोळ्या फुलराणीला ?
पुरा विनोदी संध्यावात डोलडोलवी हिरवें शेत;
तोच एकदां हांसत आला चुंबून म्हणे फुलराणीला--
"छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती?
कोण बरें त्या संध्येंतून - हळुच पाहतें डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा आवडला अमुच्या राणींना?"
लाजलाजली या वचनांनीं साधी भोळी ती फुलराणी !
आंदोलीं संध्येच्या बसुनी त्या रजनीचे नेत्र विलोल झोंके झोंके घेते रजनी; नभीं चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनीं केला निजलीं शेतें; निजलें रान चैन पडेना फुलराणीला; निजले प्राणी थोरलहान.
अजून जागी फुलराणी ही आज कशी ताळ्यावर नाहीं?
लागेना डोळ्याशीं डोळा काय जाहलें फुलराणीला ?
या कुंजांतुन, त्या कुंजांतुन मध्यरात्रिच्या निवांत समयीं इवल्याशा या दिवठ्या लावुन, खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर झुलुनि राहिलें सगळे रान प्रणयचिंतनीं विलीनवृत्ति डुलतां डुलतां गुंग होउनी निर्झर गातो; त्या तालावर -स्वप्नसंगमर्मी दंग होउन ! कुमारिका ही डोलत होती; स्वप्नें पाही मग फुलराणी
"कुणी कुणाला आकाशांत हळुच मागुनी आलें कोण प्रणयगायनें होतें गात; कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्तीं तों व्योमींच्या प्रेमदेवता विरहार्ता फुलराणी होती; वाऱ्यावरतीं फिरतां फिरतां हळूच आल्या उतरुन खालीं- फुलराणीसह करण्या केली, परस्परांना खुणवुनि नयनीं त्या वदल्या ही अमुची राणी !
स्वर्भूमीचा जुळवित हात नाचनाचतो प्रभातवात; खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला हळुहळु लागति लपावयाला आकाशींची गभीर शांती मंदमंद ये अवनीवरतीं;
विरूं लागलें संशयजाल संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचें वस्त्र लेवुनी स्वप्नसंगमीं रंगत होती हर्षनिर्भरा नटली अवनी; तरीहि अजुनी फुलराणी ती !
तेजोमय नव मंडप केला जिकडेतिकडे उधळित मोतीं लाल सुवर्णी झगे घालुनी कुणीं बांधिला गुलाबि फेटा आकाशीं चंडोल चालला हें थाटाचें लग्न कुणाचें ! लख्ख पांढरा दहा दिशांला, दिव्य वऱ्हाडी गगनीं येती; हांसत हांसत आले कोणी; झकमकणारा सुंदर मोठा ! हा वानिश्चय करावयाला; साध्या भोळ्या फुलराणीचें !
गाउं लागले मंगलपाठ, वाजवि सनई मारुतराणा नाचुं लागले भारद्वाज, नवरदेव सोनेरी रविकर लग्न लागतें! सावध सारे! दंवमय हा अंतःपट फिटला सृष्टीचे गाणारे भाट, कोकिळ घे तानांवर ताना ! वाजविती निर्झर पखवाज, नवरी ही फुलराणी सुंदर ! सावध पक्षी! सावध वारे ! भेटे रविकर फुलराणीला !
वधूवरांना दिव्य रवांनीं- कुर्णी गाइलीं मंगल गाणीं; त्यांत कुणीसें गुंफित होतें परस्परांचें प्रेम! अहा तें! आणिक तेथिल वनदेवीही दिव्य आपुल्या उच्छ्वासांहीं लिहीत होत्या वातावरणीं- फुलराणीची गोड कहाणी! गुंगतगुंगत कवि त्या ठायीं स्फूर्तीसह विहराया जाई; त्यानें तर अभिषेकच केला नवगीतांनीं फुलराणीला !
गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५
सावित्रीबाई जोतिराव फुले - प्रज्ञा दया पवार यांच्या कवितेचा भावार्थ
बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५
जग खूप सुंदर आहे.
सत्य सर्वांचे आदी घर - महात्मा जोतीराव फुले यांच्या निवडक अखंड काव्य रचनेचा भावार्थ
टीव्हीवर सिनमा चालू व्हता - दिशा पिंकी शेख यांच्या कवितेचा भावार्थ
मुंग्यांचे हरवत नाहीत आत्मसूर - वृषाली किन्हाळकर यांच्या कवितेचा भावार्थ
शिल्पकार ऐसा - प्रकाश मोगले यांच्या कवितेचा भावार्थ
एक समूह - उत्तम कांबळे यांच्या कवितेचा भावार्थ
गोधड - वाहरू सोनवणे यांच्या कवितेचा भावार्थ
बेभरवशाचे जगणे - जगदीश कदम त्यांच्या कवितेचा भावार्थ
निरालय - खलील मोमीन यांच्या कवितेचा भावार्थ
अक्षरे चुरगाळिता - ना. धों. महानोर यांच्या कवितेचा भावार्थ
अक्षरे चुरगाळिता - ना. धों. महानोर
परिचय - नामदेव धोंडो महानोर (१९४५-२०२३)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेड या गावी जन्म. थोर निसर्गकवी. कथाकार, कादंबरीकार, गीतकार म्हणून प्रसिद्ध. निसर्ग हा महानोरांच्या कवितेचा आणि जीवनाचाही मूलाधार आहे. 'रानातल्या कविता', 'वही', 'पावसाळी कविता', 'अजिंठा', 'पानझड', 'गाथा शिवरायाची', 'पळसखेडची गाणी', 'प्रार्थना दयाघना', 'पक्ष्यांचे लक्ष थवे', 'दिवेलागणीची वेळ' इ. काव्यसंग्रह प्रकाशित. 'गांधारी' ही कादंबरी, 'गावाकडच्या गोष्टी' हा कथासंग्रह तर 'गपसप' हा लोककथांचा संपादित संग्रह आहे. 'जैत रे जैत', 'सर्जा', 'एक होता विदूषक', 'मुक्ता', 'दोघी' इ. चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले.
भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा किताब देऊन सन्मानित केले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार व इतर प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांचे लेखन सन्मानित झाले आहे. ग्रामीण जीवनातील कष्ट, दुःखभोग व लोकजीवनाचे दर्शन त्यांच्या कवितेतून घडते. निसर्गाची जिवंत व रसरशीत चित्रणे, गेयता, लयबद्धता, नादमयता इ. वैशिष्ट्ये त्यांच्या काव्यातून प्रतीत होतात. प्रस्तुत कविता त्यांच्या रानातल्या कविता या कवितासंग्रहातून घेतलेली आहे.
प्रस्तुत कवितेतून अंतरीची ऊर्जा आयुष्याच्या प्रवासाला कशी बळ देणारी ठरते, हा आशय प्रकट झाला आहे. अक्षरांच्या संगतीने प्रकाशमान झालेल्या आयुष्याची गाथा कवीने मांडली आहे.
मराठी नाटक प्रारंभ ते १९९५
मराठी रंगभूमी दिवस
मराठी नाटक प्रारंभ ते १९९५
०५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने मराठी नाट्य लेखक व नाट्य कलावंतांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
या दिवसाचे औचित्य साधून आपण आजच्या ब्लॉगमध्ये मराठी रंगभूमीचा किंबहुना मराठी नाट्य वाङ्मयाचा आढावा घेणार आहोत.
⭐नाटक आणि रंगभूमी
नाटक आणि रंगभूमी या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. नाटक हे नाट्यसंहितेशी निगडित आहे, तर रंगभूमी ही नाटकाच्या प्रयोगाशी निगडित आहे. नाट्यसंहितेचा प्रयोग रंगभूमीवर होत असतो. नाटककार नाटक लिहितो म्हणजेच तो संहिता तयार करतो आणि त्या संहितेचा प्रयोग हा रंगभूमीवर सादर होत असतो. तसेच रंगभूमीवर प्रयोग सादर होतो म्हणून नाटककार नाट्यसंहिता लिहितो असेही आपल्याला म्हणता येते. या अनुषंगाने विचार केला तर नाटक आणि रंगभूमीचा संबंध आणि इतिहास हा खूप प्राचीन आणि नाटक संहिता आधी की रंगभूमी आधी या वादग्रस्त प्रश्नावर जाऊन संपू शकतो. या प्रश्नाचा फारसा विचार न करता आपण रंगभूमी म्हणजे नाटक हा रूढ झालेला अर्थ गृहीत धरून आणि उपलब्ध संदर्भ ग्रंथांच्या आधारे मराठी नाट्य इतिहासाचा आढावा घेणार आहोत.
मराठी नाट्य वाङ्मयाचा इतिहास हा कालखंडानुसार आरंभ ते १८८०, १८८० ते १९२०, १९२० ते १९५०, १९५० ते १९९० असा केला जातो. आपणही याच पद्धतीने नाट्य वाङ्मयाचा इतिहास तपासणार आहोत.
वर्तमान पातळीवर प्रादेशिक अंगाने विचार केला तर मराठी नाटक हे आज स्वतंत्रपणे विकसित झालेले असले तरी मराठी नाटकांच्या पूर्वीही आपल्याला भारतात नाट्य परंपरा दिसून येते. साधारणपणे इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन २०० हा कालखंड भरतमुनीच्या नाट्यशास्त्राच्या जडणघडणीचा कालखंड मानला जातो. आपल्या नाट्यशास्त्रात भरतमुनींनी नाटकाविषयीचे अतिशय सविस्तर आणि दीर्घ विवेचन केलेले आहे. रंगभूमी अस्तित्वात होती त्यातूनच हे विवेचन अस्तित्वात आलेले असावे किंबहुना नाट्यपरंपरेचा इतिहास आणि मागोवा घेऊन भरतमुनींनी नाट्यशास्त्राची रचना केली आहे. असे आपल्याला म्हणता येते. कारण आधी भाषा येते नंतर व्याकरण तोच संबंध येथेही लावता येतो.
“अंगी कलांचा व्यक्तिशः किंवा समुदायाने अविष्कार करण्याची भूमी किंवा स्थान म्हणजे रंगभूमी” विश्वकोशात असलेली ही रंगभूमीची व्याख्या लक्षात घेतली तर केवळ संस्कृत नाटकच नव्हे तर रंगभूमीशी निगडित असलेले विविध लोक कलाप्रकार आपल्याला दिसतात. यात गोंधळ, दशावतारी खेळ, लळीते, दंडार, भारुड, बहुरूपी आणि तमाशा या लोककला प्रकारात आपल्याला मराठी रंगभूमीची बीजे दिसून येतात. संस्कृत रंगभूमीच्या आधीही हे लोक कलाप्रकार अस्तित्वात होते आणि आज मराठी रंगभूमी विकसित झाल्यावर ही हे लोककलाप्रकार जीवनामध्ये अस्तित्वात आहेत.
⭐मराठीतले ‘पहिले नाटक’
मराठी रंगभूमीच्या आरंभाविषयी मराठी समीक्षकांमध्ये मतभेद दिसून येतात. “कै. विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली येथे सांगलीचे संस्थानिक अप्पासाहेब पटवर्धन यांच्या उपस्थितीत ‘सीता स्वयंवर’ या नावाचा दशावतारी ‘खेळ’ सादर केला. या घटनेच्या आधारे सांगली हे मराठी नाटकाचे ‘माहेरघर’ कै. विष्णुदास भावे हे मराठी नाटकाचे ‘जनक’ आणि ‘सीता स्वयंवर’ हे मराठीतले ‘पहिले नाटक’ ही समजूत रूढ झाली आहे. ही समजूत दृढ व्हावी म्हणून ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमीचा वर्धापन दिन आहे असे गृहीत धरून हा दिवस साजरा करण्याची प्रथा ही रूढ झालेली आहे.”( प्रा. दत्ता भगत, मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास, पृ.२९) प्रा. दत्ता भगत यांनी अतिशय सविस्तरपणे मराठी रंगभूमीच्या आद्यत्वाविषयीची चर्चा केलेली आहे. यासाठी त्यांनी काही कसोट्याही लावलेल्या आहेत त्यात कालप्रमाण आणि नाट्यसंहिता या दोन कसोट्यांचा विचार केला तर त्यांनी पुढील प्रश्न उपस्थित करून मराठी नाटकाचे आद्यत्व ठरवायचे कसे यासंदर्भातील विवेचन केले आहे. त्यांच्या मते
१. लक्ष्मीनारायण कल्याण इ स.१६८४
२. सं. सीता स्वयंवर इ. स.१८४३
३. प्रबोध चंद्रोदय इ.स. १८५१
४. तृतीय रत्न इ. स.१८५५
५. व्यवहारोपयोगी नाटक इ स १८५६
६. नाटक थोरले माधवराव पेशवे याजवर इ. स.१८६१.
वरीलपैकी कोणते नाटक पहिले नाटक होय ? असा ते प्रश्न उपस्थित करतात आणि त्या प्रश्नाचे उत्तरही अतिशय तार्किकपणे देतात. त्यांच्या मते
⭐'लक्ष्मीनारायण कल्याण 'मराठी रंगभूमीवरील उपलब्ध पहिले नाटक कारण या नाटकाचे हस्तलिखित उपलब्ध आहे. परंतु याचा प्रयोग झालेला आहे किंवा नाही याविषयीची
वि. वा. शिरवाडकर यांनी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन केले आणि त्या नावानेच ते प्रसिद्धही झाले. त्यांनी नाटके मात्र वि. वा. शिरवाडकर या नावानेच लिहिली. राजमुकुट, दूरचे दिवे, दुसरा पेशवा, कौंतेय, ययाती आणि देवयानी, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, चंद्र जिथे उगवत नाही इत्यादी त्यांची लोकप्रिय नाटके आहेत. यातील ‘नटसम्राट’ या नाटकाने तर इतिहासच असलेला आहे याच नाटकासाठी त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला.
⭐महेश एलकुंचवार
महेश एलकुंचवार साधारणपणे १९६५ नंतर लिखाण करणारे महत्त्वाचे नाटककार आहेत. त्यांनी गार्बो, वासनाकांड, वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगांत ही नाटके लिहिली आहे. यातील वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत या तीन नाटकांच्या संचाला आज मराठी प्रेक्षक नाट्यत्रयी म्हणून ओळखतो.
⭐गो.पु. देशपांडे
गो.पु. देशपांडे यांची उध्वस्त धर्मशाळा, अंधारयात्रा, विष्णूगुप्त चाणक्य, सत्यशोधक ही लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाटके आहेत. विचार प्रवर्तक नाटककार म्हणून देशपांडे यांचा उल्लेख होतो.
⭐सतीश आळेकर
सतीश आळेकर यांचे मिकी आणि मेमसाहेब, महानिर्वाण, बेगम बर्वे, महापूर इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
⭐दलित रंगभूमी
१९७० ते ९० या दोन दशकात दलित साहित्याने आपली मुद्रा मराठी साहित्यावर नोंदवली. त्यातच दलित रंगभूमी ही आघाडीवर होती. यात प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, संजय पवार, रामनाथ चव्हाण, प्रकाश त्रिभुवन इत्यादी लेखकांनी महत्त्वाचे नाट्य लेखन केले आहे.
⭐दत्ता भगत यांचे वाटा पळवाटा, खेळीया,जहाज फुटल आहे आणि इतर एकांकिका, अश्मक इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
![]() |
| दत्ता भगत |
⭐प्रेमानंद गज्वी यांचे तनमाजोरी, किरवंत, गांधी आंबेडकर इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत तर त्यांच्या ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेने महाराष्ट्रभर ख्याती मिळवलेली आहे.
⭐रामनाथ चव्हाण यांचे साक्षीपुरम, बामणवाडा इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
⭐प्रकाश त्रिभुवन यांचं ‘थांबा रामराज्य येतंय’ या नाटकानेही इतिहास घडवला.
⭐संजय पवार यांचे ‘कोण म्हणतं टक्का दिला ?’ हे एक प्रसिद्ध नाटक आहे.
⭐सुरेश खरे
विंदा करंदीकर यांच्या 'घेता' कवितेचा भावार्थ
विंदा करंदीकर यांच्या 'घेता' कवितेचा भावार्थ परिचय - गोविंद विनायक करंदीकर (१९१८-२०१०) मराठीतील अतिशय महत्त्वाचे प्रयोगशील कवी, अनुव...
-
सांस्कृतिक कार्यक्रम सुत्र संचलन चारोळ्या यात दिलेली माहीती ही संग्रहीत आहे, चारोळ्या अनेकांनी लिहलेल्या आहेत, त्या माझ्या नाहीत मी फक्...
-
नवा शिपाई ही कवी केशवसुतांची प्रसिद्ध कविता आहे. 'केशवसुत" या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांनी काव्य लेखन केलेले आ...
.png)
.png)